
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : मंगळाची स्थानागत फळे
संकलन : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : नवग्रह साधना
नमस्कार,
आज आपण मंगळाची स्थानागत फळे पाहणार आहोत.
प्रथम भाव : लग्नस्थ मंगळ जातकाला कोणताही व्यवसाय करण्यास प्रेरित करतो; पण जातकाला कोणत्याही व्यवसायात यश मिळन्यास खूप संघर्ष करायला लागतो. त्याला डोकेदुखीचा त्रास असू शकतो. जातक धाडसी, पराक्रमी पण स्वभावाने रागीट असतो. मेष, सिंह, धनु, कर्क व वृश्चिक राशीचा मंगळ लग्नी असेल तर अशा लोकांना पोलीस, सैन्यात विशेष लाभ मिळतो. उच्चीचा मंगळ वडिलां संदर्भात बाबतीत इष्ट फले देत नाही. पृथ्वितत्त्वाचा मंगळ जातक कंजूष वृत्तीचा राहू शकतो. जातक विचार करूनच मित्र बनवतो. लग्नस्थ मंगळ डॉक्टर- वैद्यांना चांगला असतो. वकिलांना तो प्रतिकूल असतो.
द्वितीय भाव : मेष, सिंह, धनु यापैकी कोणत्याही राशीचा मंगळ दुसऱ्या स्थानी असेल, तर जातक धनवान बनू इच्छितो. असा जातक बहुधा लॉटरी, रेस, जुगार, शेअर्स इत्यादीमध्ये पैसा गमवितो. वृषभ, सिंह, कन्या, मेष राशीचा मंगळ द्वितीय भावात असेल व वक्री असेल, तर मिळालेली संपत्ती लवकर संपते व ती पुन्हा मिळणे दुरापास्त असते. वायुतत्त्वाचा मंगळ असेल, तर धनसंग्रह होतो. चिकित्सक व वकिलांच्या बाबतीत असा मंगळ लाभदायक असतो. वृषभ राशीचा मंगळ असेल, तर जातक खोटारडा, खादाड, बंधुद्रोही व कुल कलंकित असतो. नीचस्थ मंगळ असेल, तर जातक रोगी, सिंहस्थ मंगळ असेल, तर पुत्रहीन व धर्महीन असतो.
तृतीय भाव : कुंडलीच्या तिसऱ्या स्थानी मंगळ असेल, तर वाहन रेल्वे ई. भय जातकास असते. नातेवाईक व शेजाऱ्यांशी भांडणे होतात. उच्चीचा मंगळ असेल, तर काही शुभ फले मिळतात. राहूबरोबर मंगळ असेल, तर जातक वेश्यागामी, कपटी, दुःखी आढळतो. मेष, वृश्चिक, मकर राशीचा
मंगळ असेल, तर जीवन अस्थिर असते. इतर राशीत मंगळ असेल तर जातक धनहीन, सुखहीन, वास्तुहीन आढळतो.
चतुर्थ भाव : चतुर्थ भाव म्हणजे सुखस्थानात मंगळ असेल, तर बहुधा अशुभ फले मिळतात. स्त्री राशीतील मंगळ शुभ फलदायी असतो. कर्क, तूळ अश्चिक किंवा मिथुन राशीचा मंगळ चतुर्थ स्थानी असेल, तर आई किंवा पत्नी सुखाचा नाश होत नाही. इतर राशीतील मंगळ चतुर्थ स्थानी असेल, तर द्वितीय विवाह योग निर्माण होऊ शकतो. जातकाची प्रगती जन्मभूमीत होत नाही. परदेशात तो प्रगती करतो. अग्नी राशीचा मंगळ चतुर्थात असेल, जर घराला आग लागनेपासून सावध रहावे. कर्क, तूळ, मिथुन, वृश्चिक राशीत मंगळ असेल, तर मरेपर्यंत स्वतःच्या घरात राहण्याची जातकाची इच्छा असते; पण त्याचा अंत घरात न होता इतर ठिकाणी होऊ शकतो.
पंचम भाव : पंचम भावात बहुधा मंगळाची अशुभ फलेच मिळतात. स्त्री राशीतील मंगळाची शुभ फले मिळतात. वायुतत्त्वाच्या राशीचा मंगळ असेल, तर सिव्हिल इंजिनिअरिंग, ओव्हरसिअर, भूमी सर्वेअर इ. शिक्षणाकडे ओढ असू शकते. अग्नितत्त्वाच्या राशीतील मंगळ सैन्य, पोलीस, मोटार, विमानचालक, टेक्निकल शिक्षणात जातकाची रुची उत्पन्न करतो, डॉक्टर व वकिलांना पंचमस्थ मंगळ शुभ असतो. तो यश व किर्ती मिळवून देतो.
षष्ठभाव : षष्ठभावातील मंगळ कार्य करण्याची मोठी क्षमता जातकाला देतो. तो खादाड असतो. वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ या स्थिर राशीत मंगळ असेल, तर गंडमाळा, हृदयशूळ व मूत्राशयाचे रोग होण्याची शक्यता असते. मेष, कर्क, तूळ किंवा मकरेचा मंगळ असेल, तर यकृत, संधिवात, फुफ्फुसात बिघाड, श्वासरोग, क्षयरोग होतो. जातकात कामवासना जास्त आढळते. स्त्री राशीचा मंगळ असेल, तर शत्रू असतात. पूर्वाजित धनाचा नाश होतो. मंगळ जातकाला दीर्घ कालावधीनंतर प्रसिद्धी मिळवून देतो.
सप्तम भाव : सप्तम स्थानी मंगळ असेल, तर ‘मांगलिक योग बनतो. पाप राशीचा मंगळ असेल, तर पती-पत्नीला पीडित, दांपत्य सुखात न्यूनता येते. वायुराशीचा मंगळ असेल, तर छापखाने कारखान्यात फायदा होतो. जलराशीचा मंगळ असेल, तर लाकडाच्या व्यवसायात यश मिळते. मेष, सिंह, मकर, कुंभ राशींपैकी एका राशीचा मंगळ असेल, तर द्वितीय विवाहयोग संभवतो. शुक्राच्या राशी वृषभ तुळेचा मंगळ असेल, तर जातक पत्नीवर खूप प्रेम करतो. कन्या व कुंभ राशीचा मंगळ असेल, तर अशा जातकाचा भाग्योदय विवाहानंतर होतो. चिकित्सकांना सर्जरीत, वकिलांना फौजदारी केसेस, पोलीस सैन्यात, टेक्निशियन इंजिनिअर यांना मंगळ फायदेशीर ठरतो.
अष्टम भाव : स्त्री राशीतील अष्टमस्थ मंगल विशेषत: कर्क, वृश्चिक, मीनेचा मंगळ संतती अधिक देऊ शकतो. वृषभ आणि कन्या राशिच्झा मंगळ अष्टमात असेल, तर संतती सौख्य अल्प असते. मिथुन, तूळ, कुंभेचा मंगळ अष्टमात असेल तर जातक दृढयोगी बनतो. अष्टमस्थ कर्क, मीनेचा मंगळ जातकाला राजकारणी बनवतो. जल राशीचा मंगल अष्टमात असेल, तर पाण्यात बुडून मृत्यू संभवतो. अग्नी राशीचा असेल, तर आगीत जळून मृत्यू संभवतो.
नवम भाव : नवम स्थानी मंगळ असेल, तर शुभ-अशुभ दोन्ही प्रकारची फले मिळतात. मीन व मकर राशीचा मंगळ नवम स्थानी असेल, तर जातक दुराचारी, हिसक, पापी व व्यभिचारी बनतो. इतर राशीचा मंगळ असेल, तर जातक विद्वान असतो. वृषभ राशीचा मंगळ असेल, तर विपरीत फले मिळतात. पुरुष राशीचा शुभ प्रभावित मंगळ राजकारणात छोटे-मोठे पद मिळवून देतो. नवमस्थ मंगळ असलेले जातक विवाहाला पवित्र व स्थायी बंधन मानत नाहीत. बाह्य स्त्रीशी संबंध जोडण्यास उत्सुक आढळतात.
दशम भाव : मंगळ दशम स्थानी असेल, तर जातक धैर्यवान, अभिलाषी आणि उतावळ्या स्वभावाचा असतो. व्यवसायात प्रवीण असूनही नफा-नुकसान होत राहते. स्वभावाने पशूसारखा असतो. दशमस्थ मंगळ सहजगत्या यश व मानसन्मान मिळवून देतो.
एकादश भाव : वायू व अग्नी राशीचा मंगळ एकादश स्थानी असेल, तर संतती नाश संभवतो. कोणत्याही स्वरूपात या राशीचा मंगळ पुत्रसुख दुर्लभ बनवतो. जल व पृथ्वी राशीचा मंगळ पुत्रसुख, यशप्राप्ती देतो. अशा जातकाचे धनार्जन व अधिकारप्राप्ती हे एकमेव ध्येय असते. मित्राकडून जातक फसवला जातो. जलतत्त्वीय राशीचा मंगळ एकादश स्थानी मित्राला जामीन राहिल्याने जातक अडचणीत येऊ शकतो. अग्नितत्त्वाच्या राशीचा मंगळ एकादश स्थानी असेल, तर जातक सट्टा, मटका, जुगार, लॉटरी अशा आकस्मिक धनलाभातून पैसे मिळवतो.
द्वादश भाव : बाराव्या स्थानी मंगळ असेल, तर ‘असा जातक बहुभक्षी व कामवेगाने पीडित आढळतो. त्यास स्त्री सुख कमी लाभते. जातक उदार, सत्यभाषी व रागीट असतो. द्वादश भावस्थ मंगळ भाऊ व संततीला अनिष्ट असतो. अपवादात्मक परिस्थितीत हा मंगळ वंशक्षय करतो. अशा जातकाला पडल्याने इजा होणे, विषबाधा होणे व अपघात होण्याची भीती असते. कोणाला उसनवार दिलेले पैसे परत मिळत नाहीत, चोरामुळे धन हानी संभवते.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : निसर्ग दशा साधन पद्धती
संकलन : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : ज्योतिष सोबती
नमस्कार,
आपण रोजच्या बोली भाषेत काही शब्द सहजगत्या वापरत असतो. पण त्या शब्दांची व्यापकता आपल्या गावीही नसते. असाच एक ज्योतिष शास्त्रीय शब्द म्हणजे दशा. आपण किती सहज बोलून जातो, काय दशा झालीय तुझी. दशा म्हणजे स्थिती मग ती चांगली स्थिती असो अथवा प्रतिकूल स्थिती असो. आणि ती स्थिती जाणून घेण्याच्या व त्याचे कालमापन करण्याच्या काही पूर्वापार चालत आलेल्या काही पद्धती आहेत त्या विशिष्ट पद्धती म्हणजे दशा. दशा साधन म्हणजे एखाद्या घटनेचे कालमापन करण्याचे साधन.
असे म्हणतात की, पूर्वी जवळजवळ ४२ प्रकारच्या दशा वापरात होत्या. काळाच्या ओघात त्यातील बर्याचशा दशा पद्धती लुप्त झाल्या. आज आपल्याला फक्त, विमशोत्तरी, अष्टोत्तरी, योगिनी अशा ठराविक दशा माहित आहेत व प्रचलित आहेत. देशाच्या विविध भागात ठराविक पाडती वापरात असे. जसे उडू किंवा विमशोत्तरी दशा दाक्षिणात्य ज्योतिषी वापरत असत. गुजरात, मारवाड आदी भागात अष्टोत्तरी दशा विचारात घेतात. अशा प्रचलित तसेच अजून काही दशा साधने असतील, तर त्यांचा ही अभ्यास व्हायला हवा. ज्योतिष अभ्यासकाचा ध्यास व अभ्यास कधीच संपत नाही व या प्रवासात आपल्या ऋषी मुनींनी लिहिलेले ग्रंथ जसे मौल्यवान ठरतात, तसेच त्या त्या प्रदेशात प्रांतीय भाषेत लिहिलेली पुस्तके देखील मोलाचे काम करतात. कारण मातृभाषेत ज्ञान असेल, तर समजायला सोपे जाते. अशाच उत्तम ज्योतीशाचार्यापैकी एक अग्रणी व आदराचे नाव म्हणजे श्री.श्री. भट. त्यांचे ज्योतिष सोबती ही ज्योतीषांसाठी हे मार्गार्शिका वाचत असता, त्यात निसर्ग दशा अशी एक दशा पद्धती वाचनात आली. खर्र तर हे पुस्तक मुळातूनच वाचण्यासारखे व संग्रही ठेवण्यासारखे आहे. पण ज्यांनी हे वाचलेले नाही, त्यांचेसाठी त्यातील निसर्ग दशा हे छोटेसे संकलन आपल्या समोर ठेवत आहे.
ही निसर्ग दशा कधी अस्तित्वात आली याबद्दल मला कल्पना नाही. या दशेत विमशोत्तरी दशेप्रमाणेच १२० वर्षांचे साधारण आयुष्य धरले आहे व दशेचा कालावधी मात्र वेगळा आहे.
तसेच यात सात ग्रहांच्या दशा धरल्या आहेत. राहू केतू या छाया ग्रहांना व नंतर शोध लागलेल्या ग्रहांना यात स्थान नाही.
जन्मापासून
१ वर्ष चंद्र महादशा
२ वर्षे मंगळ महादशा,
९ वर्षे बुध महादशा
२० वर्षे शुक्र महादशा
१८ वर्षे गुरु महादशा
२० वर्षे रवि महादशा
५० वर्षे शनि महादशा
एकूण १२० वर्षे अशी विभागणी केली आहे.
या दशातील अंतर्दशा कोष्टक सोबत दिलेले आहे.
दशा व अंतर्दशा यांचे अधिपति गोचरीने अनुकूल असतील, तर शुभ फले मिळतील.
दशा व अंतर्दशा यांचे अधिपति गोचरीने प्रतीकूल असतील, तर अशुभ फले मिळतील.
या दोन अधिपतीचे एकमेकांचे संबंध शत्रुमित्रत्व, बलाबल यांचा विचार करुन प्रमाण ठरवावे.
अर्थात या प्रमाणे कशी फळे मिळतात, हा अभ्यासाचा विषय राहील.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्था, मुंबई
आयोजित
ज्योतिष आणि अध्यात्मिक स्नेह संमेलन
रविवार दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी स. ९.०० ते सायं. ४.०० वा. पर्यंत
स्थळ : बँकीट हॉल तळमजला,
फिनिक्स हॉस्पिटल जवळ, चिकूवाडी,
बोरिवली (प.)
श्री. अनिल चांदवडकर (महाराष्ट्र ज्योतिष परिषद)
यांच्या अध्यक्षते खाली
आयोजनाची वैशिष्ट्ये
🚩 होराभूषण श्री. मनीष गोसावी, अष्टक वर्ग गुरु श्री. हेमंत उपासनी, फेसबुक वरील लोकप्रिय ज्योतिर्विद्या वाचस्पती ज्योतिष मित्र मिलिंद आणि ज्योतिष, वास्तू, रेकी, अध्यात्मिक ई. ३० वर्षाचा दीर्घ अनुभव असलेल्या संस्थेच्या सर्वेसर्वा सौ. समीक्षा दारवलिकर यांचे विचार ऐकण्याची सुवर्णसंधी
🚩 सर्वांमधील निवडलेल्या ज्योतिष अध्यात्म प्रेमी सभासदांना व्यासपीठावर बोलण्याची संधी
🚩एकमेकांच्या ज्ञानाची, विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी योग्य मंच
🚩उपस्थित सदस्यांना एक संस्मरणीय स्मृतिचिन्ह भेट
🚩 स्नेह भोजनाची व्यवस्था
🚩माफक नोंदणी शुल्क रु. २५००/- प्रती व्यक्ती
🚩 प्रायोजक, जाहिरातदार, स्टॉल धारक यांना आपले उत्पादन योग्य समुहापर्यंत पोहोचण्याची उत्तम संधी
आणि बरेच काही… याल तर समक्ष अनुभवाल…
नोंदणी व जाहिरात, स्टॉल, प्रायोजकत्व, बॅनर ई. साठी त्वरित संपर्क करा.
संपर्क क्र. : ९८२१२५२५५६
Gpay No. 9821252556
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)