Category: Uncategorized

प्राणी, पक्षी, झाडे यांची स्पंदने


विषय : प्राणी, पक्षी, झाडे यांची स्पंदने

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : मानवी जीवनातील गूढ रहस्ये

नमस्कार,

किती इम्प्रेसिव्ह आहे त्याचे व्यक्तिमत्व, छान Vibes आल्या तो नुसता दिसला तर… नको तूच घे तिचा फोन, तिचा नुसता आवाज जरी कानावर पडला तरी Negative Vibes येतात. आपण बरेचदा आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर अथवा नातेवाईकांबरोबर गप्पा मारत असताना Vibes  हा शब्द किती सहजगत्या वापरत असतो. विश्वकोशात बघितले तर Vibes या इंग्रजी शब्दाचा चा अर्थ हा व्यक्त होणारा, अनुभवास येणारा, भावात्मिक संदेश असा आपल्याला पाहायला मिळतो.

हे एक प्रकारचे भावनिक संदेश आपल्याला अनुभवावरून किंवा आपल्या समोर जी व्यक्ती असते त्याचे व्यक्तिमत्वामुळे, त्याच्या वर्तनावरून अथवा सान्निध्यात आल्याने, आजूबाजूच्या वातावरणामुळे येत असतात. मराठीमध्ये यालाच आपण स्पंदने असे म्हणतो. स्पंदने ही सकारात्मक (Positive Vibes) अथवा नकारात्मक (Negative Vibes) असू शकतात.

स्पंदने ही फक्त व्यक्तींद्वारेच येतात असे नसून प्राणी, पक्षी, झाडे, वास्तू ई. द्वारे सुद्धा येऊन आपल्या मनावर सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम घडवत असतात.

आज आपण झाडे, प्राणी, पक्षी यांचे स्पंदनांबद्दल संकलित माहिती पाहणार आहोत.

प्राणी स्पंदने :

गाय : हिंदू धर्मामध्ये लोक गाईला खूप पवित्र मानले जाते. गाईमध्ये खूप पवित्र स्पंदने आहेत. अपवित्र स्पंदने मुळीच नाहीत. यासाठीच गाईची पूजा करतात.

बैल : बैलामध्येही चांगली स्पंदने असतात.

कुत्रा : कुत्र्यामध्येही चांगली स्पंदने असतात. कुत्रा हा भैरवाचा प्रतिनिधी आहे.

गाढव : वाईट स्पंदने असतात.

मांजर : मांजरामध्ये मिश्र स्पंदने आढळतात. शुभ्र मांजरामध्ये चांगली स्पंदने आढळतात. तर काळ्या मांजरामध्ये वाईट पैशाचिक स्पंदने आढळतात. पिशाच्च काळ्या मांजराच्या रूपात दिसते.

शेळी व मेंढी : शेळ्या तसेच मेंढ्यांमध्ये चांगली स्पंदने असतात. शेळ्या मेंढ्यांच्या सहवासात राहणारी व्यक्ती निरोगी असते. त्यांच्या सहवासात राहणाऱ्या व्यक्तीला क्षयाचा (टी. बी.) विकार होत नाही.

म्हैस व रेडा : या प्राण्यांमध्ये दुष्ट स्पंदने असतात. तांत्रिक दुष्ट शक्ती प्राप्त करण्यासाठी यांचा वापर करतात. स्वप्नात लोक म्हैस वा रेडा येणे, हे खूप वाईट मानले जाते. त्यामुळे संकटे येतात असे हिंदूधर्मात मानले जाते.

डुक्कर : वाईट स्पंदनांचे प्रतिनिधित्व करतो. याच्यामध्ये खूप वाईट शक्ती असतात. पिशाच्चे डुकराच्या रूपात दिसतात किंवा वाटेत आडवी येतात.

वानर : वानर चांगली स्पंदने प्रक्षेपित करतात. वानरामध्ये पिशाच्च शक्ती दूर करण्याचे सामर्थ्य असते असे म्हटले जाते.

हरिण : हरिणामध्ये पवित्र स्पंदने खूप असतात. याच्या चर्मावर बसून मंत्रजप केला असता ज्ञान प्राप्त होते. यासाठी भारतातील बरेच साधू हरिणाच्या चर्मावर बसून जप करतात. आध्यात्मिक प्रगतीसाठीही हरिणाजिनावर बसून जप करणे, श्रेष्ठ मानले गेले आहे. हा सात्त्विक स्पंदनांचा प्राणी आहे.

वाघ : वाघामध्ये नवग्रहांकडून येणारी स्पंदने आपल्याला अनुकूल करण्याचे सामर्थ्य आहे. वाघनख धारण केले असता नवग्रहांची शांती होते, असे मानले जाते. नैसर्गिकरित्या मृत पावलेल्या (मारलेल्या नव्हे) वाघाच्या चर्मावर बसून मंत्रजप केला असता शक्ती प्राप्त होते. वाघाचे, सिंहाचे सामर्थ्य सारखेच मानले गेले आहे. परंतु सिंहाची स्पंदने ही वाघापेक्षा अधिक पवित्र असतात.

अस्वल : अस्वलामध्ये वाईट स्पंदने असतात. पिशाच्च शक्ती यांच्यातही आढळते, परंतु बर्फामध्ये राहणाऱ्या पांढऱ्या अस्वलामध्ये चांगली स्पंदने असतात.

तरस : अतिशय घाणेरडी स्पंदने या प्राण्यात असतात.

लांडगा : याच्यामध्ये वाईट, तामसी स्पंदने आढळतात.

कोल्हा : या प्राण्याची स्पंदने मिश्र स्वरूपाची असतात. कोल्हा स्वप्नात येणे हे शुभ मानले जाते. एखाद्या कामासाठी जात असता वाटेत कोल्हा दिसला तर यश प्राप्ती होते.

हत्ती : हा सात्त्विक व शुद्ध स्पंदनांचा प्राणी आहे. हत्तीमध्ये दैवी स्पंदने आढळतात. हत्तीचे वैशिष्ट्य असे असते, की एखादा हत्ती खूप पिसाळलेला असेल व आपल्या अंगावर धावून येत असेल तर त्याला नमस्कार करताच तो शांत होतो व काहीही न करता बाजूला निघून जातो.

मुंगूस : हा दैवी स्पंदने असणारा प्राणी आहे. हा प्राणीही वाटेत दिसताच यश प्राप्ती होते.

पक्षी स्पंदने :

मोर : अत्यंत चांगली स्पंदने मोरामध्ये असतात. दैवी स्पंदनांचा हा पक्षी असल्याने दुष्ट शक्तीपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी मोराची पिसे जवळ बाळगतात. हिंदू घरामध्ये मोराची पिसे ठेवली जातात. मुस्लिम धर्म मध्ये, दर्ग्यामध्येही मोरपीस वापरले जाते.

पोपट : हा अत्यंत शुभ पक्षी मानला जातो. त्यामुळे लोक याला घरी पाळतात.

भारद्वाज : हा पक्षीही दैवी स्पंदनांचा पक्षी आहे. याचे दर्शन हे अत्यंत शुभप्रद मानले जाते. घरातून बाहेर पडताना वा प्रवास करताना याचे दर्शन झाले असता प्रवास सुखरूप होतो व कामे तडीस जातात.

हंस : हा पक्षीही दैवी पक्षी आहे. याच्यामध्ये दैवी स्पंदने असून स्वप्नात याचे दर्शन होणे शुभ मानले जाते.

गरुड : याच्यामध्येही चांगली स्पंदने असतात.

कबुतर : याच्यामध्येही चांगली स्पंदने असतात.

कावळा : हा मिश्र स्पंदनांचा पक्षी आहे. तरीही याच्यामध्ये प्रामुख्याने अशुभ स्पंदनेच जास्त असतात. हा पितरांचे प्रतिनिधित्व करतो. हा शनीग्रहाचे वाहन आहे. शनीग्रहाची स्पंदने प्रसृत करतो. याला खायला दिले असता शनीची पीडा होत नाही, असे हिंदूधर्मात सांगितले आहे. हा मृतात्म्यांचे प्रतिनिधित्व करीत असल्याने याला खायला घातल्याने पितरांचीही तृप्ती होते, असे म्हटले जाते.

चिमण्या : चिमण्यांची स्पंदने ही चांगली असतात. या राहू ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात, यासाठी चिमण्यांना बाजरी खाऊ घालावी म्हणजे राहूची पीडा कमी होते, असे मानले जाते. ज्या वास्तूला आगामी काळात धोका नाही अशाच वास्तूत चिमण्या आपली घरटी बांधतात, असे म्हटले जाते.

कोंबडा : कोंबड्यामध्येही शुभ स्पंदने आढळतात.

पिंगळा : हा पिशाच्च शक्ती स्पंदनांचा पक्षी आहे. हा एक जंगली पक्षी असून, हा भविष्य कथन करतो. भारतात काही लोक स्मशानात काही दिवस साधना करून या पक्ष्याची भाषा जाणण्याची विद्या शिकतात. हा माणसाचे अचूक – भूत-भविष्य कथन करतो.

गिधाड : गिधाडामध्ये खूप वाईट स्पंदने असतात. पिशाच्च शक्तीचे हा प्रतिनिधित्व करतो. प्रवासात गिधाड दिसले तर प्रवास कष्टप्रद होतो, असे मानले जाते.

घुबड : पैशाचिक स्पंदने या पक्ष्यात सर्वांत जास्त असतात. सर्व धर्मांमध्ये हा पक्षी अशुभ मानला जातो. जंगली-जाती जमातीतही हा अशुभ समजला जातो. या पक्ष्यामध्ये खूप वाईट, दुष्ट स्पंदने असतात. तांत्रिक सिद्धींसाठी तांत्रिक लोक किंवा ब्लॅकमॅजिक करणारे या पक्ष्याचा वापर करतात.

घार : घारीमध्ये शुभ स्पंदने असतात.

वनस्पती स्पंदने :

औदुंबर : या वृक्षात अत्यंत दैवी स्पंदने आढळतात. याची स्पंदने शांती प्रदान करतात. या वृक्षात शीतलता अधिक. असते. सात्त्विक स्पंदनांच्या या वृक्षामध्ये दत्तात्रेयांची स्पंदने असल्याने हिंदूधर्मात याला पाणी घालणे वा याच्याजवळ दिवा लावणे हे शुभ मानले जाते. यामुळे साहजिकच त्या व्यक्तीला सात्त्विकता प्राप्त होते. नदीच्या किनारी असणाऱ्या औदुंबर वृक्षामध्ये खूप दैवी शक्ती असते.

आंबा : अत्यंत चांगली स्पंदने असणारा हा वृक्ष आहे. याच्यामध्ये दैवी स्पंदने आहेत, म्हणून शुभ कार्यामध्ये याच्या पानांचा तोरण म्हणून उपयोग करतात. याच्यामध्ये देवीची स्पंदने असतात.

तुलसी : अत्यंत सात्त्विक स्पंदनाचे हे झाड आहे. हिंदू धरांच्यासमोर याचे वृंदावन असते. या झाडालाही पाणी घातल्याने सात्त्विकता व शांती लाभते.

पिंपळवृक्ष : या वृक्षामध्ये चांगली व मध्यम दोन्ही प्रकारची स्पंदने असतात. या वृक्षातळी दिवा लावल्याने भाग्य वृद्धी होते.

वटवृक्ष : चांगली व मध्यम दोन प्रकारची स्पंदने असतात. परंतु या वृक्षाची स्पंदने ही सुप्तावस्थेत असतात. वरील पाचही वृक्षांना नेमाने पाणी दिल्यास व्यक्तीचा भाग्योदय होतो. कष्ट तसेच त्रास कमी होतात.

रुद्राक्ष : रक्त शुद्ध करणारी स्पंदने या वृक्षात असतात.

चंदन : या वृक्षात सात्त्विक व शांती देणारी स्पंदने असतात.

हिरडा : याची स्पंदने चांगली असतात ही औषधी वनस्पती आहे. हिरडा उशाखाली ठेवून झोपले असता वाईट स्वप्ने पडणे थांबते.

सर्पगंधा : या वनस्पतीच्या जवळ कधीही साप येत ना साप या वनस्पतीपासून सदैव दूर राहतो. या वनस्पतीचा सापाला सहन होत नाही. या वनस्पतीच्या काडीचा एक लहान तुकडा जर गळ्यात बांधला असता साप स्वप्नात येत नाही व जंगल फिरताना सर्प भय रहात नाही.

बाभूळ : या झाडाजवळ सतत पिशाच्चे राहतात. पिशाच्च साधना करणारे या झाडाच्या आश्रयाने साधना करतात.

वड, औदुंबर, पिंपळ या वृक्षांची लागवड केल्याने पुण्य मिळते. तसेच या वृक्षांना तोडू नये असे शास्त्रात सांगितले आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

मघा नक्षत्र विचार


विषय : मघा नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण मघा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

१०. मघा नक्षत्र :

मघा नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील १० वे नक्षत्र आहे.

“मघा”

मघा नक्षत्र चतुष्पादी, क्रूर, उग्र, अधोमुखी व मध्यलोचनी आहे. या नक्षत्राचे ४ ही चरण सिंह राशीत येतात. या चार चरणांवर अनुक्रमे मंगळ शुक्र, बुध व चंद्र येनचे प्रभुत्व आहे. नक्षत्र स्वामी केतू, राशी स्वामी रवि व दैवत पितर असल्याने या नक्षत्रात केतूची सेवा व त्यागीवृत्ती, रवीचा पराक्रम व अधिकार लालसा आणि पितरांची शाप किंवा आशीर्वाद देण्याची वृत्ती यांचा मिलाफ आढळून येतो.

नक्षत्राची आकृती विळा किंवा कोयत्यासारखी आहे. नक्षत्रामध्ये ५ तारे असून पूर्वेकडे उगवून वर येताना ही आकृती स्पष्ट दिसते, त्यात वरील ३ तारे म्हणजे कोयत्याचे पाते व खालील २ तारे मुठीतले होत. नक्षत्रातील तारे अतिशय तेजस्वी, प्रखर व ठळक असून ते लखलखीत असतात. ताऱ्यांचा रंग पांढरा व तांबडा आहे. तारे अग्नितत्त्वाचे वाटतात. या नक्षत्राच्या उत्तरेकडे सिंह राशी सारखीच लहान आकृती असून तिला लघुसिंह म्हणतात, तर या नक्षत्राच्या योग ताऱ्याच्या जरा दक्षिणेला सरळ रेषेत वासूकीहय हा तारा आहे. माघ महिन्यात ते रात्रभर आकाशात आढळते व अतिशय तेजस्वी व ठळक असल्याने सहज ओळखता येते. सिंह राशीची सुरुवात मघा नक्षत्रापासून होत असल्याने हे नक्षत्र गंडांतर तारा योगातले आहे. मघा नक्षत्राच्या प्रारंभीच्या २ घटिका किंवा २ गडांतर तारा योगात येतात. मघा हे नक्षत्र म्हणून व्यूहभेदक किंवा एकदम स्थित्यंतर करणारे आहे. या नक्षत्राचे इंग्रजी नाव रेग्युलस’ असे आहे.

मघा आणि आकाशाकडे बघा, जर पडतील मघा, तर पिकतील शेते बघा.

पडल्या मघा, नाही तर वरती बघा

अशा म्हणी ग्रामीण भागात पूर्वापार प्रचलित आहे. धान्य पिकून हाती येण्यासाठी मघाच्या पावसाची गरज भासते. पहिल्या ६ नक्षत्रांचा भरपूर पाऊस पडूनसुद्धा मघा नक्षत्र जर कोरडे गेले, तर हातातोंडाशी आलेले पीक जाईल, या काळजीपोटी मघा नक्षत्रात शेतकरी आशेने आकाशाकडे डोळे लावून बसलेले असतात.

अशीच एक म्हण अस्सल ग्रामीण इरसाल भाषेत प्रसिद्ध आहे.

पडतील मघा तर चुलीपुढे हगा. ( मघा नक्षत्रातला पाऊस इतका सातत्याने पडतो की, माणूस घराबाहेर पडू शकत नाही, उबेसाठी तो चुलीपाशी बसतो असा याचा मतितार्थ आहे.)

मघा शब्दाचा अर्थ सुबत्ता असा आहे. याकाळी धान्य पिकून हातात येत असते. या नक्षत्रात सूर्य आला म्हणजे तो पितृलोकात जातो असे वेदात म्हटले आहे.

माघा नक्षत्र हे शरीरप्रकृती, सौंदर्य व गुणाच्या दृष्टीनेही अनुकूल असे नक्षत्र आहे. मात्र स्त्री जातका पेक्षा पुरुष जातकांना जास्त अनुकूल आहे. कारण पुरुषांना लागणारे साहस, धाडस, अहंकार, स्वातंत्र्यप्रेम, स्वावलंबित्व, निर्भयता, अधिकारलालसा हे गुण या नक्षत्रामध्ये ठळकपणे दिसून येतात. मघा नक्षत्रावर जन्मलेल्या जातकांचा बांधा उंच, सडपातळ, प्रमाणशीर, थोडा तगडा, हाडपेराने मजबूत असतो. पिळदार अवयव, बारीक कंबर, खांदे जरा जास्त रुंद, पिळदार मांड्या व दंड, अतिशय रुंद कपाळ,  छाती शारीरिक उर्जा व रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असते. हे जातक छाती पुढे काढून ऐटबाज चालणारे असून चेहरा मोहक, देखणा व सुंदर असला तरी चेहऱ्यावर करारी व रागीटपणाची झाक असते. त्यामुळे राजस भासतात. यांचे सौंदर्य जरा रांगडे असते. हे स्त्री व पुरुष जातक लौकिक, कूळ व चालीरीती यांना महत्त्व देतात.

मघा नक्षत्राचा पुरुष जातक म्हणजे ‘गडी अंगाने उभा नि आडवा, त्याच्या रूपात गावरान गोडवा’, हे जातक स्वभावाने मानी, शिस्तप्रिय, आज्ञाधारक, उच्च आचारविचार, महत्त्वाकांक्षी, न्यायी, उदार, स्पष्टवक्ता, पराक्रमी, राजनिष्ठ, स्वामीनिष्ठ, कोणत्याही गोष्टीत कमीपणा न घेणारे, अहंपणा व अधिकाराची लालसा असे असतात.. मात्र शुभ गुण जास्त असतात. मघा नक्षत्रात रवि-मंगळ असता वरील स्वभाव वैशिष्ट्ये ठळकपणे दिसून येतात. या जातकांना मर्दानी खेळ व पोषाखाची आवड असते. जरा तंग अथवा राजचिन्हे असलेला पोषाख जास्त प्रिय असतो. चालणे, उठणे, बसणे, खेळणे, बोलणे अशा प्रत्येक गोष्टीत त्यांची ऐट दिसून येते.

माघा स्त्री जातकांना हे नक्षत्र शरीरप्रकृती व कर्तृत्वाच्या दृष्टीने जास्त अनुकूल आहे. मात्र सौंदर्याच्या दृष्टीने थोडे कमी. या नक्षत्रावरच्या स्त्रिया पुरुषी बांधा व पुरुषी वृत्तीच्या असू शकतात. त्या हाडापेराने मजबूत, काटक, सशक्त व पीळदार अवयवाच्या असतात. चालणे मर्दानी व ऐटबाज असते. चालण्यात झाशीच्या राणीची ऐट असते. त्या महत्त्वाकांक्षी, शूर व अधिकारलालसा असणाऱ्या असून प्रसंगी, पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून धडपड करत, कष्ट उपसत व पराक्रम गाजवून राणी सारख्या राहतात. फक्त शिक्षणात किंवा केवळ ऑफिसातील बैठ्या नोकरीत बरोबरी न करता प्रत्यक्ष अंमलबजावणी किवा शासकीय खात्यात पुरुषांप्रमाणेच मर्दुमकी दाखवून नाव कमावण्याची त्यांची हौस असते. संसारात मात्र पतीने आपल्या ताब्यात राहावे अशी त्याची फार इच्छा असते.

मघा नक्षत्रावर होणारे आजार प्रखर व दाहक असतात. हे जातक कधीही साध्या तापाने बिछान्यावर पडून राहणार नाहीत. हे उष्ण प्रकृती दर्शविते. यांना उष्णतेने अंगाची लाहीलाही होणे, डोळे जळजळणे, अंगावर लाल पुरळ उठणे, भयंकार डोके दुखणे (अर्धशिशी), कापणे, भाजणे, हाड मोडणे, शस्त्रास्त्रांच्या जखमा, ऑपरेशन, अपघात अशा बाह्य रोगांची संभावना असते. स्त्रियांच्या कुंडलीत मघा नक्षत्रात शुक्र असता मासिक पाळीच्या वेळी फार त्रास होतो.

मघा नक्षत्र अंतर्गत सरकारी खात्यात काम करणारा वर्ग, विशेषतः अंमलबजावणी किंवा शासकीय खात्यातील लोक, सरकारी अंमलदार, रेव्हेन्यू ऑफिसर्स, कलेक्टर, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, कस्टम अधिकारी, पोलिस किंवा लष्करातील वर्ग, डॉक्टर त्यातून शस्त्रक्रिया किंवा सर्जरी करणारे डॉक्टर्स, इंजिनिअर्स, मिल किंवा कारखान्यातील जॉबर्स, मुकादम, फायर ब्रिगेडमध्ये काम करणारा वर्ग, कारखानदार, कंत्राटदार, फॉरेस्टर, गावातील पोलिस पाटील ई. वर्ग येतो. मघा नक्षत्रात रवि असता नोकरी सेंट्रल गव्हर्नमेन्टमध्ये मिळण्याचा संभव असतो.

मघा नक्षत्र स्वपराक्रमाने अधिकार देणारे आहे. मघा नक्षत्राचे दैवत पितर असल्याने या नक्षत्रात गुरु अथवा पंचमेश असता संतती साठी अनिष्ट आहे. याला कारण पितरांचा शाप आहे मानतात. अशा वेळी पितरांची श्राद्धाची धार्मिक क्रिया राहिली असल्यास, ती करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यास सांगितले जाते. मघा नक्षत्राचा वृक्ष वटवृक्ष आहे. वटवृक्षाच्या खाली किंवा आजूबाजूला झाडांना वाव नसतो. हे कदाचित संतती साठी अनिष्टता दर्शवत असेल.

मघा नक्षत्री रवि फार अनुकूल असतो. तो शरीरप्रकृती व नोकरीत अधिकार योगाच्या दृष्टीने फार चांगला. मघा नक्षत्री रवि असता जातकाचा शरीरबांधा उंच, सशक्त, काटक व उत्तम असतो. व्यक्तिमत्त्व उत्तम व ऐटबाज असते. मघा नक्षत्री रवी विशेषतः लग्नी, तृतीयात किंवा दशमात असता कोणत्या ना कोणत्या प्रकारचा अधिकार योग नोकरीत प्राप्त होतो. प्रतिष्ठा, मानसन्मान, अधिकार, शौर्य, कर्तृत्व, पराक्रमाला चांगला. हा एक प्रकारचा राजयोगच आहे.

मघा नक्षत्री चंद्र असता स्वभाव, गुण व प्रसिद्धीच्या दृष्टीने बरा. हा जातक मानी, धीट, पराक्रमी, महत्त्वाकांक्षी, निश्चयी आपल्या बळाने लोकांकडून काम करून घेणारा व कर्तबगार असतो. आरोग्य पण बरे असते. चंद्र मन स्थिर ठेवतो,

मघा नक्षत्री मंगळ फार चांगला असतो. शरीरप्रकृती फारच चांगली, बांधा उंच, सडपातळ व अवयव पीळदार असतात. हे जातक अतिशय काटक व चपळ असतात. उसळेपणा असतो. मात्र मंगळ असता अतिशय तापट, उतावळ्या, रागीट, आक्रमक वृत्तीच्या व अतिमानी स्वभावाचे असतात. शत्रूवर त्यांचा दरारा असतो. स्वभाव कडक असतो. मंगळ डॉक्टर्स, इंजिनिअर्स, लष्करी शिक्षण, सेनापती यांना चांगला.

मघा नक्षत्री बुध फारसा अनुकूल नसतो. शरीरप्रकृती मध्यम, चपळ, मज्जातंतू बलवान असतात. मर्दानी खेळासाठी बरा.

मघा नक्षत्री गुरु बुद्धी व विद्येच्या दृष्टीने चांगला. तो शरीरप्रकृती, बुद्धी, ऐश्वर्य व अधिकार अशा सर्वच दृष्टीने अनुकूल असतो. बांधा उंच, सशक्त, ऐटबाज, चेहरा देखणा व तेजस्वी असतो. हे जातक बुद्धिमान व कर्तृत्ववान असतात. इंजिनिअर, डॉक्टर्स व नोकरीत किंवा राजदरबारी मोठ्या पदावर असतात. नावलौकिक व मानसन्मान चांगला मिळतो.

मघा नक्षत्री शुक्र सौंदर्य व ऐश्वर्याच्या दृष्टीने जास्त बरा. स्त्रियांच्या कुंडलीत असा शुक्र असता त्या पुरुषी बांध्याच्या, कर्तबगार व अधिकार गाजविण्याची हौस असणाऱ्या असतात. फॅशनेबल किंवा पुरुषी वृत्तीच्या असल्या तरी वर्तन शुद्ध व वागणे विनयशील असते. पुरुषांच्या कुंडलीत असा शुक्र असता त्यांची विषयवासना जास्त असते.

मघा नक्षत्री शनि शरीरप्रकृती व अधिकाराच्या दृष्टीने बरा पण सौंदर्य किंवा ऐश्वर्याच्या दृष्टीने अनुकूल नसतो. या व्यक्ती हाड दिसणाऱ्या, शिरा जास्त दिसणाऱ्या, राकट, त्वचा जाड व खरखरीत असणाऱ्या असतात. श्रम, कष्ट, धडपड व दगदग फार करावी लागते. मात्र न्यायी, कठोर अंतःकरणाच्या व कर्तबगार असतात.

मघा नक्षत्री राहू सौंदर्य, शारीरिक प्रकृती, अधिकार या दृष्टीने उत्तम. पण या नक्षत्रात राहू म्हणजे शापित राजपुत्र मनाला जातो. अगदी उच्च तरतरीत असतो. चेहरा मोहक व मायावी दिसतो. या व्यक्ती अतिशय शूर, धीट, पराक्रमी व साहसी असतात. खेडेगावात त्यांचा जास्त वचक असतो.

मघा नक्षत्री केतु शरीर प्रकृतीच्या दृष्टीने चांगला. पण शरीर हाडाळ व अप्रमान्बाद्ध असू शकते. जातक कष्टाळू, मेहनती व कामसू असले तरी अधिकार योग कमी. गुरु अनुकूल असता हा केतू औषधे, रसायने, शस्त्रक्रिया या विद्येत यश देतो.

मघा नक्षत्री हर्षल बुद्धिमत्ता देतो. यांत्रिक कामे, इंजनिअरिंग, युद्ध साहित्याचे कारखाने यांना फार चांगला.

मघा नक्षत्री नेपच्यूनही साधारण असतो. तो पीळदार शरीर पण नितळ त्वचा देईल. हे जातक शूर, पराक्रमी, तेवढ्याच रसिक व हौशी असतात.

मघा नक्षत्राचा अंक १ किंवा ८ आहे. १ अंकाचे वर्चस्व जास्त वाटते. भाग्यरत्न रविचे माणिक आहे. हस्ताक्षर ठळक, व्यवस्थित व मोठे असते. दोन शब्दांत सारखे अंतर असते. मात्रा, वेलांटी, उकार हे टोकदार असतात. तांबूस किंवा सोनेरी रंगाच्या वस्तू लाभदायक होतात. हे मध्यलोचनी नक्षत्र असल्याने या नक्षत्रावर एखादी वस्तू हरवल्यास ती वारंवार बरेच प्रयत्न केल्यावर पश्चिम दिशेला मिळू शकते.

मघा नक्षत्र मुहूर्त शास्त्रामध्ये बऱ्याच शुभ कार्यासाठी हे नक्षत्र अनुकूल आहे. हे राक्षसगणी नक्षत्र असले, तरी विवाहासाठी हे नक्षत्र चांगले. अधोमुख नक्षत्र किंवा तलाव खोदण्यास आरंभ करणे, द्रव्य काढणे किंवा पुरणे, मद्य काढण्यास आरंभ करणे, नवीन शस्त्र वापरणे, शस्त्रविद्या शिकण्यास आरंभ करणे ई. साठी चांगले. तसेच हे क्रूर नक्षत्र असले तरी शस्त्रक्रिया करण्यास चांगले. राज नक्षत्र असल्याने राज्याभिषेकासही चांगले. मघा नक्षत्राच्या प्रथम चरणावर जन्म झाला असता शांती सांगितली जाते. 

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

जन्मकुंडलीतील पूनरफु दोष


विषय : जन्मकुंडली तील पूनरफु दोष

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : बृहत् जातक व स्व अभ्यास

हिंदू वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जन्मकुंडलीत ग्रहांचे विविध प्रकारचे योग, दृष्टी, स्थिती ई. मुळे जातकाचे आयुष्यात अनेक वांछित अथवा अवांछित घटना घडत असतात. ज्यो. कृष्णमूर्ती यांनी ठराविक काही महत्वाचे योग्य मान्य केले आहेत, त्यापैकी एक म्हणजे पुनरफु दोष. वराहमिहिर यांच्या बृहत जातक सह अनेक ग्रंथांमध्ये पुनरफु योगाचा उल्लेख आहे. पुनर म्हणजे पुनर्जन्म म्हणजे पुनर्जन्म सारखे परत परत एखादी गोष्ट करायला लागणे. हे नाव एखाद्या गोष्टीचा शेवट आणि नवीन सुरुवात दर्शवते.

पुनरफु दोषामुळे शिक्षण, विवाह, नोकरी, धंदा आणि संतती होणे यावर परिणाम होतो. ठरलेली घटना आयत्यावेळी घडत नाही. डोकेदुखी, भीती आणि चिंता, विश्वासास तडा जाणे, जोडीदाराला थंड प्रतिसाद देऊन दु:खी करणे, लग्नाला होणारा विलंब, वैवाहिक आयुष्यात समस्या, लग्नाला नकार, लग्न मोडणे ई. फळे प्रदान करतो.

जन्मकुंडलीत पुनरफु दोष असेल तर जातक अध्यात्माचा मार्ग निवडू शकतो. तो भौतिक जगापासून अलिप्त होऊ शकतो. त्याचे आयुष्यात अशा काही घटना घडू शकतात,  ज्याने भौतिक सुखांची लालसा नष्ट होऊ शकते. पुनरफू योग तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि अध्यापन क्षेत्रासाठी चांगला आहे, पण संसारिक, भौतिक गोष्टींसाठी मात्र निराशाजनक आहे.

जन्मकुंडलीत पुनरफू दोष कसा ओळखायचा?

१) शनि चंद्राचे नक्षत्रात व शनिचे उपनक्षत्रात किंवा

२) चंद्र शनिचे नक्षत्रात व चंद्राचे उपनक्षत्रात.

३) चंद्र शनिचे उपनक्षत्रात.

४) चंद्र शनिपासून ३ रे किंवा १० व्या स्थानात असेल तर. कारण शनीची चंद्रावर ३ री व १० वी दृष्टी येते.

५) शनि चंद्र युतीत असतील तर

मंद गती ग्रह असल्याने शनि घटना उशीरा घडवून आणतो, तसेच शनि एक थंड ग्रह आहे. या विरुद्ध धर्माचा चंद्र हा वेगवान ग्रह असून मनाचा, भावनेचा, संवेदनशीलतेचा कारक ग्रह आहे.  परिणामी या दोषामुळे जातकास प्रबळ दु:ख वाट्यास येऊ शकते.

साधारणपणे पुनरफू दोष असून शनि लग्न, द्वितीय, पंचम, सप्तम, अष्टम किंवा लाभ स्थानात असताना खूपच समस्या निर्माण करतो किंवा घटना उशीरा घडवतो.

१. शनि १ ले स्थानात असता अथवा १ ले स्थानावर दृष्टी पडत असता :

जातकास डोकेदुखी, भीती आणि चिंता, कुठल्याही गोष्टीत उत्साह न वाटणे, गळाठून जाणे ई. फळे दर्शवतो.

२. शनि २ रे स्थानात असता अथवा २ रे स्थानावर दृष्टी पडत असता :

धननाश, कौटुंबिक सौख्यात बाधा ई. २ रे स्थान संबंधित फळात कमतरता येते.

३. शनि ३ रे स्थानात असता अथवा ३ रे स्थानावर दृष्टी पडत असता :

भावंडे, आप्तेष्ट यांचे बोलण्याने मन दुखावून संबंध दुरावतात. कर्तुत्व सिद्ध करण्याऐवजी जातक हातावर हात धरून बसतो.

४. शनि ४ थे स्थानात असता अथवा ४ थे स्थानावर दृष्टी पडत असता : आईशी भांडण, गाडीचे नुकसान, घराचे नुकसान, फ्लॅटचा ताबा मिळण्यास उशीर, वाहन किंवा कोणतीही नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणे/उपकरण किंवा मोबाईल, कपडे इत्यादी खरेदी करू नका अन्यथा काही दोषांमुळे ते बदलण्यासाठी तुम्हाला परत दुकानात जावे लागू शकते. ई. ४ थे स्थान संबंधित फळात कमतरता येते.

५. शनि ५ वे स्थानात असता अथवा ५ वे स्थानावर दृष्टी पडत असता :

संततीस विलंब, प्रेमात अचानक घुमजाव, कला, म्युझिक, सिनेमा क्षेत्र ई. ५ वे स्थान संदर्भात विपरीत फळे देतो.

६. शनि ६ वे स्थानात असता अथवा ६ वे स्थानावर दृष्टी पडत असता : नोकरीत जाच, विरोधकांमध्ये वाढ, आजारपण, प्रयत्नांना वेळेत यश न लाभणे, मामाशी वितुष्ट ६ वे स्थान संबंधित फळात अशुभता येते.

७. शनि ७ वे स्थानात असता अथवा ७ वे स्थानावर दृष्टी पडत असता :

पाहण्याचा कार्यक्रम ठरला असेल तर वेळेत जाणे होणार नाही किंवा रद्द होईल, विवाहस्थळी प्रवास करताना विलंब, लग्नाला होणारा विलंब, लग्नाला नकार, लग्न मोडणे, जोडीदाराला थंड प्रतिसाद देऊन दु:खी करणे, वैवाहिक आयुष्यात समस्या, व्यावसायिक भागीदाराशी वितुष्ट ई. फळे प्रदान करतो.

८. शनि ८ वे स्थानात असता अथवा ८ वे स्थानावर दृष्टी पडत असता : मांगल्य स्थान व अपघात, दुर्भाग्य, निराशा, प्रगतीला रोक लागणे ई. दर्शवितो.

९. शनि ९ वे स्थानात असता अथवा ९ वे स्थानावर दृष्टी पडत असता : प्रगती मंदावणे, वडिलांचे नुकसान, प्रवासात अडचणी, दिरंगाई ई. ९ वे स्थान संबंधित फळात कमतरता येते.

१०. शनि १० वे स्थानात असता अथवा १० वे स्थानावर दृष्टी पडत असता : कामात दिरंगाई, व्यवसायात ग्राहकास दिलेला शब्द पाळता न येणे ई. १० वे स्थान संबंधित फळात कमतरता येते.

११. शनि ११ वे स्थानात असता अथवा ११ वे स्थानावर दृष्टी पडत असता : सर्व प्रकारच्या लाभास विलंब, संतती होण्यास अडथळे, ई. ११ वे स्थान संबंधित फळात कमतरता येते.

१२. शनि १२ वे स्थानात असता अथवा १२ वे स्थानावर दृष्टी पडत असता : प्रवासात अडचणी, विलंब, दिलेल्या मुदतीत कर्ज फेडण्यास विलंब, आजार बारा होण्यास विलंब, ई. ११ वे स्थान संबंधित फळात कमतरता येते.

जेव्हा गुरु व सूर्याची या दोषावर शुभ दृष्टी अथवा संबंध असेल तेव्हा हा दोष टळला जातो. 

पण माझ्या मते शनि व चंद्राच्या कारकत्वास जास्त महत्व दिल्याने हा योग जास्त धास्तीदायक वाटतो. त्यात ही बरेच ठिकाणी प्रेम व विवाह या संदर्भात जास्त अशुभ सांगितला जातो. व यासाठी एक तांत्रिक पूजा सुचवली जाते, ज्या योगे याचे दोष निवारण होईल.

ज्याच्या जन्मकुंडलीमध्ये पुनरफू दोष आहे अशा व्यक्तीशी संबंध तोडणे योग्य आहे का, जरी तो/ती एक गुणी आणि सक्षम व्यक्ती आहे? ज्या गुणांनी तुम्हाला एकेकाळी आकर्षित केले होते, ते तीव्र तिरस्काराचे कारण बनले आहेत का? निर्णय तुमच्यावर सोडला आहे. माझ्या मते ज्योतिषशास्त्रात शनि व चंद्र पीडा निवारणासाठी जे सोपे व विनाखर्च उपाय आहेत ते केल्याने सुद्धा फायदा होईल. मुळात प्रेम असो वा कोणतेही नाते. त्या व्यक्तीस समजून घेत, त्याचे दोष कमी करायला सहाय्यक व्हायचे असते. कोणीही परिपूर्ण जन्माला येत नाही, अगदी आपणही नाही. म्हणून, सकारात्मक गुणांवर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या प्रियकर किंवा जोडीदाराच्या कुंडलीतील दोषांबद्दल काळजी करू नका.

हा योग काही विशिष्ट जन्म कुंडली मध्ये महत्वाचा ठरत असला, तरी सर्वांनी घाबरून जायचे कारण नाही. जेव्हा त्यांची दशा अंतर्दशा चालू असेल आणि त्यांचा त्रिक किंवा मारक स्थानाशी संबंध असेल. तसेच या ग्रहांचे बलाबल देखील तपासणे गरजेचे आहे. आणि त्याच बरोबर इतर ग्रहस्थिती सुद्धा ग्रह दोषास पूरक असेल, तरच प्रकर्षाने याची अनिष्ट फळे प्राप्त होतील.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)