
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : ग्रहांची सकारात्मक-नकारात्मक अभिव्यक्ती
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : ELEMENTS OF ASTROLOGY AND PSYCHOLOGY
नमस्कार,
ज्योतिष शास्त्रीय अभ्यासात गोल गोल फिरत आज, पुन्हा एकदा नजर ग्रहांकडे वळाली. व मनात विचार चक्र चालू झाले. आणि मन विचारते झाले के, खरच हे ज्योतिष शास्त्र प्रत्येकाच्या आवाक्यात येऊ शकते का? तर मनाचे हो उत्तर आले. आपण कसे २००९ पासून टप्प्याटप्प्याने अभ्यास सोपा सोपा मार्ग शोधत आत्मसात करत आलो हे आठवले. आणि मग मन ग्रहाच्या मागे लागले.
१. ग्रह हे अनुभवाचे विशिष्ट परिमाण दर्शवतात.
२. राशी अनुभवाचे विशिष्ट गुण दर्शवतात.
३. स्थान/भाव अनुभवाची विशिष्ट क्षेत्रे दर्शवतात, ज्यामध्ये ग्रह आणि राशी यांची ऊर्जा कार्यरत असते.
४. दृष्टी (ग्रहांमधील कोनीय संबंध) अनुभवाची विविध साधने प्रकट करतात.
या सर्व गोष्टींचा एकत्र विचार करून निर्णयापर्यंत येण्याची ही कला व अभ्यास व ऊर्जा आहे. ज्यामुळे उर्जेची भाषा म्हणजे ज्योतिष असे मी मानतो.प्रत्येक ग्रह त्याच्या दशे अंतर्दशेत चांगली व अनिष्ट अशी दोन्ही फळे दयायला बांधील असतो. फक्त प्रत्येक ग्रह त्याच्या स्वभावाप्रमाणे ग्रह स्थिती, रास, दृष्टी ई. द्वारा सर्जनशील किंवा आत्म-विनाशकारी फळ देणार असतो.ग्रहांची सकारात्मक-नकारात्मक अभिव्यक्तीप्रत्येक ग्रह तत्त्व सकारात्मक आणि सर्जनशील किंवा नकारात्मक आणि आत्म-विनाशकारीपणे व्यक्त केले जाऊ शकते. कर्म – कर्माचा परिणाम – आणि त्या परिणाम मुळे निर्माण झालेले कर्म अथवा संचित या अनुभवाची प्रतीक्रिया ही नैतिक दृष्टीने सुसंगत असू शकते किंवा विसंगती आणि मतभेदाच्या स्थितीत असू शकते. याचा परिणाम सर्जनशील वापरात होतो किंवा या विविध ऊर्जा, शक्ती आणि वृत्ती यांचा गैरवापर होतो. यासाठी प्रत्येक ग्रहाच्या प्रत्येक पैलूंचे विश्लेषण करणे आवश्यक ठरते. जेणेकरून जातकामध्ये सामंजस्य किंवा मतभेद किती प्रमाणात आहेत हे समजून घेण्यास खूप मदत होते. ग्रहाचे मूळ परिणाम देण्याचे स्वरूप समजले की, मग घटनेच्या जवळ जाण्याचा मार्ग उलगडत जातो.
वर दिलेले ४ मुद्दे तपासून त्यांचा त्रिक स्थाने (६ ८ १२) शी कोणत्याही प्रकारचा संबंध व संबंधित प्रश्नांचे स्थानाचा विरोधी ग्रह प्रभावी आहेत का हे तपासले की जन्म कुंडलीचा निम्मा ढाचा लक्षात येतो.
या छोट्याशा मंथनात दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स व व दिलेल्या तक्त्यातील वैशिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवत योग्य अभ्यास करून फलादेशाची सांगड घालता आली तर तुम्ही एक ज्योतिषी होऊ शकता.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : पूर्वाषाढा नक्षत्र विचार
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : नक्षत्र ज्योतिष
नमस्कार,
आज आपण पूर्वाषाढा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.
पूर्वाषाढा हे नक्षत्र चक्रातील २० वे क्रमांकाचे नक्षत्र असून या नक्षत्राला इंग्रजीमध्ये ‘आल्फा डेल्फिनी’ म्हणतात. या नक्षत्रामध्ये २ तारे असून नक्षत्राची आकृती हत्तीच्या दातासारखी किंवा काहींच्या मते शय्याकृती आहे. तारे ठळक व पांढऱ्या रंगाचे असून मध्यम तेजस्वी आहेत. आषाढ महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसते. या नक्षत्राचे ४ ही चरण धनु राशीत येत असल्याने ते चतुष्पादी आहे. नक्षत्राचा स्वामी शुक्र, दैवत उदक नावाची देवता व राशीस्वामी गुरु असल्याने या नक्षत्रात शुक्राची हौस व सौंदर्यदृष्टी, उदक या देवतेचा उदारपणा व गुरुचा न्यायीपणा व समतोलपणा या गुणांचा सुंदर संगम दिसून येतो. तसेच हे नक्षत्र अधोमुख, उग्र, क्रूर, अंधलोचनी, मनुष्यगणी आहे. हे नक्षत्र मनुष्यगणी असल्याने या नक्षत्रात फार प्रखर व वैशिष्ट्यपूर्ण फलादेश दिसून येत नाही. शुभ व रजो गुणधर्माचे मिश्रण दिसून येते, खावे-प्यावे, मजा करावी, फक्त आपला संसार व आपल्यापुरते बघावे. फारशी महत्त्वाकांक्षा नसणे हे गुण आढळतात. विद्या व बुद्धी, सुख साधारण, जरा अभिमानी, गर्विष्ठ, चैनी, आनंदी, रजोगुणी, स्वार्थ साधून समाजसेवा व कामापुरती देवाची भक्ती, टापटीप, व्यवस्थितपणा, धाडसीपणा साधारण.
पूर्वाषाढा नक्षत्र स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त चांगले. कारण पुरुषांना लागणारा राकटपणा, कणखरपणा, काटकपणा, स्वतंत्रवृत्ती, अधिकारलालसा, स्वावलंबित्व हे गुण चांगले दिसून येतात. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या जातकांचा बांधा मध्यम उंच, थोडा आडवा, शरीर हाडापेराने मजबूत, थोडे पीळदार पण प्रमाणबद्ध असते. सांध्यातील हाडे जरा मोठी, रुंद व लांब असतात. मनगटे पीळदार असतात. कपाळ मोठे व डोके मोठे असते. गालफाडे वर असून कोणताही पदार्थ गालफडात साठवून चावून चावून खायची सवय असते. चेहरा दिसण्यात चारचौघासारखा व थोडा बुद्धीमान असतो. या जातकांना व्यायामाची वगैरे फारशी आवड नसली तरी त्यांची अंगकाठी मूळचीच मजबूत असून शारीरिक ऊर्जा व प्रतिकारशक्ती उत्तम असते. स्वभावाने उदार व उदात्त असल्या तरी आपल्यापुरते पाहणारे, अभिमानी, वारंवार कायद्याच्या भाषेत बोलणारे, बऱ्याच वेळा कीस काढणारे व किरकिरे असतात. कमी कष्टात आहे त्याच परिस्थितीत समाधान मानणाऱ्या असतात. खादाडपणा जास्त असून त्यांना सात्विक व चवदार अन्न लागते.
पूर्वाषाढा नक्षत्र स्त्रियांना फारसे अनुकूल नाही. हे शुक्राचे नक्षत्र असले तरी शुक्राचे सुडौल, बांधेसूद शरीर, कोमलपणा, नाजूकपणा, रेखीवपणा, सौंदर्य किंवा कला या गोष्टी दिसून न येता थोडेफार सुस्तपणा, ऐदीपणा, छानछोकीपणा असू शकतो. या स्त्रिया जवळजवळ पुरुषी बांध्याच्या व जरा राकट दिसतात. हाडपेर जास्त मजबूत असते. चेहराही जरा पुरुषी वळणाचा असू शकतो. छाती विशाल, रुंद व खांदेपण रुंद असतात. बांधा मजबूत व सशक्त असतो. स्वच्छ व नीटनेटक्या पोशाखाची आवड असते. स्वतंत्र वृत्ती व अधिकारलालसा दिसून येते. उत्तम गृहिणी व संसाराला लागणारे गुण व्यवहारकुशलता व कर्तव्यदक्षता आढळते. कलाकौशल्य, कलाकुसर, संगीत, गायन, वादन, नृत्य अशा कलांसाठी साधारण.
पूर्वाषाढा नक्षत्राखाली येणारा वर्ग म्हणजे समाजामधील नोकरी किंवा व्यापारात असलेला, धार्मिक, पापभीरू असा मध्यमवर्ग. बँका, कंपन्या यात काम करणारा कारकुनी वर्ग, लहान प्रमाणात स्टेशनरी, पुस्तके विकणारे व्यापारी, छोटे छोटे अॅडव्होकेट, वकील किंवा इन्कमटॅक्स व सेल्सटॅक्सची प्रॅक्टिस करणारा वर्ग याखाली येतो. हे नक्षत्र फारसे अधिकार किंवा उच्चपदे अथवा श्रेष्ठत्व साठी साधारण.
पूर्वाषाढा नक्षत्र क्रूर व जरा अग्नितत्त्वाचे असल्याने या नक्षत्रावर होणारे आजार कमी, पण जरा दाहक स्वरूपाचे असतात. प्रकृती जरा उष्ण असते. उष्णतेच्या विकाराचा जास्त त्रास होतो. अंगाची लाहीलाही होणे, अंग खाजणे, कापणे, भाजणे, हाडे मोडणे, खरचटणे, धडपडणे, पाठीचे मणके घासणे, सरकणे, मणक्यात पाणी साचणे किंवा शुष्क होणे, मांड्यांना जखमा होणे, अपघात, मूळव्याध, कावीळ हे याचे मुख्य आजार होत.
पूर्वाषाढा नक्षत्री रवि शरीरप्रकृतीच्या दृष्टीने उत्तम, बांधा मजबूत, सशक्त व ताठ असतो. हाडपेर मजबूत असते. धन व अधिकारयोगाच्या दृष्टीनेही बरा पण बुद्धीच्या दृष्टीने सामान्य नीतिमान व सगुणी असतो.
पूर्वाषाढा नक्षत्री चंद्र हा रूप व संपत्तीच्या दृष्टीने चांगला असतो. चंद्र असता अनुकूल, आनंदी, संपत्तीमान, ऐश्वर्य भोगणारा, हौशी, विलासी व मित्रसंपन्न होतो. विद्या व बुद्धी मध्यम.
पूर्वाषाढा नक्षत्री मंगळ साधारण. शरीरप्रकृती सशक्त व मजबूत असते. थोडी व्यायामाची आवड असते. मात्र तामसी, उतावळा व गर्विष्ठं असतो. यांत्रिक कलासंबंधी शिक्षण पूर्ण होते. शस्त्रक्रिया व अपघाताची भीती असते.
पूर्वाषाढा नक्षत्री बुध सामान्य असतो. बुद्धी बरी, व्यवहारी व काटकसरी असून विचारवंत असतो.
पूर्वाषाढा नक्षत्री गुरु विद्या व शरीरप्रकृतीच्या दृष्टीने चांगला पण धन किंवा ऐश्वर्याच्या दृष्टीने मध्यम. बुद्धी साधारण असते. कायदा, न्याय, अर्थशास्त्र, स्थापत्यशास्त्र यांना चांगला. अधिकारयोग व दर्जा मिळतो.
पूर्वाषाढा नक्षत्री शुक्र ख्यालीखुशालीपणा व रंगेलपणा देतो. पण कला किंवा ऐश्वर्याच्या दृष्टीने अनुकूल नसतो. पण विचारी, व्यापारी वर्गाला चांगला. तब्येत मात्र साधारण असते.
पूर्वाषाढा नक्षत्री शनि शरीरप्रकृती व व्यापाराच्या दृष्टीने उत्तम. बांधा पीळदार, मजबूत व कणखर असतो. लोखंडाचा व्यापार, कारखानदारी अथवा कठीण वस्तूंच्या व्यापाराला उत्तम. बरेच प्रश्न व कष्ट घेऊन हे जातक यशस्वी व्यापारी बनतात. तसेच गुणवान, खटपटी, मेहनती, धनसंचय करणारे असतात.
पूर्वाषाढा नक्षत्री राहू शरीरप्रकृती व आरोग्य बरे देतो. धनाच्या दृष्टीने मध्यम व जास्त चैनी व ख्याली-खुशालीत दंग असतो.
पूर्वाषाढा नक्षत्री केतू निरोगी पण ओबडधोबड शरीर दर्शवितो. धार्मिक, आध्यात्मिक, तत्त्वज्ञान व परमार्थिक विद्येच्या दृष्टीने बरा.
पूर्वाषाढा नक्षत्री हर्षल असता शरीरबांधा व प्रकृती बरी असते. पण बुद्धीमान असल्या तरी सरळ मार्गाने जाणाऱ्या नसून जरा लहरी, विक्षिप्त, चैनी, विलासी आणि अघोरी महत्वाकांक्षा असणाऱ्या असतात.
पूर्वाषाढा नक्षत्री नेपच्यून प्रमाणबद्ध सुंदर शरीर, संगीत, गायन, वादन, कला यांच्या दृष्टीने बरा. हे जातक जरा हौशी, रसिक, आनंदी, कलाप्रिय व दैविक विद्येची आवड असणाऱ्या असतात.
पूर्वाषाढा नक्षत्राच्या ३ रे चरणात जन्म झाला असता माता, पिता, भ्राता व स्वतःला अनिष्ट फळ मिळते म्हणून शांती करावयाची पद्धत आहे.
पूर्वाषाढा नक्षत्री जन्मणाऱ्या जातकांचे अक्षर मोठे पण पोकळ असते. अक्षर वेडेवाकडे पण ठळक असते. या नक्षत्रावर ३ किंवा ६ या अंकाचे वर्चस्व दिसून येते. गुरुचा पुष्कराज किंवा शुक्राचा हिरा लाभदायक ठरतो. हे नक्षत्र अंधलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास पूर्वेला सापडू शकते.
मुहूर्तशास्त्रात हे नक्षत्र फारसे महत्त्वाचे नाही. हे नक्षत्र विहीर खणण्यास आरंभ करणे, पुरलेले द्रव्य काढणे, द्यूत खेळणे, गणितारंभ, मद्य काढण्यास आरंभ करणे, पुंसवन, अष्टप्राशन, मौजी, प्रयाण, शेतकामास आरंभ अशा कृत्यांना चांगले.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
विषय : राशी नुसार मंत्र, तंत्र, जप, ई. मुलभूत माहिती तक्ता
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : ज्योतिष भूषण डॉ. सौ. सविता महाडिक यांचा वाचनात आलेला एक लेख
नमस्कार,
मध्यंतरी ज्योतिष भूषण डॉ. सौ. सविता महाडिक यांचा एक लेख वाचनात आला. त्यात राशी नुसार मंत्र, तंत्र, जप, ई. मुलभूत पारंपारिक माहितीच एका विशिष्ट क्रमाने दिलेली होती. तिचा तक्ता रूपाने अभ्यास करताना उपयोग होऊ शकतो, म्हणून तक्ता स्वरूपात दिलेली आहे.


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)