कोणतीही उपासना, जप, मंत्र श्रद्धे ने पठन करण्याने मन एकाग्र होते, असंख्य विचारांची वादळ शांत होऊन मनाच्या गाभारा च्या पोकळीत अन्तर्मनाचा नाद ऐकू येतो. मन विकार रहित होऊन आत्मशक्ति वाढते व आनंदाच्या चैतन्य लहरी निर्माण होतात. तुमची जन्म रास व राशि स्वामी विचारात घेऊन त्यानुसार काही उपासना देत आहे.
मेष मंत्र – ||ॐ गं गणपतये नमः उपासना – गणपती अथर्वशिर्ष वृषभ मंत्र – ||ॐ श्रीं नमः|| उपासना – कुलदेवता किंवा देवीचे स्तोत्र मिथुन मंत्र – ||ॐ -हीं सूर्याय नमः|| उपासना – हनुमान स्तोत्र कर्क मंत्र – ||ॐ श्रीं नमः|| उपासना – गणपती अथर्वशिर्ष सिंह मंत्र – गायत्री मंत्र उपासना – आदित्य ह्रदय कन्या मंत्र – ||ॐ -हीं नमः|| उपासना – श्री सूक्त हनुमान तूळ मंत्र – ||ॐ श्रीं नमः|| उपासना – श्री सुक्त वृश्चिक मंत्र – ||ॐ गं गणपतये नम:|| उपासना – अथर्वशिर्ष धनु मंत्र – ||श्री स्वामी समर्थ|| उपासना – दत्तस्तोत्र, अक्कलकोट स्वामीं मकर मंत्र – ||ॐ नमः शिवाय|| उपासना – शिवस्तुती कुंभ मंत्र – ||ॐ शनैश्वराय नमः|| उपासना – शनी व हनुमान मीन मंत्र – ||ॐ गं गणपतये नमः|| उपासना – अथर्वशिर्ष
ही स्वानुभवाची गोष्ट आहे. झाला तर फ़ायदाच होईल, नुकसान काहीच नाही. रास माहित नसेल तर तुम्हाला भावनारी देवता चे मंत्र वा उपासना करुन एकाग्रता साधा.
मांगल्य चिन्ह आकाशातील स्वस्तिक च्या निर्मितीची भूमिती
आज आपण हिंदू संस्कृतीतील प्राचीन व पूर्वापार चालत आलेले मांगल्य चिन्ह स्वस्तिक च्या निर्मितीची भूमिती जाणून घेणार आहोत.
स्वस्तिक हे उत्तर ध्रुवणाचे प्रतिनिधित्व करणारे आकाशातील एक भौमितिक चित्राकृती आहे. सप्तर्षी हा आकाशात स्थित असलेल्या मारिची, वसिष्ठ, अंगिरस, अत्रि, पुलस्त्य, पुलह आणि क्रतु या सात तारकांचा समुह आहे. पुलह व क्रतु तारकांच्या आंतराच्या ५ पट अंतरावर सरळ रेषेत वाढवत नेले की ध्रुव तारा आपणांस दिसतो. विश्वाची निर्मिती स्थापित करण्यात याला सर्वात महत्त्व आहे. उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव या अक्षाच्या मधे सर्पिल आकार असलेली आपली आकाशगंगा अनादि अनंत काळ गोलाकाल फ़िरत आहे. उत्तर ध्रुव तारका ला संस्कृत साहित्यात ध्रुव नक्षत्र म्हणतात. जे सर्वदा स्थिर व अढळ असते. सप्तर्षी हा आकाशात स्थित असलेल्या मारिची, वसिष्ठ, अंगिरस, अत्रि, पुलस्त्य, पुलह आणि क्रतु या सात तारकांचा समुह आहे. त्यामध्ये आणखी एक तारा किंचित दिसतो, ज्याला “अरुंधती” म्हणून ओळखले जाते. ध्रुव कालचक्रांचे केंद्र आहे ज्याभोवती सप्तर्षी मंडळ घड्याळाच्या दिशेने या निश्चित केंद्राभोवती फिरत आहे.
चित्राकृती प्रमाणे वसंत ऋतू मधे वरील बाजूस दाखवल्याप्रमाणे पाठी वर करुन झोपलेल्या प्रश्न चिन्हाच्या स्थितीत सप्तर्षी तारका समुह आपल्याला दिसतो. शिशिर ऋतू मधे म्हणजे हिवाळ्यात उजवीकडील बाजूस दाखवलेल्या स्थितीत सप्तर्षी तारका समुह आपल्याला दिसतो. शरद ऋतू मधे जेव्हा पानगळ होते तेव्हा खालील बाजूस दाखवल्याप्रमाणे पाठीवर झोपलेल्या प्रश्न चिन्हाच्या स्थितीत सप्तर्षी तारका समुह आपल्याला दिसतो. ग्रीष्म ऋतू मधे म्हणजे उन्हाळ्यात वरील डाव्या बाजूस दाखवल्याप्रमाणे शीर्षासन केलेल्या प्रश्न चिन्हाच्या स्थितीत सप्तर्षी तारका समुह आपल्याला दिसतो. या चारही आकृत्या सरळ रेषेत ध्रुव नक्षत्रास जॊड्ल्यावर एक विशिष्ठ आकृतीबंध तयार होतो. तेच मूळ आकाश स्थित स्वस्तिक. स्वास्तिकचे हात सूर्य, वारा, पाणी आणि माती.याचे प्रतिनिधित्व करतात. अध्यात्मिक स्वस्तिक : ‘सु’ म्हणजे ” चांगले आणि ’अस्ति’ ” होणे किंवा असणे अस्तित्व, “क” जो “कल्याणशी संबंधित आहे, सु+अस्ति+क= स्वस्तिक. त्याचे चार पाय 90° वर वाकलेले असतात. कालचक्र, युग धर्म आणि चतुर्पदाचे चे प्रतिनिधित्व करतात. चांगले होणे, कल्याणकारी असणे, स्वास्थ्यकारी याचे प्रतिक म्हणून कोणत्याही मंगल कार्यात, व्यवसायाचे ठिकाणी, घराच्या दारावर, देव्हारा मधे ई. ठिकाणी स्वस्तिक चिन्हांचा वापर केला जात आलाय. हे अगदी खरे आहे की नुसते शुभ चिन्ह लावून काही मंगलमय होणार नाही, पण त्या शुभ चिन्हामुळे, सकारात्मक ऊर्जा मेंदूमधे उत्पन्न होऊन, त्यानुसार कल्याणकारी गोष्टी घडण्यासाठी चांगले प्रयत्न करायला बळ निश्चित मिळेल.
वेदांमध्ये असे म्हटले आहे की ‘स्वस्तिक’ हे आपल्या स्वतःच्या रूपात विश्वाचे प्रतिनिधित्व करते. निर्मात्याच्या तर्जनी वर आवर्त आकाशगंगा. हे ब्रह्मांड संकल्पना ‘काल’ किंवा वेळ म्हणून स्थापित करण्यात सर्वात महत्त्वाचे आहेत. हे काल चक्राचे एक उत्तम प्रतीक आहे. काळ हा मानवी दिनदर्शिकेपेक्षा अधिक प्रगत असल्याचे दिसणारे एक प्रतीक आहे, ज्याला भगवान शिव अर्धाकार चंद्र व्दारे दर्शवितात. पश्चिम तिबेट मधील कैलास पर्वताच्या पश्चिमेला अस्थपद पर्वतावर हा निसर्गाचा शास्त्रीय अविष्कार स्पष्ट्पणे पाहता येतो. यावरुन अध्यात्मातील कैलासाचे महत्व व त्याची विज्ञानाशी असलेले नाते च अधोरेखीत होते.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे) संपर्क : 7058115947 (सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
ज्योतिष अभ्यास करताना असे लक्षात येते की, प्रामुख्याने अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल या चार तत्वांमधे राशी व नक्षत्रे विभागली आहेत. आपल्या माहितीसाठी येथे नक्षत्रे, त्यांची तत्वे व त्याचे गुण असे एक छोटेसे कोष्टक देत आहे.
-ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे) संपर्क : ७०५८११५९४७ (सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
ओम (ॐ) हे हिंदू धर्मातील एक प्रमुख चिन्ह आहे. ओंकार हा ‘अ’कार,’उ’कार व ‘म’कार अशा तीन वर्णांनी बनलेला आहे. हे तिन्ही वर्ण जो चांगल्या प्रकारे आकलन करतो तो ब्रह्मपदास पोचतो. ब्रह्मदेवाने पूर्ण ब्रम्हाण्डचे दोहन केल्यावर ऋग्,यजु व साम हे तीन वेद उत्पन्न झाले. या वेदांमध्ये संपूर्ण ब्रम्हांडाचा अंश आहे असे मानतात. या वेदांमधील प्रत्येक ऋचा ही अनेक ऋषींनी उच्चारली आणि त्यातून अनुक्रमे ‘अ’, ‘उ’ आणि ‘म्’ हे वर्ण उगम पावले . हे वर्ण सम्पूर्ण ब्रम्हाण्डात विहार करून त्यांचा संयोग झाला. हा संयोग म्हणजेच ओम् कार होय. या सृष्टीचे पालक ब्रह्मा, विष्णू, महेश हे अनुक्रमे अ ,उ आणि म् यांचे प्रतिनिधित्व करतात. ओंकारातील अ या अक्षराच्या उच्चाराने ओठ उघडले जातात. त्याने सृष्टी निर्माता ब्रह्माचे स्मरण होते. उ या वर्णाच्या उच्चाराने ओठाचा चंबू होतो. त्याच्या गोलाकार स्वरूपाने सृष्टीचा पालनहार विष्णूचे स्मरण होते व सृष्टीचक्राचा प्रारंभ होतो. म् उच्चारतांना ओठ बंद होतात. हे सृष्टीच्या लयाचे प्रतीक आहे. त्याने सृष्टिसंहारक शिवाचे स्मरण होते. अशाप्रकारे, ओम (ॐ) हे परमतत्त्व प्रदर्शक चिन्ह आहे. (ॐ) हे मातृकांनी बनलेले आहे. प्रत्येक मातृका एक एक वर्ण तत्व विषद करते. आणि या तत्वाच्या राशी बनतात. ऒंकाराची ‘अ’कार मातृका ही भूमितत्वाची आहे. अ म्हणजे अहं म्हणजे मी. या ‘अ’कार मातृकेतून जो घॊष निर्माण झाला, त्यातून ब्रह्म निर्माण झाला. याचे निजतत्व सत्य जी पृथ्वी रुपाने भूमीतत्व साकार झाले. या तत्वामधून ज्या वासना निर्माण झाल्या त्या म्हणजे राशी. अशाप्रकारे ‘अ’कार मातृकेतून वृषभ, कन्या, मकर या भूमीतत्वाच्या राशी निर्माण झाल्या. ऒंकाराची ‘उ’कार मातृका ही जलतत्वाची आहे. याचे निजतत्व सत्व जे जल रुपाने जल तत्व साकार झाले. पूर्वकर्मानुसार कोणते शरीर भोग आहेत या सत्वाचा स्वामी विष्णू व त्याचे ज्ञानाचा स्वामी गणपती, या देवतांच्या मीन, वृश्चिक, कर्क या राशी निर्माण झाल्या. ऒंकाराची ‘म’कार मातृका ही अग्नितत्वाची आहे. याचे निजतत्व शील जे अग्नि रुपाने अग्नि तत्व साकार झाले. शील निजतत्वाचा अविष्कार म्ह्णून दत्त व राम या देवतांच्या मेष, सिंह, धनू या राशी निर्माण झाल्या. ऒंकाराची अर्ध (निराकार) मातृका ही वायू तत्वाची आहे. याचे निजतत्व दया. प्राणवायू हीच एक मोठी दया आहे. वायू ही निराकार व अव्दैत शक्ती आहे. शिवाला आकार नाही म्हणून आपण पिंडीची पूजा करतो. यातूनच शिव व सूतपूत्र मारुती या देवतांच्या मिथुन, तुळ, कुंभ या राशी निर्माण झाल्या. असे हे ओंकार तत्व संपूर्ण चराचर सृष्टी व्यापून राहिले आहे ॐ कार स्वरूपा तूज नमो… तूज नमो… तूज नमो…
आदरणीय कै. के.एस. कृष्ण्मूर्ती यांनी त्यांच्या प्रेडिक्टिव्ह स्टेलर अस्ट्रॊलॊजी रीडर ३ मधे चंद्र कोणत्या नक्षत्रात असताना नवीन कपडे परिधान केल्यास काय परिणाम मिळतील याचे वर्णन केले आहे. आपणही याचा अनुभव घेऊन पहावा.
चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे, त्यानुसार मिळणारे परिणाम
चंद्र कोणत्या नक्षत्रात
मिळणारे परिणाम
१ अश्विनी नक्षत्र :
नवीन कपड्यांचा लाभ
२ भरणी नक्षत्र :
चोरीस जाण्याचे भय
३ कृतिका नक्षत्र :
अग्नीपासून भय
४ रोहिणी नक्षत्र :
आर्थिक परिस्थितीत सुधारणा
५. मृगशीर्ष नक्षत्र :
कापड कुरतडले जाऊ शकते
६ आद्रा नक्षत्र :
पैशाचे नुकसान
७ पुनर्वसु नक्षत्र :
चांगला दिवस जाईल
८ पुष्य नक्षत्र :
आर्थिक आवक चांगली राहील
९ आश्लेषा नक्षत्र :
कापडाचा नाश संभवतो
१० मघा नक्षत्र :
धोकादायक
११ पूर्वा फाल्गुनी :
शासकीय कटकट
१२ उत्तरा फाल्गुनी :
उत्पन्न, आरोग्य सुधारेल
१३ हस्त नक्षत्र :
यशोदायी
१४ चित्रा नक्षत्र :
अजुन नवीन खरेदी
१५ स्वाति नक्षत्र :
उत्तम खाद्यपेयांचा आस्वाद
१६ विशाखा नक्षत्र :
लोकप्रियता वाढेल
१७ अनुराधा नक्षत्र :
मैत्रीसंबंध, सामाजिक यश
१८ ज्येष्ठा नक्षत्र :
नुकसानकारक
१९ मूळ नक्षत्र :
ढोब्याकडून नुकसान
२० पूर्वाषाढा नक्षत्र :
प्रकृती बिघाड
२१ उत्तराषाढा नक्षत्र :
चमचमीत मेजवानी
२२ श्रवण नक्षत्र :
नेत्रविकार
२३ धनिष्ठा नक्षत्र :
स्वत:ची जागा, शेतीतून उत्पन्न
२४ शततारका नक्षत्र:
विषज्वर धोका
२५ पूर्वाभाद्रपदा नक्षत्र :
पाण्यापासून धोका
२६ उत्तराभाद्रपदा नक्षत्र :
संतती धारणेसाठी उपयुक्त
२७ रेवती नक्षत्र :
रत्नखरेदीसाठी उपयुक्त
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे) संपर्क : 7058115947 (सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
काळ आणि जडविश्व यांच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्त्वाचा अभ्यास करणारे शास्त्र. हे दृष्य विश्व पंचमहाभूतांचे आहे. पृथ्वी, आप (पाणी), तेज (उष्णता), वायू, आकाश, या पंचभौतिक प्रकृतीत तीन गुण १) सत्व,२) रज, ३) तम यांची मिळून अष्टधा प्रकृती निर्माण झाली. प्रत्येक प्राणी मात्रांचे शरीर ह्या अष्टधा प्रकृतीने बनलेले आहे. शरीर हे जड (जे डोळ्यानां दिसते) आहे. परमात्मा अजड आहे (अदृष्य आहे, जो चराचरात भरला आहे, प्रत्येक प्राणीमात्रांच्या ह्रदयात आहे ज्याची या जगावर सत्ता आहे तो परमात्मा, ईश्वर) त्याचा अभ्यास म्हणजेच अध्यात्म. अधि म्हणजे बुद्धी. बुद्धी आत्म्याकडे वळवणे म्हणजे अध्यात्म. देह बुद्धीच्या पलीकडे जाऊन स्वानंद मिळवणे म्हणजे आध्यात्म. देह बुद्धी विसरणे म्हणजे देह विसरणे नव्हे तर एक प्रकारे देहाच्या अनावशक क्रिया विसरणे. परमेश्वर निर्मित सृष्टी रचना व नियम (जन्म, मृत्यू, संकटे, आनंद, दु:ख ई) समजून चित्त शांत व स्थिर करुन भौतिकतेकडे ओढ असलेली मनोवासना नियंत्रित करणे हे अध्यात्म शिकवते. अध्यात्म- ‘अधि आत्म’- म्हणजे स्वतकडे पाहणे. अर्थातच आत्मपरीक्षण. ऐहिक गोष्टींपेक्षा मोठे काहीतरी, परिपूर्ण असलेले, खोलवर अर्थ प्राप्त करून देणारे आयुष्यात काही आहे याचा विचार आणि एक ‘पूर्णत्वा’ची आस निर्माण होणे. त्याचा वेध घेऊन त्यात आपले म्हणजे मानवाचे स्थान काय, कार्य काय, हे शोधून काढण्याची प्रक्रिया म्हणजे आध्यात्मिकता. मनात चांगल्या विचारामुळे चांगल्या इच्छा निर्णाण होतात ज्या मनाला समाधान देतात. मनुष्य चुकीचा विचार करून, चुकीच्या मार्गाने जाऊन अनावश्यक चिंता ओढावून घेत असतो. नि:शंक व निर्भय मन शरीराला पुरेशी झोप / ताकद / आरोग्य देते. भीती फक्त मनात असते. नि:शंक निर्भय होण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म. प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता, काळजी आहेच. ती मनाची तगमग थांबवण्याचे शास्त्र अध्यात्म. हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे. अध्यात्म आणि धर्म हे दोन्ही संस्कृतीचा भाग आहेत. मानवापेक्षा श्रेष्ठ असा देव वा शक्ती असते हे आध्यात्मिक माणूस मानेलच असे नाही. आस्तिक आणि नास्तिक दोघेही आध्यात्मिक असू शकतात. धर्म माणसाला जगण्याचा मार्ग दाखवतो. पण खूप वेळा धार्मिकता ही रूढी-परंपरा, परमेश्वरस्तुती, पूजा-अर्चा, प्रार्थना यातून व्यक्त होते. याउलट आध्यात्मिकतेला कर्मकांडाचे बंधन नाही. असे असले तरी धार्मिकता, धर्मश्रद्धा ही आध्यात्मिकता वाढवणेसाठी फ़ायदेशीर होऊ शकते.
आजच्या संघर्षमय जीवनात, मनशांती मिळवणे अधिकाधिक गरजेचे वाटू लागले आहे. सभोवताली अनेक भौतिक प्रलोभने, जीवनात यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी स्पर्धा, अत्यंत धकाधकीचे आणि असुरक्षित दैनंदिन जीवन या सगळ्यात जीव मेटाकुटीस येतो. मनात निर्माण होणाऱ्या चिंता, विषाद, एखाद्या आपत्तीनंतर मनावर होणारा आघात या सर्वाचा यशस्वीपणे सामना करताना इतर अनेक गोष्टींप्रमाणे आध्यात्मिक दृष्टिकोनाचा खूप फायदा होतो हे आत्तापर्यंतच्या विविध शास्त्रीय संशोधनातून क्षात आले आहे. अध्यात्माकडे कल असलेल्या व्यक्तीच्या मेंदूतील मज्जातंतूंच्या जाळ्यात बदल होतात. अंत:स्राव करणाऱ्या संस्था आणि प्रतिकारशक्ती यांमध्ये अनुकूल बदल घडतात. त्यामुळे त्या व्यक्तीचे रोगांपासून, शारीरिक आणि मानसिक संरक्षण होते. विषादाच्या मनोविकाराचा आध्यात्मिक दृष्टिकोनातून सामना केला तर उदासी कमी होते. आयुष्यात समाधानी असलेला आणि ‘आपल्या जीवनात काही शुद्ध हेतू आहे’ असे मानणारा कमी निराश होतो. कॅन्सर, हृदयरोग सारख्या विकाराचा सामना करताना किंवा मज्जारज्जूच्या शस्त्रक्रियेतून बरे होताना जी अति चिंता निर्माण होते ती नियंत्रणात आणण्यासाठी आध्यात्मिकतेचा उपयोग होतो. मानसिक विकारांची रुग्णाकडून माहिती घेताना त्याचा धार्मिक, आध्यात्मिक दृष्टिकोन समजून घेणे दिवसेंदिवस महत्त्वाचे बनले आहे. मानसिक उपचारांमध्येदेखील आध्यात्मिकतेचा उपयोग केला जाऊ लागला आहे. देऊळ, देवळातले वातावरण, भजन-कीर्तन, नामस्मरण, चर्च- मशिदीतील वातावरण या सगळ्याचा आध्यात्मिकता वाढण्यासाठी उपयोग होतो. प्रार्थनेत, निसर्गाच्या सान्निध्यात अंतर्मुख करण्याची, लीनता निर्माण करण्याची, विनम्र भाव निर्माण करण्याची शक्ती असते. मोठय़ाने उच्चारलेले मंत्रोच्चारण, ठेक्यात आणि तालात एकत्र म्हटलेले भजन, चर्चमध्ये गायली जाणारी ईशस्तुती, प्रवचन या सगळ्यातून अमाप मनशांती आणि समाधान मिळते. आध्यात्मिक मनोवृत्तीतून आशा, समाधान, क्षमाशीलता आणि प्रेम निर्माण होते. मानसिक स्वास्थ्य वाढीस लागते. नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला या कालाविष्कारांतूनही आध्यात्मिकता व्यक्त होते. एक अवर्णनीय मानसिक शांती प्राप्त होते. येणारी अनुभूती स्वतचा शोध घ्यायला लावणारी असते. अशी अनुभूती मनाला उभारी देते, भविष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करते. आपल्याकडे संतसाहित्यही आध्यात्मिकतेतून मनाचा विचार मांडताना दिसते. समर्थ रामदासांनी तर ‘मनाचे श्लोक’ लिहिले. आपले दुख आणि चिंता कमी करण्यासाठी स्वतपलीकडचा व्यापक विचार करण्याचा एक उत्तम परिपाठच. II मना मानसी दुख आणू नको रे II II मना सर्वथा शोक चिंता नको रे II II विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी II II विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी II माझ्या अल्पबुद्धीनुसार घेतलेला हा अध्यात्मिकतेचा बोध. आपण आपला आत्मशोध घेऊन समाधानी व्हावे ही सदिच्छा…
श्री कृष्णाय नमः 🙏 भगवान श्री कृष्ण असा असाधारण अवतार आहे की, त्याचे आयुष्यावर, गीता उपदेशावर संशोधन करण्यासाठी आपले आयुष्य वाहणारे सर्वधर्मिय जगभर पसरलेले आहेत. त्या श्री कृष्णाची ज्योतिष शास्त्रकारांच्या मते जी कुंडली प्रचलित आहे, ती आपण थोडक्यात पाहू.
श्री कृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्ष अष्टमीला रात्री ठीक १२ वा. झाला. त्यासमयी वृषभ रास पूर्वेस उदीत हो्ती व चंद्र वृषभ राशीतील च रोहिणी नक्षत्रात होता. म्हणजेच श्री कृष्णाची जन्म रास व चंद्र रास दोन्ही वृषभ आहेत. १ ले स्थानी म्हणजेच लग्नी चंद्र स्वत:च्या उच्च राशीत असल्याने व चंद्र मनाचा कारक असल्याने ते सर्वांची मनस्थिती जाणन्यात माहिर होते. तसेच चंद्राची कर्क रास ३ रे स्थानात असल्याने ते अत्यंत पराक्रमी, बुद्धिवाण आणि वाणी वर अत्यंत प्रभुत्व असणारे होते. लग्न व चंद्र राशीचा स्वामी शुक्र यामुळे तो रसिक, कलासंपन्न, मनमोहना असा होता. ४ थे स्थानात सुर्य सिंह या स्वत:च्या राशीत असल्याने सुखस्थानात असल्याने प्रत्येक समस्येचे निराकरण व समाधान ते करु शकले. ५ वे स्थानात बुध कन्या या स्वत:च्या राशीत असल्याने विलक्षण बुद्धी व अनेक गुप्त विद्या लीलया अवगत होत्या. ६ वे स्थानात शनी तुळ या स्वत:च्या उच्च राशीत असल्याने व भाग्य (९) व कर्म (१०) स्थानाचा मालक असल्याने दिग्गज शत्रूलाही (राक्षस, कंस ई.) नामोहरम केले. ६ वे स्थानात १ ले स्थानाचा मालक शुक्र शनी व केतूबरोबर असल्याने जन्म काळ्कोठडीत (तुरुंगात) झाला. ९ वे स्थानात ७ वे व १२ वे स्थानाचा मालक मंगळ मकर या उच्च राशीत असल्याने प्रतिस्पर्धी व गुप्त शत्रूचा पाडाव, प्रसंगी राजकारण वा धुर्तपणा दाखवून सहज केला. ११ वे स्थानात गुरु हा मीन या स्वत:च्या राशीत असल्याने व ८ वे स्थान मृत्यू स्थानाचा मालक असल्याने जन्म मृत्यूचे गूढ विवेचन गीतेद्वारे विषद केले. १२ वे स्थानात राहू हा ७ वे व १२ वे स्थानाचा मालक मंगळाच्या राशीत असल्याने श्रीकृष्णाच्या रासलीला व प्रेम अध्याय व स्त्रियांना लोभवणारे व्यक्तीमत्व लाभले. जन्माष्टमीचे निमित्त साधून या लेखाद्वारे श्री कृष्णाला कोटी कोटी दंडवत. II जय श्रीकृष्ण II
आपल्याला खुप वेळा आपल्या गुरुजींच्या मुखातुन नवपंचम अथवा शुभ पंचम योग आहे असे शब्द प्रयोग कानावर पडत असतात. म्हणजे नक्की काय हे आपल्याला कळत नसते पण नवपंचम व शुभपंचम या शब्दांवरुन काही तरी खास आहे असे आपण तर्क लावत असतो. आज आपण याच योगाविषयी जाणून घेणार आहोत.
दोन ग्रहांच्या मधील अंतर हे १२० अंश असते तेव्हा नवपंचम योग तयार होतो. या योगाचे वैशिष्ट्य म्हणजे तत्वाच्या राशीतून हा योग आकारास येतो, त्यात तत्व हे समान असते. म्हणजेच १-५-९ (मेष-सिंह-धनु) या अग्नी तत्वाच्या राशी, २-६-१० (वृषभ-कन्या-मकर) या पृथ्वी तत्त्वाच्या राशी, ३-७-११ (मिथुन-तुळ-कुंभ) या वायु तत्वाच्या राशी व ४-८-१२ (कर्क-वृश्चिक-मीन) या जलतत्वाच्या राशीं मधून हा योग साकारला जातो. नक्षत्र चक्राचा विचार केला तर योग अचुक १२० अंशाचा असेल तर एकाच नक्षत्र स्वामीच्या विभागातुन साकारला जातो. कारण १२० अंशांवर केतू पासून सुरु झालेली एक माला पूर्ण होऊन एकूण ३ वेळा अशी माला येऊन २७ नक्षत्रे ३६० अंशाचा फ़ेरा पूर्ण करतात.
याप्रमाणे १-५-९ (मेष-सिंह-धनु) हा धर्म त्रिकोण (धर्म, कर्तव्य, पूर्वकर्म, कीर्ती कारक योग) २-६-१० (वृषभ-कन्या-मकर) हा अर्थ त्रिकोण (संपत्ती कारक, चालू कर्म कारक योग) ३-७-११ (मिथुन-तुळ-कुंभ) हा काम त्रिकोण (वैवाहिक / शरीर सुख, मैत्री कारक योग) ४-८-१२ (कर्क-वृश्चिक-मीन) हा मोक्ष त्रिकोण (मुक्ती, मोक्ष, अध्यात्म कारक योग)
या चार त्रिकोणां मधुन नवपंचम योग / त्रिकोण योग होतो.
थोडक्यात नवपंचम वा त्रिकोण योगात संकल्पना पुढे नेणे, विस्तार वा नवनिर्मिती करणे हे सूत्र दिसते. अर्थात या योगाशी पूरक ग्रह त्यामधे स्थित असतील व त्या संबंधित ग्रहांची दशा चालू असतील तेव्हा ही फ़ळे प्राप्त होतील.
– ज्योतिष मित्र मिलिंद jyotish mitra milind
ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947 contact@jyotishmitramilind.in jyotishmitramilind.in
विंशोत्तरी दशा पद्धति : आयुष्यातील चढ़ उतार जाणून घ्यायचे एक गणिती तंत्र आज आपण थोड़े ज्योतिष शास्त्रातील दशा पध्दति चे विश्लेषण करणार आहोत. आपण बऱ्याच वेळा ऐकत असतो, काय दशा झाली आहे त्याची. दशा म्हणजे स्थिती. आपली आयुष्यात काळा नुसार चांगली अथवा वाईट स्थिती बदलत राहते. वाईट काळ कधी संपेल व चांगला काळ कधी असेल हे आधीच जाणून घ्यायची माणसाला नेहमीच उत्सुकता वाटत आली आहे. दशा पद्धति म्हणजे आयुष्यातील चढ़ उतार नक्की केव्हा असतील है जाणून घ्यायचे एक गणित तंत्र. पूर्वीच्या काळी हिंदू ज्योतिष शास्त्र कारांनी विंशोत्तरी, अष्टोत्तरी, योगिनी, पाराशरी अशा ४३ विविध प्रकारच्या दशा शोधल्या होत्या. नंतर काळाच्या ओघात या पद्धति लोप पावल्या. सध्या विंशोत्तरी, अष्टोत्तरी आशा मोजकया दशा प्रचलित आहेत. जसे ३६० अंशाचे १२ विभाग केले असता राशी चक्र तयार होते, तसेच ३६० अंशाचे २७ नक्षत्रांमधे विभाजन करून नक्षत्र चक्र तयार होते. एका ग्रहाच्या मालकीची ३ नक्षत्रे असतात. या नक्षत्र चक्र आणि राशी चक्राची फ़ार सुंदर गुफ़ण करण्यात आली आहे. थोड्क्यात १ नक्षत्र म्हणजे १३ अंश २० कला चा एक विभाग. सहाजिकच राशीफ़लात सुक्ष्मता आणण्यासाठी नक्षत्र विभागाचा उपयोग होतो. या नक्षत्रांचा क्रम ठरलेला असतो. मेष राशीतील अश्विनी हे पहिले नक्षत्र जे केतूचे आहे तिथुन सुरु होऊन केतू, शुक्र, रवी, चंद्र, मंगळ, राहू, गुरु, शनी, बुध व परत केतू पासून बुध पर्यंत असा ३ वेळा ९ ग्रह मिळून २७ नक्षत्रांचे एक चक्र पूर्ण होते. थोडक्यात ९ ग्रहांची एक माला १२० अंशात पूर्ण होते. १२० अंश गुणिले ३ माला बरोबर ३६० अंश. अशी रचना करण्याचे काय कारण असावे हे मला विशोत्तरी दशेचा अभ्यास करताना लक्षात आले. विशोत्तरी दशा ही एक सुक्ष्मता व अचुकता देणारी नक्षत्राधारित कालमापन पध्दति आहे. १२० वर्ष हे माणसाचे जास्तीत जास्त आयुष्य मानुन ते या नक्षत्र मालेशी संबंधित आहे. जन्मकाळी चंद्र ज्या नक्षत्रात असेल तिथुन त्या नक्षत्राच्या मालकीच्या ग्रहाची महादशा सुरु होते. प्रत्येक महादशेची वर्षे ही ठरलेली आहेत. केतू ७ बर्षे, शुक्र २० वर्षे, रवी ६ वर्षे, चंद्र १० वर्षे, मंगळ ७ वर्षे, राहू १८, गुरु १६, शनी १९, बुध १७ असे मिळून १२० वर्षे १२० अंश पूर्ण होतात. याप्रमाणे जन्मदशा अंशात्मक विभाजन करुन अंतर्दशा, विदशा, सुक्ष्म दशा, प्राण दशा ई. शोधतात. व त्यामुळे कुंडलीत दिसत असलेले एखादे फ़ळ अथवा योग उदा. विवाह योग, संतती योग कधी प्राप्त होईल याचे अगदी वर्ष, महीना, दिवस असा सुक्ष्म अनुमान घेता येते. यासाठीच अंशात्मक जन्मकुंडली व्दारे वर्तवलेले फ़ळ गोचर फ़ळांपेक्षा बहुतांशी जास्त सुक्ष्म व अचुक येते असा अनुभव आहे. धन्य ते आपले पूर्वज ज्यांनी अवघ्या मानव जगताचे आकलन एका जन्मकुंडली व्दारे रेखाटले.
मानवी शरीरातील कोणता भाव पीडीत वा प्रभावित झाला आहे हे कुंडलीद्वारे तपासताना स्थान, योग, दशा, गोचर ई. गोष्टी बघताना राशींचा प्रभाव त्या त्या अंगाने बघणे योग्य ठरेल.
१. मेष : मस्तक, कपाळ, मेंदू २. व्रुषभ : मान, गळा, कंठ, श्वास नलिका, अन्न नलिका ३. मिथुन : खांदे, हात, बाहू, फुप्फ़ुस ४. कर्क : छाती, स्तन ५. सिंह : पाठ, पाठिचा मणका, ह्रुदय ६. कन्या : पोट, लहान मोठे आतडे, जठर ७. तुळ : कंबरेचा भाग, मूत्रपिंड ८. व्रुश्चिक : गुप्तेंद्रिये ९. धनु : मांड्या १०. मकर : गुडघे ११. कुंभ : पोटरी, पिंढरी १२. मीन : तळपाय, घॊटा
वास्तवत: वैद्यकिय क्षेत्रातील मंडळीनी सुध्दा याबाबतीत तुलनात्मक अभ्यास करुन व सखोल निरीक्षणे नोंदवावीत व आपल्या प्राचिन शाखेचा सर्वांच्या आरोग्यरक्षणासाठी कसा उपयोग करुन घेता येईल याचा विचार करावा.