Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

कोणत्या रंगाची उधळण करेल तुमच्या प्रेमास व आयुष्याच्या जोडीदारास तुमच्याकडे आकर्षित 🥰


रंग काय आणि किती लावायचा, जो आज आहे तर उद्या निघून जाईल. लावायचा आहे तर असा जीव लावा, जो आयुष्यभर राहील…

होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी च्या सर्वांना शूभेच्छा…


रंगपंचमी च्या निमित्ताने जरा माझ्या मेंदूने ज्योतिष शास्त्रानुसार पंचमेष जो प्रेमाचा कारक आहे व सप्तमेष जो आयुष्याच्या जोडीदाराचा कारक आहे. त्यांचे फळ देणारे रंग तुम्हाला खेळायला सुचवून प्रेम पंचमी चे मिश्किल रंग उधळले आहेत. तर मग बघा खेळून तुमचा प्रेमाचा रंग कायमचा आहे का ते 😊

अनु क्र.लग्न रासउधळणखेळायचा रंग
मेषमेष वाले सोनेरी, लाल, चंदेरी रंग लावा आणि बघा कदाचित तुमची प्रेमिका/ आयुष्याची जोडीदार तुम्हाला काही संकेत देते का ते. 🤪सोनेरी, लाल, चंदेरी रंग
वृषभवृषभ वाले तुम्ही मात्र हिरवा आणि लाल रंगाची उधळण करा आणि बघा बरं तुम्हाला तुमची संभाव्य प्रेमिका/जोडीदार ग्रीन सिग्नल देते का ते. 🤪हिरवा आणि लाल रंग
मिथुनमिथुन वाले तुम्ही चंदेरी आणि पिवळा, रंग खेळा आणि बघा तुमची प्रेमिका/जोडीदार गोड कटाक्ष टाकतेय का 🤪चंदेरी आणि पिवळा रंग
कर्ककर्क वाले तुम्ही मात्र लाल व गडद जांभळ्या रंगाचा वर्षाव करा आणि पहा तुमची संभाव्य प्रेमिका/जोडीदार तुम्हाला आनंदाने चिंब करतेय का 🤪लाल व गडद जांभळा रंग
सिंहसिंह राशी वाले तुम्ही पिवळा आणि गडद जांभळा रंग खेळा आणि बघा तुमची संभाव्य प्रेमिका/जोडीदार आयुष्यात रंगत आणते का 🤪पिवळा आणि गडद जांभळा रंग
कन्याकन्या वाले तुम्ही गडद जांभळा व पिवळा रंग खेळा आणि बघा तुमची संभाव्य प्रेमिका/जोडीदार आकर्षिला जातो आहे का. 🤪गडद जांभळा व पिवळा रंग
तूळतूळ वाले तुम्ही गडद जांभळा आणि लाल रंग खेळा आणि बघा तुमची संभाव्य प्रेमिका/जोडीदार प्रेमाचे माप तुमच्या पारड्यात टाकते का 🤪गडद जांभळा आणि लाल रंग
वृश्चिकवृश्चिक वाले तुम्ही पिवळा आणि चंदेरी रंग खेळून बघा तुमची संभाव्य प्रेमिका/जोडीदार तुमच्यावर आसक्त होते का 🤪पिवळा आणि चंदेरी रंग
धनुधनु वाले तुम्ही लाल व हिरवा रंग हातात धरून नेम धरा आणि बघा तुमची संभाव्य प्रेमिका/जोडीदार तुमच्या टप्प्यात येतेय का 🤪लाल व हिरवा रंग
१०मकरमकर वाले तुम्ही चंदेरी रंग घेऊन शुभ्र कुर्ती घालून तुमची संभाव्य प्रेमिका/जोडीदार गाठून रंग खेळा आणि बघा तुमचे प्रेम चमचमतेय का ते 🤪चंदेरी रंग
११कुंभकुंभ वाल्यानो तुम्ही हिरव्या आणि सोनेरी रंगाचे हंडे तयार ठेवा आणि बघा तुमची संभाव्य प्रेमिका/जोडीदार तुम्हाला प्रेमाने भिजवतेय का 🤪हिरवा आणि सोनेरी रंग
१२मीनमीन वाले तुम्ही चंदेरी आणि हिरवा रंगाने तुमची संभाव्य प्रेमिका/जोडीदार भिजवा आणि बघा त्यांच्या प्रेम भावना उचंबळून येतात का 🤪चंदेरी आणि हिरवा रंग

ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

कोणती लग्न रास उदित असताना कॊणती कामे करणे मुहुर्तानुसार ठरते फ़ायदेशीर


गधड्या अभ्यास करण्यासाठी मुहुर्त लागतोय की नाही पासून, अहो ऐकलत का? गुरुजींना भेटून लेकीच्या लग्नासाठी येत्या मे मधे काही चांगले मुहुर्त पाहून या…इथपर्यंत मुहुर्त या शब्दाचा बोलबाला आहे. आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यासाठी मग ते एखादे नवीन काम, उद्घाटन, विवाह, मुंज, सण, उत्सव, प्रतिस्थापना असो वा प्रवास करायचा असो आपल्याकडे मुहुर्त बघण्याची प्रथा आहे.

मुहुर्त शास्त्र हे फ़लज्योतिष शास्त्रातील एक महत्त्वाचे अंग मानले जाते. ऋग्वेदामधे देखील मुहुर्ताचा उल्लेख आढळतो. वैदिक पद्धतीनुसार पंचांगातील वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण या पाच अंगांच्या आधारावर मुहूर्त काढला जातो. मुहुर्त याचा अर्थ ठराविक थोडा काळ असा आहे. शुभ कार्यासाठी योग्य असणारा काळ यास ही मुहुर्त संबोधले जाते. दिवसाच्या पंधराव्या भागास मुहूर्त म्हणतात. रात्रीचे ही तेवढेच मुहूर्त असतात.

२ घटिकांचा एक मुहुर्त मानला जातो.
मुहुर्ताचे अनेक प्रकार व नावे आहेत.
१. सूर्योदयापासून ६ घटिका – प्रातःकाळ
२. त्यानंतरचे ६ घटिका – संगवकाळ (गाईंना व वासरांना एकत्र आणून दूध प्राशन व चरायला नेण्याचा काळ.)
३. त्यानंतरचे ६ घटिका – मध्यान्हकाळ
४. त्यानंतरचे ६ घटिका – अपराण्हकाळ – ( श्राद्धासाठी महत्त्वाचा काळ.)
५. त्यानंतरचे ६ घटिका – सायंकाळ -हा कोणत्याही कामांस फ़ारसा प्रशस्त मानला जात नाही.

कामे काही विशिष्ट नक्षत्रांवर. तिथीवर, करणावर वा मुहुर्तावर केली तर त्या ग्रह देवतेच्या आशिर्वादाने कार्यसिद्धी होते, अशी समजूत आहे.
एखादे कार्य करण्याला योग्य असा काळ वा मुहुर्ताला ग्रह, बारा भाव (कुंडलीतील १२ स्थाने) आणि राशी यांची माहिती असणे आवश्यक असते.
कृष्णमूर्ती पद्धतीनुसार कोणतेही कार्य वा घटनेविषयी जाणून घेताना भावारंभावर जास्त लक्ष द्यावे लागते.
मुहुर्त या विषयावर बरेच काही लिहिण्यासारखे आहे. पण जास्त खोलात न जाता कार्य करताना कोणते लग्न उदित आहे यानुसार वेळ ठरवण्यासाठी एक सोपा तक्ता देत आहे. त्यानुसार आपण कामांस सुरुवात केली तर कार्यसिद्धी साठी सहाय्यक ठरेल. लग्न वा लग्न रास म्हणजे कार्याच्या त्या विशिष्ट वेळी कोणती रास पूर्व दिशेला उगम पावली आहे ती रास. या काळाचा भावारंभ गाठता आला तर सर्वोत्तम सहाय्यकारी ठरेल.

कोणती लग्न रास उदित असताना कॊणती कामे करणे मुहुर्तानुसार ठरते फ़ायदेशीर याचा तक्ता

अनु.क्र.लग्न रासकॊणती कामे करणे मुहुर्तानुसार ठरते फ़ायदेशीर
१.मेष चर कार्य. प्रवास, यात्रा, नविन वस्त्र नेसणे, नविन अलंकार धारण करणे, जमीन खणणे, सुलेनामा करणे, साहसी व धाडसाची कामे ई.
२.वृषभस्थिर कार्य. शेतीची, विहिरीची, बागायती कामे करणे, जनावर खरेदी वा विक्री. विवाह, मंगल कार्य, गृह प्रवेश, नवीन दुकान उद्घाटन करणे ई.
३.मिथुनसर्व शुभ कार्य, विवाह, अधिकार ग्रहण, विज्ञान कार्ये, शिल्प, कला, युध्द, ई.
४.कर्कविहिरीची कामे, लेखन करणे, शांतीकार्य, ई.
५.सिंहस्थिर कार्ये. वस्तुची खरेदी, दुकान उदघाटन, अलंकार बनविणे, नोकरीवर रुजु होणे, सर्व शुभ कार्ये, ई.
६.कन्याचर स्थिर कार्ये, विद्यारंभ, औषधी तयार करणे, विवाहादी सर्व मंगल कार्ये, ई.
७.तुळशेतीकाम, पशुपालन, यात्रा, व्यापार, विवाह मौंजी, ई.
८.वृश्चिकस्थिर कार्य, अधिकारग्रहण करणे. नोकरीवर रुजु होणे, ई.
९.धनुविवाह, मौजी, जनावर खरेदी वा विक्री, शुभ कार्ये ई.
१०.मकरशेतीची कामे, जनावर खरेदी वा विक्री, शुभ कार्ये ई.
११.कुंभशेती, व्यापार, जल पर्यटन. ई.
१२.मीनविवाह मौजी. वस्त्र व अलंकार बनविणे व धारण करणे. अधिकार ग्रहण करणे. सरकारी कामे. ई.

टीप : अधिक खोल तपशीलासाठी व मुहुर्तासाठी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.

ज्योतिष मित्र मिलिंद ( jyotish mitra milind )

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

गर्भधारणा ते प्रसूती काळातील ग्रहांचा प्रभाव


तुम्हाला म्हणून सांगते, अजून बोलले नाहीय कोणाला, पण लवकरच मी एका बाळाची आई होणार आहे असे ती माऊली लाजत सांगत असते, नवरोजी मिशीला पीळ मारत किंवा गोड हसताना लवकरच बाबा होणार असल्याची प्रौढी चेहऱ्यावर झळकत असते. आजी आजोबा नातवंडे खेळवायला मिळणार म्हणून खुशीत असतात व अनुभवाचे सल्ले द्यायला तत्पर असतात.
घरात बाळाच्या जन्माची नुसती चाहूल लागताच आनंदी आनंद पसरतो.
थोडा आनंद, थोडी उत्सुकता, थोडी भीती, थोडी हुरहूर असा हा काळ.
तर असा हा ९ महिन्यांवरचा काळ बाळ प्रत्यक्षात आकार घेत असताना आईच्या जन्मकुंडली नुसार कोणत्या ग्रहाचा प्रभाव असतो व एखादा ग्रह कमजोर व अशुभ आढळल्यास, काही दोष वा कमतरता निदर्शनास आल्यास वा या काळात दशा वा गोचर ग्रह अनुसार कोणत्या ग्रहाचे उपाय सहाय्यभूत ठरतात या साठी हा लेख प्रपंच…

गर्भधारणा ते प्रसूती काळातील ग्रहांचा प्रभाव

अनु. क्र.महिना काळगर्भाची अवस्थाग्रह प्रभावग्रह उपाय
28 दिवसांचा १ला महिना,फलित समगमा नंतरचा लगेच चा काळ. शुक्राणू आणि बीजांड यांचे मिलन होऊन गर्भ राहतो. भ्रूणातील अतिशय उच्च क्रियाकलापाचा काळ जिथे पेशी नवीन शरीर म्हणून नियुक्त असलेल्या गर्भाशयात स्थिर होण्याचा काळ. कार्य अद्याप निश्चित न झालेल्या द्रवरूप प्रारंभिक पेशीद्वारे अनेक प्रकारच्या पेशींना जन्म देण्याचा काळ.शुक्रशुक्राच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे
28 दिवसांचा २रा महिनाशरीराच्या पेशी कडक होण्याचा काळ. एक पेशी विभाजित होऊन अनेक पेशी तयार व ठराविक कार्यासाठी विकसित होण्याचा काळ. यकृतासाठी नियुक्त केलेल्या पेशी स्नायू बनण्यासाठी कार्य करू शकत नाहीत. शरीराचा आकार स्पष्ट होणे.मंगळमंगळाच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे
28 दिवसांचा ३रा महिनाजलद विकासाचा काळ. गर्भाच्या शरीराचा आकार अधिक ठळक. गर्भ जागृत होऊन आई/वडिलांना योग्य प्रतिसाद देणे. गुरूगुरूच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे
28 दिवसांचा ४था महिनाबाळाच्या बुद्धिमत्तेचा विकास आत्म्याची शक्ती स्थापित होते. शरीराची ताकद वाढते, हाडे आणि स्नायूंची रचना तयार होऊ लागते. सूर्यसूर्याच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे. ग्रहण वा अमावस्या दिवशी काळजी घ्या.
28 दिवसांचा ५वा महिनागर्भाची रक्ताभिसरण यंत्रणा कार्यरत. रक्त आणि रक्तपेशी कार्यरत. रोगप्रतिकारक शक्ती चा विकास. भावनिक जाणिवेची निर्मिती व व्यक्त करणे. मन आणि भावना ची जडण घडण चंद्रचंद्राच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे. ग्रहण व अमावस्या दिवशी काळजी घ्या.
28 दिवसांचा ६वा महिनाशरीराची हाडे, नसा आणि आधार देणारी शरीराची बनावट, केस आणि नखे यांची वाढ. मुलाची सहनशक्ती कमी होते. शनीशनीच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे
28 दिवसांचा ७वा महिनाबाळाची विचारशक्ती, मज्जासंस्था आणि मेंदू विकासाचा महत्वाचा टप्पा. स्वतःच्या गर्भाच्या शरीराची आणि त्याच्या आई आणि बाह्य वातावरणाकडून प्राप्त होणारे संकेत स्पष्टपणे माहित होतात. बुद्धिमत्ता आणि जागरूकता महत्त्वपूर्ण टप्प्यावर.बुधबुधाच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे
28 दिवसांचा ८वा महिनासंवेदनशील काळ ज्यात संपूर्ण व्यक्तिमत्व ठरते. मातेच्या सकारात्मक व आनंद लहरी गर्भास प्रक्षेपित करण्याचा काळआईच्या कुंडलीतील लग्न राशीचा स्वामीआईच्या कुंडलीतील लग्न राशीचा स्वामीच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे
२८ दिवसांचा ९वा महिनागर्भाला स्वतःच्या शरीराची समज आणि नियंत्रण प्राप्ती.भूक आणि तहान याची जाणीव. प्रसूतीच्या तयारीत शरीराची रचना अंतिम टप्प्या कडे वाटचाल करण्यास सुरुवात.सूर्यसूर्याच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे
१०२८ दिवसांचा १०वा महिनाप्रसूती आधीचा शेवटचा टप्पा. बाळाचे मन आणि भावना सक्रिय आणि प्रसूतीसाठी मानसिकदृष्ट्या तयार चंद्रचंद्राच्या बीज मंत्राचे पठण किंवा इतर अनुभविक तोडगे

अशाप्रकारे २८० दिवसांच्या या अविरत क्रिया प्रक्रियांनंतर बाळाचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगात प्रवेश होतो आणि त्याच्या जन्मवेळे नुसार त्याची स्वतः ची अशी भोग कुंडली अर्थात जन्मकुंडली तयार होते.

शुभं भवतु 🙏🏻

(टीप : एखादी उपाय योजना करण्यापूर्वी जाणकार ज्योतिष सल्ला अवश्य घ्यावा.)

ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

तीळा तीळा दार उघड….


तीळा तीळा दार उघड….

गालावरचा तीळ कसा खुलुन दिसतोय बघ…. तुझ्या हेतूबद्दल मला तीळ मात्र शंका नाही रे, पण जीव तीळ तीळ तुटतोय रे माझा…. तीळ गूळ घे आणि गोड बोल…. तीळा तीळा दार उघड….

तर असा हा तीळ सर्वांच्या उत्सुकतेचा कायमच विषय राहिला आहे. बर तीळ हा असा प्रकार आहे की तो शरीरावर कुठेही असू शकतो व आयुष्यभर जन्म खूण म्हणून साथ देत राहतो. याचाच भाऊ आहे तो म्हणजे मस आणि चामखीळ. वेगवेगळ्या आकारात, वेगवेगळ्या रंगात हे सर्व आस्तित्वात असतात. कधी सौंदर्य खुलवतात. तर कधी सौंदर्यात बाधा उत्पन्न करतात. अशा या भावंडांवर तीळ ज्योतिष, सामुद्रिक शास्त्रात विपूल प्रमाणात लेखन, संशोधन झाले आहे. आणि या अशा तीळाभोवती अनेक समज, श्रद्धा वा अंधश्रद्धा एकवटलेल्या आहेत. एवढासा दिसणारा तीळ पूर्वायुष्यातील कर्मांचे परिणाम स्वरुप या जन्मातील काही भोग सूचित करत असतात असे मानले जाते. तीळ ज्योतिष शास्त्रानुसार गर्भधारणेपासून जन्म होईपर्यंत ग्रहस्थितीनुसार तीळ आपली जागा पक्की करत असतात. जर प्रभाव टाकणारे ग्रह, रास ई. स्त्री लिंगी असतील तर शरीराच्या डाव्या बाजूला तीळ उत्पन्न होतात व पुरुष प्रधान असतील तर शरीराच्या उजव्या बाजूला तीळ उत्पन्न होतात. तर हे तीळ जातकाचे व्यक्तिमत्व, स्वभाव, कर्म, भाग्य विशिष्ट परिस्थिती, सवय अशा अनेक गोष्टी प्रगट करत असतात.

चला तर मग पाहू यात कोठे असलेला तीळ आपणांस माहितीचा खजिना खुला करण्यासाठी कोणते दार उघडतो ते…
तीळ तीळ गोळा करुन संग्रहित केलेले अर्थ येथे देत आहे…. तीळा तीळा दार उघड !!!

ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)

अनु. क्र. तीळ कोठे आहेतीळाचा अर्थ
०१कपाळाच्या मध्यभागी तीळशहाणा आणि शांत स्वभावाचा, स्पष्ट वक्ता, अंतर्दृष्टी प्राप्त, कष्टाळू
०२ कपाळाच्या उजव्या बाजूला तीळश्रीमंती लाभेल, भाग्यवान व इतरांचे हीत पाहणारा
०३ कपाळाच्या डाव्या बाजूला तीळखडतर नशीब व स्वत:चे हीत पाहणारा
०४ कपाळाच्या दोन्ही बाजूला तीळआकस्मिक धन लाभ वा एखाद्या सुंदर कुंटुंबास प्राधान्य देणारा जोडीदार लाभेल
०५ भुवयांच्या मध्यभागी तीळनेतृत्व गुण संपंन्न व प्रसिद्धी, आर्थिक समृद्धीचा कारक
०६ भुवयांच्या डाव्या बाजूला तीळघाबरट व आयुष्यात, नोकरी व्यवसायात संघर्ष
०७ भुवयाच्या उजव्या बाजूला तीळसुखी वैवाहिक आयुष्य आणि निरोगी संतती
०८ उजव्या डोळ्यावर तीळ प्रामाणिक, मेहनती, विश्वासू, सकारात्मक वृत्ती
०९डाव्या डोळ्यावर तीळ गर्विष्ठ, नकारात्मक वृत्ती
१०नाकाच्या अग्रभागी तीळ आवेशपूर्ण वागणे आणि बेधडक निर्णय घेण्याचा स्वभाव
११नाकाच्या उजव्या बाजूला तीळकमी कष्टात जास्त धनप्राप्ती
१२ नाकाच्या डाव्या बाजूला तीळ कष्टाव्दारे धनप्राप्ती, संघर्ष
१३ नाकाखाली तीळ कामुकतेचे चुंबक, भिन्न लिंगी सहजपणे आकर्षित करणारे व्यक्तिमत्व.
१४ डाव्या गालावर तीळअंतर्मुख, तर्कट स्वभावाची, धनप्राप्ती होऊनही धनसंचय करण्यात अडचण
१५ उजव्या गालावर तीळवर्चस्व गाजवणारे व्यक्तिमत्व, तर्कशुद्ध मानसिकता, धनवृद्धी व योग्य विनिमय क्षमता
१६ कानावर तीळशौकीन व विलासी राहणीमानाची आवड
१७ कानाच्या शीर्षस्थानी तीळ बौद्धिक क्षमता जास्त
१८ ओठावर तीळवजन वाढ वा आरोग्यास हानिकारक खाण्याची अनियंत्रित सवय
१९खालच्या ओठावर तीळचवीची जाण व चवीने खाणारा
२०जिभेवर तीळआरोग्य आणि भाषणाशी संबंधित समस्या, शिक्षणात अडचणी
२१जिभेच्या टोकावरील तीळ मुत्सद्दी स्वभावाचा, परिस्थिती हाताळायची कला, व चवीची उत्तम जाण
२२हनुवटीवर तीळ प्रवासाची व नवनवीन ठिकाणे भेटीची आवड
२३हनुवटीच्या उजव्या बाजूला तीळमुत्सद्दी स्वभावाचा, विषयाची तर्कशूद्ध मांडणी करण्यात तरबेज
२४हनुवटीच्या डाव्या बाजूला तीळगुळमुळीत स्वभाव पण प्रामाणिक
२५मानेच्या पुढच्या बाजूला नशीबवान, शांत आणि कलात्मक आवाज
२६मानेच्या पाठीमागील बाजूला तीळस्वभावात आक्रमकता
२७डाव्या खांद्यावर तीळ हट्टी स्वभाव व भांडखोर
२८उजव्या खांद्यावर तीळ धैर्यवान, समंजस आणि शहाणा
२९डाव्या हातावर तीळविलासी जीवन जगण्याची इच्छा
३०कोपरावरील तीळ अस्थिर, चंचल स्वभाव, कलानिपून, श्रीमंत आणि प्रवास करायची आवड
३१मनगटावर तीळनाविन्यपूर्ण गोष्टी करणारा, सर्जनशील, चित्रकला किंवा लेखन कौशल्य
३२तळ हातावर तीळसंघर्ष, आव्हाने यांचा सामना
३३हाताच्या बोटावर तीळअविश्वासू, अतिशयोक्ती पूर्ण
३४बरगडीच्या उजव्या बाजूला तीळपडून इजा, मनात भीती
३५बरगडीच्या डाव्या बाजूला तीळसाधारण आयुष्य जगेल
३६पाठीच्या कण्याजवळ तीळयश, नेतृत्व आणि प्रसिद्धी
३७खांद्याच्या कुर्ची खाली तीळसतत चा संघर्ष
३८खांद्याच्या कुर्ची वर तीळअडचणींचा सामना करण्याचे धैर्य
३९खांद्याच्या उजव्या बाजूला तीळउत्तम आरोग्य
४०खांद्याच्या डाव्या बाजूला तीळमुत्सद्दी
४१छातीवर तीळकामुक वृत्ती
४२स्त्री च्या उजव्या स्तनावरील तीळव्यसनाकडे कल
४३पुरुषाच्या छातीच्या उजव्या बाजूला तीळआर्थिक अडचणी
४४छातीच्या डाव्या बाजूला तीळहुशार पण मित्र व कुटुंबीयांशी संबंध जोपासण्यात कमी
४५स्त्री च्या डाव्या स्तनावरील तीळशांत स्वभाव, मित्र व कुटुंबीयांशी चांगले संबंध
४६स्त्रीच्या नाभीभोवती तीळआनंदी वैवाहिक आयुष्य व संतती सौख्य
४७पुरुषाच्या नाभीच्या डाव्या बाजूला तीळसमृद्धी, प्रसिद्ध संतती
४८पोटावर तीळउत्साही
४९पोटावर उजव्या बाजूला तीळइर्षा, सोप्या मार्गाने कमाई,
५०दोन्ही नितंबांवर तीळआनंदी, प्रेमळ स्वभाव, निष्ठावान
५१उजव्या नितंबांवर तीळशहाणा व सर्जनशील
५२डाव्या नितंबांवर तीळअल्प समाधानी
५३जननेंद्रियावर तीळखुले मन, उदार, प्रामाणिक, समाधानी, आनंदी वैवाहिक सुख
५४उजव्या मांडीवर तीळनिर्भयी
५५डाव्या मांडीवर तीळकलात्मक पण आळशी व असामाजिक
५६डाव्या गुडघ्यावर तीळधोका पत्करायचा स्वभाव, उच्च जीवन शैलीची आवड
५७उजव्या गुडघ्यावर तीळप्रामाणिक, मित्रता व यशस्वी प्रेम जीवन
५८उजव्या पोटरी वर तीळयशस्वी आणि समृद्ध राजकारणाची आवड
५९डाव्या पोटरी वर तीळमेहनती, नोकरी व्यवसाय निमित्त प्रवास मोठा मित्र परिवार
६०पायावर तीळबेधडक कृती
६१उजव्या पायावर तीळयोग्य जोडीदार व कौटुंबिक सुख प्राप्त
६२डाव्या पायावर तीळआर्थिक वा कौटुंबिक समस्यांचा सामना
६३उजव्या घोट्यावर तीळदूरदृष्टी, बोलकी
६४डाव्या घोट्यावर तीळधार्मिक श्रद्धाळू
६५तळव्या वर तीळ आजारपण, गुप्त शत्रू.
६६पायाच्या बोटांवर तीळवैवाहिक वाद

टीप : फ़क्त तीळ पाहून प्रगतीला खीळ घालू नका. योग्य प्रगती मार्गासाठी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्या.

ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)

ग्रहांनुसार कडे वा ब्रेसलेट घालणे ठरते कोणांस फ़ायदेशीर?


ग्रहांनुसार कडे वा ब्रेसलेट घालणे ठरते कोणांस फ़ायदेशीर?

फॅशन हा या युगाचा परवली चा शब्द आहे. तशी फॅशन ही पूर्वापार चालत आलेली आहे फक्त थोडेफार स्वरूप बदलून परत येते एवढेच. पुरुष मंडळी सुद्धा यात मागे नाहीत बरे का.

अशीच एक गोष्ट पूर्वी फार प्रचलित होती. ते म्हणजे हातात धातूचे कडे घालणे. आज ही बरेच जणांना आवडत असेल, त्याची जागा ब्रेसलेट ने ही बरेच अंशी पटकावली आहे. असो.

फॅशन म्हणून कडे घालणे वेगळं आणि एखाद्या ग्रहावरील उपाय वा अनुकूलते साठी कडे हातात घालणे वेगळं.

हातात तांबे, पितळ, चांदी, सोने अथवा लोखंडाचे कडे कडे हातात दिसायला जरी चांगले दिसत असले तरी ते घालण्याचेही काही नियम आहेत. तसेच हे कडे प्रत्येकाला लाभेल असे नाहीजाणकार ज्योतिषाने सुचवलेले नियम न पाळता कडे घातल्यास नुकसान देखील होऊ शकते.

कडे घालणे हे जानवे घालण्यासारखे आहे. यासाठी कडे घातल्यानंतर यज्ञोपवीतचे नियम पाळले पाहिजे. मांस-दारू तसेच तामसी भोजन करताना कडे घालण्याऱ्या व्यक्तीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. शत्रु ग्रह प्रतिकूल फळ देऊ शकतो. ग्रहांची कुंडलीतील स्थिती पाहून त्याप्रमाणे कडे घालावे.

अंगळ्यांमधील रत्ने/खडे घालणे आणि कडे घालणे यामगील तत्व सारखेच आहे.

१. एखाद्याच्या कूंडलीमधे रवी (सूर्य) जर कमजोर असेल तर त्यांस बलवान बनवण्यासाठी सोन्याचे कडे सूचवले जाते.

२. मंगळाची शक्ती मिळवण्यासाठी तांब्याचे कडे उपयोगी पडते.

३. चंद्र बळ वाढवण्यासाठी चांदीचे कडे उपयोगी सिद्ध होते.

४. गुरु बळ प्राप्तीसाठी पितळेचे कडे जातकांस सांगितले जाते.

५. शनी बळ प्राप्त करण्यासाठी लोखंडाचे/स्टील चे कडे घालावे.

६. मिश्र कडे घालण्यामुळे काही नुकसान होणार नाही. पितळ, तांबे आणि चांदीमिश्रित कडे घातल्यास कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. यात सर्व धातू समप्रमाणात मिश्र केलेले असले पाहीजे. त्यामुळे ग्रहांच्या स्थितीमध्ये कोणताही फरक पडत नाही.

७. भूत बाधा, निराशा ई. नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी पितळ अथवा तांबे मिश्रित कडे लाभदायक ठरते

८. अनेक व्याधीं पासून मुक्ती मिळवण्यासाठी अष्टधातूचे कडे घातले जाते. यामुळे सततच्या आजारांपासून संरक्षण मिळते.

कडे हे हनुमानाचे प्रतीक मानले जाते.

उजव्या हातात मंगळवारी हे कडे बनवण्यास द्यावे. शनिवारी हे कडे खरेदी करुन हनुमान मंदिरात त्याचे चरणावर हे कडे ठेवावे. हनुमान चालिसाचे पठण करावे. यानंतर हनुमानाला थोडा शेंदूर लावावा. हनुमानाचा आशीर्वाद प्राप्त करावा आणि हे कडे धारण करावे. असे सांगितले जाते.

धातूचेकडे घालण्याआधी जाणकार ज्योतिषांचा सल्ला जरूर घ्या. तसेच धातूची शूद्धता देखील तेवढीच महत्वाची ठरते.

ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

विवाह योग की कृत्रिम विवाह विलंब योग ?


विवाह योग की कृत्रिम विवाह विलंब योग ?

यंदा कर्तव्य आहे बर्र…!

एकदा नवजात बालकाचा जन्म झाला की तयार करुन घेतलेल्या जन्मकुंडली वरील धूळ बरेच वेळा जेव्हा ते नवजात बालक लग्नाच्या वयाचे होते किंवा त्याला शिक्षण, नोकरी-व्यवसाय, आरोग्य ई. या बाबतील अडचणी येतात तेव्हाच झटकली जाते.

जन्मपत्रिकेचा विषय मुख्यत्वे मुलगी/मुलगा लग्नाचा झाला व स्थळे बघण्याची वेळ आली कि निघतो. मग अनेक प्रश्न डोक्यात फ़ेर धरु लागतात.
विवाहयोग कधी आहे? स्थळ कसे मिळेल? परदेशातले मिळेल कि भारतातले? असे अनेक प्रश्न मनात यायला लागतात. मग आस्थेने आई-वडील गुरुजीचा किंवा ज्योतिषाचा रस्ता धरतात.

सर्वसाधारणपणे पारंपारिक ज्योतिषी विवाहाचा विचार करताना सप्तमेश, सप्तमातील ग्रह तसेच विवाहाचा कारक ग्रह म्हणून शुक्र तसेच मुलीची पत्रिका असेल तर रवि इ. गोष्टीचा विचार करतात.
विवाह योग लवकर वा उशिरा ह्याचा अंदाज साधारण सप्तमेश, सप्तमातील ग्रह, तसेच विवाह विलंब वा लवकर घडवून आणणारे योग ह्यावरून घेता येतो. महादशा, गुरु भ्रमण इ. चा विचार करून मग साधारण काळ काढतात.


विवाहास विलंब करणारे योग :
बहुतेक वेळेस शनि-शुक्र युती, चंद्र-शनि युती, पंचमात शनि, सप्तमेश निर्बली, सप्तमात पापग्रह (मंगळ, .शनि, हर्षल), शुक्र निर्बली, मुलीच्या पत्रिकेत रवि-शनि युती यापेकी काही ग्रहयोग असतील तर बहुतेक वेळा उशिरा विवाह होतो किंवा काही वेळेस विवाह योग येतच नाही.
विवाह लवकर होण्याचे योग:
शुभ ग्रहाचे एकमेकाशी शुभ संबंध असतील उदा. शुक्र , बुध, चंद्र,गुरु यापैकी ग्रह युतीत असणे, लग्नेश-सप्तमेश युती असणे.

.मी जेव्हा एखाद्या विवाहाचा विचार करतो तेव्हा अशी व्याख्या करतो की विवाह ही अशी घटना आहे की ज्यात आयुष्यात एक जोडीदार प्राप्ती होते ( सप्तम स्थान ) ज्यामुळे कुटुंब सदस्यात वाढ होते ( व्दितीय स्थान ), स्थायी मित्रत्वाचे नाते प्रस्थापित होते ( लाभ स्थान ) व संतती सुख प्राप्ती साठी ( पंचम स्थान ) संसार केला जातो. या सर्वांचा व ईतर अनुकुल व प्रतिकुल घटकांचा एकत्रित विचार करुन मग विवाह योगापर्यंत येतो.

सप्तम वा सप्तमेष बरोबरील ग्रहावरून जोडीदाराच्या बाबतीत भाकिते वर्तवता येतात. उदा. जर शनि संबंध असेल तर मुलीस जोडीदार वयात जास्त अंतर असलेला मिळतो. मुलाच्या बाबतीत समवयस्क किंवा वयाने जास्त असलेली वधु मिळते. जर चंद्र, शुक्र, बुध संबंध असेल तर जोडीदार वयात कमी अंतर असलेला मिळतो. रवि, मंगळ असेल तर जोडीदाराच्या वयात मध्यम अंतर असते .
सप्तमाचा कोणत्या स्थानाशी घनिष्ठ संबंध आहे त्यावरून लग्न कसे ठरेल हे ठरवता येते. उदा. तृतीयाचा कार्येश असेल तर विवाह संस्था, शेजारी, जाहिरात देऊन, तृतीयाचा कार्येश असेल तर मातुल घराच्या, आत्या, मामाच्य ओळखीतून, नोकरीतील सहकारी ने सुचवलेले ई., बाराव्या स्थानाचा कार्येश असेल तर लांबच्या प्रदेशात राहणारे, परदेशातील, पंचमाचा कार्येश असेल तर प्रेमविवाहाची शक्यता असते (अर्थात त्या करता पत्रिकेत शुक्र, मंगळ, हर्षल ई. ह्याचे योग लागतात. राहू विवाहातील वैचित्र्य दाखवतो ई.)

वरील सर्व योगाचा, महादशा,अंतर्दशाचा सुक्ष्म अभ्यास करून मग विवाह योग कधी आहे ते ठरवावे लागते.

अभिनव कृत्रिम विवाह विलंब योग

आता वरील कुंडली अभ्यास जरा बाजूला ठेवून जे सध्याच्या तथाकथित वर्गाने व अति उत्साही पालक मंड्ळींनी काही गोष्टीचे अवास्तव स्तोम माजवले आहे. की ज्या गोष्टींनी विवाह ठरण्यापेक्षा विवाह लांबत चालल्याची यादीच जास्त फ़ुगत चालली आहे. हा एक अभिनव कृत्रिम विवाह विलंब योग च म्हणायला हवा. माझे विचार वाचा, पटतेय का बघा, नाहीतर सोडून द्या.

१. गुणमेलन : अनेक वर्षे लग्न जमवण्यासाठी प्रचलित असलेला गुणमेलन हा प्रकार. ३६ पैकी किती गुण जुळतात. ग्रहमैत्री जमतेय का, एक नाड तर येत नाही ना, मग रक्त गट वेगळा आहे का, गण कोणते आहेत, विवाह संबंधांना आवश्यक भुकुट चे गुण मिळताहेत का ई. अनेक गोष्टी यात समाविष्ट असतात. तटस्थ पणे जर विचार केलात तर तुम्हाला सत्य लक्षात येईल की ७०% हुन अधिक उत्तम स्थळे या गुणमेलन पायी न बघता, न भेटताच नाकारली जातात. बर पत्रिका न बघताही, पत्रिकाच काय जुन्या जमान्यातील चेहरासुद्धा न बघता लग्न करुन सुद्धा तो यशस्वी झाल्याची व ३६ च्या ३६ गुण जुळुन सुद्धा काडीमोड झाल्याची अनेक उदाहरणे आपल्या अवती भोवती आहेतच की. तर हा सर्वात मोठा कृत्रिम विवाह विलंब योग आहे असे मला वाटते.

२. मंगळाची पत्रिका : अनेक वर्षे लग्न जमवताना प्रचलित असलेला हा अजून एक भयंकर प्रकार. ५०% हुन अधिक उत्तम स्थळे या मंगळाच्या भीती पायी न बघता, न भेटताच नाकारली जातात. १, ४, ७, ८, १२ या स्थानी मंगळ असेल तर ती मंगळाची प्राथमिक पत्रिका ठरते. मग नंतर मंगळ निर्दोष आहे का, सौम्य आहे का, अस्तंगत आहे का अशा पळवाटा शोधल्या जातात. तुम्हीच विचार करा कुंडलीतील १२ स्थानांपैकी पाच स्थाने एकटा मंगळ खाऊन टाकतो, तुमच्या हाती काय उरणार. तर हा अजुन एक मोठा कृत्रिम विवाह विलंब योग आहे असे मला वाटते.

३. क्रूर ग्रह शांती : हा एक या कृत्रिम विवाह विलंब योग मालिकेतील अजून एक महागडा उपाय. अहो तुम्ही शांती केल्याने मनाचे समाधान मिळेल आणि भाव असेल श्रद्धा असेल तर फ़ळ मिळेल. ग्रह उलटा नाही फ़िरायला लागणार. कृष्णाने सांगितले आहे ते तोडपाठ आहे सर्वांचे की कर्म करा, फ़ळाची अपेक्षा करु नका. आमची फ़ळाकडे आधी नजर मग जे प्रत्यक्षात कर्म करायचे ते राहूनच जाते.

या सर्व गोष्टींनी लग्नाच्या बाजारात गोंधळून गेलेले आई वडील अजूनच धास्तावतात. व अनेक वर्षे यंदा कर्तव्य आहे बर्र असे सांगून सांगून थकून निराश होतात.

मी सुद्धा एक ज्योतिषी आहे. योग्य मार्गदर्शनाचे मानधन सुद्धा घेतो. पण प्रत्येक ज्योतिषाची दृष्टी ही गोंधळलेला जातकास योग्य मार्गदर्शना बरोबरच त्यास चिंतामुक्त करुन व समुपदेशनाव्दारे त्यास प्रोत्साहित करणारी व सकारात्मकता प्रदान करणारी हवी. दुर्दैवाने जातकाच्या कमजोर मनस्तिथीचा गैरफ़ायदा घेऊन त्यांना अजुन घाबरवून सोडून आपली पोळी कशी भाजून घेता येईल असा असेल तर हे मात्र वाईटच.

यावर काय करता येईल :

यावर एक करा. जाणकार ज्योतिषाचा सल्ला जरुर घ्या पण नंतर. जेव्हा तुम्ही संभाव्य जोडीदारास भेटून, बोलून, त्याचे विचार, कौटुंबिक वातावरण, जीवन शैली, स्वभाव हे सर्व जाणून घ्या.

अनुकुलता असेल तर मग संभाव्य मतभेदांचा काळ जाणून घ्या. त्यानुसार दोघे वा घरचे मिळून चर्चा करुन त्याचे साठी काय मानसिक बैठक मजबूत करता येईल यावर भर द्या. एकमेकांच्या विरोधी गुणांचा आदर करुन परस्पर समन्वय कसा साधता येईल हे बघा. रात गयी बात गयी हे धोरण स्वीकारुन व वादात एक्मेकांना दूर करण्यापेक्षा वाद दूर ठेवण्याची कला शिकलात तर सौख्य लाभेल.

लक्षात घ्या ग्रह हे तुमच्या मानसिकतेवर परिणाम करत असतात. तुम्ही मानसिकता भक्कम ठेवलीत तर सर्व अडचणींवर मात करुन यशस्वी व्हाल ही खात्री बाळगा आणि या साठी आवश्यक तेथे जाणकार ज्योतिषी वा समुपदेशकाची मदत घ्या.

मनापासून लिहिलेय. पटतेय का बघा, नाहीतर सोडून द्या.

ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

आजच्या बाजारात गुरुबळ कमी होत चालले आहे आणि शुक्र बलवान होत चालला आहे


आजच्या जगात गुरुबळ कमी होत चालले आहे आणि शुक्र बलवान होत चालला आहे.

हे किती यथार्थ निरिक्षण नोंदवले आहे आदरणीय कै. ज्यो. कृष्णमूर्ती यांनी.

पूर्वीच्या काळी कोणतेही शुभकार्य, विवाह जमवताना ई. गोष्टी करताना गुरुबळ बघितले जायचे. कारण गुरू हा ज्ञानाचा कारक ग्रह, विवाहाचा नैसर्गिक कारक ग्रह. गुरू सालस, सुसंस्कृत, धार्मिक, अध्यात्मिक, सज्जन, नेक व्यक्ती घडवणारा ग्रह. तसेच काल पुरुषाच्या कुंडलीतील ९ व १२ व्या स्थानाचा अधिपती. ९ वे स्थान हे भाग्य, कीर्ती, प्रगती, धार्मिकता, पितृ या गोष्टींचे कारक स्थान तर १२ वे स्थान हे मोक्ष, मुक्ती, दानशूरता, सेवा या गोष्टींचे कारक स्थान. मग असे गुण असलेला जोडीदार आपल्या पाल्यास मिळावा म्हणजे सुखी संसार होईल असे वाटणे साहजिकच होते.

पण आजकलच्या पालकांकडे आणि पाल्यांकडे एक सूक्ष्म नजर टाकली तर तुम्हाला तर सहज लक्षात येईल की वर लिहिलेला आदर्शवाद आज फक्त शिकण्याकरिता व दुसऱ्याला उपदेश करण्या पुरता राहिला आहे. म्हणजेच गुरूचे बळ कमी होताना दिसत आहे.

आता आपण शुक्रा कडे वळू या.
शुक्र हा भौतिक सुखांचा कारक ग्रह. शुक्राच्या कारक्तवाकडे किंवा शुक्र उल्लेख असलेले शब्द नुसते चाळले तरी शुक्र समजेल. शुक्र संपत्ती, दागदागिने, महागड्या वस्तू, उंची द्रव्ये, अत्तरे, कपडे, सिनेमा, स्त्रिया, शरीर सुख, वैवाहिक सुख, चैन, विलासीपणा या व अशा अनेक गोष्टी दाखवतो. राक्षसांचा शिक्षक कोण होता तर शुक्राचार्य. संतती साठी योग्य हवे काय तर शुक्राणू…

आजचे पालकांच्या मुलींच्या अपेक्षा बघा,

मुलगा किती पॅकेज घेतो?

स्वतः चे घर आहे का?

घरात DUST BEEN (वृद्ध बिनकामाचे आई वडील) नाहीत ना?

संन्यासा चा नव्हे तर राजा राणीचा संसार हवा…

आजचा एक च फंडा आय टी तील मुलांचा दिसतो. तो म्हणजे … D I N K.
आता हे डिंक काय प्रकरण आहे. ऐकून तुम्ही ही चकित व्हाल माहित असून ही. याचा अर्थ आहे… Double Income No Kid.

म्हणजे मजा तर हवी आहे पण जबाबदारी नको. दुसरीकडे Leave in relation, Companion हे शब्द भुरळ पाडत आहेत. असे हे आजचे भोगवादी, चंगळवादी वातावरण.

म्हणून हेच जाणवतेय की

आजच्या जगात गुरुबळ कमी होत चालले आहे आणि शुक्र बलवान होत चालला आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

दत्तक पुत्र योग ( Child Adoption )


दत्तक पुत्र योग ( Child Adoption )
एखाद्या जोडप्याने मूल दत्तक घ्यायचे ठरवणे आणि दत्तक घेणे यात खूप अंतर आहे. अत्यंत संवेदनशील व मनोधैर्य ची सत्व परीक्षा पाहणारा विषय आहे. आजकाल मूल दत्तक घेण्यासाठी चे नियम देखील काटेकोर करण्यात आले आहेत. उद्देश हाच की या निर्णयाचा त्या जोडप्याला लाभ होत असताना त्या लहानग्या जीवाची आबाळ तर होत नाही ना.

ज्योतिष शास्त्रानुसार दत्तक योग बघताना पुत्रकारक ग्रह वां स्थाने ही मूल होण्या दृष्टीने कमजोर आहेत का हे आधी पाहिले जाते.
बहुतांशी जर काही नैसर्गिक समस्या नसतील तर, दत्तक घेणे ही आजही शक्यता फार कमी आहे. त्यामुळे दत्तक योग कमी-अधिक प्रमाणात ५ व्या (संतती स्थान) आणि 9व्या (पितृ स्थान) यांचे संबंधित ग्रह राशी कमजोर असतील निपुत्रिक योग असण्याची शक्यता जास्त असते. त्या जोडीला सहाय्यक २रे (कुटुंब स्थान) व ११ वें लाभ स्थान (जोडीदाराचे ५वें स्थान) सुद्धा तपासणे गरजेचे आहे. तसेच ७ व्या स्थानावरून प्रजनन क्षमता वा शरीरसंबंध शक्ति जाणून घ्यावी लागते.
५ व्या भावात शनि आणि मंगळाचा अशुभ प्रभाव मुलांच्या सुखावर प्रतिकूल परिणाम करतो.

वांझ राशिंमध्ये ५ व्या घराचा स्वामी, म्हणजेच शनि आणि बुधशी संबंधित असतील म्हणजेच जन्मकुंडलीतील पाचव्या घरात मिथुन, कन्या, मकर किंवा कुंभ राशी पुत्र होण्यात प्रतिकुलता प्रदान करते. याचा अर्थ असा आहे की कुंभ, वृषभ, कन्या, तुला या लग्न राशीचे लोक इतरांपेक्षा मूल दत्तक घेण्याची अधिक शक्यता असते.

७ व्या स्थाना संबधित अशुभ ग्रह वा राशी हे प्रजनन करण्यास असमर्थता देतात.
लग्नाच्या स्वामीचा बुधाशी संबंध देखील प्रजनन करण्यास असमर्थता दर्शवू शकतो.

दत्तक घेतल्यावर एखाद्या व्यक्तीला स्वतःचे म्हणवून घेण्यासाठी मूल होणार असल्याने, ५ व्या घरावर किंवा त्याच्या स्वामीचा शुभ प्रभाव असणे आवश्यक आहे.

५ व्या घरावर प्रभाव टाकणारा हा लाभदायक गुरू म्हणजे नैसर्गिक पुत्रकारक वा चंद्र किंवा शुक्र असेल तर, विविध पाराशरी योगांमधून दिसून आल्याप्रमाणे हा प्रभाव मुले जन्माला येण्याची पुष्टी देतो.

तसेच या स्थानाचे व्यय स्थान पाय खेचत नाहीत ना हे तपासणे गरजेचे असते.

तरी हा एक क्लिष्ट अभ्यास व जिव्हाळ्याची समस्या असल्याने या बाबतीत जाणकार ज्योतिष सल्ल्याची नितांत आवश्यकता असते.

ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

महाशिवरात्री साजरी करण्यामागील आख्यायिका व पौराणिक कथा


महाशिवरात्री साजरी करण्यामागील आख्यायिका व पौराणिक कथा

महाशिरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 💐

सत्य हे शिव आहे व शिव सुंदर आहे.
महाशिवरात्री माघ वद्य चतुर्दशीला साजरी केली जाते. प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की, या दिवशी शिव तत्व जे अव्यक्त दिव्यत्वाचे तेज आहे ते मानवाच्या भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पृथ्वीतलावर अवतीर्ण होते.

म्हणून या दिवशी भगवान शिव प्रसन्न व्हावेत यासाठी भक्त जन पूर्ण श्रद्धेने उपवास, मंत्रोच्चार, प्रार्थना, साधना, ध्यान ई. करून भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करतात अशी या मागची धारणा आहे.

महाशिवरात्री विषयी पुराणातील काही आख्यायिका, कथा पूर्वापार प्रसिद्ध आहेत.

काही पुराणांनुसार माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि पार्वती देवी यांचा विवाह संपन्न झाला होता. म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते.

काही पुराण अभ्यासक सांगतात की

समुद्र मंथन समयी राक्षस आणि देव यांच्यात तुंबळ युद्ध झाले. या मंथनात प्राप्त झालेला सगळा ऐवजाची समान वाटणी करण्यात आली होती. पण अमृत कोणी घ्यायचं यावरून, वाद विकोपाला पोचला होता. कारण हे अमृत जो कोणी प्राशन करेल तो कायमचा अमर होणार होता. परंतू समुद्र मंथनातून अमृत बाहेर काढत असतांना सुरवातीला विष बाहेर पडून सगळीकडे पसरत होते. त्यामुळे देव, साधू, संन्यासी प्रचंड घाबरले होते, शेवटी हे सगळे भगवान शंकराकडे मदत मागण्यासाठी गेले. यावर तोडगा म्हणून शंकराने ते सगळं विष स्वतः पिऊन आपल्या गळ्यात थोपवून ठेवलं, त्यावेळी शंकराचा गळा निळा दिसत असल्याने शंकर नीळकंठ म्हणून प्रसिद्ध पावले. शंकरांनी स्वत: सगळं विष पिऊन ही मोठी समस्या सोडवल्यामुळे चंद्र प्रकाशात म्हणजेच त्या रात्री शंकराचे गुणगान गायले गेले, म्हणूनच या रात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात.

या महाशिवरात्री संबंधी अजून एक कथा सांगितली जाते

एकदा ब्रह्मा आणि विष्णू हे दोघांपैकी श्रेष्ठ कोण या गोष्टीवरून भांडायला लागले. त्यामुळे सगळीकडे प्रचंड कोलाहल निर्माण झाला. हे भांडण वाढत खूप विकोपाला गेले. सगळे देव चिंताग्रस्त झाले व त्यांनी शंकराच्या कानावर ही गोष्ट घातली. तेव्हा भगवान शिव एका मोठ्या अनादि अनंत पिंडीच्या स्वरुपात प्रकट झाले. ब्रह्मा आणि विष्णू हे महाकाय रूप पाहून गोंधळून गेले. तेव्हा ब्रम्हदेवाने सुरवात शेवट शोधण्याचा निष्फळ प्रयत्न केला. त्यानंतर विष्णू ने हंस रूप धारण करून पिंडीची सुरवात आणि शेवट शोधून काढण्याचा प्रयत्न केला. तो ही व्यर्थ ठरला. शेवटी दोघांनी त्या पिंडी समोर हात जोडले व शरण गेले. हात जोडताच त्यातून ऊॅं ध्वनी ऐकू येऊ लागला. त्यानंतर ब्रह्म आणि विष्णू यांच्या लक्षात आले की, पिंडीच्या उजव्या बाजूला आकार, डाव्या बाजूला उकार आणि मध्यभागात मकार आहे आणि स्फटीकाच्या रुपात भगवान शंकर आहेत. हे पाहून विष्णू आणि ब्रह्मा शंकराची अनन्य भावाने पूजा करू लागले. पहिल्यांदाच भगवान शंकर पिंडीच्या रुपात माघ वद्य चतुर्दशीला प्रकट झाल्याने या रात्रीस महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते.

तर या लेख लिहिण्याचे प्रयोजन एवढेच की, अनादि अनंत असे हे अव्यक्त दिव्यत्व असे शिवतेज जो या सृष्टीचा परम आत्मा आहे तोच मात्र केवळ एक सत्य आहे बाकी सर्व नश्वर गोष्टी ही माया आहे. मग अहंकार कशाचा बाळगायचा? त्यामुळे महाशिरात्रीनिमित्त मात्रे का होईना त्या परम सत्यास शरण जावे व अनन्य भावाने अध्यात्मिक प्रगती वा मोहापासून मुक्ती प्राप्त व्हावी यासाठी आराधना करावी.

सत्य हे शिव आहे व शिव सुंदर आहे.

सत्यम शिवम सुंदरम 🙏🏻

महाशिरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 💐

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

सूर्याच्या नवग्रह मालेतील बिरबल


सूर्याच्या नवग्रह मालेतील बिरबल

लहानपणी आपण अकबर बिरबलाच्या गोष्टी अगदी आवडीने वाचल्या आहेत. अकबराच्या दरबारात जे नवरत्न मंत्री मंडळ होते, त्या पैकी बिरबल हा सर्वात प्रसिद्ध झाला, कारण बिरबलाकडे अशी एक गोष्ट होती जी इतरांपेक्षा विशेष नजरेत भरणारी होती ती म्हणजे ती म्हणजे त्याचे बुद्धीचातुर्य.

एका दोरीवर काही कपडे वाळत घातले आहेत तर समजा १ ड्रेस व १ शर्ट वाळायला १५ मिनिटे लागतात, तर ४ ड्रेस व ४ शर्ट वाळायला किती वेळ लागेल? या प्रश्नाचे उत्तर बिरबलाने तात्काळ दिलेच असते वर अजून ४ कोडी आपल्याला घातली असती आणि निरुत्तर केलं असतं.

ही प्रचंड बुद्धिमत्ता व तल्लखपणा देणारा सुर्याच्या दरबारातील बिरबल रुपी रत्न म्हणजे बुध.

आपल्या अवती-भोवती जी काही बुध्दीमान, चतुर, चलाख, धुर्त मंडळी ई. वावरत असतात, त्यांचा ‘बुध’ हा ग्रह सुस्थितीत असतो. बुध ‘चांगला’ म्हणजे काय? हे विस्तृत पणे जाणून घेण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करावा लागेल, पण इथे या गोषवारा जरी कळला तरी पुरेसं आहे.

बुध म्हटले की बुद्धी व धुर्तपणा आपल्याला नजेरेसमोर येत असला तरी बुधाच्या कारकत्वाखाली बुद्धी, वाकचातुर्य, संपर्क, अनेकत्व, ई अनेक गोष्टी येतात.

त्यातीलच एक गोष्ट म्हणजे ‘अनेकत्व’ एखादया व्यक्ती बाबतीत तुम्ही बघितलं असेल की त्याला एका वेळेला कामाच्या दोन चांगल्या संधी चालून येतात आणि मग त्यातली कुठली निवडावी हा प्रश्न पडतो, किंवा लग्नाच्या जोडीदाराचा शोध चालू असताना दोन उत्तम स्थळे एकाच वेळेला चालून येतात आणि कोणांस होकार दयावा, हा प्रश्न पडतो. काही वेळेला एकच स्थळ हे काही काळाने परत सांगुन येतं. एखादया व्यक्तीचे ‘एकापेक्षा अधिक’ उदयोगधंदे असतात, म्हणजेच धन प्राप्तीचे स्त्रोत (Source of income) हे ‘एकापेक्षा अधिक’ असतात. अशा सर्व गोष्टी बुधाच्या अंमलाखाली येतात. बुध हा बुध्दीमत्ता देतोच पण त्यात देखील उत्तम ‘आकलनं शक्ती’ (Grasping Power) आणि तर्ककला (Logic) देतो. विनोदबुध्दी, मिस्किलपणा हे सुद्धा बुधाचेच गुण. ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ ही म्हण बुध व्यक्ती सार्थ ठरवतो.

एका नवरोजी ला कोर्टात वाद चालू असताना एका वकिलाने प्रश्न विचारला की, ‘तुम्ही तुमच्या बायकोला पूर्वी इतकीच सध्या मारहाण करता का? फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ मधेच उत्तर दया’ नवरोजी ची पंचाईत झाली. ‘हो’ उत्तर दिलं तरी पंचाईत ‘नाही’ उत्तर दिलं तरी पंचाईत.

बुधाच्या अंमलाखाली येणारी कार्यक्षेत्रे म्हणजे सॉफ्टवेअर व त्या संबंधातील सर्व क्षेत्रं, कॉल सेन्टर्स, बीपीओ, इलेक्ट्रॉनिक्स. इथ पासून ते लेखन, साहित्य, प्रकाशन, प्रिंटिंग, वधुवर सूचक, ज्योतिष ई. अनेक कार्यक्षेत्र येतात..

बुधाचा अजून एक गुण म्हणजे परिवर्तन. बुध हा सतत बदल घडविणारा ग्रह आहे. असे उदयोगधंदे की, ज्यात समोरचा ‘ग्राहक’ हा सारखा बदलत असतो. उदाहरणार्थ- दुकान किवां तत्सम व्यवसाय हे बुधच्या अंमलाखाली येतात. बुधाच्या अंमलाखाली येणारं सॉफ्टवेअरचं क्षेत्र हे सतत बदलणारं क्षेत्र आहे. त्याचप्रमाणे सॉफ्टवेअर क्षेत्रात नोक-या बदलण्याचं प्रमाण हे खूप अधिक आहे. ज्या व्यक्तीचं कामाचं स्वरूप हे सतत बदलत असतं ते देखील बुधामुळेच.. शेअर बाजार हा देखील बुधाच्याच अंमलाखाली येतो. तिथे तर रोज नविन चित्र असतं, सतत बदल, व चढ उतार. बुधाचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे एकाच कामासाठी अनेक वेळा किंवा एकापेक्षा जास्तवेळा प्रयत्न करावे लागतात. पहिल्याच फटक्यात काम होत नाही. बुधवारी किंवा बुधाचं नक्षत्र असणा-या दिवशी एखादं काम करायला गेल्यास बहुतेकवेळा त्याच कामासाठी परत जावं लागतं. म्हणजेच पहिल्याच फटक्यात काम होत नाही.

बुधाच्या अधिपत्याखाली येणा-या दोन राशी म्हणजे ‘मिथून’ व ‘कन्या’ या दोन्ही राशी जरी बुधाच्याच अधिपत्याखाली येत असल्या तरी या दोन्ही राशीत बुधाच्या गुणधर्माची वेगवेगळी झलक पहायला मिळते. दोन्हीही राशी बुध्दीमान आहेत पण मिथून राशीत बुधाचा चलाखपणा, वाक्चातुर्य, विनोदबुध्दी, धुर्तपणा हया गोष्टी अधिक आहेत.

कन्या राशीत बुधाची आकलंन शक्ती, चिकित्सकवृत्ती कुठल्याही गोष्टीचा अतिविचार, काही वेळेला या अतिविचारामुळे कन्याराशी निर्णय घ्यायला प्रचंड वेळ लावते. समोरचा माणूस वैतागून जातो, तरी यांचा निर्णय अजून झालेला नसतो. हयांना निर्णय घेण्यासाठी सतत कोणाच्या तरी आधाराची गरज असते. कन्या ही अत्यंत शास्त्रीय पध्दतीने विचार करणारी राशी आहे. प्रत्येक गोष्ट सिध्द व्हावी लागते. थोडीशी अतिशयोक्ती म्हणजे, समजा कन्या व्यक्तीने ‘पिवळा’ शर्ट घातलेला असेल तरी ते एकदा समोरच्या माणसाला विचारतील की मी कुठल्या रंगाचा शर्ट घातलाय? समोरच्या व्यक्तीने एकदा ‘पिवळा’ म्हटलं की मग हयांची खात्री पटते. मिथून ही वायु  तत्त्वाची रास असल्याने सतत विचार ‘बदलणारी राशी’ आहे हे लोक त्याचे निर्णय सतत ‘बदलत’ असतात. सकाळी संध्याकाळी फ़िरायला जाऊ. दुपारी म्हणतील घरीच आराम करु.

संदेशवहनाचा’ कारक देखील बुधच! त्यामुळे आपल्या हातातला ‘भ्रमणध्वनी’ (मोबाईल) हा देखील बुधाच्याच अधिपत्याखाली येतो. बुध हा बुध्दीचा कारक आणि बुध्दी जिथे साठवली जाते त्या मेंदुचे देखील ‘दोन’ भाग आहेत, मोठा मेंदू व छोटा मेंदू! हयात देखील बुधाचं ‘एकापेक्षा अधिक’ हे कारकत्व चुकलेलं नाही!

बुधा संबंधी इतक्या अनेक गोष्टी आहेत त्या सगळया गोष्टीचा एकाच लेखात उल्लेख करणंही अवघड आहे.

‘रवि’ला ज्योतिषशास्त्रात ‘राजा’ म्हटलेलं आहे आणि ‘बुध’ हा सूर्यमालेतील रविच्या म्हणजे सुर्याच्या सगळयात जवळचा ग्रह आहे. अकबर बादशहा देखील बिरबलाला कायम त्याच्याबरोबर ठेवत असे, म्हणूनच बुध्दींच्या कारक बुधाला नवग्रह मालेतील बिरबल हे नाव सार्थ वाटते..

(मध्यंतरी वाचनात आलेल्या एका लेखाचा स्वैर अनुवाद)

ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in