शनिवार दि. ४ एप्रिल ला आयोजक व व्यवस्थापन संस्था संस्थापक व कुलगुरू डॉ. समीक्षा शिरीष दारवलीकर, अनिरुद्ध नक्षत्र इंटरनॅशनल संस्था (आय एस ओ प्रमाणित), मुबंई. यांच्या अथक परिश्रमाने हॉटेल राधाकृष्ण बँक्वेट, एल.टी रोड डायमंड टॉकीज समोर बोरिवली (पश्चिम) मुबंई येथे दिग्गज ज्योतिषांच्या उपस्थित स्नेह संमेलन व पदवीदान कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व श्री गणेश स्तुतीने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्योतिष रत्न विजय जकातदार व व प्रमुख पाहुणे अष्टमहागुरु प्रदीप पंडित व होराभूषण मनीष गोसावी, सुहास समुद्र आणि अॅड. मालती शर्मा उपस्थित होते. अनेक ज्योतिषांचे व्याख्यान झाले. ज्योतिषाचार्य पंडित व हेमंत उपासनी सरांनी अष्टकवर्ग या विषयावर व्याख्यान केले.
कोहिनूर या पदवीने
ज्योतिष रत्न नंदकिशोर जकातदार
अष्टमहागुरू प्रदीप पंडित
डॉ. निलेश कुलकर्णी
अजिंक्य नळोले
डॉ. ज्योतिष मित्र मिलिंद
दीपक पाटील
अनिल महामुनी
हेमंत उपासनी
मनीष गोसावी
अॅड. मालती शर्मा
यांना सन्मानित करण्यात आले.
तसेच ज्योतिष महर्षी डॉ. अमित भलिंगे यांना सन्मानित करण्यात आले.
ज्योतिषरत्न या पदवीने सुहास समुद्र यांना सन्मानित करण्यात आले.
मेडिकल अॅस्ट्रोलॉजी वाचस्पती व महाराष्ट्र भूषण या पदवीने पंडित सतीश गुरुजी यांना सन्मानित करण्यात आले.
ज्योतिरविद्या वाचस्पती या पदवीने
अनंत राजाराम आठल्ये
अनिल महामुनी
हेमंत उपासनी
बाबासाहेब देशमुख
सतीश नाईक
डॉ. ज्योतिष मित्र मिलिंद
जयश्री जोशी
दीपक पाटील
निर्मला बेळमकर
मेघश्याम महामनी
डॉ. मंजुषा व्यवहारे
अनंत लक्ष्मण जोशी
तसेच महाराष्ट्र ज्योतीष भूषण या पदवीने अनंत राजाराम आठल्ये
सायली जोशी
दीपक पाटील
जयश्री जोशी
निर्मला बेडकर
रघुनंदन पामडी
कृष्णा पोर्ट
सरिता गंभीर
सुनील जोशी
प्रियंका जोशी
शिवानी कारखानीस
ऋषिकेश देवनहळळी
यशश्री कारखानीस
रेखा छापवाले
उमा देशपांडे
राजेश्री राऊत
जयंत नाईक
रूपा जयंत नाईक
संतोष अंबावले
मनीष गोसावी
विकास नालकर
यांना सन्मानित करण्यात आले.
असे संस्थेच्या संस्थापिका व कुलगुरू डॉ. सौ. समीक्षा शिरीष दारवलिकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
कीलकम् – आधारस्तंभ,कवच 🚩 अर्थ – या रामरक्षास्तोत्ररूपी मंत्राचा ऋषि (रचणारा) बुधकौशिक असून छंद (वृत्त?) अनुष्टुभ् आहे, सीता आणि श्रीरामचंद्र या देवता आहेत, सीता शक्ती आहे, हनुमान आधारस्तंभ आहे आणि श्रीरामचंद्राच्या प्रेमाने जपासाठी वापरला जावा म्हणून हा स्तोत्ररूप मंत्र निर्माण केला आहे.
ध्यायेदाजानुबाहुं – ध्यायेत् + आजानुबाहुं, नीरदाभम् – नीरद म्हणजे मेघ, त्याच्यासारखी कांती असणारे श्रीराम, दधतमुरुजटामण्डनं – दधतम् + उरू + जटामंडनं , दधतम् – धारण करणारा, उरू – विस्तृत, मोठ्या, जटामंडनं – जटांनी सुशोभित असलेला. 🚩 अर्थ – आता ध्यानाची सुरुवात करू या. गुडघ्यापर्यंत हात असलेल्या, धनुष्यबाण धारण केलेल्या, बद्धपद्मासनात बसलेल्या, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेल्या, नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीशी स्पर्धा करणाऱ्या प्रसन्न अशा श्रीरामांचे ध्यान करू या. त्याच्या डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे, श्रीरामाची नजर तिच्या मुखकमलाकडे लागलेली आहे. श्रीरामांची कांती मेघश्याम आहे. शरीर निरनिराळ्या अलंकारांच्या शोभेने झळकत आहे. मोठ्या जटांमुळे त्यांचा चेहरा सुशोभीत झालेला आहे.
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ १ ॥
शतकोटिप्रविस्तरम् – शंभर कोटी श्लोकांइतके विस्तृत, पुंसां – पुरुषांची 🚩 अर्थ – श्रीरामाचे चरित्र शंभर कोटी श्लोकांइतके विस्तृत आहे. त्याचे केवळ एक अक्षरसुद्धा पुरुषाची मोठी पापे नष्ट करण्यास समर्थ आहे.
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ॥ २ ॥
नीलोत्पलश्यामं – नील + उत्पल + श्यामं, उत्पल – कमळ, राजीव – कमळ, जानकीलक्ष्मणोपेतं – जानकी + लक्ष्मण + उपेतं, म्हणजे सीता आणि लक्ष्मण ज्याच्या जवळ आहेत असा 🚩 अर्थ – नीलकमळासारखा सावळा रंग असलेल्या आणि कमळासारखे नेत्र असलेल्या रामाचे ध्यान करावे. सीता आणि लक्ष्मण ज्याच्या सन्निध असून ज्याचे मस्तक जटारूपी मुकुटाने सुशोभित आहे
सासितूणधनुर्बाणपाणिं – स + असि + तूण + धनुर् + बाण + पाणिं, असि = तलवार, तूण = भाता, म्हणजे धनुष्यबाण आणि भात्याबरोबरच तलवारही हाती असणारे, नक्तंचरान्तकम् – नक्तं + चर + अंतकम्, नक्तं – रात्र, नक्तंचर – निशाचर म्हणजे दानव, राक्षस, नक्तंचरांतकं – राक्षसांचा नाश करणारा, जगत्त्रातुमाविर्भूतमजं – जगत्रातुम् + आविर्भूतम् + अजम्, जगत्रातुम् – जगत् + त्रातुम् , म्हणजे जगाच्या रक्षणासाठी , आविर्भूतम् – स्वतःला प्रकट केले आहे, अजम् म्हणजे जन्मरहित आणि म्हणूनच मृत्युरहित सुद्धा. विभुम्- व्यापून उरणारा. ह्या शेवटच्या दोन ओळींतील विशेषणे श्रीरारामाच्या रुपाने अवतार घेणाऱ्या परमात्म्याला श्रीविष्णूला लागू होतात. 🚩 अर्थ – आणखी एक म्हणजे मूलत: जन्मरहित व सर्वव्यापक असूनही त्याने जगाच्या रक्षणासाठी स्वतःस मर्यादित स्वरूपात सहज लीलेने प्रकट केले आहे. बाकी अर्थ सहज स्पष्ट होईल.
रामरक्षाम् पठेत् प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् ।
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥ ४ ॥
प्राज्ञः – प्रज्ञावान, सूज्ञ पुरुष, पापघ्नीं – पापाचा नाश करणारी (रामरक्षा) सर्वकामदाम् – काम – इच्छा. सर्व इच्छा पूर्ण करणारी (रामरक्षा) असा अर्थ 🚩 अर्थ – रामरक्षा पापांचा नाश करणारी व सर्व इच्छा पूर्ण करणारी असल्याने सूज्ञ लोकांनी तिचे पठण करावे.(दुसऱ्या ओळीपासून कवच सुरू होते) रघूच्या कुळात उत्पन्न झालेला राम माझ्या कपाळाचे रक्षण करो. दशरथाचा पुत्र कपाळाचे रक्षण करो.
मखत्राता – मख म्हणजे यज्ञ, त्राता म्हणजे रक्षण करणारा, 🚩 अर्थ – कौसल्येचा पुत्र माझ्या दृष्टीचे रक्षण करो, विश्वामित्राला प्रिय (असलेले श्रीराम) माझ्या कानांचे रक्षण करोत, इथे विशेषणाची चपखलता लक्षात घेण्यासारखी आहे. श्रुतींसाठी विश्वामित्राशी संबंधित विशेषणच का, कारण विश्वामित्राने श्रुतींद्वारे म्हणजे कानांद्वारे विद्येचे संस्कार रामावर केले. यज्ञाचे रक्षण करणारे (श्रीराम) माझ्या नाकाचे रक्षण करोत तर सुमित्रेचे ज्यांच्यावर प्रेम आहे (श्रीराम) माझ्या मुखाचे रक्षण करोत.
भग्नेशकार्मुकः – भग्न + ईश + कार्मुक:, ईश – शंकर, कार्मुक – धनुष्य, शिवधनुष्य भंग करणारे (श्रीराम) 🚩 अर्थ – विद्येचा खजिना असलेले माझ्या जिभेचे रक्षण करोत (जीभ कारण तिच्या टोकावरच विद्या नर्तन करते असे मानतात) तर भरताला वंदनीय असलेले माझ्या कंठाचे रक्षण करोत. दिव्य शस्त्रास्त्रे असलेले माझ्या खांद्यांचे रक्षण करोत (खांद्यांचे कारण कदाचित काही अस्त्रे चालवण्यासाठी खांद्यांचा आधार घ्यावा लागत असावा). तर शिवधनुष्याचा भंग करणारे माझ्या भुजांचे रक्षण करोत (ज्या हातांनी शिवधनुष्य भंगले म्हणून हात).
जामदग्न्यजित् – जमदग्निपुत्र परशुरामाला जिंकणारे श्रीराम 🚩 अर्थ – सीतेचे पती माझ्या हातांचे रक्षण करोत (पतीचा एक अर्थ रक्षणकर्ता. सीतेचे रक्षण करणारा माझेही रक्षण करो असे काहीसे) तर परशुरामाला जिंकणारे माझ्या हृदयाचे रक्षण करोत. खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारे माझ्या मध्यभागाचे रक्षण करोत तर जांबुवंताला आश्रय देणारे माझ्या नाभिचे रक्षण करोत.
🚩 अर्थ – सुग्रीवाचे देव माझ्या कंबरेचे रक्षण करोत तर हनुमंताचे प्रभु माझ्या दोन्ही जांघांचे रक्षण करोत. रघुकुळातले उत्तम (पुरुष) व राक्षसांच्या कुळांचा नाश करणारे माझ्या मांड्यांचे रक्षण करोत.
वपुः – शरीर 🚩 अर्थ – सेतु बांधणारे माझ्या गुडघ्यांचे रक्षण करोत तर दोन्ही पोटऱ्यांचे रक्षण दशमुख रावणाचा अंत करणारे करोत. बिभीषणाला राज्य व संपत्ती देणारे माझ्या पावलांचे रक्षण करोत तर श्रीराम माझ्या सर्व शरीराचे रक्षण करोत.
एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् ।
स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥ १० ॥
🚩 अर्थ -(इथे कवच संपून फलश्रुति सुरू होते) जो पुण्यवान मनुष्य रामबलाने युक्त असा रक्षेचे (कवचाचे) पठण करेल तो दीर्घायु, सुखी, पुत्रवान, विजयी आणि विनयी होईल.
पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः ।
न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥ ११ ॥
🚩 पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः – याची फोड पातालभूतलव्योमचारिण: + छद्मचारिणः अशी आहे. पातालभूतलव्योमचारिण: – पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे, छद्मचारिणः – कपटी, मायावी खोटे सोंग घेणारे (राक्षस) दुसऱ्या ओळीचा अर्थ – रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे असे (पहिल्या ओळीत वर्णन केलेले) मायावी आणि कपटी राक्षस नजर वर उचलून पण पाहू शकत नाहीत.
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् ।
नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ।। १२ ॥
🚩 अर्थ – राम अथवा रामभद्र अथवा रामचंद्र या नावाने जो स्मरण करतो तो मनुष्य कधीही पापाने लिप्त होत नाही व त्याला सुखोपभोग आणि मुक्ति मिळतात.
जगज्जैत्रेकमन्त्रेण – जगज्जेत्रा + एकमन्त्रेण जग जिंकणाऱ्या एका मंत्राने, रामनाम्नाभिरक्षितम् – रामनाम्ना + अभिरक्षितम् – रामनामाने सर्व बाजूंनी रक्षण होते 🚩 अर्थ – सर्व जग जिंकणाऱ्या या रामनामरूपी एका मंत्राने मनुष्याचे सर्व बाजूंनी रक्षण होते. जो हा मंत्र कंठात धारण करतो (पाठ करतो) त्याच्या हातात सर्व सिद्धी येतात.
वज्रपञ्जरनामेदमं यो रामकवचं स्मरेत् ।
अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् ॥ १४ ॥
अव्याहताज्ञः – म्हणजे त्याची आज्ञा कधीही मोडली जात नाही असा 🚩 अर्थ – हे कवच वज्राचा पिंजऱ्यासारखे अत्यंत संरक्षक असल्याने याला वज्रपंजर असे नाव आहे. ह्या कवचाचे जो नित्य स्मरण करतो त्याची आज्ञा अबाधित राहते आणि त्याला सर्वत्र मंगलमय विजय मिळतो
आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।
तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥ १५ ॥
🚩 अर्थ – भगवान शंकरांनी ज्याप्रमाणे स्वप्नात येऊन ही रामरक्षा सांगितली त्याप्रमाणे सकाळी उठून बुधकौशिक ऋषींनी ती लिहिली.
आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् ।
अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः ॥ १६ ॥
🚩 आरामः – बाग, वन, विरामः – शेवट करणारा, सकलापदाम् – सकल + आपदाम् – म्हणजे सर्व दु:खसंकटांचा, अभिरामस्त्रिलोकानां – अभिराम: + त्रिलोकानां – तिन्ही लोकांना आवडणारा, श्रीमान् – श्रीमंत, स नः प्रभुः – तो आमचा देव आहे यापुढील (२०व्या श्लोकापर्यंतचे)वर्णन श्रीराम व लक्ष्मण या दोघांचे आहे.
फलमूलाशिनौ – फल + मूल + अशिनौ, म्हणजे फळे व कंदमुळे भक्षण करून राहणारे, दान्तौ – इंद्रिये दमन करणारे, जितेंद्रिय अर्थ – फळे व कंदमुळे भक्षण करून राहणारे, जितेंद्रिय, तपस्वी, ब्रह्मचारी असे हे दशरथाचे दोन पुत्र व एकमेकांचे भाऊ म्हणजे राम व लक्ष्मण.
शरण्यौ सर्वसत्वानां – सत्त्व म्हणजे प्राणी. याचा अर्थ सर्व प्राण्यांचे आश्रयस्थान 🚩 अर्थ- सर्व प्राण्यांचे आश्रयस्थान असलेले, सर्व धनुर्धारी योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ, राक्षसांच्या कुळांचा वध करणारे रघुकुळातले श्रेष्ठ वीर, म्हणजे राम व लक्ष्मण, आमचे रक्षण करोत.
आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ – आत्तसज्जधनुषौ + ईषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ, पैकी आत्तसज्जधनुषौ – आत्त + सज्ज + धनुषौ + ईषुस्पृशौ यातील आत्त- धारण केलेले, ईषुस्पृशौ – ईषु म्हणजे बाण, बाण लावून सज्ज केलेले धनुष्य धारण केलेले (रामलक्ष्मण) असा एकूण अर्थ आणि अक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ – अक्षय + आशुग + निषङ्ग + सङ्गिनौ, यातील अक्षय – म्हणजे कधीही न संपणारा, आशुग – पुढे जाणारा बाण, निषङ्ग – भाता, सङ्गिनौ – जवळ असलेले, रामलक्ष्मणावग्रतः- रामलक्ष्मणौ + अग्रतः , अग्रतः= पुढे 🚩 अर्थ – बाण लावून सज्ज केलेले धनुष्य धारण केलेले तसेच पुढे जाणाऱ्या बाणांचा कधीही न संपणारा अक्षय भाता जवळ असलेले(श्रीराम व लक्ष्मण) माझ्या रक्षणाकरता मार्गामध्ये नेहमी माझापुढे चालोत.
संनद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।
गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥ २१ ॥
संनद्धः – निरंतर सज्ज, कवची – चिलखत घातलेला, 🚩 अर्थ – चिलखत घातलेल्या व धनुष्य, बाण व तलवार यांनी निरंतर सज्ज असलेल्या तरूण श्रीरामामुळे आमचे मनोरथ सिद्धीस जावोत आणी लक्ष्मणासह श्रीराम आमचे रक्षण करोत.
काकुत्स्थः – ककुत्स्थ हे श्रीरामांच्या कुळाच्या मूळ पुरुषाचे नाव. त्याच्या कुळात जन्म झाला म्हणून श्रीराम काकुत्स्थ. 🚩 अर्थ – दशरथपुत्र श्रीराम शूर आहे, लक्ष्मणासारखा बलवान मनुष्यही ज्याच्या पावलावर पाऊल ठेऊन चालतो असा (महान) आहे. ककुत्स्थ कुळातला हा पूर्ण पुरुष असलेला कौसल्येचा पुत्र रघुकुळात श्रेष्ठ आहे.
वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः ।
जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥ २३ ॥
🚩 अर्थ – वेदान्तवेद्यो – वेदांत हे ज्याला जाणून घ्यायचे साधन आहे असा, पुराणपुरुषोत्तमः – सनातन पुरुष, जानकीवल्लभः – सीतेचा पति, श्रीमानप्रमेयपराक्रमः – श्रीमान् + अप्रमेय + पराक्रमः, अप्रमेय – ज्याच्या पराक्रमाची मोजदाद करता येत नाही असा (पराक्रमीइत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः ।)
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥ २४ ॥ 🚩 अर्थ – ह्या स्तोत्राचा जप जे माझे भक्त श्रद्धायुक्त मनाने करतील त्यांना अश्वमेध यज्ञापेक्षाही जास्त पुण्य प्राप्त होईल यात शंका नाही.
रामंदूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् ।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः ॥ २५ ॥
🚩 अर्थ – दूर्वादलासारखे सावळ्या वर्णाच्या, कमळासारखे डोळे असलेल्या, पिवळे वस्त्र परिधान केलेल्या (अशा) श्रीरामांचे दिव्य नाव घेऊन जे स्तुति करतात ते पुरुष संसाराच्या/ जन्ममरणाच्या जाळ्यातून मुक्त होतात.
🚩 २६ व २७ श्लोकांचा एकत्र अर्थ -श्रीराम लक्ष्मणाग्रज, रघुकुळातले श्रेष्ठ, सीतेचे पती, व सुंदर आहेत. तसेच ककुत्स्थ कुळातले, करूणेचे सागर, गुणांचा खजिना, ब्राह्मणांना प्रिय असलेले व धार्मिक आहेत. राजांमध्ये श्रेष्ठ, सत्याशी कायम जोडलेले, दशरथपुत्र, सावळे व शांततेची मूर्ती आहेत. लोकांना प्रिय असणाऱ्या, रघुकुळात तिलकाप्रमाणे शोभणाऱ्या, रावणाच्या शत्रू आहेत. अशा (गुणांनी युक्त) श्रीरामांना मी वंदन करतो.
🚩 अर्थ – लोकांना प्रिय असलेल्या, रणांगणावर धीरगंभीर असलेल्या, कमळाप्रमाने नेत्र असलेल्या, रघुवंशात श्रेष्ठ असलेल्या, कारुण्याची मूर्ति असलेल्या, दया करणाऱ्या अशा श्रीरामांना मी वंदन करतो.
🚩 अर्थ – मनाप्रमाणे, वाऱ्यासारखा वेग असलेल्या, जितेंद्रिय, बुद्धिमान लोकांमध्ये श्रेष्ठ, पवनपुत्र, वानरांच्या सेनेचा मुख्य असलेल्या (हनुमानाला) मी शरण आहे.
आपदामपहर्तारं – आपदाम् + अपहर्तारं – दु:खसंकटांचा नाश करणाऱ्या, भूयो भूयो – पुनः पुनः 🚩 अर्थ – दु:खसंकटांचा नाश करणाऱ्या, सुखसमृद्धी देणाऱ्या, लोकांना प्रिय असणाऱ्या श्रीरामांना मी पुनः पुनः नमन करतो.
🚩 अर्थ – (या आणि पुढच्या श्लोकात राम शब्दाच्या सातही विभक्ति वापरलेल्या आहेत). राजांमध्ये श्रेष्ठ रामाचा सदा विजय होतो. मी रामाला, रमेशाला म्हणजेच रमेच्या पतीला- विष्णुला भजतो. रामाने राक्षसांचे समुदाय नष्ट केले. त्या रामाला वंदन असो.
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् ।
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥३९ ॥
🚩 अर्थ – रामापेक्षा अधिक कुशल कोणी नाही. मी रामाचा दास आहे. रामामध्ये माझा चित्तवृत्तीचा लय होवो आणि हे राम माझा उद्धार कर.
वरानने – सुवदने, 🚩 अर्थ – (शंकर पार्वतीला सांगतात) हे सुमुखी, मनाला आनंद देणाऱ्या रामाच्या ठिकाणी मी रममाण होतो. रामाचे एक नाव (विष्णूच्या) हजार नावांच्या बरोबरीचे आहे.
🚩 अर्थ – श्रीबुधकौशिकऋषींनी रचलेले श्रीरामरक्षा नावाचे स्तोत्र इथे संपले. ॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥ 🚩 अर्थ – हे स्तोत्र श्रीराम व सीतेला अर्पण असो.
आज आपण युरोपमधील सौर दिनदर्शिका पद्धतीचा उगम वा मूळ स्त्रोत या बाबत थोडक्यात रंजक माहिती आपण बघणार आहोत.
‘कालांतर’ हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे. ज्याप्रमाणे “एका कालखंडातून दुसऱ्या कालखंडात होणाऱ्या संक्रमणाला” ‘कालांतर’ असे संबोधले जाते, त्याचप्रमाणे काळाच्या ओघात घडणाऱ्या बदलांच्या आकलनालाही ‘कालांतर’ असेच म्हटले जाते.
जेव्हा भारताचे खगोलशास्त्रीय ज्ञान अरेबिया मार्गे युरोपातील राष्ट्रांपर्यंत, जसे की ग्रीस आणि रोमपर्यंत पोहोचले, तेव्हा त्याच्या उच्चाराबाबत काही अडचणी निर्माण झाल्या.
युरोपातील अनेक प्रदेशांमधील भाषांमध्ये, ‘त’, ‘ट’ आणि ‘ड’ या अक्षरांना अनुरूप असलेले ध्वनी (उच्चार) अस्तित्वातच नाहीत. परिणामी, त्यांना हे विशिष्ट ध्वनी उच्चारणे शक्य होत नाही. जेव्हा आपण हा शब्द उच्चारतो, तेव्हा त्यांना ‘कालांतर’ हा शब्द अगदी अचूकपणे ऐकू येतो; परंतु जेव्हा ते स्वतः तो उच्चारण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तो शब्द अपरिहार्यपणे Kalandar असा ऐकू येतो. याचे कारण वरील अक्षरांच्या जागी, त्यांना केवळ ‘d’ हाच ध्वनी उच्चारणे शक्य असते. अशा प्रकारे, Kalandar या संज्ञेने युरोपातील विविध भाषिक प्रदेशांमधून आपला प्रवास होत असतानांच तिच्यात काही किरकोळ बदलही होत गेले. ज्यामुळे कालांतराने या संज्ञेचे रूपांतर होऊन त्यातून ‘Calendar’ हा शब्द निर्माण झाला.
किरकोळ बदलांच्या एका टप्प्याटप्प्याने चालणाऱ्या प्रक्रियेद्वारे, कालांतराने त्याचे रूपांतर ‘दिनदर्शिके’ मध्ये झाले. युरोपीय दिनदर्शिका केवळ सूर्याच्या गतीवर आधारित असलेल्या गणितीय तत्त्वावर चालतात. म्हणूनच, खगोलशास्त्रीय परिभाषेत त्यांना ‘सौर दिनदर्शिका’ असे संबोधले जाते.
इ.स.पू. ७१६ ते ६७३ या कालावधीत, रोमन सम्राट नुमा पॉम्पिलियस याने ‘जानेवारी’ आणि ‘फेब्रुवारी’ हे दोन नवीन महिने सुरू केले. त्या वेळी, त्याने जानेवारीला वर्षाचा पहिला महिना आणि फेब्रुवारीला बारावा महिना म्हणून निश्चित केले. पुढे, इ.स.पू. १५३ मध्ये या पद्धतीत सुधारणा करण्यात आली आणि फेब्रुवारीची गणना वर्षाचा दुसरा महिना म्हणून केली जाऊ लागली. परिणामी, मूळच्या भारतीय महिन्यांचा दहा महिन्यांचा क्रम बदलला आणि ते तिसऱ्या स्थानापासून ते बाराव्या स्थानापर्यंत सरकले. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर—जे महिने यापूर्वी अनुक्रमे सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर होते, ते आता नवव्या, दहाव्या, अकराव्या आणि बाराव्या स्थानावर ढकलले गेले.
काळाच्या ओघात महिन्यांची नावेही विविध देव, देवी आणि राजांच्या नावावरून ठेवण्यात आली.
January : हे नाव ‘Janus’ या देवावरून घेण्यात आले.
February : हे नाव ‘Februa’ या देवीवरून ठेवण्यात आले.
March : हे नाव प्राचीन रोमन युद्धाची देवता Mars या देवीवरून ठेवण्यात आले.
April : हे नाव Aperio (बहरणे/फुलणे) या शब्दावरून व्युत्पन्न झाले.
May : हे नाव ज्या महिन्यात वनस्पती बहरतात, म्हणजेच वाढीचा ऋतू—त्या महिन्याला ‘May’ असे नाव देण्यात आले; हे नाव Mag (वाढणे) या शब्दावरून आले आहे.
June : हे नाव ‘Juno’ या देवी वरून घेण्यात आले;
July : हे नाव ज्या महिन्यात ज्युलियस सीझरचा जन्म झाला, त्या महिन्याचे नाव बदलून ‘July’ असे झाले.
August : हे नाव ऑगस्टस सीझरच्या नावावरून ठेवण्यात आले.
काही मूळ संस्कृत संज्ञा मात्र युरोपीय दिनदर्शिकेत कोणत्याही बदलाशिवाय तशाच राहिल्या.
सप्टेंबर : (सप्तम + अंबर),
ऑक्टोबर : (अष्टम + अंबर),
नोव्हेंबर : (नवम + अंबर)
डिसेंबर : (दशम + अंबर)
धन्य ते आपले पुर्वज ! त्यांच्या अगाध ज्ञानाला त्रिवार वंदन !!!
भारतीय संस्कृतीचा वर्षातील शेवटचा महिना अर्थात फाल्गुन महिना. आज फाल्गुनी पौर्णिमा.. हुताशनी पौर्णिमा. सगळ्या सणामागे विशिष्ट उद्देश असतो.. हे सण आनंद देतात पण आजच्या या सणाची गोष्टच आगळी. लहान थोर सगळेच याची वर्षभर वाट बघतात. फाल्गुन पौर्णिमेला केसरीया रंगाच्या बहरलेल्या पळस फुलानें निसर्ग सौंदर्य आणखी खुललेय. त्याचा मनसोक्त आनंद आज लुटला जाणार. हिवाळ्यातील थंडीला दूर सारणारी आज होळी. महाराष्ट्रात घरोघरी छोट्या होळीचा होम करुन विधीवत पूजन करुन पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जाणार. निसर्गात पसरलेल्या रोगट जीवजंतूंचे या होळीत दहन होणार. जेव्हा असुरी शक्तीचे निर्दालन होते तेव्हाच आनंद निर्माण होतो. असुरी प्रवृत्तीत असलेला अहंकार नातेही विसरतो. हिरण्यकश्यपूचे असेच झाले. हिरण्याक्ष हा असुर त्याचा भाऊ होता. त्याने पृथ्वीवर संकट आणल्याने त्या असुराला भगवान विष्णूनी वराह अवतार धारण करून संपवून पृथ्वीचे रक्षण केले. भगवान विष्णूविषयी हिरण्यकश्यपूच्या मनात हा राग होता. हिरण्यकश्यपूने ब्रम्हदेवाची भक्ती करून अनेक वर प्राप्त केले. तो दैत्यांचा राजा झाला होता. त्याने आपल्या राज्यात देवतांचे नावही घेण्यावर बंदी घातली. पण पुत्र प्रल्हाद हा विष्णू भक्त. या पुत्राला भक्तीपासून थांबविण्यासाठी खूप प्रयत्न केले. सगळे प्रयत्न संपले तेव्हा त्याने आपली बहिण होलीकेच्या मांडीवर आपल्या मुलाला.. विष्णूभक्त प्रल्हादाला बसवून होळीत दहन करण्याचे त्याने ठरविले. होलिकेला अग्नीपासून अभय होते. हे लोकांना कळताच लोकांनी घरोघर अग्नीपूजन करुन होलिकेला प्रल्हादाला वाचविण्याची गळ घातली. तिने अग्नी ज्वाळातून सद्प्रवृत्तीच्या प्रभूनिष्ठ प्रल्हादाला सुखरुप ठेवले. याचे स्मरण म्हणून होलिका दहन. यामध्ये राग.. व्देष.. मत्सर.. अहंकार या असुरांचे.. शत्रूचे दहन करायचे. मग जीवन आनंदीच. असुरीशक्तीचे दहन करुन प्रभूनिष्ठांचे रक्षण करते ती होलिकादेवी. या होळीत शत्रूभावना संपली की मग अग्निपरिक्षेतून सुखरुप बाहेर पडता येते. या शिमगा सणाला देव माझ्या घरी येणार हा प्रत्येकाला आनंद. असुरी शक्तीवर विजय मिळणार.. भगवंत भक्तांचे रक्षण होणार हा विश्वास देणारा हा सण. प्रदूषण हे विचारांचेही असते जे असुरी शक्तीना बळ देते. असुरी विचारांचे दहन करत आनंदाने संपन्न होणारी ही होळी…
साधारण वर्षभरापूर्वी मुलीच्या विवाहयोग गेली 4 वर्षे येत नव्हता, त्यासाठी कुंडली मार्गदर्शन साठी माझेकडे आले होते. त्यांना फेब्रुवारी 2026 पर्यंत विवाह ठरेल असे सांगितले होते. त्यांचा मुलीचे लग्न ठरल्याचा व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलेला मेसेज शेअर करत आहे.
मा. अजितदादा पवार यांना सर्व प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली
मा. अजितदादा पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी देवळाली येथे झाला.
जन्मवेळ ही बरेचदा 12 ही प्रसिद्ध व्यक्तींसाठी घेतलेली असते. त्यामुळे जन्मलग्न हे चुकीचे घेतले जाऊ शकते. त्यामुळे मी आज वेगळ्या पद्धतीने त्यांचे अकस्मिक जाण्याचे उत्तर मिळते का, याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न करणार आहे. हे कोणतेही भाकित नाही. माझ्या अल्प ज्ञानाप्रमाणे उत्तर शोधण्याचा केलेला एक प्रयत्न आहे. त्यामुळे ज्यांना हा प्रयत्न रुचत नसेल, त्यांनी लक्ष देऊ नये. आणि विनाकारण त्यांचा वेळ नकारात्मक लिहिण्यात घालवू नये ही नम्र विनंती .
त्यांचा जन्मचंद्र रास कुंभ येत असून धनिष्ठा या मंगळाच्या नक्षत्रात झाला आहे.
नक्षत्र गोचरी प्रमाणे 3 रे नक्षत्र विपत्ती कारक 5 वे प्रयाण व 7 वे वध कारक नक्षत्र मानले जाते.
म्हणजेच गुरु विपत, बुध प्रयाण व शुक्र वध कारक ठरतील.
अजित दादा यांचे निधन 28 जानेवारी, 2026 रोजी सकाळी 8.45 वाजता बारामती येथे विमान अपघातात झाले.
या वेळेची कुंडली मांडली तर लक्षात येईल.
कुंभ लग्न असून चंद्र रवीच्या नक्षत्रात शुक्राच्या उपनक्षत्रात आहे.
विपत कारक गुरु निधन वेळेच्या कुंडलीत मारकेश असून वध कारक शुक्र बाधकेश आहे व प्रयाण कारक बुध अष्टमेश आहे.
शुक्र आणि बुध मंगळ, रवी, प्लूटो या अग्नी व स्फोटक परिस्थिती सूचक ग्रहांच्या युतीत व्ययात असून मंगळ तृतीयेश आहे व रवी मारकेश आहे.
3 9 12 या स्थानाचा मारक, बाधक व अष्टम स्थानाशी संबंध व या सर्वांचा नक्षत्र गोचर प्रमाणे 3,5,7 या नक्षत्र स्वामींचा संबंध प्रवासातील अपघात, स्फोटक परिस्थिती व अनिष्ट मृत्यू दर्शवतो.
अजूनही खूप गोष्टी वेगवेगवेगळ्या पद्धतीने नोंद केल्या आहेत. परंतु नक्षत्र गोचर डोळ्यासमोर ठेवून हा एक छोटासा प्रयत्न केला आहे.