मानवी शरीर हे रोगांचे माहेरघर आहे व म्हणूनच ते निरोगी कसे राखावे याचा विचार आमच्या पूर्वजांनी (ऋषीमुनींनी) फार पूर्वी केला आहे.
मानवास भौतिक, अधिभौतिक व अध्यात्मिक अशा प्रकारांपासून होणारे त्रासांपासून मुक्ती वा सुटका होण्यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात. आपल्या पूर्वजांनी याचा सखोल विचार करुन मंत्र, तंत्र व यंत्र यासारख्या उपाय योजना केल्या. यात कंपनशास्त्र हा मूळ गाभा आहे व मूळ शिवस्वरोदय शास्त्रा मधे आहे. यात मानवी शरीर, त्यातील प्राणरुपी चैतन्य, पंचमहाभूतांची तत्वे व त्यांचे मानवी शरीरावर होणारे परिणाम याचा सखोल विचार आहे. स्वर म्हणजेच श्री शिवशंकर असून बम्हांड व पिंड या स्वरांमुळेच निर्माण झाले आहे. स्वर आणी श्वास यांचा अतुट संबंध आहे.
शरीरात रोग कधी निर्माण होतो या प्रश्नाचे उत्तर ज्या नाकपुडीतून स्वर ज्यावेळी निघावयास हवा तेव्हा तो तसा त्या नाकपुडीतून न निघणे असे आहे. अशा वेळेस विरुद्ध स्वर वाहू लागतो. तत्त्वांचा क्रम बदलला जातो आणि विपरित स्वर वाहण्यास सुरुवात होते. म्हणून शरीरात रोग उद्भवतो. आपला देह प्राणाच्या सम्यक वहनावर व्यवहार करतो ही महत्त्वाची बाब लक्षात ठेवावयास पाहिजे. म्हणूनच तत्त्वाची वेळ व क्रम यांना जागेवर आणल्यास रोग निवारण होईल. अर्थातच माणसाचे खाणे-पिणे, स्वभाव, वागणूक, मानसिक स्थिती या गोष्टींवरसुद्धा माणसाचे आरोग्य अवलंबून असते.
मानवी देहाची यंत्रणा समजून घेतल्यावर, श्वास जरी कोणत्याही नाकपुडीतून वहात असला तरी त्या श्वासाचे स्पर्शावरून शरीरात कार्यरत असलेली वेगवेगळी तत्त्व ओळखता येतात. ते कसे हे पाहू.
श्वास मधोमध वाहत असेल तर पृथ्वीतत्त्व.
श्वास नाकपुडी तळाशी स्पर्श करत असेल तर आपतत्त्व.
श्वास नाकपुडीचे वरच्या भागास स्पर्श करत असेल तर तेज तत्त्व.
श्वास तिरकस असेल तर वायुतत्त्व व
श्वासाचे संक्रमण होत असेल तर आकाशतत्त्व सुरू आहे असे जाणावे.
प्रत्येक वाहणाऱ्या श्वासाची लांबी वेगवेगळी असते.
पृथ्वीतत्त्व – १२ अंगुळे, आपतत्त्व – १६ अंगुळे, तेजतत्त्व – ४ अंगुळे, वायुतत्त्व – ८ अंगुळे, आकाशतत्त्व अस्पष्ट.
निरोगी माणसाचे एका नाकपुडीतून प्राणवायू अडीच घटका म्हणजे एक तास वाहत असतो व तत्त्वेही क्रमवार पद्धतीने सुरू असतात. पृथ्वीतत्त्व = २० मिनिटे, आपतत्त्व = १६ मिनिटे, तेजतत्त्व = १२ मिनिटे, वायुतत्त्व = ८ मिनिटे, आकाशतत्त्व = ४ मिनिटे. सर्व तत्त्वांच्या वेळेची बेरीज साठ मिनिटे म्हणजेच एक तास होते.
या साठ मिनिटात प्रत्येक तत्त्व हे निर्देशलेल्या आपल्या गतीने वाहत असते. या तत्त्वांचा कालावधी कमी-अधिक झाल्यास मानवाचे आरोग्यास तसेच निरोगपणास बाधा निर्माण झाली आहे असे समजावे.
निरोगी माणसाचे बाबतीत स्वरातील तत्त्व वाहण्याचा क्रम असा आहे. प्रथम आकाशतत्त्व, नंतर वायुतत्त्व, नंतर तेजतत्त्व व आपतत्त्वास धरूनच पृथ्वीतत्त्व. परत आकाशतत्त्व असा क्रम सुरू असतो.
पृथ्वी व आपतत्त्व ही तत्त्वे शुभदायक मानली जातात तर उरलेली तीनही तत्त्वे तेज, वायु व आकाश ही शुभकारक मानली जात नाहीत. सर्वसाधारणपणे नीट विचार केल्यास एका तासात फक्त दोनच तत्त्वांचे उदय हे शुभफलदायक असून बाकीचे अशुभ फल देणारे आहेत. यातूनच या शास्त्राचे महत्त्व लक्षात येईल.
वरील सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्या पूर्वजांनी कोणत्या राशीत चंद्र असताना कोणते तत्त्व कार्यरत असावयास पाहिजे ते शोधले त्याबद्दल माहिती खालीलप्रमाणे
‘ल’ या बीजाक्षरात रोग्यास निरोगी बनवण्याची शक्ती आहे. या बीजाचा जप केल्यावर पृथ्वीतत्त्व उदय पावते.
आपतत्त्व ( जल तत्व ) : कर्क, वृश्चिक, मकर रास
बीजाक्षर : वं
‘वं’ या बीजाक्षरात चित्ताची एकाग्रता वाढवण्याची शक्ती आहे.
तेजतत्त्व (अग्नी तत्व ) : मेष, सिंह, धनु रास
बीजाक्षर : रं
‘ रं ‘ हे बीजाक्षर तेजतत्त्वाचे असून अग्नीमांद्य असलेल्या रोग्याने सूर्यस्वरात रं बीजाची आराधना केल्यास त्या व्यक्तीस सपाटून भूक लागते.
वायुतत्त्व : मिथुन, तुळ, कुंभ रास
बीजाक्षर : यं
‘यं’ बीज वायुतत्त्वाचे असून त्यामुळे नाकाचे तसेच बरेचसे वायुविकारांपासून सुटका होते.
आकाशतत्त्व : राशी नाहीत
बीजाक्षर : हं
प्रत्येक बीजाचा उच्चार करताना त्यापासून निर्माण होणारी कंपने ही वेगवेगळ्या वारंवारतेची असतात व त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असतो.
अशाप्रकारे विविध बीजाक्षरांचा उपयोग रोग निवारणासाठी आमच्या पूर्वजांनी सांगितला आहे.
ॐकार व बीजाक्षर साधना :
आपले शरीर व जीवन वायूवर अवलंबून आहे. आपण शुद्ध हवा आत घेतो व उच्छ्वासावाटे शरीरातील वायू बाहेर टाकतो. त्यामुळे शरीरातील क्रिया व्यवस्थित चालतात. आपल्या शरीरात अनेक प्रकारचे वायू निरनिराळ्या ठिकाणी उपस्थित असतात. शरीरातले अनेक दोषही वायुरूपाने असू शकतात. हे दोष बाहेर काढून शरीर स्वच्छ, शुद्ध कसे ठेवावे व मनःशांती लाभून आनंदाचा उदय होतो. ह्यासाठी ही साधना सांगत आहोत. ( मात्र अखंडत्व राखता आले पाहिजे.)
ॐकार व बीजाक्षर साधना करताना प्राणायाम आपोआपच केला जातो. ही क्रिया व्यवस्थित व नैसर्गिकरीत्या करावयास पाहिजे. त्यात कृत्रिमपणा व आततायीपणा नको. शरीरात काही दोष असे असतात की जे अन्य कोणत्याही औषधाने दूर करता येत नाहीत; ते दोष, ही साधना योग्य प्रकारे व व्यवस्थित चालू असेल, तर दूर होऊ शकतात.
सुरुवातीला पाच मिनिटे जरी साधना केली तरी चालते. नंतर हळूहळू वाढवायला हरकत नाही. श्वास घेताना व श्वास बाहेर सोडताना ध्वनी निर्माण होतो ह्याकडे जाणीवपूर्वक व बारकाईने लक्ष द्यावे.
ॐ श्वास आत घेताना व आपले राशिचे बीजाक्षर श्वास बाहेर सोडताना स्मरावे. ही उपासना हळूहळू वाढवीत एक तासापर्यंत न्यावी. आज एक तास, उद्या अर्धा तास असे बदल कधीही करू नयेत. त्यात खंड पडू देऊ नये. ह्या साधनेचा आपल्या आहारावर परिणाम होतो. कमी आहारावर तृप्ती होते.
ॐकार व बीजाक्षर च्या लहरी एकसारख्या निघाल्या पाहिजेत. त्यातील लयबद्धतेने ध्वनिकंपने निर्माण होऊन त्याचा सुयोग्य परिणाम होतो. उपासनेनंतर शरीर हलके वाटते; तरतरी वाटते, मनाला शांतता व स्वस्थता लाभते. ही साधना करणान्याला हृदयविकार, मेंदूचा विकार, दम्याचा विकार व पोटाचा विकार होणार नाही. काही लोकांना विनाकारण कसली तरी भीती वाटत असते. भीती कशाची आहे ते नक्की सांगता येत नाही; पण या साधनेमुळे भीती निघून जाते व मनात धैर्य निर्माण होते. आपले प्रयत्न जर योग्य दिशेने झाले तर थोडा तरी अनुभव यायलाच हवा.
शुभं भवतु !
-ज्योतिषमित्र मिलिंद
ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन साठी संपर्क : (७०५८११५९४७)
मीन ही राशी चक्रातील १२ वी राशी असून गुरु हा स्वामी आहे. या राशीमधे पूर्वा भाद्रपदाचा ४ था चरण, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती ही नक्षत्रे येतात. ही जल, थंड, व्दिस्वभाव, स्त्री, फ़लित, अभौतिक, भाऊक, व्दिपद, लघु उदीत राशी आहे. ही राशी द्याळू, मोक्षदायी, धर्मदायी, स्वर्गदायी व दानाची राशी पण म्ह्टली जाते.
या राशीत शुक्र उच्च व बुध नीच असतो. शनी निर्बळी नसून उलट शुभ असतो. सूर्य, मंगळ, चंद्राची मित्र राशी आहे. माझ्या मता प्रमाणे चंद्र या राशीचा पूर्ण लाभ घेऊ शकतो कारण भाग्येश चंद्र मीन मधे असेल तर नवपंचम योग होईल. मंगळ आपली राशी मेष चे फ़ळ कमजोर देईल कारण मेषेपासून मीन मधे मंगळ आपल्या व्ययस्थानी असेल. सिंह पासून रवी मीनमधे अष्ट्म स्थानी असलेने फ़ळ कमजोर करेल. हिंदू विव्दानांनी सांगितले आहे की गुरु शुक्र शत्रू आहेत. त्याचे तात्पर्य हेच की गुरु जातक व शुक्र जातकाचे गुण विभिन्न असतात. त्यांचे विचार, कार्य, राहणी, मित्र, समाज ई. सारखे नसतात. गुरु व शुक्रास अक्षरश: शत्रू मानावयास नको. गुरु जातक अध्यात्मिक जीवनाकडे वळवेल. तर शुक्र जातक आपल्या पशू प्रवृत्तींना संतुष्ट करतो. या जगातील प्राप्त भौतिक सुखाचा आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.
मीन राशीचे दुसरे स्वामीत्व नेपच्यून ला बहाल केले आहे. नेपच्युन ला समुद्र देवता मानतात, मीन १२ वी राशी असल्याने समुद्र पार विदेशी स्थानामधे जीवनक्रम दाखवते.
1. शारिरिक आकृती- मीन राशीचे लोक उंचीला कमी असतात. त्यांचे वजन बरे असते. हात व पाय लहान असतील. खांदे मांसल व गोलाकार असतील. डोके मोठे व पुढे आलेले असेल. केस नरम व रेशमी असतील.
2. विशेषता- मीन राशी जलराशी व गुरु स्वामी असल्याने दर्शन शास्त्र व प्रजनन दर्शवते. हे जातक दार्शनिक, आरामहीन, स्वप्नाळू, चिंतक, कल्पनाशील, रसिक असेल. जातक इमानदार, स्पष्टवक्ता, मदतगार व मानवीय असेल.
ही व्दिस्वभाव राशी आहे. तो कोणाच्या कष्टाचे कारण होणार नाही, पण कोणी बोलावले तर तत्काळ मदतीस धावून जाईल. मीन जातक शत्रूना शांत करु शकतो. त्याच्याशी नम्रतेने व्यवहार करेल व माफ़ करेल. तो दंभहीन असेल व अत्याधिक उदारता व अती दानशूरपणामुळे अधिक संचय करु शकत नाही. तो कमी महत्वाकांक्षी असू शकतो. अहिंसावादी असतो. कोणासही नुकसान करण्याचा विचार करत नाही. मीन जातक पैशापेक्षा आदर, आत्मसंमान या गोष्टींना जास्त प्राधान्य देतो. तर काही मीन जातक स्वत: इतरांना डोकेदुखी असते. त्यांचा स्वभावात एक प्रकारचा विक्षिप्तपणा असतो व कधी कधी हट्टी स्वभाव डोकावतो. एरवी स्वभावाने मृदू व समाजाकडे ओढा असतो.
स्त्री राशी असल्याने नवनवे विचार व आवडी निवडीकडे ओढा असतो. नम्र व सुशील असतो. शुक्र याराशीमधे उच्च असल्याने त्यास कवी, संगीत क्षेत्र, चित्रकार, मेक अप आर्टिस्ट, ई संबंधित क्षेत्रात असू शकतो. लोकांचे दु:ख कमी करण्यासाठी काम करु शकतो.
व्दिस्वभाव व स्त्री राशि असल्याने त्यांचे विचारात सान्निध्यात येणारे लोकांचा प्रभावाने बदल होत राहतील. मीन जातकाच्या चरित्राशी तुलना करणे अवघड आहे.
राशी चक्रातील १२ वी राशि असल्याने रहस्यमय शास्त्र अथवा अध्यात्मिक जीवनाचा मार्ग असेल. तो घाबरट नसेल पण आत्मविश्वास कमी असेल. तो समुद्र सफ़रीची ईच्छा करेल. विदेशामधे भ्रमण करेल.
व्द्तीयेश मंगळ त्याला दशे अंतर्दशेत वायफ़ळ खर्च करायला लावतो, जास्त कमाई व जास्त खर्च असे समिकरण असते. तो स्पष्टवक्ता व निर्भय असू शकतो. शुक्र ३ रे स्थानाचे अधिपती असल्याने शेजारी चांगले मिळतात व उदारता व सहाय्यता मुळे अनेक मित्र जोडले जातात. बुध हे दर्शवतो की तो अध्ययनशील असून विचार बदलत राहतो. चंद्र त्याला स्वप्नील व कल्पनाशील बनवतो. सूर्य संक्रमक रोग व निराशा दाखवतो. मीन जातक आपल्या सर्व मित्रांवर विश्वास ठेवतो व चांगले व वाईट दोन्ही प्रकारचे लोक असतात याची जाणीव फ़ार उशिरा होते.
3. कमजोरी- अनेक भावनांचा गुंता कमी करावा व कमी काळजी करावी. स्वत:ला कमी लेखू नका, आत्मविश्वासाने पुढे जाण्याची वृत्ती जोपासा. उदार बना पण डोळे उघडे ठेवून. इतरांच्या आश्वासनाला भूलू नका. नेहमी मनन, चिंतन, स्वप्न यात रमू नका.
4. धन व संपत्ती- २ रे, ६ वे, १० वे स्थान हे अर्थ त्रिकोण दाखवते, ज्याचे स्वामी मंगळ, रवी व गुरु आहेत. नीट निरखून पाहिले तर तुम्हास असे लक्षात येईल की कालपुरुषाच्या १ ल्या, ५ व्या व ९ व्या स्थानाचा म्हणजेच धर्म त्रिकोणाचे स्वामी हे तेच आहेत. त्यामुळे यांचा मूळ स्वभावधर्म हा सेवा हाच आहे. त्यांचे मूलत: जीवनाचे ध्येय व आकांक्षा हेच सांगते की त्या लोकांची सहाय्यता करा स्वास्थ्य, धन, द्न्यान याची आवश्यकता असेल त्यांना सहाय्य करणे. यांचे करता उत्तम व्यवसाय हा नोकरी असतो. हे आपले कर्म ईमानदारीने व सेवाभावी वृत्तीने करतात व कमाई करतात व उदारताही दाखवतात वा अव्यवहारी खर्च ही करतात. मीन जातक वृद्धावस्थामधे आपल्या मुलांवर अवलंबून रहायला नको या विचाराचे असतात व त्या व्यवस्थेसाठी ते नेहमी सतर्क राहतात व भविष्यकालीन गुंतवणूक करु ईच्छितात. राशी स्वामी गुरु असल्याने त्यांचे धन उपयोगी व सुरक्षित राहते जरी कोणास गुरु उप दशेत उधार दिले तरीही. पण शनी मित्र जातक वा अंतर्दशेत ते मित्र तोपर्यंत गोड राहतात जोपर्यंत त्यांना मीन जातकाचा लाभ होत असतो व नंतर त्यास त्रस्त, बदनाम व धनहीन करतात.
5. नोकरी व्यवसाय- राशी चक्राची १२ वी राशी असल्याने यांना अशा नोकरी व्यवसायात आनंद मिळतो ज्यामधे दूरर्दृष्टी, विस्तृत कार्य, सहाय्यतेची आवश्यकता असते. त्यामुळे स्वास्थ्य, परिचाल, अन्न व्यवसाय, कल्याणकारी, कार्यकर्ता, शिक्षक, अकाऊन्टंट, बैकर ई. संबंधित नोकरी व्यवसाय करु शकतात.
५ वे स्थानावर ज्याचा स्वामी चंद्राची शुभ दृष्टी असेल तर जलसेना, जहाज, बंदर, पोर्ट, कस्टम, दारु, पेय, तेल, तरल पदार्थ, केमिकल्स, मत्सोद्द्योग, ई संबंधित नोकरी व्यवसाय करु शकतो. शुक्राचे उच्चत्व जातक संगीत, सिनेमा, गुप्त शास्त्र विभाग, संगीतकार, कवी, अभिनेता, वेशभूषा, शृंगार, स्त्रीविषयक ई नोकरी व्यवसाय उत्पन्न करतो.
गुरु लग्नेश व दशमेश असल्याने हे दर्शवतो की ते मंत्री वा चिकित्सकाच्या रुपाने, शिक्षक, मंदीर, चर्च, ट्रस्ट, मठ, दवाखाना, आश्रम, वित्त, स्वास्थ्य ई नोकरी व्यवसायात चांगली सफ़लता प्राप्त करु शकतो.
६ वे स्थानाचा स्वामी सूर्य शुभ दृष्टीने शासकीय विभागामधे कायम नोकरी प्राप्त करु शकतो.
२ रे व ९ वे स्थानाचा स्वामी मंगळ शुभ दृष्टीने दूर संचार, सेना, कस्टम, पोर्ट, ट्रस्ट, तेल, राजनीती, दार्शनिक ई संबंधित नोकरी व्यवसाय करु शकतो.
6. आरोग्य- जल राशी असल्याने तरल पदार्थांची आवड असू शकते. कन्या राशीच्या विपरीत असल्याने गैस ट्र्बल असेल. १२ वे स्थान छोटे पाय दर्शवतात त्यामुळे तळवे व पायाचे दोष त्रास देऊ शकतात.
१२ वी व जल राशी असल्याने एखादी शिर सूजणे व शिर चढणे, वाकडी होणे असा त्रास होऊ शकतो. मीन मधे सूर्य असेल तर पायामधे घाम येणे, थंडपणा आतडीचा त्रास, रक्ताची कमतरता, टायफ़ॊईड ई त्रास होऊ शकतो.
चंद्र दारू वा तरल पदार्थ, पचन संस्था ई. मंगळ पायामधे फ़्रैक्चर, वाकडेपणा, आतड्यामधे उष्णता, हार्निया, बुध नसांमधे खराबी, मुकेपणा, क्षयरोग, गुरु पायामधे सूज, घाम येणे, लिव्हर वाढणे, पोटामधे गोळे, आतड्यांची शिथीलता, शुक्र वातरोग, आतड्यात गाठ, शनी गुठळ्या, पायामधे बाक, क्षय, जलोदर ई आजार दर्शवतात.
7. मित्र व परिवार- मीन जातक सामान्यपणे अनेक मित्रांचे स्वागत करतात, त्यांचे मनोरंजन करण्यासाठी नव्हे तर त्यांनी त्याचे दु:खाचे रडगाने मनापासुन एइकावे, द्या दाखवावी, मानसिक शांती व धीर द्यावा यासाठी. ते आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याची ईच्छा ठेवतात. शिकलेली नसेल तर पत्नीलाही शिक्षित होण्यासाठी प्रोत्साहित करतील. त्यांना आनंदी पारिवारिक जीवन आवडते. व घरात सर्वांवर माया करतात. पंचमेश चंद्र असल्याने प्रत्येक सुदर चेह्ररा पाहून उत्तेजित होऊ शक्तात व कल्पनेत रमतात. पण हे जातकांची प्रवृत्ती चांगली असते. स्वभावाने द्यळु व सहायक सिद्ध होतात. मित्र भरपूर असतात पण काही जण यांचा उपयोग करुन घेतात. मीन जातक आपल्य व्यक्तिगत समस्या विसरुन त्याग करण्यास तयार असतात. जेव्हा त्यांचे मित्र अडचणीत असतात तेव्हा त्यांना दु:ख होते व मित्र आनंदी तर हे आनंदी.
8. प्रेम- मीन जातक आपल्या जोडीदाराची सुंदरता, बुद्धिमत्ता, कार्यकुशलता, ललित कला यांस प्राधान्य देतात. ते संकुचित वृत्तीची व्यक्ती पसंत करत नाही पण हे विसरतात की हाच त्यांचा स्वभाव त्यांना तिरस्कारी बनवतात व त्यांचेकडे शंकीत दृष्टीने पाहिले जाऊ शकते व हळूहळू प्रेम भावना कमी होऊ लागते. जोडीदाराची प्रवृत्ती त्याने समजून घ्यावयास हवी, जोडीदारास प्रेमाचा विश्वास दिला पाहीजे व प्रसंगी प्रसंसा ही केली पाहिजे.
मीन जातक नेहमी प्रेमाचे बाबतीत स्वप्नाळू असतील व स्वप्नील वागण्यासाठी अधीर असतील. त्यांनी असा जोडीदार निवडू नये जो जो स्वतंत्र व अती वास्तववादी असेल. प्रेमातील शंका हे नुकसान करु शकते.
व्दिस्वभाव राशी असल्याने काही प्रसंगी प्रेमात अगदी निरस व्यवहार करतील. व असंतुष्ट ही राहतील. व इतर वेळी प्रेमळ, रसिक, प्रशंसक राहतील. कोणी कोणी प्रेमाचा जर दिखावा करत असेल तर जेवढे द्याळू, प्रेमळ तेवढेच कठोर होऊ शकतात. लहरी वागू शकतात.
9. वैवाहिक- २ रे, ७ वे, ११ वे स्थान विवाह जोडीदार दर्शवते ज्यांचा स्वामी मंगळ, बुध व शनी आहे.
जर मंगळ बलवान कारक ग्रह असेल व जोडीदार दृढ, बहादूर व स्वतंत्र असेल व जर मीन जातक त्याचेशी वाईट व्यवहार करेल तर तो कधी त्यास अनुकूल होऊ शकणार नाही. जर शुक्र व शनीची वाईट दृष्टी असेल तर वैवाहिक आयुष्य अल्प असेल. अशा व ईतर घटकांमुळे घटस्फ़ोट ची शक्यता अथवा एकाच घरात स्वतंत्र राहण्याची शक्यता राहते. ( जाणकार ज्योतिषाचे मार्गदर्शन घेऊन मग च याबाबतीत निर्णय घ्यावा )
जर बुध बलवान कारक ग्रह असेल तर जोडीदार विश्वसनीय व चतुर असेल. व चतुराईने जोडीदारास हाताळेल. जर जोडीदार नाराज असेल तर गप्प बसेल व जर आनंदी असेल तर त्यास अलिंगण देऊन त्यास अनुमोदन देईल.
कन्या व कर्क जातक जोडीदार मीन जातकाबरोबर सुख वैवाहिक आयुष्य उपभोगू शकतात.
जर शनी बलवान कारक ग्रह असेल तर मीन जातकास सावध व सतर्क रहावयास हवे. व स्वत: च्या व्यवहारामधे थोडी सुधारणा करावी लागेल. अन्यथा मीन जातकाच्या चांगल्या वेळी चांगली सोबत करतील व परिस्थिती पालटताच वाईट परिस्थितीत त्यांचे वागणे, बोलणे, ढंग एकदम बदलून जाईल. (शनी ११ वे व १२ वे दोन्ही स्थानांचा अधिपती आहे. जाणकार ज्योतिषाचे मार्गदर्शन घेऊन मग च याबाबतीत निर्णय घ्यावा) ही काळजी व्यावसायिक जोडीदार व मित्र यांचेबाबतीत सुद्धा घ्यावी.
10. संतती- मीन चा स्वामी गुरु हा शुक्राच्या, गुरुच्या व चंद्राच्या राशीत उच्च असतो. संतान दर्शक ५ वे स्थानात चंद्राची कर्क राशी येते. त्यामुळे मीन जातक आपल्या मुलांवर प्रकट प्रेम करतात व त्यांना मुलांचे प्रेम पण प्राप्त होते. मीन जातक आपल्या मुलांचे बाबतीत कठोर होऊ शकत नाहीत आनि तसे मृदू राहीले तरच चांगली फ़ळे प्राप्त करतात. मुलांना परीक्षेत चांगले गुण नाही मिळाले पण खेळात अग्रेसर आहेत तर त्यांना समजून सांगता येते पण जर भीती आणि धमकाऊन सांगाल तर मुले बंडखोर व उर्मट वागतील. मुले सामान्यपणे बुद्धिमान असतात व आयुष्यात सफ़ल होतात, काही जण कलाकार असू शकतात.
11. भाग्य दिवस- गुरुवार, मंगळवार, रविवार शुभ दिवस आहेत. सोमवार व शनिवार व्यग्र ठेवतात व नुकसान करतात. बुधवार व शुक्रवार अशुभ आहेत पण जोडीदारास वा विरोध करण्याकरता लाभप्रद आहेत. व्यवसाय व प्रसिद्धीकरता गुरुवार निवडा. मंगळवार आर्थिक स्थिती, उच्च शिक्षण अथवा प्रवासासाठी शुभ आहे. स्पर्धा, ओव्हरड्राफ़्ट साठी रविवार चांगला आहे. सोमवार, बुधवार, शुक्रवार जोडीदारासाठी वस्तू खरेदीस चांगला. सोमावारी वाद, भांडण अथवा राजीनामा साठी अनुकुल.
12. भाग्य रंग- लाल, पिवळा, गुलाबी, नारिंगी शुभ रंग आहेत. निळा अशुभ असतो. पांढरा, क्रीम, हिरवा जोडीदारासाठी शुभ असतो. मीन जातकाने याचा उपयोग करु नये.
कुंभ ही राशी चक्राची ११ वी राशी आहे. कुंभ राशीमधे धनिष्ठा नक्षत्राचा उत्तरार्ध, शततारका, पूर्वा भाद्रपदाचा १, २, ३ चरण ही नक्षत्रे येतात. या राशीचा स्वामी शनी आहे.
कुंभ रास ही वायू, आर्द्र, स्थिर, सकारात्मक, मानवीय, स्वर, पुरुष व लघु उदीत राशी आहे.
कुंभ राशीमधे कोणताही ग्रह उच्च वा नीच नसतो. बुध व शुक्राची ही मित्र राशी आहे. सूर्य, चंद्र, मंगळ, गुरु यांची शत्रू राशी आहे.
1. शारिरिक आकृती- कुंभ मधे जन्मलेले लोक उंच व भरलेल्या शरीराचे असू शकतात. मजबूत बांधा व चेहरा अंडाकार असतो. सुंदर बांधा, सुंदर चेहरा असेल. दात खराब असू शकतात. केस भुरकट असू शकतात. जांघेमधे मस अथवा घावाचे चिन्ह असू वा होऊ शकते.
2. विशेषता- वायु राशी असल्याने कुंभ जातक बुद्धिमान असतील. कोणी त्यांची खुशामत करुन अथवा उल्लू बनवून त्यांचे काम साधू शकत नाही. ते इतरांचा स्वभाव वा प्रकृती ओळखू शकतात. वायू राशिचा स्वामी शनी हे दर्शवतो की ते प्रत्येक गोष्टीचे गुण अवगुणांचा बारकाईने निवांत विचार करतात. नवेनवे विचार हळू हळु ग्रहन करुन आत्मसात करतात. त्यांची स्मरण शक्ती उत्तम असते.
राशी चक्रातील ११ वी राशी असल्याने विस्तृत विचारधारा असणारे असतात. मानवीय दृष्टिकोण, स्पष्टवादी, नि:स्वार्थी असतात. ते सामजिक देखील असऊ शकतात. मित्रांचा एकोपा जपण्याचा प्रयत्न करतात. भावी काळात बाधक, हानीकारक, अडथळा आणणार्या गोष्टींना शिताफ़ीने दूर करतात. निंदकांपासून २ हात लांब राहणे पसंत करतात.
युरेनस ला कुंभ राशीचा दुसरा स्वामी समजत असल्याने जातक चतुर, स्पष्ट्वक्ता, बुद्धिमान, पाय जमिनीवर असणारा असू शकतो. समाजाचा विकास व स्तर उंचावण्यासाठी प्रय्त्न करणारा, नवे विचार, नवे रस्ते, अडचणींवर उपाय, विकसित साधने ई बाबतीत अग्रेसर असतात. त्यांचे स्वता:चे असे विचार असतात, स्वत:चे पक्के नियम असतात, ते लोकांचे अनुकरण करत नाहीत, त्यांचा ढंग, कपडे, राहणीमान स्व्त: ला आवडेल असे राहते. ते नेहमी काही सिद्धांतावर जोर देतात. ठरवलेले काम करण्यावर ठाम असतात. संशोधन कार्य करण्यास योग्य असतात व दीर्घ काळ काम करुन सफ़लता प्राप्त करतात. ते आपल्या आवडी निवडीवर ठाम असतात. ते चांगल्या मित्रांकरता काहीही करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. पण एखादी गोष्ट त्यांना पटत नसेल तर कोणीही त्यांचे मन वळवू शकणार नाही. ते हट्टी असतात पण मूर्ख नसतात.
काम कामत्रिकोणातील पारमार्थीक साधनांची व आत्मानंद मिळवणारी ही राशी आहे. काम म्हणजे कामना वा इच्छा. ते भौतिक विषय शिकण्याची इच्छा ठेवतात व अंतर्द्न्यान व प्रेरणांचा विकास करतात. ते एकांत, गहन ध्यान, उत्तम एकाग्रता पसंत करतात. उपवास तप ई करु शकतात. जर त्यांच्या मनात जगापासून वेगळे रहायचा विचार आला तर सर्व त्यागुण सन्यासी बनू शकतात. ते इतरांना सल्ले उपदेश देत न बसता स्वत: कृती करतात. ते समाजशास्त्राला शास्त्रीय दृष्टिकोणातून पाहतात.
गुरु कुटुंब व धन स्थानाचा व लाभ स्थानाचा २ व ११ चा स्वामी असल्याने जातकास उत्तम परिवार व समाधानकारक आर्थिक स्थिती प्रदान करतो.
३ रे व १० वे स्थानाचा स्वामी मंगळ अध्ययन कढे ओढा, संशोधन करण्यामधे दृढ व साहसी असल्याने व शेवटी सफ़लता प्राप्त होत असल्याने नाव, सन्मान, प्रसिद्धी प्राप्त करतो.
४ थे व ९ वे स्थानाचा स्वामी शुक्र असल्याने आई वडीलांचा भक्त असतो. चांगले शिक्षण प्राप्त करतो. ते संशोधन, समुद्र यात्रा ई करतात.
संसारामधे सुख्प्राप्ती साठी गुरु २ ११ चा स्वामी व शुक्र ४ ९ चा स्वामी व धनू या गुरुच्या राशी मधे पुर्वाषाढा या नक्षत्रामधे एखादा ग्रह आसेल तर त्या ग्रहाच्या दशा अंतर्दशेत तो भाग्यशाली ठरेल.
बुध ८वे स्थानाचा व च्ंद्र ६ वे स्थानाचा स्वामी असल्याने हे दर्शवतो की कुंभ जातक नेहमी विचारांचा भुकेला असतो व नेहमी मनन, ध्यान, योजनांमधे गुंतलेला असतो. व पीडीत असेल तर उदास, खिन्न, निराश व एकलकोंडा राहू शकतो.
3. कमजोरी- लग्न वा लग्नेश शनी जर पापग्रहांनी पीडीत असेल तर जातक आळशी व सुस्त असेल, त्याला एकलकोंडा राहण्याची सवय मोडायला हवी. निराशा, दु:ख व खिन्नता झटकून अग्रस्थानी व सतर्क रहावयास हवे. जी गोष्ट वा व्यक्ती पसंत नाही त्याविषयी चा कठोर रवैय्या सोडायला हवा.
4. धन व संपत्ती- सामान्यपणे कुंभ जातक महान अविष्कार, व अनुसंधानव्दारे धन कमवतात. ते केलेल्या कामाच्या त्वरीत धन्प्राप्तीमधे विशवास ठेवत नाहीत. ते पुष्कळ काळापर्यंत प्रतिक्षा करु शकतात. धैर्यपूर्वक काम करतात. व काही विकास कामांनंतर वा नवीन उपलब्धीनंतर आपली योग्यता वा गुणांआधारे धन अर्जित करतात. ते कधी मान मतराब शोधण्यास जात नाही उलट मान त्यांना शोधत येतो. त्यांचे विचाराने धन व संपत्ती सांसारिक गरजांसाठी असते. ते मितव्ययी असतात, ना फ़ार उदार ना फ़ार खर्चिक. त्यांचे मधे गुण व महत्वाकांक्षा असते व धन कमवण्यात भाग्यशाली व भाग्यहीन दोन्ही असतात. ते त्यांच्या विचारांच्या ठामपणावर अवलंबून असते.
5. नोकरी व्यवसाय- सामान्यपणे कुंभ जातक महान अविष्कार, व अनुसंधानव्दारे धन कमवतात. ते केलेल्या कामाच्या त्वरीत धन्प्राप्तीमधे विशवास ठेवत नाहीत. ते पुष्कळ काळापर्यंत प्रतिक्षा करु शकतात. धैर्यपूर्वक काम करतात. व काही विकास कामांनंतर वा नवीन उपलब्धीनंतर आपली योग्यता वा गुणांआधारे धन अर्जित करतात. ते कधी मान मतराब शोधण्यास जात नाही उलट मान त्यांना शोधत येतो. त्यांचे विचाराने धन व संपत्ती सांसारिक गरजांसाठी असते. ते मितव्ययी असतात, ना फ़ार उदार ना फ़ार खर्चिक. त्यांचे मधे गुण व महत्वाकांक्षा असते व धन कमवण्यात भाग्यशाली व भाग्यहीन दोन्ही असतात. ते त्यांच्या विचारांच्या ठामपणावर अवलंबून असते.
गुरु २ रे स्थानाचा स्वामी असल्याने शास्त्रीय, प्रशासकीय, वा कंपनीमधे उच्च पदावर असू शकतो. एक व्याख्याता, सायकॊलॊजिस्ट, समुपदेशक, ज्योतिषी, कायदा, वित्त, शिक्षण, धार्मिक संस्था, खनिज पदार्थ, जहाज, निर्यात या संबंधी नोकरी व्यवसाय करु शकतो.
चंद्र ६ वे स्थानाचा स्वामी असल्याने जातक चिकित्सक, सामाजिक सेवक, जहाज, समुद्र यात्रा, पंप सेट, तरल पदार्थ ई संबंधित नोकरी व्यवसाय करु शकतो.
मंगळ १० वे स्थानाचा स्वामी असल्याने जातक धातू, विमा, केमिकल्स, यांत्रिक, बांधकाम, कच्चे खनिज पदार्थ, वीट भट्टी, बॊयलर, सिमेंट, सर्व्हेयर, शल्य चिकित्सक, पोस्ट मार्टम, हत्यारा, कसाई, न्हावी, शीसे, तांबे, स्टील, गुप्तचर संस्था, ई संबंधित नोकरी व्यवसाय करु शकतो.
शुक्र १० वे स्थानावर शुभ दृष्टीने पहात असेल तर जातक एक कवी, चित्रकार, संगीत क्षेत्र, हैंड बैग ई संबंधित नोकरी व्यवसाय असू शकतो.
6. आरोग्य- कुंभ राशी सुर्य़ाच्या विपरीत राशी असल्याने कुंभ जातक संक्रमक रोगाने ग्रासित असतात. जर साधारणपणे अति परिश्रमाने थकवा जाणवेल तर वैद्यकिय सल्ला घ्यावा. हृदय प्रभावित होऊ शकते. दात दुखणे, टॊन्स्लिल्स, देखील कष्टाचे कारण होऊ शकते. शनी थंड ग्रह व कुंभ वायू राशी असल्याने त्यांचा रक्त प्रवाह कमी असतो. त्यांना हिवाळ्यात जड जाते. खरचटले व घाव लागला तर ताबडतोब मलम पट्टी करावी. डासांचा प्रादुर्भाव जास्त असेल अशा ठिकाणी थांबणे टाळावे. काही त्रास झाल्यास योग्य आराम करावा. वाढलेल्या वा फ़ुगलेल्या शिरा चा वेळीच उपाय करावा. गाठी, रक्तदाब, पायावर सूज, पीडीत शुक्र चामड्याचे रोग, नेत्रपीडा, पीडीत चंद्रामुळे जलोदर, धनिष्ठा नक्षत्रामधे स्थित ग्रह उच्चताप, मलेरिया, फ़िलेशिया, उच्च रक्तदाब, फ़्रैक्चर दर्शवतो.
शततारका मधे स्थित ग्रह जातकास अधिक वैठकीच्या अभ्यासामुळे कमजोर पचनक्रिया बनवतो. रक्तदाब, निद्रानाश, देतो. पूर्वा भाद्रपदामधे स्थित ग्रह जलोदर, स्कीन चे रोग, फ़ोड ई दर्शवतो.
स्थिर राशी असल्याने ९ वे स्थान बाधक स्थान असते. शुक्र ९ वे स्थानाचा स्वामी असल्याने तसेच केंद्राधिपती पन असल्याने आयुष्यावर प्रभाव टाकतो. तसेच २ रे व ७ वे स्थानांचे स्वामी गुरु व सुर्य आहे, ६ वे स्थानाचा अधिपती चंद्र आहे व बुध अष्टमेष आहे. हे सर्व ग्रह त्यांच्या दशा अम्तर्दशांमधे आरोग्यास नुकसानकारक सिद्ध होतात.
चंद्र षष्ठेश असल्याने सामान्य रोग दाखवतो जे उपचारांनी बरे होतील. पण गुरु, सूर्य, बुध दर्शित आजार जास्त त्रासदायक असतील. बुध व शुक्राची दशामधे उत्पन्न रोग दुभाग्यवश असतात. उत्तरा फ़ाल्गुनी, विशाखा, पुर्वाषाढा नक्षत्रामधे स्थित ग्रह जातकाच्या प्रकृतीस प्रभावित करतील.
7. मित्र व परिवार- कुंभ राशी चक्रातील ११ वी राशी जिचा स्वामी गुरु असल्याने चांगली मनोवृत्ती, अत्याधिक उत्साह व प्रसन्न असतात. त्यांना अनेक मित्र हवे असतात व गुरु त्यांना खरे, विश्वसनीय व उत्तम मित्र देतो. त्याचे मधून काही जणाचे बाबतीत कुंभ जातक थोडे अलिप्त राहतात. त्यांचे मित्रांना असे वाटू शकते की हे संपर्क करत नाहीत व उदासिन राहतात. पण कुंभ जातक इतरांचे दोष काढत नाहीत व गोष्ट सहज घेतात. त्यांचे बरोबर कोणी चांगला व्यवहार केला नाही तरी हे सहयोगी असतात. ते आपले मित्रांचे वागने व व्यवहार याचा अभ्यास करतात. ते मित्रांप्रती इमानदार असतात पण याची जाणीव असते की काही जण दगाबाज व स्वार्थी व अनादर करणारे असू शकतात. तरी ते शांत व अहंकार रहित असतात.
कुंभ जातक फ़ार सामाजिक असतात. ते आपले घर फ़ार स्वच्छ व सुंदर ठेवतात व मित्रांना घरी आमंत्रित करतात. घर छान सजवलेले, चित्र विचित्र जुन्या वस्तू, वा अधुनिक ढंगाचा संग्रह असेल. कुंभ जात घरकामासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देतात व त्याचे पाहुण्यांसमोर प्रदर्शन करण्यात त्यांना आनंद होतो. ते जुन्या परंपरागत कष्टदायक पद्धती सोडून देतात व आधुनिक साधनांचा वापर करुन वेळेची बचत करतात. ते एकांत व समाज दोघांना समान प्राधान्य देतात हे विशेष आहे. हे अगदी अलिप्त व अगदी मिसळ्णारे नसतात.
8. प्रेम- कुंभ जातक बुद्धिमान असल्याने नेहमी शिक्षित व बुद्धिमान जोडीदार निवडण्यास प्राधान्य देतात. ते दृढ व कायमचे संबंध राखतात. ते अहंकारहीन असल्याने जोडीदाराव्दारे नुकसान होत नाही. ते सर्वांबरोबर स्वच्छ मनाने राहतात व नंतरही त्यांना आयुष्यात स्थान देतात. ते आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करत नाहीत. हर प्रेमी भाऊक असेल तर तो असमाधानी राहू शकतो कारण कुंभ जातक फ़ार शांतीने सर्व गोष्टी घेतात.
9. वैवाहिक- रे, ७ वे, ११ वे स्थान जीवन साथी दाखवते. कुंभ जातकास यांचे स्वामी गुरु व सूर्य आहेत. म्हणून जोडीदार कायदा पाळ्णारा, ईमानदार, विश्वसनीय असतो. ते गौरवशाली व योग्य कर्तव्यपरायण असतात. परंतू ज्यांचा विवाह कुंभ जातकाशि होतो त्यांना हे जाणवेल की हे लोक पुष्कळ मानवतावादी, द्याळू, सहानुभूतीपूर्ण, निभाऊन नेणारे असतात. ते अनुकुलता व प्रसन्न्तेची चर्चा करतील.
कुंभ जातक स्त्रिया परंपरावादी नसतात. जर तिला जानवेल की जोडीदार तिच्या मताने वागत नाही तर त्यास बदलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल वा भासवेल. पती बरोबर अधिक इच्छा प्रदर्शित करुन सहयोग करेल. त्याव्हे उत्तरदायित्व, कर्तव्य व कामामधे सहभागी होईल.
मिथुन व तुळ जातक कुंभजातका करता सुयोग्य असतात.जोडीदारास हे जाणणे जरुरी आहे की कुंभ जातक अलिप्त राहणारा असतो व कमी वेळ सहवासात रमतो. त्यंची पत्नी नोकरी करणारी वा इतरत्र गुंतवून घेणारी असेल तर जास्त गोडवा टिकून राहील. पण त्याच्या भरपुर वेळ व सहवास मिळण्याची इच्छा ठेवणारी असेल तर दु:खी होईल.
10. संतती- कुंभ जातक स्वत:ला वयाने मोठे आहोत हे मुलांसमोर दाखवत नाहीत, त्यांना वास्तवात अले पाहीजे व आपल्या मुलांशी एक शिक्षकाप्रमाणे कठोर व्यवहार केला पाहीजे हे परंपरागत मान्य नसते.. उलट ते मुलांशी असे वागतात जसे ती मुले मोठी झाली आहेत. त्यामुळे मुले त्यंच्यावर प्रेम व आदर देखील करतात. मुलांना नवीन पद्धतीने व बुद्धिमानीने प्रशिक्षित केल्याने ती साहसी व आत्मविश्वासू होतात. कुंभ जातकांजवळ गोष्टींचे भांडार असते. व मुलांना मुलांप्रमाणे नक्कल करुन शिकवू शकतात. व त्यांना क्रियाशील बनवतात.
२ रे ५ वे ११ वे स्थान संतानकारक आहे ज्याचे स्वामी गुरु व बुध आहेत. हे स्पष्ट आहे की ते बुद्धिमान, माहित्गार असतील व प्त्रकार, सूचना अधिकारी, गणिती, प्रचारक ई होतील.
11. भाग्य दिवस- गुरुवार, शुक्रवार, मंगळ्वार, सोमवार भाग्यशाली दिवस आहेत. बुधवार रविवार अशुभ आहेत. शनिवारी मिश्र फ़ळ मिळेल, अधिकर नुकसान करतो. मंगळ्वार, गुरुवार करार करा, मंगळवार, सोमवार स्पर्धेत यश शुक्रवार समुद्र यात्रा, शाळा, कॊलेज प्रवेश साठी चांगला, शनिवारी व्यवहार करु नका. बुधवार, रविवारी करार करु नका.
12. भाग्य रंग- पिवळा, लाल, पांढरा, क्रीम शुभ रंग आहेत, संत्री, हिरवा, निळा अशुभ रंग आहेत.
मकर- ही राशी चक्रातील १० वी राशी असून उत्तराषाढाचे २ रे, ३ रे, ४ थे चरण, श्रवन, धनिष्ठा चे १ ले व २ रे चरण ही नक्षत्रे या राशीत येतात. मकर राशी चर, प्रधान, उष्ण, नकारात्मक, पृथ्वी तत्व, स्त्री, कोरडी, थंड, चतुष्पाद, उद्विग्न, लघु उदीत राशी म्हणवली जाते.
या राशीचा स्वामी शनी आहे.
मेष मधे शनी नीच असतो पण शनीच्या राशीमधे मंगळ उच्च असतो. गुरु या राशीत नीच असतो. सूर्य व चंद्र या राशीत शत्रू घरी मानले जातात. शुक्र व बुध या राशीत स्थित असता मित्र घरी मानले जातात.
1. शारिरिक आकृती- राशीचा स्वामी शनी हे दर्शवतो की जातक दुर्बळ, बारकट शरीराचा असेल. हळू हळू त्यात सुधारणा होईल. शरीर फ़ारसे मांसल नसेल. परंतू वयाच्या १६ व्या वर्षानंतर लवकर उंची वाढेल व शरीराचा विकास होईल. चेहरा पातळ व गोलसर असेल, नाक लांब व काळे डोळे व काळे केस असतील. शनी व रवी केसांची वाढ दाखवतो. कमजोर शनी डोक्याचे पुढील भागातील केसांची कमी वाढ दाखवतो वा नंतर कमी होतील. बलवान शनी केसाळ व्यक्ती दाखवतो. त्याचे गुडघ्याची वाटी मधे खरचटल्याचा व्रण वा मसा होऊ शकतो.
2. विशेषता- मकर ही पृथ्वी राशी असल्याने जातक कमी खर्च करणारा, काटकसरी, समंजस, विचारी, व्यावहारिक, बुद्धिवान असेल. जातक परिश्रमी, उद्योगप्रिय, शांतपणे काम करणारा स्वभाव असेल. गणना करणारा, व्यापारी असू शकतो.
मकर ही चर राशि असल्याने कोणत्याही कार्यास जबाबदारीने आणि विश्वासाने तत्परता दाखवेल. जर त्याला एखादी गोष्ट लाभप्रद वाटली तर आपले आयुष्यात पूर्ण परिवर्तन करण्यात जराही कचरणार नाहीत. योजना व्यवस्थापन कौशल्य, सहिष्णूता, धैर्य व दॄढ स्वभाव असेल. स्त्री राशी व शनी स्वामी असल्याने एकांतप्रिय प्रकृती व उपहासाने व्यथित होणारे असतात. ते इतरांच्या आशवासनावर आनंदी ही होणार नाहीत व आपले काम पुरे होईपर्यंत आशावादी ही राहणार नाहीत. जरी हे नम्र व सरळ वाटत नाहीत तरी मकर जातकास धोका देणे सोपे नाही. तो कोणाशीही घाईमधे मित्रता करणार नाही, पुर्णपणे त्यास तपासून पाहील आणि मग कायमची मित्रता करेल.
मकर जातक ईमानदार, विश्वसनीय, धर्मिक, नि”स्वार्थी, सहयोगी असेल पण पीडीत असेल तर घमंडी, बेईमान, स्वार्थी, लालची कंजूस, अपराध करण्यास न संकोच करणारा असेल.
शुभ दृष्टी शनी जातक हे दर्शवतो की तो प्रयोजनपूर्ण व वेळेचा सदुपयोग करणारा असेल. क कमजोर शनी हे दाखवतो की जातक मंदबुद्धी व काम करण्यासाठी एखाद्याच्या आधाराची गरज भासेल. सामान्यपणे तो कोणतेही काम लगेच करत नाही व शेवटपर्यंत स्थगीत ठेवतो. दुसरेकडून प्रेरणा मिळाल्यावार कामास सुरुवात करतो. मंद शनी त्याला लवकर सफ़लता मिळू देत नाही. त्याला निराश म्हणणे योग्य होणार नाही कारण हा जातक पुन्ह पुन्हा प्रयत्न करत राहतो आणी शेवटी सफ़लता मिळवतो.
मकर जातक एखादे काम सुरु झाल्यावर मात्र पूर्ण केल्याशिवाय सोडत नाही.
सामान्यपणे शुक्र एखादी गोष्ट प्राप्त करण्याची ईच्छा दर्शवतो व मकर जातकाच्या ५ वे व १० वे स्थानाची स्वामी शुक्र आहे. त्यामुळे तो आनंददायक गोष्टी प्राप्त करण्यासाठी उत्सुक असेल. तो संगीत, नाटक, सिनेमा ई. चा शौकीन असेल. सट्टा खेळणारा असू शकतो अथवा मंत्र दीक्षा प्राप्त करण्याकरता योग्य गुरु शोधेल वा भेटेल व सफ़लता प्राप्त करण्यात भाग्यशाली ठरेल.
चंद्र ७ वे स्थानाचा स्वामी असल्याने तो सतत जोडीदार अथवा मित्र संगतीची इच्छा ठेवेल व सोबत नसेल तर त्यास वाईट वाटेल. जेव्हा ते कोणतेही कार्य, अभ्यास अथवा प्रवास करतील तेव्हा मित्रांना सोबत घेतील व त्यामुळे खुश व कार्यशील राहतील.
महान व्यक्ती निर्माण करण्याची मकर राशीची क्षमता आहे. दशम स्थानी शनी उच्च असेल तर राजकारणी व्यक्ती असू शकतो. तुळ राशीमधे काही उपनक्षत्रांमधे शनी असा प्रभाव प्राप्त करेल की ते कार्यशील, धुर्त, चतुर, कूटनीती कुशल व स्वार्थी असतील. बुध निवड्णूकीच्या आधी लोकांना आशवासने देतो आणि नंतर विसरुन जातो. पण अशा व्यक्तींच्या कुंडलीत शनी बुध शुभ संबंध देशहिताचे ठरेल. कारण ते देशासाठी नि:पक्षपाती कार्य करतील फ़क्त त्यांच्या धीम्या गतीने.
3. कमजोरी- मकर लग्न वा लग्नेश शनी अशुभ दृष्टीत असेल तर जातक स्वार्थी व अहंकारी असेल. निराश व भंगलेल्या हृदयाचा असेल. अधिक चिंतन मनन करुन मानसिक दबाव घेईल व त्याचा थकवा जाणवेल वा जे आरोग्यास अतिशय घातक ठरु शकते.
4. धन व संपत्ती- मकर जातक परंपरावादी असून कमजोरी, बाधा, चिंता यात न अडकण्याचा व सफ़लता मिळेपर्यंत काम करण्याचा प्रय्त्न करतील. त्यांची महत्वाकांक्षा त्यांना कष्ट उपसण्याकडे प्रवृत्त करते व नाव, प्रसिद्धी, सन्मान व धनवान होण्याची इच्छा असते. ते येणारी संधी न चुकवण्याचा प्रय्त्न करतील पण ते व्यापारांचे वा सुविधांचे एकीकरण करण्याचा उपद्व्याप करतात. १२ पैकी कोणत्याही राशीचा व्यापारी गुरुच्या दशेमधे विस्तार करेल, अनेक शाखा काढेल, तोच व्यापारी शनीच्या दशेमधे अथवा मकर मधे स्थित ग्रहाच्या दशेमधे त्याचे एकत्रीकरण करेल. मकर जातकास निराशा घेरु शकते. सावधपने सर्व कागद पाहिल्यावर व पर्याप्त सुख प्राप्त केल्यावर स्थायी संपत्ती साठी विनियोग करतील.
ते उद्योगी असतात व हळूहळू संपत्ती गोळा करत राहतात. जास्त जबाबदारी घेत नाहीत व संधी पकडण्यास विलंब करतात आणि लाभापासून वंचित राहतात. पण पैसे उधळत नाहीत.
जर नोकरीत असतील तर मितव्ययी, खरे, विश्वासपात्र, सतर्क असतील. ते वित्त विभागात नोकरी करण्यास योग्य असतात. ते नेहमी भविष्याचा विचार करुन अकस्मिक खर्चा साठी योग्य बचत करतील.
5. नोकरी व्यवसाय- शनी लग्न व व्दितीय स्थानाचा स्वामी असल्याने सूर्याची दृष्टी असेल तर अर्थ, शासकिय सेवेमधे, नगरपालिका, स्थानिय परिषद, खनिज पदार्थ, मोठ्या संस्थांचा संस्थांचा व्यवस्थापक, ठोक व्यापार ई संबंधित नोकरी व्यवसाय करेल.
चंद्राची शुभ दृष्टी असेल तर घासलेट, जमीन, पशू, शेती, विहीर खणणे, तलाव, किल्ल्यांची दुरुस्ती ऒईल, खाण ई संबंधित नोकरी व्यवसाय करेल.
मंगळाची शुभ दृष्टी असल्यास धातुचे नक्षीकाम, मिस्त्री, इंजिनियर, सर्व्हेयर, सिमेंट व चामडे( शुक्र पण संबंधित हवा), शल्य चिकित्सक ( सुर्य पण संबंधित), वकील (गुरु पण संबंधित), वीट भट्टी ई संबंधित नोकरी व्यवसाय करतो.
बुधाची ची शुभ दृष्टी असल्यास इंजिनियर, गुप्त पोलीस, कादंबरीकार, विचारवंत, गणीत व भौतीक शिक्षक, शास्त्रीय उपकरणे, सी आय डी (मंगळ पण संबंधित), हस्तकला, ध्यान, योगी ई संबंधित नोकरी व्यवसाय करतो.
गुरुची ची शुभ दृष्टी असल्यास चिकित्सक, शास्त्रद्न्य, क्लब, सोसायटी, कंपनी व्यवस्थापक, धर्मिक दान परिषद, जमीन, खाणी, शिक्षण, वित्त, कायदा, मोठे ठेके ई संबंधित नोकरी व्यवसाय करु शकतो.
शुक्राची ची शुभ दृष्टी असल्यास जातकास केमिकल्स, खनीज, वस्तू, चामडे, हाडे, जन्म मृत्यू नोंदणी, सन्यासी, बाग, जमीन, कब्रस्थान, ई संबंधित नोकरी व्यवसाय करतात. पुरोहित वा बाबा ज्याची गुरु व शुक्र शुभ दृष्टी असेल तर विवाह जमवण्यामधे निपून असतात. पुरोहित वा बाबा ज्याची शनी व शुक्र शुभ दृष्टी असेल तर विवाह विच्छेद मधे निपून असतात.
6. आरोग्य- मकर लग्न वा लग्नेश शनी अशुभ दृष्टीत असेल तर जातक स्वार्थी व अहंकारी असेल. निराश व भंगलेल्या हृदयाचा असेल. अधिक चिंतन मनन करुन मानसिक दबाव घेईल व त्याचा थकवा जाणवेल वा जे आरोग्यास अतिशय घातक ठरु शकते.
मकर गुढगे वा टाच दर्शवतो. शनी हाडांचा विकास दर्शवतो. मकर दुष्काळ व महामारी दर्शवतो. हिस्टेरिया, संधीवात, गाठी, सर्दी शनीव्दारे दर्शित होते. हे मानसिक दबाव घेऊन व आतुन कुढत राहतील व त्याचा आरोग्यावर व पचन संस्थेवर परिणाम होतो. क्वचित पोट फ़ुगु शकते.
मकर कर्क राशीच्या विपरीत असल्याने फ़ुप्फ़ुसासंबंधी त्रास होऊ शकतो. सिंह राशीपासून ६ वे असल्याने तो हृदयासंबंधी त्रास होऊ शकतो. उत्तराषाढा नक्षत्रामधे शनी असेल तर तो हृदयाच्या धडकण्यास प्रभावित करतो. उत्तराषाढा मधे मंगळ असेल तर तो हृदयाकडे जाणारे रक्त वाहिणीत गुठळ्या निर्माण करतो. राहू केतु असेल तर रक्तदाबाचा त्रास होतो.
श्रवण नक्षत्रामधे स्थित ग्रह फ़ुप्फ़ुस, एक्झीमा ई वर प्रभाव ठेवतो. धनिष्ठामधे स्थित ग्रह उच्चताप, दमा, न्युमोनिया, पित्त, जखम, फ़्राक्चर, हाड सरकणे ई. दर्शवतो. मकर चर राशी असल्याने त्याचे ११ वे स्थान वश्चिक बाधक स्थान असल्याने मंगळ दीर्घाय़ू करता शुभ नाही.
२ रे व ७ वे स्थान मारक आहे. शनी लग्नेश असल्याने स्वभावत: आयुष्य कारक आहे व २ रे मारक स्थान कुंभ चा स्वामी आहे, त्यामुळे शनी जातकाच्या आयुष्यास घातक ठरेल. सप्तमेष चंद्र आहे, म्हणुन मंगळ, शनी व चंद्र पापग्रह आहेत व त्यांच्या दशा अंतर्दशेत मृत्यू चे कारक होतील. अष्टमेश सूर्य असल्याने त्रास देऊ शकतो व षष्ठेश बुध प्रकृतीला प्रभावित करतो व व्हिटामिन बी ची कमतरता, गैस्ट्रिक त्रास, सामान्य नाडी रोग, बुध दशे अंतर्दशे मधे होऊ शकतो.
7. मित्र व परिवार- सामान्यपणे मकर जातक कोणासही एकदम मित्र बनवत नाहीत. पण त्याला पुष्कळ व्यक्ती ओळखतात. अनेक परिचित असले तरी ही चांगले मित्र फ़ार कमी असतील व तो आपल्या मित्रांसाठी सच्चा असेल व कायम साथ देतील. बुद्धिमत्तापूर्ण गोष्टींमुळे इतरांना प्रसन्न ठेवू इच्छितो व सोसायटी, क्लब सदस्य बनण्याकरता योग्य असतो. ज्यांचा जन्म मंगळ्वार वा वृस्चिक राशीमधे वा मृग, चित्रा वा धनिष्ठा, भरणी, पूर्वाफ़ाल्गुनी, पूर्वाषाढा नक्षत्रामधे झाला असेल, ते हितैषी आहेत व ते त्याला मदत करण्यास मागेपुढे पहात नाहीत व न सांगता मदतीस येतील.
११ वे स्थानाचा व ४ थे स्थानाचा स्वामी मंगळ असल्याने त्याचा आईकडे ओढा असतो व आईकडून लाभ प्राप्त करतो. पोटभाडेकरु सहयोग देतील, मकर जातकाचे मित्र विस्तृत विचारधारेचे वा धनवान असू शकतात.
सामान्यपणे मकर स्त्री जातक विवाहास उत्सुक नसते, परंतू तिचे लग्न लवकर जमते, तिला विवाह करावा लागतो. तिला जास्त मुले आवडत नाहीत. पण जरी मकर जातकास मुले जास्त असली तरी कर्तव्यामधे कधि कसूर करत नाहीत. ते आपल्या मुलांवर व जोडीदारावर प्रेमाचा अतिरेक करत नाहीत व त्यागही करत नाहीत. त्यामुळे त्यांचा गैरसमज होऊ शकतो की आपल्यावर प्रेम करत नाहीत. हे सुंदर वस्तूंचा संग्रह करतात. वाचनाची आवड व पुस्तकांच्या संग्रहची आवड असते. त्यांना मारहाण ई आवडत नाही व शांतीपूर्ण एकांत वातावरण आवडते. जर दांपत्य भांडणारे असले तरी मकर जातक त्यावेळेपुरता घरातुन निघून जाईल. ते आपल्या पारिवारिक जीवनाचा मान सन्मान टिकवण्याची इच्छा ठेवतात, मग जोडीदार कितीही त्यात बाधा आणू देत.
8. प्रेम- मकर जातक जोडीदारावर प्रेम करतो पण ते व्यक्त करत नाही. नाही तो लडिवाळ वा नृत्य ई करुन जोडादारास खुश करण्याचा करेल. तो भाऊक होणार नाही. जोडीदाराच्या निकट असला तरी उत्सुक व उतावळा होणार नाही. वा पुढाकार घेणार नाही. तो २ ३ वेळा जोडीदाराची विचारपूस करुन संमती मागेल व तरीही धिम्या गतीने सामोरे जाईल. या त्याच्या अवेळी संथ पणामुळे जोडीदार असमाधानी होऊ शकतो. जोडीदाराची निवड करण्यास देखील वेळ घेऊ शकतात.
9. वैवाहिक- २, ७, ११ स्थान विवाह दर्शवतो. यांचे स्वामी शनी, चंद्र व मंगळ आहेत. या मधील सर्वात बलवान ग्रह कोणता हे माहीत करा, जो जोडीदाराचे प्रकृती, स्मृती, विशेषता ई. दर्शवतो.
जर व्दितीयेश शनी बलवान व उत्तम प्रकारे स्थित असेल तर शनी दशा अंतर्दशेत विवाह होईल. जोडीदार फ़ार स्वार्थी पण कमी खर्चिक असेल. व जातकास देखील वायफ़ळ खर्च करु देणार नाही. परिश्रमी असून परिवाराची प्रथा वा परंपरा पुढे सांभाळेल.
जर सप्तमेश चंद्र बलवान व उत्तम प्रकारे स्थित असेल तर जोडीदार भित्रा व प्रकृतीने कमजोर असेल. वारंवार निवासस्थान बदलण्याची इच्छा ठेवेल. अस्थिर असेल तरीही जातक व परिवाराशी जिव्हाळा असेल. दयाळू, स्वामीभक्त, व्यव्स्थित घर सांभाळ्णारी, सुविधा पुरवणारी व पतीचे सहकार्य मागणारी असेल.
जर लाभेश मंगळ बलवान व उत्तम प्रकारे स्थित असेल तर अधुनिक व पुरुष स्वभाव वाला जोडीदार मिळेल. ती योग्य व विश्वसनीय पत्नी सिद्ध होईल. परिवारास उत्तम प्रकारे सांभाळेल. कष्टाळू, सुग्रण, आदरातिथ्य करणारी असेल. ती मकर जातकास स्वतंत्रता देणार नाही. ती प्रत्येक गोश्टीचे मार्ग्दर्शन करेल. व कठोर शिस्तीचे असेल. सामान्यपणे पुष्कळ कमी वयामशे अकस्मात विवाह निश्चित होऊन विवाह होतो.
10. संतती- मकर जातकास पुष्कळ संतती असू शकते. तो त्यांचे वरचे प्रेम उघड व्यक्त करणार नाही. त्याचे कर्तव्य नीट पार पाडेल. खेळ कुद मधे कमी सहभाग घेईल. मुलांना शांत बसवीन आपले काम करणे पसंत करेल. तो आपल्या मुलांना एका चौकटीच्या बाहेर जाऊ देणार नाही व नियंत्रणामधे ठेवेल. ते तरी बाहेरुन प्रेमळ वाटले नाही तरी जसजशी मुले मोठी होत जातील, तसे त्यांना हे कळेल की वडील आतुन आपल्यावर प्रेम करतात व आपल्या हितालाच प्राधान्य देतात व आपल्याला सुख सुविधा देण्यासाठी अपार कष्ट घेतात.
11. भाग्य दिवस- तो आपल्या मुलांना एका चौकटीच्या बाहेर जाऊ देणार नाही व नियंत्रणामधे ठेवेल. ते तरी बाहेरुन प्रेमळ वाटले नाही तरी जसजशी मुले मोठी होत जातील, तसे त्यांना हे कळेल की वडील आतुन आपल्यावर प्रेम करतात व आपल्या हितालाच प्राधान्य देतात व आपल्याला सुख सुविधा देण्यासाठी अपार कष्ट घेतात.
शुक्रवार, मंगळ्वार शनिवार सर्वोत्तम आहेत. बुधवार सफ़लता देतो. प्रतीस्पर्धी वर विजय मिळ्वण्यास व दीर्घयात्रा करण्यास चांगला. गुरुवार रविवार खर्चिक आहेत. सोमवारॊ शत्रूता व कोर्ट कचेरी मागे लावतो. मंगळ्वार, शुक्रवार करार करण्यास चांगला. शनिवारी पैसे गुंतवण्यास चांगला. रविवारी व सोमवारी प्रवास टाळा. मंगळ्वारी, शुक्रवारी देव देवतांची प्रार्थना करा.
धनु ही राशीचक्रातील ९ वी रास असून गुरु हा अधिपती आहे. या राशीमधे मूळ, पूर्वाषाढा व उत्तराषाढा चे १ ले चरण ही नक्षत्रे येतात. ही अग्नी, स्थिर, उभय, सकारात्मक, पुरुष, गरम, कोरडी, उभय शरीर, दीर्घ उदीत राशी आहे. धनु मधे कोणताही ग्रह उच्च वा नीच नसतो. बुध या राशीमधे कमजोर असतो. सुर्य, चंद्र, मंगळ धनु मधे मित्र घरी स्थित मानले जातात. शनी, शुक्र, बुध या राशीमधे शत्रू घरी स्थित मानले जातात. धनु राशीव्दारा एक मार्ग दोन कामे दाखवली जातात. गुरु स्वामी असल्याने कोनताही आजार वा अपघात झाला तर जातकाचे त्यातुन रक्ष्ण होईल. गुरुच्या अनुकुल दृष्टिचे तात्पर्य की जातकास दैवी सहाय्य प्राप्त होईल. गुरु जर बुध चे बरोबर असेल तर कोणीही तुमचे इच्छेविरुद्ध जाणार नाही.
1. शारिरिक आकृती- सुविकसित शरीर, उंच, मोठे डोके, उंच व जाड भुवया, लांब नाक, चमक्णारे डोळे, लोभस चेहरा, गौरवपूर्ण दृष्टि, सुंदर व्यक्ती असू शकतो.
2. विशेषता- धनु अग्नी राशि असल्याने तुम्ही दृढ, साहसी, बलवान, महत्वाकांक्षी व लोभी असाल. तुम्ही कोणत्याही गोष्टीस चांगल्या दृष्टीकोणाने पहाल. तुम्ही धांदरट होणार नाहीत. तुम्ही अगदी प्रतिकुल परिस्थितीमधे ही डगमगून जाणार नाहीत व परिस्थिती विरुद्ध आत्मविश्वासाने निर्भयपणे लढाल. जेव्हा अडचणी येतात, तेव्हाच तुमची परीक्षा होत असते. अग्निराशी तुम्हाला उत्साह, शक्ती, पौरुष, चैतन्य प्रदान करते. प्रथम राशी असल्याने तुम्ही प्रत्येक बाबतीत गुण अवगुणांचे मुल्यांकन कराल, पूर्ण व गहन विचार कराल आणि मगच निर्णय घ्याल व कामास सुरुवात कराल. तुमची कामाची सुरुवात उशीरा होईल कारण त्यापूर्वी तुम्ही मनन, चिंतन, व योजना बनवली असेल.
अग्नी राशि असल्याने तुम्हास स्वभावत: कोणाच्या आदेशाखाली काम करणे आवडत नाही, तुमची स्वत:ची अशी स्वतंत्र काम करण्याची पद्धत असते व ना ही तुम्ही सतत एका ठिकाणी बसून काम करु शकता. तुमची इच्छा अनेक बदल घदवण्याची असते. व तुम्हास मुक्त हस्त प्राप्त असेल तर तुम्ही भव्य दिव्य दिसता.
पुरुष राशी असल्याने तुम्ही अधिक विचार करणे, बोलणे, इच्छा असलेली गोष्ट करणे यात संकोचत नाही. तुम्ही स्वत:वर प्रेम करता व या जगात एकटा आलोय या उक्तीप्रमाणे सिद्धांतावर कायम रहाल. तुम्हाला याची पूर्ण जाणीव असते की आपन कधी कधी जे काही काम करतो, त्याचे वाईट परिणाम ही होऊ शकतात. तुम्ही वास्तविकपणे जे काही अनुभव कराल ते बोलून दाखवाल, मग याचा विचार करणार नाही की ईतरांना अशी वाक्ये आवडतील का नाहीअ.
धनु राशी चक्रातील ९ वी राशी असल्याने तुम्ही उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न कराल अथवा परिक्षार्थी न राहता कायम विद्या मिळवत रहाल. तुम्हाला प्रवासाची आवड असेल. तुम्ही विदेशात मैत्री वाढवण्याचा प्रयत्न कराल. शुभ दृष्टी असेल तर तुम्ही उच्च दार्शनिक, सच्चे ईश्वर भक्त होऊ शकता.
गुरु राशी स्वामी असल्याने प्रगल्भ बुद्धी, विश्वास, अध्यात्मिक विकास देतो. न्याय, सहनुभुती, साहस, अतिरिक्त चांगली भावना, प्रेम आहे. तुम्हाला खेळांची आवड असेल.
९ वे व १० वे स्थानाचे अधिपती सूर्य व बुध असल्याने धनु लवकर नवे विचार सनजू शकतात व त्याची तुलना करतात. तुमच्या मधे अंतर्द्न्यान शक्ती असू शकते. तुम्हाला एखाद्यावर अन्याय होत आहे दिसले तर त्यास त्याचे गमावलेले परत मिळ्वून देण्यासाठी त्यास मदत कराल.
६ वे स्थान इच्छा वा वासना दर्शवते. ६ वे स्थानाचा शुक्र हा स्वामी असल्याने, पाळीव कुत्रा वा अन्य जनावरांना सांभाळाल. स्त्री, उंची वस्तू, सुगंधी द्रव्ये, शॊपिंग या विषयी ओढा असेल.
११ वे स्थानाचा स्वामी शुक्र असल्याने तुम्हास अनेक मित्र व लाभदाता असतील. तुम्ही भिन्न लिंगी व्यक्तींबरोबर राहने पसंत करता. तुम्ही मित्रता कायम ठेवू शकता व अनेक वर्षे निभावता.
चंद्र ८ वे स्थानाचा अधिपती असल्याने मन कधी कधी अस्थिर वा अस्वस्थ राहू शकते, अविश्वास वाटू लागतो.
लग्न, वा धनु चंद्र रास वा स्थित ग्रह पीडीत असेल तर, अधिकांश रुपाने चांगले असाल पण कधी कधी तुमचा व्यवहार अविवेकी असेल अथवा कुशलतेची कमी होऊ शकेल. तुम्ही असे कार्य करता ज्याची दुसरा काम चांगले असेल तरी प्रशंसा करत नाही. वाढवून सांगणे वा वायफ़ळ बोलत राहणे हा अवगुण असेल. तुम्ही अनेक पोकळ आश्वासने देत रहाल. विचार मांडताना इतरांचा अनादर करतील. आई वडील, भाऊ यांचे बाबत सतत काही ना काही तक्रार करत राहतील.
4. धन व संपत्ती- २ रे स्थानाचा स्वामी शनी असल्याने तुम्ही उशीरा अथवा धीम्या गतीने धनसंचय करता. धनसंपत्ती मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. राशी स्वामी गुरु असला तरी २ रे स्थानाचा स्वामी शनी आहे तेव्हा वेळ पडली तर कोणत्याही मार्गाने पैसे मिळवण्यास संकोच करणार नाही, अथवा पैसा मिळवून देणारे कोणतेही काम हलके वा उत्तम असला विचार करणार नाहीत.
5. नोकरी व्यवसाय- राशी स्वामी गुरु असल्याने तुम्ही शिक्षक, व्याख्याता, बैंक वा आर्थिक, धर्मिक संस्थेमधे, समुपदेशक ई संबंधित नोकरी व्यवसाय करु शकता.
बुध दशमेश असल्याने हे दर्शवतो की तुम्ही संपादन, प्रकाशन, जाहिरात प्रतिनिधी, मिडीया, माहिती तंत्रद्न्यान, सिव्हील अथवा बांधकाम संबंधी प्रोडक्टस, विदेशी दुतावास, ई. संबंधित नोकरी व्यवसाय करु शकता.
धनु राशीमधे स्थित ग्रह जर २, ६, १० स्थानाशी संबंधित असेल तर खाण, परिवहन व इंजिनियरिंग संबंधित काम करु शकतो.
मंगळ पंचमेश व व्दादशेश असल्याने सट्टा वा जुगार तुम्हास लाभदायक नाही. ज्या व्यक्तीच्या पूर्वाषाढा नक्षत्रामधे १, २, ३, ६, ११ स्थानाचा स्वामी स्थित असेल तर ते विनाश्रम श्रीमंत होऊ शकतात व लाभ प्राप्त करु शकतात.
6. आरोग्य- धनु राशी जांघ, कुल्ले, कंबर, कमरेच्या मागिल रक्त नलिका दर्शवतो. त्यामुळे कुल्लांवर गाठ, सांधे सुजणे, कंबर दुखणे, मसल्स या भागातील हाडे दुखणे, वात रोग फ़ुप्फ़ुस ई, संबंधित कष्ट होतात. धनु मधे मंगळ व शनी असेल तर हाडामधे फ़्रैक्चर, जांघे मधे फोड, ई साठी शल्य चिकित्सेची गरज पडते. धनु राशित गुरु स्थित असल्यास वात, फ़ुप्फ़ुस, फ़ीटस, ई. संबंधी त्रास होऊ शकतो. धनू पूर्वाषाढा मधे गुरु असल्यास मधुमेह होऊ शकतो. शनी मुळे कुल्ल्ह्यावर घाव, क्षय, जुना फ़ुप्फ़ुसाचा रोग, दमा ई त्रास उदभवू शकतात. चंद्रामुळे फ़ुप्फ़ुसावर सूज, न्युमोनिया, मधुमेह होऊ शकतो. सूर्यामुळे नेत्रहीनता, व कमजोरी दर्शवतो. शुक्र गाठ उत्पन्न करतो. बुध उचकी, दमा ई. धनुसाठी बुध राजयोगाधिपती ग्रह असला तरी ७ वे स्थानाचा म्हणजेच बाधक व मारक स्थानाचा अधिपती असल्याने प्राणघातक आजार निर्माण करतो.
7. मित्र व परिवार- तुमचे नातेवाईकांशी संबंध बेताचेच असतात. तुम्ही विभिन्न लिंगी व्यक्तीबाबत उदार असाल व त्यांचेशी मित्रवत रहाल. कोणाशीही मैत्री करणे तुमच्या करता कठीण नाही. तुमचे अनुभवाने हे समजाल की तुमची मैत्री होण्यापूर्वी वाद होतील व नंतर तुम्ही कायमचे घनिष्ठ संबंध प्रस्थापित कराल. तुम्ही तुमच्या मुलांवर अधिक खर्च कराल. ज्यांना संतती नसेल ते शिक्षण संस्था, मंदीराचा जीर्णोद्धार ई गोष्टींवर खर्च कराल. इतरांकरता कॄपाळू रहाल, पण नातेवाईकांशी जपून व्यवहार कराल. लग्नेश व चतुर्थेश गुरु असल्याने तुम्हाला घरी स्वतंत्रता वा प्रायव्हसी अशी मिळणार नाही. अशा प्रकारे धनु व मिथुन राशीचे लोक मित्रता करतात. कारण ११ वे स्थान मित्र दाखवतो, ६ वे स्थान वाद दाखवतो. व धनु राशीस शुक्र ६, ११ चा व मिथुन राशिस मंगळ ६, ११ चा स्वामी आहे. त्यामुळे त्यांचे दशेत हे अनुभव येतील. तुमचे मित्र तुम्हास स्थायी रुपाने पसंत करतील. तुमचे गोड स्मित हास्य व तेज स्वभाव तुम्हास भरपूर मित्र देतील. ज्या लोकांचा जन्म शुक्रवारी अथवा वृषभ, तुळ लग्न मधे असतो तो भरणी, पूर्वा फ़ाल्गुनी अथवा अथवा पूर्वाषाढा नक्षत्रांमधे असेल तर ते चांगले मित्र असतील व ज्यांचा जन्म हस्त नक्षत्री असेल ते कळत नकळत तुमच्या बदनामीस कारणीभूत होतील, कारण अष्टमेष दशम स्थानामधे अष्टमेष च्या नक्षत्रमधे असेल.
8. प्रेम- पंचम स्थानाचा स्वामी मंगळ असल्याने प्रेमात उत्कटता, आकर्षण व पुढाकार दाखवतो. मंगळ व्दादशेश पण असल्याने. लांबच्या प्रवासात, अनोळ्खी ठिकाणी, सतत च्या सहवासाने आकर्षण वाढून प्रेम जमू शकते. प्रेमात तुम्ही आक्रमक असू शकता व पुढाकार घ्याल. पण मनासारखे न झाल्यास तुम्ही फ़ार क्रोधी व्हाल, १२ स्थानचे स्व्मी मुळे असफ़ल होण्याची संभावना आहे. तुम्ही वारेमाप खर्च कराल.
9. वैवाहिक- धनु जातकाच्या पत्नीने फ़ार बुद्धिमान व कुशल असायला हवी, कारण तुमचा स्वभाव शीघ्रकोपी असतो व ती हे समजून घेणारी हवी की राग थोडावेळच राहील. ती कुशलतापूर्वक व्यवहार करेल व वैवाहिक आयुष्य आनंदी व्यतीत करेल. धनु व्यक्ती, खेळ, सोसायटी, क्लब ई चा शौकीन असतो, व त्यासाठी वेळ देतो, त्यामुळे असे भासेल की यांना पारिवारीक जॊवन कमी महत्वपूर्ण आहे. त्यांच्या आयुष्यात प्रगल्भता उशीरा आल्याने त्यांचे पत्नीसाठी तो समयोचित व सरळ स्वभावाचा माणूस भासतो. जर एखादी व्यक्ती धनू जातका मुलीशी विवाह करेल, तर ती व्यक्ती भाग्यवान असेल. एक व्यक्ती आपल्या पत्नीपासून जी काही अपेक्षा करेल ते सर्व काही तिच्यामधे मिळेल. ती कधीच पतीच्या कामामधे अडथळे निर्माण करणार नाही व पतीने विचारल्याशिवाय काही सल्ला ही देणार नाही. आपल्या पतीस प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे मदत करत राहील. ती शांत, चतुर, कुशल व विचारी असेल. तिला कधी वाटेल की आपला पती चुकीच्या मार्गाचर चालला आहे तरी त्यास ती अतिशय हळुवार पणे ही गोष्ट लक्षात आणून देईल.
२, ७, ११ वे स्थान विवाह्पूरक स्थाने आहेत. २ रे चा स्वामी शनी, ७ वे चा बुध व ११ वे चा शुक्र स्वामी आहे. हे तीनही ग्रह एकमेकांचे मित्र आहेत त्यामुळे चांगले स्थितीत असता व मंगळाची अशुभ दृष्टी नसता, जोडीदार अत्यंत विश्वसनीय, स्वामीभक्त कर्तव्य्परायण, प्रसन्नचित्त व घर प्रसन्न ठेवणारी, असेल. पण मंगळाने २ व ११ चे स्वामी ना पीडीत असेल तर एकपेक्षा अधिक संबंध ठेवणारा व संभावना असणारा जोडीदार लाभेल.
10. संतती- २, ५, ११ संतती दर्शक स्थाने आहेत. शनी, मंगळ, शुक्र यांचे स्वामी असून तुमची मुले छोटी असतील तेव्हा, तेव्हा त्यांना जवळ घेणार नाहीत व जसजशी मुले मोठी होतील तसे तुम्ही त्यांचे कडे जास्तीचे लक्ष पुरवाल. त्यांचे व्यवहार, गतिविधी मधे शंका व सल्ला ई मार्गे नाक खुपसणे थांबवले पाहीजे. जर तुम्ही त्यांचे स्वतंत्रतेमधे बाधा आणलीत तर ते अधिक हट्टी होतील व मग तुम्ही त्यांना सुधारु शकणार नाही. आपल्या मुलांबरोबर नेहमी कुशलतेने व्यवहार करा.
11. भाग्य दिवस- सोमवार दु:ख व कष्ट्दायक आहे. मंगळवार व्यर्थ खर्च व नुकसान दर्शवतो. बुधवारी करार करण्यासाठी शुभ, गुरुवार परीक्षेत सफ़लता देतो. शुक्रवारी सट्टा, निवडणूक, कोर्ट कचेरी साठी लाभदायक ठरेल. शनीवार हळ्हळू दृढतापूर्वक उन्नती व दुसरेंना सहाय्यता देतो. रविवार सुखदायक व समृद्धीदायक आहे. दीर्घ यात्रा करा. मंगळवार, बुधवार, शुक्रवार शांती, हवन, प्रार्थना करण्यास चांगला.
12. भाग्य रंग- पांढरा, हिरवा, संत्री व हलका नीळा शुभ, लाल रंग अशुभ
वृश्चिक राशीचक्रातील ८ वी राशी आहे. या राशीचा स्वामी मंगल असून विशाखाचे ४ थ चरण, अनुराधा व ज्येष्ठा नक्षत्र या राशीत येतात. ही फ़लदायी, स्थिर, हिंसक, दीर्घ उदीत, मौन, स्त्री, जलराशी आहे. याराशीत कोणताही ग्रह उच्च नसतो. चंद्र वृश्चिक राशीत कमजोर असून नीच असतो. शुक्रा करता ही राशी हानीकारक ही आहे. सूर्य व गुरु या राशित स्थित असता मित्र घरी मानले जातात. शनी, बुध, शुक्र या राशीमधे स्थित असतील तर शत्रू घरी मानले जातात.
वृश्चिक राशी २ प्रकारचे फ़ळ देऊ शकते. उच्च वृश्चिक जातक आपल्या इंद्रियांना नियंत्रित करुन जितेंद्रिय म्हणवतात. हेच कारण आहे की श्रीकृष्ण कालिया सर्पावर उभे आहेत व आपल्या काबूमधे ठेवले आहे. नीच प्रकारचे लोक प्रतिव्देषी व भ्रष्ट असतात. त्यांची आत्मशक्ती बळकट असते पण ते असंगत असतात. त्यांना माहीत असते की इतरांना कशाप्रकारे ताब्यात ठेवावे, पण स्वत:स नियंत्रित ठेवू शकत नाहीत.
1.शारिरिक आकृती- वृश्चिक राशी जातक शरीर सुगठीत. व बांधणी उत्तम असते.
सामान्यपणे हात लांब असतात. मध्यम उंच असतात. रुंद चेहरा, अधिकारपूर्ण दिखावट, छोटे व कुरळे केस, मांसल शरीर व चांगले व्यक्तिमत्त्व असते.
2. विशेषता- स्थिर राशी असल्याने स्थिर मेंदूवाले असतात. जेव्हा तुम्ही एखादे विशिष्ट उद्देश डोक्यात घेता, मग रेंगाळत न राहता, तो उद्देश ठेवून च कामास लागता. तुम्ही फ़ार काळ रिकामे स्वस्थ बसू शकत नाही. जोपर्यंत ठरवलेले काम पूर्ण होत नाही, वेळ घालवत नाहीत. विघ्न वा अडचणी आल्यास त्यातुन मार्ग काढण्यासाठी कठोर परिश्रम करतात पण चिकाटी सोडत नाही संघर्ष करत राहता.
जल राशी असल्याने बुद्धी तीक्ष्ण व तेज असते. तुम्हाला तुमच्या योग्यतेची व सामर्थ्याची जाणीव नसते अथवा उशीरा जाणीव होते. पण जेव्हा एखादे काम हाती घ्याल तेव्हा हेच सिद्ध होईल की तुमच्यामधे परिपूर्ण स्वयंशक्ती आहे व तुम्ही तुमचे कार्य विनाआराम पूर्ण कराल. संभवता मारुतीचा जन्म या राशीमधे झाला असावा.
जल राशी असल्याने तुमच्या मधे परिपूर्ण भावना व विचारशक्ती व आत्मशक्ती असेल. त्यामुळे तुम्ही एक प्रसिद्ध व्यक्ती होऊ शकाल. तुम्ही एक उत्तम आलोचक आहात तसेच साधनपूर्ण आहात. सर्व आर्थिक मामल्यांमधे योग्य आत्मशक्ती व कार्यकुशल असल्याने खुप सफ़लता मिळेल. तुम्ही सांसारिक सुखाचा व भौतिक सुखांचा पूर्ण आनंद आयुष्यात मिळवाल.
राशीस्वामी मंगळ तुम्हाला आत्मविश्वास युक्त प्रेरक कार्य, हिंमत, दृढता, स्वतंत्रता, उत्तेजना, शक्ती संपन्नता देते. तुमची स्वत:ची अशी आवड निवड असते. तुम्ही अतिवादी असता, व्यवाहारिक अतिरेक असेल नसेल पण असावधानी वा बेफ़िकीरीची सवय असू शकते. तुमची प्रकृती इतरांवर हावी होण्याची व त्यांना नियंत्रणात ठेवण्याची आहे.
तुम्ही हट्टी असला तरी विश्वस्त असता. तुम्ही एकांतप्रिय असता. आपले संघर्ष करत असताना अपाल्या मुलांची काळजी घेण्यासाठी खंबीर असता.
मंगळामुळे तुम्ही प्रसंगी मानसिक संतुलन गमवता. तुम्ही शीघ्र कोपी आहात व संभवत: तुम्हांस गरम पेय पिण्याची सवय असते. कधी कधी रागाच्या भरात वा नुकसानीच्या भीतीने तुम्ही घाई करुन अविवेकी काम करु शकता. तरी संयम बाळगा.
वृश्चिक मौन राशि आहे. निसर्गाच्या सानिद्ध्यात रमायला आवडते. वृश्चिक जातक एकांतात काम व संशोधन करु शकतात. ते आपल्या मार्गाने जातात. तुम्ही कोणत्याही सिद्धांतास एकदम स्वीकारणार नाही, जे पूर्वापार आहेत. तुम्ही विवेकपूर्ण विचार, विश्वास, तर्क, अनुभव व शास्त्रीय गोष्टी तपासून मग ग्राह्य धराल. तुम्ही जुने रीतीरिवाज अनुकरण करणार नाही पण त्याचा अनादर ही करणार नाही.
तुम्ही वायफ़ळ गप्पेबाजी, फ़ुशारकी, अफ़वा, काळाबाजार ची घृणा करता. तुम्ही थोडेच बोलता प्ण तुमचे शब्द युक्तीचे असतात. तुम्ही सामान्यपणे अंतिम क्षणांमधे एखाद्या गोष्टीला एकदम कलाटणी देता. अगदी अल्प काळामधे निष्णात होता व सफ़लता मिळते. वृश्चिक थोडे ऊशीरा धावण्यास सुरुवात करतात व प्रथम स्थान प्राप्त करतात.
तुम्ही इतरांचे बाबतीत स्वत:हून हस्तक्षेप करत नाहीत. तुम्ही तेव्हाच सहभागी होता, जेव्हा कोणी तुम्हास मदतीसाठी संपर्क करेल. तुम्ही सरळ व स्पष्ट्वादी व नेमके रोखठोक बोलणारे व मताचे असता. तुमची वास्तविकता ही आहे की तुम्ही थोडे रहस्यमयी असता व इतरांची आलोचना करता तेव्हा व्यंगात्मक वा उपरोधिक शब्द वा ढंगात बोलता. तुम्ही स्वत:चा बचाव करण्याकरता हुकमी एक्का राखून ठेवाल. तुम्ही शत्रूच्या शक्तीचा योग्य अंदाज बांधता व पूर्ण सतर्क राहता. व महत्वपूर्ण असे एक कमजोर बाजू शोधून काढता व वेळ्प्रसंगी उपयोग करण्यासाठी गुप्त ठेवता. वृश्चिक जातक चलाख असतात, पण ज्यांना आपले मानता त्यांचे साठी खरे, ईमानदार, विश्वसनीय असता. तुम्ही असे तोपर्यंतच असाल जोपर्यंत तो तुम्हास दगा वा नुकसान करत नाही, नंतर मात्र तुम्ही त्याचा बदला घ्याल व निर्दयी असाल.
3. कमजोरी- कोणाची बोचरी चेष्टा करु नका. तुमच्या सहायकाकडून अशी अपेक्षा ठेवू नका की तुम्च्या सारखेच चतुर व परिश्रमी असतील. मन व राग संतुलित ठेवा. एखादे छोटे नुकसान झाले तरी डोके शांत ठेवा, ते तुम्ही सहन वा भरुन काढण्याची क्षमता असते, पण तुमचा राग त्याचा खुप विध्वंस करु शकतो.
4. धन व संपत्ती- वृश्चिक राशी जातक धनप्राप्तीत भाग्यवान असतात व कोणताही धंदा वा नोकरी असू दे, जोखीम त्यांना पैसा मिळवून देते, सट्टा त्यांना लाभ देणारा असतो. कारण २ रे (धन स्थान ) व ५ वे स्थानाचा अधिपती गुरु आहे. जो संपत्तीत वाढ करतो. अकस्मिक रुपाने प्राती होते जी विशेष स्वरुपाची असते. ते घर, जमीन जुमला, फ़ार्म, वाहन ई गोष्टी प्राप्त करतात. त्यांना हे चांगले प्रकारे माहीत असते की कशा प्रकारे पैसा कमवावा. व तसेच खर्चिक ही असतात.
5. नोकरी व्यवसाय- वृश्चिक राशी रसायन, औषधी, वीमा, दारु संबंधित, बॊयलर, स्टीम इंजिन, ऒटोमोबाईल, खाण, मिलिटरी, जलसेना, चहा-कॊफ़ी, तंबाखू, तांबे, तांदूळ, खनीज, घोडे, हत्ती, दगडाचा पृष्ठभाग, जमीन खोदणे, मोठे सर्जन, संशोधक, गुप्त पोलीस, डिटेक्टिव्ह, शिपाई, न्हावी, कसाई, दंत चिकित्सक, मशीनरी, रेल वे, सट्टा ई संबंधित नोकरी व्यवसाय करु शकतात.
6. आरोग्य- वृश्चिक राशी जननेंद्रिय व मुत्राशय दर्शवते. जर रोगकारक ग्रह या राशित स्थित असेल तर मूत्राशय, गर्भाशय, अंडाशय ई. संबंधित आजाराची संभावना असते. गुरु व मंगळ स्थित असेल तर शिस्म ग्रंथीमधे वाढ झाल्याने, मैथुन संबंधी त्रास होतो. शनी स्थित असेल तर मूतखडा होऊ शकतो. वृश्चिक जे ६वे स्थान रोग स्थान मेष असल्याने व स्थित ग्रहांनुसार मंगळाच्या प्रभावाने डोके दुखी, निद्रा नाश, नाडी संबंधी पीडा, थंडी वाजणे, मूर्च्छा, गर्मी, लट्ठपणा, झोपेत चालण्याची सवय, ई. त्रास होऊ शकतात.
वृश्चिक स्थिर राशी असल्याने व चंद्र ९ वे स्थानाचा ( बाधक स्थानाचा ) अधिपती असल्याने त्याच्या दशेत आजारपण येऊ शकते. गुरु व शुक्र मारक स्थान अधिपती आहेत त्यामुळे त्याचे ही दशेत स्वास्थ्य खराब राहू शकते. ( ६ वे स्थन आजारपण, २ ७ ८ दुर्धर आजार )
7. कौटूंबिक- आनंदी व उत्तम जीवन व सफ़लता प्राप्त करण्याकरता सभोवतालचे वातावरण फ़ार महत्वाचे असते. तुमची ही महत्वाकांक्षा असते की, कि तुम्ही जे काही कराल ते इतरांनी विनाशंका स्वीकारावे. तुम्हाला तुमचे घर परिवार हा सर्व सुख सोयीयुक्त च असावा असे वाटते. व त्यासाठी तुमची अतिरिक्त खर्च करण्याची तयारी असते. घराची सजावट आपल्या आवडीनुसार करावयास आवडते, वाईट परिस्थितीलाही योग्य दृष्टिकोणातून घेता व प्रतिकुलतेचा ही फ़ायदा करुन घेता. व अशा तर्हेने कोणत्याही परिस्थितीत आपल्या कुटुंबास सुख सोयी अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करतात.
वॄश्चिक जातक फ़ार कमी वेळामधे मैत्रीपूर्ण होतात पण तोपर्यंतच जोपर्यंत त्याना समोरचा गैरफ़ायदा घ्यायचा प्रय्त्न करत नाही. मग त्यांच्याईतका भयानक शत्रू कोणी नसेल. ते कोणत्याही वागण्याचे हिशोब चुकते करतातच. त्यामुळे सच्चे मित्र वा नातेवाईक फ़ार कमी असतात. ज्यांची ते निवड करतात ते शक्ती संपन्न, अधिकार स्थितीत व प्रभावशाली असतील. ११वे स्थान जे मित्रता वा पारिवारिक घनिष्ठ संबंध दर्शवते त्याचा स्वामी बुध हा ८ वे स्थानाचा पण अधिपती असल्याने, कोण्त्याही व्यक्तीवर विश्वास असत नाही वा थेवू नये, तुमच्या गुप्त गोष्टी सांगत नाहीत अथवा सांगू नयेत.
8. प्रेम- वृश्चिक जातक वेगवेगळे मूड बाळगतो. रसिकता व प्रेमाचे बाबतीत गतीशील व उग्र असतात. जोपर्यंत तुम्ही जोडीदाराचा सहानुभूतीपूर्वक, दॄढपणाचा सकारात्मक विचार करणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याचे बरोबर आनंददायक साथ प्राप्त करु शकणार नाहीत.
9. वैवाहिक- वृश्चिक जातक आपल्या संसारास स्वर्ग समजतात. जर ते आपल्या जोडीदाराकडून आदर, सन्मान, प्रशंसा प्राप्त करत असतील तर. पण जर त्यांची विचारधारा, वागणे स्वीकारणार नाहीत तर ते दु:खी व खिन्न होतील व अतिरिक्त सोयी सुविधा उपलब्ध करुन त्यांचे प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करतील. पण तरीही उप्योग नाही झाला तर मात्र घृणा करु लागतील व कठोर व निरदयी होतील. आयुष्याचा जोडीदार दाखवणारे २ रे, ७ वे व ११ वे स्थान चे अधिपती गुरु, शुक्र व बुध आहेत हे तीनही शुभ ग्रह आहेत. त्यामुळे साधारणपणे यांना न्यायप्रिय, ईमानदार, विश्वसनीय व प्रसन्नचित्त जोडीदार मिळतो. अडचणी तेव्हा असतात, जेव्हा या स्थानी पापग्रह असतील अथवा दृष्टी ठेवतील. तो वैवाहिक आयुष्य खुप आनंदात व्यतीत करेल व आपले खरे प्रेम देईल जर त्यांचे संब्म्ध मैत्रीपूर्ण असतील.
दोघेही वृश्चिक जोडीदार असतील तर ते भाग्यशाली असतील. जर जोडीदार मीन व कर्क असतील तर वैवाहिक आयुष्य शांतीपूर्ण असेल. जर जोडीदार कन्या व मकर असेल तर ती अनुरुप जोडी असेल. शुक्र जोडीदार ईच्छापूर्ति व समाधान देणारा असेल.
10. संतती- गुरु २ रे व ५ वे स्थानाचा अधिपती आहे. बुध ११ वे स्थानाचा अधिपती आहे. त्यामुळे तुमचा परिवार मोठा झाला तरी तुम्हास संकोच होणार नाही. तुम्ही परिवार नियोजन करालच असे नाही. गुरु व बुधावर पाप ग्रहांची दृष्टी वा युती तुम्हास नि:संतती अथवा अल्प संतती बनवते. काही लोकांना एक च संतती वा मुलगी होईल. यांची मुले बुद्धिमान व भाग्यशाली असतात व कुटुंबात सर्व साधन सुविधा, सुख सोयी प्राप्त करतात.
11. भाग्य दिवस- रविवारी उत्तम आर्थिक स्थिती देतो. व्यवसायाकरता प्रभावशाली व्यक्तींना रविवारी भेटा. सोमवार विदेशी लोकांशी संपर्क, यात्रा, यशप्राप्तीसाठी चांगला. सोमवारी अधिक उत्साही व आनंदी असाल. मंगळवार उत्तम स्वास्थ्य देतो, ग्राहक मिळते, स्पर्धा, निवड्णूक, सोसायटी कारिणी, सभा ई. विजयप्राप्तीस चांगला. बुधवारी मित्रव्दारा कष्ट प्राप्त होऊ शकते. कोणत्याही करारावर सहि करु नका. गुरुवारी धनप्राप्तीस, लग्न करण्यासाठी, बैंक खाते उघडण्यासाठी चांगला. शुक्रवारी सामाजिक सफ़लता मिळते व बैंकेची स्थिती कमजोर करतो. शनिवारी अनुत्साही असता. शनिवारी कर्ज परतफ़ेड करा
तुळ ही राशी चक्रातील ७ वी राशी आहे. चित्राचे ३ रे व ४ थे चरण, स्वाती व विशाखाचे १ ले २ रे ३ रे चरण ही नक्षत्रे या राशीत येतात. ही वायु, चर, सकारात्मक, पुरुष, वैश्य, मानवीय, व्दिपाद, दीर्घ उदीत राशी आहे.
शनी या राशीमधे उच्च असतो व सूर्य नीच असतो. चंद्र, मंगळ, गुरु या राशीत स्थित असता ते शत्रू घरी मानले जातात.
1.शारिरिक आकृती- तुळ लग्नामधे जन्मलेल्या व्यक्ती ऊंच व उचीत तुलनात्मक शरीराचा असतो. त्याचे ओठ पातळ पण मजबुत असतात. तो दिसण्यामधे रेखीव, हसतमूख, व प्रमाण्बद्ध शरीराचा असतो. त्याच्या भुवया त्याच्या रेखीव पणास बाधा आणू शकतात. वयस्कर झाल्यावर डोक्याला पुढील बाजूस टक्कल पडते. नाक बाकदार असते.
2.विशेषता- तुळ जातक संतुलित डोक्याचे असतात. ते मानसिक स्थिती स्थिर राखू शकतात. गुण व अवगुण दोन्ही मापू शकतात. त्यांची विचार धारा शांत स्वरुपाची असते. ते सर्वोत्तम न्यायवादी आहेत. जेव्हा ते वादविवाद करतात तेव्हा इतरांच्या तुलनेत विशिष्ट ठसा उमटवतात. ते रचनात्मक कार्य करु शकतात.
शुक्र या राशीचा स्वामी असल्याने तुळ जातक द्याळू, सभ्य व विनीत असू शकतो. ( लग्न वा शुक्र शुभ असता) ते नेहमी सुखी व अनुकुल जीवन व्यतीत करणे पसंत करतात.ते स्वत:हून कधी वाम मार्ग स्वीकारत नाहीत. ते कोण्त्याही किंमतीमधे शांती विकत घेतील. ते ईमानदार व सहानुभूतीयुक्त असतील. त्यांना राग आला तरी लवकर शांत होतात. ते आयुष्यातील सर्व सुख उपभोगतात व आनंदी आयुष्य जगायचा प्रयत्न करतात. ते पोषाख, सुगंधी वस्तू, कला, संगीताचे प्रेमी असतात. शुक्र हे दाखवतो की तुळ जातक अनेक गोष्टीत रुची दाखवतील व चर राशी असल्याने त्यांची आवडनिवड बदलत राहील. फ़ोटोग्राफ़ी, वाचन, चित्रकला, पेंटिंग, कशीदाकारी ई. गोष्टींची आवड असू शकते.
तुळ राशी मेष राशीच्या प्रतियोगात आहे त्यामुळे तुळ जातक आपल्या व्यक्तिगत आरामाचा त्याग करेल पण इतरांकरता खुप कष्ट घ्घेतील. तुळ जातक राजनीती कुशल, प्रसिद्ध व लोकप्रिय असू शकतात.
तुळ राशी वायु राशी असल्याने उत्तम कल्पकता देते. वास्तविक आत्म शक्ती, तेज बुद्धी, आनंददायक स्वभाव देते. तुळ जातक अन्य बाबींचा विचार करुन उत्तम योजना बनवण्यास सक्षम असतो. शनी या राशी मधे उच्च असतो त्यामुळे जातक एकाग्र शक्ती, ध्यान मग्न, व अध्यात्मिक मार्गात उच्च स्थानि पोहोचू शकतात. समाजात इतरांना मार्गदर्शन करु शकतात. तुळ जातक वाद्विवाद मधे विश्वास ठेवत नाहीत. उलट मतभिन्नतेमधे मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न करतील. त्यांचा मूळ स्वभाव अहंकाररहित व मानव प्रेमी असतो. जेव्हा कोणी एखादा चूक करतो, तुळ जातक लवकर्च ती विसरुन जातो. ते भौतिकतेपेक्षा अध्यात्मिक जास्त असू शकतात. तुळ जातक चांगल्या कामाकरता दान करतात व उदार व दयाळू असतात.
तुळ पुरुष राशी आहे व राशीमालेतील ७ व्या स्थानाची राशी आहे ( ७वे स्थान स्त्री दर्शवते) त्यामुळे तुळ जातकामधे खुप वैवाहिक प्रेम असते व दुसरेंच्या भावनेला धक्का न देणारे असतात. ते सरळ प्रकृतीचे, चतुर व हृदय जिंकणारे असतात. तुळ जातक आपल्या जोडीदाराबरोबर आनंदपुर्ण जीवन व्यतीत करतात. तुळ जातकास कह्यात घेणे अवघड असते. तो विरोधकांना शांतपणे कूत नीतीने वा छ्ळ कपटाने नामोहरम करेल.
मंगळ व्दितीयेष असल्याने निर्भयता देतो. ते आपला तर्क व विचार स्पष्ट मांडू शकतात. तो कोणत्याही परिस्थितीचा सामना युक्ती-प्रतियुक्ती ने करु शकतात. तुळ जातकाचे काम सुंदर व स्वच्छ असते. त्यांची शैली सुंदर व आकर्षक असते, जी लोकांच्या मनात शांत भावना निर्माण करु शकते.
राशीचा स्वामी शुक्र असल्याने तुळ जातक कपडे, फ़र्निचर, साधन व सुविधांमधे बरीच रुची ठेवतो. ते आपल्या जोडीदारास नेहमी प्रसन्न ठेवतील. जोडीदारा असा असेल की तो याच्या प्रेमात हरखून व हरवून जाईल. पण तुळ जातक आसापासच्या वातावरणावरही लक्ष ठेवून असेल. तुळ जातक तुळ्वर अथवा शुक्रावर मंगळाची दृष्टी असल्यास रसिक असतात व संगीताची आवड असते. शनीची दृष्टी असल्यास दर्दभरे संगीत आवडते. गुरुची दृष्टी असल्यास प्रार्थना वा भजन आवडते, चंद्र श्रोत्यांना मंत्रमूग्ध करणारे मधुर संगीत दाखवतो.
3.कमजोरी- तुळ जातकाने निर्णय वेळेत घेण्याचा प्रयत्न करावा, कारण त्यांच्या मेंदूत एका पाठोपाठ एक विचार उत्पन्न होत राहतात व ते त्यात अडकून राहतात. इतरांचे राहणे व अडाणीपणाची नक्कल करणे टाळावे. ते अहंकारी असतात. सर्व प्रिय राहण्याच्या नादात, काही मित्र तुमचा गैरफ़ायदा घ्यायचा प्रयत्न करतात, तेव्हा अशा मित्रांशी सावधानतेने व्यवहार करावा. तुळ जातक नेहमी माफ़ करण्यास व झालेले विसरण्यास तयार असतात. माफ़ करा पण धडा न घेता विसरणे हे टाळा. तुळ जातक हे नेहमी अनुभव करतील की त्यांना प्रत्येक ठिकाणी नवीन पोषाख हवा व रीती रिवाज सांभाळण्यासाठी जास्त खर्च करतील, पण हे स्वीकारणार नाहीत की उपजत व्यक्तिमत्वाचा प्रभाव असेल तर जास्त सजावट, दिखाव्याची आवश्यकता नाही.
4.धन व संपत्ती- तुळ जातक भागिदारीमधे व्यवसाय करण्यात हुशार असतात. तुळ जातक सल्लागार होऊ शकतो व त्याचा जोडीदार त्याप्रमाणे देखरेख ठेवेल तर ते फ़ायदेशीर ठरते. कारण तुळ जातक योग्य व वास्तविक सल्ला, तार्किक विचार व पुर्वानुभवाचे अवलोकन करुन योग्य सल्ला देऊ शकतो. तुळ जातक प्रशंसक व आलोचक असल्याने व्यावसायिक फ़ायदा मिळवण्यासाठी योग्य असतात. तुळ जातकाची हृदय जिंकण्यात हातोटी असते, त्यांचे व्यक्तीमत्वाचा प्रभाव, ग्राहकास खुश करण्याचे कसब, हसणे, गोड बोलणे याचा प्रभाव पडतो. त्यामुळे नोकरीत मालकाचा वा व्यवसायात अधिक फ़ायदा मिळवू शकतात.
तुळ जातकाची आवश्यकतेची संकल्पना इतरांपासून वेगळी असते. त्यामुळे कधीकधी वायफ़ळ खर्च करतात. ते कमी खर्चिक असणे हे दुर्मिळ, त्यामुळे बरेचसे धन हे खर्च होण्यात जाते. त्यांनी अनावश्यक व अवास्तव खर्च करने टाळले तर चांगली कमाई व संपत्ती राखू शकतात.
5.नोकरी व्यवसाय- १० वे स्थानाचा अधिपती चंद्र असल्याने नोकरी व्यवसाय तरल पदार्थांशि संबंधित, ड्रगिस्ट, केमिस्ट, पेंटर, जलविद्युत इंजिनीयरींग, ट्रान्सपोर्ट, सामुद्रिक, खाद्य, दुध, फ़ळे संबंधित असू शकतो.
तुळ शुक्राची व वायु राशी असल्याने २ रे, ६ वे , १० वे स्थानाशी संबंधित ग्रह, राशीव्दारे दर्शवलेले नोकरी, व्यवसाय, लेखक, कादंबरीकार, संगीत क्षेत्र, शिल्पकार, नर्सरी, वायुसेना, स्त्री पुरुष समुपदेशन, स्वागतकर्ता, ई संबंधित नोकरी व्यवसाय करु शकतो.
6.आरोग्य- साधारणपणे तुळ जातकाची शारिरिक बनावट उत्तम असते. पण संक्रमक रोगापासून लांब राहण्याची प्रतिकार शक्ती कमी पडते, त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावयास हवी. तुळ जातकाने त्रास होऊ नये म्हणून खालचा पाठीचा कणा, किडनी, कुल्हे, कंबरेमधे दुखणे, पोलिओ यां बाबतीत योग्य ती खबरदारी घ्यावी. स्त्रियांना गर्भाशयाचा त्रास होऊ शकतो.
7.कौटूंबिक- तुळ जातकाचे कौटुंबिक जीवन आनंदी असेल. व ते कौटुंबिक शांती टिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे घर सुखसुविधा व विलासी गोष्टींनी युक्त असते. इंटेरिअर, डिझाईन, पेंटिंग्ज, पडदे ई सर्व उच्च प्रतीचे असते. परिवारामधे बहुमूल्य दागिणे असतील व आनंदई प्रसंगात मिरवतील. ते जीवनात सर्व उपभोगाचा आनंद घेतात. तुळ जातक आपले घर, परिवार, संपत्तीवर फ़ार प्रेम करतात.
तुळ जातकाचे आई वडील ऒफ़ीसमधून धावत पळत घरी जातील, जेणे करुन अधिक काळ मुलासमवेत घालवता येईल. कार्यालयीन काम कार्यालयातच पूर्ण करुन घरी त्यांना यायला आवडेल.
तुळ जातक संर्वांचे मित्र बनून जातात, कारण ते ईमानदार, न्यायप्रिय, द्याळू, विनम्र व उदार असतात. ते निर्मळ मैत्री कायम करु शकतात. ते मित्रांसमवेत रमतात. सूर्य ११ वे स्थानाचा स्वामी असल्याने त्यांची शासकीय व्यक्तींबरोबर ऊठबस असेल. ते आपले अधिकांश जन जीवन सामाजिक व आर्थिक सफ़लतेमधे व्यतीत करतात. सुर्याची शुभ दृष्टी त्यांना लोकांपासून फ़ायदा देते. ते या लोकांवर खर्च करतील जे पुनर्वसू, विशाखा, पूर्वा भाद्रपदा, आश्लेषा, ज्येष्ठा, रेवती या नक्षत्रांवर जन्मलेले असतील, कारण ते जातकास सहाय्यकारी नाहीत.
8.प्रेम- तुळ जातक यौन जीवनात रमतात व प्रणयांत माहीर असतात. आपल्या विश्वसनीय प्रेमाने आपल्या साथीदारास ताब्यात ठेवतात. या व्यतिरिक्त व्यक्तिमत्त्व, शैली, पोषाख, सुगंधित वस्तू, मधाळ वागणे मोहात पाडणारे असते. तुळ जातकांस वासना आकस्मिक रुपाने उत्पन्न होतात व चर राशी असल्याने लवकर शांत ही होतात. पन ज्यावेळी ते आपल्या जोडीदाराबरोबर आनंदी क्षण अनुभवत असतात तेव्हा धुंद होतात. भौतिक आनंदाची प्रवृत्ती असल्याने आपले विचार, अपेक्षा स्पष्ट रुपाने मांडतात व चांगले विचार विनिमय करुन सुख प्राप्त करतात. तुळ राशीच्या मुलींना माहीत असते की पुरुष त्यांचे बरोबर लगट करेल. पण त्यांना त्याचे आकर्षण असू शकते. व मनपसंत सुखाचा जोडीदार मिळाल्यास हसुन त्याचे आभार मानतील.
9.वैवाहिक- तूळ जातक वयात आल्यावर लवकर विवाहबद्ध होतात. ते एकमकांना फ़ार महत्व देतात. व आपल्या कौटुंबिक व सामाजिक आयुष्यात खुश राहतात. तुळ जातकांना उच्च राहणी आवदत असल्याने मनपसंत जोडीदार न मिळाल्यास असंतुष्ट राहतील.
तुळ कन्या बुद्धिमान, युक्तीबाज, चतुर असतात. त्या कधिही मोठ्या विवादामधे पडत नाहीत व शांतीपूर्ण वातावरण टिकवण्यासाठी प्रयत्न करतात. तुळ स्त्रिया विलासी जीवन जगतील व आपल्या जोडीदारास प्रेम व आराधना करतील.
तुळ पुरुष जातक प्रसन्नचित्त, दयावान, समयोचित स्वभावाचे असतात. ते आपल्या परिवारासाठी लागणारे सुखवस्तू, सुविधा ई उच्च प्रतीच्या उअपलब्ध करुन देतील. ते फ़ार भाऊक असतात. आपल्या प्रेमाचे भरपूर प्रदर्शन करतात. त्यांना जोडीदाराची तशीच साथ नाही मिळाली तर फ़ार निराश होतात. पण साधारणत: घटस्फ़ोट ही देत नाहीत व निभाऊन नेण्याचा प्रयत्न करतात. २ रे ७ वे ११ वे स्थान जे वैवाहिक जीवन दाखवतात त्याचे स्वामी मंगळ व सूर्य आहेत त्यामुळे ते शीघ्र उत्तेजित होणारे व घाई करणारे असतात. ते जोडीदाराचे म्हणणे ऐकून घेतील पण आपल्याला जे वाटते ते वागण्याची घाई करतील. त्यामुळे तुळ जातकास जोडीदाराची चिड्चिड कमी करावी लागते, पण ते मन रिजवण्यात व शांती टिकवून ठेवण्यात कुशल असतात.
मिथुन व कुंभ जातक जोडीदार म्हणून योग्य असतात. मीन, मकर, कर्क यांचेशी सहमत होत नाहीत. बाकी राशींबरोबर तुळ जातक निभाऊन नेतील.
10.संतती- ५ वे स्थानाचा अधिपती शनी असल्यांने साधारणत: तुळ जातकास अल्प संतती असू शकते. कारण शनी कर्तव्यशील ग्रह आहे. तुळ जातकाची मुले त्याची वृद्धावस्थामधे सेवा करतील. तुळ जातक आपल्या मुलांशी असा प्रेमळ व्यवहार ठेवतात की त्यांची मुले आनंदाने त्यांचे आदेशाचे पालन करतील.
जी मुले शनीची उच्च राशी तुळ मधे जन्म घेतात, ते आपल्या कूट्नीतीसाठी प्रसिद्ध असतील. ते कधीही भांडण करत नाहीत. ते इतरांकडे ही लक्ष देतील, त्यांचा दृष्टिकोण समजावून घेतील, ते त्याचा योग्य उपयोग करतील व अतिवादी होणार नाहीत. पक्षपाती नसतात. नम्र व इमानदार असतात. सकारात्मक असतात, नाही म्हणत नाहीत.
11.भाग्य दिवस- रविवार, सोमवार सफ़लतादायक व भाग्यशाली आहेत. शनिवार पन सफ़लता देतो कारण केंद्र व कोण ४ व ५ चा स्वामी आहे. मंगळवार स्पर्धा, मुकादमा, कोर्ट, निवडणूक ई करता शुभ. बुधवार दीर्घ यात्रा, विदेशी लोकांशी स्पर्धा, मौज, सामाजिक कार्य, आरामासाठि चांगला. गुरुवार अनिष्ट आहे. चुलत भाऊ, मित्र, जोडीदार यांचे गैरसमज होतात. ओव्हर्ड्राफ़्ट सुविधेसाठी चांगला आहे. शुक्रवार मिश्र फ़ळ देतो.
12.भाग्य रंग- संत्री, पांढरा, लाल रंग शुभ, हिरवा पिवळा निळा त्याज्य आहे.
कन्या ही राशी चक्रातील ६ वी राशी आहे. उत्तरा फ़ाल्गुनीचे २ रे ३ रे ४ थे चरण, हस्त, चित्राचे १ ले व २ रे चरण या नक्षत्रात येतात. बुध या राशीचा अधिपती आहे. ही पृथ्वी, व्दिस्वभाव, नकारात्मक स्त्री राशी, बंजर, थंड, शुष्क, रात्रकालिन, उत्तरी, दीर्घ कालिन राशी म्हणवली जाते.
बुध या राशीमधे उच्च व शुक्र नीच असतो. सुर्य, चंद्र, मंगळ, गुरु या राशीमधे स्थित असतील तर ते शत्रू घरी मानले जातात. शनी कन्यामधे स्थित असेल तर मित्र घरी असतो.
बुध जातक धनापेक्षा बुद्धीला अधिक प्राधान्य देतात. आत्मिक धन व द्न्यान जे सरस्वती प्रदान करते, ते कधी नष्ट होत नाही व त्यावर डाका ही टाकू शकत नाही. कन्या जातक कोणाचेही, कसलेही कर्ज, ओझे, उधार आपल्यावर ठेवत नाहीत. शुभ बुध त्यास मोक्ष प्रदान करतो तर सांसारिक मोह वा अशुभ बुध त्यास अनैकतेकडे घेऊन जाऊ शकतो.
जेव्हा बुध जातक जन्मास येतो, त्याचे संगोपन सामान्यप्रकारे होते. कन्या जातक भाऊक असतात तरी त्यांचे विचार त्यापासून भिन्न असतात. कन्या राशीचे पृथ्वी तत्व त्यास एकांतप्रिय बनवते. व स्वभाव लाजाळू पण आत्मजागृत असतो. हा जातक कसे अनुभव येत जातात तसे त्यातून धडा घेऊन बदल घडवत जातात इतके की हाच तो जातक आहे हा प्रश्न पडावा व जशास तसे ही कला आत्मसात करतात.
1. शारिरिक आकृती- जातक उंच व दुबळ्या शरीराचा असू शकतो. केस व डोळे काळे असतात. भुवया दाट, केसाळ व वृत्ताकार असू शकतात. आवाज पातळ व तेज असेल. कन्या जातक जलद गतीने चालणारे असतात व पोट सुटलेले नसेल. क्रियाशीलतेमुळे ते वास्तविक वयापेक्षा लहान दिसतात. ते चतुर असतात पण कपटी नसतात. त्यांचे डोळे ईमानदार व स्पष्ट्वक्ते असल्याचे सांगून जातात. (दुसरी राशी तुळ ही शुक्राची राशि आहे)
2. विशेषता- कन्या राशीचा स्वामी परिवर्तनशील बुध आहे त्यामुळे आयुष्यात नेहमी काही ना काही बदल वा घडामोडी अपेक्षित आहेत. यांच्या संपर्कात अनेक स्वभावाचे लोक येत असतात व चांगले वाईट अनुभव देऊन जातात. पण ते आपल्या आंतरात्म्यास फ़ार मानतात व प्रतिकुल परिस्थितीचाही उत्तम तर्हेने सामना करण्यास सक्षम असतात.
कन्या जातक पूर्वनियोजित काम बुधिमत्तापूर्वक पूर्ण करतात. यांच्या व्यापारी प्रवृत्ती भिनलेली असते. आपल्या कामामधे हुशार व तत्पर असतील व काम पूर्ण करण्याची घाई असेल. कन्या जातक अपेक्षा करतील की कोणतेही कार्य पटकन पूर्ण व्हावे व इतरांनी देखील व्यावसायिक दृष्टीकोण ठेवावा. पण जेव्हा तुम्ही स्वत: काम हाती घेता ते व्यवस्थित व विस्तृतप्रकारे करण्याकडे कल असतो व त्यामुळे लवकर मूळ मुद्य्यावर येत नाही. एखाद्या गोष्टीचे विश्लेषण करुन अगदी मूळापर्यंत जाऊन मग निर्णयावर याल. तुम्ही विवेकी आहात. तुम्ही इतरांच्या चुका पकडण्यामधे हुशार आहात. एखादे काम परत परत तपासून विचारपूर्वक कराल, पण एकदा काम पुर्ण केल्यावर परत परत तेच काम करायला आवडत नाही.
जन्म कुंडलीमधे बुध जर कमजोर असेल तर, तुम्ही असंतुष्ट रहाल. बुध बलवान असेल तर तुमची नेहमी प्रगती होत राहील व बुद्धी विकसित होत जाईल.
पृथ्वी राशि असल्याने तुमची ईच्छा पैसे वाचवण्याची असेल. व काही ना काही गुपचुप बचत करुन ठेवाल ज्याचा इतरांना सुगावाही लागू देणार नाही. जर कोठे प्रवास करत असाल तर काही पैसे एका खिशात व काही दुसरे खिशात ठेवाल व काही पैसे खर्च न करणेचे हिशोबाने सुटकेसमधे लपवून ठेवाल.
तुम्हास कोणतीही वस्तू अथवा माणूस त्याच्या योग्य जागेवर ठेवावयास आवडते. तुम्ही हिशोब व नोटिंग्ज, फ़ाईलिंग अगदी व्यवस्थित मुद्देसूद राखता. तुमचा सहकारी तुमची पद्धत समजून घेणारा नसेल तर तुम्ही ज्या सीमेपर्यंत अपेक्षा करता त्या पूर्ण नसेल तर असमाधानी रहाल.
कन्या ही स्त्री पृथ्वी राशी असल्याने बागायती, शेती, बागकाम, झाडे लावणेचे शौकीन असता. तुम्हास न्यायी व सामाजिक वर्तन आवडते. व बुद्धीने निर्णय घेता व सहानुभूती वा भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणार नाही. कन्या राशिवर शनिची दृष्टी असेल तर जातक आळशी असतो व सोपे कार्य करणे पसंत करतो. परंतू ईतरांना टोकण्यात आनंद अनुभव करु शकता. व्दिस्वभाव राशी असल्याने नवे मित्र, नवे जोडीदार, नवी माणसे जोडत रहाल.
कन्या ही राशिचक्रातील ६ वी राशी असल्याने विशेष रुपाने औषधी वस्तू, खाद्य, भोजन, ई. चे शौकीन असाल व या बाबतीत वेगवेगळे प्रयोग कराल. जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा तुम्ची मनस्थिती एकदम कमजोर होऊन जाईल व नेहमी आजारपणाबद्दल विचार करत रहाल. स्वत:स उत्साहित करणार नाही व रमवणार नाहीत. व बरेच वेळा स्वत:च आजारपणाच्या पकडीतून सुटाल. व अशा प्रकारे प्रकृतीचे नुकसान करुन घ्याल. व ईतरांनी लक्ष द्यावे ही अपेक्षा ठेवाल. पण ज्यावेळी तुम्ही स्वस्थ असाल त्यावेळी दुसरे कोणी आजारी असेल तर त्याची उत्तम काळजी घ्याल व उत्तम सेवाभावी असल्याचे सिद्ध कराल.
कन्या राशी मधे नेपच्यून स्थित असेल तर कल्पकता व योजकता देतो. जातक कपटी व अवैध आनंद मिळवणारा असू शकतो. कन्या लग्नाच्या ठीक भावारंभावर जर नेपच्यून असेल तर तो चालाख, कूट नीतीयुक्त, दूष्ट वा चोर असू शकतो. कन्या लग्ना मधे युरेनस असेल तर जातक चतुर, बुद्धीमान व चंचल असेल. शिक्षक, लेखक, अधिक्षक दर्जाचा अधिकारी, युरेनस विश्लेषक बुद्धी व कन्या विश्लेषणात्मक प्रकृती देते, त्यामुळे अनेक शोध लावणारे, हुशार व्यक्ती कन्या राशिचे असू शकतात. युरेनस ची शुभ दृष्टी असेल तर महान संगितकार, गणिती, पत्रकार, संशोधक असू शकतो.
3. कमजोरी- कन्या जातक अतिशय बड्बड्या स्वभावाचा असतो. ते विश्लेषन वादी असतात. व एखाद्या गोष्टीचे इअतके वर्णन करेल की ऐकणारा कंटाळून जाईल. त्यांनी दुसरेचे दोषावर टीका टिपणी करताना संयम ठेवावा. छोट्याछोट्या गोष्टींनी निराश वा नाराज होऊ नये. जे काम कराल त्यामधे दृढता असणे गरजेचे आहे. स्वत: निर्णय कर्ता असल्याने अनेक जणांचे मत विचारावयास जाऊ नये, त्यामुळे डोक्यात विचारांची गर्दी होऊन फ़क्त संभ्रम निर्माण होईल. शक्यतो फ़क्त एखाद्या विश्वासू व्यक्तीचा फ़ारतर सल्ला घ्यावा वा मत विचारावे. कारण तुम्ही करणार तेच असता जे तुम्हाला पटत असते.
6. आरोग्य- तुम्ही साधारणपणे संयमी व्यक्ती आहात. बुद्धिमानी राखता व आरोग्याची निगा राखण्यास प्रयत्नशील असता व खाण्यापिण्याकडे लक्ष देता. पण तुम्ही फ़ार क्रियाशील असता त्यामुळे अतिश्रम होऊन वा दगदगीमुळे त्रास वा आजारपण येऊ शकते. लग्न स्थानी असणारा ग्रह पीडीत असेल तर पचन व आतड्यासंबंधी त्रास निर्माण करतो व शरीर कमजोर राहते. साधारणपणे कन्या राशीत पापग्रह असतील तर ते त्या ग्रहांच्या दशा अंतर्दशेत टायफ़ॊईड, गळ्याचे त्रास, हगवण ई होऊ शकते. व आपणांस बरे व शांत वाटण्यासाठी अत्याधिक विशवासु वातावरण व समजुन घेणारा जोडीदार याची आवश्यकता भासते. तुम्हास योग्य तेवढाच व्यायाम करावयास हवा. तुमचे नाडी मंडळ चेतनात्मक आहे. नियमित योग्य व वेळेवर जेवन व व्हिटामिन बी अधिक घेतल्यास स्वास्थ्य राखण्यास मदत होईल. ६ वे स्थानाचा अधिपती शनी व ८ वे स्थानाचा अधिपती मंगळ असल्याने. जरा त्रास होऊ लागला तरी तुम्ही सतत विचार व चिंता करुन व कल्पनेने स्वत:स फ़ार दु:खी करता. नेहमी खरचटणे, ठेच, किरकोळ दुखापती होत राहतात.
कन्या रास पोट व आतडे दर्शवते. स्वामी बुध असल्याने त्याचा नाडी मंडळावर प्रभाव पडतो. आतड्याच्या गडबडीमुळे व विचारांनी मानसिक स्थितीवर प्रभाव पडतो व नंतर बिघडलेली मानसिक स्थिती व्यवसायिक व पारिवारिक अडचणींवर प्रभाव टाकते.
कन्या रास पित्त व्याधी दर्शवते. कन्या राशीचे कार्य आहे भोजन रस शोषण करणे व त्याचा ऊर्जात्मक उपयोग करणे, पचन करणे, त्यामुळे योग्य आहार अनिवार्य आहे. दु:ख, असंतोष, उव्दिग्नता व दृढ हट्ट कमी करावयास हवे. बाहेरील चमचमीत खाणे, मद्य टाळावे. शेफ़ळ खाने स्वास्थ राखण्यास चांगले.
7. धन व संपत्ती- कन्या जातकांस व्यापारामधे रुची असते. त्यामुळे नोकरी असो वा व्यवसाय तुम्ही पैशाचे व्यवहारामधे नेहमी सावधानी बाळगता. भाग्याने धनवान होण्यापेक्षा कठोर मेहनत घ्याल व पुरेसे धनवान होण्याची ईच्छा ठेवाल. ६ वे स्स्थानाचा स्वामी शनी असल्याने तुम्ही जेवढी मेहनत घेता त्या प्रमाणात तुम्हास त्याचा फ़ायदा मिळत नाही. व धनसंचय करण्यास कष्ट पडतात. तुम्ही किती यशस्वी होता हे तुमच्या बुद्धी व निर्णयक्षमतेवर अवलंबून असते. सामान्यपणे तुम्ही केलेल्या कामाचे पैसे घेऊ शकता किंवा नोकरी करु शकता. तुम्ही कठीन परिश्रमी असाल व एकांतामधे शांतीपूर्वक काम करणे पसंत कराल.
5. नोकरी व्यवसाय- कन्या लग्नावर, २ रे, ६ वे अथवा १० वे स्थानावर सूर्याची दृष्टी असेल तर यशस्वी चिकित्सा अधिकारी व्हाल. मेडिकल अथवा जनारोग्य, विभागात काम करु शकाल. तुम्ही शासकीय इंजिनियरिंग, ऒडिटिंग, शिक्षण खात्यामधे नोकरी करु शकाल.
चंद्राची शुभ दृष्टी जातक अकाऊंट्स क्षेत्रात, इंजिनियरींग अथवा नेव्ही संबंधित काम करेल. अथवा पेट्रोल, पारा, पाणी ई द्रव पदार्थांचा उपयोग वा संबंध येत असेल अशा ठिकाणी अथवा वस्त्रोद्योग, शाई, पेन, दौत ई संबंधित काम करेल.
मंगळाची शुभ दृष्टी असेल तर जातकाचे स्वत:चे नर्सिंग होम, शल्य चिकित्सा केंद्र असू शकते अथवा शास्त्रीय उपकरणे संबंधी कार्य करेल. क्लेरिकल, स्वतंत्र ऒडीटर, मिलितरी अकाऊंटंट, प्रिंटिंग प्रेस, एडिटिंग, लेखन, स्टील, कीटकनाशक, शेती अवजारे, अथवा प्रतिरक्षा विभागात काम करेल. मंगळ पीडीत असेल तर काळा बाजार, चोरी, दगाबाजी करुन धन कमवेल.
मंगळ पीडित कन्या जातकांनी नोकरी व्यवसाय करताना सतर्क राहणे जरुरी आहे की आजुबाजुला काही लोक कटु बोलणारे वा निंदा करणारे असू शकतात. कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्हाला सहकार्य करणारे सहकारी वा तुमच्या मित्रांना त्रास देऊ शकतात, कारण तुम्ही त्यांना संरक्षित करता. ते तुमचे कडे तुमच्या हितचिंतकांच्या तक्रारी करतील, गैरसमज निर्माण करतील, आळ घेतील. यात त्यांना आनंद मिळेल पण तुम्ही ऐकून चुकीचा निर्णय घेतला तर संकटात सापडू शकता किंवा दु:ख होऊ शकते. साधरण पणे असे अनुभव बुध मंगळ दशे अंतर्दशेत अथवा बुध मंगळ दृष्टी संब्म्धात व पीडीत असेल तर येतात.
बुधाची शुभ दृष्टी हे दर्शवते की तुम्ही एक दलाल, कमिशन एजंट, मुनीम, अकाऊंटंट, शिक्षक, वकील, लेखक, संपादक, अथवा औषध विक्रेते असू शकता.
गुरुची शुभ दृष्टी हे दर्शवते की तुम्ही सहित्यिक, संशोधक, बुद्धिजीवी व्यवसाय करनारे, प्रकाशक, संपादक, पत्रकार, धर्म संस्था, न्यायसंस्था, वीमा, मंदीर, चर्च, बैंक, दूतावास, राजदूत, ई संबंधी नोकरी व्यवसाय कराल.
शुक्राची शुभ दृष्टी हे दर्शवते की तुम्ही संगीतकार, अभिनेता, पेंटर, ऒडिटर, सौंदर्य प्रसाधने, दागिणे, वस्त्रोद्योग, खाद्य पदार्थ, हलवाई, भंडरी, हॊटेल, सुगंधी द्रव्ये, अत्तर, इटेरिअर, आर्किटेक्ट ई. संबंधित नोकरी व्यवसाय कराल.
शनीची शुभ दृष्टी हे दर्शवते की कन्या जातक, सांख्यिकी, अकाऊंट्स, फ़िजिक्स, डायनेमिक्स, खाण, खनिज धातू, ट्रस्टी, वारसाहक्क, फ़िंगरप्रिंट्स(मंगळ पण संबंधित असेल तर) ई संबंधित नोकरी व्यवसाय करु शकता.
7. कौटूंबिक- तुम्हाला आपले घर व घरातील वस्तू नीट व सुव्यवस्थित व सुशोभित ठेवायची आवड आहे. व घरातल्या सदस्यांनी सुद्ध ते तसेच राखावे अशी तुमची अपेक्षा असते. व पाहुणे आले तर त्यांच्या नजरेत ते भरावे असे वाटते.गुरु ४ थे स्थानाचा अधिपती असल्याने घर, वाहन प्राप्तीसाठी तुम्ही भाग्यवान असता. संपत्तीची किंमत वा प्राप्तीचा अवसर गुरु दशेमधे अधिक असेल. शनि ५ व ६ वे स्थानाचा अधिपती असल्याने व मंगळ ८ वे स्थानाचा अधिपती असल्याने शनि व मंगळाच्या दशेमधे खर्च वा नुकसान होईल. गुरु दशेत विनियोग अथवा विक्री फ़ायदेशीर ठरेल व शनी दशेत नुकसानदायक.गुरू ७ वे स्थानाचा पण अधिपती असल्याने सांसारिक सुख व शांती चांगले लाभेल. पण गुरु जर पीडीत असेल तर अथवा त्रिक स्थानात स्थित असेल तर मात्र वैवाहिक सौख्यात काही ना काही कमतरता जाणवत राहील व मन अतृप्त राहील. किंवा नोकरी व्यवसायानिमित्त घरापासून लांब रहाल व त्यातच रमाल.
8. प्रेम- तुमची ही विशेषता आहे की तुम्ही बुद्धीमान लोकांना प्राधान्य देऊ शकता, सहकार्य करायची तयारी असते, पण फ़क्त त्यांनी त्याची जाण ठेवणे तुम्हाला महत्वाचे वाटते. तुम्ही ज्यांना आपले आयुष्यात स्थान देता त्यांनी तुमच्या मैत्रीची, सहयोगाची केलेली स्तुती तुम्हास आवडते. तुम्ही सहसा फ़ारसे कोणाशी मनापासून मैत्री करण्यास जात नाही. तुमची स्वत:ची अशी पसंती असते व निश्चित धारणा असते. तुम्ही अशाच लोकांमधे मनापासून मिसळता जे तुमच्या पसंतीस उतरतात. तुम्हांस तुमची प्रशंसा करणारे लोक आजूबाजूला आढळून ही येतात. पण फ़ार कमी भाग्यवान असतात ज्यांना तुम्ही जवळ करता. तुम्ही तुमच्या मूडनुसार वर्तन करु शकता. ११ वे स्थानाचा स्वामी चंद्र असल्याने जर तुमच्या मनास नारज केले तर तुम्ही त्यापासून लांब राहणे पसंत करता.
9. वैवाहिक- तुम्ही स्वत:च एक आदर्श व्यक्ती असल्याने तुमच्या पसंतीचा वा सर्वस्वी मनासारखा जोडीदार मिळणे कठीण जाते व त्रास होतो. संभव आहे की सुरुवातीलाच तुम्ही तुम्च्या धारनेत बसणारा जोडी दार न मिळाल्याने निराश होऊ शकता.कारण तुम्ही कोणाची निवद करताना रसिकतेपेक्षा बुद्धीस जास्त प्राधान्य देता.प्रणयाच्या बाबतीत तुम्ही नेहमी संकोचित राहता व प्रेमाचे प्रदर्शन करत नाही. तुम्हांस फ़ार चिड्चिडे व्हावयास नको. कारण जोडीदाराबरोबर आनंदी वैवाहिक सौख्याकरता काही प्रमानात का होईना तुम्हास प्रेमाचे प्रदर्शन करावयास हवे.तुम्ही हे जाणता की प्रेमाबरोबरच चांगल्या दृष्टिकोणाची गरज असते. फ़क्त आलोचने वर प्रेम टिकुन रहात नाही. तुमचा स्वभाव चुका काढण्याचा आहे, काही संबंध टिकवताना तो सोडून देणे गरजेचे असते. ज्याप्रमाणे तुम्ही अपेक्षा करता की तुमच्या सहकार्याची व मैत्रीची इतरांनी जान ठेवावी, त्याप्रमाणे तुमचा जोडीदार बुद्धिमान असो वा नसो तिच्याकडे गुण असो वा नसो तुम्ही थोडीतरी स्तुती करावयास मनास तयार केले पाहीजे. अथवा थोडातरी दिखावा तरी शिकला पाहिजे. कन्या जातक कमी कामुक असतात व म्हणून निदान काही गोष्टी स्वीकारुन जोडीदारास प्रसन्न केले पाहीजे. व अशी पुस्तके वाचावित अथवा आपल्या अहदी जवळच्या व विश्वासू मित्राबरोबर अशी चर्चा मोकलेपनाने करावी जेणेकरुन तुम्ही तुमच्या वैवाहिक कामजीवनास उत्सुक व्हाल.
कन्या जातक आपला विवाहाचा जोडीदारास भागिदाराच्या नजरेने पाहतात. कारण व्यापार व सामाजिक व्यवहार हे त्यांच्या मूळ स्वाभवाचा एक कंगोरा आहे. हेच कारण आहे की अनेक कन्या जातक आपला विवाह लांबणीवर टाकत राह्तात वा मनाप्रमाणे विवाह झाल्यास अपेक्षाभंगाची शक्यता असते. कन्या जातकास जास्त काळ कुमार अथवा स्वतंत्र आस्तित्वात राहणे व त्यांची इच्छा एकांतात शांतीपूर्ण व चिंतनशील राहण्याची असते. पण विवाह झाल्यावर तुम्ही आपल्या पतीच्या व कुटूंबियांच्या सोयी, सुविधा बघण्यात कसुर करत नाहीत. हे देखील संभव आहे कि तुमच्या प्रकृतीच्या नेहमी तक्रारी राहतील व त्याने तुम्ही धास्तावून जाता.
कन्या स्त्री जातक संतापी व मनात राग धरणारी असू शकते. ती कंजूष वा काटकसरी असते. ती भागिदारी तत्वाप्रमाणे जोडीदारास हात राखून खर्च करावयास सांगते व अर्थिक व्यवहारात तिला बरोबरीने शामिल करावे असे वाटते. ती घर उत्तम रीत्या चालवू शकते व स्वत: वा जोडीदाराने अनावश्यक खर्च केलेला तिला रुचत नाही. ती आपले घर जबाबदारीने सांभाळेल. कन्या स्त्री असा विचार करु शकते की प्रेमक्रीडा हा तुच्छ, नीच व काळवेळ वा मूड विरुद्ध दु:खदायक प्रकार आहे. चतुर जोडीदार होण्यासाठी तिने हे आपले मत बाजूला ठेवून रममान व्हावयास हवे.
10. संतती- ५ वे स्थानाचा स्वामी शनी असल्याने संततीची संख्या मर्यादित वा कमी असेल. त्यांना त्यांच्या शिक्षणावर अधिक खर्च करावा लागतो. कन्या जातकाची संपत्ती चा त्यांची मुले उपभोग घेतात. जरी तुम्ही मुलांच्या भल्यासाठी तुम्चे प्रेम त्यांचेकडे नेहमी व्यक्त करत नाही तरी त्यांना योग्य शिक्षण, संस्कार देण्यास कधीही विसरणार नाहीत व त्यांना अधिकार पदासाठी योग्य व सक्षम बनवाल. तुमची ज्येष्ठ संतती ही परिश्रमी, उद्यमशिल, धैर्यशील, समृद्ध होईल. दुसरी व तीसरी संतती असेल तर आरोग्य चांगले असेल पण कमी सुखाचा अनुभव करेल.
11. भाग्य दिवस- बुधवारी भाग्य साथ देईल. गुरुवार विनियोग, मोटर खरेदी, रसिकतेसाठी, नव्या घरात परिवाराबरोबर वा जवलच्या व्यक्तींचा सहवास प्राप्त करण्यासाठी, व्यापारी भागिदारी व साहसी कार्यासाठी शुभ आहे.शुक्रवार आर्थिक स्थिती करता शुभ आहे. शनीवारी उशीर, असफ़लता व निराशेचे भय राहील. रविवारी नुकसान व मनस्ताप होऊ शकतो. सोमवार मित्रभेटीस, नवे मित्र बनवण्यास, जोखीम घेण्यास, लाभ प्राप्तीसाठी चांगला आहे. मंगळ अशुभ असून सट्टा, जुगार, छोटा प्रवास, पत्रव्यवहार, करार, संपर्का साठी अनिष्ट आहे.
12. भाग्य रंग- हिरवा, पांधरा, पिवळा, लाल शुभ, निळा अशुभ स्वास्थ्य व जखमा, व अडचणीदायक रंग
13- भाग्य रत्न- पाचू, मोती, हिरा, पोवळा, नीलम
14- भाग्यशाली अंक- ५, २, ७, ६, ३ शुभ व १,४,८,९ अशुभ
सिंह ही राशी चक्रातील ५ वे क्रमांकाची राशी आहे. मघा, पूर्वा फ़ल्गुनी, उत्तरा फ़ल्गुनी चे १ ले चरण ही नक्षत्रे या राशीत येतात. ही अग्नी, गरम, रुक्ष, पुरुष, सकारात्मक, जंगली, उजाड, स्थिर, दीर्घ राशी म्हणवली जाते.
सिंह राशी चा स्वामी सूर्य आहे. कोणताही ग्रह सिंह राशीमधे उच्च वा नीच नसतो. युरेनस या राशीमधे कमजोर असतो व नेपच्यून बलवान.
1. शारिरिक आकृती- सिंह राशी मधे जन्मलेल्या व्यक्तीची हाडे पुष्ट व मजबूत असतात. खांदे व कपाळ पुढच्या बाजूस रुंद असते. उंच, मजबूत व मांसल अंगयष्टीचा असतो. तो लठ्ठ व कुरुप नसतो, लंबोदर असतो. याची बनावट बाह्यता पूर्ण प्रभावशाली, रुबाबदार, प्रभूत्वसंपन्न व गौरवशाली असते. रंगरुप व वर्णन लग्न स्थित ग्रह, दृष्टी यानुसार बदल होऊ शकतो.
2. विशेषता- सिंह राशीमधे जन्म घेणारे जातक योग्यतापूर्ण व उदार असतात. हे जातक माणसांची सहाय्यता करु शकतात. सिंह जातक सूर्याप्रमाणे इतरांना प्रकाश दाखवणारा, आयुष्यातील अंधकार नाहीसा करणारा, वाईट विचार नष्ट करणारा असू शकतो. (जर पापग्रहाने बिघडला नसेल तर )सूर्य शासनाचे प्रतिनिधित्व करतो. ज्या व्यक्तीचे सूर्यावर गुरुची शुभ दृष्टी असेल ते सरकार व्दारा सहाय्यता प्राप्त, संरक्षणप्राप्त व सुरक्षित कवचात राहतात.
शनीची सूर्यावर वाईट दृष्टी असल्यास अशा व्यक्तीना सरकार व्दारे दंड, शिक्षा होऊ शकतो. म्हणून स्वास्थ्य, आनंदी आयुष्य अथवा अडचणी साठी सुर्यावर पडणारी दृष्टी व लग्नराशीची स्थिती यामुळे विशेषता प्रभावित होऊ शकते. सिंह जातक समारचरणास पात्र असतो व मित्र व नातेवाईकांना विश्वासाने सल्ले देत राहतील.
त्यांची प्रमुख विशेषता मौन राहण्यात आहे. ते तक्रारी व अफ़वा अगदी शांतपने ऐकूण घेतील व बुद्धिपूर्वक निर्णय घेतील. ते इतरांच्या चुका विसरु वा माफ़ करु शकतात. ते विश्वास ठेव्णारे असतात त्यामुळे त्यांना दु:ख वा धोका प्राप्त होऊ शकतो. ते स्वत:च्या आदर्श कल्पनेत रमतात व त्यापुढे त्यांना इतर गौण वाटते. सिंह जातक इतरांच्या विनंतीमुळे प्रसन्न होतात व लोक त्यांचे ईप्सित साध्य करुन घेऊ शकतात. बुध जातक सिंहाचे प्रिय असतात. कारण ते चतुरपणे सिंह जातकाची स्तुती करु शकतात. सिंह जातकामधे प्रशासन क्षमता असते. एखाद्या गोष्टीचे योग्य विश्लेशन करु शकतात.
सिंह अग्नी व स्थिर राशी असल्याने प्रभुत्व, महत्वाकांक्षा, अधिकार, चमक, चतुरपणा, शासन करणे, शक्ती व उत्साह, अत्म विश्वास, प्रसिद्धी व कीर्ती, शिश्टता, सन्मान बुद्धी, प्रसन्नता, नेतृत्व गुण, वैभवता, दिखावट, गर्व, आदर, स्पष्ट्वक्ते पणा हे गुण आढळतात.
सिंह राशी चक्राची ५वी रास असल्याने, संगीत, खेळ, नाट्क, ई आवड असते.
सिंह जातक स्थिर राशी असल्याने तो हट्टी व ठाम निर्णयाचा, दृढ असतो. ते बाधा व अडचणी येतात तेव्हा शांत राहण्यासाठी मौन धारण करतात. ते आपली आकांक्षा पूर्ण होईपर्यंत पूर्ण आत्मशक्ती पणाला लावतात. सिंह जातक स्पष्ट्वादी, मोकळे मन व न्यायप्रेमी असतात. त्यांचा क्रोध फ़ार टिकाऊ नसतो. नीच कृत्याचा राग येतो ते उत्तम सेवा करु शकतात व मनापासून करतात. ते नेहमी प्रमुख नेता व श्रेष्ठ बनण्याची ईच्छा ठेवतात. सिंह जातक उदार असतात, पण त्यांना आग्रहपूर्वक कोणी मागणी केलि तर ते त्यांना आवडत नाही,
जर शनीची सूर्यावर अथवा सिंह लग्नावर शुभ दृष्टी असेल तर, उत्तेजित वा अधिक परिश्रम होऊ देत नाहीत व हृदयावर कोणतेही विपरित परिणाम होऊ देत नाहीत. यांना कही दु:ख वा हताशपणा असेल तर ते त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. ते कोणती ही चुक न होण्याची खबरदारी घेतील.
जर मंगळ लग्न अथवा सिंह राशी पीडीत करत असेल तर, तो अतिषयोक्ती करणारा, अहंकारी व आत्मप्रशंसक असेल. जर तो कोणाशी विवाह करेल तर शंकेखोर, कामी, हिंमतवान असेल.
साधरणपणे सिंह जातक कोण्त्याही समस्येवर दोन्ही बाजूंचा विचार करत नाहीत. त्यांनी इतरांच दृष्टीकोण समजून घेतला पाहिजे. जेव्हा त्यांना बाजूला ठेव्अले जाते तेव्हा ते वाह्यमुखी होतात व सिंहाप्रमाणे गुरगुरतात व कष्टी होतात. सिंह जातक दैनंदिन, भूत, भविष्याचा विचार न करता पुढे वाटचाल करत राहतात. ते मनातले उद्देश व ईच्छांवर ताबा ठेवतात. इतरांना आपले अधिकाराखाली ठेवण्याचा प्रयत्न करतात व आपल्या स्वत:च्या जोख्मी वर मोठमोठे निर्णय घेत राहता. त्यांना स्वतंत्रता आवड्ते.
3. कमजोरी- मी सिंह जातक घाई करतात, इतरांचे मत विचारात घेत नाहीत, गर्व, जादा आत्मविश्वास या गोष्टी टाळायला हव्यात.
4. धन व संपत्ती- सिंह जातक उच्च आर्थिक स्थिती प्राप्त करण्यासाठी झटत असतात. ते बहुतांश स्थितीत प्राप्त ही करतात. ते जास्तीत जास्त फ़ायदा कसा होईल यासाठी प्रयत्नशील असतात. स्वभावत: खर्च करण्याकडे कल असू शकतो. किंवा खर्चास अनेक वाटा फ़ुटतात, त्यामुळे कधी कधी कठीण परिस्थिती ही निर्माण होऊ शकते. पण ते कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करण्यास समर्थ असतात. सिंह जातकांना भाग्याची साथ लाभते. तरुणपणी अनेक कमाई चे साधन उपलब्ध असतात. एखादी जोखीम पत्करली तरी भाग्याने जुगार यशस्वी होतो.
5. नोकरी व्यवसाय- साधरणपणे सिंह जातक शासनाचे प्रधान, रजिस्ट्रार, शासक, अध्यक्ष, स्बागताध्यक्ष, डायरेक्टर, प्रसासक, अशा जागांवर अधिक काळ पर्यंत पदावर राहू शकतात.
सिंह राशी चक्राची ५ वी रास असल्याने, संगीत, खेळ, नाट्क, ई क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात.
स्थिर राशी असल्याने व सूर्य स्वामी असल्याने व्यापारात उत्तम यश देऊ शक्तो. तसेच सरकारी नोकरी, व्यवस्थापन अशा नोकरी चा लाभ होऊ शकतो. ५ वी राशी अस
मंगळाची शुभ दृष्टी असेल तर, शिपाई, सर्जन, केमिस्ट, डेंटिस्ट, न्हावी, कसाई, लोखंड-तांब्याचा व्यापारी, अवजारे, प्रतिरक्षा, आरोग्य विभाग, इंजिनीयर, ई दर्शवतो.
गुरु शुभ दॄष्टीत प्रवासी कंपन्या, शेती विभाग, सोने, काच, कपडे, रेशीम, सधन सुविधा, खाद्य वस्तू ई मधे संधी देतो.
शनी शुभ दॄष्टीत खाण, कोळसा, लाकूड, रस्ता, जंगल, मजदूरी, सेवा विभाग ई दर्शवतो.
6. आरोग्य- साधरणपणे सिंह जातक सुदृढ असतात. कधी आजारी पडले तरी ते लवकर बरे होतात. जेव्हा त्यांना आजारी पडण्याची शक्यता वाटते,तेव्हा ते सावध होतात. सिंह राशी हृदय दर्शवते. या व्यतिरिक्त पाठीचा कणा, मज्जा नाडी व तंतू दाखवते. त्यामुळे या संबंधी आजार होऊ शकतात. सिंहस्थ गुरु असेल तर शल्य चिकित्सेपासून रक्षा करतो. मंगळाने पीडीत असेल तर रक्त नलिकेत रक्त साचणे, अथवा शल्य चिकित्सा दर्शवते. हृदयाशी संबंधी असल्याने या राशीच्या लोकांनी मद्य सेवन, मदक पेय, उत्तेजक पेय यांना टाळावे व सकस आहारावर भर द्यावा.
7. कौटूंबिक- सिंह जातक नेहमी उत्तम मित्रांची निवड करतात. ते आपला मान व प्रतिष्ठा कायम ठेवण्यास खर्च करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. त्यांचा काही काळ अडचणीचा व आर्थिक चणचणीचा असेल तरीही आपण सुखात आहोत हेच भासवतील. ते पोषाख, घराचे पडदे, फ़र्निचर ई स्व्च्छ व उत्तम ठेवतील व ते पाहून त्यांचा सुखाचा भास तयार करतील. जोडीदार जर सिंह जातक असेल तर त्याला हा विचार करणे भाग आहे की, ड्रेस, दागिणे, कपडे ई घेऊन प्रसन्न कसे ठेवता येईल. हे जर जमले त्याचे घर स्वर्ग होईल.
8. प्रेम- सिंह जातक रसिक असतो व तो फ़ार प्रेम करतो व प्रेमाच्या अधिन असतो. तो चतुरपणे आपल्या जोडीदारास आनंदी ठेवतो व एक आदर्श प्रेमी असतो, तो उग्र व कामुक असतो. पण तो बाहेर समाजात प्रेमाचे प्रदर्शन करणे योग्य समजत नाही व त्यास आपल्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध समजतो. सिंह जातकामधे आपल्या प्रेमीसाठी एक सौंदर्य व आकर्षण असते, सिंह जातकाची पत्नी थोडी नाखुश राहू शकतो कारण सिंह स्त्रिया च्या समुहामधे वावरत असतो. त्यामुळे सिंह जातकाने थोडे समजदारी ने काम घ्यावे. जेव्हा तो पार्टी देतो व उत्तेजक वेळी आनंदित होतो तेव्हा स्त्रीस देखील यामधे सामील व्हावयास हवे.
जोपर्यंत सिंह जातकाचे लग्नी, ५वे, ७वे, ११वे स्थानी शनी, मंगळ, शुक्र नसेल तर सिंह जातक स्त्रीचा पती होणे गैरवाजवी नाही.
9. वैवाहिक- सिंह जातकास नीट समजून घेतले तर तिंस सिंह जातकाचे प्रेम व प्रशंसा प्राप्त होईल.व ती संसारात सुखी होईल. सिंह जातक कधीहि आपल्या जोडीदाराची अथवा कुटुंबियांची मानहानी सहन करणार नाही. आपल्या जोडीदाराचा व कुंटुंबाचा नेहमी गर्व राहील. सिंह स्त्री आपली सामजिक प्रतिमा जपण्यासाठी नेहमी सतर्क व हुशार राहील. सिंह राशी अग्नि राशी असल्याने मेष, सिंह, धनू व वायू राशीच्या मिथुन, तुळ, कुंभ या राशीत जन्मास आलेले जातक जोडीदार म्हणून योग्य असतील. मेष व धनू जातक आनंद व अनुरुपता देतील. मिथुन, तुळ, कुंभ राशीत जन्मलेले सिंह जातकावर फ़ार प्रेम करतील. तुळ जातक त्यास नेहमी लाभ देण्याचा प्रयत्न करेल, कष्टी होण्यापासून दूर ठेवेल व कोण्त्याही परिस्थित शांती टिकवून ठेवेल. मिथुन जातक युक्तीबाज असतात व असे कोणतेही काम करणार नाहीत ज्याने जोडीदार नाराज होईल. मिथुन एक साथ देणारा व विश्वसनीय प्रेमी ठरेल.
सिंह स्त्री महत्वाकांक्षी व आदर्श असते. ती आपल्या घराची उत्तम व्यवस्था ठेवेल या जोडीला ती सामाजिक संबंध सुद्धा उत्तम जोपासेल. ती सर्वांवर अनुकुल प्रभाव ठेवू शकते. सिंह स्त्री मेष वराशी लग्न करेल तर तिला भाग्यशाली असते. कारण तो अधिकारप्रिय असेल तर ही आपल्या सीमा ओळखू शकते. व ती न ओलांड्ण्याचा तिचा मानस असेल. ती असा पती निवड्ते जो अधिकारयुक्त असेल व तिला आपल्या पतीचे कौतुक करता येईल. प्रेम दया, वस्तविकतेचे भान व समृद्धी असे जीवन व्यतीत करेल.
काही स्त्रियांचे विचार पक्के असतील व तो असे अनुभव करेल की तिचा शब्द हाच कायदा आहे व दोघे तिच कामे करतील जी तिला योग्य वाटतात.
10. संतती- सिंह जातक व्यक्ती आपल्या मुलांवर फ़ार प्रेम करतात. त्यांना त्यांचा फ़ार अभिमान वाटतो. साधारणत: त्यांची मुले फ़ार कष्टाळू व संवेदनशील असतात. त्यांना बंधन जास्त रुचत नाही व लहानपणी बंडखोरी सुद्ध करु शकतात.
सिंह जातकांने नेहमी आपल्या मुलांवर विश्वास ठेवावा व समजावून सांगावे अन्यथा विश्वास गमावतील.
सिंह राशीमधे जन्मलेले बालक इतरांवर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करेल. ते टीम चे कप्तान, शाळेत हेडबॊय असतील. योग्य नेता होतील. कारण त्यांचे कडे चेतना, महत्वाकांक्षा व आग्रहीपणा असतो. हे इतराना प्रेरणा देणारे उत्तम व्यवस्थापक असतात. ते अभिमानी असतात पण अहंकारी नसतात. ते आपल्या कल्पनेम्धे वहावत जात नाहीत. ते चांगल्या स्वभावाचे अधिकारी व शासन करण्याची हिंमत असणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध पावतील.
11. भाग्य दिवस- स्वास्थ्य, उच्च अधिकार, साहसी काम, सूर्य अधिष्ठित वस्तू खरेदीस रविवार लाभदायक. सोमवार अनिष्ट. धनहानी, मानहानी, गुप्त शत्रू कारवाया, संताप. मंगळ्वार जिद्दीने काम करण्यासाठी, विजय मिळवण्यासाठी, संपत्तीकारक, वाहन खरेदीत सफ़लता देणारा. बुधवार भाग्यदायक, धनलाभ, बैंकिंग ची कामे, करार, दस्तएइवज कामे, प्रेमपूर्ती, मैत्री साठी चांगला दिवस. गुरुवारी पैसे उधार वा कर्ज घेण्यासाठी चांगला. लवकर त्याची परतफ़ेड करता येईल. मौल्यवान वस्तू खरेदी, भेटीगाठीसाठी, जमीन अथवा कार मुलांच्या नावावर खरेदी करण्यासाठी चांगला. शुक्रवार लहान सहान प्रवास, बदली अथवा पदोन्नतीसाठी चांगला दिवस. शनिवार नुकसानदायक, धोका खाऊ शकता.
४) कर्क– कर्क ही राशी चक्रातील ४ क्रमांकाची राशी आहे.पुनर्वसू चे ४थे चरण, पुष्य व आश्लेशा ही नक्षत्रे यात येतात. जल, चर, मूक, फ़लदायी, दीर्घ उदीत, स्त्री राशी आहे. या राशीचा अधिपती चंद्र आहे. ह्या राशी मधे गुरु उच्च असतो. मंगळ निचेचा असतो. सूर्याची मित्र … Continue reading कर्क राशीफ़ल ( Kark Rashiphal )