
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : निसर्ग दशा साधन पद्धती
संकलन : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : ज्योतिष सोबती
नमस्कार,
आपण रोजच्या बोली भाषेत काही शब्द सहजगत्या वापरत असतो. पण त्या शब्दांची व्यापकता आपल्या गावीही नसते. असाच एक ज्योतिष शास्त्रीय शब्द म्हणजे दशा. आपण किती सहज बोलून जातो, काय दशा झालीय तुझी. दशा म्हणजे स्थिती मग ती चांगली स्थिती असो अथवा प्रतिकूल स्थिती असो. आणि ती स्थिती जाणून घेण्याच्या व त्याचे कालमापन करण्याच्या काही पूर्वापार चालत आलेल्या काही पद्धती आहेत त्या विशिष्ट पद्धती म्हणजे दशा. दशा साधन म्हणजे एखाद्या घटनेचे कालमापन करण्याचे साधन.
असे म्हणतात की, पूर्वी जवळजवळ ४२ प्रकारच्या दशा वापरात होत्या. काळाच्या ओघात त्यातील बर्याचशा दशा पद्धती लुप्त झाल्या. आज आपल्याला फक्त, विमशोत्तरी, अष्टोत्तरी, योगिनी अशा ठराविक दशा माहित आहेत व प्रचलित आहेत. देशाच्या विविध भागात ठराविक पाडती वापरात असे. जसे उडू किंवा विमशोत्तरी दशा दाक्षिणात्य ज्योतिषी वापरत असत. गुजरात, मारवाड आदी भागात अष्टोत्तरी दशा विचारात घेतात. अशा प्रचलित तसेच अजून काही दशा साधने असतील, तर त्यांचा ही अभ्यास व्हायला हवा. ज्योतिष अभ्यासकाचा ध्यास व अभ्यास कधीच संपत नाही व या प्रवासात आपल्या ऋषी मुनींनी लिहिलेले ग्रंथ जसे मौल्यवान ठरतात, तसेच त्या त्या प्रदेशात प्रांतीय भाषेत लिहिलेली पुस्तके देखील मोलाचे काम करतात. कारण मातृभाषेत ज्ञान असेल, तर समजायला सोपे जाते. अशाच उत्तम ज्योतीशाचार्यापैकी एक अग्रणी व आदराचे नाव म्हणजे श्री.श्री. भट. त्यांचे ज्योतिष सोबती ही ज्योतीषांसाठी हे मार्गार्शिका वाचत असता, त्यात निसर्ग दशा अशी एक दशा पद्धती वाचनात आली. खर्र तर हे पुस्तक मुळातूनच वाचण्यासारखे व संग्रही ठेवण्यासारखे आहे. पण ज्यांनी हे वाचलेले नाही, त्यांचेसाठी त्यातील निसर्ग दशा हे छोटेसे संकलन आपल्या समोर ठेवत आहे.
ही निसर्ग दशा कधी अस्तित्वात आली याबद्दल मला कल्पना नाही. या दशेत विमशोत्तरी दशेप्रमाणेच १२० वर्षांचे साधारण आयुष्य धरले आहे व दशेचा कालावधी मात्र वेगळा आहे.
तसेच यात सात ग्रहांच्या दशा धरल्या आहेत. राहू केतू या छाया ग्रहांना व नंतर शोध लागलेल्या ग्रहांना यात स्थान नाही.
जन्मापासून
१ वर्ष चंद्र महादशा
२ वर्षे मंगळ महादशा,
९ वर्षे बुध महादशा
२० वर्षे शुक्र महादशा
१८ वर्षे गुरु महादशा
२० वर्षे रवि महादशा
५० वर्षे शनि महादशा
एकूण १२० वर्षे अशी विभागणी केली आहे.
या दशातील अंतर्दशा कोष्टक सोबत दिलेले आहे.
दशा व अंतर्दशा यांचे अधिपति गोचरीने अनुकूल असतील, तर शुभ फले मिळतील.
दशा व अंतर्दशा यांचे अधिपति गोचरीने प्रतीकूल असतील, तर अशुभ फले मिळतील.
या दोन अधिपतीचे एकमेकांचे संबंध शत्रुमित्रत्व, बलाबल यांचा विचार करुन प्रमाण ठरवावे.
अर्थात या प्रमाणे कशी फळे मिळतात, हा अभ्यासाचा विषय राहील.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्था, मुंबई
आयोजित
ज्योतिष आणि अध्यात्मिक स्नेह संमेलन
रविवार दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी स. ९.०० ते सायं. ४.०० वा. पर्यंत
स्थळ : बँकीट हॉल तळमजला,
फिनिक्स हॉस्पिटल जवळ, चिकूवाडी,
बोरिवली (प.)
श्री. अनिल चांदवडकर (महाराष्ट्र ज्योतिष परिषद)
यांच्या अध्यक्षते खाली
आयोजनाची वैशिष्ट्ये
🚩 होराभूषण श्री. मनीष गोसावी, अष्टक वर्ग गुरु श्री. हेमंत उपासनी, फेसबुक वरील लोकप्रिय ज्योतिर्विद्या वाचस्पती ज्योतिष मित्र मिलिंद आणि ज्योतिष, वास्तू, रेकी, अध्यात्मिक ई. ३० वर्षाचा दीर्घ अनुभव असलेल्या संस्थेच्या सर्वेसर्वा सौ. समीक्षा दारवलिकर यांचे विचार ऐकण्याची सुवर्णसंधी
🚩 सर्वांमधील निवडलेल्या ज्योतिष अध्यात्म प्रेमी सभासदांना व्यासपीठावर बोलण्याची संधी
🚩एकमेकांच्या ज्ञानाची, विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी योग्य मंच
🚩उपस्थित सदस्यांना एक संस्मरणीय स्मृतिचिन्ह भेट
🚩 स्नेह भोजनाची व्यवस्था
🚩माफक नोंदणी शुल्क रु. २५००/- प्रती व्यक्ती
🚩 प्रायोजक, जाहिरातदार, स्टॉल धारक यांना आपले उत्पादन योग्य समुहापर्यंत पोहोचण्याची उत्तम संधी
आणि बरेच काही… याल तर समक्ष अनुभवाल…
नोंदणी व जाहिरात, स्टॉल, प्रायोजकत्व, बॅनर ई. साठी त्वरित संपर्क करा.
संपर्क क्र. : ९८२१२५२५५६
Gpay No. 9821252556
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : चंद्राची स्थानागत फळे
संकलन : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : नवग्रह साधना
नमस्कार,
आज आपण चंद्राची स्थानागत फळे पाहणार आहोत.
प्रथम भाव : लग्नस्थानी जर एखाद्या जातकाच्या कुंडलीत शुक्ल पक्षाचा चंद्र असेल, तर आपली शक्ती, राशी स्थिती आणि इतर ग्रहांचे त्यावर होणारे दृष्टिकारक प्रभावानुसार कमी-अधिक फले जातकाला मिळतात.
कुटुंबात सुख-समाधानाचे वातावरण राहते. चंद्र जातक उत्साही व कष्टाळू असतो.
कृष्णपक्षीय चंद्र प्रथम भावात असेल, तर कुटुंबातील सुख-शांतीत बाधा बेते. रोग, अपयश, नुकसान सहन करावे लागते.
द्वितीय भाव : शुक्ल पक्ष चंद्र द्वितीय भावात असेल, तर जातक जातक सुंदर व्यक्तिमत्त्वाचा, धनी व कमी भौतिक सुखे भोगणारा असतो. आई-वडिलांचा लाडका असतो. धनसंपदा जोडतो. तो स्त्री वर्गात लोकप्रिय असतो.
कृष्णपक्षीय चंद्र जातकाच्या कुंडलीत द्वितीय भावात असेल, तर जातकाच्या सुंदर चेहऱ्यावर सुरकुत्या व डाग संभवतात. कामसुखात बाधा येते. खर्च नेहमी वाढता राहतो.
तृतीय भाव : तृतीय भावात शुभ, बलवान व दुष्प्रभावरहित चंद्र असेल, तर जातक आपल्या भावांशी खूप प्रेमाने वागतो. तो प्रसन्नवदनी, आस्तिक, धर्मावर श्रद्धा ठेवणारा, विद्याव्यासंगी, मधुरभाषी असतो. चंद्र अशुभ बलहीन व दुष्प्रभावित असेल तर काही अडचणींना सामोरे जावे लागते.
चतुर्थ भाव : सुखस्थानात शुभ व बलवान चंद्र असेल, तर जातकाला चांगली प्रसिद्धी मिळते. लोकप्रियता लाभते. तो सद्गुणांचा पुतळा असतो. तो उदार, सुखी, प्रतिष्ठित बनतो. अत्यंत कामातुर व रुची असलेला आढळतो.
पंचम भाव : शुक्लपक्षीय चंद्र पंचम भावात असेल, तर जातकाला सुंदर कन्या संतती होते. सहिष्णू, हसतमुख व चांगली कामे करतो.
कृष्ण पक्षातील अशुभ चंद्र असेल तर जातक चंचल वृत्तीचा व अस्थिर भाग्याचा असतो. जातकाची संतती विकारग्रस्त असते.
षष्ठ भाव : सहाव्या भावात चंद्र असेल, तर जातक कफ व नेत्ररोगी तसेच खर्चीक बनतो. स्वतःचे व आईचे आरोग्य चांगले नसते. चंद्र शुभ व बलवान असेल तर शुभ फले मिळतात.
सप्तम भाव : वैवाहिक जीवन व भागीदारीच्या स्थानी चंद्र असेल, तर जातक सुप्रसिद्ध, धैर्यवान, विचारक, अभिमानी असतो. जातकाचा विवाह सुखी होतो. वैभवशाली, प्रवास, सहली, पर्यटन वारंवार होतात.
सातव्या भावात शुक्ल पक्षातील चंद्र असेल तर शुभ फले मोठ्या प्रमाणात मिळतात. वैवाहिक जीवनाचा जोडीदार सुंदर, चपळ व चंचल वृत्तीचा असतो.
अष्टम भाग : आठवा भाव मृत्यूचे घर आहे. या भावात चंद्र असणे अशुभ मानले आहे. या भावातील चंद्र जातकाला सुख-सुविधांपासून वंचित ठेवतो. या भावातील चंद्र कसाही असो, शुभ असो किंवा अशुभ, बलवान असो किंवा बलहीन असो, तो निश्चतपणे दुष्प्रभावित असतो.
नवम भाव : धर्म, भाग्य व पित्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या भावात शुक्ल पक्षातील चंद्र असेल, तर जातक धर्मपारायण गुरू व अतिथींचा सन्मान करणारा असतो. तसेच तो उद्योगी व न्यायप्रिय असतो. त्याचा मान, लोकप्रियता वाढत जाते. याची संतती गुणवान असते व चांगली निपजले.
दशम भाव : दहावा भाव हे कर्मस्थान आहे. या ठिकाणी असलेला चंद्र कार्यकुशल, दयाळू, दुर्बल, बुद्धिजीवी बनतो. प्रगती, प्रतिष्ठा, लोकप्रियता जातकास खूप मिळते.
अशुभ चंद्र दशम भावात असेल तर जातकास मिळणारे लाभ गौण ठरतात.
एकादश भाव : कुंडलीत चंद्र एकादश भावात असलेला जातक चंचल दीर्घायू, यशस्वी व लोकप्रिय बनतो. चांगल्या व गुणवान संततीला जन्म देणारा असतो. एकादश भावात चंद्र, शुभ, बलवान असेल तर वरील चांगली फले मिळतात.
व्यय भाव : जर बाराव्या स्थानी चंद्र असेल, तर जातक नेत्ररोगी, कफरोगी व एकांतप्रिय असतो. या जातकाची बुद्धी अस्थिर असते. तो आपले धनऐश्वर्य गमावतो. अशा जातकाच्या आईचे व पत्नीचे आरोग्य चांगले राहत नाही.
लग्नभाव, पंचम भाव, नवम भाव, दशम भाव या चार भावांत असलेला चंद्र जातकाच्या दृष्टीने विशेष भाग्यवर्धक असतो.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)