
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : देव देऊळ मूर्ती प्रतीके भावार्थ आणि उपासना
लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : हिंदू संस्कृती
नमस्कार,
आज मि एका वेगळ्या विषयावर लिहिणार आहे. जगात दोन प्रकारचे लोक साधारणपणे आढळतात. धार्मिक, श्रद्धाळू व दुसरे अश्रद्ध विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन ठेवणारे. अर्थात या दोन्हीचे सोयीने मिश्रण करणारे लोकसुद्धा आहेतच. काहीवेळेस तथाकथित विज्ञाननिष्ठ ज्या वेळेस इतर लोक मंदिरात जाणा-या भक्तांची चेष्टा करत असतात व सांगत असतात की, तुमचा देव जर सर्व व्यापी आहे, तर मग त्यासाठी त्याला मूर्तीत किंवा देवळात शोधण्याची काय गरज आहे. देव सर्वव्यापक असल्याचे विधान वापरायचे, तर इतरत्र असल्या प्रमाणे तो ईश्वर देवळात, मूर्तीत सुद्धा असणारच हा मुद्दा ती माणसे विसरतात. केवळ या कारणास्तव, दगडाच्या मूर्तीची केवळ पूजा करीत नसून त्यातल्या ईश्वराच्या अस्तित्वाची, जो त्या स्वरूपात आहे, त्याची पूजा करतो. मूर्ति व देऊळ हे आमच्या मनाला ईश्वराच्या अस्तित्वाची जागरूकता आणून देण्यास मदत करीत असतात.
अनेकजन आपल्या कुटुंबाचा फोटो त्यांच्या ऑफिस मध्ये किंवा पाकिटात ठेवतात, ते त्या प्रिय व्यक्तीना विसरतात म्हणून नव्हे. तर त्यांना त्या फोटोमुळे आपल्या कुटुंबाबद्दल प्रेम जागृत होत असते व त्यांच्या प्रति आपुलकीचा भाव मनात येत असतो.
कांही लोक एखादा वापरलेल्या वस्त्राचा तुकडा जपून ठेवतात. तसे केल्यांने, त्यांना स्वतःच्या प्रिय असणा-या माणसांची आठवण व त्यांच्या प्रति असणारा जिव्हाळ्याचा व प्रेमाचा एक आनंद मिळत असतो इतरांना तो केवळ तुकडा आहे एवढेच वाटते. हा पण एका प्रकारे श्रद्धेचा व प्रेमाचाच भाग आहे.
एक गोष्ट तुम्हाला सांगतो-
एकदा स्वामी विवेकानंद एका नास्तिक राजाकडे गेले असतांना राजां त्यांना म्हणाला की मूर्ति पूजनात कांही अर्थ नसतो, कारण मूर्ति म्हणजे केवळ एखादा कागद किंवा दगड आहे असे माझे मत आहे. त्या राजाच्या राजवाड्यात बरीचशी वडिलोपार्जित चित्रे भिंतीवर अडकवलेली होती. स्वामी विवेकानंदांनी एका मंत्र्याला त्या राजाच्या आजोबाचे चित्र काढून जमोनीवर ठेवण्यास सांगितले. नंतर ते चित्र तुडविण्यास सांगून त्यावर धुंकण्यास सांगताच, तो राजा भडकला व ओरडला, “हे काय करण्यास आपण सांगत आहात ?”
स्वामी विवेकानंद म्हणाले, मी त्यास त्या चित्रावर युंकण्यास सांगितले.”
तेव्हां तो राजा उद्वेगाने म्हणाला, आपण तसे कसे म्हणता? आपण माझ्या आजोबांचा असा अपमान करत आहात.
स्वामी विवेकानंद शांतपणे म्हणाले, त्यात काय चूक आहे माझी? हे तर केवळ एक चित्र आहे, ते आपले आजोबा तर नाहीत ना?
त्याच क्षणी राजाच्या डोक्यात प्रकाश पडला व त्यांनी तात्काळ स्वामी विवेकानंदांचे पाय धरले व क्षमा मागितली आणि मूर्ति पूजनाचा गूढार्थ ध्यानात आणून दिल्याचे आभार मानले.
सामान्यतः एखाद्याच्या नुसत्या फोटोला किंमत नसते, पण वर दिलेल्या उदाहरणा प्रमाणे तो फोटो केवळ एक फोटोच नसून, त्या राजघराण्याची परंपरा व प्रतिष्ठा दर्शविणारा एक महत्त्वाचा भाग होता. त्या राजाच्या सत्तेचे व राजघराण्याच्या संस्थानाचे, ते चित्र, हे एक साकार प्रतीक होते.
सांगण्याचा उद्देश एवढाच की, इतरांना एखादी वस्तू कितीही गौण वाटली तरी, तीच वस्तू दुस-या व्यक्तीस अगदी निराळा अनुभव व भाव उत्पन्न करण्याचे सामर्थ्य ठेवू शकते. त्याच प्रमाणे वैदिक धर्मात देखील, भौतिक जगांतल्या प्रमाणे मूर्ति-पूजनांत, भक्ताला ती केवळ दगडाची मूर्तिच वाटत नसून, त्यांतून त्या भक्ताला त्याच्या इष्ट देवाच्या अस्तित्वाची जाणीव व अनुभव येत असतो. असा हा अनुभव एकाएकी होत नसून, निरंतर पूजनाने मन इष्टदेवावर एकाग्र केल्यांने, व त्यावर अगाध प्रेम केल्यांने, योग्य वेळ आल्यावर होतो. हे लिहित असताना मला नाशिकचे होराभूषण मनीष गोसावी सरांची आठवण झाली. मध्यंतरी एका झूम मीटिंग मध्ये एकत्र आलो असताना ते बोलताना म्हणाले होते की, ग्रह प्रत्यक्ष बोलतात कुंडली तपासताना, अन्यथा स्थाने आणि नुसती आकडेमोड यातच अडकून पडतो. किती हि एकरूपता त्या ग्रह देवतांशी.
सारांश, देवळामुळे व त्यातल्या मूर्तिमुळे आपल्या अंतःकरणात देवाच्या अस्तित्वा बद्दल भाव निर्माण होत असतात. हे सर्व जरी बाह्य असले, तरी ज्ञान व जागरुकता आपल्या अंतरंगात होत असते. ईश्वराच्या अस्तित्वाचा हा ज्ञानबोध, एका स्वरुपात व एका स्थळी पाहणे हा एक असा अभ्यास आहे, ज्यांने आपले मन पवित्र होते. आणि मग तशा पवित्र व तयार झालेल्या मनात परम सत्यानेच सर्व ब्रह्मांड व्यापलेले आहे, व ते म्हणजेच मी असे आत्मज्ञान विकसित होते.
मंदिराची सांस्कृतिक भूमिका
हिन्दू धर्मात देवस्थानाचे कार्य केवळ प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक अध्यात्मिक गरजा पुरविणे, एवढेच नसून आणखीही जास्त आहे. पूर्वी देवस्थानात धार्मिक शिक्षण, प्रवचने, वार्षिक उत्सव ई. होत असत आणि ते संगीत व इतर कलांचे क्षेत्र देखील मानले जात हा ईश्वराच्या पूजेचाच भाग आहे, असे जाणून कित्येक कलाकार आपल्या चित्रकलेचे, नृत्याचे किंवा संगीताचे अविष्कार देवळात सादर करीत असत. देवस्थानात सर्व एकत्र येऊन आपले व्यक्तिगत, अध्यात्मिक व सांस्कृतिक अनुभव परस्परांना सांगत आणि एकूण संस्कृतीच्या उन्नतीचा व अभिवृद्धीचा आणि लोक-कल्याणाचा विचार विनिमय करत.
आता देवळात फारशी प्रवचने होत नसल्याने, कर्मकाण्डाच्या मागे काय अर्थ आहे हे जाणून न घेताच लोक केवळ कर्मकाण्डातल्या विधि करण्यातच फार गुंतत असतात. आपली देवळे पुन्हा पूर्ववत व्हावयास हवीत. तिथे सर्वांनी एकत्र येऊन आपला इतिहास व आपली संस्कृति शिकावी व आपला धर्म व तत्त्वज्ञान शिकावे म्हणजेच देवळाचा खरा उद्देश पूर्ण होईल.
देवळाचा आणखी एक गूढ गर्भितार्य आहे, जो अनेक जणांना माहित नसतो. असे म्हणतात की देवळाची बांधणी, माणसाच्या शरिरास अनुसरून असते.
जसे शरिरात एक हृदय (मन किंवा बुद्धि) आहे, ज्यांत देव सामावलेला आहे, त्याचप्रमाणे देवस्थानाच्या आवारातल्या अगदी आंतल्या भागात, गर्भ गृहात, ईश्वराचे वास्तव्य असते. जणूं माणसाचे शरीर म्हणजे देवळाचे आवार, गर्भ गृह म्हणजे त्याचे हृदय, ज्यांत ईश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव आम्हास येत असतो.
दक्षिण भारतातल्या देवळात प्रामुख्याने, देवस्थानाचा सबंध बहिर्मुख आवार अतिशय विस्तीर्ण असतो, परंतु देवाची मूर्ति ज्या ठिकाणी असते ती जागा मात्र फारशी मोठी नसते. गर्भ गृहात बहुधा अंधार असतो आणि ज्या वेळेस दर्शनाकरिता तुम्ही जाता, तेव्हां तिथले पुरोहित दिव्याच्या उजेडांत आणि कापुराच्या प्रकाशात ईश्वराची मूर्ति तुम्हाला दाखवतात.
याचे तात्पर्य असे की, जे ब्रह्म (परमसत्य), तो ईश्वर जो माझ्यात हृदयस्थ आहे, तो अज्ञानाच्या अंधकाराने पूर्णतया झाकला गेला आहे आणि त्याचे अस्तित्व अजून मी जाणून घेतलेले नाही किंवा बघितले नाही. कापूराची आरती पुरोहिताने दाखविली म्हणजे केवळ एक सुगंधाचा गोळा, जो जळाल्यानंतर कांहीच बघण्याचे उरत नाही. (सुगंधाला वास किंवा वासना असे म्हणतात.) तो गंध आपल्या मनातल्या दुर्विचारांना व दुर्गुणांना दर्शवितो आमच्यातल्या एकत्रित झालेल्या वासना म्हणजे अहंकार, जो इच्छा, राग व द्वेष या रूपाने अवतरित होत असतो. देवळात कापूर जाळणे म्हणजे आपल्या हृदयातल्या ज्ञानाग्निला उज्वलित करून अहंकाराला पूर्णपणे जाळणे असे आहे. त्या ज्ञानाच्या उजेडात मग “परमात्म्याचे दर्शन” होते, जो आमच्या हृदयाचा स्वामी आहे.
देवपूजा झाल्यानंतर, कापूराची आरती जेव्हां सर्वांच्या पुढे नेतात, तेव्हां सर्व त्या ज्योतीवर हात ठेवून, ते डोळ्यास लावतात. असे करणे म्हणजे ज्या ज्योतिच्या उजेडात आम्ही ईश्वरास पाहिले, ती ज्योत सदैव आपल्या डोळ्यापुढे असावी असा संदर्भ आहे कारण जे डोळ्यास दिसते, ते हृदयात जाते. तेव्हां, त्या संदर्भाने, जेव्हां आम्ही निर्मित झालेल्या जगास पाहतो, तेंव्हां सर्वत्र ईश्वर रूप झालेले आहे या नवीन दृष्टीने पाहतो.
ईशावास्य उपनिषदातल्या प्रसिद्ध असलेल्या पहिल्या श्लोकातून हाच उपदेश देण्यात येतो –
” ईशावास्यम् इदम् सर्वम्”
म्हणजे संपूर्ण विश्व ज्याने व्यापित आहे किंबहुना जे सर्व अस्तित्वात आहे ते सर्व ईश्वराचेच स्वरूप आहे.
पुढ्यात आलेल्या आरतीच्या थाळीत दान अर्पण करण्याचा सुद्धा एक संदर्भ आहे. तो असा की विश्वदर्शनाच्या भव्यतेची दृष्टी जेव्हां आम्हाला लाभते, तेंव्हां त्या मानानेच आम्ही पण उदार व्हावे. आरतीत घालतांना संकुचितपणा करू नये. कांही लोक मात्र कमीतकमी घालण्यास खिसे तपासतात किंवा थाळीतून मोड काढून घेण्यासदेखील कमी करत नाहीत. देवळात दिलेले पैसे जसे समाज कल्याणाकरिता असतात, त्याचप्रमाणे भगवंताचे अस्तित्वच सर्वत्र असल्याचा ज्यावेळेस आपण अनुभव घेतो, तेंव्हां आपली श्रीमंती व संपत्ति देखील आपण इतरांच्या समवेत भोगू शकतो.
पूजेच्या सर्वात शेवटी ईश्वरास दाखवलेला नैवेद्य “प्रसाद” म्हणून वाटण्यात येतो. सर्व साधारण, प्रसाद म्हणजे खाण्याचा असतो, एवढेच आम्हाला माहित असते. पण प्रसाद याचा खरा अर्थ म्हणजे पवित्रता, आनंद, समाधान, उत्साह व शांति असा आहे. हे सर्व पावणे म्हणजेच पूजेच्या वेळेस सर्वथा आपले मन भगवंताशी एकरूपतेच्या अनुभूतीचा लाभ घेणे. आम्ही जेव्हां अत्यंत प्रेमाने आणि भक्तिभावाने केलेल्या दैनिक पूजे नंतर ईश्वराच्या मूर्तीला न्याहाळतो, तेव्हां आपल्या हृदयात समाधान व शांति अनुभवणे, हाच खरा प्रसाद आहे. पण साधारणतः आम्ही पूजा जरी केली तरी, घाई-गडबडीत एक दोन मिनिटात तो संपवितो व झाली एकदाची असे म्हणतो. त्या कारणाने शांति व समाधानाचा प्रसाद आम्ही अनुभवू शकत नाही कारण देवाशी भावपूर्ण एकाग्र मन कसे करावे तेच ध्यानात घेत नाही.
आतापर्यंत देवळाचा व देवपूजेचा गर्भित अर्थ काय असतो एवढे जरी समजले, तरी पुष्कळ चांगली गोष्ट आहे.
देवाच्या प्रतीकांचीसुद्धा एक निराळीच भाषा आहे, आणि ती पूर्णपणे समजण्यास आपल्याला वेदांचा पुष्कळ सखोल अभ्यास करावा लागतो.
उदा. भगवान विष्णूंना पद्मनाभं असेही म्हटले आहे. भगवान विष्णूंच्या नाभीतून कमळाचे फूल येते असे आपण अनेक चित्रातून पाहत असतो. संस्कृत भाषेत “क” याचा अर्थ पाणी, आनंद व ब्रह्म” आणि “मल” म्हणजे अस्वच्छ किंवा घाण. “कमल” याचा एक अर्थ पाण्यातली घाण असा देखील होतो. पण इये “मल ” म्हणजे आपल्या मधून जी अस्वच्छता किंवा घाण येते, जसा घाम हा आपल्या मधूनच येतो, बाहेरून तो येत नाही, त्याच प्रमाणे, या प्रतीकात्मक भाषेत “ब्रह्म ” यातून जो मल बाहेर आला तो या कमळाच्या रूपाने आला. याचा अर्थ हा की श्रेष्ठ, उदात्त, अनंत ब्रह्मातून, “मी” हा सर्व प्रथम असलेला मनोविकार उगम पावला.
जेव्हां “मी” गाढ निद्रेत असतो, तेव्हां ती अव्यक्त अवस्या असते, ज्यांत सृष्टि किंवा जगत् या दोन्ही स्थिति अवगत नसतात. परंतु ज्या क्षणी जाग येते, तेव्हां पहिला विचार “मी” या जाणिवेचा होतो. जर आपण या अहंकाराचा मळ साफ केला तर ईश्वर प्राप्ती होईल.
ही प्रतीकात्मक भाषा आपल्याला असे दर्शविते की, आपण भगवंताच्या (ब्रह्माच्या) निरनिराळ्या स्वरूपावर त्याचा भावार्थ जाणून जर ध्यान केले, तर या बाह्य स्वरूपातून आपल्याला त्याचे श्रेयस आंतरिक स्वरूप कळेल. नाम व रूपाच्या पलिकडे असलेले ब्रह्मतत्त्व जाणून घेता येईल व संपूर्ण सृष्टीच्या स्थिति लयाचे ज्ञान होईल. यावरून हे पण उमजेल की परब्रह्म जरी विश्वरूपाने दृश्य जगात प्रगट होत असले, तरी ते उपाधिरहित चैतन्य स्वस्वरूपात निरंतर स्थित असते. यालाच खरे ध्यान म्हणतात.
तत्काळ जरी आपल्याला प्रतीकांच्या सूक्ष्म व उदात्त भावार्थाचे ज्ञान नसले, तरी मूर्ति पूजनाने कां असेना सुरुवात करावी. त्यावर मन एकाग्र करून प्रेमभाव जागृत करावा. ध्यान श्लोकावर आधारित असा एका मूर्तीचा हा भावार्थ आहे. हिन्दू धर्मात प्रत्येक मूर्तीचे असे ध्यान श्लोक आहेत. ज्या वेळेस त्या मूर्तिच्या मागचा अपूर्व भावार्थ जाणून आपण त्याची पूजा व त्यावर ध्यान करतो, तेंव्हां एक निराळाच अलौकिक अनुभव आपल्याला येतो.
जशी विद्युतशक्ति बॅटरीतून विजेच्या तारेत वाहते व त्यामुळे मोटार गाडी सुरु करता येते, तसे मंत्र विशिष्ट पद्धतीने म्हटल्याने, दैवी मंत्र शक्ति आपल्याला विशिष्ट निर्धारित परिणामासाठी प्रभावित करते. ध्वनिलहरीचा परिणाम आपल्या मनावर व शरिरावर देखील होतो.
उदा. एक पुरोहित, गृहस्थाश्रमो लोकांच्या घरी पूजा करीत असे व नंतर त्यांनी दिलेले गोडाचे सुग्रण जेवण जेवीत असे. त्यास मधूमेहाची व्याधि असूनही गोड पदार्थ खाण्याची अतिशय आवड होती. त्यास सूर्य सूक्त वैदिक मंत्र माहित होते व तो घरी आल्यावर ते म्हणत असे. ते मंत्र कांही विशिष्टवेळा म्हटल्याने त्याच्या शरिरातून घाम निघत असे. जेव्हां तो डॉक्टरकडे तपासणी करण्यास गेला तेंव्हां गोड खाण्याने कांहीही अपाय झाल्याचे डॉक्टरना आढळले नाही. जेव्हां वैदिक मंत्राचा पूर्ण अर्थ अजाणता जरी कोणी म्हटले तरी, त्याचा सपरिणाम शरिरावर व मनावर’ होत असतो. वैदिक मंत्रांचा असा विलक्षण प्रभाव आहे ।
या सर्व गोष्टींचे ज्ञान आपल्या ऋषी मुनींनी आत्मसात केले होते. ज्योतिषी म्हणूनच तुमच्या प्रारब्ध स्वरूप जन्म कुंडलीचा अभ्यास करून तुम्हाला योग्य असणारी उपासना, प्रतीके, यंत्रे, मंत्र, तंत्र ई. सुचवत असतो. ते उपाय सश्रद्ध व एकाग्र भावाने व सकारात्मकतेने केले तर त्याचा नक्कीच उपयोग होतो.
अगदीच काही नाही तर तुमचे कुलदैवत अथवा भावपूर्ण श्रद्धा असणाऱ्या देवाची नित्य उपासना दररोज केली, दर्शन घेतले तरी त्याचा चांगला परिणाम दिसून येईल.
आपल्या माहितीसाठी येथे प्रत्येक जन्म नक्षत्रासाठी नित्य उपासना मंत्र देत आहे.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : धनिष्ठा नक्षत्र विचार
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : नक्षत्र ज्योतिष
नमस्कार,
आज आपण धनिष्ठा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.
धनिष्ठा हे नक्षत्र चक्रातील २३ वे क्रमांकाचे नक्षत्र असून या नक्षत्राला इंग्रजीमध्ये ‘आल्फा डेल्फिनी’ म्हणतात. या नक्षत्राचे पहिले २ चरण मकर राशीत व शेवटचे २ चरण कुंभ राशीत असल्याने हे द्विपाद नक्षत्र आहे. धनिष्ठा नक्षत्र हे अंधलोचन, ऊर्ध्वमुख व चलरूप आहे. नक्षत्र स्वामी मंगळ, राशी स्वामी शनी व दैवत वसु असल्याने या नक्षत्रामध्ये मंगळाचा पराक्रम व निश्चयीपणा, मकरेच्या शनीची चिकाटी व कष्ट करण्याची वृत्ती, कुंभेच्या शनीची स्थिरता व बुद्धीप्रगल्भता व वसु देवतेची परोपकारी वृत्ती यांचा सुंदर मिलाफ आढळून येतो. या नक्षत्राच्या चारही चरणांवर अनुक्रमे रवि, बुध, शुक्र व मंगळाचे स्वामित्व आहे. धनिष्ठा या शब्दाचा अर्थ समशीतोष्ण म्हणजे ऋतुमानाचे ज्ञान देणारा असा आहे. फार प्राचीन काळी संपातबिदू या नक्षत्रामध्ये होता. धनिष्ठा नक्षत्राची आकृती चक्राकृती किवा मृदुंगा सारखी भासते. या नक्षत्रामध्ये एकूण ४ तारे असून ते जरासे काटेरी, तेजस्वी आणि पांढरट रंगाचे आहेत. भाद्रपद महिन्यात धनिष्ठा नक्षत्र रात्रभर आकाशात दिसते.
हे नक्षत्र राक्षसगणी असल्याने त्यात पराक्रम असला तरी, साधारण शुभत्व असून तमोगुण आढळतात.
धनिष्ठा नक्षत्रावर जन्मणारे जातक चंचल, निलाजरे, गायन वादनाचे शौकीन, छानछोकी, खादाड, निर्दयी, साहसी, अविचारी, मोठमोठ्या उलाढाली करणारे, थोडे स्वार्थी, लोभी, मात्र शूर, पराक्रमी, करारी, कर्तबगारी व कर्तृत्ववान आढळतात.
धनिष्ठा नक्षत्रावर जन्मणाऱ्या जातक पुरुषांचा बांधा मध्यम, उंच, थोडा अप्रमाणबद्ध, हाडे मोठी, रुंद, सांध्यातील हाडे जास्त मोठी दिसणारी, जरा अरुंद कपाळ, निमुळती हनवटी, गालाची हाडे जरा वर आलेली, काटक, चिवट, चांगली शारीरिक ऊर्जा व रोगप्रतिकार शक्ती, थोडा प्रौढ चेहरा, उदासीची छटा, जरा स्वार्थी स्वभाव आढळत्तात. हे जातक निश्चयी, शूर, पराक्रमी, कर्तबगार, श्रमिक, कष्टाळू, मेहनती, अंग मोडून काम करणारे, चिकित्सक, चौकस, संशोधक, दीर्घोद्योगी, कोणतेही काम शेवटपर्यंत तडीस नेणारे, प्रतिज्ञा करणारे, किचकट कामाची आवड असणारे, अल्प संयमी व किरकिर करणारे असतात.
धनिष्ठा स्त्री जातकांना हे नक्षत्र साधारण आहे. या नक्षत्राकडे सौंदर्य, रूप व कला, कोमलपणा, नाजूकपणा, हळूवारपणा, संगोपन करण्याची वृत्ती हे स्त्री गुण साधारण असतात. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रियांचा बांधा कणखर, काटक व जरा हाडाळ व थोडा अप्रमाणबद्ध आढळतो. चेहरा थोडा सुस्वरूप असला, तरी त्यावर प्रौढपणा व उदासी ची छटा दिसून येते. स्वभाव कष्टाळू, श्रमिक, संसारी, काटकसरी, कर्तव्यदक्ष, धार्मिक, बुद्धीवान व मेहनती, गरिबीतूनही काटकसरीने संसार करणारा, आज्ञाधारक व सेवावृत्तीचा आढळतो. अलंकार, उंची वस्त्र, आधुनिक फॅशन, दागदागिने यांचा फारसा हव्यास नसतो, पण नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा चांगला असते.
धनिष्ठा नक्षत्र बुद्धीमत्ता, कर्तृत्व, अधिकारयोग यांना अनुकूल असते. या नक्षत्रावर जन्मणारे जातक स्वकर्तृत्वाने, हुषारीने व कर्तबगारीने श्रेष्ठपद प्राप्त केलेले आढळून येतात.
धनिष्ठा या नक्षत्राखाली बुद्धीमान तसेच कष्ट व कामकरी वर्गही आढळून येतो. या नक्षत्राखाली बँक किंवा खाजगी कंपनीत काम करणारे हिशोबनीस, कायदेपंडित, इंजिनिअर्स, आर्किटेक्ट, सेल्स टॅक्स व इन्कमटॅक्सचे काम करणारा वर्ग, कारखानदार, कंत्राटदार, उत्पादक, वितरक, शारीरिक श्रम व कष्ट करणारा मजूरवर्ग, घाऊक व्यापारी, धान्य, तेल, तंबाखू, कोळसा, लोखंड, लोकर यांचे व्यापारी, खाजगी औद्योगिक क्षेत्रात काम करणारा वर्ग हे सर्व येतात.
धनिष्ठा नक्षत्री रवी आरोग्याच्या’ दृष्टीने साधारण चांगला असतो. मेहनतीच्या कामाला चांगला, पण थोडासा अविचार, निर्दयी, मतलबी व सारासार विचार करणारा नसतो.
धनिष्ठा नक्षत्री चंद्र असता शूर, धाडसी, संपन्न, दाता. निश्चयी, अलौ केक, बुद्धीमान, मेहनती, भोजनप्रिय, धनसंचय करणारा असतो.
धनिष्ठा नक्षत्र मंगळाचे स्वतःचे नक्षत्र असल्याने व या नक्षत्रात मंगळ उच्च होत असल्याने फार चांगले, शरीरप्रकृती मध्यम पण काटक, चपळ, मजबूत, सशक्त, शूर, धाडसी, पराक्रमी, पण थोडा हळू गतीचा, मुत्सद्दी, कर्तबगार, इंजिनिअर, कारखानदार अथवा आर्किटेक्ट यांना चांगला, मात्र थोडा खादाड, निर्दय व छानछोकीची आवड असणारा असतो.
धनिष्ठा नक्षत्री बुध असता बांधा जरा अप्रमाणबद्ध पण चपळ, हुशार, बुद्धीमान, चुणचुणीत असतो.
धनिष्ठा नक्षत्री असलेल्या गुरूसाठी हे नक्षत्र साधारण आहे. शरीरप्रकृतीच्या दृष्टीने मध्यम, बुद्धी बरी, पण पैशाचे दृष्टीने साधारण आहे. जातक थोडा दुराग्रही, स्वार्थी व द्रव्याच्या उलाढाली करणारा आढळतो.
धनिष्ठा नक्षत्री शुक्र असता सुस्वरूप, पण बांधा अप्रमांणशीर, पुढचे दात थोडे मोठे, एका रेषेत नाही. थोडा हाडाळ, मात्र छानछोकी, रंगेल, थोडी खर्चिक, विषयसत्ता, स्वार्थी, आर्किटेक्ट व व्यापार यांच्या दृष्टीने बरा असतो.
धनिष्ठा नक्षत्री शनी असता मजबूत, सशक्त बांधा आणि लांब व रुंद हाडांचा, किंचित थोराड, मिशा कल्ले राखणरा, तसा हुशार, कष्टाळू, मेहनती, धडपड्या, अंगमेहनती, कर्तृत्ववान, निश्चयी व चिकाटीकारक पण जरा संयमी, स्वार्थी, किरकिरा व त्रासिक स्वभावाचा व आतल्या गाठीचा आढळतो. मात्र हा शनी कारखानदार, उत्पादक, घाऊक व्यापारी, स्वतंत्र व्यवसायाची आवड देतो.
धनिष्ठा नक्षत्री राहू असता हाडापेराने मजबूत, काटक, सशक्त, पीळदार शरीर, चपळ, शूर, धाडसी, कर्तृत्ववान, मेहनती, थोडाफार अधिकारभोग, आर्किटेक्टला चांगला,
धनिष्ठा नक्षत्री केतूला साधारण असतो. फक्त तब्येतीच्या दृष्टीने चांगला, पण बुद्धी व धनाच्या बाबतीत अनुकूल नाही. थोडाफार धार्मिक व सत्वगुणी असेल.
धनिष्ठा नक्षत्री हर्षल असता बुद्धीला चांगला, हुशार, संशोधक, उत्तम कल्पनाशक्ती, विजेच्या सहाय्याने चालणारी यंत्रे व कारखाने तसेच अधिकारयोग व दर्जा यांना चांगला. तब्येत मध्यम पण थोडा अविचारी, लहरी, अस्थिर मनाचा, उलाढाल्या करणारा आढळतो.
धनिष्ठा नक्षत्री नेपच्यून साधारण असतो. संशोधक वृत्तीचे नक्षत्र असल्याने दैविकविद्या किंवा चमत्कार वगैरेला वाव नसतो. जरा उदासीन प्रवृत्ती असते. मात्र धार्मिक व आध्यात्मिक गोष्टींना बरा.
धनिष्ठा नक्षत्री या नक्षत्राखाली होणारे आजार जरा दाहक व मुरणारे असतात. हे जातक तशा साध्या तापाने किवा सर्दीपडशाने आजारी पडलेले दिसून येत नाहीत. रोग प्रतिकारशक्ती बरी असते. मात्र कापणे, भाजणे, हाड मोडणे, खरचटणे, धडपडणे, फार गुडघे दुखणे किवा संधिवात असला तरी कळा मारणे व सूज दिसते. त्वचेचे रोग, मुखाचे रोग फार होतात. काहीवेळा विलंबीत डांग्या खोकला, दमा यांचा फार त्रास होतो. शिरा सरकणे, सुजणे, अपघात यांची संभावना असते.
धनिष्ठा नक्षत्री जन्मणाऱ्या जातकांचे हस्ताक्षर जरा बारीक, गिचमीड व थोडे जवळजवळ लिहिलेले असते. मात्र अक्षर एका रेषेत असते.
धनिष्ठा नक्षत्र अंधलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्या, तर त्या थोड्या प्रयत्नाने सापडू शकतात. वस्तू पूर्व दिशेला गेलेली असते.
धनिष्ठा नक्षत्र साठी रत्न मंगळाचे पोवळे अथवा शनीचा नीलमणी असला तरी पोवळे जास्त योग्य वाटते. अंकशास्त्राप्रमाणे या नक्षत्रावर ९ या अंकाचा किवा या अंकाचे वर्चस्व आहे. तरी ९ अंक योग्य वाटतो.
धनिष्ठा नक्षत्र राक्षसगणी असले तरी मौंजी, बारसे, पालकारोहण अशा शुभकार्याला चांगले. तर नारदमान्य विवाहालाही ते योग्य आहे. हे नक्षत्र घरे, देवालये, विहिरी खणणे, गलबत बांधण्यास आरंभ करणे, राज्याभिषेक, वहान घेणे व त्यात बसणे, नवीन वस्त्रालंकार करणे, मुलांचे नाक-कान टोचणे, बी पेरणे, नृत्यारंभ, राजदर्शन, प्रथम स्त्री- समागम, मंचकारोहण, विद्यारंभ, गांधर्वविवाह, दत्तक घेणे, प्रयाण, शिक्का सुरू करणे, बाळंतीणीस स्नान घालणे अशा कार्यांना उत्तम असते.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : चंद्र जन्मा तुझी कहाणी
लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : स्वअध्ययन व नवग्रह साधना व गुगल आंतरजाल
नमस्कार,
ज्योतिष शास्त्रातील चंद्राचे महत्व हे कायम अबाधित असणार आहे. चंद्र मनाचा कारक ग्रह मनाला जातो. मनोभावना, मनोविकार, प्रेम, संमोहन, गूढविद्या, इंद्रिय सुखाचे समाधान, स्पर्शाचे ज्ञान, सुखाची झोप, मनाचा खंबीरपणा, भोळेपणा, विसराळूपणा, दुर्बलता, वेड, माता, स्वतःचे घर व त्यातील सुखसोयी, स्त्री, कलाविष्कार, औषधे, दुध, पातळ पदार्थ, पेये, अन्न धान्ये, उपहारगृहे, मासे, पांढऱ्या रंगाच्या वस्तू, प्रवास, पाणी, गर्भाशय, पोट, गर्भपेशी, स्तन, शरीरातील लस, रसोत्पादक ग्रंथी, जननक्रिया, स्त्रियांचे नैसर्गिक धर्म ईत्यादी अनेक गोष्टी चंद्र दर्शवत असतो.
आयुष्यातील चढ उतार दर्शवणारी प्रसिद्ध विंशोत्तरी महादशा जन्माचे वेळी चंद्र ज्या नक्षत्रात असेल तिथून सुरु होते.
आपले पुराण चंद्राविषयी एक रूपक कथा सांगते, ब्रह्माच्या सल्ल्यानुसार ब्रह्म पुत्र आग्नेय याने कठोर तपश्चर्या केली, तापाची सांगता झाल्यावर त्याचे डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. त्या दिव्याश्रूंनी अवघे विश्व प्रकाशमान झाले. दिशांनी मोहित होऊन पुत्र प्राप्तीच्या लालसेने स्त्री रूप धारण करून ते अश्रू प्राशन केले. पण अश्रू पाणी स्वरूप पातळ असल्याने गर्भ धारणा काही होऊ शकली नाही. म्हणून त्याने अश्रुंचा त्याग केला. तेव्हा ब्रह्माने त्याचे नाव चंद्र ठेवले व ब्रह्मलोकी नेऊन ठेवले.
अशीच अजून एक कथा वाचनात आली. अत्रिऋषी व सती अनसूया यांना ब्रह्मदेवांच्या अंशापासून झालेला पुत्र म्हणजेच चंद्र. चंद्राने माता-पित्यांच्या अनुमतीने वाराणसी येथे जाऊन शिवलिंग तयार करून त्रिकाळ स्नान करून तो शिवाराधना करू लागला त्यामुळे भगवान शंकर शिवलिंगातून प्रगट झाले व आकाशात स्वतंत्र चंद्रमंडळ निर्माण करून तेथे चंद्राची स्थापना केली.पुढे प्रजापती दक्ष राजाने आपल्या २७ उपवर मुलींचे विवाह चंद्राशी लावून दिले, त्या मुली म्हणजे २७ नक्षत्रे होय.
रोमन कैथालिक लोक चन्द्राला Vergin Mary म्हणतात व ती स्वर्गाची आई होय, जी पोषण करते. ती ल्यूना आहे. ती रात्रिची राणी आहे. डायना अपोलोची जुळी बहिण आाहे. ही देवी व शिकारी पण आहे, ही शुद्धता व फलोत्पादकेतेची अधिष्ठाती पण आहे. तिला ग्रीक लोकाद्वारे Astors म्हटले जाते.
तसेच आधुनिक विज्ञानास ही सतत खुणावणारा कोण असेल तर तो चंद्र. चंद्रावर वातावरण कसे असेल, मानवी वस्ती तिथे करणे शक्य आहे का. अशा अनेक शक्यतांचा शोध घेण्यासाठी जगातील प्रगत देशांमध्ये चंद्र मोहिमा आखल्या जातात.
१९६९ सालच्या जुलै महिन्यात अमेरिकेच्या अपोलो-११ या यानातून नील आर्मस्ट्राँग, मायकेल कॉलिन्स व एडवीन ऑल्ड्रिन हे अंतराळ वीर चंद्राच्या भेटीसाठी गेले. नील आर्मस्टींग व एडवीन ऑल्ड्रिन चंद्रावर यशस्वी पाउल ठेवले व तेथून माती, दगड ई. नमुने गोळा केले आणि सुखरूपपणे पृथ्वीवर परतले.
तर अशा या चंद्राच्या जन्माविषयी आधुनिक विज्ञानात जे सिद्धांत प्रचलित आहेत त्यांची थोडक्यात माहिती घेणार आहोत.
सर्वसाधारणपणे, चंद्र कसा तयार झाला याचे चार सिद्धांत प्रचलित आहेत.
१) कॅप्चर थिअरी
२) कंडेन्सेशन थिअरी
३) जायंट इम्पॅक्ट थिअरी
४) फिजन थिअरी (विखंडन सिद्धांत)
१) कॅप्चर थिअरी :
सन १९०९ मध्ये थॉमस जेफरसन जॅक्सन सी या अमेरिकन खगोलशास्त्रज्ञाने कॅप्चर सिद्धांत मांडला. त्यांचे मते चंद्राची निर्मिती सूर्यमालेत इतरत्र लघुग्रहांप्रमाणे झाली, परंतु जेव्हा.तो पृथ्वी ग्रहाच्या खूप जवळ आला, तेव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने त्यास आपल्या कक्षेत खेचले व चंद्र त्यानंतर पृथ्वीभोवती भ्रमण करू लागला.
हा सिद्धांत चंद्र आणि पृथ्वीची रचना वेगळी का आहे हे ओळखण्यास मदत करतो. तथापि, हा सिद्धांत वेगवेगळ्या ग्रहांभोवती फिरणाऱ्या इतर चंद्रांच्या निर्मितीचे स्पष्टीकरण देतो असे मानले जाते, अनेक शास्त्रज्ञांना वाटते की हा सिद्धांत पृथ्वीच्या चंद्रासाठी संभव नाही.
उदाहरणार्थ, फोबी, शनिभोवती फिरणारा चंद्र, या वलयांकित ग्रहाने पकडला आहे असे मानले जाते. फोबीचा आकार लघुग्रहांसारखा अनियमित असतो आणि तो चंद्रासारखा पूर्णपणे गोलाकार नसतो. शिवाय, ग्रहांद्वारे (पकडलेले) कॅप्चर केलेले फोबीसारखे चंद्र सामान्यतः विलक्षण किंवा गोलाकार नसलेल्या कक्षाचे अनुसरण करतात. पृथ्वीचा चंद्र अतिशय गोलाकार कक्षेत ग्रहाभोवती फिरतो. याव्यतिरिक्त, काही आकाषीय वस्तूंना चंद्र पृथ्वीशी टक्कर होण्याआधी त्याचा वेग कमी करावा लागला असता आणि अशा घटनेचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.
२) कंडेन्सेशन थिअरी :
हा सिद्धांत असे सांगतो की, पृथ्वी आणि चंद्र एकाच वेळी तेजो मेघातून घनरूप झाले आहेत.
कंडेन्सेशन थिअरी हा सिद्धांत सौर यंत्रणा कशी निर्माण झाली हे स्पष्ट करते. त्यात असे म्हटले आहे की वायू आणि धूळ यांचे एक महाकाय ढग घन पदार्थात घनरूप होऊन ग्रह तयार होतो व सौर वाऱ्यामुळे ग्रहांची वाढ थांबते. हा सिद्धांत असेही सुचवितो की चंद्र आणि पृथ्वी एकाच नेब्युलापासून घनरूप झाले आहेत आणि चंद्र पृथ्वीभोवती कक्षेत फिरत आहे.
३) जायंट इम्पॅक्ट थिअरी :
जायंट इम्पॅक्ट थिअरीला कोलायडिंग किंवा इजेक्टेड रिंग थिअरी असेही म्हटले जाते. पृथ्वीला मोठ्या वस्तुमानाची जोरदार धडक बसली आणि पृथ्वीचा एक तुकडा अवकाशात बाहेर पडला. तो म्हणजे चंद्र. पण हा सिद्धांत फारसा स्वीकारला गेला नाही.
४) फिजन थिअरी (विखंडन सिद्धांत)
सन १८९८ मध्ये चार्ल्स डार्विन चा मुलगा जॉर्ज हॉवर्ड डार्विन याने हा सिद्धांत मांडला. विखंडन म्हणजे विभक्त होणे, आणि विखंडन सिद्धांत असे सुचवितो की, जेव्हा पृथ्वीच्या इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात एक खडकाचा वितळलेला तप्त गोळा होता. तिच्या प्रदक्षिणेचा वेग ४ तास इतका प्रचंड होता. त्याकाळीही पृथ्वीवर सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे भरती ओहोटीचे चक्र सुरू झाले होते. त्यावेळी दर दोन तासांनी पृथ्वीवर भरती येत असे. व या सर्वांमुळे केंद्रोत्सारी शक्ती निर्माण होऊन दूर फेकला जाऊन तो पृथ्वीपासून विभक्त झाला व पृथ्वीभोवताली चंद्राच्या स्वरूपात फिरू लागला. पृथ्वीच्या ज्या भागातून चंद्र बाहेर फेकला गेला, त्याची खूण आजही आपल्याला पॅसिफिक महासागराच्या रूपाने दिसत आहे. पृथ्वीपासून चंद्राची निर्मिती झाल्यामुळे पॅसिफिकचा खड्डा तयार झाला असे डार्विनचे म्हणणे होते.
हा सिद्धांत शक्य आहे असे वाटले कारण, चंद्राची रचना संपूर्ण पृथ्वीसारखी नसली तरी ती आपल्या ग्रहाच्या बाह्य स्तरांसारखी दिसते.
१९५३ साली रेमंड आर्थर लिटलटन यांनी गणना करून हे मांडले की, जर केंद्रोत्सारी शक्ती निर्माण होऊन दूर फेकला जाऊन तो पृथ्वीपासून विभक्त झाला, दोन ऐवजी एक मोठा तुकडा दूर उडून पडला व मधला छोटा तुकडा जवळच उडून पडेल. यातील विभक्त होऊन दूर गेलेला मोठा तुकडा म्हणजे मंगळ हा ग्रह आहे. मंगळ व पृथ्वी एकमेकांपासून सुटे होताना मधल्या ताणलेल्या भाग जो सुटा झाला तो चंद्र आहे. हा तुकदा (चंद्र) पृथ्वीपासून बराच जवळ असल्यामुळे तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीभोवती फिरत राहिला. मंगळ मात्र भ्रमणातील अस्थैर्यामुळे पृथ्वीपासून बराच लांब उडून स्वतंत्र ग्रह म्हणून सूर्याभोवती फिरू लागला.
इथे एक गोष्ट मांडावीशी वाटते, ती म्हणजे मंगळाचे वस्तुमान साधारणपणे पृथ्वीच्या वस्तुमानाएवढे आहे. वैदिक ग्रंथात मंगळाला ‘कुज’ म्हणजे पृथ्वीपासून जन्मलेला असे नाव आहे. मंगळाला भौम म्हणजे भूमीपुत्र असे ही म्हणतात.
मंगळ जन्माची पुराणातील रूपक कथा वाचनात आली ती आपल्याला सांगतो.
अवंती नगरीत वेदपारंगत भारद्वाज नावाचा एक तेजस्वी ब्राह्मण क्षिप्रा नदीच्या काठी तपास बसला असताना एक अप्सरा तपोभंग करण्यासाठी येऊन आली व भारद्वाज जागेवरून उठल्यावर गुप्त झाली. भारद्वाज कामविकाराने ग्रासल्याने त्याचे रेतस्खलन होऊन भूमीत शिरले व त्यातून एक पुत्र जन्मास आला. स्त्री रूपाने पृथ्वीने त्याचे संगोपन केले व तो ७ वर्षाचा झाल्यावर ती भारद्वाज कडे गेली व त्याला सर्व कथा सांगून त्याचे कडे सुपूर्त केले. तोच हा भौम म्हणजे मंगळ.
रेमंड आर्थर लिटलटन यांच्या मंगळ व चंद्र जन्माच्या संकल्पनेशी आपल्या पुराण ग्रंथांमधील वर्णन जुळणारे आहे, जे अतिप्राचीन काळी दिलेले आहे.
इति चंद्र जन्मकथा अध्याय संपूर्णम I
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)