
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : मूळ नक्षत्र विचार
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : नक्षत्र ज्योतिष
नमस्कार,
आज आपण मूळ नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.
मूळ हे नक्षत्र चक्रातील १९ वे क्रमांकाचे नक्षत्र असून या नक्षत्राचे ४ ही चरण धनु राशीत येत असल्याने चतुष्पाद नक्षत्र आहे. तसेच ते अधोमुखी व सुलोचनी आहे. त्यामुळे या नक्षत्रात केतूचा आध्यात्मिकपणा, गुरूचा न्यायी व उदारपणा व निऋतीचा त्यागीपणा अशा शुभगुणधर्माचा सुंदर मिलाफ आढळतो. या नक्षत्रामध्ये ११ तारे असून ते विंचवाच्या नांगीसारखे किंवा सिंहाच्या शेपटीसारखे दिसतात. तारे अत्यंत तेजस्वी, जरा लालसर पांढरे व काटेरी दिसतात. या नक्षत्राची आकृती झाडाच्या मुळासारखी पण भासते. कारण या नक्षत्राचे दुसरे नाव ‘निऋती मूलवर्हिणी’ असे आहे. पहिल्या प्रकारात ही तारका मुळाशी वाटते तर दुसऱ्यात मोराच्या तुऱ्याच्या ठिकाणी आहे. या नक्षत्राचे इंग्रजी नाव ‘लांबडा स्काप आहे. या नक्षत्राचेही पहिले २ अंश गंडांतर तारा योगात येतात, नक्षत्राच्या ४ चरणावर अनुक्रमे मंगळ, शुक्र, बुध व चंद्राची सत्ता आहे.
मूळ नक्षत्राबद्दल बरेच गैरसमज आहेत. ‘मूळ’ हे जन्मनक्षत्र आले की बरेच जातक घाबरून जातात व शांतीकर्माचा मार्ग स्वीकारतात. बऱ्याच वेळा ‘मूळ’ नक्षत्रात असलेल्या उपवर मुलीच्या पत्रिका नाकारल्या जातात.
वास्तविक मूळ हे अत्यंत सत्त्व व शुभगुणधर्मी असून महापराक्रमी व कर्तृत्ववान आहे. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती कधीही सामान्य म्हणून न राहता अत्यंत श्रेष्ठपदाला जातात.
मूळ हे मुळावर येणारे नक्षत्र आहे. या नक्षत्रावरील व्यक्तीचा भाग्योदय दुसऱ्याच्या मुळावर येऊनच होतो. ज्या प्रमाणे कोणत्याही झाडांचे मूळ हे दुसऱ्याच्या मुळावर येऊन वाढते, त्या प्रमाणे ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीवर संकट वगैरे येऊन त्याचा नाश झाला असेल त्या ठिकाणी यांचा उदय होतो. ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची नोकरी सुटलेली असेल त्या ठिकाणी यांना नोकरी मिळते. जर एखाद्या मुलीच्या सप्तमात चंद्र किंवा सप्तमेश मूळ नक्षत्रात असता तिला स्थळ अतिशय श्रीमंत व सुखवस्तू मिळेल. पण त्या ठिकाणी दुसऱ्या एखाद्या मुलीचा विवाह मोडलेला असेल.
मूळ नक्षत्र राक्षसगणी असले तरी अतिशय शुभ आहे. कारण या नक्षत्रावर जन्मणारे जातक अंगाने सशक्त, दणकट व बलवान, तरी त्यांच्यामध्ये नम्रपणा, दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती, परोकार, न्यायीपणा, दयाळू, महत्त्वाकांक्षी, ध्येयवादी, अन्यायांचे रक्षण करणारा, शूर, धाडसी, कर्तृत्ववान व कर्तबगार आढळतात. हे नक्षत्र जरा हानिकारक आहे. ते एखाद्याला वाईट तितकेच एखाद्याला उच्च पदाला पोहोचवणारे आहे. खरे बोलणारे, ईश्वराला भिऊन वागणारे, सदाचारी, तेवढेच युद्धप्रिय, राजकीय उलाढाली करणारे, घराण्याचा नावलौकिक काढणारे व धनसंचय करणारे असतात. यांना व्यायामाची फार आवड असते.
मूळ नक्षत्र स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त अनुकूल आहे. कारण पुरुषांना लागणारे घाडस, शौर्य, पराक्रम, स्वावलंबित्व, अधिकारलालसा, स्वातंत्र्यप्रेम हे गुण यामध्ये जास्त आढळतात. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या जातकांचा बांधा मध्यम, उंच, सडपातळ, हाडापेराने मजबूत, लांब व रुंद हाडे असणारा. अवयव पीळदार विशेषतः हात, पाय, मांड्या, दंड व मनगट लोखंडासारखे जाड व टणक असतात. मुख व मान भरदार असते. कपाळ भव्य, चौरस व चेहरा सुंदर, तेजस्वी, थोडा रागीट, करारी व बौद्धिक आणि विद्वान माणसांचे तेज असणारा असतो. यांना मर्दानी खेळ, कुस्ती, घोड्यावर बसणे, दांडपट्टा, लष्करी शिक्षण, मंत्रविद्या यांची फार आवड असते. पांढऱ्या स्वच्छ पोशाखाची आवड असते. राहणी साधी पण नीटनेटकी व व्यवस्थित असते. या नक्षत्राचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे शरीरसंपत्तीबरोबर बुद्धिमत्ताही चांगली असते. हे जातक हुशार, बुद्धीमान, विद्वान व विधेसाठी परिश्रम घेणारे असतात. उच्च शिक्षण पूर्ण होते.
संत ज्ञानेश्वरांचे मूळ नक्षत्र होते. त्यांच्या जन्मानंतर त्यांच्या माता-पित्याचे निधन झाले पण ते श्रेष्ठपदाला गेले. चेहरा सुंदर, तेजस्वी व बळकट असून त्यांच्या हातून ज्ञानेश्वरी लिहिली गेली.
मूळ नक्षत्र स्त्रियांना फारसे अनुकूल नाही. कारण या नक्षत्रात नाजूक किंवा कोमलपण नाही. कलेच्या दृष्टीनेही ते फार योग्य नाही. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रिया पुरुषी बांध्याच्या व पुरुषी वृत्तीच्या आढळून येतात. बाचा सशक्त, दणकट व मजबूत असतो. चेहरा सुंदर पण पुरुषाची झाक असते. मात्र त्या शूर, धाडसी, कर्तृत्ववान, कर्तबगार, तेवढ्याच संसारी, समाजप्रिय, समाजसेवेची आवड असणाऱ्या, रसिक, हौशी, कलाप्रिय, आनंदी, थोडचा गंभीर असतात. खेळांची बरीच आवड असते. बुद्धीमत्ताही चांगली असून शिक्षण चांगले असते. स्वच्छ व साधा पेहराव यांना प्रिय असतो. पिवळा रंग विशेष आवडतो. फार भडक, गडद अथवा डिझाईनच्या पातळाची आवड नसून उठावदार व एकाच रंगाची साडी प्रिय असते. रोहिणीप्रमाणे अलंकाराचा फाजील हव्यास नसून २-३ ठळक व उपयुक्त दागिने आवडतात. वेण्या किंवा गजन्यापेक्षा फुले प्रिय असतात. मूळ नक्षत्राची स्त्री एखाद्या देवीसारखी भासते.
मूळ नक्षत्राखाली येणारा वर्ग डॉक्टर्स, इंजिनिअर्स, शस्त्रक्रिया करणारे, पोलीस व लष्करी खात्यातील लोक, न्यायाधीश, मॅजिस्ट्रेट, रेल्वे अधिकारी, कस्टम अधिकारी, पुढारी वर्ग, अंमलबजावणी खात्यातील लोक, सरकारी किवा कॉर्पोरेशन क्षेत्रात काम करणारा वर्ग, संतवर्ग, वकील, अॅडव्होकेट, कारखानदार, गॅरेजचे मालक, रिपेअर्स करणारे, शिक्षक व प्रोफेसर वर्ग, समाजसेवक, धर्मप्रसारक, समाजातील वरिष्ठ मध्यम वर्ग होय.
मूळ नक्षत्री रवि असता शरीरप्रकृती बरी असते. बांधा उंच, सडपातळ, सशक्त, दणकट, रुंद व लांबट चेहऱ्याचा व रुबाबदार व्यक्तिमत्त्व असते. मात्र अतिक्रोधी, मानी व शिस्तीचा भोक्ता असतो. अधिकार योग, नावलौकिक, कीर्ती व पुढारीपणाला चांगला,
मूळ नक्षत्री चंद्र असता शरीर बांधा मध्यमकारक व चिवट असतो. मात्र सत्त्वगुणी, विवेकी, बुद्धीमान, समाजप्रिय व कीर्तिमान होतो. मूळव्याधीचा कधी कधी त्रास होतो.
मूळ नक्षत्री मंगळाला चांगले आहे. तो शरीरप्रकृती व अधिकारयोगाला फार चांगला. बांधा मध्यम, उंच, हाडापेराने मजबूत, लांब व रुंद हाडाचा, शरीर पिळदार, तालीमबाज, चपळ व तरतरीत असतो. चेहरा रुंद, तेजस्वी व फार रागीट दिसतो. स्वभाव मानी, ताफ्ट, उतावळा व आक्रमक पण थोडा तारतम्य असणारा असतो. इंजिनिअर्स, डॉक्टर्स, शस्त्रक्रिया करणारा वर्ग तसेच पोलिस किंवा लष्करातील अधिकारी किंवा अंमलबजावणी खात्यातील वर्ग यांना चांगला, कोणत्या ना कोणत्या प्रकारचा अधिकार मिळतोच. मात्र मंगळ बिघडला असता शस्त्रक्रिया, अपघात, कापणे, भाजणे, हाड मोडणे यांची फार भीती असते.
मूळ नक्षत्री बुध असता बुटका, आडवा व चेंडूसारखा गोल बांधा व टुणटुणीत असतो. बुद्धीमत्तेला मात्र मध्यम असतो.
मूळ नक्षत्री गुरु फार चांगला, गुरु असता उंच, हाडापेराने मजबूत, सशक्त, दणकट व भारदस्त शरीराचा असतो. चेहरा सुंदर तेजस्वी पण गंभीर व बौद्धिक तेज असते. बुद्धीमत्ताही श्रेष्ठ असते. तो कायदेशास्त्र, इंजिनिअरिंग, डॉक्टर्स यांना चांगला. जज्ज, वकील, अॅडव्होकेटस् यांना उत्तम. तर पुढारीपण व समाजसेवक, धर्म प्रसारक यांना पण चांगला, अधिकार योग व कीर्ती चांगली मिळते.
मूळ नक्षत्री शुक्र फारसे अनुकूल नाही. शरीरबांधा बळकट असला तरी प्रकृती उष्ण असते. बारीस सारीक किरकिर असतेच. बुद्धीमत्ता, कला व अधिकार योगालाही तो बरा नाही.
मूळ नक्षत्री शनी शरीर चांगले देतो. हाडपेर व शिरा मजबूत असतात. मांस कमी असते. कणखरपणा चांगला असतो. मात्र शनी बुद्धी धन किंवा रूप व कला यांना अनुकूल नसतो. जन्मभर काबाडकष्ट, श्रम व दगदगच करावी लागते.
मूळ नक्षत्री राहू प्रकृतीच्या दृष्टीने चांगला. बांधा मजबूत, पीळदार व आकर्षक असतो. तो अंमलबजावणी खात्यातील कामाला चांगला. अधिकार योग मिळतोच. काहीवेळा इंजिनिअरिंग किवा लष्करी शिक्षणाला चांगला. स्वपराक्रमानेच पुढे येतो.
मूळ नक्षत्री केतू मजबूत पण जरा बेढब बांधा दर्शवितो. मात्र प्रकृती उष्ण असते. मूळ व्याधीची भीती असते. तो धार्मिक व पारमार्थिक मार्ग, सत्प्रवृत्तीकडे लवकर वळतो.
मूळ नक्षत्री हर्षल शरीरप्रकृती चांगली दर्शवतो. अधिकार योगालाही चांगला. तो विमानविद्या, टी.व्ही., विजेच्या साहाय्याने चालणाऱ्या मशीनचे इंजिनिअरिंग शिक्षण, संशोधन यांना उत्तम. मात्र स्वभाव विक्षिप्त, लहरी व जरा हेकेखोर असतो.
मूळ नक्षत्री नेपच्यून शरीरप्रकृतीच्या दृष्टीने मध्यम, धार्मिक व सात्विक प्रकृती बरी असली तरी अंतःस्फूर्ती किंवा ध्यानधारणा यांना फारसे अनुकूल नसते.
मूळ नक्षत्री होणारे आजार दाहक व जरा कूर असतात. या व्यक्ती सहसा ताप, सर्दी किंवा खोकला अशा साध्या विकाराने आजारी नसतात. तर मूळव्याध, कापणे, भाजणे, हाड मोडणे, खरचटणे, हाडाचा चुरा होणे, झाडावरून किवा उंचावरून पडणे, उष्णतेचे विकार, शस्त्रांच्या जखमा, शिरा सरकणे, अपघात, पाठीचे मणके सरकणे, पोटाची अॅपेडीसीयटीस, ट्यूमर, अल्सर, कॅन्सर यांची फार भीती असणे.
मूळ नक्षत्रावर जन्मसमयी अनिष्ट कालादी दोष म्हणून शांती करण्याची प्रथा आहे. मूळ नक्षत्राच्या प्रथम चरणावर जन्म झाला असता पितॄनाश, दुसऱ्या चरणावर मातृनाश, तिसऱ्यात द्रव्यनाश व चौथ्यात कुलनाश होतो. मुळाचा चौथा चरण काहीजण शुभ मानतात. मूळ नक्षत्रावर जन्मलेली कन्या, सासू व सासरा यांना अनिष्ट फलदायक होते. ज्येष्ठा नक्षत्राची शेवटची एक घटिका व मूळ नक्षत्राच्या पहिल्या दोन घटिकांत जन्म झाला असता एवढ्या काळाला अभुक्तमूळ म्हणतात. या अभुक्त मूळकाली जन्म झाला असता ८ अनिष्ट फल असते. मूळ नक्षत्रावर जन्म असून २।५।८।११ या राशीचे लग्न असता मूळ स्वर्गलोकी असते. फळ राज्यप्राप्ती ३२६।७।१२ या राशीचे लग्न असता मूळ पाताळी राहाते. फळ धनप्राप्ती. १।४।९।१० या राशीचे लग्न असता मूळ मनुष्यलोकी होते. फळ शून्य.
मूळ नक्षत्रावर जन्मणाऱ्या जातकाचे अक्षर मोठे, ठळक व गोल असते. मात्र एकाच रेषेत अक्षरे नसता वेडेवाकडेपणा दिसून येतो. लिहिणे जरा दाबून असते. या नक्षत्रावर ३ किवा ९ अंकाचे वर्चस्व दिसते व गुरुचा पुष्कराज किवा रवीचे माणिक शुभ असते. हे नक्षत्र सुलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती बराच प्रयत्न करूनही सापडत नाही. वस्तू उत्तरेला गेलेली असते.
मुहूर्तशास्त्रामध्ये मात्र मूळ नक्षत्र बऱ्याच शुभकार्याला अनुकूल आहे. विशेषतः विवाहाला हे नक्षत्र प्रशस्त आहे. अधोमुखी नक्षत्र असल्याने विहिरी बांधणे, पुरलेले द्रव्य काढणे, पुरणे यांना चांगले. तसेच गणितारंभ, घूत खेळणे, मंत्र, साधन, मध काढण्यास आरंभ करणे, पुरवून औषध घेणे, औषधी वृक्ष लावणे, जमीन नांगरणे, बी पेरणे, मुलांचे नाक-कान टोचणे, गांधर्व विवाह, प्रयाण इत्यादी कार्यांना चांगले. शस्त्रक्रिया करण्यासाठी हे नक्षत्र फारच चांगले आहे. बऱ्याचवेळा या नक्षत्रावर शस्त्रक्रियेचे दिलेले मुहूर्त यशस्वी झालेले आहेत.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : नवाशांबाबत काही निरीक्षणे
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : स्वाभ्यास व NAVANSHA IN ASTROLOGY
नमस्कार,
आज नवांशा बाबत अभ्यास उजळणी दरम्यान केलेली काही निरीक्षणे येथे मांडत आहे. निरीक्षणे तशी सामान्यच आहेत. पण ती नवोदित अभ्यासकास एक दिशा देऊ शकतील असे वाटल्याने हा खटाटोप.
(१) नवांश म्हणजे एका राशीचा नववा भाग जो ३°-२० चा असतो, त्या भागालाच आपण चरण किंवा पद असे म्हणतो. म्हणजेच मेष ते मीन चरणांचे एक चक्र ३°-२० गुणिले १२ चरण = प्रत्येकी ४०° च्या अंतराने पूर्ण होईल व त्याची पुनरावृत्ती होईल. म्हणजेच संपूर्ण राशी चक्रात राशीचक्रात ३६०° भागिले ४०°= ९ वेळा पुनरावृत्ती होईल. म्हणजेच मेष ते मीन पर्यंतचे सर्व नवांश नऊ वेळा परत येतील.
(२) प्रत्येक ग्रहाला एका नवांशास म्हणजेच ३°-२० पार करण्यासाठी लागणारा सरासरी वेळ खालीलप्रमाणे आहे :
सुर्य : ३ दिवस ८ तास
चंद्र : ० दिवस ६.१/२ तास
मंगळ : ४ दिवस १०.१/२ तास
बुध : २ दिवस ५.१/२ तास
गुरु : १ महिना १० दिवस
शुक्र : २ दिवस १६ तास
शनि : ३ महिने १० दिवस
राहू-केतू : २ महिने २ दिवस
एका नवांशला पूर्वेला उगवायला लागणारा वेळ १३ मिनिटे २० सेकंद आहे.
(३) नवांश युती दोन प्रकारचे असतात :
i) एकाच नक्षत्र-चरणातील दोन ग्रह म्हणजेच एकाच राशीत एका नवांश मध्ये
ii) जन्म कुंडलीत एकमेकांपासून ४०°, ८०°, १२०°, १६०°, २००°, २४०°, २८०° आणि ३२०° अंतरावर असलेले दोन ग्रह एका नवांश मध्ये येतील, ज्यामुळे एका नवांश चार्टमध्ये युती होईल.
(४) लग्न नवांशापासून दृष्टी :
i) ६०° दृष्टी : हा लग्न नवांशापासून १९ वा नवांश असेल ( त्याच्या पासून ९१ वा नवांश लग्न नवांश असेल.) (सेक्सटाइल)
ii) ९०° दृष्टी : हा लग्न नवांशापासून २८ वा नवांश असेल ( त्याच्या पासून ८२ वा नवांश लग्न नवांश असेल.) (केंद्रीय)
iii) १२०° दृष्टी : हा लग्न नवांशापासून ३७ वा नवांश असेल ( त्याच्या पासून ७३ वा नवांश लग्न नवांश असेल.) (त्रिकोण)
iv) १५०° दृष्टी : हा लग्न नवांशापासून ४६ वा नवांश असेल ( त्याच्या पासून ६४ वा नवांश लग्न नवांश असेल.) (क़्वीन-कंक्स)
v) १८०° दृष्टी : हा लग्न नवांशापासून ५५ वा नवांश असेल ( त्याच्या पासून ५५ वा नवांश लग्न नवांश असेल.) (प्रतियोग)
(टीप : येथे आकड्यांची अदा पहा … १९-९१ वा नवांश, २८-८२, ३७-७३, ४६-६४, ५५-५५ वा नवांश.)
(५) त्रिकोण, तत्वे आणि नवांश :
मेष-सिंह-धनु या राशी धर्म त्रिकोण दर्शवतात.
वृषभ-कन्या-मकर या राशी अर्थ त्रिकोण दर्शवतात.
मिथुन-तूळ-कुंभ या राशी काम त्रिकोण दर्शवतात.
कर्क-वृश्चिक-मीन या राशी मोक्ष त्रिकोण दर्शवतात.
प्रत्येक नक्षत्राला चार पद-चरण (नवांश) असतात.
निट निरीक्षण केले तर, लक्षात येईल की
१ ले पद म्हणजे १ ला नवांश म्हणजे धर्म त्रिकोण रास व अग्नितत्वाची रास येते.
२ रे पद म्हणजे २ रा नवांश म्हणजे अर्थ त्रिकोण रास व पृथ्वीतत्वाची रास येते.
३ रे पद म्हणजे ३ रा नवांश म्हणजे संसार त्रिकोण रास व वायूतत्वाची रास येते.
४ थे पद म्हणजे ४ था नवांश म्हणजे मोक्ष त्रिकोण रास व जलतत्वाची रास येते.
म्हणजेच
प्रत्येक नक्षत्रातील १ ले पद १ ला, ५ वा , ९ वा नवांश दर्शवते.
प्रत्येक नक्षत्रातील २ रे पद २ रा, ६ वा , १० वा नवांश दर्शवते.
प्रत्येक नक्षत्रातील ३ रे पद ३ रा, ७ वा , ११ वा नवांश दर्शवते.
प्रत्येक नक्षत्रातील ४ थे पद ४ था, ८ वा , १२ वा नवांश दर्शवते.
अशा प्रकारे वेगवेगळ्या विचारांनी आपण व वेगळे दृष्टीकोनातून मूळ ज्योतिष तत्वे अभ्यासली, तर जास्त सूक्ष्म फळे हाती येऊ शकतात, असे मला वाटते.
उदा.
एखाद्या जातकाचा लग्न नवांश कन्या आहे.
व चंद्र नवांश मकर आहे.
तर तुम्ही एखाद्याचा स्वभाव, मानसिकता, व्यक्तिमत्व ठरवताना तुम्हाला लक्षात येईल की, दोन्ही नवांश अर्थ त्रिकोणाचे व पृथ्वितत्वाचे प्रतिनिधित्व करतात. व शनी, बुध, मकर, कन्या, व मकर या उपलब्ध माहितीवरुन चटकन अंदाज बंधू शकता.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : ज्येष्ठा नक्षत्र विचार
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : नक्षत्र ज्योतिष
नमस्कार,
आज आपण ज्येष्ठा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. ज्येष्ठा हे नक्षत्र चक्रातील १८ वे क्रमांकाचे नक्षत्र असून ज्येष्ठा नक्षत्राची आकृती उघडलेल्या छत्रांच्या मधल्या दांड्यासारखी आहे किंवा आपण बोटामध्ये लाल खड्याची अंगठी घालावी त्या प्रमाणे दिसते. या नक्षत्रामध्ये ३ प्रखर व लालसर रंगाचे तारे असून त्यातला मधील तारा ठळक व लाल आहे. हा तारा महाराक्षसी वर्गातील असून त्याला स्तावर्णी खुजा तारा म्हणतात. त्याचा व्यास सूर्यव्यासाच्या २८५ पट आहे. इंग्रजीत या नक्षत्राला ‘अंटारिस’ असे म्हणतात.
पूर्वी आकाशात दोन नक्षत्रं होती. ज्येष्ठ नक्षत्राचे पूर्वीचं नाव ज्येष्ठा रोहिणी होते. या ज्येष्ठा नक्षत्राच्या बरोबर १८० अंतरावर एक तारका आहे, तिला कनिष्ठ रोहिणी म्हणतात. त्यामध्ये ज्येष्ठामधील रोहिणी हा शब्द व कनिष्ठमधील कनिष्ठ हा शब्द लोप पावला. ज्येष्ठा हे नक्षत्र चक्रामध्ये १८ वे नक्षत्र आहे. १८ या अंकाला फार महत्त्व आहे. कारण १८व्या वर्षी मुले सज्ञान होतात, वयात येतात. त्याला सज्ञान म्हणतात. म्हणजेच तो ज्येष्ठ होतो.
ज्येष्ठा नक्षत्र मध्यलोचन संज्ञक तीर्यङ्मुख, दारूण व राक्षसगणी आहे. नक्षत्राचा स्वामी बुध. राशीस्वामी मंगळ व दैवत इंद्र आहे. त्यामुळे या नक्षत्रात इंद्राचा खलपणा, मंगळाचा हट्टीपणा व बुधाचे चातुर्य यांचा संगम झालेला दिसून येतो. तसेच या नक्षत्राचे ४ ही चरण वृश्चिक राशीत येत असल्याने ते चतुष्पादी नक्षत्र आहे व या चार चरणांवर अनुक्रमे गुरू व शनीची सत्ता आहे. हे नक्षत्र व वृश्चिक राशी एकाच ठिकाणी संपत असल्याने ते गंडांतर तारा योगातील नक्षत्र आहे.
ज्येष्ठा नक्षत्र राक्षसगणी व क्रूरकर्मी आहे. या नक्षत्रात अशुभ गुणधर्म जास्त दिसून येतात. या नक्षत्रावरचे जातक हट्टी, खुनशी, सूड वृत्ती, रागीट, कपटी, द्वेषी, कोत्या मनाचा, निष्ठुर, नीतिभ्रष्ट, खोडकर, स्त्री लंपट, थोड्या विश्वासघातकी, द्वेषी व भांडखोर असू शकतो. पण हे ही तेवढेच खरे, या नक्षत्रात जास्त अशुभ गुण असले तरी माणसाला उच्च पदाला नेणारे, श्रेष्ठ पदाला नेणारे, अधिकार योग देणारे व वैभवाला नेणारे आहे. म्हणून उच्चपद मिळवण्यासाठी हे जातक महत्त्वाकांक्षी स्वभावाचे, शूर, धाडसी, पराक्रमी, अत्यंत निश्चयी व कर्तृत्ववान, धडपड्या स्वभावाचे असतात. श्रम व कष्ट घेण्याची तयारी असते. मात्र बुद्धी खल व स्वार्थी असते. दुर्योधनाचे ज्येष्ठ नक्षत्र होते असे म्हणतात.
या नक्षत्रावर जन्मणाऱ्या जातकांचा बांधा मध्यम, उंच, आडवा, मजबूत व सशक्त असतो. अवयव रुंद व जरा तोकडे असतात. कमरेचा खालचा भाग तोकडा व वर उंच असतो. कपाळ भव्य, चेहरा त्रिकोणी, नाक जरा नकटे व ठसठशीत असते. काटकपणा व चिवटपणा चांगला असतो. शारीरिक उर्जा व रोग प्रतिकार शक्ती उत्तम असते. पुरुषांना हे नक्षत्र उत्तम आहे. कारण धाडस, शौर्य, पराक्रम, स्वावलंबित्व, अधिकारलालसा, कर्तबगारी हे पुरुषांना लागणारे गुणधर्म चांगल्या प्रकारे आढळून येतात. बुद्धीही तीष्ण, धारदार व उत्तम असते. मात्र जरा खलपणा आढळून येतो. हे नक्षत्र बिघडल्यास फारच अशुभ असते. गुन्हेगारीकडे पटकन कल वळतो. बिघडले असता व्यसनी, मारामाऱ्या करणारे, बळ व अधिकाराचा दुरुपयोग करून लोकांना छळणारे, परस्त्रीची अभिलाषा धरणारे, जुगारी, सट्टा, रेस यांचा नाद असणारे, मत्सरी व सूड घेणारे निपजतात.
ज्येष्ठा नक्षत्र स्त्रियांना साधारण आहे. कारण सौंदर्य, रूप, कला, माया, प्रेम, दया या गुणांचा अभाव दिसून येतो. शरीरप्रकृती बरी असते. बांधा आडवा, मजबूत, सशक्त व जरा भारदस्तच दिसतो. चेहरा त्रिकोणी, जरा रागीट असून डोळे जरा भेदक व खुनशी दिसतात. शारीरिक काम व श्रमाच्या दृष्टीने मात्र हे नक्षत्र चांगले असते. स्वभाव जरा हट्टी, रागीट, जहांबाज, कुढ्या व द्वेषी असतो. कोणत्याही साध्या कारणाने रुसणे, फुगणे चालू असते. वेळप्रसंगी त्राटिकेचा अवतार धारण करतात. तसे नक्षत्र अनुकूल असता, त्या पुरुषाप्रमाणेच कर्तृत्ववान, पराक्रमी आढळतात. ज्येष्ठा नक्षत्र बिघडलेले असता कुटील कारस्थानी, कपटी व गुन्हेगारीकडे वळणाऱ्याही असतात. चैनी, ख्यालीखुशाली व सिनेमा नाटकांच्या शौकीन असतात. या नक्षत्राच्या स्त्रियांना खास वैशिष्ट्यपूर्ण पोशाख, अलंकार किंवा फॅशनची आवड नसते. जर स्त्रीच्या कुंडलीत इयत कुयोगाने बिघडलेला शुक्र असेल, तर अशा स्त्रियांचा पुरुषवर्ग गैरफायदा घेणारा असू शकतो. अशा स्त्रियांना विवाह किंवा इतर शुभ समारंभात कैकयीप्रमाणे विघ्ने आणण्याची फार हौस असते. कला-कौशल्य किंवा धनाच्या दृष्टीने मात्र ते फारसे महत्त्वाचे नाही.
ज्येष्ठा नक्षत्राखाली येणारा वर्ग म्हणजे डॉक्टर्स, शस्त्रक्रिया करणारे, वैदू, पोलिस खात्यातील विशेषतः डिटेक्टिव्ह खात्यात काम करणारा वर्ग, हेरगिरी करणारे, इंजिनिअर्स, कारखानदार, शस्त्रास्त्र व दारूगोळा यांच्या कारखान्यात काम करणारे, औषधी कंपन्यात काम करणारे, केमिस्ट, हॉस्पिटलमध्ये विष अथवा लस यासंबंधी संशोधन करणारे, वकील, बॅरिस्टर्स, मिलिटरीमध्ये असणारे शिपाई, अधिकारी, कस्टम एक्साईज ऑफिसर्स, फिरते रिप्रेझेन्टेटेव्हज, मॅजिस्टिट, शेतात कसणारी कुळे, कारखान्यातील मुकादम, खेडेगावातील पोलिस पाटील, सरपंच, रानातील फॉरेस्टर्स, जॉबर्स, तसेच बिघडले असता चोर, दरोडेखोर, भानगडीचे धंदे करणारे, स्मगलिंग किंवा अड्ढे चालवणारे ई. या नक्षत्राचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे नक्षत्र जातक स्वतःच्या पराक्रमाने, हुशारीने व कर्तबगारीने अधिकारपदावर पोहोचतात.
ज्येष्ठा राक्षस गणी नक्षत्र असल्याने, या नक्षत्रावर होणारे आजार दाहक व कडक असतात. कापणे, भाजणे, धडपडणे, खरचटणे, शस्त्रांच्या जखमा, ऑपरेशन, अपघात, हाडांचा चुराडा होणे, अतिशय उष्णतेने डोळे जळजळणे, विषमज्वर, विषारी प्राण्यांचा दंश, गुप्तरोग, कावीळ, मूळव्याध, साथीजन्य रोग, किडनीचे विकार हे आजार जास्त आढळून येतात.
ज्येष्ठा नक्षत्री रवि शरीरप्रकृती व अधिकारयोगाच्या दृष्टीने उत्तम. बांधा मजबूत व सशक्त असतो. मात्र स्वभावाने हे जातक कुचकट, करड्या शिस्तीचे व जरासे खवचट असू शक तात. हाताखालील लोकांना त्रास देण्यात त्यांना मजा वाटते. ममत्व, शूर पराक्रमी असतात.
ज्येष्ठा नक्षत्री चंद्राल जरा प्रतिकूल. शरीरप्रकृती सशक्त असते. स्वभाव अतिशय हट्टी, कुढा, जळाऊ, मत्सरी व द्वेषी असतो. मन कमकुवत असते. नैराश्य जास्त दिसून येते.
ज्येष्ठा नक्षत्री मंगळाला हे नक्षत्र अनुकूल आहे. बांधा आडवा पण मजबूत सशक्त असतो. शरीरप्रकृती निरोगी, उत्तम असते. चेहरा रागीट व तेजस्वी असतो. स्वभाव मानी, तापट पण धीमा व मुत्सद्दी असतो. तो डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील अशा विद्येला चांगला. शस्त्रक्रिया उत्तम जमते. हे जातक थोडे कंजूष, कडक, अधिकारलालसा जास्त, लवकर अधिकारयोग, पोलिस व मिलिटरी खाते ई. साठी अनुकूलअसतो. मात्र मंगळ बिघडलेला असता तेवढाच दुर्वर्तनी व गुन्हेगारीवृत्तीचा निघतो.
ज्येष्ठा नक्षत्री बुध साधारणच. बुद्धी खल व बिघडणारी असते. शरीरप्रकृती अशक्त व रोगट असते व बुध बिघडलेला असता वेड लागण्याची भीती असते.
ज्येष्ठा नक्षत्री गुरु साधारण आहे. शरीरप्रकृती व बांधा बरा. इंजिनिअर व वकिलीला चांगला, तरी बुद्धी मध्यम असते. मात्र अधिकार व उच्चपद मिळते.
ज्येष्ठा नक्षत्री शुक्राला फारसे अनुकूल नाही. चैन, रंगेलपणा, व्यसने याकडे प्रवृत्ती असते. कामेच्छा तीव्र व भडकती असते. विरोधी प्रेमात भंग, वारंवार अबोला, हट्टी स्वभाव, खुनशीपणा आढळतो.
ज्येष्ठा नक्षत्री शनि असता शरीरप्रकृती उत्तम पण काबाडकष्ट करणारा, दरिद्री, संकटे भोगणारा, हाल- अपेष्टा भोगणारा, निर्दय, खुनशी, कपटी, पुष्कळ दिवस टिकणारे आजार असू शकतात. विद्या व बुद्धी कमी व त्यातून बिघडलेला असता चोर, दरोडेखोर व बंधनयोग होणारा असतो.
ज्येष्ठा नक्षत्री राहू असता बांधा उत्तम, शूर, धाडसी, पराक्रमी, कर्तृत्ववान, राक्षसी महत्त्वाकांक्षा असणारा, उलाढाली करणारी पण फसवा, स्वार्थी, कुटील व कारस्थानी निपजतो. हा मोक्याच्या ठिकाणी लष्करात अथवा पोलिस खात्यात अधिकारयोग देतो.
ज्येष्ठा नक्षत्री केतू असता शरीरप्रकृती बिघडलेला, रोगी, संकटे, हालअपेष्टा भोगणारा आढळतो.
ज्येष्ठा नक्षत्री हर्षल असता मजबूत बांधा, बुद्धीने हुशार, चाणाक्ष, संशोधक, हुशारीने, कर्तबगारीने उच्च पदाला जाणारा कल्पक निपजतो. मात्र शुक्राबरोबर असता लैंगिक विकृती तपासून घ्या. विषयवासना विकृत असते. विध्वंसक मार्गाकडे प्रवृत्ती असते व हर्षल मुत्सदेगिरी, धुरंधर राजकारणी, क्रांतिकारक यांना चांगला. नेपच्यून असता जरा निराशा, संघ, उदास मनाचा असतो.
ज्येष्ठा नक्षत्राला ‘ज्येष्ठघ्नी’ असे पण नाव आहे. या नक्षत्रावर जन्मलेल्या बालकाच्या ज्येष्ठ भ्रात्याचा मृत्यू होतो अशी समजूत आहे. म्हणून ज्येष्ठ नक्षत्रावर शांती करण्याची पद्धती आहे. ज्येष्ठ नक्षत्र नेहमी ज्येष्ठपणासाठी धडपडत असतो. म्हणून त्याच्यापेक्षा कोणी मोठा असल्यास त्याच्या नाशाशिवाय ज्येष्ठपद मिळत नाही. म्हणून ते अनिष्ट आहे. जर वर ज्येष्ठ व वधू पण ज्येष्ठ असल्यास ज्येष्ठ महिन्यात विवाह करू नये. त्रिजेष्ठा हा अशुभ योग होतो.
पारंपारिक ज्योतिष शास्त्रात ज्येष्ठ नक्षत्राच्या एकूण कालाचे १० समान विभाग करतात.
पहिल्या भागात जन्म असता मातेची आई मृत होते.
दुसऱ्यात मातेच्या पित्याचा मृत्यू,
तिसऱ्यात मातृत्वनाश,
चौथ्यात मातृनाश,
पाचव्यात स्वतःचा नाश,
सहाव्यात गोत्रजनाश,
सातव्यात माता व पित्याच्या कुलाचा नाश,
आठव्यात ज्येष्ठ बंधूंचा नाश,
नवव्यात सामन्याचा नाश
दहाव्यात सर्वांचा नाश
अशी अनिष्ट फळे दिली आहेत.
ज्येष्ठ नक्षत्रावर जन्मलेला पुत्र आपल्या ज्येष्ठ भावाचा नाश करतो व कन्या तिच्या ज्येष्ठ दिराचा नाश करते. ज्येष्ठाच्या पहिल्या तीन चरणांवर जन्मलेला मनुष्य श्रेष्ठ व पराक्रमी होतो पण चौथ्या चरणी जन्मला असता माता पिता व स्वतः चा नाश होतो.
टीप : या बरोबरच पत्रिकेतील इतर कुयोग का इंगित करत आहे हे पासाने गरजेचे असते.
ज्येष्ठा नक्षत्रावर जन्मणाऱ्या जातकाचेचे अक्षर ठळक, टपोरे व मोठे असते. वळण दिसून येत नाही. लिहिताना फार दाबून लिहितात. ९ या अंकाचे वर्चस्व दिसून येते. मंगळाचे पोवळे किंवा बुधाचा पाचू लाभदायक ठरतो. नक्षत्र मध्यलोचनी असल्याने बराच प्रयत्न केला तरच हरवलेली वस्तू पश्चिम दिशेला मिळू शकते. अन्यथा वस्तू गेलेली असते.
मुहूर्तशास्त्रात शुभकार्याला ज्येष्ठा नक्षत्र अगदी वर्ज्य आहे. तरी यावर जमीन नांगरणे, अग्निहोम, प्रयाण, गलबत पाण्यात लोटणे, मंत्रसाधन, पिशाच्च किंवा गारुडी विद्या शिकणे, पुरलेले द्रव्य काढणे, राज्याभिषेक, नृत्य शिकवण्यास आरंभ, चौल, वधू प्रवेश, हिंस्र पशूंना शिक्षा करणे व ऑपरेशन यांना बरेच चांगले.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)