Category: Uncategorized

संकल्प रंग प्रतिक आणि जन्मकुंडली


विषय : संकल्प रंग प्रतिक आणि जन्मकुंडली

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : अॅनाटॉमी ऑफ नर्व्हस सिस्टिम व स्व अभ्यास

नमस्कार,

वैज्ञानिक संशोधनाद्वारे हे सिद्ध झाले आहे की रंग लहरींद्वारे उत्सर्जित झालेली उर्जा शारीरिक कार्ये, मन आणि भावनांवर परिणाम करतात. अभ्यासानुसार मेंदू, सर्जनशीलता, उत्पादकता आणि शिक्षणाशी ई. संबंधित असलेल्या रंगांचे फायदे दिसून आले आहेत. आधुनिक विज्ञानात ब्रेन वेव्ह बदलण्यासाठी ठराविक रंग दर्शविले गेले आहेत. ईईजी आणि नाडी मोजण्याच्या प्रणालीनुसार, पुरुष आणि स्त्रिया रंगांवर भिन्न प्रतिक्रिया देतात. रंग डोळ्यापासून मेंदूमध्ये प्रसारित केला जातो तेव्हा मेंदू भावना, मनाची स्पष्टता आणि उर्जा पातळीवर परिणाम करणारे हार्मोन सोडतो.

उदा. आपल्या राष्ट्राचा ध्वज आपण कुठेही पाहिला की, राष्ट्रप्रेमाची उर्मी हृदयात उफाळून येते. एखादे निसर्गाच्या देखाव्याचे चित्र पाहून प्रसन्न वाटते. प्रतिकाचा परिणाम निश्चितच होतो. त्याला विज्ञानामध्ये कंडिशंड रिफ्लेक्स् असे म्हणतात. या सिद्धांताप्रमाणे, अशी प्रतिके आपल्यामध्ये मूळ वस्तुएवढाच परिणाम व फरक आपल्यात घडवून आणत असतात. रंगांचा नकारात्मक आणि सकारात्मक मानसिक प्रभाव माणसांमध्ये वापरल्या जाणार्‍या संयोजनांच्या आधारावर दिसू शकतो. समोहन, समुपदेशन, मानस शास्त्र या मधे अन्तर्मनात काही गोष्टी प्रक्षेपित करण्यासाठी रंगां चा प्रभावी वापर केला जातो.

ज्योतिष शास्त्रात देखील काही उपाय सांगताना याची विज्ञानाशी कशा प्रकारे सांगड घातली आहे याची कल्पना तुम्ही कल्पना करू शकता. शनिला काळे उड़ीद वहा, गणपतीला लाल फूल वहा, गुरुबळ वाढवण्यासाठी पितांबर नेसून धार्मिक उपासना केली जात असे. वेगवेगळ्या रंगाचे खड़े, विशिष्ट रत्न यांचा वापर ई. गोष्टींचा रंग प्रधान वापर ज्योतिष शास्त्रात केला जातो.

त्याच बरोबर संकल्प शक्ती च्या जोरावर अनेक अशक्यप्राय गोष्टी लीलया शक्य होऊन जातात. मन संकल्पपूर्वक ज्याचा विचार करते, मेंदू ज्यावर एकाग्र होतो ती वस्तु किंवा त्या वस्तूचे प्रतीक माणसाच्या मानसिकतेत व पर्यायाने शरीरात त्या त्या पातळीचे फरक घडवून आणते. मनुष्याच्या शरीरात जैविके असतात. आपण जो दृढ निश्चय जागेपणी करतो. तो  निद्रावस्थेतही जागृत असतो.

उदा. लहानपणी दररोज सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो. आईने कितीही हाक मारून  प्रयत्न केला तरी लवकर जाग येत नाही. पण तेच तेच जर दुसऱ्या दिवशी जर सहलीला जायचे असेल व त्यासाठी सकाळी ५ वाजता शाळेत बोलावलेले असेल तर, पहाटे कोणीही न उठवता चार वाजताच जाग येते. हा सर्वसाधारण अनुभव आपण घेत असतो. हा सकारात्मक परिणाम त्याचे लवकर उठून सहलीला जायचे या संकल्पामुळे सहज शक्य होतो.

महात्मा गांधी आणि नेपोलियन हे दोघेही झोपताना केलेल्या निश्चयाचे वेळी अलार्म न लावता जागे होऊ शकत असत.

या मागचे वैज्ञानिक कारण असे आहे की, आपल्या मेंदूमध्ये पिरॅमिड सेल्स आणि एक्स्ट्रा पिरॅमिड सेल्स् असतात. ह्या सेल्स् मेंदूतील मोटर एरियामध्ये कार्यरत असतात. मोटर एरिया हा महत्वाचा कार्य करणारा भाग आहे. ह्या पिरॅमिड सेल्सच्या भागावर आपल्या दृढ संकल्पाचा, आपण नोंद घेतलेल्या प्रतिमांचा, आकाराचा, आकृतीचा, घटनांचा परिणाम होत असतो व आपली  कार्यतत्परता त्यावर अवलंबून असते. हा भाग जेवढ्या सकारात्मक गोष्टी टिपेल तसे आपले विचार, शरीर व नशीब बदलण्यास उपयुक्त ठरते.


आज आपण आयुष्यात समृद्धी, शांती, समाधान नांदावे, यासाठी आधीच सिद्ध झालेला व त्यास अभ्यासपूर्वक ज्योतिष शास्त्राची जोड देत संकल्प रंग प्रतिकांचा असाच एक कल्पक, सोपा व उपयुक्त उपाय आज पाहणार आहोत.

या संकल्पपूर्वक सकारात्मक मानसिकतेने केलेल्या प्रयत्नाचा उपयोग झोपेतल्या काळात होतो. झोपेच्या आधी मेंदूमध्ये एक प्रकारची निरामय अवस्था सुरु होत असते. या अवस्थेत आकृतीत दाखवल्याप्रमाणे (ही आकृती मेंदूंचे प्रतिक आहे, जी अॅनाटॉमी ऑफ नर्व्हस सिस्टिम या ग्रंथात पान क्र.३०० वर दिलेली आहे.) आकृती स्वतःच्या हाताने कागदावर अर्धवर्तुळाकार आकारामध्ये बरोबरची खूण काढावयाची व तो वरचा भाग तुम्हास जाणकार ज्योतिषाने सुचवलेला भाग्य रंगाने रंगवायचा. व त्यावर रोज एकाग्र होऊन आपला संकल्प आठवायचा. मेंदूत तो ठसण्यासाठी त्याचे चिंतन करायचे. आणि डोक्याखाली ते प्रतिक ठेवून संकल्प आळवत आळवत झोपून जायचे. रात्री झोपेच्या काळात संकल्पपूर्वक ठेवलेले प्रतीक सकाळी उठल्यावर पुन्हा एकदा नजरेत साठवायचे.,

शक्तीकाळ आणि शांतीकाळ यांच्यातला दुवा बळकट व अधिक फलदायी ठरतो. जागृती आणि झोप यामध्ये असणाऱ्या अवस्थेत माणूस हा विचाराच्या शांत अवस्थेत असतो. कोणतीही गोष्ट करण्याच्या अवस्थेत असतो असे सुप्रसिद्ध डॉ. थॉमस बुडाझेकी यानी म्हटले आहे. असाच संदर्भ स्लीप पोझिशन्स या डॉ. डंकेल यांच्याही ग्रंथात आहे. तसेच रंगाचा परिणाम माणसावर होत असतो याबद्दलचे संशोधन संदर्भ बिटा पल्स प्रेडिक्टस् शक्तीयोग या ग्रंथात देखील आहेत.


आपल्या राशीनुसार आपल्या विशिष्ट संकल्प पूर्तीसाठी जाणकार ज्योतिषाने सुचवलेल्या भाग्यदायक रंगांचा उपयोग केला, तर तो विशिष्ट रंग तुमच्या अंतरंगास भावेल व त्याचे निश्चितच चांगले परिणाम अनुभवास येतील.

हा उपाय करताना लग्न रास विचारात घेऊन त्यानुसार भाग्य रंग निश्चित केलेला असावा. तसेच लग्न स्वामी ६, ८, १२, स्थान, नीच राशी, शत्रू राशी, मारकेश, बाधकेश ई. संबंधित वा पीडित नाही, दशा अंतर्दशा, ग्रह स्थिती ई. बाबी तपासून अथवा या सर्व गोष्टींचा विचार करून जाणकार ज्योतिषाने सुचवलेल्या रंगाचाच वापर करणे महत्वाचे आहे. केवळ लेखात रंग दिला आह्रे म्हणून योग्य सल्ला न घेता वापर करणे टाळावा.

मेष रास : लाल रंग

वृषभ रास : गुलाबी, हिरवा, पांढरा

मिथुन रास : हिरवा, पिवळा

कर्क रास : पांढरा, क्रीम, लाल, पिवळा

सिंह रास : नारंगी, लाल, हिरवा

कन्या रास : हिरवा, पांढरा, पिवळा

तूळ रास : नारंगी, पांढरा, लाल, मोती

वृश्चिक रास : पिवळा, लाल, नारंगी, क्रीम

धनु रास : पांढरा, क्रीम, हिरवा, नारंगी, हलका निळा

मकर रास : पांढरा, लाल, निळा

कुंभ रास : पिवळा, लाल, पांढरा, क्रीम

मीन रास : लाल

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ग्रह विचार : हर्षल (Uranus)


विषय : हर्षल ग्रह विचार

लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : प्रेडीक्टीव्ह स्टेलर ॲस्ट्रोलॉजी

नमस्कार,

आज आपण हर्षल या ग्रहाविषयी माहिती घेणार आहोत.

हर्षल (Uranus) हा आपल्या सूर्यमालेतील सातवा ग्रह आहे. युरेनसचा शोध १७८१ मध्ये जर्मन-जन्मलेल्या ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर विल्यम हर्शेलने केली. त्याचे नावावरून या ग्रहाला हर्षल असे म्हणतात. त्याही पूर्वी १६८० ते १७१५ दरम्यान एक ज्योतिषी जौन फुलेक्सटीड याना या ग्रहाचे आस्तित्व ६-७ वेळा जाणवले होते, परंतु ते युरेनस चे ठोस अस्तित्व ठरवू शकले नव्हते.

हर्षल (युरेनस) हा गैसचा महाकाय, मुख्यत: हायड्रोजन आणि हेलियमपासून आपल्याला तयार झालेला ग्रह आहे. ९८ डिग्रींवर वळणी असलेला अक्षांतर अक्ष असल्याने अनौपचारिक ऋतुंची आणि विचित्र  चुंबकीय क्षेत्रांच्या कारणाने या ग्रहास निळसर-हिरवट रंग आहे. हर्षलला टाइटेनिया, ओबेरॉन, उंब्रिएल, एरियल, मिरांडा ई. २७ चंद्र आहेत.

हर्षल सूर्या पासून १ अरब ७८ करोड़ २० लक्ष मैल दूर आहे. त्यामुळे हर्षल अतिमंदगतिवाला ग्रह आहे, हा सूर्याला ८४ वर्षांमध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्याचा व्यास ३२००० मैल आहे.

पाश्चात्य व पौर्वात्त्य दोन्ही कडे फक्त सात ग्रहांना मानून राशि चक्र १२ भाग मध्ये विभाजित केले होते. हर्षलचा शोध लागल्यानंतर विद्वानांनी खालील निरिक्षणे नोंदवली.

(१) हर्षल केन्द्रीय नाडी प्रणालीच्या अधिपति आहे व हा उच्च बुद्धि व शोध कार्याकरता मनामध्ये दृणित विचार प्रदान करतो.

(२) हर्षल काही अशुभ परिणाम दर्शवते, ज्यामध्ये मृत्युपण सम्मिलित आहे. हर्षलला (यूरेनस)

ला कुंभ हि वायू राशि देण्यात आली आहे. अकस्मात मृत्यु हृदय बंद पडून होतो. जो पर्यन्त हृदय बंद पडून आपले कार्य करणे बंद करत नाही, तो पर्यंत त्याला मृत म्हटले जाऊ शक्त नाही. सामान्यपणे हृदय शेवटी बंद पडते, परन्तु येथे पहिले बंद पड़ते व हृदयास दर्शविणारी सिंह राशि विपरित कुंभ राशी आहे. म्हणून कुंभ राशिचे शनि व हर्ष (यूरेनस) दोन्ही अधिपति मानले जातात.

हर्षल जातकाच्या नाडी मंडळ व बुद्धीस नियंत्रित करतो व नाही महालापण म्हणून हर्षलला कन्या ही उच्च राशि देणे योग्य राहिल.

शारीरिक आकृति : हर्षल लग्न स्थानी स्थित असेल तेव्हा अथवा लग्न भावारंभी शुभ दृष्टीने पाहत असेल, तर जाताकास उंच शरीर यष्टी व सुंदर शरीर देतो. हर्षल कुंभ, मिथुन, धनु व सिंह राशि मध्ये स्थित असेल तर असाधारण उंची प्रदान करतो. हर्षल गंभीर, तीक्ष्ण डोळे व उत्तम दृष्टि प्रदान करतो. परन्तु जर हर्षल २ रे स्थानाचा भावारंभ, शुक्र, सूर्य याना पीडित करत असेल, तर हा नेत्र दोष उत्पन्न करतो.

आजार : हर्षल लग्नी असेल अथवा ६ वें स्थाना मध्ये असेल व जर सूर्याशी अशुभ दृष्टि बनवत असेल, तर जातकास हृदयरोग होऊ शकतो.

हर्षल मेष राशि मध्ये असेल, तर डोक्यामध्ये जखम वा कोणत्याही एका भागामध्ये दुखते, झोप येणार नाही. जातक अजाणतेपणी पुन: पुन: डोके हलवित राहील.

हर्षल वृषभ मध्ये असेल तर, तो गळयामध्ये सूज, मस्सा व जर हा बुधास आणि २ रे स्थानाचे भावारंभ पीडित करत असेल तर, जातकाची वाणी नष्ट होउन जाईल.

हर्षल मिथुन मध्ये असेल तर, न्यूमोनिया, फुफ्फुसा चे आजार, दमा, डांग्या खोकला ई. आजार दर्शवतो.

यूरेनस कर्क मध्ये असेल तर, मंदाग्नि, फासळ्या तुटणे, चास्ति मध्ये फोड़ होणे दर्शवतो.

हर्षल सिंह मध्ये असेल तर, रीढ़ व हृदयाला प्रभावित करतो.

हर्षल कन्या मध्ये तर, पाचन प्रणाली मध्ये दोष व अल्सर रोग व अज्ञात रोग दर्शवतो. काहीना विजेचा करांत द्यावा लागू शकतो.

हर्षल तुळ राशि मध्ये असेल तर, गुदामध्ये सूज, मुतखडा, मधुमेह, कूल्हा मध्ये दुखणे दर्शवितो.

हर्षल वृश्चिक मध्ये असेल तर, हार्निया, अंडवृद्धि, वंशावृद्धीत त्रास, मैथुन संबंधी रोग, नळीच्या आकाराचा फोड़ उत्पन्न दर्शवतो.

हर्षल धनु राशि मध्ये असेल तर, त्याला जनावरापासून धोका, पिसाळलेल्या (वेड्या) कुत्र्याने चावल्याने रोग, एखाया जनावरावरून पडून घाव (लागणे), कूल्हे व जांघामध्ये फ्रैक्चर ई. दर्शवतो.

हर्षल मकर मध्ये असेल तर, गठिया, अंग एक जागी आखडणे, हाड तुटणे ई.दर्शवतो.

हर्षल कुंभ मध्ये असेल तर, जीव गुदमरणे, हृदय गति बंद होणे, व विषारी वायू ने मृत्यु दर्शवतो.

हर्षल मीन मध्ये असेल तर, फ्रैक्चर, लंगडेपणा, अंगभंग कटुता, चर्मरोग, एकझीमा ई. दर्शवतो.

विशेषता : हर्षल द्वारा सामान्य पणे वैज्ञानिक विकास दर्शित होतो. म्हणून ज्या जातकांच्या जन्मकुंडलीमध्ये हर्षल बली असून स्थित असतो, ते नेहमी अध्ययनशील व पुन: पुन: चिंतन करणारे असतात. ते शोध कार्य करणारे व सत्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील असतात.  ते स्वतःला समाधान  देणारेच कार्य करतात. जातक रहस्य विज्ञान व जादुई विद्या प्राप्त करतील. असे जातक आंतरिक शक्तिदवारे आजाराचा इलाज करतात. टेलिपैथी, टेलीव्हजन, विश्व, ज्योतिष व अन्य अशा प्रकारच्या विज्ञानाचे अध्ययन करतात. ज्या जातकांचा हर्शल बलवान असतो, त्यांचेमध्ये अंतर्ज्ञान, सूक्ष्म दूरदर्शिता व कार्यतत्परता व रचनात्मक कार्य ई गुण आढळतात. हर्षल स्वतंत्र उत्साह, मौलिक विचार व शीघ्र परिवर्तन देतो.

प्रेमात त्याचे स्वत:चे नियम असतात,एखाद्याशी प्रेम करणे, संबंध बिघडवणे अथवा घटस्फोट देणे मध्ये त्यांना जराही वेळ लागत नाही. मग भौतिक नियम अथवा मानवा द्वारे नियम, कायदा काही असू देत.  परन्तु हर्षल ची शुभ दृष्टि असल्यास तो जातक समाज निमित्त बनतो. व आपल्या मित्र-मंडळीना जाणतो. अधिकाश पणे हे लोक आपल्या स्वत:चे मार्गानुसार विवाहाची व्यवस्था करतात. मंगल व हर्षल संबंधित असता, ते परंपरावादी नसतात, ते दूसरे काय विचार करतील अथवा काय म्हणतील याचा विचार करीत नाही. हर्षल व बुध अशुभ दृष्ट असतील, तर ते पुष्कळ लहरी असतील.

विशेषता ज्यामध्ये सुधारणा हवी : जातकाने स्वतंत्र होण्याचा खोटा विचार ठेऊ नये, विचार मध्ये कधीही हट्टी होऊ नका. हिंसा सारख्या कार्याचा त्याग करा, अन्यथा ते आत्मनाशक ठर्टेल. आकस्मिक परिवर्तन करताना विचार करा की, ह्याने नुकसान व प्रतिकूल अथवा विपरित निर्माण होऊ शकते.

व्यवसाय : संशोधक, सर्व अनुसंधान विभाग, ज्योतिषी, हस्त सामुद्रिक शास्त्री, शिक्षक, शिल्प कलाकार, मनोवैज्ञानिक, स्वभावाचे अध्ययनकर्ता, समुपदेशक, टेलीग्राफर, व्याख्याता, प्राचीन काळचे जादूगार, केमिस्ट, सर्व कार्याना करणारा, वीज, रेडियो, हवाईजहाज व स्वयंचलित यंत्र, वैज्ञानिक, इंजीनियर्स, विशेष रूपाने टेलीफोन, विद्युत प्रयोग, तारा, तार, टेलीग्राफ, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, बस (मोटर) ट्राम, रेल्वे, वायुयान, जहाज, शेअर, सरकारी उद्योग, अल्युमिनीयम, पारा असलेल्या वस्तु, आधुनिक उत्पादन, म्युझियम, म्युनिसिपल कर्पोरेशन, लोकोपयोगी नियुक्त अणू शक्ती ई.

राजनैतिक : वरील संस्थाची रचना व राज्यकारण अश्या विभागामध्ये वा विस्तार व पदाच्या संख्यामध्ये वाढ. सर्व आधुनिक विज्ञानाची शाखामध्ये संशोधन व प्राचीन विधानामध्ये नवीनीकरण, यातायात व परिवहन विभागाचा विस्तार, नगर पालिका व स्थानिक संस्थाला कर्ज/अनुदान देणे, एखाद्या विभागामध्ये अचानक निकाल या नवा विभाग तयार करणे, नव्या पदाचा निर्माण हत्यादि.

आर्थिक : हर्षल वर शुभ दृष्टि असेल, तर बाजारामध्ये अचानक गड़बड़ी व विशेष रूपाने विद्युत  विभागात केबल्स, विस्फोटक पदार्थ व टेलीकॉन ई. करता शेअरची किंमत वाढेल, संप समाप्त होउन जाईल, क्रांतीचे नियंत्रण ठेवलेले जाऊ शकते. विज पडणे, अथवा दुर्घटनामध्ये काही नुकसान नाही, परन्तु जर यूरेनस वाईट असेल तर प्रकोप व महान संकटामुळे शेअर मध्ये अचानक दुर्गती.

उत्पादन : रेडियम, विजेचे सामान, तार, धातु मध्ये मिसळ, धातु, पारा मिसळलेल्या वस्तु, इलेक्ट्रानिक व ज्योतिषिय यंत्र, साहसी वस्तू, ज्योतिषी, ऑटोमोबाईल, सायकल, विस्फोटक, हठधर्मी, गैस, जनरेटर, नियम विरुद, आत्मनिर्भर विज, आधुनिक माइक्रोस्कोप, रेडियो, टेलीग्राम, टेलीस्कोप, अपरम्परावादी उत्पादन, एक्स-रे इत्यादि,

स्थान : रेल्वे, स्टीम इंजीन, गैस प्लान्ट, हॉस्पीटल, कार्यालय, आश्रम, बैंक, चिकित्सालय, कोळश्याची खाण, मशीन व अवजार उद्योग, स्वीमिंग पूल,

शुभ रंग : गरम जस्त, व मिश्रित रंग, बैंगणी रंग.

शुभांक : ४, १३, २२, ३१.

दिवस : बुधवारजर बुध जातका करिता अशुभ नसेल तर

हर्षलची राशी दर्शित फळे :

मेष : स्वतंत्र, मौलिक, महत्वाकांक्षी, शक्तिसंपन्न, निष्कपट, बलवान, सकारात्मक, प्रेरक, क्रियाशील, चतुर, अन्वेषक, परिवर्तनशील, भ्रमणशील, यात्रा करणे व बुद्धीमानास महत्व देणारा, आत्मनियंत्रण नसणारा, पुष्कष्ठ मंद बुद्धि, भांडखोर, निःशस्त्र, अवनीति

वृषभ : जड डोके, हट्टी, निश्चयी, स्वेच्छाकारी, दृढ, शंकेखोर, ईष्यायुक्त, आर्थिक स्थितित उतार-चढ़ाव, अकस्मात नुकसान, अचानक पदावनती, जोडीदार किंवा शोधकद्वारे लाभ

मिथुन : अंतर्ज्ञानी, मौलिक, विलक्षण, निष्कपट, वैज्ञानिक, अपरंपरावादी, ज्योतिषी, विद्युत चे अध्ययन, शौकीन, जादूगर, अनेक यात्रा करणारा, मित्र बनविणारा, जर पीड़ित असेल तर तो पत्र व्यवहार, यात्रा ह. द्वारा आप्तेष्ट, मानव, शेजारच्याशी वैर ठेवणारा.

कर्क: भावूक, शीघ्र प्रभावित करणारा, ब्रम्हज्ञान प्राप्तीत लीन, मध्यस्थच्या गुणांचा विकास करणारा, आरामहीन, विश्वासहीन, परिवर्तनशील, पर्यवेक्षक दल, जमीन-जुमल्या मध्ये नुकसान, अव्यवस्थित पोट, अपचन,

सिंह : कठोर, निश्चयी, उद्यमी, प्रेरक, शक्तिशाली, शक्तिसंपन्न, अपरंपरावादी, राजद्रोही, पुष्कळ आत्मनिर्भर, साहसी, हिंसक, रहस्यमय, विद्युत, अन्वेषण, मशीनरी, पत्रकारिता, खेळाची आवड, प्रेमाचे बाबतीत परिवर्तन, नव्या मित्राशी दोस्ती, जुन्या मित्राशी अलगाव, प्रसूती मध्ये कष्ट प्राप्त होतात.

कन्या : पुष्कळ चतुर, स्वतंत्र, मौलिक वाढ, वैज्ञानिक व मैकेनिक डोक्याचा, शिकण्यामध्ये चतुर, नोकरीमध्ये बदलाचे द्वारा कष्टप्रद.

तुळ : असाधारण, कलात्मक योग्यता, रहस्यमय विषयाचा शौकीन, अंतर्ज्ञानी, सुन्दर व्यक्तिमत्व, उत्तम कल्पनाशक्ती, जोडीदारावर अपार प्रेम, जोड़ीदार मिळवण्यात घाई, जर पीडित असेल तर अचानक वियोग, काडीमोड अथवा जोडीदाराचा मृत्यु, शत्रुता, आलोचना, प्रतिस्पर्धा, विरोध, दुःख, कष्ट, निराशा, पारिवारिक कष्ट.

वृश्चिक : निश्चित विचारांचा, शक्ति संपन्न, हट्टी, ध्यान व एकाग्र शक्ति, चतुर, अंतर्मुख, राजद्रोही, गुप्त, आत्मोन्नति, अन्वेषक, जादुई शक्ति, औद्योगिक, कैमेस्ट्री, विस्फोटक, अग्निमय शस्त्र, विजेचे यंत्र संबंधित.

धनु : अन्वेशक, कल्पनाशील, स्वप्नामध्ये रहाण्याची प्रवृत्ति, रहस्यकला, धार्मिक, विश्वप्रेमी, सामाजिक अधिष्ठित, शिक्षण, उच्च शिक्षा, साहसी, उन्नतशील, उद्यमी, विदेशी मामले, समुद्रयात्रा, दीर्घ यात्रा संबंधित

मकर : हट्टी, साहसी, उत्तम तर्कबुद्धी, तीक्ष्णबुद्धी, महत्वाकांक्षी, गंभीर, उत्तरदायित्वपूर्ण, मौलिक, प्रशासकीय क्षमता, मोठ्यांना धोका, वियोग, त्याग, पदावनती, लेखनद्वारे आलोचना, वरिष्ठ अधिका-याशी शत्रूता.

कुंभ : अंतर्ज्ञानी, मौलिक, निःस्वार्थी, साहसपूर्ण, विश्वासपात्र, मैकेनिक्ल योग्यता, अन्वेषक, स्वतंत्र,  वैज्ञानिक, संप, समाज, क्लब, पलिक लाइफ, म्युनिसिपल कारपोरेशन, मोठ-मोठ्या कंपन्या, रेल्वे, रेडियो, वायुमार्ग संबंधित

मीन : रहस्यमय शोध, गुप्त व पार्थिव शोध, स्वप्न व दृष्टि खरी ठरते, दूरदर्शी, आत्मसाक्षात्कार, प्रतिष्ठित, अस्थिर, दुर्भाग्य, कलंकित, असमानता, लढवैय्या, विरुध्द, आत्महत्या, व्यापारिक रसायन ई.

हर्षलची स्थान दर्शित फळे :

प्रथम स्थान : स्वतंत्र, मौलिक, अंतर्ज्ञानी, अन्वेशक, रहस्यपूर्ण, विज्ञान कडे ओढा, अपरम्परावादी, म्हातारा दिसणे, विलक्षण सवयी, ज्योतिष, जादू, हिप्नोटिज्म, अध्यात्मवाद, औषधा विना इलाज, टेलीपैथी, अन्वेशक, विद्युत घेणे व देणेची स्थिती, आरामहीन, कार्यालय, घरामध्ये परिवर्तन, दुर्भाग्यशाली विवाह,  विद्वान व धर्माचा अध्ययन, तीव्र बुद्धि, आकस्मिक, विस्फोटक, मृत्यु.

द्वितीय स्थान : भाग्यामध्ये उतार-चढ़ाव, अनिश्चीतता, शोधा द्वारे लाभ, मैकेनिक्ल, बैंक, रेल्वे, संगीत व विद्युत ई संबंधित

तृतीय स्थान : आपल्या निकट संबंधीयांपासून वियोग, चतुर, दुःखी, अकस्मात व अवांछित वार्ता, यात्रा, सभा, दुर्घटना, साहसी, उत्साही, नाव उलटणे, जहाज ध्वस्त होणे, नाड़ी कष्ट ई संबंधित

चतुर्थ स्थान : विवेशामध्ये भाग्योन्नति, पैतृक संपत्ति मध्ये अडचणी, पारिवारिक जीवनामध्ये अडचणी, स्त्री व निकट संबंधीयांशी भांडण, आर्थिक स्थिति मध्ये उतार-चढ़ाव, दुर्घटना संभव, चोरीमुळे नुकसान, धोका, छळ कपट, विज पडल्यामुळे नुक्सान, पुरामुळे नुकसान, चुकीचे निर्णय ई. संबंधित

पंचम स्थान : रोमांटिक, गुप्त प्रेम, परिवर्तनीय कृत्या पासून आनंदी नाही, अपरंपरा-वादी, विवाहा करिता आराधना, मुलाचा खतरनाक रूपाने जन्म, प्रथम पुत्र वियोग, सामाजिक, नेहमी नव नवीन चित्र पाहणे, पीडित असेल तर सन प्रकाशनद्वारे हानि, षडयंत्र प्रेरित, विश्वासघात व राजद्रोह, सट्टा, जोखिम द्वारे नुक्सान

षष्ठम स्थान : अनिश्चित, नाडी मध्ये गड़बड़, आजारपण, डोके खराब होणे, चिकित्सक, विभिन्न व आराम न देणारी बीमारी, मानसिक अनावस्था, आत्मिक प्रयोग,वेड, रेडियम द्वारा इलाज, हिप्नोटिज्म व विक्स द्वारे इलाज, तत्वज्ञानी व जादूगर.

सप्तम स्थान शीघ्र विवाह, जान्तरपूर्ण रोमान्स, अचानक वियोग, बुढीवान, जोडीदार, विवाह नन्तर गैर समज विदेश द्वारा नुक्सान, ठेके, नगर पालिका, अधिका-याशी मारण,

अष्टम स्थान : भौतिक संसाराशी प्रेम, संसारा मध्ये गमन, मुदतीचा रोग व या दुःखानंतर या अकस्मात अवाछित्त मृत्यु. शक्ती, प्रेम जीवन पसंत. अचानक मृत्यु मुळे सहायक, जोडीदार द्वारा लाभ, अकस्मात या वास्तविक लाभ, अथवा एखाद्या भागीद्वारे व शुभ दृष्ट असेल तर दुःखी अडचणी, आर्थिक कष्ट, विशेष रोग, मृत्यु.

नवम स्थान : स्वतंत्र, मौलिक, अन्वेषक, चतुर, अंतर्ज्ञानी, नेहमी योजना बनविणारा, यात्राचा शौकीन, नातेवाईकापासून कष्ट, विवाह द्वारा रहस्यामध्ये रुचि, तत्वज्ञान संबंधी, धार्मिक, दार्शनिक, व्यापारी, सुधारा- विकासात्मक विचार, वायु संबंधी अन्वेषणकर्ता व मार्गदर्शक नेता.

दशम स्थान : स्वतंत्र, मौलिक, अन्वेषक, चतुर, अपरंपरावादी, आत्मनिर्भर, अस्थिर, विलक्षण, शासन, जनताचा अडचणी, व असफलता, परिवार वियोग, विद्युत, अनुसंधान कर्ता, सुधारक, मनोवैज्ञानिक, कादंबरीकार, इंजीनियर, मेकैनिक, हिप्नोटिज्म, अचानक परिवर्तन

एकादश स्थान : बुद्धीमान, स्वतंत्र मित्र, यौनिक रचनात्मक, अन्वेशक, लेखक, मित्र शासकीय प्रशासक, मोठ्या कंपनीशी संधान, भावुकता कडे ओढा, रोमाटिक जीवन, उतम आशा, स्वास्थ्य, प्रेम प्राप्ति

द्वादश स्थान : रहस्याचा शोध, आत्मिक शक्ति, गुप्त अनुभव, गुप्त प्रेमाचे मामले, पशु द्वारे अडचणी, परिवाराशी वियोग, वनवास, त्याग, हॉस्पीटल, विचित्र गुप्त शत्रू, विदेशामध्ये भाग्य हानि

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

आश्लेषा नक्षत्र विचार


विषय : आश्लेषा नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण आश्लेषा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

९. आश्लेषा नक्षत्र :

आश्लेषा नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील ९ वे नक्षत्र आहे. वेटोळे घालून पसरलेल्या सापासारखी किंवा मराठी ९ अकासारखी भासते. हे नक्षत्र अधोमुखी, तीष्ण, दारुण, मंदलोचनी, जीवाग्नि तत्त्वाचे व चतुष्पादी आहे. या नक्षत्राचे ४ ही चरण कर्क राशीत येतात. या ४ चरणांवर अनुक्रमे गुरु शनि, शनि व गुरुचे स्वामित्व आहे. नक्षत्राचा स्वामी बुध, राशीस्वामी चंद्र व दैवत सर्प असल्याने या नक्षत्रात बहुतांशी अवखळपणा, चंद्राचा सुखासक्तपणा व सर्पाचा सुस्त व जागरूकपणा यांचे मिश्रण आढळते. या नक्षत्राचे इंग्रजी नाव ‘झीटा ‘हेड़ी’ आहे.

आश्लेषा म्हणजे डोक्यावर पृथ्वीचा भार घेणारा आदिशेष. भारतात नागाला नाग देवता म्हणतात आणि श्रावण महिन्यातील पंचमीला नागाची पूजा केली जाते.

शेषनाग (विष्णूचा सर्प/विष्णुशाय) आणि वासुकी (शिवाचा सर्प) या दोन्ही सर्पांचे आश्लेषा हे जन्म नक्षत्र आहे. या नक्षत्रापासून कलियुगाची सुरुवात झाली असे मानतात.

दुर्वासाच्या शापामुळे देवतांच्या सान्निध्यात मंदाराचल पर्वत आणि वासुकी नागाच्या मंथनाने असुरांनी दुधाचा सागर मंथन केला, यातून वनौषधी आणि १४ रत्ने प्राप्त झाली अशी कथा प्रसिद्ध आहे.

हे नक्षत्र अंगावर काहीतरी भार टाकणारे आहे. स्व. पंतप्रधान के पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लग्नी चंद्र आश्लेषा नक्षत्री होता. त्यांच्यावर स्वतंत्र झालेल्या भारताचा भार होता. हा भार त्यांनी किती यशस्वीपणे पार पाडला. संकटाला तोंड देऊन देशात लोकशाही टिकविण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या लोकनायक श्री. जयप्रकाश नारायण यांच्या कुंडलीत लग्नी आश्लेषाचाच मंगळ आहे. आयुष्यभर रामाच्या मागे सावलीसारखा असणारा व वनवासात असता डोळ्यात तेल घालून रामाला जपणाऱ्या लक्ष्मणाचेही आश्लेषा नक्षत्रच होते. प्रभू श्री रामचंद्रांचे नक्षत्र पुष्य तर त्यांच्या पाठीवरील लक्ष्मणाचे नक्षत्र आश्लेषा. त्यामुळे या नक्षत्राला लक्ष्मण नक्षत्र असेही म्हणतात. हे नक्षत्र नुसतेच अंगावर भार किंवा जबाबदाऱ्या न देता, त्यास यशस्वीपणाने पार पाडण्याचे सामर्थ्यही देते.

आश्लेषा नक्षत्रात ठळक असे ५ तारे असून ते रंगाने थोडे पांढरट पिवळे, तेजस्वी व थोडेसे काटेरी दिसतात. आकाशात हे नक्षत्र अतिशय ठळकपणे चमकताना दिसते. पौष किवा माघ महिन्यात ते रात्रभर आकाशात दिसते. या नक्षत्राला गंडातर ताऱ्यातील नक्षत्र म्हणतात. विशेषतः नक्षत्राचे शेवटचे २ किंवा २ घटी गंडातरात येतात. कारण हे नक्षत्र व कर्क राशी एकाच ठिकाणी संपून लगेच मघा व सिंह राशीच्या विभागाचा प्रारंभ होतो. या नक्षत्राच्या संधीवर जन्म लग्न बिंदू किवा चंद्र असता या व्यक्तीवर अनेक संकटे व गंडांतरे येतात असे मानले जाते.

आश्लेषा नक्षत्रावर जन्मणाऱ्या (लग्नी असता) जातकाचा बांधा मध्यम उंच व जास्त आडवा असतो. बांधा जरासा अप्रमाणशीर असतो. शरीर अवयव पुष्ट व मांसल असतात. पोट, मान, मांड्या, मनगटे, नितंब व हाताच्या पंजाचे आकार वाटोळे, मोठे व गोलाकार असतात. कपाळ व चेहरा रुंद व अर्थ वर्तृळाकार असतो. नाक जरा लांबट, नाकाचा शेंडा खाली व नाकपुड्या मागे असतात. गाल फुगीर व गोबरे असतात. पावले आतल्या बाजूस वळलेली असून चालणे तिरपे असते. अवयव ढिले असतात. स्वभाव सुस्त, भिडस्त, ऐषारामी, सुखासक्त, चंचल, नाटकी, भावनाप्रधान, विकारवश, मोहाला बळी पडणारा व भित्रा असू शकतो. या जातकांना घराबद्दल व कुटुंबाबद्दल फार ओढ असते. यांचे स्वतःचे मत बदलते असू शकते. त्या दुसऱ्यांच्या तंत्राने चालणाऱ्या व वहावत जाणाऱ्या असु शकतात. हे नक्षत्र राक्षसगणी असले तरी तामसी, निर्दयी किंवा कुटील नाही, तर त्यांच्या आचारविचारात महत्त्वाकांक्षा, ध्येय अथवा तारतम्यता नसून केवळ खावे, प्यावे, मजा करावी व स्वप्नात दंग व्हावे असे वाटू शकते.

आश्लेषा जातक स्त्रियांना हे नक्षत्र फारसे महत्त्वाचे नाही. सौंदर्य, कला अथवा गुणांच्या दृष्टीने ते अनुकूल नसते. या नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्रियाही आडव्या, थोड्या अप्रमाणशीर बांध्याच्या असतात. अवयव पुष्ट गोलाकार व आकारहीन असतात. अंगात चपळ व तरतरीपणा नसतो. त्या तरुण वयातच अंगाने सुटतात. या स्त्री जातकांना घर व कुटुंबाची ओढ असली तरी घरातील कामापेक्षा आराम प्रिय असतो. त्यांना नाटक, सिनेमा, टीव्ही, रेडिओ, संगीत, वाहनातून प्रवास यांची आवड फार असते. संगीत, गायन, वादन, कलाकौशल्याच्या गोष्टींची आवड असली तरी त्या गोष्टी शिकण्यापेक्षा त्यांच्या आनंद उपभोगण्याची वृत्ती जास्त असते. त्या कलावंत नसून कलाप्रिय असतात. फॅशनची आवड असली तरी आळशीपणामुळे त्यांना ती जमत नाही. स्वभावाने मात्र त्या प्रेमळ, उदार, दयाळू, भावनाशील व कुटुंबवत्सल असतात.

आश्लेषा नक्षत्र मिश्र गुणधर्माचे आहे. ते पराक्रमी, कर्तृबवान, जागरूक व प्रचंड कार्य करणारे आहे. तसेच शांत, सुस्त, व निद्रित पण आहे. आश्लेषा म्हणजे सर्प. या नक्षत्रात रवि, मंगळ, शनि व राहू असे ग्रह असून ते लग्नी, तृतीयात अथवा दशमात असता हा सर्प जागरूक अवस्थेतला, सळसळणारा व चळवळ्या असतो. हे जातक कर्तबगार असून त्यांच्या हातून प्रचंड अलौकिक कार्य घडतील. आश्लेषा नक्षत्रात चंद्र, गुरु व शुक्रासारखे शुभ ग्रह असता हा सर्प वेटोळे घालून सुस्त होऊन पडणाऱ्या निद्रिस्त अवस्थेतला असतो. हे जातक आळशी, सुखासक्त व ऐहिक सौख्याच्या अधीन असतील. या नक्षत्रात रवि मंगळ, शनी व राहूसारखे ग्रह असता त्यांच्याकडे जबाबदाऱ्या किंवा प्रमुखपणा येतोच. त्या व्यक्ती कुटुंबाच्या कोणत्यातरी गावाच्या, पंचायतीच्या, राज्याच्या किंवा संस्थेच्या प्रमुख म्हणून असतात. आश्लेषा नक्षत्रात चंद्र, शुक्र व गुरु यांसारखे शुभ ग्रह असता त्या सुख देण्यापेक्षा सुख भोगण्यासाठी आलेल्या असतात. त्या दुसऱ्यांची सेवा करून घेण्यास अथवा दुसऱ्याकडून सुखोपभोग मिळवण्यास आलेल्या असतात. बऱ्याच वेळा या नक्षत्राचे जातक दुसऱ्याशी कितीही गर्विष्ठपणे किवा तुच्छतेने वागले, तरी त्या व्यक्ती यांच्याशी प्रेमाने व चांगल्या तऱ्हेने वागतात.

या नक्षत्रावरचे आजार फारसे दाहक नसले तरी बराच काळ टिकणारे असतात. प्रकृति सर्द व वातुळ असते. शीत विकारापासून त्रास होतो. थंडी, कफ, थंडीताप, पोटात गॅस धरणे, अपचन, ओकाऱ्या, मळमळणे, हवामानातील बदलामुळे होणारे रोग यापासून जास्त भीती असते. शनि असता डायरिया अथवा पोटात खडे होणे. मंगळ असता रक्तन्यूनता व रक्तदोष, गुरु असता मेदाधिक्य, वात, कॅन्सर, मधुमेह, अपचन यांची भीती तर राहू असता त्वचेचे विकार, केतू असता पोटात गॅसेस धरणे, जलोदर, पोट व पचनक्रिया बिघडणे यापासून त्रास. बऱ्याच वेळा राहू अशुभ असता सर्प, विंचू, फुरसे, कुत्रा अगर इतर विषारी प्राण्यांच्या दंशाची भीती असते. स्त्रियांनाही स्तनाचा कॅन्सर होण्याची भीती असते. मात्र या नक्षत्रात हे ग्रह बिघडलेले असतील तरच वरील रोगांचा संभव जास्त आहे.

आश्लेषा नक्षत्री रवि पुष्कळसा अनुकूल असतो. रवीला शारीरिकदृष्ट्या व अधिकारयोगाच्या दृष्टीनेही हे नक्षत्र चांगले आहे. शरीर अवयव, मांसल असून शारीरिक जीवन व रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. रवि ऐश्वर्य, कीर्ती, मानसन्मान व अधिकारही देईल. मात्र बऱ्याच वेळा स्वभावाने या व्यक्ती स्वार्थी, अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्या व ख्यालीखुशालीत दंग होणाऱ्या असतात.

आश्लेषा नक्षत्री चंद्र असता शरीर भरलेले, अवयव मांसल व गुबगुबीत असतात. मात्र अंगात वात जास्त असतो. मध्यम वयातच शरीर सुटते. रोग प्रतिकारक शक्ती कमी असते. चंद्र कर्तृत्व व महत्त्वाकांक्षा देणार नाही. या व्यक्ती सुस्त, आळशी, चैनी, सुखासक्त, चंचल, प्रवासाची व वाहनांची भयंकर आवड असणाऱ्या, विकारवश, भिडस्त, भावनाप्रधान, कल्पनासृष्टीत वावरणाऱ्या पण उदार असतात. मात्र ऐहिक सौख्य मिळण्याच्या बाबतीत भाग्यवान असतात.

आश्लेषा नक्षत्री मंगळ बऱ्याच दृष्टीने प्रतिकूल असतो. शरीर फोफसे असून रक्त कमी असते. शारीरिक जीवन व रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. स्वभावाने त्या भांडखोर, द्वेषी, दुष्ट, खर्चिक, उचळ्या व त्यात बिघडलेला मंगळ असता गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना त्रास देण्यात आनंद मानणाऱ्या व फाजील पराक्रमाने स्वतःवर संकटे ओढवून घेणाऱ्या असतात.

आश्लेषा नक्षत्री बुध असता अशक्त, दुर्बल, मंद बुद्धीच्या, खोटे बोलणाऱ्या, नकला, बनावट कृत्ये करणाऱ्या व दुर्भागी असतात.

आश्लेषा नक्षत्री गुरु सर्व प्रकारची सुख भोगण्यास चांगला. शरीर प्रकृती चांगली असते. शरीर भारदस्त, भरलेले, भरदार अवयव, पुष्ट, मांसल व गुबगुबीत असतात. चेहरा गोल व फुगीर असतो. गुरु हा सुखोपभोग, चैन व भाग्याच्या दृष्टीने बरा. मात्र तो उच्चपदे, अधिकार, सत्ता किंवा दर्जाच्या (नोकरीत) अनुकूल नाही. या नक्षत्रात गुरुचे फारसे शुभ गुणधर्म दिसून येत नाहीत. कारण या व्यक्ती स्वभावाने स्वार्थी, अहंकारी, घमेंडखोर, ऐहिक सौख्यात दंग असलेल्या व खादाड प्रवृत्तीच्या असतात.

आश्लेषा नक्षत्री शुक्र असता शरीरप्रकृती व सौदर्यदृष्ट्या साधारण. चेहरा सुंदर व मोहक असतो. मात्र बांधा जरा अप्रमाणशीर व स्थूल असतो. या स्त्रियाही उतार वयात सुटणाऱ्या असतात. स्वभावाने अतिशय चैनी, विलासी, रंगेल, भोगी, विषयासक्त, रसिक, हौशी, कलाप्रिय, सौंदर्यप्रेमी व शुक्र बिघडलेला असता व्यसनी, स्वैराचारी, दुर्गुणी, प्रेमात व मोहात गुरफटणाऱ्या असतात. पिण्याचे व्यसन फार असते. हाडापेरांची बरोबर वाढ होत नाही. शरीरप्रकृती अशक्त व दुर्बल असते.

आश्लेषा नक्षत्री चंद्र शनि युति असता बालपणी मुडदूस व आकडी या रोगांची भीती असते. डोळे मिचमिचे व बारीक असतात. कपाळावर आट्या फार असतात. बिघडलेला शनि असला तर जुनाट रोगाने आजारी पडणाऱ्या व व्यंग असण्याचा संभव असतो. स्वभावाने कपटी, घातकी, विषारी, आतल्या गाठीच्या, क्रूर व आयुष्यभर दगदग, काबाडकष्ट भोगणारा असतो.

आश्लेषा नक्षत्री राहू असता शरीर प्रकृती बरी, पराक्रमी, शूर व कर्तृववान असतो. मात्र बिघडलेला राहू असता पराक्रमी पण चैनी, गुन्हेगारी वृत्तीचा व समाजविघातक धंदे करणारा असतो. शुभ राहू असून तो ३, ६ व १० या स्थानात म्लैश्छ, यवन, जंगली लोक व मजूर वर्गावर प्रभुत्व देईल.

आश्लेषा नक्षत्री केतु मध्यम शरीर प्रकृतीच्या दृष्टीने जास्त खराब, वातापासून व थंडीपासून जास्त त्रास होतो. श्रम, कष्ट, दगदग फार होते. ऐहिक सौख्याच्या बाबतीत खराब असतो.

आश्लेषा नक्षत्री हर्षल शरीर प्रकृतीला चांगला पण स्वभावाने विक्षिप्त वृत्तीचा, विलासी, बुद्धीचा उपयोग वाईट कार्यासाठी करणारा, कपटी, आतल्या गाठीचा व शुक्राबरोबर असता प्रेमाच्या खेळात दंग होणारा व स्वतःचा नाश करून घेणारा असतो.

आश्लेषा नक्षत्री नेपच्यून असता रसिक, हौशी, वाघांची आवड असणारा असतो.

आश्लेषा नक्षत्रात सरकारी खात्यात काम करणारा वर्ग, विशेषतः ज्या खात्यात सत्ता नाही अशी खाती, तसेच नगरपालिका, कॉर्पोरेशन बॉडीज, प्रवासी कंपन्या, औषधी कंपन्यात काम करणारा वर्ग, खलाशी, मीठ व मासळी विकणारा वर्ग, गावातील वैदू, खेडेगावी अधिकार गाजवणारे तसेच नाटक, सिनेमा किंवा इतर करमणुकीच्या अथवा चैनीच्या ठिकाणी काम करणारा वर्ग येतो.

आश्लेषा नक्षत्रावर २ किंवा ९ या अंकाचा प्रभाव आहे. यापैकी २ अंकाचे वर्चस्व जास्त पडते. अनुकूल रत्न पाचू किंवा मोती आहे. पाचू जास्त योग्य वाटतो. हस्ताक्षर मोठे व ठळक असते. त्यात वेलांटी, मात्रा व अक्षरे यामधील पोकळ गोल मोठे काढतात. अक्षर सरळ रेषेत नसून वरखाली असते. लिहिण्याची गती पण बदलती असते. लोचन संज्ञा मंद असल्याने या नक्षत्रावर हरवलेली वस्तू थोड्या फार शोधाने सापडू शकते. वस्तू दक्षिण दिशेला सापडते.

आश्लेषा नक्षत्रात जन्म झाला असता अनिष्ट कालादि दोष मानून शांती करण्याची पद्धत आहे. दोष जन्मापासून ९ महिन्यांपर्यंत राहतो. पहिल्या ५ घटकांत जन्म झाला असता राज्यलाभ, त्यापुढील ७ घटिकात पितृनाश, त्यापुढील २ घटिकांत मातृनाश, त्यापुढील ३ घटिकात कर्मभोग, त्यापुढील ६ घटिकांत त्याग, त्यापुढील ९ घटिकात भोग, त्यापुढील ५ घटिकांत धन असे फलादेश आहेत. आश्लेषाच्या १ ल्या चरणात जन्म झाला असता शुभ, २ ऱ्यात धननाश, ३ ऱ्यात मातृनाश व ४ थ्यात पितृनाश असे चरणपरत्वे फलादेश वैदिक पद्धतीत सांगितले आहेत. आश्लेषाच्या शेवटच्या ३ चरणांवर जन्म झाला असता जन्मणाऱ्याच्या सासूला मृत्युपद फल मिळते. मात्र सासू नसेल तर हा दोष मानू नये.

मुहूर्त शास्त्रात या नक्षत्राचे महत्त्व नाही. ते क्रूर, राक्षस गणी व गंडांतराच्या योगातले असल्याने शुभकार्याला वर्ज्य आहे. ते अधोमुख असल्याने विहिरी खणण्यास आरंभ करणे, पुरलेले द्रव्य काढणे व पुरणे, यांना चांगले, तसेच द्यूत खेळणे, गणितारंभ, यंत्र साधना, मध काढण्यास आरंभ करणे. गलबत चालू करणे, रोग मुक्ती-स्नान, सर्पाचे विष उतरवणे यांना चांगले. याच्या १४ घटिका प्रयाणास वर्ज्य आहेत.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

मन करा रे प्रसन्न, आरोग्य वृद्धीचे साधन


विषय : मन करा रे प्रसन्न, आरोग्य वृद्धीचे साधन

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : स्व अभ्यास

नमस्कार,

कुंडलीचा थोडाफार अभ्यास असणाऱ्या सगळ्यांना माहित आहे की, कुंडलीतील ६ वे स्थान आजार दर्शवते. ६ वे स्थानास रिपू किंवा शत्रू किंवा रोग स्थान अशी नावे आहेत. खरतर अर्थ त्रिकोणातील हे एक स्थान आहे. अर्थ त्रिकोणात ६ वे स्थान प्रयत्न, संघर्ष वा नोकरी दर्शवते. १० वे स्थान कर्म अथवा व्यवसाय दर्शवते. आणि २ रे स्थान जे धन स्थान मानले जाते (जे आरोग्यासाठी एक मारक स्थान आहे). आजच्या धकाधकीच्या आयुष्यात सर्वच जन भौतिक सुख व पैसा अडका मिळवण्यासाठी प्रचंड धकाधकीचे आयुष्य जगत असतात. व ही दगदग शरीरास असह्य झाली की आजार निर्माण होतात. आपण औषधोपचार घेतो व पटकन बरे व्हायचा विचार करत असतो. पण या सर्व रस्सीखेच शर्यतीत आपण आपल्या मनावर प्रचंड ताण निर्माण करत असतो, त्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो.

एखादा पेशंट हास्पिटलमध्ये अॅडमिट असतो. त्याच्या प्रकृतीत काही केल्या सुधारणा दिसत नसते. नातेवाईक डॉक्टरना विनवत असतात की, “काहीही करून आमच्या पेशंटला बरे करा”. तेव्हा डॉक्टर सांगतात, ‘अहो, आम्ही खूप प्रयत्न करतो आहोत. पण पेशंटचा ” ट्रीटमेंटला रिस्पॉन्सच मिळत नाहीये.”

आता पेशंटचा रिस्पॉन्स नाहीये म्हणजे काय ? याचा अर्थ डॉक्टरांनी नुसती औषधे शरीरात पाठवून उपयोग नसतो. पेशंटने त्या औषधांना प्रतिसाद द्यावा लागतो. तरच औषधांचा परिणाम शरीरावर होतो. पेशंट प्रतिसाद देत नाही म्हणजे पेशंटचे शरीर आणि मनही प्रतिसाद देत नसते. कोणत्याही आजारात, कोणत्याही ट्रिटमेंटमध्ये पेशंटच्या शरीर आणि मनाचा प्रतिसाद उत्तम असणे आवश्यक असते. जर आपण आपल्या मनाची शक्ती वाढवली तर आपल्याला आरोग्यप्राप्ती आणि रोगमुक्ती मिळवता येते. यासाठी आपल्या मनाबद्दल आणि त्याच्या भूमिकेबद्दल जाणून घेऊ या.

माणसाला मन असते, पण शरीराच्या आतही कुठे मन नावाचा अवयव नाही. कारण, मनाला भौतिक अस्तित्व नाही. म्हणजे मनाला आकार, वजन नाही. ते डोळ्यांनी दिसत नाही, पण तरीही मनाचे अस्तित्त्व असते. मन आपल्या अनुभवाला येते. या मनाची आपल्या आरोग्यामध्ये फार महत्त्वाची  भूमिका असते, कारण व्यक्ती ही मन आणि शरीर दोन्हींची मिळून बनलेली असते. आपल्या आयुष्यात जे काही घडते ते आपल्या मनाच्या इच्छेमुळे. मनाप्रमाणे शरीरात बदल होतो. जरी आपण म्हणतो की शरीराला इच्छा होते. तरी ते पूर्ण सत्य नाही. माझ्या जिभेला गोड खाण्याची इच्छा झालीय, असे आपण म्हणतो. पण ती इच्छा खरी मनाची असते. जिभेला गोड चव आवडत असती, तर सर्वच व्यक्तींच्या जिभेला ती आवडली असती. पण तसे होत नाही. आवड निवड हे मन ठरवत असते. आपल्याला होणाऱ्या आजाराचे मूळ कारण हे कित्येक वेळेला मन असते. मनोकायिक आजार (सायको सोमॅटिक डिसिजेस) हा शब्द आपण ऐकला असेल. मनाचा परिणाम शरीरावर होऊन निर्माण झालेले आजार. सध्या वाढत्या प्रमाणात असलेले आजार म्हणजे मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, त्वचेचे आजार, श्वसनसंस्थेचे आजार, कॅन्सर असे अनेक आजार मनातील नैराश्य, चिंता, ताण यामुळे होतात, असे संशोधन सांगते. त्यामुळे कोणत्याही आजारामध्ये शरीराला ट्रिटमेंट देण्याबरोबरच त्याला मनाची शक्ती वाढवण्यासाठीच्या उपायांची जोड देणे गरजेचे आहे. मनाचा परिणाम शरीरावर होतो आणि ते रोज आपण अनुभवत असतो.

उदा. आपल्याला जो राग येतो, तो आपल्या मनाला येतो का शरीराला? तुम्ही म्हणाल मनाला, पण मन दिसत नाही, मग राग कसा दिसतो? एखादी व्यक्ती रागावली आहे हे आपल्याला कसे समजते? रागावलेल्या व्यक्तीचा चेहरा संतापाने लालबुंद होतो. डोळे मोठे होतात, तो माणूस मोठमोठ्याने बोलत राहतो. हे वर्णन तर शरीराचे झाले ना. याचाच अर्थ राग मनाला आहे पण त्याचा परिणाम शरीरावर दिसतो आहे. रागावलेल्या व्यक्तीचे हे झाले बाह्य वर्णन, पण रागामुळे. व्यक्तीच्या शरीरांतर्गतही अनेक बदल होत असतात. हृदयाचे ठोके वाढतात, नाडीगती वाढते, रक्त तापते इ.

आता मनातल्या रागाचा जो शरीरावर परिणाम झालेला असतो, त्यामुळे शरीरांतर्गत चाललेली अनेक महत्त्वाची कामे थांबतात. रागामुळे जो बिघाड झालेला असतो, तो दुरुस्त करण्यासाठी शरीरातील पेशींना काम करावे लागते. रागावलेल्या व्यक्तीला या सगळ्याची जाणीव नसते. तिला अस वाटत असत की मी रागावून समोरच्या व्यक्तीला कसं गप्प केलं. पण रागामुळे आपण त्या व्यक्तीच थोड आणि स्वत:चं जास्त नुकसान केलं आहे, हे तिला समजत नाही. जस रागाचं आहे तसं इतर भावनांचंही आहे. आपल्या मनातील प्रत्येक भावनेचा परिणाम: आपल्या शरीरावर होत असतो. नकारात्मक भावनांचा नकारात्मक आणि सकारात्मक भावनांचा सकारात्मक परिणाम होतो. नकारात्मक भावनांमुळे आजार निर्माण होतात. आपण रागावलो की शरीरावर जो परिणाम झालेला असतो, तो शरीर काही वेळात दुरुस्त करते. पण आपण सतत रागवत राहिलो तर शरीरावर त्याचे सखोल परिणाम होत राहातात आणि त्यातून पुढे दीर्घ आजारांची निर्मिती होऊ शकते.

माणूस आयुष्यभर इंद्रियांच्या साहाय्याने बाह्य जगातील सुखाची लयलुट करतो. त्या इंद्रियांना सुखाचे साधन म्हणून वापरतो. बाह्य जगातील भौतिक सुख प्राप्तीसाठी गतीशील राहतो. अशा साधनांकडून मिळालेल्या सुखाची सवय, त्याच्या मनाला लागलेली असल्यामुळे, ते मन प्रतीगतीच्या नियमानुसार सतत दुःख भोगत राहाते. अशाप्रकारे भावना आणि सुखगती यांच्याशी गुंफण घातलेल्या माणसाला, दुःखगतीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. रोगाची निर्मिती हा त्याचाच परिणाम आहे. माणूस मरणाला घाबरतो, यामागील सुप्त कारण कदाचित हेच असेल की त्याला जगण्याची आस असते.

६ वे स्थान वासना देखील दर्शवते. रिपू स्थान म्हणजे शरीराचे किंवा आपले शत्रू यात आपले मन भावनांना, विकारांना, वासनेला, मोहाला, बळी पडून आपला शत्रू बनते हे आपण सोयीस्कर विसरतो.हे षड रिपू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया. या भावना आपण अतिरेकाने वापरतो. आयुष्यात भावना हव्यातच. पण या सहा भावना संयमाने आणि नियमाने वापरल्या तर त्या आपल्या मित्र ठरतात. आपल्या बाबतीत जे काही चांगले आणि वाईट घडत असतं, तो आपणच निर्माण केलेल्या कारणांचा परिणाम आहे. आपण जे वागतो, निर्णय घेतो, कृती करतो याचा परिणाम म्हणून आपल्याला सुख किंवा दुःख येते. आपल्या सुख- दुःखाला आपणच जबाबदार असतो. आपण आपल्या मनाने ठरविल्याप्रमाणे आपण वागत सुटतो. त्याचे परिणाम आपल्याला स्वीकारावे लागतात. आपल्या आजारांना, दुखांना आपण इतर व्यक्तींना जबाबदार समजत असतो. जो पर्यंत आपण जबाबदार आहोत हे आपण मान्य करत नाही. तो पर्यंत आपल्याला आपले प्रश्न सोडविता येत नाहीत.

शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी माझ्या अभ्यासानुसार आजारी पडण्याआधीच तुमचा धर्म त्रिकोण बळकट केला तर त्याचा खूप सकारात्मक परिणाम आयुष्यावर झालेला दिसेल.

१, ५, ९ हि स्थाने धर्म त्रिकोण दर्शवतात.

१ ले स्थान आपले व्यक्तिमत्व दर्शवते. व्यक्तिमत्त्व हे शरीर व स्वभाव या दोन्हीचे मिश्रण आहे.

शरीर उर्जा टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करा.

मानसिक शक्ती टिकवण्यासाठी स्वत:मध्ये कोणत्या नकारी आणि अतिरेकी भावना बिघडल्या आहेत याचे परीक्षण करा आणि जाणिवपूर्वक त्या भावनांचे संयमन करा.

५ वे स्थान खेळ, क्रीडा, कला, उपासना दर्शवते.

शाररीक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही मैदानी खेळाची आवड जोपासू शकता.

मानसिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही संगीत, कला याचा आधार घेऊ शकता. आजकाल रोगमुक्तीसाठी म्युझिक थेरपी चा वापर केला जातो. तसेच उपासना सुचवण्या मागे हे ही एक कारण असते की, मनातील विकार नाहीसे झाल्याने मन शांत होऊन एकाग्रता वाढीस लागते. मनात सकारात्मक भावना निर्माण झाल्याने आत्मसंयमन करता येते. आपले आजार मन अस्थिर झाल्यामुळे तसेच आपली कृती (६ वे व १० वे स्थान) बिघडल्यामुळे होतात. प्रत्येक माणसाला ५०% सुख आणि ५०% दुःख मिळते. कोणीही अतिदुःखी किंवा अतिसुखी नसतो. आपल्याला काय मिळाले नाही हे आठवून रडत बसण्यापेक्षा काय मिळाले याचा विचार करून समाधानी रहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे मन शांत, खंबीर, धैर्यशील होते. म्हणून तुम्ही घेत असलेल्या सावधानी/औषधोपचारांना मनाचा समतोल राखणेसाठी कला, क्रीडा, संगीत, उपासना याची जोड द्या.

९ वे स्थान धार्मिकता अध्यात्मिकता, नीती, उपासना, प्रगती ई. दर्शवते.

भौतिक प्रगती करत असताना, कीर्ती मिळवता असताना समतोल साधण्यासाठी त्यात नीती व्यवहार असणे महत्वाचे असते. तसेच मला काय मिळायला पाहिजे यापेक्षा मी कोणाकोणाचे देणे लागतो याचा विचार करायला हवा. आपले आईवडील, कुटुंब, समाज, देश आणि निसर्ग यांच्याकडून खूप काही मिळत असते. त्यांच्या प्रती आपले देण्याचे कर्तव्य जाणून जाणीवपूर्वक आपण निरपेक्ष काम केले पाहिजे. कुटुंबासाठी आपण करतो, पण समाजाप्रती करायचे राहून जाते. आपल्या श्रमाचा आणि धनाचा नियोजित वाटा दर महिन्याला त्यागरूपाने समाजातील दुःख दूर होण्यासाठी द्यायला हवा.

ध्यान म्हणजे जाणीवपूर्वक स्वार्थी बुद्धीला विश्रांती देणे. ध्यानामुळे आत्मविश्वास व शारीरिक क्षमता वाढतात. ध्यानाचे परिणाम आपल्या मनावर मेंदूवर शरीरांतर्गत कार्यावर अतिशय चांगले होतात. रोज संध्याकाळी साडेसात वाजता दिव्याच्या ज्योतीवर १२ मिनिटांचे ध्यान करावे. यामुळे दिवसभरातील ताणतणावाचे स्वतःवर झालेले दुष्परिणाम दूर होतात. मनशांती वाढते.

तसेच उपासना, देवदर्शन आदि गोष्टी देखील मनाचे पावित्र्य आणि शांती टिकवण्यास उपयुक्त ठरतात. भाग्य स्थान तुम्ही अशा पद्धतीने लिहिले तर श्रमदान सार्थकी लागेल. ( १० वे चे १२ वे स्थान जे श्रमाचे दान दर्शवते.) त्याग, दान आणि सत्कृत्याची जोड माणसाला उन्नती प्रदान करते.

शरीर हे जड माध्यम असल्यामुळे प्रकृतीचे नियम लागू असतात. न्यूटनच्या गतीच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे अॅक्शनला रिअॅक्शन असते. रिअॅक्शन ही अॅक्शनच्या सम प्रमाणात आणि विरूद्ध दिशेने असते. शरीराच्या अॅक्शनमधून मन सुख भोगते. त्यामुळे रिअॅक्शन स्वरूपात दुःख त्याच्याकडे येते. यानुसार सुखाचे दुःखात आणि दुःखाचे सुखात रुपांतर होत असते. आजाराचे दुःख घालवायचे असेल तर औषध उपचार याचे दुःख सकारात्मक भावनेने घ्यायला हवे.

या भावनांवर संयमन न करता आपण आजारात नुसते औषधोपचार केले, तर त्याचा परिणाम नीट होत नाही. म्हणून कोणाचाही आजारामध्ये शरीराबरोबर मनालाही ट्रिटमेंट देणे आवश्यक आहे. मनाला ट्रिटमेंट देण्यासाठी प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जावेच लागते असे नाही. आत्मचिंतन आणि आत्मपरिक्षण करून आजाराच्या आणि दुखाच्या मूळ कारणापर्यंत पोहोचणे, मनातील बिघाड जाणून तो दुरुस्त करणे

गरजेचे ठरते व मग त्यावर इलाज करणे सोपे जाते.

सर्वांना आरोग्यदायी सुखी जीवनासाठी शुभेच्छा !

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)