३) मिथुन– ही राशी चक्रातील ३ री राशी आहे. मृग नक्ष्त्राचे ३ रे व ४ थे चरण, आर्द्रा व पुनर्वसूचा १ ला व २ रा चरण या राशी मधे येतात. ही पुरुष, सकारात्मक, मूक, जुळी, निष्फ़ळ, व्दि, वायु राशी आहे. मिथुन राशीचा अधिपती बुध हा … Continue reading मिथुन राशीफ़ल ( Mithun Rashiphal )
ही राशि चक्रातील दुसरी रास आहे. कृतिका मध्ये दुसरा, तिसरा व चौथा चरण, पूर्ण रोहिणी मात्र व मुग नक्षत्र मध्ये प्रथम व दुसरा चरण या राशि मध्ये असतो.
वृषभ राशि पृथ्वी तत्व, स्थिर, स्त्री राशि, अर्धफलदाई, चतुष्पाद व लघु उदित राशि जाहे, या राशिचे चिन्ह हिन्दू व पाश्चात्य पद्धति मध्ये बैल मानतात, असाधारण शिंग असलेला ज्याचा डोक्या वर व शिंग असताना दिसतात. याची दृष्टि सदैव वर असते, व त्या आपला इट्टी व ढ स्वभाव दर्शवितो.
वृषमचा स्वामी शुक आहे. वृषभ मध्ये चन्द्र उच्चीचा असतो कारण की वृषभ मंगळा ची वृश्चिक राशितून सातवा असतो. म्हणून मंगध्ठा करिता नुक्सान दायक आहे. मंगष्ठ चा उग्र स्वभाव भावुक, शांतीप्रिय शुक्राव्दारे सौम्य केला जातो.
1. शारीरिक आकृति – ऊंची सामान्य, शरीर जाड़े, डोक्याचा पुढील माग रुंद, जाडी व स्थूल मान, चमकदार डोळे, काळे केस, सुन्दर चेहरा, सुदृढ़, शरीर कमवलेले, रुंद खांदे व सुविकसित मासपेशी.
2. विशेषता- पृथ्वी तत्वाच्या तीन राशि पैकी वृषभ, प्रथम राशि होय व स्थिर राशि मध्ये ही प्रथम होय. पृथ्वी तत्वाची असल्यामुळे उत्कट उत्साह असतो, ते सहनशील व धैर्यवान असतात. लोक सहनशील व्यक्तिची तुलना पृथ्वीशी करतात, जी निरंतर कार्य करित असते, पण जेव्हा रागामध्ये उत्तेजित होतात व उत्तेजित होउन एखाद्या भूकंपाप्रमाणे मयंकर होतात. ते हिंसक व निडर होतील.. वृषभ जातक धीम्या गतीने व नियमित कार्य करणारे असतात. परिश्रमी, उद्योगप्रिय, धैयवान, सहनशील व प्रशासनमध्ये कुशल असतात. ते परंपरावादी असतात व आपल्या शक्तिचा अपव्यय करीत नाहीत.
स्थिर तत्व राशि असल्याने एकाग्रता, आत्मशक्ती चांगली असते. बुद्धीपेक्षा भावामधे जास्त लीन असतात. ते निश्चित मताचे व कट्टरवादी असतात. वृषभ जातक हट्टी व निश्चयी सिद्ध होतील. ते दुसरें लोकांचे तर्क विचार समजून घेतील पण एकदा मत बनवले अथवा सवय लागली की ते बदलणे फ़ार कठीण आहे. कोणतेही कार्य विचारपूर्वक करतात, पण वेळेची वाट पहात थांबत नाहीत, जर त्यात फ़ायदा दिसत असेल.
वृषभ रास पार्थिव व स्थिर दोन्ही आहे. वृषभ जातक पैशाची नीट काळ्जी घेणारे, ते आपली प्राप्ती सावकाश प्राप्त करतात, पण जेव्हा ते पैसा आवशयक आहे असे डोक्यात घेतील तेव्हा हात धुवुन मागे लागतील. ते दीर्घकालीन योजनांचे सुयोग्य संचालक असतात. कोणी कौतुक करो अथवा टीका ते आपल्या योजनेपासून ढळत नाहीत व चिकाटीने सफ़लता प्राप्त करतील. सांसारिक अधिकार, उत्तम भोजन आस्वाद घेणारे, मिठाईला प्राधान्य देणारे असतात. (२ री रास धन, कुटुंब, पैसा दाखवते.) ते सांसा रिक असतात, जीवनामध्ये उत्तम वस्तूंचा आनंद उपभोगतात. ते डोके अधिक कार्यरत ठेवतील व कमी भावनावश होतील तर त्यांची निकोप प्रकृती राहील. वृषभ जातक स्वाभाविक प्रकृतीचा सरळ स्वभावाचा, निष्पक्ष व ईमानदार असतात त्यामुळे त्यांच्या विचारधारेवर निर्भर राहू शकतात.
राशिचा स्वामी शुक्र जाहे म्हणून व्यक्ति उत्साही व प्रसन्नचित राहतील. चेहरा व वाणी, वक्तृत्व चांगले असेल कारण स्वामी शुक्र आहे. वृषभ जातक आपली विचारधारा स्वत: बनवतात व सामान्यत: चूक करत नाहीत. आपले मनसुबे, विचार गुप्त ठेवतात. काही जातक नेहमी तोंड कडू करतील व कूट्नीती जाणणारे असू शकतात व त्याला समजणे फार कठिण आहे. शुक्र दर्शवितो की तो आपल्या जीवनामध्ये कोणत्याही भागामध्ये वर येईल, कारण तो आपल्या नातेवाईकांच्या शुभकामना व अधिक स्नेह प्राप्त करेल. वृषभ जातक माग्यशाली असेल व दैवी शक्ति द्वारा वागिने, हीरे, जवाहर, फ़र्निचर, सुख सुविधा, आरामाच्या वस्तू प्राप्त होतील. त्याला राज्य, बगीचा, प्राप्त होतील व त्याचा शौक बागायती करण्याचा असेल, ताँ अश्या गोष्टी मध्ये अधिक रुचि दाखवेल व आनंदी जीवन घालवेल. सर्व आनंददायक प्राकॄतिक सौंदर्य त्यांना नेत्रसूख देतील. जर या राशीमध्ये शनी स्थित असेल व शुभ दॄष्ट असेल तर जातक एकांतात अथवा ग्रामीण जीवन व्यतीत करेल.
3. प्रेम-राशी स्वामी शुक्र असल्याने ज्यच्यावर प्रेम करतात ते खरे व मनापासून करतात. मग ते कितीही विपरित परिस्थितीत का असेनात. युवावस्था पार पडेपर्यंत मात्र आत्मनियंत्रण जरुरी असते. विशेष करुन जेव्हा शनी वॄषभेस पाहतो अथवा शनी वॄषभ लग्नी स्थित असतो. या व अशा काही घटकांमुळे तो जातक भौतीक गोष्टींचा आनंद घेताना अनीतीचा मार्ग स्वीकारु शकतो, त्यामुळे मनांस वेसन घालणे आवश्यक ठरते.
शुक्र कोणत्याही व्यक्तीस कला, संगीत, मूर्तीकला, नाटक, सिनेमे ईत्यादीमध्ये आवड निर्माण करतो. परंतू ते भाग्यशाली असतात जे पैशाचे व व्यवहाराचे महत्व जाणतात. सरळ मार्गाने कष्ट करुन धन एकत्र करत नाहीत तेव्हाच ते आराम करतात. जेव्हा ते पैसा प्राप्त करतात तेव्हा त्यांचा खिसा पूर्ण भरलेला असतो पण आधी बचत खात्यात टाकतात वा एफ़ डी करतात. वस्तूत: ते पैसे कमावून साठवण्यामधे विश्वास करत नाहीत वा अडकलेल्या पैशाचा जास्त विचार करत माहीत. त्यांना हे पटत असते ते घाई गडवड करुन पैसा लगेच मिळत नाही मात्र तरीही पैसा कमावण्यासाठी घाई करतात व प्रसंगी नुकसान करुन घेतात.
4. कमजोरी- हट्टी असू नय्रे व कार्य एकदम हळू गतीने करु नये.स्वार्थ व बदल्याची भावना मनात धरु नये, ज्याम्धे व्देष भरलेला असेल.
5. आरोग्य- वृषभ जातकांस साधारण्पणे उत्तम आरोग्य लाभते. यांच्यामधे इतर मानवीय शक्ती असते तांत्रीक अथवा पश्चिमी व्यवसायांस उत्तम असते. ते ईतरांपेक्षा अधिक कष्ट सोसू शकतात. त्यांना दुखवण्यारेबद्दल कमी भावुकता असते, व ते शारिरिक अक्षमता मनाने स्वीकारु शकत नाहीत. व कोणाला काही न सांगता अधिक काळ दु:खी राहतात. आजारी पडले तर हळ्हळू आरोग्य सुधारते. टॊन्सिल्स, गळा, जिभेचा टाळू, अपचन, हाय ब्लड प्रेशर, कोड, नेत्र रोग ई. वाढत्या वयाबरोबर वाढत जाऊ शकतात.
6. धन व संपत्ती- वृषभ जातक धैर्य व परिश्रम युक्त असतात. हे धन्संचय करताना धन गाडून अथवा लपवून ठेवू शकतात. खर्च करताना आवश्यकतेचा विचार करतात. धनसंचय असला तरी हिशोबीपणे कार्य करतात व जोखीम न घेता पैसा सुरक्षित ठेवतात. व अनावश्यक अपव्यय करत नाहीत. वृषभ पासून २ रे व ५ वे स्थानाचा अधिपती बुध असल्याने संबंधित दशेत सट्टा खेळण्याकडे कल असू शकतो. भाग्याने त्यांना बुधाच्या दशेत सफ़लता मिळते, यात संघर्ष करावा लागला तरी पैसा हाती येतो.सामान्यपणे शनी पापग्रह मानला जातो पण वृषभ जातकास शनी जातकाने पूर्व जन्मामधे कोणकोणते गुण संपन्न केले आहेतव या जन्मात काय भाग्य रुपाने प्राप्त करणार आहे हे दर्शवणार्या ९ व १० व्या स्थानाचा अधिपती असल्याने शुभ फ़ळ देतो.
7. नोकरी वा व्यवसाय- वृषभ जातक भौतिक संपत्तीसाठी काम करतात. ते जमिनीकरता खर्च करु शकतील वा जमिनीचा, फ़ळे, फ़ूल, चहा, कॊफ़ी, ई. संबंधित व्यवसाय करतील. त्यांचे आसपास बाग बगिचे वा वनराई असेल. बुध हे दर्शव्तो की त्यांच्याजवळ दुसर्यांकरता देखील पैसा असेल म्हणून ते दलाल, कमिशन एजंट असु शकतात.
ते कार्यशील राहून पाया मजबूत बनवण्याचा प्रयत्न करतात व आपल्या प्राप्तीची पूर्ण गुंतवणूक न करता शिल्लक ठेवुन सफ़लताचे बचतीशी मूल्यांकन करतात.
वृषभ जातक आरामयुक्त असल्याने जीवनात संपूर्ण आनंद प्राप्त करण्याची ईच्छा ठेवतात. राशि स्वामी शुक्र असल्याने‘ ते विलासी, लक्झुरियस वस्तूंचा व्यापार करु शकतात. सौन्दर्यवर्धक वस्तू, सुगंधित अत्तर, हिरे, जवाहिराचे व्यापारी असू शकतात. राशी चक्रातील २ री राशी असल्याने व दुसरे स्थान वित्त दाखवत असल्याने बैंक मालक, अथवा कंपनी व्यवस्थापन मंडळ, स्टॊक दलाल, खजांची, सट्टेबाज, जुगार चालक, रेस लावणारे असू शकतात.
शुक्र कला, संगीत, आनंद व सामाजिक सफ़लताचा द्योतक आहे.म्हणून जातक संगीत क्षेत्रात, अभिनेता, फ़िल्म निर्माता, थि‘एटर मालक असू शकतो.
बिल कलेक्टर, रेव्हेन्यू कलेक्टर किंवा त्या विभागात नोकरी, धरण बांधणारा, शिंपी, केमिस्ट, पेंटर, डेकोरेटर, वीमा एजंट, मोटर चालक, टैक्सीचालक, मालक, ट्रन्स्पोर्टर, काच, अभ्रकम प्लास्टिक, रबर, तांदुळ, पशू, दुध डेअरी फ़ार्म, आईस्क्रीम, चांदी, कापूस, पेट्रोल, ऊस व साखर ई. संबंधित व्यवसाय संबंधित ग्रह वृषभ राशी शी संबंधित असताना दर्शविले जातात.
शुक गृह स्त्री ग्रह आहे. वृषभ पण स्त्री राशि जाहे म्हणून कोणी कन्या विद्यालया मध्ये व लेडीज क्लब, कोर्ट, आयकर, विक्रीकर विभाग, इत्यादि मध्ये नोकरी करू शकतो.. कानामध्ये एरिंग, बांगड्या, पड्याष्ठ, औहै, बामडे, ईअरिंग, बांगड्या, सौंदर्य प्रसाधने, पार्लर, वधुवर सुचक ई. व्यापार देखिल शुक द्वारे प्रदर्शित होतात.
अचुकता ज्योतिषावर निर्भर करते की वृषभ राशीशी संबंधित ग्रहाची स्थिती, नक्षत्र, दृष्टी ई संबंध तपासून मग अनुमान काढावे.
उदा. गरम दूध विक्रेता असेल तर वृषभ राशीशी चंद्र व अग्निमय ग्रह मंगळाचा संबंध असेल. आईस्क्रीम विक्रेता असेल तर चंद्र शुक्र व थंड ग्रह शनीचा संबंध असेल ई.
8. कौटुंबिक-. वृषभ पुरुष जातक उत्तम पदावर व स्त्री उत्तम गृहिणी असते. हे आनंदमय व अनुकुल जीवन व्यतीत करतात. यांना घरीच आराम, सुख व शांती मिळते. त्यांना जन्मभूमी पसंत असते व शांती, आनंद, समृद्धी, प्रसिद्धी, मान त्यांना पुष्कळ प्राप्त होतो. लोकांना खाऊ घालणे पार्टी देणे यांना आवडते. अतिथीने त्यांचे कौतुक करावे असे वाटते. हे घर कलात्मक फ़र्निचर, झाडॆ, ई याने सजवतात, स्वच्छ, उत्तम ठेवतात.
9. वैवाहिक- वृषभ जातक सामन्यपणे जोडीदाराची निवड करताना निश्चय करण्यास जास्त वेळ घेतात.पृथ्वी तत्वाची राशी असल्याने यांना पृथ्वी व जलतत्वाचे जोडीदार योग्य ठरतील. (वॄषभ, कन्या, मकर, कर्क, वृश्चिक, मीन) शांती, आनंद, एकता यानी जीवन व्यतीत होईल. रसिक व प्रेमी असतील. प्रेम करत असतील तर शेवटपर्यंत विश्वसनीय राहतील. भावना व विचार गहन असतात. भांडन आवडत नाही व शंकेचा त्यांना राग येतो. वृषभ जातक पुरुषाची पत्नी प्रेमळ असू शकते. पण या राशीत जन्मलेल्य स्त्री चा पती पुष्कळ प्रेमळ व स्त्री रसिक असते. प्रेम त्यांच्यकरत वास्तविक असते. हे आपली सामाजिक व आर्थिक जबाबदारी पूर्ण करतील. दयाळू व प्रेमळ व्यवहार करणारे असतात. घटस्फ़ोट फ़ार कमी होतात.हे अपरिमित दु:ख सहन करतील पण जोडीदाराला कष्ट होऊ देत नाहीत. हे जोडीदारास उत्तम जागा, प्रेम व उत्तम सांभाळ प्रदान करतात. जोडीदाराची मागणी पूर्ण करण्यात यांना आनंद वाटतो. यांचे जोडीदार उच्च घरातील असतात व शक्यतो अनोळखी जोडीदार मिळतो. कारण ७ वे स्थानाची स्वामी १२ वे स्थानाचा पण अधिपती असतो. हे आपले पारिवारिक जीवन विस्कटलेले पसंत करत नाहीत. कोणत्याही गोष्टी चा पश्चत्तप ही करत नाहीत आणी तारुण्यात केलेल्या मौज मजेचा परिणाम ही होऊ देत नाहीत. वॄषभ जातकाची पत्नी पती व भाऊ दोन्हीचा सन्वय साधते. त्यांना पती प्रेमाबद्दल शंका वाटू शकते, पण स्वत:चे रहस्य सांगत नाहीत.
10. संतती- वृषभ आपल्या मुलांच्या बाबतीत काहीवेळा कठोर असतात. पण त्यांची भावना चांगली असते. संतती आइ वडील व मोठे यांना मान देतात. मुले सुदृढ व बुद्धिमान असतात.
11. भाग्य दिवस- सामान्यपणे शुकुवार भाग्यशाली , बुधवारला मोठ्यात मोठी सफलता मिष्ठते . शनिवार विलंब करतो पण निराश करत नाही व शेवटी सफ़लता देतो. छोटे प्रवास वा आनंददायक पत्रव्यवहार दर्शवतो. रविवार आवडीच्या गोष्टीत रमतो. मंगळ्वार मनोरंजनात अथवा वेळ वायफ़ळ जातो.
मेष राशि चक्रातील प्रथम क्रमाकाची राशि आहे, ही अग्नी रास असून उग्र स्वभावाची आहे. तसेच चतुष्पाद व निष्फ़ळ रास आहे. ही चर रास असून, पुरुष, सकारात्मक व लघु उदित रास आहे. मेंढा हे राशी चिन्ह मानले जाते. ही पूर्व दिशेची राशि म्हणविली जाते. मेष रास डोके व चेहरा दर्शवते.. राशि स्वामी मंगव्ठ आहे,
मेष लग्न रास अथवा चंद्र रास असलेली व्यक्ती उतावळ्या स्वभावाची, गुढ प्रिय व विध्वंसप्रिय, साहसी असते.
1- शारिरीकआकार – या राशीमधे जन्मलेले व्यक्ति मध्यम उंचीवाले असतात, त्याचे शरीर दुबळे व मांसयुक्त असते. ते मजबूत ही नसतात व लट्ठही नसतात. रंगरूपाने गुलाबी व लांब मान व चेहरा असतो. त्याचे डोके वरुन रूद व हनुवटीकडे अरुंद असे असते. भुवया केसाळ व डोळे भुरे व तेजस्वी असतात. केस काळे व राठ असू शकतात.
2- मानसिकप्रवृत्ति – या राशीमधे जन्मलेले व्यक्ति क्रियाशील व महत्वाकांक्षी, दृढ व प्रेरक असतात, जर लग्न पडित असेल ते उतावळे, आक्रमक व विध्वंसप्रिय, असतात. लाभदायक दृष्टी असल्यास आत्मविश्वासू व हिंमती असतात. उद्देश नेहमी उच्च असतो व साहसी असतात.
3-विशेषता – या राशीमधे जन्मलेले व्यक्ति त्यांना सर्व बाबतीत पुढाकार मिळावा अशी आकांक्षा बाळगतात. ते अन्य लोकांच्या सल्ल्यावर अवलंबून रहात नाहीत, आपल्या स्वत:च्या निर्णयानुसार कार्य करतात ते कोणाच्या अधिनस्थ रहाणे पसंत करीत नाही. ते विचार व कार्याने नेता बनू पाहतात. लाभदायक दृष्टी असल्यास ते दुस-यांना मार्गदर्शन करणे, नियंत्रित करणे, य दुस-यावर प्रशासन करण्यामध्ये सुयोग्य असतात. सकारात्मक राशि असल्यामुळे निश्चयात्मकता व चारित्र्य शक्ति वेते अत्माविश्वासाने व शीघ्र गतीने कामे करतात. त्यापमध्ये प्रशासकीय योग्यता अधिक व तडजोड न करण्याची प्रवृत्ती असते. चर राशीचे असल्याने ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या बदलून टाकतात व संधी वाट पहात न बसता ते स्वत: संधी निर्माण करतात. अग्नी राशी असल्याने नुसता विचार करुन थांबत नाहीत तर लगेच त्याप्रमाणे कृती करण्यासाठी उत्सूक असतात. ते कोणत्याही नियतीचा, स्थितीचा सामना करण्यात सक्षम असतात, दुस-या करिता आपल्या व्यक्तिगत इच्छेचा त्याग करीत नाहीत. ते स्वत:च्या दृष्टिकोणावर अधिक भर देतात, ते ईतरांना- तुच्छ मानतात, ते अधिक आशावादी असतात, चौकटीच्या बाहेर जाऊन कार्य करणारे व व्यापाराकडे कल असतो. ते उडी घेण्यापुर्वी विचार करत अथवा डगमगत नाहीत. स्थिरता त्याचा गुण नाही. ते आपल्या हाताचे साहसिक कार्य पूर्ण करण्याचा आधीच दुस-याचे साहसिक कार्य हाती घेतील. ते साधनांपेक्षा परिणामांवर जास्त भर देतात.
जर ते कोणाचा अधिनस्थ असतील व नरम स्थिति असेल तरी देखिल ते कोणत्याही शाखेचे प्रमुख होऊ पाहतात, ते कोणतीही योजना लवकर बनवतात व अन्य लोकांना मार्गदर्शन करत कार्यास प्रवृत्त करतात.
जर एखाद्या ग्रहाने पीहित असेल तर भांडण वा वाद करण्यात तरबेज असतात व त्यांना नीट हाताळले नाही तर आक्रमक होतात व संतापतात. दुराग्रही, आक्रमक, घमंडी, अहंकारी, संतापी, भांडखोर, विध्वसंक बनतात.
4- आरोग्य – सामान्य पणे स्वास्थय उत्तम बसते. स्पर्शजन्य रोगापासून ते मुक्त असतात व प्रतिकार शक्ती चांगली असते. कारण राशि स्वामी मगष्ठ असतो. परन्तु त्याना लहान सहान जखमा, खरचटणे वारंवार होते. कधी कधी दुर्घटनेत डॊक्यास मार लागू शक्तो, जे धोकादायक आहे, तरी सावधानता बाळगणे गरजेचे आहे, विशेष रूपाने जेव्हा ते कार चालवित असतील अथवा तीक्ष्ण हत्याराने कार्य करीत असतील. शक्तीप्रयोग व चपळता मुळे मेष राशीचे स्त्री व पुरुष दोघेही खेळाचे फ़ार शौकीन असतात., ते अधिक काळात समाप्त होणा-या खेळापेक्षा लवकर समाप्त होणा-या खेळामध्ये फार निपुण असतात,
मेष डोळ्यांची सुचक रास आहे. ६ वे स्थानी कन्या रास येते, त्यामुळे पचन क्रिया संबंधी त्रास दर्शवतो. ते डोकेदुखी, आगीमध्ये भाजणे, ज्वलनशील बीमारी, डोक्यावर घाव, वातशूळ, निद्रानाश, उच्चज्वर, पोटदुखी, लकवा, फिट्स चक्कर येणे, खाज, खरुज, देवी, हिवताप, मानसिक रोग वाहिणीमध्ये रक्त साचणे ई. रोग त्रास देऊ शकतात.
त्यांनी अधिक आराम, पुरेशी झोप, व भाजीपाला युक्त जेवण आवश्यक आहे. भावना कमी उद्दीपीत व नियंत्रिक करणे शिकले पाहीजे. दु:ख, उत्तेजना व क्रोध सोडायला हवा. उत्तेजक पदार्थ व मांसाहार शक्यतो टाळणे आवश्यक.
5-धनवसंपत्ती– मेष राशि जातकाना पुष्कष्ळशी संपत्ती प्राप्त होत नाही. परन्तु त्याची इच्छा अधिक कमविणे, व त्यानुसार प्रयत्न करण्याची असते. धन व संपत्ती उत्तेजित होऊन खरेदी व संपत्तीचा विनियोग केल्याने नुकसान होते. उद्याचा विचार न करता, चालू फ़ायद्याचा विचार करणाने नुकसान होते. मेष मध्ये पापग्रह असेल तर असे मानतात की सुरुवात घाईगडबडीत करतात व शेवट वादात होतो. ते आपला जमाखर्च कथीच मांडत नाहीत व नंतर त्यांना मेळ लागत नाही. योग्य मार्ग म्हणजे की काम करण्या आधी विचार करावा. ते दुस-याना बचत चा सल्ला देतील व स्व्त: त्याचे पालन करीत नाही.
6- प्रणयवविवाह– मेष रास स्पष्ट्वक्तेपणा व प्रेमामाध्ये उत्साही असते. उत्तम स्वभाव व प्रसन्नवदन भिन्न लिंगी व्यक्तीस आकर्षित करते. मेष राशिच्या स्त्रिया चतुर व स्वतंत्र असतील. जर रास पीडित असेल तर दिखावा करण्याविरुद्ध वास्तविक पारिवारिक वातावरणामध्ये रमते व ती नेहमी जापल्या परिवाराची स्तुति करेल, हव्यास व घमंड कमी आढळून येईल. ती नेह्मी आपल्या पति सहवासास उत्सुक असेल. ती नेहमी स्वत:ची प्रशंसा करेल.
जर मेष राशिच्या स्त्रिचा विवाह साधारण मनुष्याशी झाला तर सर्व बाबतीत तो त्याचावर अधिकार गाजवणारी व त्यास काबूत ठेवणारी असेल, कारण की यांचा स्वभाव आक्रमक असल्याने पति करिता धैर्य तसेच चतुर व्यवहार करता येणे हे जरुरी आहे. मेष स्त्रिया फार रोमांचक व उत्साही असतात.
सिंह अथवा धनु राशि मध्ये जन्मलेली व्यक्ती पति-पत्नीला दोघेही तोंड देण्यास सक्षम असतात. तुळ मध्ये जन्मलेले लोक मेषेला रसिकता कौशल्याने हाताळतील व शांती टिकवून ठेवतील.
मेष रास फ़ार वांछित प्रेमी सिद्ध होतील. ते साधारणपणे सुंदर, चतुर व उत्तम पत्नीची निवड करतात. ते उदारता, दानशीलता ला प्राधान्य देतात. मेष पती पैसे हाती नसताना देखील अधिक उधारीमध्ये खरेदी करु शक्तात. म्हणून ज्याचा विवाह मेष राशि वाल्या पतिशी होतो त्यानी पति अपरोक्ष पैसा वाचविण्याचा प्रयत्न करावा.
7- कौटुंबिकवातावरण– मेष मध्ये उत्पन्न व्यक्ति आपले पर व कुटुंबावर प्रेम करतो. ते नेहमी आपल्या नातेवाईकांना बरोबर घेऊन राहतात. ते घरास स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न ही करतात. ते सर्वोत्तम आतिथ्य सत्कार करितात व उत्तम संगत करतात. त्यांना तो मित्रांची कमी कथी ही होणार नाही. ते नेहमी त्याना भेटत राहतात व त्यांना खुश ठेवतात जे त्यांना आवडतात.
8-व्यवसाय– मेष मध्ये उत्पन्न व्यक्ति अशा प्रकारचे व्ययसाय जे मंगळाच्या अधिकारामधे येतात, एखादा ग्रह कोणाच्या कुंडलीमध्ये 2, 6 व 10 व्या स्थानात वा त्या स्थानांच्या अधिपति असल्याने मेषेशी अथवा मंगळाशी संबंधित असेल तर तो स्थळ सेना, अधिकारी, केप्टन, शिपाई, प्रतिरक्षा विभाग तस्य चिकित्सक, कसाई, न्हावी, पोलिस, पिलीस अधिकारी, औषध विक्रेता, मुख्य प्रशासक, चोर, सोनार, लोहार, शिंपी, चाकू सुरे विकणारा, स्वयंपाकी, ईस्त्री दुकान, स्वयंपाकी, सुतार, खेळाडू, बंदुक बनवणारे, मुष्टियोद्धा, लोखंडाच्या जागेत काम करणारा, फ़ायरमन, गुप्तहेर, मेकैनिक, पहेलवान, विटा व चुना चे काम करणारा, जमिनीचे व्यवहार करणारा, खेळ साहित्य विक्रेता, लाल रंगाचे साहित्य विकणारा, कंपनी, मिल कामगार ई. असू शकतो.
९– भाग्यकारकदिवस–:मंगव्ठवार, शुक्रवार, शनिवार सोमवार रविवार साधारण ठीक बुधवार व गुरुवार खर्चिक व हानिकारक असतील,
१०– भाग्यांक– ९, ८, ६,
११-भाग्य रत्न- नीलम
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे) संपर्क : 7058115947 (सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह) प्रत्येक क्षणावर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा वा ग्रहांचा प्रभाव असतो. व त्याप्रमाणे घटना घडताना त्याचे परिणाम अनुभवास येतात. असे कार्येश ग्रह जर शोधून काढता आले तर एखादे घटनेचा अंदाज वर्तवण्यात अधिक अचुकता येऊ शकते. कै. कृष्णमूर्तींनी आपल्या अथक संशोधनाने Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह) ही संकल्पना शोधून काढली. जन्मकालिन कुंडलीतील एखाद्या घटनेचे कार्येश ग्रह, घटना घडताना चे कार्येश ग्रह व त्यासंबंधी तळमळीने प्रश्न सोडवतानाचे कार्येश ग्रह हे सारखेच वा संबंधित असतात हे यामागिल तत्व आहे. व याव्दारे जन्मकुंडली नसेल तरीही काही विवक्षित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हे मोठे दालन उघडले गेले आहे. काही नामांकित ज्योतिर्विदांनी या पद्धतीस कृ.प. मधील चमत्कार, जादूची कांडी वा यक्षिणीची कांडी अशी संबोधने बहाल केली आहेत.
खाली दिलेल्या नियमांप्रमाणे असलेले ग्रह प्रश्नवेळी क्रियाशील असतात. १. L : प्रश्नवेळी चालू असलेल्या लग्नाचा स्वामी १००% फ़ळ देतो २. S : प्रश्नवेळी असलेल्या चंद्र नक्षत्राचा स्वामी ७५% फ़ळ देतो ३. R : प्रश्नवेळी असलेल्या चंद्र राशीचा स्वामी ५०% फ़ळ देतो ४. D : प्रश्नवेळ दिवसाचा स्वामी (सुर्योदया पासून पुढील सुर्योदया पर्यंत) २५% फ़ळ देतो
या Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह) वापर अचुकतेसाठी अनेक प्रकारे केला जातो. काही ज्योतिषी प्रश्न कुंडली म्हणजेच प्रश्न सोडवतानाची अंशात्मक कुंडली व Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह) चा वा जन्मकुंडली व Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह) चा संयुक्त वापर करतात. काही प्रश्नात समजा एखादी गोष्टीचा आकारमान, रंग ई. ओळखायचे असल्यास वा घटना लवकर वा उशीरा घडणार असल्यास ग्रहाच्या नैसर्गिक कारकत्वाचा वापर करतात. मुलाला वा मुलीला किती % मार्क मिळू शकतात अशा प्रश्नांमधे ना उत्तरांचे पर्याय ठरवून त्यानुसार अंदाज वर्तवतात. चोराचे वर्णन, हरवलेली वस्तू, हरवलेली व्यक्ती, पुनर्मिलन, विवाह योग, संतती, दत्तक योग, घटस्फ़ोट, परदेश गमन, शस्त्रकिया कधी करावी पासून लॊटरी लागेल का पासून लाईट कधी येणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देता येऊ शकतात. अशा पद्धतीने जन्म कुंडली देऊ शकणार नाही इतक्या सुक्ष्मतेने उत्तरे देता येऊ शकतात. पण माझ्या अनुभवाने उत्तरे तेव्हाच जास्त अचुक येतात जेव्हा जातकाची प्रश्न विचारण्याची आंतरिक व प्रामाणिक तळमळ, प्रश्न सोडवण्याची अचुक वेळ व ज्योतिषाचा अनुभव हे सारे जमून येते. तर मित्रांनो आपलेही काही असे प्रश्न असतील व जाणून घेण्याची तळमळ असेल तर नक्कीच या पद्धतीचा लाभ घेऊ शकता.
-ज्योतिष मित्र मिलिंद
ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only) contact@jyotishmitramilind.in jyotishmitramilind.in
भविष्यात काय फळ मिळेल हे जाणून घेण्याची उत्सुकता असणारे प्रत्येक पिढीत आहेत. काही जण या विषयावर फार गंभीर असतात तर काही जणांना विरंगुळा म्हणून फळ जाणून घ्यायची इच्छा असते.
यातील राशी भविष्य हा प्रकार फारच लोकप्रिय आहे. पण राशी च्या ही आधी आपल्या हिंदू विद्वानांनी नक्षत्र चक विकसित केले होते. राशी चक्रात ३६० अंशांचे १२ भाग विभागून ३० अंशाच्या राशी तयार होतात, त्याच प्रमाणे ३६० अंशांचे २७ भाग विभागून १३ अंश २० कलेची नक्षत्रे तयार होतात. यावरून लक्षात येईल की नक्षत्र फळे ही राशी फळांपेक्षा जास्त सूक्ष्म होत.
या दोन्ही चक्रांचा योग्य विचार व सांगड घालून जाणकार ज्योतिषी एक उत्तम भविष्यवेत्ता होतो. उत्तम अनुभव देणारी विशोत्तरी दशा पद्धत ही जन्म नक्षत्र नुसार निर्मित आहे, पण त्यांची फळे अभ्यासताना राशीं देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. असो.
आज आपण पाहणार आहोत की, जन्मवेळीं असलेल्या नक्षत्रा प्रमाणे एखाद्या व्यक्तीस काय फळ मिळू शकते.
ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)
१ अश्विनी नक्षत्र : धनी, हसतमुख, सुंदर, बुद्दिमान, चाग्ले कपडे, दागिणे ची आवड, उत्तम शरीर, जनप्रिय, प्रत्येक कामात तर्बेज, परोपकारी, यशस्वी, वाहन एवं नोकर युक्त, भाग्योदय २० वर्ष नंतर , यशस्वी, ऐश्वर्य संपन्न, नम्र, स्पष्ट वक्ता, अस्थिर, चरित्रवान, उद्देशपूर्ति साठी काहीही करणारा, अशुभ ग्रह दशा मधे सूर्य, मंगल व् गुरु अंतरदशामधे शत्रु कष्ट, चोरी चे भय २ भरणी नक्षत्र : सत्यवादी, उत्तम स्वाथ्य,सन्मार्गी,, सुखी, स्त्रियांचे आकर्षण, अस्थिर मनोवृत्ति, परदेश प्रवासची इच्छा, दीर्घायु, शत्रुंजय, भाग्योदय २५ वर्ष नंतर, काही वेळा दुखापती होतात, मितभाषी, क्रूर व् कृतघ्न, नीच कर्म रत, अशुभ ग्रह दशा मधे व चन्द्र, राहू, शनि अंतरदशा मधे शत्रु, कष्ट, चोरी चे भय ३ कृतिका नक्षत्र : कामी, कंजूस, मित्र नतेवाईकांशी मतभेद, हाती घेतलेले काम तडीस नेणारा, खाण्यापिण्याचा शौक़ीन, स्त्रियांशी मैत्री, स्वत:च्या पद्धतीने काम करणारा, बुद्दिमान, लोभी, प्रसिद्ध, तेजस्वी, आशावादी, चांगले व्यक्तिमत्व, दिसायला भव्य, भाग्योदय २९ वर्ष नंतर, अशुभ ग्रह दशा मधे व मंगल, गुरु, बुध अन्तर्दशा मधे शत्रु, कष्ट चोरी चे भय ४ रोहिणी नक्षत्र : सुंदर आकर्षक, लोभस व्यक्तिमत्व, सत्य व मधुर भाषी, लोकप्रिय, कार्यक्षम, कलाकार, बुद्धिप्रधान, दृढ निश्चयी, रात्रीचा जन्म असल्यास खॊटे बोलणारा, कठोर मन, वासना जास्त, तीव्र स्मरण शक्ति, मोठे डोळे, रूद कपाळ, आळशी, भाग्योदय ३० वर्ष नंतर, अशुभ ग्रह दशा मधे राहू, शनि, केतु अंतर दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय ५ मृगशिरा नक्षत्र : कामी, जलद चाल कोपी, चालाक, वादपटू, भित्रा विव्दान, संतान व मित्र युक्त, चंचल वृत्ति, अभिमानी, भाग्योदय २८ वर्ष नंतर, अशुभ ग्रह दशा मधे, गुरु, बुध, शुक्र अंतरदशा मधे शत्रू, कष्ट, चोरी चे भय ६ आद्रा नक्षत्र : नम्र स्वभाव, बुद्दिमान, परिस्थितीशी सामना करणारा कमाई व खर्च सारखाच चांगल्या कामात रुची ठेवणारा विचलित मन, हलके विचार अल्पशिक्षित धार्मिक कामामधे प्रदर्शन करणारा फिटर वर्कर, फोरमेन, इंजिनीयर ई. भाग्योदय २५ वर्ष नंतर, अशुभ ग्रह दशा मधे शनि केतु सूर्य अंतर दशामधे शत्रु, कष्ट चोरी चे भय ७ पुनर्वसु नक्षत्र : बुद्दिमान, विद्वान् शीतल स्वभाव खुप मित्र व संतती सुख युक्त, पांढरे रंगाची आवड, प्रवासाची आवड काव्य प्रेमी मातृ-पितृ भक्त, आनंदमय जीवन, कामात प्रसिद्धी, , स्वकर्मी पण परोपकारी, जास्त तहान लागते, अहंकारी दुष्ट, दुर्बुद्दी, मुर्ख भाग्योदय २४ वर्ष नंतर, अशुभ ग्रह दशा मधे बुध शुक्र चन्द्र अंतर दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय ८ पुष्य नक्षत्र : बुद्दिमान, सुशील हुशार, धार्मिक, मदत करणारा,, अल्पसंतुष्ट, आकलनशक्ती, चतुर कार्यदक्ष, सुन्दर सत्यवादी, कुटुंब प्रेमी, विशाल ह्रदयी प्रवक्ता, कार्य कुशल, अतिथि प्रेमी करुण मन, कवि लेखक पत्रकार वकील अध्यन – अध्यापन क्षेत्राची आवड, प्रशासकिय कार्यात दक्ष वस्त्राभूषण नोकर वाहन युक्त भाग्योदय ३५ वर्ष नंतर, समाजिक प्रतिष्ठा प्राप्त, अशुभ ग्रह दशा मधे केतु, सूर्य व् मंगल अंतर मधे शत्रु कष्ट चोरी चे भय ९ आश्लेषा नक्षत्र : सत्कर्मी, मोठे कुटुंब, साधू संतांची सेवा करणारा, स्वधुंदीत मग्न, फ़ायदा असेल तर नीती अनीती चा विचार न करणारा,, आप्तेष्टांशी मतभेद, मद्य प्रेमी, धूर्त लम्पट, चिडखोर, दुराचारी, निर्लज्ज, शत्रुंजय, औषध व्यापार मधे लाभ, परस्त्रीआसक्त भाग्योदय ३० वर्ष नंतर, अशुभ ग्रह दशा मधे शुक्र चन्द्र राहु अंतर दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय
१० मघा नक्षत्र : धनवान, पत्नीप्रेमी, खुशहाल, आइ वडीलांची सेवा करणारा, चतुर, व्यवहार कुशल, व्यापारात लाभ, योजनाकार, कामसु अस्थिर चित्तवृत्ति, अत्यंत साहसी, अस्वास्थ्य, घमंडी, परिश्रमी, अहंकारी, स्त्रिआसक्त, व्यर्थ वाद विवाद करणारा, मुळापर्यंत जाण्याची क्षमता,भाग्योदय २५ वर्ष नंतर, अशुभ ग्रह दशा मधे सूर्य मंगल व् गुरु अंतर दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय ११ पूर्वा फाल्गुनी : शत्रुंजय, हुशार, कामात निपुण, मृदु भाषी, मोठ्या लोकांत ऊठ्बस, स्त्रियांना आकर्षित करणारा, सरकारी कामाशी संबंधित, राजकीय वर्तुळात वावरणारा, दानी, वस्त्राभूषण वाहन, प्रवासाची आवड, धनवान संतान युक्त, नृत्य– संगीत प्रेमी, मिस्कील व खुषमस्करी, अधिक मित्र, कमावलेले शरीर, नेतृत्वाची आवड, भाग्योदय २८ – ३२ वर्ष दरम्यान, अशुभ ग्रह दशा मधे, चन्द्र राहु शनि अंतर दशा मधे शत्रु कष्ट व चोरी चे भय १२ उत्तरा फाल्गुनी : धन संचय करणारा, विलासी मर्दानी खेळाची आवड, कुशाग्र बुद्धि, मृदुभाषी, सत्यवचनी, मदत करणारा, अधिक संतती, मेहनती, पत्नी वाद घालणारा, भाग्योदय ३० – ३२ वर्ष दरम्यान, अशुभ ग्रह दशा मधे मंगल गुरु बुध अंतर दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय १३ हस्त नक्षत्र : जातीमधे नेता, मुखिया, विरोधकांना टक्क्र द्यायची क्षमता, चरित्र हीन, क्रोधी, मद्यप्रेमी, पत्नी ची तब्येत नाजूक व् संतती चुकीच्या संगतीने वाया जाण्याचा धोका, अशांत मन, भाग्यशाली, सम्मानित, किर्किरा स्वभाव, भाग्योदय ३०- ३२ वर्ष मधे, अशुभ ग्रह दशा मधे राहु शनि केतु अन्तर्दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय १४ चित्रा नक्षत्र : बुद्धिमान, साहसी, धनवान, दानी, सुशील, शरीर सुन्दर, स्त्री व् संतान सुख उत्तम, धार्मिक, आयुर्वेद वर विश्वास, सिव्हिल इंजिनीयरींग मधे रुची, सौंदर्य प्रसाधन प्रेमी, चित्रकला अभिनय, बहुमूल्य वस्तुं चा व्यापार, प्रभावी व्यक्तिमत्व, गायन गणित, लेखनकला ई गुणसंपन्न. भाग्योदय ३३ से ३८ वर्ष मधे. अशुभ ग्रह दशा मधे गुरु, बुध, शुक्र, अंतरदशा मधे शत्रु कष्ट व् चोरी चे भय १५ स्वाति नक्षत्र : समजंस, शीतल स्वभाव, मित्रवत, हुशार व कुशल व्यवसायी, बौद्धिक कार्यों द्वारा मनासारखा लाभ, यशस्वी, अर्धवट शिक्षण, आर्थिक द्रष्टया संपन्न व् ऐश्वर्यशाली, समाजात मान, इंजीनियर व् टेक्नीकल क्षेत्र, परोपकारी व् साधू संतांचि सेवा करणारा. भाग्योदय ३० से ३६ वर्ष मधे. अशुभ ग्रह दशा मधे शनि, केतु, सूर्य अंतरदशा मधे शत्रु कष्ट व् चोरी चे भय १६ विशाखा नक्षत्र : सुंदर, धनवान, कावेबाज, वाद घालणारा, लोभी, बोलण्यात हुशार, सामान्य बुद्धि, क्रोधी, अहंकारी, कामासक्त, मद्यप्रेमी, जुगारी, स्त्री आसक्त, पाप पुण्य न मानाणारा, मतलबी, अचानक धन प्राप्ती, शत्रुंजय, कष्ट्दायक जीवन, भाग्योदय २१-२८-३४ वर्ष मधे, अशुभ ग्रह दशा मधे बुध, शुक्र, चन्द्र, अंतर दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय १७ अनुराधा नक्षत्र : शक्तिशाली, स्थूल शरीर, धनवान, मान,सम्मान प्राप्त, कामात तरबेज, प्रवास करणारा, अस्थिर मनोवृत्ति, साहसी, पराक्रमी, यशस्वी, स्वावलंबी, सुन्दर व्यक्तिमत्व, खादाड, धार्मिक, अध्ययनशील, एकांत प्रिय, दानी सहिष्णु. सरकारी नोकरी, स्वार्थ साधणारा, मृदुभाषी, स्त्रियांना आकर्षित करणारा, भाग्योदय ३९ वर्ष नंतर. अशुभ ग्रह दशा मधे केतु सूर्य मंगल अंतर दशा मधे शत्रु कष्ट व् चोरी चे भय १८ ज्येष्ठा नक्षत्र : चतुर, कामात हुशार, खूप मित्र, संतोषी, शीतल स्वभाव, कलेची आवड, क्रोधी, धार्मिक स्त्री चा आदर करणारा, ,सुन्दर व्यतिमत्व, चांगली संतान, गृहस्थ जीवन सुख बरे, कवि, लेखक, पत्रकार, साहित्यकार, प्रशाशक, निरीक्षक, वकील चार्टर्ड एकाउंटेंट. २७,३१,४९ वर्ष आरोग्य जपा, अशुभ ग्रह दशा मधे शुक्र, चन्द्र, राहु, अन्तर्दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय १९ मूळ नक्षत्र : विशाल ह्रदय, गंभीर, धनी, समाजात मान, कमजोर स्वास्थ्य, वाकपटु, चतुर, धूर्त, स्वार्थी, वाचाल, लोकप्रिय, संतापी, सतत अडीअडचणी, भाग्योदय २७ या ३१ वें वर्ष मधे, अशुभ ग्रह दशा मधे सूर्य मंगल गुरु अंतर दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय २० पूर्वाषाढा नक्षत्र : बुद्धिमान, उपकारी, सगळ्यांचा मित्र, सर्व कामात हुशार, संतान सुख, उदार, स्वाभिमानी, शत्रूंजय, अधिक धन प्राप्ती बरी असुनसुद्धा अडत नाही, भाग्यशाली, कार्य कुशल, यशस्वी, पत्नी सुख चांगले, भाग्योदय २८ वें वर्ष मधे, अशुभ ग्रह दशा मधे चन्द्र, राहू, शनि अन्तर्दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय २१ उत्तराषाढा नक्षत्र : परोपकारी, मान सम्मान प्राप्त, हुशार, चतुर, बहादुर, संगीत प्रेमी, विनम्र, शांत स्वभाव, धार्मिक, सुखी, सर्व प्रिय, विद्वान, बुद्धिमान, मेहनती धनी, सट्टेबाजी चा शौक, कुसंगति चा धोका, कामुक, विनासायास धन प्राप्ति, भाग्योदय ३१ वें वर्ष मधे, अशुभ ग्रह दशा मधे मंगल, गुरु, बुध अंतरदशा मधे शत्रु, कष्ट, चोरी चे भय २२ श्रवण नक्षत्र : धनी, बडबड्या, बुद्धिमान, साहसी, प्रसिद्द, नेक, पत्नी सुन्दर, गणित, ज्योतिष आवड,, मनातले विचार ओळखणारा, १९ – २४ वे वर्ष खराब असू शकते, विवेकी, विद्वान, उच्च विचार, धार्मिक, उत्तम व्यक्तिमत्व, उच्च पदाधिकारी, काव्य, संगीत, सिनेमा मधे रूचि, अशुभ ग्रह दशा मधे राहु, शनि, केतु अन्तर्दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय २३ धनिष्ठा नक्षत्र : बंधू प्रेमी, धनवान, नेक, साहसी, सत्कर्मी, स्त्रियाम्ना आवडणारा, सरकारी संबंधित काम, दागिन्यांचा शौकिन, समाजात इज्जत व् मान, १५, १९, २३, वर्ष अशुभ, धर्मं कर्म मधे लिप्त, संपन्न, उदार, वासना ग्रस्त, कामुक, पत्नी ला दबकून राहणारा, लोभी, स्त्रियांवर खर्च, अशुभ ग्रह दशा मधे गुरु, बुध, शुक्र अंतर दशा मधे शत्रु, कष्ट, चोरी चे भय २४ शततारका नक्षत्र : धनवान, सत्यवादी, दानी, प्रसिद्द, सत्कर्मी, बुद्धिमान, हुशार, शत्रुंजय, इज्जतदार, सरकारी पद, सत्कार, परस्त्री आसक्त, २८ वे वर्ष विशेष महत्वपूर्ण, जुगार, व्यसनी, सट्टेबाज, साहसी, निडर, ज्योतिष प्रेमी, साधारण धन, अन्य व्यक्तीच्या धनाची लालसा, अशुभ ग्रह दशा मधे शनि केतु सूर्य अन्तर्दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय २५ पूर्वाभाद्रपदा नक्षत्र : धनवान, सुंदर, खुप बोलका, कुशल, झोप प्रिय, अनेक साथीदार, संतान सुख उतम, पटकन चिडणारा, कार्यदक्ष, चतुर, धूर्त, डरपोक, सहन शक्ति कमी, कामुकता, स्त्रियांकडुन धोका खाणारा, पत्नी चंचंल, गृहस्थ जीवन सामान्य, भाग्योदय १९ से २१ वर्ष मधे. अशुभ ग्रह दशा मधे बुध, शुक्र, चन्द्र अंतर दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय २६ उत्तराभाद्रपदा नक्षत्र : सुन्दर, पराक्रमी, साहसी, बुद्धिमान, रंग गोरा, वाचाल, दानी, शत्रुंजय, धार्मिक, धनवान, उदार, परोपकारी, सुखी, धन-धान्य व् संतती युक्त. अध्ययनशील, जबाबदार, लेखक, पत्रकार, संगीतज्ञ, सफल संसार, म्रदु भाषी पत्नी, भाग्योदय २७ से ३१ वर्ष दरम्यान. अशुभ ग्रह दशा मधे केतु, सूर्य, मंगल अन्तर्दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय २७ रेवती नक्षत्र : आई वडीलांची जाण ठेवणारा, बुद्धिमान, साधू स्वभाव, तेज वाणी, व् मित्रांबरोबर खुश राहणारा, शरीर पुष्ट, निरोगी काया, साहसी, सर्वप्रिय, धनवान, सुपुत्रवान, कामातुर, सुन्दर, चतुर, कुशाग्रबुद्धि, सल्ला देण्यात हुशार, चांगला व्यापारी, कवि लेखक, पत्रकार, निबंधकार, कादंबरीकार स् दृढ निश्चयी, प्रतिभाशाली, सर्वगुण संम्पन्न, सुन्दर पत्नी वाला, चरित्रवान, गृहकर्तव्य तत्पर, मधुर भाषी. १७ वें, २१ वें, २४ वें वर्ष अशुभ. अशुभ ग्रह दशा मधे शुक्र- चन्द्र राहु अन्तर्दशा मधे शत्रु कष्ट चोरी भय
२१ डिसेंबर, २०२० रोजी रात्री ७.३० ते ९.३० या वेळेत गुरु व शनी हे दोन ग्रह सर्वात जवळील अंशात्मक युती करणार आहेत. यानंतर असा योग २०८० साली येईल. ज्योतिष शास्त्रानुसार या युतीचे परिणाम कसे आहेत यासाठी सुजाता यांनी सुचवल्याप्रमाणे हा लेख प्रपंच. ज्योतिश शास्त्रानुसार गुरु शनी युती हा एक महासंयोग आहे. गुरु व शनी युती समसंबंध दर्शवते. ते एकमेकांशी वैर व हानी न करता शनी गुरुचा आदर राखतो. शनी कर्माचा कारक ग्रह असून गुरु चांगल्या कर्माचे फ़ळ देतो. दोन्ही ग्रह मंदगती व प्रभाव शाली आहेत. तसे पाहता शनी मकर राशीत असताना २० नोव्हेंबर २०२० ला च गुरु ने मकर राशित प्रवेश केला आहे. व ५ एप्रिल २०२१ पर्यंत दोघे याच राशित असणार आहेत. फ़क्त आता अंशात्मक अंतर जवळ्जवळ शून्य असणार आहे.
आपल्याला आठवत असेल च मी एफ़ बी लाईव्ह ईंटरव्ह्यू मधे सांगितले होते की नोव्हेंबर डिसेंबर मधे लस बाजारात व करोनाचा हळूहळू परिणाम कमी होईल तरी मे पर्यंत यागोष्टीचा प्रभाव राहील. याचे कारण च हे आहे की शनी वर गुरु चा प्रभाव पडणार आहे. व शनीच्या अनिर्बंध प्रभावाला रोक लागणार आहे. कारण पारंपारिक दृष्टीने गुरु हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे व शनी हा क्रुर ग्रह आहे. दोन्ही न्याय देणारे पण गुरु भक्तीने सद्रुदयतेने सन्मार्ग दाखवतो. तर शनी सत्त्याचे दर्शन घडवून डोके वठणीवर आणतो.
आता आपण या युतीचे राशीनुसार होणारे परिणाम पाहू. हे परिणाम त्या त्या राशीच्या लोकांना जास्त जाणवतील, ज्यांची गुरु, शनी अथवा संबंधित कारक ग्रहांची दशा चालू असेल.
मेष : कर्म भावात युती असल्याने कर्मावर चांगला प्रभाव पडेल. आपल्या सोबत काम करणारे सहकारी ना आपण खूप मदत कराल. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. कौटुंबिक सौख्यात काही अडचणी येऊ शकतात. काही जनांना वारसा हक्काने घर प्राप्त होऊ शकते.
वृषभ : भाग्य स्थानात युती असल्याने धार्मिक कार्य, परोपकार या बाबतीत अग्रेसर असाल. मान सन्मान वाढेल. प्रवासाचे योग येतील. समाजात प्रतिष्ठित लोकांमधे ऊठबस वाढेल. नोकरीत बदल होण्याचे संकेत आहेत.
मिथुन : मांगल्य स्थानात युती असल्याने अध्यात्मिक अनुभव येतील. भौतिक स्तरावर ही युती अनिष्ट जाईल. धनहानी, खर्च वाढतील. आरोग्याच्या तक्रारी राहतील. कुटुंबात सदस्य वाढ होऊ शकते.
कर्क : सप्तम स्थानात युती असल्याने चांगली धनप्राप्ती होऊ शकते. व्यापारात वाढ होण्यासाठी आपली दूर दृष्टी कामी येईल. आरोग्य चांगले राहील व व्यक्तिमत्त्व उजळून निघेल. व समाजात चांगली छाप पडेल. लोकप्रियतेत वाढ होईल व बढतीचे योग. फ़क्त अहंकारापासून लांब रहा.
सिंह : आरोग्य स्थानात युती असल्याने आप्ले आरोग्य नरम राहिल. अपचन, पित्त, गैसेस, मूत्राचे त्रास ई होऊ शकतो. नवीन कोर्ट कचेरी नुकसानदायक होऊ शकते. पूर्वीचे दावे आपल्या बाजूने निकाल लागू शकतो. खर्चात वाढ होऊ शकते. परिवारातील कोणा सदस्याच्या आजारपण काळजीचे कारण बनू शकते.
कन्या : पंचम स्थानात युती असल्याने प्रेम संबंधात अडथळे निर्माण होतील. पण जर आपले खरे व निश्चल प्रेम असेल तर यातून पार पडाल व एकत्र रहाल. शिक्षणाच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. संतती होण्यासाठी चांगला काळ. प्राप्ती वाढू शकेल. समाजात आप्ले स्थान उंचावेल. काहीना नोकरीत बदल संभवतो.
तुळ : सुख स्थानात युती असल्याने परिवारात वाद विवाद निर्माण होतील. या काळात घर बदलले जाऊ शकते. एखादी यंत्र खरेदी करुन उत्पादन सुरु करु शकता.आपल्या कामाचे लाभ मिळतील व कौतुक होईल. घरात पूजा अथवा धर्मिक कार्य संपन्न होऊ शकते.
वृश्चिक : तृतीय स्थानात युती असल्याने अनेक छोटे प्रवास होऊ शकतात. आपले आचरण धार्मिक राहील व यश व किर्ती प्राप्त कराल. धनप्राप्ती करताना आळ्स दाखवला तर चांगल्या संधी निसटून जातील. दुसरेस मदत करताना स्वत: कष्ट घ्याल. या काळात आपले सहकारी निवडताना विशेष सतर्क रहा. धाकटे भाऊ बहीण यांचे आरोग्याकडे लक्ष द्या.
धनु : द्वितीय स्थानात युती असल्याने आपल्या बोलण्यात गंभीरता येईल. तुमच्या वाणीने लोक प्रभावित होऊन त्यचा लाभ होईल. कौटुंबिक मतभेद व पैशावरुन वाद टाळा. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्याकडे लक्ष द्या.
मकर : लग्न स्थानी युती असल्याने अचानक प्रसिद्धी मिळु शकते. समाजात अथवा संस्थेत एखादे चांगले पद मिळू शकते. सांधे दुखी अथवा गैसेस चा त्रास होऊ शकतो. व्यापारासाठी चांगला काळ. वैवाहिक संबंध घनिष्ठ राहतील.
कुंभ : व्ययस्थानत युती असल्याने खर्चात वाढ होईल. दुसरे लोग आपण करत असलेल्या मदतीचा गैरफ़ायदा घेतील. कोर्ट कचेरीसाठी जास्त खर्च होईल. विरोधी प्रबळ असतील.
मीन : लाभ स्थानात युती असल्याने धनप्राप्तीत वाढ होईल. समाजीतील प्रतिष्ठित लोकांशी संबंध प्रस्थापित होतील व उच्च पद मिळेल. नोकरीत वरिष्ठ खुश असल्याने त्याचा लाभ होईल. प्रेम संबंधात थोडा संघर्षाचा व परीक्षेचा काळ असेल. शिक्षणासाठी अनुकुल असेल.
आज बरेच दिवसांनी ज्योतिष विषयक लेख घेऊन समोर येताना मला खुप आनंद होत आहे. जसे लौक डाऊन शिथील झाले तसे नोकरी व्यवसायात अधिकच व्यस्त होत गेलो. त्यामुळे लेख लिहायला सवड मिळणे मुश्किल होऊन बसले. आज माझे एक स्नेही श्री. श्रीकांत यांनी शेअर आणी ज्योतिष याबद्दल लिहावे असे सुचवले त्यानिमित्ताने लेख लिहायला घेतला. मुळात शेअर हा विषय अनिश्चिततेने ग्रासलेला, जर अंदाज बरोबर आले तर फ़ायदा नाहीतर लाखोंचे नुकसान. अशा विषयावर शेअर घेताना कुंडलीतील कोणत्या घटकांचा विचार फ़ायदेशीर ठरु शकतो याबद्दल लिहायला मला नक्कीच आवडेल. असो. एखाद्या कंपनीचा शेअर घेणे किंवा भागदारक होणे याची आपण थोडी विभागणी करु. १. शेअर घेण्यासाठी त्या कंपनीची व ईतर कंपन्यांची सद्य स्थिती, वाटचाल, यांचे तुलनात्मक सखोल द्न्यान व अभ्यास सातत्य व संयम २. माहिती व अनुभवाच्या आधारे शेअर निवड व कधी घ्यायचा व कधी विकायचा याविषयी समयसुचकता व बौद्धिक क्षमता ३. योग्य ब्रोकर ची निवड अथवा कैलक्युलेटेड रिस्क वा सुरक्षित जोखीम ४. निधी गुंतवणूक व त्याचा धनरुपाने मिळणारा परतावा अथवा लाभ या गोष्टी व प्रयत्न सातत्य यांची आवश्यकता आहे. अशा प्रकारे विभागणी केली असता १ व २ व ३ साठी शनी व बुध व ४ साठी शुक्र डोळ्यासमोर येतात. कारण शनी सखोल द्न्यान, संयम याचा तर बुध बुद्धी, माहिती, अस्थिरता, निर्णय क्षमता, एजंट, दलाल, ब्रोकर, गणीत याचा कारक ग्रह आहे. शुक्र हा निधी निवेश म्हणजे गुंतवणुक व त्याचा मिळणारा धनरुपी परतावा यासाठी कारक ग्रह आहे. कॄष्णमुर्ती पद्धतीत शेअर साठी ३ रे स्थान हे प्रमुख मानले जाते व २ ११ ६ ही पूरक स्थाने मानली जातात. तसेच १ ५ ९ ८ १२ ही विरोधी स्थाने मानली जातात. ३ रे स्थान हे बुद्धी, विचार, पराक्रम, परिवर्तन दाखवते, २ रे स्थान हे धन स्थान आहे, ६ वे स्थान हे प्रयत्न सातत्य चे स्थान आहे व ११ वे स्थानावरुन लाभ बघितला जातो. आता दोन्ही गोष्टींची सांगड घातली तर हे लक्षात येईल की नैसर्गिक कुंडली अथवा कालपुरुषाची कुंडली विचारात घेतली तर
३ रे स्थानी बुधाची मिथुन रास आहे २ रे स्थानी शुक्राची वृषभ रास आहे ११ वे स्थानी शनीची कुंभ रास आहे ६ वे रे स्थानी बुधाची कन्या रास आहे
थोडक्यात सांगायचे तर जन्मकुंड्ली नुसार ३ २ ११ ६ या स्थानांच्या कारक ग्रहांची दशा अंतर्दशा चालू असताना अथवा गोचरमधे या स्थानांचे कारक ग्रहांचे नक्षत्री वा राशीत ग्रह भ्रमण करत असताना त्यावेळेस गुंतवणुक केली असता लाभ होईल व तसेच १ ५ ९ ८ १२ ही विरोधी स्थाने कार्यरत असताना गुंतवणूक केली असता नुकसान होऊ शकते. या जोडीला बुध शनी व शुक्र यांची जन्म कुंडलीतील स्थिती व सध्याची स्थिती ही लाभासाठी व विरोधी स्थानाच्या कारक ग्रहांचा नुकसान टाळण्यासाठी अभ्यास करणे गरजेचे आहे. असे मला वाटते. बाकीचे ज्योतिष शास्त्रातील नियम तर आहेतच.
तर ज्यांना शेअर वा समभाग या विषयात रुची आहे त्यांनी जरुर या गोष्टीचा अनुभव घेऊन पहावा.