Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

गुरु ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Jupiter)


गुरु चे पारंपारिक उपाय

1. गुरुवारी केळीच्या झाडावर जल अर्पित करुन शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि गुरुच्या 108 नावांचे उच्चारण करावे. असे केल्याने लवकरच जीवनसाथीदाराचा शोध पूर्ण होतो.

2. शीघ्र विवाहासाठी गुरुवारी उपास करावा विशेष रूपाने या दिवशी पिवळे वस्त्र नेसावे.. आहारात देखील पिवळ्या रंगाचे पदार्थ सामील करावे.

3. व्यवसायात अडथळे येत असल्यास गुरुवारी देवघरात हळदीची माळ लटकवावी. आपल्या कार्यस्थळी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करावा. तसेच भगवान लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरात लाडूचा नैवेद्य दाखवावा.

4. घरातनू दारिद्र्य दूर करण्यासाठी गुरुवारी कुटुंबातील सदस्य विशेषत: स्त्रियांनी केस धुऊ नये. तसेच या दिवशी नखे कापू नये.

5. नोकरीत प्रमोशन होत नसेल किंवा रोजगार संबंधी अडचणी येत असल्यास गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू जसे खाद्य पदाथा, फळं, कपडे इतर वस्तू दान कराव्या.

6. हळदीची गाठ पिवळ्या रंगाच्या धाग्यामध्ये बांधून उजव्या भुजेवर बांधले पाहिजे.

7. 27 गुरुवार पर्यंत केशराचा टिळा लावणे आणि केशरची पुडी पिवळ्या रंगाच्या कपड्यात किंवा कागदात आपल्या आसपास ठेवले पाहिजे.

8. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे आणि घरात पिवळ्या रंगाचे पडदे लावणे शुभ असते.

9. घरात पिवळ्या सुरजमुखीचे रोपटे लावले पाहिजे.

10. सोन्याची चेन आणि बृहस्पती यंत्र धारण केले पाहिजे.

11. व्यक्तीला माता-पिता, गुरुजन आणि अन्य पूजनीय व्यकतींच्या प्रति आदर आणि सन्मानाचा भाव ठेवला पाहिजे.

12. कुठल्या मंदीर किंवा धार्मिक स्थळावर जाऊन नि:शुल्क सेवा केली पाहिजे.

13. गुरुवारच्या दिवशी मंदीरामधे केळीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावला पाहिजे.

14. गुरुवारच्या दिवशी पिठाच्या पेढ्यामध्ये चण्याची डाळ, गूळ आणि हळद टाकून गाईला खाऊ घातले पाहिजे.

15. गुरू अध्यात्मिक ज्ञानाचे कारक असल्याने बुद्धिजीवी व्यक्ती आणि गुरुजनांचा सन्मान करा.

16. गुरुवारच्या दिवशी ‘ॐ बृं बृहस्पतये नमः!’ मंत्राचा जप करा.

17. गुरुवारी बृहस्पतीच्या वैदिक मंत्राचा जप केल्याने जाडपणा आणि पोटासंबंधित आजार दूर होतात.

18. गुरुवारी बृहस्पतीच्या पूजेमध्ये गंध, अक्षत, पिवळे फुल, पिवळे पकवान्न आणि पिवळे वस्त्र यांचे दान करा.

19. गुरुच्या संबंधित उपाय गुरुवारच्या दिवशी गुरुचे नक्षत्र (पुनर्वसू, विशाखा, पूर्वा भाद्रपदा) आणि गुरूच्या होरा मध्ये केले पाहिजे.

20. केशर उपयोगात आणावे. जीभ व बेंबीवर केशराचे गंध लावावे.

21. पिवळ्या रंगाची वस्तू मंदिरात दान करावी, पिंपळाच्या झाडाला नियमित पाणी घालावे.

22. गुरुवारचा उपवास धरावा.

23. एकत्र कुटुंबात राहावे. मंदिर स्वच्छ करावे.

24. दुर्गापूजन करावे. गुरुप्रदोष व्रत करावे.

25. कोणालाही आपले नग्न शरीर दाखवू नये.

26. आरंगमूळ नावाची वनस्पती ताईतात घालून धारण करावी.

27. गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात नागरमोथा घालून अंघोळ करावी.

28. गळ्यात माळा घालू नये. दारू पिऊ नये.

-ज्योतिषमित्र मिलिंद

For any query or Astrological guidance feel free to contact on 7058115947 (whatsapp)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

बुध ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Mercury)


बुधाचे पारंपारिक उपाय

1. बुधवारी गणपती अथर्वशीर्षाचे पाठ करणे फलदायी ठरेल. तसेच महिन्यातून येणारे दोन्ही चतुर्थीला देखील पाठ करणे शुभ ठरेल.

2. या व्यतिरिक्त आपण गणपती मंदिरात जाऊन दूर्वा अर्पित कराव्या आणि लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा.

3. बुधवारी किन्नरांना पैसे दान करावे. आंणि त्यांच्याकडून काही पैसे आशिर्वाद म्हणून घ्यावे. त्यांनी दिलेले पैसे पूजा स्थळी ठेवून धूप-उदबत्ती दाखवावी. नंतर हिरव्या कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागी ठेवून द्यावे. याने बरकत येते.

5. आपण तांत्रिक उपाय करू इच्छित असल्यास बुधवारी 7 कवड्या घ्याव्या. यासि मूठभर अख्खे मूग घ्यावे आणि दोन्ही वस्तू हिरव्या कपड्यात गुंडाळून गुपचुप एखाद्या मंदिराच्या पायरीवर ठेवून यावे. याबद्दल कोणालाही सांगू नये. याची चर्चा करू नये.

6. दारू, मांस, अंडे खाणे टाळा

7. रात्री डोक्याजवळ पाणी ठेऊन सकाळी ते पाणी पिंपळाच्या झाडाला चढवा.

8. मुंग डाळ रात्री भिजवून सकाळी जनावरांना खाऊ घाला.

9. मेंढी, बकरी आणि पोपट पाळू नका.

10. तांदूळ किंवा दुध मंदीर किंवा धार्मिक स्थळावर दान करा.

11. कावळ्याला जेऊ घाला.

12. बुधाची अनिष्टता दूर करण्यासाठी तांब्याच्या गोल नाण्याला मधोमध भोक पाडून वाहत्या पाण्यात सोडावे किंवा कवड्यांची राख करून ती समुद्रात सोडावी.

13. बुध केतूबरोबर लग्न व सुखस्थान सोडून इतर कोणत्याही स्थानी असेल तर अनिष्ट होतो. अशा जातकाने नाक टोचून घ्यावे. तुरटीने दात स्वच्छ करावेत. लहान मुलींना पिवळ्या रंगाचा हलवा खाऊ घालावा. मंदिरात केशर अर्पण करावा.

14. बुध तृतीय स्थानी बसून अनिष्ट फले देतो. मंगळवारी रात्री मूठभर मुगाची डाळ भिजत घालावी व बुधवारी सकाळी ही डाळ पक्ष्यांना खाऊ घालावी. असे ४३ वेळा करावे. हिरवे मूग दान करावेत.

15. वरधारा वनस्पती ताईतात बंद करून धारण करावी.

16. गहूला वनस्पती ताईतात बंद करून त्या पाण्याने स्नान करावे.

17. मातीच्या भांड्यातून पाणी प्यावे.

18. लिंबाचे झाड लावल्यास बुधाची अनिष्टता संपते.

19. दुर्गादेवीची उपासना करावी. घरात शंख किंवा ताईत ठेवावा.

20. मुलाच्या वाढदिवशी फरसाण वाटावे.

21. मांसाहार करू नये. दारू पिऊ नये. घरात मनीप्लांट लावू नये.

22. मेव्हणीला आपल्या घरात ठेवू नये.

23. तांदूळ व दूध मंदिरात दान केल्यास बुधाची अनिष्टता संपते.

24. लोखंडाच्या गोल गोळीवर रंग चढवून ती गोळी नेहमी जवळ ठेवावी.

25. बुधवारचा उपवास किंवा बुध प्रदोष करावा. शुभ्र बुधवार व्रत करावे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

मंगळ ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Mars)


मंगळाचे पारंपारिक उपाय

1. ज्या व्यक्तीचा मंगळ अधिक प्रभावी आहे अशा व्यक्तीने नारळाचं पाणी पिणे खूप चांगलं असतं. यामुळे मंगळ शांत होतो आणि त्या व्यक्तीचा राग कमी होतो.

2. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन मारूतीरायावर तेल अर्पण करावं आणि शेंदूर लावावा. हनुमंताच्या शेंदूराचा आपल्या कपाळावर टिळा लावावा.

3. बुंदीचे लाडू आपल्या हाताने तयार करावे, त्यात चार लवंगा टाकून हनुमानाच्या चरणी मंगळवारी अर्पण करावेत.

4. विड्याच्या पानावर काथ लावावा आणण असा विडा मंगळवारी बजरंगबलीला अर्पण करावा.

5. दररोज हनुमान चालीसा आणि मारूती स्तोत्राचं पठण करावं.

6. मोहरीच्या तेलात नीळ (पांढरे कपडे धुवायला वापरतो ती नीळ) मिसळून त्याचा दिवा मंगळवारी हनुमानासमोर लावावा.

7. मंगळवारी उपवास करून गुळ आणि फुटाणे दान करावे.

8. असं म्हणतात जो भक्त प्रत्येक मंगळवारी उपवास करतो आणि हनुमंताची विशेष पूजा करतो. त्याच्यावर मारूतीरायाची सदैव कृपा राहते. ज्या तरूण-तरूणींना सौम्य मंगळ किंवा मंगळ आहे. ज्यामुळे त्यांचा विवाह ठरत नाही, अशा तरूणांनी हा उपाय करून बघण्यास हरकत नाही. मंगळाचा प्रभाव कमी झाला तर आपला राग शांत होईल आणि त्यामुळे दूर गेलेले व्यक्ती जवळ येतील आणि जवळचे दूर जाणार नाहीत.

9. वड वृक्षाच्या मूळ मध्ये गोड दूध – पाणी टाकून त्याची ओली माती नाभी वर लावा.

10. घरात ठोस चांदी ठेवा.

11. घरात आलेल्या बहिणीला गोड देऊन घरातून विदा करा.

12. धार्मिक स्थळावर गूळ, चण्याची डाळ इत्यादीचे दान करा.

13. दुसऱयांना गोड खाऊ घाला आणि शक्य असल्यास स्वतः ही गोड खा.

14. अनिष्ट मंगळ शुभग्रहांनी युक्त असेल तर साखरेचे बत्ताशे वाहत्या पाण्यात सोडावेत. तिळगुळाच्या रेवड्या विकत घेऊन वाहत्या पाण्यात सोडाव्यात.

15. मृगचर्माचे आसन नेहमी वापरावे.

16. गुळाच्या किंवा पुरणपोळ्या गरिबांना खाऊ घालाव्यात.

17. चतुर्थ मंगळ असेल तर अडचणी दूर करण्यासाठी रोज सकाळी विहिरीच्या पाण्याने दात स्वच्छ करावेत.

18. साखर घातलेले दूध, वडाची मुळी, जमिनीतील माती या तीन वस्तूंचे गंध तयार करून रोज त्याचा टिळा कपाळी लावावा.

19. अग्निभय असेल तर आपल्या घरावर थोडी साखर टाकावी.

20. अनिष्ट मंगळामुळे पत्नीच्या मृत्यूची भीती असेल तर एका नव्या भांड्यात मध ठेवून यावे.

21. दीर्घ आजारातून बचाव होण्यासाठी मृगचर्मावर झोपावे. घराच्या दक्षिण दिशेला लोखंडाची नखे अडकवून ठेवावीत. घरात कुत्रा पाळावा.

22. कुंडलीच्या बाराव्या स्थानात मंगळ असेल व बुध ३,८,९,१२ यापैकी कोणत्याही स्थानी असल्यास दुष्परिणाम भोगावे लागतात. अशा स्थितीत दुधात बत्ताशे व मध मिसळून मारुतीच्या मंदिरात अर्पण करावेत.

23. मंगळवारी अनंत मूळ वनस्पतीची मुळी आणून लाल धागा बांधावा व ही मुळी आपल्या दंडावर बांधावी.

24. दर मंगळवारी ‘ॐ हनुमंते नमः’ या मंत्राचा जप १०८ वेळा करावा

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

चंद्र ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Moon)


चंद्राचे पारंपारिक उपाय

1. पुत्र सुखासाठी भूमीमध्ये शोपा (बडीशोप) दाबा.

2. घरात चांदीचे ताट शुभ असेल.

3. समुद्रा मध्ये पैसे टाका.

4. गरजू लोकांना जल आणि दूध पाजा.

5. शंकराची भक्ती, उपासना करा.

6. उशीपाशी स्वच्छ भांड्यात पाणी किंवा दूध ठेवून झोपावे व ते सकाळी तुळशीच्या झाडाला घालावे.

7. तांदूळ, पांढरे वस्त्र, शंख, पांढरे चंदन, पंढरी फुले, साखर, बैल, दही, मोती, मैदा यांचे यथाशक्ती दान करावे.

8. चांदीचे कडे, चांदीची अंगठी, चांदीची साखळी, चांदीचे पैंजण धारण करावे.

9. रात्री उशिरापर्यंत जागत बसू नये.

10. शंकराला खीर किंवा राबडीचा नेवैद्य दाखवावा व मुलीना खाऊ घालावा.

11. चंद्र मातृकारक असल्याने आई किंवा मामाने दिलेली चांदीची अथवा पांढरी भेटवस्तू सांभाळून ठेवा.

12. ‘ओम सोम सोमाय नमः’ हा मंत्रजप रोज १०८ वेळा करणे चांगले.

13. अनिष्ट चंद्रामुळे आईला आजारपणाचा त्रास, रोग, धननाश या घटना घडतात. या दूर करण्यासाठी रविवारी रात्री चांदी/स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात दूध घालून हे भांडे उशाला ठेवावे. सोमवारी सकाळी झोपेतून उठल्यावर कोणाशी न बोलता हे दूध पिंपळ/ बाभळीच्या झाडाला घालावे.

14. कब्रस्तान किंवा स्मशानातील विहिरीचे पाणी नेहमी घरात ठेवावे.

15. वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करावा.

16. लहान मुलांना नियमित दूध पाजावे.

17. रोज चंद्रपूजा करावी.

18. जन्मकुंडलीत चंद्र एकादश स्थानी व केतू तिसऱ्या स्थानी असेल तर बाळंतपणाच्या वेळी मातेला कष्टप्रवास त्रासदायक होतो. रव्याचे २१ लाडू लहान मुलांना खाऊ घालावेत किंवा नदीत प्रवाहित करावे. अनिष्टता दूर होते.

19. ५ सोमवारचे व्रत करावे. सोमप्रदोष करावा.

20. सोमवारी मीठ व अन्नसेवन करू नये. संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन पंचामृताचा शिवलिंगावर अभिषेक करावा. बेलपत्र व पांढरी फुले अर्पण करावीत. धूपारती करून नमस्कार करावा.

-ज्योतिषमित्र मिलिंद

For any query or Astrological guidance feel free to contact on 7058115947 (whatsapp)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

रवी ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Sun)


रवी चे पारंपारिक उपाय

1. पती – पत्नी पैकी एकाने गूळ खाणे बंद केले पाहिजे

2. मुफ्त वस्तू घेऊ नका

3. आईचा आशिर्वाद सदैव घ्या

4. तांदूळ – दुधाचे दान करा.

5. आंधळ्या व्यकतींची मदत करा.

6. दुसरें सोबत प्रेमाने वागा.

7. जन्मकुंडलीत रवि अनिष्ट असेल व त्यामुळे जीवनात विघ्न बाधा उत्पन्न होत असेल तर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणत्याही रविवारी २ किलो गूळ पाण्यात प्रवाहित करावा.

8. जन्मकुंडलीत लग्नी रवि असेल वा सप्तमात शनि असेल तर रवि- अनिष्ट होऊन खूप त्रास करतो. अशा जातकाने आपल्या पैतृक घरात हँडपंप बसवावा. विहीर खोदून घ्यावी.

9. सप्तम स्थानांत रवि व लग्नस्थानी शनि असेल किंवा दृष्टी रविवर असेल तर जातकाला संतती होत नाही. अशा जातकाने जेवणापूर्वी आचमन करावे. तांब्याचे ७ तुकडे जमिनीत गाडावेत. रविवारी बिनशिंगाच्या कपिला गाईला पोळी व गूळ खावयास घालावा.

10. प्रथम स्थानी अनिष्ट रवि असेल तर बापजाद्यांच्या घरात पाण्याचा नळ बसवून घ्यावा.

11. द्वितीय स्थानी अनिष्ट रवि असेल तर वाहत्या पाण्यात गूळ प्रवाहित करावा. चारित्र्यावर लक्ष द्यावे.

12. चतुर्थ स्थानी अनिष्ट रवि असेल तर वडिलोपार्जित घरात गरिबांना जेवण द्यावे. नित्य हवन करावे.

13. पंचम स्थानी अनिष्ट रवि असेल तर रोज सकाळी १८ सूर्यनमस्कार घालावेत. सकाळी पिण्याच्या पाण्यात गूळ घालून ते पाणी दिवसभर थोडे-थोडे प्यावे. प्रयोगाची सुरुवात रविवारी करून ४३ दिवस करावा.

14. सहाव्या स्थानी रवि अनिष्ट असेल तर माकडांना चणे-गूळ व मुंग्यांना साखर-पीठ घालावे.

15. सातव्या स्थानी रवि अनिष्ट असेल तर मीठ कमी खावे. स्वयंपाक झाल्यावर अग्नी दुधाने विझवावा.

16. आठव्या स्थानी पांढऱ्या गाईखेरीज इतर गाईची सेवा करावी.

17. नवव्या स्थानी स्वयंपाक, जेवणासाठी पितळी भांड्यांचा उपयोग करावा.

18. दहाव्या स्थानी बोडक्या डोक्याने हिंडू नये.

19. अकराव्या स्थानी मद्यपान व मांसाहार करू नये.

20. बाराव्या स्थानी घरात जात्यावर धान्य दळावे.

21. बेलाची पत्री ताईतात घालून तो गळ्यात धारण करावा.

22. हरिवंश पुराण वाचावे.

-ज्योतिषमित्र मिलिंद

For any query or Astrological guidance feel free to contact on 7058115947 (whatsapp)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

शनी ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Saturn)


शनीचे पारंपारिक उपाय

1. तीळ किंवा ईतर तेलाने मॉलिश करून काळे तीळ, बडीशोप यांना पाण्यात मिसळून आंघोळ करावी. त्यामुळे अनिष्ट प्रभावापासून शांती मिळते.

2. लोखंड, काळे कपडे, बडीशोप, काळे तीळ, चामडे, निळे फुल यांचे दान करावे.

3. शनीच्या कोपापासून वाचण्यासाठी शनी मंत्राचा जप करावा. ॐ शं शनैश्वराय नम: किंवा शनीच्या अन्य मंत्राचा जप करू शकता.

4. शनी यंत्राचे यथासंभव दान करावे.

5. शनी ग्रह शांतीसाठी पूजा-पाठ केल्यानंतर अशुभ प्रभाव शुभ प्रभावात रुपांतरीत होतो. यासाठी हवनसुध्दा केले पाहिजे.

6. तसेच शनवारचे व्रत करावे.

7. शनवारी पिंपळाच्या झाडाजवळील हनुमान किंवा शिव मंदिरात जाऊन दिवा लावावा

8. शनी काळ्या रंगाच्या पशु-पक्ष्यांचे प्रतिनिधीत्व करीत असल्यामुळे त्यांची सेवा करावी. त्यांना सुखमय भोजन द्यावे.

9. व्यसनांपासून दूर रहावे

10. छळ, कपट, खोटी साक्ष यापासून लांब रहावे

11.सामसुम असलेल्या किंवा निर्जन ठिकाणी जाणे टाळावे. तसेच अंधारापासून लांब रहावे

12. वडीलधारी व्यक्तींचा मान ठेवावा.

13. शनी अशुभ असल्यास शनीच्या वस्तुंचे दान करावे. शनी शुभ असल्यास शनीचे वस्तूंचे दान करू नये.

14. शनीची वक्र दृष्टी ने वाचण्यासाठी हनुमानजी ची सेवा आंणि नियमित हनुमान चालीसाचे पाठ केले पाहिजे.

15. शनीच्या शांतीसाठी महामृत्यूंजय मंत्राचा जप करू शकतात.

16. तीळ, उडद, लोखंड, म्हैस, तेल, काळे कपडे, काळी गाय, बूट दान दिले पाहिजे

17. मागणाऱयांना लोखंडाचा चिमटा, तवा, अंगठी दान मध्ये दिले पाहिजे.

18. जातक मस्तकावर तेलाच्या ऐवजी दूध किंवा दह्याचा टिळा लावल्यास अ्धिक लाभदायक असेल.

19. काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालणे, पाळणे, त्याची सेवा केल्याने लाभ होईल.

20. घराच्या शेवटी अंधार कोठी शुभ असेल.

21. मास्यांना दाणा किंवा तांदूळ टाकणे लाभदायक असते.

22. तांदूळ किंवा बदाम वाहत्या पाण्यात टाकल्याने लाभ होईल.

23. दारू, मांस, अंडे खाणे अत्यंत सकतीने टाळा.

24. मशिनरी आणि शनी संबंधित अन्य वस्तुंनी लाभ होईल.

25. प्रतिदिन कावळ्याला पोळी खाऊ घाला.

26. दात, नाक, कान नेहमी साफ़ ठेवा

27. आंधळ्या, दिव्यांग, सेवक आणि सफाई कामगारांसोबत चांगला व्यवहार ठेवा.

28. छाया पात्र दान करा म्हणजे एक वाटी किंवा अन्य पात्रात सरसोचे तेल घेऊन आपला चेहरा पाहून शनी मंदिरात आपल्या पापांची क्षमा मागून ठेऊन या.

29.भुऱया रंगाची म्हैस ठेवणे लाभकारी असेल.

30. मजुर, म्हैस आणि माश्यांच्या सेवेने लाभ होईल.

शनिची अनिष्टे निवारणारे अनुभवसिद्ध उपाय-

१) घरात लोखंडी फर्निचर वापरावे. जेवणात काळी मिरी व काळ्या मिठाचा उपयोग करावा.

२) साडेसाती दूर करण्यासाठी रोज जेवणापूर्वी वाढलेल्या ताटातून सर्व पदार्थ थोडे-थोडे बाजूला काढून ते कावळ्याला खावयास द्यावेत.

३) मोहरी व तिळाचे तेल दान करावे.

४) चतुर्थ स्थानी शनि जातकाने रात्री दूध पिऊ नये. ते विषवत होऊन शनिचा त्रास वाढेल. काळ्या सापाला दूध, म्हशीला चारा, मजुरांना जेवण, विहिरीत थोडे दूध टाकावे.
५) सप्तम स्थानी अनिष्ट शनि असून, जातक मद्यपान करीत असेल तर त्यांनी मद्यपान तात्काळ बंद करावे.

६) दर शनिवारी उपवास करावा.

७) शनिवारी दारूहळद घालून त्या पाण्याने अंघोळ करावी.

८) वाच्छोल वनस्पतीचे मूळ ताईतात घालून धारण करावे.

९) शनिवारी मारुतीला उडीद वाहावेत. रुईच्या पानांची माळ अर्पण करावी.

१०) माकड पाळावे, घरातील शेवटच्या भागात अंधार कोठडी बनवावी.

११) घराचे मुख्य द्वार पूर्व किंवा दक्षिणेला बसवू नये.

१२) चांदीचा चौरस तुकडा ठेवावा.

१३) घराच्या छतावर जळाऊ लाकडे ठेवू नयेत.

१४) मांसाहार करू नये.

१५) शुभ कार्य करण्यापूर्वी घरात पाण्याने भरलेला कुंड ठेवावा.

१६) शनिप्रदोष व्रत करावे.

-ज्योतिषमित्र मिलिंद

For any query or Astrological guidance feel free to contact on 7058115947 (whatsapp)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

अ भि प्रा य (Testimonials)


नमस्कार 🙏
सध्याच्या काळ हा लोकांसाठी फार कष्टदायक व तणावपूर्ण असा आहे. कोविड सारख्या साथी, महागाई, बेरोजगारी अशा गोष्टी सामान्य माणसास अजुन च अस्थिर बनवत आहेत. वैयक्तिक संकटांची यादी तर संपायचे नाव घेत नाही. कोणाचे लग्न ठरत नाही तर कोणाचे लग्न टिकत नाही. कोणाचा व्यवसाय चालत नाही तर कोणाला नोकरी धार्जिन नाही. कोणाला मूल बाळ नाही तर कोणाची मुले परदेशी सेटल झाल्याने वृद्ध आईवडील एकाकी आयुष्य जगत आहेत. अशा अनेक अड़ी अडचणी नैराश्य आणत आहेत व मनातील हितगुज करण्यास कोणाला वेळ उरलेला नाही. जोतो आपली लढाई लढत आहे.
अशा वेळी आपला उत्कर्षा चा काळ कधी येईल, आपला प्रश्न केव्हा मार्गी लागेल, वाईट वेळ कधी संपेल हे जाणून घेण्यासाठी पावले आपसुक ज्योतिषा कड़े वा गुरुजींकडे वळतात. पण तेथेही बरेच वेळा ग्रहदोष, कुयोग यांची अनाठायी भीति दाखवून महगाडी रत्न, खर्चिक शांती ई. सांगुन ऊखळ पांढरे केले जाते.
आणि या साठीच एक मैत्रीपूर्ण सल्ला व ज्योतिष समुपदेशनासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न.
जर आमची नाममात्र मूल्य सेवा व वेबसाइट आवडली तर आपला अभिप्राय जरूर येथे नोंदवा, ज्याचा बाकीच्या लोकांना उपयोग होईल.

-ज्योतिषमित्र मिलिंद

नवग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Planets)


नमस्कार मित्रांनो,

फार पूर्वी फलज्योतिष हा शब्द प्रचारात नव्हता. ज्योतिष किंवा ज्योति:शास्त्र हा शब्द प्रचारात होता, ज्योति म्हणजे आकाशातील दीप्तीमान गोल. ज्योतिष हा शब्द मुख्यत: खगोलशास्त्र या अर्थाने वापरीत असत. त्याचा उपयोग यज्ञयागादि धर्म-कृत्ये करण्यासाठी चांगला काल कोणता ते ठरवण्यासाठी केला जात असे. त्यात अर्थातच शुभाशुभत्वाचा भाग असे. कालांतराने ज्योति:शास्त्राचे तीन स्कंध होउन त्याना सिद्धांत-स्कंध, संहिता-स्कंध आणि होरा-स्कंध अशी नावे मिळाली. पहिला सिद्धांत-स्कंध पूर्णपणे खगोलगणिताशी संबंधित होता. दुसरा संहिता-स्कंध हा ऋतूमानानुसार नागरी जीवनातील कृत्ये व कर्तव्ये केव्हा म्हणजे कुठल्या नक्षत्रावर व मुहूर्तावर करावीत हे सांगणारा होता. तिसरा होरा-स्कंध हा व्यक्तीच्या आयुष्यातील घटना वर्तवणारा होता, तो म्हणजेच आजचे फलज्योतिष .


ज्योतिष शास्त्राची व्याप्ती आज खुपच वाढत चालली आहे व त्यात तोडगे,यंत्र, मंत्रतंत्र, दैवी उपाय, सिद्धी, उपासना, रत्ने या गोष्टींनी शिरकाव केल्याने व त्याचा आर्थिक फ़ायद्याचे महागडे चक्र अडचणीत असलेल्या जातकाचे डोक्यावर ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे सोपे घरगुती उपाय व तोडगे सांगायला गेले की अंधश्रद्धा चे लेबल चिकटवले जाते.


पण नीट बघितले तर लक्षात येईल की, ग्रहांच्या कारकत्वाचा उदा. देवता, रंग व स्वभाव वैशिष्ट्ये अभ्यास करुन काही पारंपारिक उपाय व तोडगे सांगित्ले जातात. पीडा निवारण, संकट मूक्ती वा सौख्यासाठी याचा वापर करुन पाहण्यास काहीच हरकत नाही. दरवेळी महागडी रत्ने वा खर्चिक शांतीसारखे उपाय करणे गरजेचे नाही. येथे नवग्रहांसाठी वापरण्यात येणारे काही पारंपारिक तोडगे देत आहे. अर्थात त्यात स्थळ, काळानुसार त्यात बदल करण्यास हरकत नाही. त्यामुळे काही नाही तरी सकारात्मक उर्जा नक्की प्राप्त होईल जी तुम्हास बळ देईल.

-ज्योतिषमित्रमिलिंद

1. रवी ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Sun)

2. चंद्र ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Moon)

3. मंगळ ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Mars)

4. बुध ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Mercury)

5. गुरु ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Jupiter)

6. शुक्र ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Venus)

7. शनी ग्रह पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Saturn)

8. छायाग्रह राहू पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Rahu)

9. छायाग्रह केतू पीड़ा निवारण्याचे पारंपारिक उपाय (Traditional Remedies for pleasing Ketu)

-ज्योतिषमित्रमिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन साठी संपर्क :

whatsapp no. (७०५८११५९४७)

e mail : contact@jyotishmitramilind.in

For More info Visit : jyotishmitramilnd.in

Duration Of Each Planet In a Zodiac Sign


DO YOU KNOW DURATION OF EACH PLANET IN A ZODIAC SIGN?

In a zodiac sign

Moon remains about two and half days
(चंद्र एका राशीमध्ये साधारण अडीच दिवस असतो)

Mars remains about 1 month.
(मंगळ एका राशीमध्ये साधारण 1 महिना असतो)

Mercury remains about 1 month
(बुध एका राशीमध्ये साधारण 1 महिना असतो)

Jupiter remains about 13 months.
(गुरु एका राशीमध्ये साधारण 13 महिने असतो)

Venus remains about 1 month
(गुरु एका राशीमध्ये साधारण 13 महिने असतो)

Saturn remains about 30 months.
(शनि एका राशीमध्ये साधारण 30 महिने असतो)

Rahu-Ketu remain for 18 months.
(राहू-केतू एका राशीमध्ये 18 महिने एका राशीमध्ये असतात.)

The speed of other planets always varry except Rahu-Ketu.
(राहू-केतू वगळता इतर ग्रहांचा वेग नेहमी बदलत असतो.)

  • jyotishmitramilind
  • (ज्योतिषमित्र मिलिंद)

For any query or Astrological guidance feel free to contact on 7058115947 (whatsapp)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

प्रत्येक राशीची प्रेमाची नैसर्गिक प्रवृत्ती (Astrology)


Each sign’s Natural Tendency of love
(प्रत्येक राशीची प्रेमाची नैसर्गिक प्रवृत्ती)

ARIES (मेष)
Adventurous experiences together.
थरारक प्रेमानुभव

TAURUS (वृषभ)
Physical touch.
स्पर्शात्मक प्रेम

GEMINI (मिथुन)
Words of affirmation.
प्रेमाची ग्वाही

CANCER (कर्क)
Opening up about vulnerability.
मार्मिक संवाद

LEO (सिंह)
Receiving attention.
लक्ष वेधुन घेणे

VIRGO (कन्या)
Acts of service.
सेवाभाव

LIBRA (तूळ)
Compliments and affection.
कौतुक व माया

SCORPIO (वृश्चिक)
Sharing secrets and fears.
स्वभय व स्वरहस्यात सहभागी करुन घेणे

SAGITTARIUS (धनु)
Laughter and humor.
हास्य विनोद करत प्रेम

CAPRICORN (मकर)
Quality time together.
एकत्र बहुमूल्य सहवास

AQUARIUS (कुंभ)
Shared interests.
आवड़ी निवडी त सहभागी करून घेणे

PISCES (मीन(
Being honest.
प्रामाणिक प्रेम

-ज्योतिषमित्र मिलिंद

For any query or Astrological guidance feel free to contact on 7058115947 (whatsapp)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in