
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
विषय : वक्री ग्रह (ज्यो. म.दा. भट गुरुजींच्या नजरेतून)
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ/सौजन्य : ग्रहांकित दिवाळी अंक १९७७
मूळ लेखक : ज्यो. म.दा. भट गुरुजीं
नमस्कार,
१९७५ च्या आसपास ज्यो. म.दा. भट गुरुजींचे वक्री ग्रहावरील दिलेला व्याख्यानाचा संक्षिप्त गोषवारा येथे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी देत आहे. त्यांचे सारख्या व्यासंगी ज्योतिषाचे विचार आपाल्याला निश्चित च मार्गदर्शक ठरतील.
वक्रीणस्तु महावीर्यः शुभा
राज्यफलप्रदाः ।
पापाः हानिकारकः ॥
सूत्रांचा अर्थ अगदी सोपा आणि स्पष्ट असा आहे.
भारतीय फलज्योतिष शास्त्राच्या तत्त्वानुसार
१) कुंडलीतील वक्री असलेले, तसेच उच्च राशीत असलेले ग्रह महाबली म्हणजे बलवान असतात. येथे बलवान म्हणजे शुभाशुभ फले देण्याच्या दृष्टीने बलवान असा अर्थ घ्यावयाचा आहे.
२) दुसरं सूत्र पापग्रह वा शुभ ग्रह हे कुंडलीत वक्री असता काय फले मिळतात याचं दिग्दर्शन करतं. शुभ ग्रह कुंडलीत वक्री असतील तर राज्यफलप्रद समजावे असं सांगितलं आहे. फलज्योतिषशास्त्रात राज्यफलप्राप्ती, राज्योग इत्यादी संज्ञांचा अर्थ जपूनच घ्यावा लागतो. थोडक्यात कुंडलीत शुभ ग्रह वक्री असता, सुखदायक ठरतात इतकाच अर्थ मर्यादित घ्यावयाचा आहे.
३) हेच सूत्र पुढं सांगते की, कुंडलीत पापग्रह वक्री अंसतील, तर अशुभ, हानीकारक किंवा प्रतिकूल इत्यादी संभवतात.
गर्ग, वराहमिहीर, पराशर, महादेव, मत्र्येश्वर, वैद्यनाथ इत्यादी भारतीय आचार्यांनी ह्याचा अभ्यास केला होता. आपली मते मांडून ठेवली होती. वक्री किंवा स्तंभी ग्रहांची जो काही अभ्यास पूर्वाचार्यानी केला आहे; त्यानुसार वक्री किंवा स्तंभी ग्रह कुंडलीत फले देण्याच्या दृष्टीने बलवान् असतात.
कुंडलीत असे वक्री किंवा स्तंभी असलेले ग्रह नीट अभ्यासावे लागतात. त्या अभ्यासाची रीत अशी –
१) ग्रह सुटा असा वक्री वा स्तंभी आहे, का एखाद्या ग्रहांच्या युतीत आहे.
२) मानसशास्त्रीय दृष्टया महत्त्वाच्या म्हणजे कुंडलीत केंद्रस्थानी (१-४-७-१०) हया स्थानी असा वक्री वा स्तंभी ग्रह आहे का ?
३) आपत्ती, संकटे आणणारी अशी जी कुंडलीतील स्थाने म्हणजे ६-८-१२ ह्या स्थानी ग्रह आहे का ?
४) सदर ग्रहाची दशा अंतर्दशा चालू आहे का ?
५) असा वक्री वा स्तंभी ग्रह कुंडलीत दुसऱ्या एखाद्या पापग्रहाच्या केंद्र प्रतियोग वा युतियोगात आहे का ?
वरील सर्व प्रकारांत कुंडलीतील वक्री वा स्तंभी ग्रह व्यक्तीच्या जीवनात फले देण्याच्या दृष्टीने अत्यंत बलवान ठरत असतो असा अनुभव येतो.
निरनिराळे ग्रह कुंडलीत वक्री किंवा स्तंभी असता सर्वसामान्यः मिळणारी फले अशी :
१) शनि :
जीवनात स्थिरता अशी मिळत नाही. वातविकार उद्भावतात. नोकरपेक्षा जीवनात काही काळ निघतो. वय वर्षे ३२ किंवा ३६ नंतर थोडी स्थिरता येते. ६ ८ १२ वे स्थानी पापग्रहांच्या योगात वक्री शनि बंधन योग, दिवाण दाव्यात गुंतलं जाणं अपहार इत्यादी भानगडीत सापडणं, अपघात अशी फले देतो.
२) गुरु :
योग, उपासना, मठ, ट्रस्ट संस्था, सत्पुरुष इत्यादीशी संबंध येतो. महत्त्वाकांक्षी व्यक्ती असते. चिंतन करते. लेखन करते. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध येतो. पोटाचे, लिव्हरचे विकार उद्भवतात.
३) मंगळ :
ज्वरपीडा, देवी, उष्णतेचे विकार, अपघात, शस्त्रक्रिया, भावाला वा बहिणीला अपघात इत्यादी फले कुंडलीत मंगळ वक्री असताना मिळतात. कुंडलीत ६८ १२ वे स्थानी असता अशी फले जास्त प्रमाणात मिळतात.
४) शुक्र :
विकारी व कामी असतो. परस्त्रीच्या प्रेमात पडतो. गुप्तप्रेम साहित्य शिवणकला, कशीदाकाम, चित्रकला, नाट्य, गायन, लेखन इत्यादी कलात प्रावीण्य असते. सर्वसामान्यतः पापग्रहाच्या युतियोगात आणि कुंडलीत ७ ६८ १२ वे स्थानी असता फले विशेषरीत्या अनुभवास येतात.
५) बुध :
बुद्धिमत्ता उत्तम असते. पापग्रह पीडीत असता वाचादोष. शुभग्रहाच्या योगात शुभ होतो. लेखन, चिंतन, मनन करतो. ६८ १२ वे स्थानी नर्व्हस डिस्ऑर्डर्स दाखवितो. पोटाची दुखणी संभवतात.
कुंडलीतील वक्री वा स्तंभी ग्रहांच्या बाबतीत एक सर्वसामान्य नियम सांगता येईल. ग्रह ज्या गोष्टींचा कारक असतो, त्या बाबतीत जीवनात एखाद वैशिष्ट्यपूर्ण फल देताना अनुभवास येतो.
स्थानपरत्वे वक्री ग्रहांची फले
शनि : (खालील स्थानी वक्री असता)
प्रथम स्थानी : वातविकार उत्पन्न होतात. वार्धक्य लवकर दिसतं स्नायूंचे आजार होतात.
द्वितीय स्थानी : फसला जातो वा संपत्तीचा अपहार होतो. मोतीबिंदू व डोळयाचे आजार दाखवितो.
तृतीय स्थानी : धाकटे भावा वा बहिणीला अशुभदर्शक संभवतो.
चतुर्थ स्थानी : वडिलोपार्जित स्थावराचे सुख देत नाही. मातेला दीर्घ मुदतीचा आजार उत्पन्न करतो.
पंचम स्थानी : शिक्षणात अडथळे, विलंब वा बदल. चुकीची लाईन घेतो. संततीचे सुख मिळत नाही.
षष्ठं स्थानी : स्वभाव हेकट असतो, दुसऱ्याशी पटत नाही. दमा, फुफ्फुसाचे विकार, वातविकार उद्भवतात.
सप्तम स्थानी : क्वचित द्विभार्या योग संभवतो. पतिपत्नीत मतवैचित्र्य दाखवितो. नोकरीत हळूहळू भाग्योदयकारक होतो.
अष्टम स्थानी : वडिलोपार्जित स्थावराला अशुभ होतो. देवघेवीच्या व्यवहारात फसतो. दीर्घ मुदतीचे आजार उत्पन्न करतो.
नवम स्थानी : स्थिर स्वरुपाचा असा भाग्योदय होतो. आयुष्याचा उत्तरार्ध भरभराटीचा जातो. कर्णदोष उत्पन होतात.
दशम स्थानी : नोकरी व्यवसायात लवकर स्थिरता देत नाही. आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीतून सारखा मार्ग काढावा लागतो. महत्त्वाकांक्षा व चिकाटी असतो. नोकरी व व्यवसाय दोन्ही करतो.
एकादश स्थानी : आयुष्यात बऱ्याच उलाढाली करतो. व्यवसाय भरभराटीला आणतो. लोकाभिमुख होतो. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळते.
द्वादश स्थानी : आयुष्यात एकदा तरी सांपत्तिक स्थिती मोठ्या प्रमाणावर खालावते. आयुष्याच्या उत्तरार्धात किंवा पूर्वार्धात मोठा भाग्योदय होतो. उलाढालीचे जीवन जगतो.
गुरु : (खालील स्थानी वक्री असता)
प्रथम स्थानी : मधुमेह होतो. विशेषतः ४ ८ १२ राशीत प्रत्यय जास्त येतो. पोटाचे विकार उत्पन्न करतो.
द्वितीय स्थानी : संपत्तीचा संचय होत नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि खर्च यांनी बेजार असतो घरात पोष्यवर्ग असतो.
तृतीय स्थानी : प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करतो. नोकरी व्यवसायात हळूहळू भाग्योदय होतो. सामाजिक प्रतिष्ठा लाभते.
चतुर्थ स्थानी : घरात सख्खेसावत्र असते वा इस्टेटीबद्दल वा स्थावराबद्दल वाद असतात. शिक्षण प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण होते. त्याचा उपयोग असा होत नाही. शैक्षणिक क्षेशशी संबंध येतो.
पंचम स्थानी : मुलामुलींचे प्रमाण सारखे असते, मुली जास्त भाग्यवान असतात. एखाद्या मुलाकडून सांपत्तिक त्रास होतो, संसार कधी संपत नाही.
षष्ठम स्थानी : गुप्त शत्रुत्व असते. मधुमेह, संग्रहणी, रक्तदाब हयांपैकी एखादा विकार असतो.
सप्तम स्थानी : घरात पत्नीचे प्रभुत्व असते. विवाहानंतर सांपत्तिक भाग्योदय होतो. मोठ्या घराण्याशी संबंध येतो. सासरा पुरोहित, न्यायाधिश वा शिक्षक असतो.
अष्टम स्थानी : लिटिगेशन्स करावयास लावतो. पैसे देण्याघेण्याचे व्यवहार करतो काही वेळा फसतो. रक्तदोष उत्पन्न करतो, मूळव्याध होते.
नवम स्थानी : घरात पारंपारिक देवस्थान असते. कोणी साधु संन्यासी होऊन गेलेला असतो. शैक्षणिक संस्थांशी संबंध येतो. ट्रस्टी होतो.
दशम स्थानी : सामाजिक प्रतिष्ठा देतो. अधिकारयोग होतो. महत्त्वाकांक्षी असतो. यश मिळते.
एकादश स्थानी : संपत्तीमान असतो. खूप संपत्ती मिळाली तर संतती मिळत नाही. व्यवसायात यशस्वी होतो. ह्यापैकी एक मोठं असं यशस्वी फल देतो.
द्वादश स्थानी : शिक्षण पूर्ण होते. दोनदोन पदव्या मिळवितो. नोकरीत हळूहळू भाग्योदय होतो. योग, उपासना, गूढशास्त्रे ह्यांत गती असते.
मंगळ (खालील स्थानी वक्री असता) :
प्रथम स्थानी : तापट व तिरसट स्वभाव असतो. सहज शत्रुत्व उत्पन्न करतो. उष्णतेचे विकार
उत्पन्न होतात, अपघात होतो, शस्त्रक्रिया होते.
द्वितीय स्थानी : घरात चोरी वा अपहार होतो. या कोणाचा अपघाती मृत्यू येतो. घशाचे विकार होतात.
तृतीय स्थानी : भावाला किंवा बहिणीला अपघात होतो. एखाद्या भावा बद्दल किंवा बहिणी बद्दल सतत काळजी असते. कर्णदोष उत्पन्न करतो, डोकेदुखीचा विकार असतो, प्रवासात त्रास होतो.
चतुर्थ स्थानी : स्थावराला अग्निभय दाखवितो, घरात कोणाला वा स्वतःला आनीमुळे वा इतर प्रकारे मोठा अपघात होतो. नेहमी मानसिक त्रस्तता असते. कौटुंबिक सुख मिळत नाही, रक्तदाबाचे विकार उद्भवतात.
पंचम स्थानी : एखाद्या संततीचा वियोग दाखवितो, स्त्रियांच्या बाबतीत गर्भपात, सिझरेयन् इत्यादी दर्शवितो. पोटाची वा इतर प्रकारची शस्त्रक्रिया होते, शिक्षणात अडणाळे येतात. संततीकडून सांपत्तिक संकटे उत्पन्न होतात.
षष्ठ स्थानी : ज्वरपीडा होते. अधुनमधून उष्णतेचे विकार उद्भवतात. शत्रूपीडा असते. नेहमी टेन्शनखाली असतो. शस्त्रक्रिया होते. पोटाचे विकार उद्भवतात.
सप्तम स्थानी : द्विभार्यायोग होतो वा पती वा पत्नीशी पटत नाही. दूरावा होतो. स्त्रियांच्या कुंडल्यात बाळंतपणी शस्त्रक्रिया दाखवितो. कोर्टात अपयश देतो, पती वा पत्नीला अपघात होतो वा एखादी मोठी शस्त्रक्रिया करावी लागते. भागीदारीच्या व्यवहारात त्रास व कष्ट होतो. लघवीचे विकार दाखवितो. स्त्रियांच्या बाबतीत पदररोग, धुपणी, गर्भाशयाचे विकार उद्भवताना दिसतात.
अष्टम स्थानी : स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशयाची शस्त्रक्रिया दाखवितो. लघवीचे विकार वा मूळव्याध असे विकार होतात, अपघात होतो. शस्त्रभय संभवते. घरात चोरी होते वा दरोडा पडतो, फौजदारी किंवा दिवाणी दाव्यात गुंतला जातो, क्वचित बंधनयोग होतो.
नवम स्थानी : हाताचे व मांडीचे हाड मोडण्याचा अपघात होतो. फॅक्चर्स होतात. घरात देवाची उपासना असते किंवा स्थान असते, स्वतः गणपतीची उपासना करतो, कुंडलीत मंगळ वक्री असता गणपतीची उपासना हितकारक होते असे दिसते. फळ लाभर्त.
दशम स्थानी : एक्झिक्युटिव्ह, वहानखाते, मिलिटरी, पोलिस इत्यादी खात्याशी व्यक्तीचा संबंध येतो, अधिकारयोग होतो, वडिलांना अपघातदर्शक संभवतो. नोकरीत तीन बदल होतात, वरिष्ठांशी न जमल्यामुळे काही वेळा त्रास होतो.
एकादश स्थानी : पैशाच्या व्यवहारात फसला जातो. ठेव बुडते. मित्रमंडळीकडून वास होतो.
द्वादश स्थानी : फौजदारी गुन्ह्यात गुंतला जातो, रस्त्यातील मारामारीत सापडतो वा त्यामुळे इजा होते, क्वचित बंधनयोग संभवतो, पायाला अपघात होतो, पैशाच्या व्यवहारात फसतो वा दिवाणी दाव्यात गुंतला जातो.
शुक्र : (खालील स्थानी वक्री असता)
प्रथम स्थानी : व्यक्तिमत्त्व उत्तम असते. पोशाखी व रुबाबदार असतो. थोडा बायकी वागतो. आवाजाची वा एखाद्या कलेची देणगी दतो, अशुभ असतो वा पापग्रहाच्या योगात पीडित असता दृष्टिदोष उत्पन्न करतो.
द्वितीय स्थानी : शुभग्रहाच्या योगात पैसा खूप देतो, कलाभिरुचीचा संभव असतो. गायन वादनाची आवड असते, हळू व गोड बोलतो, आवाज उत्तम असो.
तृतीय स्थानी : चित्रकला, गायनकला, वादन वा लेखनकला यांपैकी एखाद्या कलेत उत्तम गती असते मित्रमंडळ मोठे असते. एखादा भाऊ वा बहीण कलाकार होते. क्वचित् कवित्व संभवते. स्त्रीच्या प्रेमात पडतो.
चतुर्थ स्थानी : महत्त्वाकांक्षेने स्वतःचे स्थावर करतो. विलासी, चैनी व खर्चिक असतो. पति व पत्नी सुखरुप व सद्गुणी असते. कलाभिरुचिसंपत्र असतो. अत्तरे, फुले, सेंट इत्यादीची अतीव आवड असते. बागेचा छंद असतो. जनावरे पाळतो, आधुनिक सुखोपयोगी साधने खरेदी करण्याची आवड असते.
पंचम स्थानी : मुले कलाभिरुचिसंपन्न व सुस्वरुप असतात. परस्त्री वा परपुरुष प्रेमात पडण्याचे योग येतात. स्वत:जवळ एखादी कला असते.
षष्ठ स्थानी : कामी, विकारी व विलासी असतो, शुक्राच्या कारकत्वाखाली असणारे रोग संभवतात, नेत्रदोष उत्पन्न होतात.
सप्तम स्थानी : विवाहात वैचित्र्य दाखवितो. प्रेमांत पडतो, पापग्रहाच्या योगात सप्तमस्थानी वक्र शुक्र असता परस्त्री वा परपुरुषाच्या प्रेमांत पडण्याचे योग येतात. पत्नी वा पती सुस्वरुप मिळतो.
अष्टम स्थानी : सांपत्तिक सुख उत्तम मिळते. पीडित असता नेत्रदोष संभवताता. गुप्तप्रेम संबंध दाखवितो.
नवम स्थानी : देवीची उपासना करतो. सांपत्तिक भाग्योदय होतो. विवाहानंतर भाग्योदयाला सुरुवात होते. एखाद्या कलेत प्रावीण्य मिळवितो.
दशम स्थानी : शुक्रप्रधान वस्तूंचा व्यापार करतो. व्यवसायात यश मिळते. मोठ्या घराण्यातील स्त्रीशी विवाह होतो. जीवनात स्त्रीमुळे यशसंपत्र होतो. एखाद्या कलेत नैपुण्य असते. नाव मिळवितो.
एकादश स्थानी : पैसा खूप मिळवतो. अनपेक्षित धनलाभाचे योग येतात, विलासी व छंदी असतो. नाटकाची आवड असते.
द्वादश स्थानी : ह्या स्थानी वक्री शुक्र पापग्रह युक्त्त वा पीडित असा असता गुप्तप्रेम संबंध दाखवतो. व्यसनाधीन असतो. एखाद्या कलेत प्रावीण्य मिळते. पैसे खूप मिळवतो. क्वचित नेत्रपीडा उत्पन्न करतो.
बुध : (खालील स्थानी वक्री असता)
प्रथम स्थानी : पीडित वा पापग्रहाने युक्त असता वाणीदोष दाखवतो. शीघ्रकोपी असतो. स्वभाव चिडखोर असतो, बुद्धिमत्ता असते.
द्वितीय स्थानी : वरीलप्रमाणे वाणीदोष असतात, जलद बोलतो, वा अडखळत बोलतो; घशाचे विकार उद्भवतात, पैसा बाळगून राहते, स्वार्थी व आपमतलबी असतो.
तृतीय स्थानी : बुद्धिमान असतो, चिंतनशील असतो, वाचन व लेखनाची अतीव आवड असते शुभ ग्रहाच्या योगात ग्रंथनिर्मिती करतो, गूढविद्येची आवड असते. पीडीत असा वक्री बुध ह्या स्थानी असेल तर ऐकण्यात दोष उत्पन करतो व कर्णविकार उद्भवतात, तशी शस्त्रक्रिया होते.
चतुर्त स्थानी : बडबड्या वा अतीव बोलका असतो, घरात कोणाशी पटत नाही, बुद्धिमत्ता चांगली असते, पापपहाच्या अंशात्मक योगात वक्री असता कमी ऐकू येते.
पंचम स्थानी : पीडित वा पापग्रहाच्या योगात वक्री असता क्वचित वेड, फिट्स, ज्वरामुळे मेंदूवर परिणाम संभवतात. शुभ ग्रहाच्या योगात पंचमस्थानी वक्री बुध शुभ फळे देतो, बुद्धिमान असतो, शिक्षण पूर्ण होते, लेखन करतो, बुद्धिमंतांमध्ये नाव कमवितो, संशोधन करतो.
षष्ठ स्थानी : पीडित असता वा पापग्रहाच्या योगात असा वक्री असता मेंदूची दुखणी दाखवितो. Nervous disorders उत्पन्न करतो, पोटाचे विकार उद्भवतात, क्वचित् Skin Disease दाखवतो, लोकात वागण्याबद्दल गैरसमज असतात व इतर प्रकारचे आतड्यांचे विकार होण्याचे योग संभवतात, षष्ठस्थानी वक्री बुध ज्या ग्रहांच्या अंशात्मक योगात असतो त्याच्या कारकत्वाप्रमाणे रोग उत्पन्न करतो.
सप्तम स्थानी : पीडित वा पापग्रहायुक्त असा वक्री बुध सप्तमस्थानी असता विवाहात वा विवाह जमताना पत्रव्यवहार वा वादविवाद जास्त होतात. ठरलेला विवाह क्वचित मोडतो. दिवाणी दाव्यात गुंतला जातो. लघवीचे विकार उत्पन्न होतात. पतिपत्नीत मतवैचित्र्य असते.
अष्टम स्थानी : ठेवीच्या वा देवघेवीच्या व्यवहारात फसण्याचे योग येतात, निद्रानाशाचे विकार उद्भवतात, त्वचारोग व मेंदूचे रोग होतात.
नवम स्थानी : बुद्धिमान असतो, नोकरीत हळूहळू भाग्योदय होतो, घरात कोणाचा शिक्षणक्षेत्रांशी संबंध येतो.
दशम स्थानी : बुधाच्या कारकत्वाखालील सर्व व्यवहारात वा व्यवसायात यशदायक ठरतो, बोलका व खटपट्या असतो, शुक्र ग्रहाच्या योगात व्यावसायिकदृष्ट्या फारच शुभ फले देताना आढळतात, लेखन, वाचन, मनन व चिंतनाची आवड असते. ग्रंथ निर्मिती करतो. संशोधन करतो.
एकादश स्थानी : शुभग्रहांच्या योगात दशमस्थानाप्रमाणे फले मिळतात.
द्वादश स्थानी : पीडित वा पापग्रहांच्या योगात व्ययस्थानी वक्री बुध नेहमी सांपत्तिक अडचणी उत्पन्न करताना अनुभवास येतो. गुप्त शत्रुत्वपीडा असते, अपघात दर्शक होतो. पादरोगी असतो.
वक्री यह है कुंडलीत नीट अभ्यासावे लागतात. अशा ग्रहांची निश्चित अशी फले मिळत असतात. कुंडलीतील वक्री महांचा स्थानदृष्ट्या, ग्रहयोगात व कारक, गुणधर्मानुसार स्वतंत्र असा विचार करावयास पाहिजे.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
विषय : उपासना काण्ड
लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : हिंदू संस्कृती
मूळ लेखक : स्वामी तेजोमयानंद
नमस्कार,
वेदांची मुख्य शिकवण अभ्यासताना मुख्यत: आपल्याला अध्यात्मिक उन्नती व प्रगती चा उहापोह दिसतो. त्यात आपल्याला तीन भाग आढळतात.
१) कर्म काण्ड : ज्याला आपण सर्व साधारण पणे आपण विधियुक्त कर्म मानतो. त्यात इतर ही बरेच काही आहे.
२) ज्ञान काण्ड : हा विभाग परमोच्च श्रेष्ठ आत्मज्ञानाचा आहे.
३) उपासना काण्ड ( जो कर्म काण्ड मधील एक अंतर्भूत भाग आहे.) : यात परमेश्वराच्या ब्रह्मांडाच्या अनेक सृष्टींमधून प्रगट झालेले सगुण रुपांवर ध्यान कसे करायचे व पूजेचे मार्गदर्शन आहे.
मानवातील मनोविकार, मनाची अस्थिरता जी आत्म्या विषयीच्या अज्ञानातून निर्माण झाली आहे ती संभ्रमावस्था दूर करण्यासाठी ही व्यवस्था आहे.
वेदातील “उपासना काण्ड” ची आवश्यकता याविषयी थोडेफार माझ्या अल्प बुद्धीने लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.
उपासना म्हणजे पूजा किंवा शब्दशः जवळ बसणे. उप याचा अर्थ जवळ, आणि आसना म्हणजे बसणे. आता जवळ बसणे याचा अर्थ म्हणजे केवळ शरिरानेच नव्हे तर अंत:करणापासून परमेश्वराच्या सानिध्यात राहणे.
आपण गुरु उपासना ” करतो, म्हणजे गुरूंच्या जवळ जाऊन बसतो एवढाच नसतो. त्याचा अर्थ असा की अनुसंधानाने (मनाने) आपण पूजनीय व्यक्तिजवळ वास करावा. आणि जेव्हां आपण तसे करतो, तेव्हां हळूहळू त्या व्यक्तीचे गुण आपल्या मध्ये उतरतात व आपण त्या गुणांचे अनुसरण करू लागतो.
अग्नि जवळ लाकडाच्या फळी ठेवली असता, हळूहळू लाकडाची फळी उष्ण होते व नंतर त्यातून ज्वाळा निघू लागतात. त्या लाकडाच्या फळीच्या दृष्टीने ही अग्नि उपासना (अग्नि जवळ बसणे) आहे. अग्नीचे गुणधर्म त्या फळीस स्पर्श करू लागतात.
जर थंडी वाजत असेल व आपण शेकोटी जवळ बसलो, तर आपल्याला पण उष्णता जाणवते व ती धग अंगात उतरते.
त्याचप्रमाणे, वेदांतून असे सांगितले गेले आहे की, आपणसुद्धा इष्टदेवतेची (स्वेच्छेने निवडलेल्या देवाची) उपासना करावी. बहुतांशी आपल्याला राम, कृष्ण आणि शिव ई. उपास्य देवांची पूजा व उपासना करताना दिसतात. खरे पाहिल्यास ही केवळ दैवते नसून अति उच्च, अनुकरणीय ध्येये आहेत. प्रत्येक देव हा एका श्रेष्ठ आदर्श ध्येयाचेच (साकार) स्वरूप आहे
काही तथाकथित आधुनिक विचारांचे लोक अकारण प्रतिमा पूजनेचा उपहास करताना आढळतात. कारण त्यांना त्याचा गर्भितार्य कळलेला नसतो.
कुठल्या न कुठल्या स्वरूपात, प्रत्येक व्यक्ति प्रतिमा पूजनच करीत असते. आम्ही जेव्हां ध्वजाला वंदन करतो, तेव्हां आम्ही काय करीत असतो ? वास्तवात तो एका कापडाचा तुकडा आहे, असे जरी दिसत असले तरी, आम्ही खरे वंदन त्या ध्वजामागच्या विधानाला करीत असतो. ध्वज हा आपल्या देशाच्या महत्त्वाकांक्षा, आपल्या उच्च लाक्षणिक मूल्यांचे व संपूर्ण संस्कृतीचे निदर्शन करतो. झेंडा किंवा ध्वज केवळ कापडाच्या तुकड्यापेक्षा, गर्भित मौलिक लक्षणे दर्शवित असतो. म्हणून लोक एका विशिष्ठ देशाचा अथवा व्यक्तीचा विरोध दाखविण्यासाठी त्या देशाचा ध्वज अथवा प्रतिमा जाळतात. अशाप्रकारे कांही संकेत आपण त्या दार्शनिक वस्तूंना लावू शकतो. असा कोण आहे, जो कुठल्या ना कुठल्या रूपांने प्रतिमा पूजन करत नाही ?
प्रतिमा पूजनांचा उपयोग एवढ्याच करता असतो की, त्याने आपले मन एकाग्र होते. आपल्याला प्रतिमेतले आदरणीय वाटणारे सर्व गुण आपल्यात उतरावेत, हाच त्यांतला हेतु असतो. असे करणे म्हणजे दूरदर्शनवर एखादा विशिष्ट केंद्र लावल्यानंतर, जसे त्या केंद्राने प्रसारित केलेले सर्व कार्यक्रम आपल्याला आपोआप दिसू लागतात, तसेच आहे हे.
प्रभू श्रीरामचंद्रावर ध्यान केल्याने, त्याच्या भक्तात देखील श्रीराम कसा उत्कृष्ट राजा, आदर्श पुत्र, पति आणि बंधु होता, तसे गुण हळूहळू आकलन होत जातात.
त्याचप्रमाणे आपणही जशी संगती करतो, तसेच बनत जातो. समजा एखादा मनुष्य आधी धूम्रपान करीत नसणारा, जर अशा लोकांच्या संगतीत राहू लागला की जिथे माणसे सारखी धूम्रपान करीत असतात आणि त्यातील एखाद्याने विचारले की, तू पण कर रे धूम्रपान, काही होत नाही. तर आपल्या मनात मोह निर्माण होतो की, एकदा करून बघावयास काय हरकत आहे ? आपण जेव्हां अशी कुसंगत करू लागतो, तेव्हां क्रमशः हळूहळू त्या वैगुण्यांचे व दुर्गुणांचे आमच्या मध्ये पण आकलन होऊ लागते. आणि व्यसनाधीन व्हायला वेळ लागत नाही . म्हणूनच वडील धारे आपल्याला सतसंगत चा उपदेश देताना आढळतात. ज्यामुळे चांगले गुण आपल्यात अवतरतील.
ज्योतिष शास्त्रात चंद्रास मनाचा कारक मानतात, तसेच पाण्याचा ही कारक मानतात. मनात विचारांच्या व समुद्रात पाण्याच्या लाटा उसळतात आणि सर्व काही ढवळून निघते. पाण्याचा स्वत:चा असा रंग आकार नसतो. ते त्याच्या सान्निध्यात येणारा रंग व आकार धारण करते. तसेच मनाचे ही असते. आता हे आपल्या बुद्धीवर निर्भर करते की, आत्मारूपी सूर्याच्या प्रकाशात उजळून निघायचे की, विकारांच्या ग्रहणाने काळवंडून जायचे.
वेदां मध्ये उपासना भागात, ध्यानासंबंधी सुंदर विवेचन दिलेले आहे. आपल्याला ध्याना करिता, एक प्रतीक दिलेले असते. ते प्रतीक म्हणजे एका श्रेष्ठ, उच्च लक्षणाचे प्रतीक असते, ज्यावर आपले मन स्थिर करावयाचे असते. आपले सर्वत्र धावणारे (परावृत्त असणारे) चित्त अनन्य भावाने एकाग्र केले असता, आपल्याला त्या लाक्षणिक प्रतीकाचे सर्व गुण आकलन होतात आणि अंती आपण त्याच्याशी तादात्म्य साधतो. अशा प्रकारे जेव्हां आपले मन शुद्ध, पवित्र व एकाग्र होते, तेव्हां ते अत्युच्च शक्तीचे प्रचंड भांडार होते. तशा तेजःपुंज चित्ताने कांहीही करणे साध्य होते. कर्म काण्ड आणि उपासना काण्डाच्या अभ्यासाची पराकाष्ठा म्हणजेच आपल्या मनाची आत्मज्ञान प्राप्त करण्याची तयारी स्वानुभवाने अध्यात्मिक साक्षात्कार करण्याची तयारी होय.
जातकाशी चर्चा करत असताना त्यांना उपाय, उपासना सुचवताना मी नेहमी सांगत असतो. देवाला भाव प्रिय आहे.
जसे की संगणक आणि मोठा संगणक ज्याला आपण परम संगणक म्हणतो.
तसेच आत्मा आणि परम आत्मा म्हणजेच परमात्मा. आता परमात्मा कसा असतो तर, निर्गुण म्हणजे सत्व, राज, तम या गुणाच्या परे व निराकार ज्याला आकाराची मर्यादा नाही असा. विज्ञान सांगते कि ज्या गोष्टीला वस्तुमान म्हणजे जडत्व नाही त्याला झिरो (शून्य) मानले जाते. आणि ZERO TENDS TO INFINITY. म्हणजेच शून्यत्व अमर्याद आहे. म्हणूनच आपल्या संस्कृतीत शून्याला पूज्य व ब्रम्ह म्हटले जाते.
आता अशा या परम आत्न्याचा एक अंश आपल्या शरीरात जन्मत: प्रवेश करतो. म्हणजेच त्या परम आत्म्याच्या त्या आत्म्यास संसार रुपी माया निर्माण होते. त्याला शरीराच्या आकाराची मर्यादा प्राप्त होते. म्हणूनच आपल्या अहं ला आकार प्राप्त होतो, नि तो अहंकार आपल्यावर राज्य करायला लागतो. वास्तविक आपला श्वास आपल्याला सो अहं म्हणजे जो परम आत्म्या जो माझ्या अंतर्यामी वसलेला आहे ते मूळ स्वरूप आहे याचे स्मरण करून देत असतो. पण मायेच्या आवरणामुळे आपण निर्गुण ऐवजी सर्व षड रिपू काम, क्रोध, भय, मत्सर… ई. मध्ये गुरफटलेले असतो.
या अज्ञानातून बाहेर येण्या साठी उपासना महत्वाची ठरते.
आपण आयुष्यात असंख्य चुका करत असतो. पण दुसरे व्यक्ती समोर आपल्याला मान्य करायला अथवा क्षमा मागायला आपला अहंकार आडवा येत असतो.
पण देवासमोर जेव्हा आपण (स्वार्थी हेतूने का होईना) जातो, तेव्हा आपला अहंकार बाजूला ठेवून आपण हात जोडून शरण जातो. व फलश्रुती आपल्या मनाप्रमाणे असावी, या साठी याचना करतो. त्याला नमतो. यालाच सुंदर शब्द आहे नमन. जेव्हा आपल्या आपला अंतरात्मा त्या परमात्म्याच्या सगुण प्रतीकाशी तादाम्य पावतो, तेव्हा माणसाच्या आयुष्यात अमुलाग्र सकारात्मक बदल लीलया घडतात. म्हणूनच देवाला शुद्ध भाव अतिप्रिय असतो.
जे उत्स्फुर्तपणे वाटले ते लिहित गेलो. आशा आहे त्यामागील भाव आपल्या पर्यंत पोहोचेल.
शुभं भवतु !!!
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
विषय : आयुष्यावर बोलू काही (आयुष्य योग)
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : कुंडलीची भाषा (खंड ३ रा)
मूळ लेखक : ज्यो. कृष्णराव वाईकर
नमस्कार,
सर्वांच्याच मनात भय, कुतूहल आणि उत्सुकता असते असा विषय म्हणजे आयुष्य योग. या विषयाबद्दल जातकास काही सांगताना ज्योतिषास काही मर्यादा व संकेत पाळावे लागतात. तसेच आयुष्य निश्चित करणे सोपे नाही. नाना तन्हेचे योग पाहून काळजी पूर्वक कुंडली तपासून मग एखादी निष्कर्षावर यावे लागते. अनुभवाचा कस लागतो. तरीही विश्व नियन्त्याचे हे गूढ गणित सुटेल याची खात्री नसते, पण काही अंदाज निश्चित बांधता येऊ शकतात.
या आयुष्य योगावर ज्यो. कृष्णराव वाईकर गुरुजींनी कुंडलीची भाषा खंड ३ रा यामध्ये विपुल व विस्तारित माहिती देऊन ज्योतिष अभ्यासकांना भरपूर खाद्य पुरवले आहे. त्यातील काही संकली माहिती अपाल्यासाठी येथे देत आहे. ज्यांना या विषयात अधिक रस आहे त्यांनी वरील ग्रंथ आणून त्याचे मनन चिंतन करावे.
आयुष्य योगाचे मोजमाप करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी महत्वाचे नक्षत्र आर्युदाय पध्दत, ग्रहदत्त पिण्डार्युदाय पध्दत, महर्षी जैमिनी पध्दत, अष्टकवर्ग पध्दत, दशा अंतर्दशा आर्युदा पध्दत व गोचर आर्युदाय पध्दत इत्यादि.
आयुष्य योग हा चार भागात विभागला आहे.
१) बालारिष्ट योग, २) अल्पायु योग, ३) मध्यायुयोग, ४) दिर्घायु योग अगर पूर्णायु योग.
(१) बालारिष्ट योग –
वय वर्षे १ ते ८ किंवा मुल १२ वर्षाचे आत मृत्यु पावल्यास बालारिष्ट योग ठरतो. या बालारिष्ट योगात _
१) नक्षत्रसंधीमध्ये जन्म असता वाईट समजला जातो. रेवती-अश्विनी, आश्लेषा-मघा, जेष्ठा-मूळ या संधीमध्ये जन्म असता बालारिष्ट योग होतो. संधी काल मागील पुढील नक्षत्रात २४ मिनीटाचा धरतात. (ह्या योगाला नक्षत्र गंडांत योग म्हणतात.)
२) जन्म लग्न संधीत वाईट समजला जातो. तो मीन-मेष, कर्क-सिंह, वृश्चिक-धनु या राशी संधीत जन्म नसावा. मागच्या पुढच्या लग्नाचे प्रत्येकी २४ मिनिटे हा काल संधीचा असतो. हा बालारिष्ट योगात मोडतो. (ह्याला लग्न गंडात योग म्हणतात.)
३) तिथीसंधी : आमावस्या शुध्द प्रतिपदा दोन्ही पक्षातील पंचमी षष्ठी व पौर्णिमा वद्य प्रतिपदा यामधील संधीकाल मागील पुढील तिथीमध्ये २ घटिका किंवा ४८ मिनिटांचा धरतात हा काल बालारिष्ट काल असतो (ह्यास तिथीगंडांत म्हणतात.)
४) दिवा-रात्री संधीकाल-दोन्ही बाजूस बारा बारा मिनिटाचा काल धरला जातो.
५) दुष्ट नक्षत्रात जन्म अश्विनी प्रथम चरण, मघा प्रथम चरण, जेष्ठा नक्षत्राचा पांचवा भाग (१० भाग करावेत) मूळ नक्षत्रातला १२ वा भाग (१५ भाग करावेत.)
६) पापग्रह २/१२ स्थानात, सप्तमात, अष्टमात, व व्ययात असता, हे ग्रह लग्नभावापासूनच मोजावेत.
७) लग्नापासून क्षीण चंद्र ६-८-१२ स्थानात असता.
८) लगेशाचा अगर चंद्र लग्नाचा शत्रु लग्नात असून तो पापग्रह असणे.
९) लग्नापासून २/१२ अगर ६/८ स्थानात पापग्रह शुभ दृष्टी रहित असणे.
१०) सारांश लग्नी, २-१२ स्थानी, ६-८ स्थानी पापग्रह शुभ ग्रह दृष्टी रहित असता बालारिष्टाला पोषक ठरतो.
११) ग्रह युध्दात लग्नेश पराभूत होऊन पापग्रह संबंधीत असून सप्तमात असणे.
१२) चंद्र ४-७-८ स्थानी पापग्रहामध्ये असता.
१३) लग्न चंद्र पापमध्यात, शुभग्रह दृष्टीरहीत आणि सप्तमात व अष्टमात पापग्रह असता.
१४) ग्रहण योगातला जन्म बालकास घातक असतो.
यापैकी एकाच वेळेस दोनपेक्षा जास्त योग बालकाच्या कुंडलीत झाले असता बालारिष्ट योग होतो. बलवान गुरुच्या दृष्टीने बालारिष्ट योगाचा भंग होतो.
१५) पुढील ग्रह योगामुळे बालारिष्ट योग निर्माण होतो. ती स्थाने त्या ग्रहांना अनिष्ट असतात. :- १) रवि पंचमात, २) चंद्र लग्नी, षष्ठात, अष्टमात व व्ययात, ३) मंगळ सप्तमात, ४) राहू नवमात, ५) गुरु तृतीयात, ६) शनि लग्नी ७) शुक्र षष्ठात, ८) बुध चतुर्थात, ९) केतू व्ययात हे बालारिष्ट योग निर्माण करतात. सर्वच ग्रह कुंडलीत या स्थानी असतील. अगर तीन किंवा चार ग्रह वरील स्थानात असता बालारिष्ट योगास पुष्टी मिळते. काही अनिष्ट नक्षत्रावर जन्म झाल्यास बालकाचे आई-बाप व जवळचे नातेवाईक यांना अनिष्ठ असते. उदाहरणार्थ भरणी तिसरा चरण, रोहिणी पहिली दोन चरणे, पुष्य ३/४ चरण, आश्लेषा १/३/४ चरणे, हस्त तिसरे चरण, चित्रा १/ २ चरण, विशाखा सबंध नक्षत्र, मूळ १/२/३ चरणे. धार्मिक शांती केल्याने नक्षत्र. परिस्थितीमुळे आलेला हा दोष कमी होतो.
२) अल्पायु योग :- वय वर्षे ८ ते ३२
१) अष्टमेश पापग्रहयुक्त षष्ठात अगर व्ययात.
२) अष्टमेश निर्बली लग्नेशासह षष्ठात अगर व्ययात.
३) अष्टमेश धरुन सर्व पाप ग्रह केंद्रात मात्र लग्नेश यामध्ये येत नाही.
४) सर्व शुभ ग्रह अपोक्लिम स्थानात.
५) गुरु, शुक्र, बुध हे सर्व ग्रह षष्ठ, अष्टम, व्ययात.
६) पाप ग्रह रवि, मंगळ, शनि राहू व केतू हे केन्द्रात (१-४-७-१० स्थानात) व त्रिस्थानात (६-८-१२ मध्ये) आयुष्य योगास विघातक असतात.
७) लग्नेश केंद्रात अगर कोणात शुभ ग्रहांनी दृष्ट नसता अगर लग्न शुभ ग्रहांनी दृष्ट नसता अगर लग्नेश स्थित राशीचा स्वामी हा शुभ ग्रहांनी दृष्ट नसात अल्पायु योग होतो. (या तिन्हींपैकी एक तरी शुभ ग्रहांनी दृष्ट असल्यास आयुष्य योग वाढतो. उत्तर कालामृत)
८) (अ) लग्नेश अगर लग्नेश स्थित राशीचा स्वामी यांच्यावर शुभ ग्रहांची दृष्टी नसल्यास व लग्न अगर चंद्र लग्न हे अष्टमेशांनी दृष्ट असल्यास अल्पायु योग होतो.
(ब) लगेश अगर लप्रेश स्थित राशीचा स्वामी यांच्यावर शुभ ग्रहांची दृष्टी नसल्यास व लग्न अगर चंद्रापासून अष्टमेशावर शनी मंगळाची दृष्टी असल्यास (उत्तरकालामृत) अल्पायु योग होतो
९) अष्टमेश केन्द्रांत असून लग्नेशापेक्षा बलवान असता व पाप ग्रह अष्टमात व्ययात असता अल्पायु योग होतो.
१०) लग्नेश अष्टमेश वाईट स्थानात अगर वाईट दृष्टी योगात असता शुभ ग्रह दुर्बल व पाप ग्रह बलवान केंद्रात असता अल्पायु योग होतो.
११) गुलीक अष्टमात व शनि दृष्ट अगर शनिच्या वर्गात असता अल्पायु योग होतो.
१२) जेव्हा चार किंवा त्यापेक्षा जास्त ग्रह नवम ते व्ययस्थानापर्यंत असतात तेव्हा अल्पायु योग होतो.
३) मध्यायु योग :-
वय वर्षे ३३ ते ७४ वर्षे. मध्यायु योग होतो.
मध्यायु योगाचे तिन प्रकार १) अल्पायु-मध्यायु, (वय वर्षे ३३ ते ४६) २) मध्यायु (वय वर्ष ४७ ते ६०)
३) पूर्ण मध्यायु (वय वर्ष ६१ ते ७४).
जुन्या ग्रंथातील काही योग :-
मध्यायु योगात काही अल्पायु योग व काही दिर्घायु योग समन्वय झालेला असतो. उदाहरणार्थ बलवान रवि लग्नी पापमध्य, शुभ ग्रह दृष्टी विरहीत असता आयुष्य मध्यायुच्या काठावरच असते.
क्षीण चंद्र लगी वर्गोत्तम पापग्रह दृष्ट व शुभ ग्रह बलहिन जातक ४८ वर्षे पर्यंत जगतो.
मध्यायु योगाचे नियम
१) ४/५ ग्रह पंचम ते अष्टम भावापर्यंत असल्यास मध्यायु योग होतो.
२) पाप ग्रह अष्टमेश धरुन व लग्नेश सोडून पणफर स्थानात (२-५-८-११) असता मध्यायु योग होतो.
३) गुरु, बुध, शुक्र व्दितीयात-तृतीयात-लाभात अनुक्रमे असल्यास मध्यायु योग होतो (उत्तर कालामृत)
४) लग्नेश गुरु दुर्बल असेल व ६-८-१२ मध्ये पाप ग्रह असतील.
५) पाप ग्रह ६-८ स्थानात व शुभ ग्रह केन्द्र कोणात.
६) लग्नेश दुर्बल, पाप ग्रह ६-८-१२ मध्ये गुरु केन्द्र कोणात व लग्नात पाप ग्रह.
७) लग्नी वृषभ चंद्र, व्ययात मेषेचा शनि अगर सप्तमात वृश्चिकेचा रवि आयुष्य ६६ वर्षापर्यंत असते.
८) जन्म लग्नेश, चंद्र स्वामीचा अष्टमेश केन्द्रात व गुरु लग्री अगर केन्द्रात नसणे ६५ वर्षा पर्यंत आयुष्य असते.
९) मकर लग्न शनि चतुर्थात, मेषेचा मंगळ पंचमात, रवि कर्केचा ७० वर्षे पर्यंत आयुष्य असते.
वरील प्रमाणे ग्रहमान असल्यास मध्यायु योग होतो. मध्यायु योग ७४ वर्षे पर्यंत आहे.
४) दिर्घायु योग – (वय वर्षे ७५ ते १०० पर्यंत)
१) अष्टमेश अष्टमात.
२) लग्नेश व अष्टमेश षष्ठात वा व्ययात दिर्घायु योग (जातक परिजात)
३) अष्टमेश शुभ ग्रह युक्त अगर दृष्ट, शुभ स्थानात अगर अष्टमात.
४) लग्नेश अष्टमेश केन्द्र कोणात अगर लाभात बलवान (जातक परिजात.)
५) लग्नेश अष्टमेश बलवान केन्द्रात.
६) अष्टमेश उच्च अगर शुभ ग्रह युक्त किंवा शुभ ग्रह अष्टमेशाच्या केन्द्रात त्रिकोणात असणे.
पुर्णायु योग
७) (अ) शुभ ग्रह केंद्रात (बु.गु.शु.) व लग्नेश शुभ ग्रह युक्त अगर दृष्ट, (ब) अष्टमात तीन ग्रह त्यापैकी एक उच्च व एक स्वगृही व एक मित्रगृही, (क) आयुष्यकारक शनि अगर अष्टमेश उच्च ग्रहाबरोबर असणे.
८) लग्न लग्नेश अगर लग्नेशस्थित राशीचा स्वामी शुभ ग्रहांनी दृष्ट असणे (उत्तरकाला मृत)
९) बुध, गुरु, शुक्र केन्द्र कोणात दिर्घायु योग (उत्तर कालामृत)
१०) जन्म लग्न विषम राशीत असून जन्म लग्नी पूर्ण चंद्र व सर्व ग्रह विषम राशीत.
११) पापग्रह ३-६-११ स्थानात शुभ ग्रह बुध, गुरु, शुक्र ६-७-८ मध्ये (६- ७-८- स्थानातील शुभग्रह लग्नाधीयोग करतात) दिर्घायु योग.
१२) लग्नेश केन्द्रात, गुरु, शुक्र युक्त किंवा गुरु व शुक्र दृष्ट दिर्घायु योग.
१३) शनि लग्री, दशमात (शनि आयुष्यकारक) व अष्टमेश केंद्रात दिर्घायु योग.
१४) अष्टमेश स्वगृही अगर शनि अष्टमात दिर्घायु योग होतो.
१५) शुभ ग्रह व लग्नेश केंद्रात (१-४-७-१०) पणफर स्थानात (२-५-८-११) अगर अपोक्लिम (३-६-९-१२) स्थानात आयुष्य अनुक्रमे दीर्घ, मध्यम, अल्प असते. त्यांच्या उलट पापग्रह व अष्टमेश केंद्रात (१-४-७-१०), पणफर स्थानात (२-५-८-११), अपोक्लिम स्थानात (३-६-९-१२) आयुष्य अनुक्रमे अल्प. मध्यम, दीर्घ असते.
१६) शनि हा अष्टमेश युक्त अगर दृष्ट असता दिर्घायु योग होतो. (भावार्थ रत्नाकर अध्याय ७)
मारक (मृत्यु) कालाबद्दल काही नियम :
आयुष्याबद्दल विचार करतांना पहिल्यांदा जातक हा अल्पायु आहे, मध्यायु आहे, अगर दिर्घायु आहे हे ठरवून मग खाली दिलेल्या मारक ग्रहांच्या दशा अनुक्रमे श्रेणीने तपासून मारक दशा ठरवावी लागेल. श्रेणी तीन प्रकारच्या आहेत.
अ) प्रथम श्रेणी :-
तृतीय व अष्टमस्थाने ही आयुष्य स्थाने आहेत. यांच्यापासूनची व्ययस्थाने अनुक्रमे व्दितीय व सप्तम मारक स्थाने ठरतात.
१) व्दितीयेश व सप्तमेश संबंधीत पाप ग्रह (युक्त अगर दृष्ट).
२) व्दितीयेश व सप्तमेश (सप्तमापेक्षा व्दितीय स्थान जास्त बलवान आहे.) पाप ग्रह दृष्ट.
ब) व्दितीय श्रेणी –
१) व्दितीयेश व सप्तमेश यांच्याशी संबंधीत शुभ ग्रह.
२) तृतीयेश व अष्टमेश असलेले ग्रह (कन्या लग्नाला मंगळ व मीन लग्नाला शुक्र असतो.) संबंधीत.
३) तृतीयेश अगर अष्टमेश हे व्दितीयेश सप्तमेश संबंधीत असता.
क) तृतीय श्रेणी –
१) शनिचा प्रथम अगर व्दितीय श्रेणीच्या मारकेशाशी सहवास अगर दृष्टीसंबंध असता.
२) षष्ठेश अगर अष्टमेश यांच्या दशा.
ड) कुंडलीतल्या सर्वात निर्बली ग्रहाची दशा.
वरील ग्रह श्रेणीप्रमाणे व आपल्या गुणवत्तेप्रमाणे मारक आहेत.
खालील ग्रहांना छिद्र ग्रह म्हणतात व जो जास्त बलवान असेल त्याच्या दशेत मृत्यु संभवतो.
१) अष्टमेश, २) अष्टमस्थ ग्रह, ३) अष्टमाला पहाणारा ग्रह, ४) २२ व्या द्रेष्काणाचा स्वामी, ५) अष्टमेशाशी संबंधीत ग्रह, ६) चंद्राचा ६४ व्या नवमांशाचा स्वामी, ७) अष्टमेशाच्या अतिशत्रुच्या दशेत मृत्यु संभवतो.
जातक परिजातक ग्रंथाप्रमाणे अष्टम स्थानाचे योग
१) अष्टमेश हा आयुष्यकारक आहे तो जर दुषित झाला तर मृत्यु आणतो. अष्टमेश ६-८-१२ स्थानात असता खालील दशा भुक्तीत मृत्यु संभवतो. (अ) अष्टमेश दशा व भुक्ती (ब) शनि स्थित राशीच्या स्वामीच्या दशेत अष्टमेशाची भुक्ती (क) अष्टमेशाची दशा व नवमेशाच्या भुक्तीत मृत्यु संभवतो.
२) लग्नेश, अष्टमेश, दशमेश व शनि ह्यांच्यामध्ये जो दुर्बल ग्रह राहूयुक्त असता मृत्यू दुर्बल ग्रहाच्या दशेत येतो किंवा ह्या दुर्बल ग्रहाबरोबर असलेला ग्रह किंवा त्याला पाहणाऱ्या ग्रहांच्या दशेत येतो.
३) अष्टमेश अष्टमात असता जातकास अष्टमेशाच्या दशेत शारिरीक भोग भोगावे लागतात. अष्टमेश बलवान असता लग्नेशाच्या दशेत मृत्यू येतो.
४) लग्न दुर्बल असता लग्नेश अष्टमेशाची दशा निर्णायक समजावी. (मारक समजावी.)
५) लग्नेश बलवान असता अष्टमेशाची दशा मारक समजावी.
६) लग्नेश अष्टमेश हे इतर ग्रहाबरोबर असले तर ह्या दोघात जो बलहीन त्याची दशा मृत्युकारक समजावी.
७) लग्नेश ६-८-१२ मध्ये राहू केतू युक्त असता मृत्यु येतो. तो लग्नेशाबरोबरच्या अगर अष्टमेश ग्रहाच्या दशेत येतो.
८) अल्पायुषी, मध्यायुषी अगर दिर्घायुषी योगात राहूची महादशा आल्यास ती दशा त्या कालखंडात मारक समजावी.
९) राहू केतू त्रिकोणात असून द्वितीयेश सप्तमेश संबंधीत असता ते मृत्यु आणतात. (उत्तर कालामृत खंड ५)
१०) राहू केतू ६-८-१२ स्थानात असून ६-८-१२ च्या स्वामीने युक्त अगर दृष्ट असता जातकास फार त्रासदायक ठरतात. मात्र ते जर २-७ स्वामीने युक्त असता दृष्ट असता मृत्युकारक ठरतात. येथे हे ग्रह केंद्र कोण स्वामीने युक्त असता अगर दृष्ट असता काही काल सुख देवून नंतर मृत्यु आणतात. (उत्तर कालामृत खंड ५)
११) व्ययेशाचा मारक ग्रहांशी संबंध आल्यास व्ययेश मारक होतो. व्ययेशाच्या दशेत व व्दितीयेशाच्या भुक्तीत मृत्यु संभवतो. किंवा व्ययस्थ ग्रह जर व्ययेशांनी दृष्ट असल्यास द्वितीयेशाच्या दशेत व्ययस्थ ग्रहाच्या मुक्तीत मरण संभवते. (भावार्थ रत्नाकर)
भावार्थ रत्नाकर प्रमाणे खालील दशाभुक्तीमध्ये मरण संभवते.
दशानाथ अष्टमेश – भुक्तीनाथ अष्टमेश
दशानाथ षष्ठेश – भुक्तीनाथ अष्टमेश
दशानाथ अष्टमेश – भुक्तीनाथ षष्ठातला पाप ग्रह
दशानाथ षष्ठेश – भुक्तीनाथ अष्टमातला पाप ग्रह
दशानाथ अष्टमेश – भुक्तीनाथ षष्ठेशाशी युक्त ग्रह किंवा अष्टमेशाने दृष्ट असलेले ग्रह
दशानाथ अष्टमातला पापग्रह – भुक्तीनाथ षष्ठेश
दशानाथ षष्ठातला पापग्रह – भुक्तीनाथ अष्टमेश
दशानाथ षष्ठातला पापग्रह – भुक्तीनाथ अष्टमेश अष्टमात
दशानाथ अष्टमस्थ पापग्रह – भुक्तीनाथ षष्ठस्थ पापग्रह
गोचर आर्युदाय :
मृत्यु दाखविणारी ग्रहांची भ्रमणे :- (Span of Life by G. कृष्ण मूर्ती ह्या ग्रंथातून)
जन्म चंद्राच्या संबंधात ग्रहांची चंद्रापासून विशिष्ट राशीतील भ्रमणे मृत्यू आणतात. जेव्हा रवि-मंगळ-गुरु-शनि जन्मस्थ चंद्रावरुन, त्याच्या अष्टमातून व व्ययातून भ्रमण करतात तेव्हा चिंता व आजारपण तर कधी कधी मृत्युही देतात.
नुसत्या ग्रहांच्या भ्रमणाने मृत्यु ठरविण्याच्या अगोदर जातकाचा आयुष्याचा कालखंड निश्चित केला पाहिजे. तो ठरविल्यावर मारक दशा भुक्तीची निश्चिती करुन मग ग्रहांचे भ्रमण पहावे. समजा जन्म कुंडलीत चंद्र वृषमेत आहे तर शनिचे मेष (व्ययस्थ) वृषभ (प्रथम) व धनु (अष्टम) राशीतले भ्रमण मारक मृत्युकारक ठरेल. शनिला सर्व राशीतून भ्रमण करण्यास साधारण ३० वर्षे लागतात. कुंडलीत गुरु अगर मंगळ हे जन्म चंद्राच्या १-८-१२ स्थानातून जर जात असतील तर मारक काल तीव्र होतो.
अ) कोणत्याही भावापासून जेव्हा शनि आपल्या भ्रमणात त्या स्थानाच्या अष्टमेशाच्या अगर व्ययेशाच्या राशीत अगर नवमांश राशीत येतो अगर त्या राशीच्या त्रिकोणात येतो तेव्हा तो त्या भावाचे नुकसान करतो. त्या भावासंबंधी वाईट फले निर्माण करतो. (फलदीपिका अध्याय १७/१)
ब) अष्टमेश गुलिक शनि व २२ व्या द्रेष्काणाचा स्वामी (लग्नापासून) यांची जन्म व नवमांश राशी पहावी जेव्हा शनि या राशीतून अगर त्यांच्या त्रिकोण राशीतून जातो तो काल मृत्यु काल समजावा. (फलदिपीका १७/२)
क) लग्नी कोणत्या द्रेष्काणाचा उदय होत आहे. त्या द्रेष्काणाचा स्वामी अष्टमेश व २२ व्या द्रेष्काणाचा स्वामी यांची जन्मराशी अगर नवमांश राशीतून अगर यांच्यापासून त्रिकोण राशीतून गुरुचे भ्रमण होत असता मृत्यु संभवतो. (फलदिपीका अध्याय १७/३)
ड) शनिचे खालील ग्रहांवरुन अगर त्यांच्या त्रिकोणातून भ्रमण मृत्यू संभव दाखवितो.
१) जन्मचंद्र २) जन्मशनि ३) चंद्राच्या राशीचा स्वामी ४) अष्टमस्थानात उदय पावणारा स्वामी ५) चंद्रापासून अष्टमेश ६) लग्नेशाचा नवमांशस्वामी ७) अष्टमेशाचा नवमांश स्वामी ८) रविपासून ६-८ स्थाने ९) गुलिक राशी.
ग) गुरुचे भ्रमण खालील परिस्थितीत मृत्युकारक ठरते.
१) अष्टमेश राशीचे त्रिकोण राशीत गुरु आला असता.
२) लग्न, रवि, मांदी राशी अंश कलेची बेरीज ज्या राशी अंश कलेत असेल ती राशी.
३) गुरु, राहू यांच्या राशी अंश यांच्या बेरजेइतक्या राशीत गुरुचे भ्रमण अगर त्या राशीच्या त्रिकोणातल्या राशीत गुरु असता मृत्यु कारक असतो. मृत्यु आणण्याकरता एका पाप ग्रहाचे भ्रमण अपुरे आहे. दोन अगर तीन अनिष्ट पाप ग्रह एकाच वेळी अनिष्ट स्थानातून भ्रमण करतात. तो काल आयुष्यास धोकादायक समजावा. मृत्युसमयी राहू अगर केतू बहुतेक जन्म लग्न अगर चंद्र लग्न यांच्या व्दितीय व्ययातून भ्रमण करतात. मंगळ हा लग्न व चंद्र लग्नापासून तृतीयात, चतुर्थात अगर चंद्र लग्नावर दृष्टीयोग करीत असता अगर लग्न चंद्रावरुन भ्रमण करताना आणि मंगळाची ४-८ प्रभावी दृष्टी असता मृत्यु येतो. गुरुचे लग्न चंद्रावरुन भ्रमण हा मृत्यु योग आहे. हे वृषभ, तूळ लग्नाच्या बाबतीत खरे ठरते. ग्रह मारक ग्रहावरुन भ्रमण करीत असता ते मारक होतात अगर मारकेशाला मदत करतात. हा भ्रमणाच्या बाबतीत महत्वाच्या नियम आहे.
मृत्युसंबंधी काही विशिष्ट योग
अ) योगकारक ग्रह हा जर योग मारक ठरला तर योग देऊन मृत्यु देईल. हा नियम लाल बहादूर शास्त्री यांच्या बाबतीत खरा ठरला आहे. योग मारक ग्रह व्दितीयात सप्तमात असता अगर व्दितीयेश सप्तमेश असता मृत्यु संभवतो. लाल बहादूर शास्त्री धनु लग्न बुध दशेत बुध भुक्तिने ते पंतप्रधान झाले व त्याच भुक्तित त्यांना मरण आले. बुध सप्तमेश आहे. लग्नेशही मारक होऊ शकतो पण अशा परिस्थितीत लग्नेश कुंडलीत वाईट परिस्थितीत असतो अगर वाईट नक्षत्रात असतो. रविंद्रनाथ टागोर मीन लग्न लग्नेश गुरुचा परिवर्तन चंद्राशी आहे. चंद्र पंचमेश हा कर्क राशीत, सप्तमेश बुधाच्या नक्षत्रात आहे. नेहमीचा अनुभव म्हणजे लग्नापासून व्दितीयेश सप्तमेश हा चंद्र लग्नाच्या व्दितीयात सप्तमात असता मृत्यु आणतो. किंवा त्याच्या उलट चंद्रापासून व्दितीयेश सप्तमेश हा लग्नाच्या व्दितीयात सप्तमात असता मृत्यु आणतो. ग्रह ज्या नक्षत्रात आहे. तो नक्षत्र स्वामी जर कुंडलीत २-७ स्थानाचा स्वामी असला किंवा २-७ स्थानात असता त्या नक्षत्र स्वामीच्या गुणधर्माप्रमाणे त्या ग्रहावर परिणाम होऊन मृत्यु येतो. टागोरांचा मृत्यू गुरु दशा गुरु मुक्त्ति झाला. राहूच्या नक्षत्रातील ग्रह आपल्या दशेत नेहमीच वाईट फले देतात.
ब) बाधक ग्रहही मारक होतो हे मेष, कर्क, तूळ, वृषभ, सिंह व कुंभ लग्नाच्या बाबतीत प्रामुख्याने खरे ठरते. वरील लग्नाला अनुक्रमे बाधक ग्रह शनि-शुक्र-रवि- शनि-मंगळ-शुक्र आहेत. वर दिलेली तीन लग्ने वृषभ, सिंह व कुंभ या लग्नाला योगकारकच बाधक होतो. या लगाला योगकारक बाधक न होण्याकरता कोणता तरी शुभ ग्रह त्याचे संबंधीत असता मृत्युयोग दूर करतो. बाधक ग्रह है जर केंद्र कोनात असता जास्त अनर्थ करतात म्हणून ते दुःस्थानात असलेले बरे. तृतीयात असता सर्वात चांगली परिस्थिती समजावी.
अल्पायु योगात तिसरी दशा, मध्यायु योगात पाचवी दशा, दिर्घायु योगात सातवी दशा मृत्युकारक असते.
सर्वात जास्त मारक ग्रह कोण आहे, हे जन्म लग्न, चंद्र लग्न व नवमांश लग्रावरुन ठरवावे. व ग्रह हा वरील तिन्ही दृष्टीने २-३-७-८ मध्ये असता अगर व्दितीयेश तृतीयेश सप्तमेश असता अगर या स्वामीबरोबर असता अगर या स्वामीने दृष्ट असता भारक अवगुण त्या ग्रहात येतात. ज्याला जास्त मारक अवगुण येतात तो ग्रह सर्वात जास्त मारक समजावा. व त्या ग्रहांची मारक प्रवृत्ती आयुष्याचा कालखंड (अल्प-मध्यम-दीर्घ) काढून ठरवावी.
मृत्यु कसा येईल
मृत्यू कोणत्या रोगाने होईल, तो रोग दीर्घ आहे की अल्प मुदतीचा असेल, मृत्यु शांततेत येईल किंवा विपन्न अवस्थेत येईल, मृत्यु नैसर्गिक असेल किंवा अनैसर्गिक असेल, मृत्यु घरी येईल किंवा परदेशात येईल, असे अनेक प्रश्न उद्भवतात.
अष्टमाचा जर एकापेक्षा जास्त ग्रहांशी संबंध असेल तर रोग एक दोन असू शकतील, ग्रहाच्या राशीवरुन शरीराचा कोणता भाग रोगाला बळी पडेल अगर शरीराला जखमा होतील हे कळते. अष्टमात पापग्रह व अष्टमाला पाहणारे ग्रह कुर असतील तर मृत्यु दुःखकारक होतो. मग तो मृत्यु नैसर्गिक असो अगर अनैसर्गिक असो. पण अष्टमेश शुभ ग्रहांनी दृष्ट असता अगर अष्टमेश अष्टमाला पहात असून बलवान शुभ ग्रहांनीही अष्टमस्थान व अष्टमेश दृष्ट असता मृत्यु एकदम होतो. सुखकर असतो. त्यातले त्यात अष्टम हे गुरुचे स्थान असून गुरुने दृष्ट असता याचा अनुभव जास्त येईल, अष्टमात ग्रह नसता व अष्टमाला कोणी ग्रह पहात नसता २२ व्या द्रेष्काणावरुन मृत्युचा अंदाज घ्यावा.
२२ व्या द्रेष्काण कसा काढावा. लग्न मेष २७ अंश आहे तर २२ वा द्रेष्काण धनुचा तिसरा द्रेष्काण होतो. ज्या ग्रहाचा संबंध अष्टम स्थानाशी येतो त्या ग्रहाच्या अनुरोधाने मृत्युचे कारण कळते. रवि-अग्निमुळे, चंद्र पाण्यामुळे, मंगळ-शस्त्रामुळे, बुध-ज्वरामुळे, गुरु-शुक्र-खाण्यापिण्याच्या अतिरेकामुळे, शनि-उपासमारीमुळे अगर अपुऱ्या अन्नामुळे मृत्यु येतो.
अष्टमात चर राशी असता मृत्यु परप्रांती, स्थिर राशीत असता घरीच मृत्यु येतो. व्दिस्वभाव राशी असता प्रवासात मृत्युयोग संभवतो. शनि-राहू हे दीर्घ आजार देणारे ग्रह आहेत. रवि, मंगळ, हर्षल अल्प मुदतीचे आजार देणारे ग्रह आहेत. दुसऱ्या प्रकाराने हीच गोष्ट पहाता येते. प्रत्येक भावाला जीव व शरीर हे दोन भाग असतात. ते भावाची फले देतात.
मृत्यु नैसर्गिक व अनैसर्गिकही असू शकतो. नैसर्गिक मृत्यु हा आजारपणाने अगर म्हतारपणाने येतो. तसा अनैसर्गिक मृत्यु नसतो. हा मृत्यु एकदम येतो व भयंकर असतो.
उदाहरणार्थ अपघाताने आलेला मृत्यु रेल्वे, मोटार, विमान अपघात होणे, बुडणे, अग्नीमध्ये जळणे विषप्राशन करुन, खुनामुळे अगर फाशी दिल्यामुळे येणारे मृत्यु या सदरात मोडतात. बहुतेक असे मृत्यु भयंकर असतात.
या मृत्युमध्ये अष्टम भावाचे व २२ व्या द्रेष्काणाचे प्राबल्य दिसून येते व ग्रहांमध्ये मंगळ, राहू व शनि, हर्षल, नेपच्यून यांचा मोठा भाग आढळतो. नक्षत्रांचासुध्दा यात प्रभाव दिसून येतो. काही देष्काणे, उदाहरणार्थ आयुध, पाश, निगल (Fetters) सर्प ही द्रेष्काणे जास्त कुर असतात याचे प्राबल्य अष्टमभावावर अगर २२ व्या द्रेष्काणावर अगर लग्नेशावर असता मृत्यु अनैसर्गिक व भयंकर रितीने होतो.
एकंदर द्रेष्काण सहा प्रकारची आहेत. आयुध, पाश, निगल, पक्षी, सर्प, चतुष्पाद.
१) आयुध द्रेष्काण : मेष, सिंह, धनु, तूळेचा द्रेष्काण; मेष, धनुचा पहिला द्रेष्काण व मिथुन कन्येचा २ रा द्रष्काण (आयुध-शस्त्र)
२) पाश (गळफास) (Noose) वृश्चिक दुसरा द्रेष्काण.
३) निगलः- (बंदिवास) मकरेचा पहिला द्रेष्काण.
४) सर्पः- वृश्चिक १ ला, कन्येचा व मीनेचा ३ रा द्रेष्काण.
अष्टमावर अगर २२ व्या द्रेष्काणावर या चारांचा प्रभाव असता मृत्यु कोणत्या प्रकारे येईल याचा बोध होतो.
जीव व शरीर संकल्पना :
जीव व शरीर ही भावाची दोन तत्वे आहेत. नक्षत्र पध्दतीत खालील रितीने जातकाचा मृत्यु दीर्घ आजाराने होईल किंवा कसे हे पाहतात व ते अष्टम स्थानावरुनही पहातात.
अष्टमेश ज्या नक्षत्रात असेल त्याचा स्वामी हा जीव ठरतो. जीव म्हणजे आत्मा (Soul)
व जीव ज्या नक्षत्रात असेल त्याचा स्वामी शरीर ठरतो. शरीर म्हणजे देह (Body) यांची बलवत्ता पहावी लागते. व मरणसमयी आजार दीर्घ किंवा अल्प मुदतीचा यांचा विचार होतो. आत्मा किंवा शरीर ह्यापैकी जो बलहिन असेल त्याला दुःख होईल.
१) जीव जर शरीरापेक्षा दुर्बल असेल तर मृत्युसमयी आजार अल्प असतो व दोघांच्या बलवत्तेत फारच फरक असल्यास आजारपणाचा काल फारच अल्प असतो.
२) जीव हा शरीरापेक्षा जास्त बलवान असेल तर मृत्युपूर्वी दीर्घ आजार देतो. यांच्या बलवत्तेत फार फरक असता आजारपण जास्त दीर्घ होते.
३) जीव शरीर हे दोन्ही सारखे बलवान अगर सारखेच दुर्बल असता आजारपणाशिवाय एकदम मृत्यू देतात. बलवत्तेत मरण दुःख कमी असते व दुर्बलते मध्ये शारिरीक हालअपेष्टा जास्त असतात.
आयुष्य निश्चित करणे सोपे नाही. नान तन्हेचे योग पाहून काळजी पूर्वक कुंडली दिर्घायु, मध्यायु किंवा अल्पायु आहे. हे ठरवून नंतर मारक दशा ठरवावी लागते.
दीर्घायु योगात ७५ ते १२० वर्ष पर्यंत ज्या बलवान मारक दशा असतील तेच मृत्यु देतील. त्याच्या अगोदरच्या आयुष्याचा काल खंडात मारक दशा आली असता तो मृत्यु योग न समजता आजारीपणाचा योग समजावा, अगर कष्ट, दुःख हानी होईल असे समजावे.
टीप : ही माहिती मुख्यत्वे ज्योतिष अभ्यासकांसाठी दिलेली आहे. केवळ लेख वाचून कोणताही निष्कर्ष काढू नये व जेथे आवश्यक असेल तेथे जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)