
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : अश्विनी नक्षत्र विचार
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : नक्षत्र ज्योतिष
नमस्कार,
आज आपण अश्विनी नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.
क्रांतिवृत्ताचे समान १२ विभाजित केलेले भाग राशी आहेत. त्याचेच २७ समान विभाग केले म्हणजे त्यांना नक्षत्रे असे म्हणतात. क्रांतिवृत्तालाच राशीचक्र किंवा नक्षत्रचक्र असे संबोधिले जाते. वर्तृळाचा आरंभ बिंदू हा कोणत्याही ठिकाणी मानता येऊ शकतो. नक्षत्र चक्रही वर्तृळकार असल्याने त्याचा प्रारंभ कोणत्याही नक्षत्रापासून मानता येऊ शकतो. पण ज्योतिषशास्त्रात ऋतुमान व कालगणना ठरविण्यासाठी मेष संपात किंवा वसंत संपात (ज्या ठिकाणी आकाशात क्रांतिवृत्त विषुववृत्ताला छेदून जाते तो बिंदू) हा राशी चक्राचा प्रारंभ मानतात. पण राशी समजण्यासाठी नक्षत्राचा उपयोग केला असल्याने या संपात बिंदूजवळ असलेले नक्षत्र नक्षत्र चक्राचा प्रारंभ म्हणून मानले जाते. निरयन राशी चक्राचा आरंभ अश्विनी नक्षत्रा पासून धरला आहे.
१. अश्विनी नक्षत्र :
अश्विनी हे नक्षत्र चक्रातील पहिले नक्षत्र असून त्याचे चार ही चरण मेष राशीत असल्याने हे नक्षत्र चतुष्पाद तसेच क्षिप्र, तीर्थमुखी, मंदलोचनी व देवगणी आहे. नक्षत्राची लांबी १ अंश ते १३ २० आहे. इंग्रजी नाव ‘बीट एरिटस’ आहे.. या नक्षत्राच्या चार चरणावर अनुक्रमे मंगळ, शुक्र, बुध व चंद्राचे स्वामित्व आहे. नक्षत्राचा स्वामी केतू, राशीस्वामी मंगळ व दैवत हे देवांचे वैद्य अश्विनकुमार आहेत. म्हणून या नक्षत्रात केतूचा त्यागीपणा, मंगळाचा पराक्रम व अश्विनीकुमारांची अप्रतिम बुद्धिमत्ता व चिकाटी यांचा सुरेख संगम दिसून येतो.
अश्विन महिन्यात हे नक्षत्र आपणाला रात्रभर आकाशात दिसू शकते. या नक्षत्रात तीन तारका असून आकृती इंग्रजी J या अक्षरासारखी किंवा पायमोज्यासारखी दिसते. काही प्राचीन ग्रंथात याचा आकार घोड्याच्या मुखासारखा किंवा तीन चाकाच्या रथासारखा सांगितला आहे. नक्षत्र चर असून तारे फिक्कट रंगाचे पांढरे व जरा धुरकट दिसतात. या नक्षत्राकडे पाहताना त्यातून वाफा निघतात, असे वाटते म्हणून ते अग्नितत्त्वाचे व तेजस्वी धरतात.
अश्विनीला घोड्याचे मुख का आले याविषयी प्राचीन ग्रंथात एक सुंदर कथा सांगितली आहे. देवांचा कारागीर त्वष्टा याला मधुविद्या (संजीवनी) येत होती. त्याने ही विद्या दधिची ऋषींना शिकवली. या विदयेमुळे दधिची ऋषी सदेह स्वर्गाला जात होते. अश्विनीकुमारांना ही विद्या शिकण्याची फार इच्छा होती. पण ही विद्या शिकण्यास इंद्राचा सक्त विरोध होता. विद्या शिकविणाऱ्याचे तो शिर उडविणार होता. तेव्हा अश्विनीने स्वतःच दधिचींचे शिर उडवून ते झाकून ठेवले व दधिचींना त्याने घोड्याचे मुख लावले व तो मधुविद्या ग्रहण करू लागला. इंद्राला हे समजल्यावर त्याने दधिचीचे अश्वमुख शिर उडवलेच, तेव्हा अश्विनीने या ठिकाणी झाकून ठेवलेले शिर पूर्ववत् लावले. मात्र अश्विनीकुमारांची ही विद्या अर्धवटच राहिली.
म्हणूनच अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या जातकांत महत्प्रयासाने विद्याप्राप्ती, विद्या ग्रहणाची आवड, असाध्य विद्या शिकण्याची हौस व चिकाटी दिसून येते.
तसेच अश्विनीने एक शिर उडवून व दुसरे शिर लावल्याने या नक्षत्रावर जन्मलेल्या जातकांत शरीराच्या कोणत्याही अवयवावर कलम करण्याची व शस्त्रक्रिया करण्याची विद्या चांगली येते.
तसेच पुराणकाळी शर्यतीच्या पणात अश्विनीकुमारांनी आपल्या बुद्धीने शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला म्हणून त्यांना सर्व प्रकारची विद्या, यश व त्रैलोक्य कीर्ती प्राप्त झाली.
या नक्षत्राला नकुल व सहदेव यांची शक्ती मिळाल्यामुळे सर्व विद्या पारंगत व त्यापासून धनप्राप्ती व ऐश्वर्यप्राप्ती हे फलादेश दिसून येतात.
शारीरिकदृष्ट्याही हे नक्षत्र अनुकूल आहे. हे नक्षत्र लग्नी (प्रथम भावात) असता किंवा या नक्षत्रात चंद्र असता जन्मणाऱ्या जातकाचा बांधा उंच, प्रमाणशीर व नीटनेटका असतो. त्या हाडापेराने मजबूत व काटक असतात. शारीरिक आरोग्य व रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असते. सहनशक्ती चांगली असून हे जातक श्रम व दगदग सहन करण्यात पटाईत व सक्षम असतात. चेहरा जरा उभट, नाकपुड्या मोठ्या व भालप्रदेश रुंद असतो. स्त्रियांपेक्षा पुरुषांना या नक्षत्रांचे महत्त्व जास्त आहे. कारण पुरुषांना लागणारा धीटपणा, धाडस, पराक्रम, कर्तबगारी, महत्त्वाकांक्षा, स्वातंत्र्यप्रियता, शौर्य, स्वावलंबित्व, अधिकार लालसा हे गुण या नक्षत्रात ठळकपणे दिसून येतात. हे नक्षत्र चर व अग्नितत्त्वाचे असल्याने हे जातक रागीट, मानी, उतावळ्या स्वभावाचे पण निश्चयी व महत्त्वाकांक्षी, उच्च आचारविचार, न्यायी, उदार, स्पष्टवक्ते, सडेतोड बोलणारे असतात. मर्दानी खेळाची आवड असून नित्य नवनव्या विद्या शिकण्याची हौस फार असते. प्रत्येक गोष्टीत त्यांना नावीन्य आवडते. प्रवासाची बरीच आवड असते. यांचे बोलणे, चालणे, लिहिणे जलद असते. हे जातक नेहमी घाई-गडबडीत असतात. वाहनात बसून प्रवासाची मौज अनुभवण्यापेक्षा बेफामपणे वाहन चालवून आपले कौशल्य व घडाडी दाखविण्याची हौस असते. हे जातक एके ठिकाणी बराच वेळ बसून राहिले तर अस्वस्थ होतात. थोडक्यात यांना व्यवहारात एक प्रकारची गतिमानता आवडते.
स्त्रियांना हे नक्षत्र मध्यम आहे. या नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्रियाही सशक्त, बांधेसूद, सडपातळ व आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या असतात. चेहरा सुरेख पण जरा रागीट, मानी, करारी व गंभीर वाटतो. डोळे जरा बारीक पण पाणीदार असतात. अंगात नाजूकपणा कमीच. त्या उच्च कुळात शालीन दिसतात. त्या पुरुष वृत्तीच्या पण सत्त्वगुणी असतात. राहणी साधी पण स्वच्छता, नीटनीटकेपणा व टापटीप यांची आवड असते. कर्तबगार व विद्याव्यासंगी असून त्यांची सर्व क्षेत्रांत पुरुषांची बरोबरी करण्याची धडपड चालू असते. त्या स्वतंत्रवृत्तीच्या असल्या तरी कुटुंबवत्सल असतात.
नक्षत्र अग्नितत्त्वाचे असल्याने प्रकृती उष्ण व पित्तकारक दर्शविते. या नक्षत्राचे मुख्य रोग म्हणजे डोके दुखणे, डोळ जळजळणे, सनस्ट्रोक हे आहेत. तसेच लहानपणी गोवर, कांजिण्या, देवी या रोगांची भीती असते. रवि मंगळ या नक्षत्रात दूषित असता वरील रोगांची भीती असते. बुध बिघडला असता चक्कर, भोवळ, ज्ञानतंतू व मज्जातंतू बिघडणे. गुरु बिघडला असता मेंदूत रक्तसंचय होणे, केतू असता मूळव्याध याचा संभव असतो. काही वेळा कापणे, भाजणे, हाड मोडणे, शरीराच्या एखाद्या भागाची शस्त्रक्रिया करावी लागणे या गोष्टी पण दिसून येतील. स्त्रीच्या कुंडलीत या नक्षत्रात शुक्र बिघडला असता मासिक पाळीच्या वेळी त्रास होतो.
रवि या नक्षत्रात फारच चांगला. या नक्षत्रात रवि असून तो विशेष करून १ किवा १० या स्थानात असता या व्यक्ती लवकर लवकर अधिकारपदाला पोहोचतील. यांच्या हाताखाली अनेक माणसे काम करत असतात. नोकरी सरकारी किंवा कुठल्याही अंमलबजावणी खात्यातील असते.
मानसन्मान व कीर्ती चांगली मिळते. I.A.S. किंवा अशा चढा- ओढीच्या परीक्षेत चांगले यश देतो. शारीरिकदृष्ट्याही रवि चांगला असतो. स्वभाव जरा कडक, शिस्तप्रिय व स्वतःला विशेष समजणारा असतो. चंद्र या नक्षत्रात असता स्वभाव चंचल, भटक्या प्रवृत्तीचा व उतावळा असतो. मंगळ असता कुलदीपक, पराक्रमी, महत्त्वाकांक्षी, धडपड्या असतो. मंगळ वैद्यकीय, इंजिनिअरिंग व लष्करी शिक्षणाला फार चांगला. १, ३, ६ व १० या स्थानात या नक्षत्रातील मंगळ अधिकार देईल, श्रेष्ठ पदाला नेईल. या व्यक्ती फायर ब्रिगेड, कारखाने, पोलिस खाते, सैन्य व ज्या ठिकाणी यांत्रिक कामाचा संबंध येतो अशा ठिकाणी नोकरी करताना दिसून येतील. शरीरप्रकृती तर फारच चांगली असेल. बुधाला हे नक्षत्र जरा प्रतिकूलच आहे. शुभ बुध असल्यास लेखक, गणिती व वैद्यकीय शास्त्रांना चांगला. या नक्षत्रात १, ६, ८ व १२ या स्थानी बिघडलेला बुध वाईट असतो. गुरु या नक्षत्रात शुभ फलादेश उत्पन्न करेल. तसे उत्तम प्रकारची शरीर संपत्ती, उच्च विद्या, ज्ञान, लेखन, धन व मानसन्मान यांना चांगला असतो. तो डॉक्टर, इंजिनिअर, वकील, अर्थशास्त्रज्ञ यांना चांगला असतो. समाजप्रियता मिळते. गुरु असता देह भरदार व अवयव पुष्ट असतात. शुक्र असता दिसण्यास सुंदर व हसतमुख, कला, कौशल्य, गायन, वादन, नाटक, सिनेमा यांची आवड असणारा असतो. वाहनसौख्याची आवड जास्त, मात्र विद्येच्या बाबतीत मध्यम शरीरप्रकृतीलाही साधारणच असतो. शनीला हे नक्षत्र शरीरप्रकृतीच्या दृष्टीने बरे, पण विद्या, धन, ऐश्वर्य, अधिकार या दृष्टीने अनुकूल नसते. शरीर मजबूत, काटक, हाडाळ व शिरायुक्त असते. अंगावर मांस कमी असते. अंगमेहनत व कष्टाची कामे जास्त पडतात व त्या प्रमाणात धन मध्यम मिळते. राहू, केतू या नक्षत्रात शरीरप्रकृती व आरोग्य चांगले देतात. या व्यक्ती अतिशय धाडसी, पराक्रमी, शूर व कर्तबगार असतात. मंत्र तंत्र, जादूटोणा, गूढविद्या, मोहिनी विद्या, गारुडी विद्या, दैविक विद्या यांना हे ग्रह चांगले. केतू आध्यात्मिक व वैद्यकीय विद्येलाही चांगलाच. मात्र राहू या नक्षत्रात जसे धन, ऐश्वर्य व अधिकार देईल तसा केतू देऊ शकणार नाही. राहू बिघडला असता कुटिल, दुष्ट व त्रासिक स्वभाव दर्शवितो. केतू मात्र उदार, त्यागी व समाधानी वृत्ती दाखवील. हर्षल ज्योतिषशास्त्र, गूढ विद्या, संशोधन, विमान विद्या व विजेच्या साहाय्याने चालणाऱ्या मशिनरीसंबंधीचे शिक्षण व नवीन शोध यांना चांगला. शरीरप्रकृतीलाही बरा. नेपच्यून आरोग्य व शरीर प्रकृतीलाही मध्यम पण गूढविद्या, ज्योतिष, अंतःस्फूर्ती, साक्षात्कार, तत्त्वज्ञान व धार्मिक विद्येला चांगला.
या नक्षत्राचा अंक १ किंवा ८ आहे. त्यापैकी १ अंकाचे वर्चस्व जास्त वाटते. रत्न पोवळे आहे. यांना पांढरा व तांबूस रंग शुभ आहे. हस्ताक्षर फिकट, उभट व टोकदार असते. लिहिणे जरा जलद नक्षत्र मंदलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवली असता ती थोड्याशा प्रयत्नाने पण जरा विलंबानेच दक्षिण दिशेला सापडू शकते.
मुहूर्त शास्त्रामध्ये या नक्षत्राचे महत्त्व फार आहे. हे प्रारंभीचे नक्षत्र असल्याने कोणत्याही शुभ कार्याला आरंभ या नक्षत्रावर करावा. विशेषतः कोणतीही विद्या शिकण्याचा आरंभ, कलाकौशल्याची कामे, संगीत, गायन, नवीन वास्तू किंवा दुकानाचे उद्घाटन, नवीन धंदा किंवा नवीन कारखाना सुरू करणे, नवीन वाहन विकत घेणे, बागेत नवीन झाडे (विशेषतः औषधी वनस्पती) लावणे, डॉक्टरांनी आपला दवाखाना सुरू करणे यांना फार चांगले. या नक्षत्रावर कोणतीही शस्त्रक्रिया चांगली व यशस्वी होते. आम्ही बऱ्याच डॉक्टरांना या नक्षत्राचा मुहूर्त दिला असता शुभ परिणाम दिसून आले. या नक्षत्रावर कोणत्याही वास्तूचा उद्घाटन समारंभ करावा. गृहप्रवेशाला हे नक्षत्र चांगले. मात्र मंगळवारी अश्विनी नक्षत्र असता अमृतसिद्धीयोग असूनही गृहप्रवेश करू नये. घर जळते. हे नक्षत्र राजनक्षत्र असल्याने राज्याभिषेकाला चांगले. कोळ्यांनी आपली नवी गलबते सुरू करावीत. रोग्यांना औषध घेण्यास व वैद्यांना औषधे करण्यास हे नक्षत्र शुभ असते. नक्षत्र चर असल्याने प्रवास, नवीन मोटार सायकल किंवा स्कूटर वापरण्यास सुरू करणे चांगले. इतर हलण्यासारखी शुभ कार्येही या नक्षत्रावर करावीत.
(टीप : जी नक्षत्रे शुभ कार्यासाठी सांगितलेली आहेत ती जर पापग्रहाने युक्त असतील किंवा त्या नक्षत्रावर ग्रहण झाले असता घेऊ नयेत.)
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
विषय : राशी दर्शित काही नोकरी व्यवसाय
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : प्रेडिक्टिव्ह स्टेलर ॲस्ट्रॉलॉजी रीडर
नमस्कार,
आजच्या आधुनिकतेच्या व जागतिक स्पर्धेच्या काळात भारत व भारतीय वेगाने प्रगती करत अनेक व्यवसायात शिखर गाठत आहे. अनेक आर्थिक प्रगतीच्या संधि उपलब्ध होत आहेत. पण त्याचबरोबर रोजगार नसलेल्या लोकांची संख्या देखील तेवढीच वाढताना दिसती आहे. आर्थिक विषमता व महागाई वाढीस लागली आहे. नोकरी टिकवणे व योग्य नियोजन करून आपले आर्थिक गणित सांभाळणे खूप अवघड बनत चालले आहे. अशा परिस्थितीत आपली आवड व आपल्याला कोणत्या तर्हेचे काम केल्यास आपली आर्थिक उन्नती होईल याची दिशा समजणे उपयोगी पडते. याच्या अनेक पद्धती पैकी ज्योतिष शास्त्रीय मार्गदर्शन सुद्धा उपयुक्त ठरते. या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे.
या विषयाला धरूनच कोणती रास काय व्यवसाय दर्शवते, हे स्थूलमानाने देण्याचा प्रयत्न केला आहे.
कोणतीही रास अशा प्रकारचे नोकरी व्यवसाय दर्शवते, जे त्याचे राशीच्या स्वामीच्या अधिकारामध्ये येतात, त्यासाठी त्या राशीचे तसेच त्या ग्रहाचे स्वत:चे गुणधर्म, तत्वे, लिंग, स्वभाव ई. सर्व ग्रहाशी येतो त्या ग्रहाचे वरीलप्रमाणे विचारात घ्यावे लागते.
काहीजण त्यांना मानवणारा अथवा आवडीचा नोकरी व्यवसाय निवडतात. त्यासाठी त्यांचा कल अथवा मानसिकता बघण्यासाठी लग्न स्थान व चंद्र रास यांचे देखील परीक्षण महत्वाचे ठरते.
पण बरेच जन असेही असतात, ज्यांची आवडनिवड वेगळी व ते काम करत असलेली क्षेत्र वेगळी असतात.
एखादा ग्रह कुंडलीमध्ये सर्वसाधारण पणे २, ६, १० व्या स्थानात किंवा त्या स्थानाचा अधिपती असल्याने अथवा अर्थ त्रिकोणात स्थित असलेल्या ग्रहाशी संबंधित असल्याने राशी दर्शित फळ दर्शवते. त्यात स्थित ग्रहांच्या वैशिष्ट्या प्रमाणे त्याचे नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रात बदल होऊ शकतो.
तसेच इतर स्थानांचे कारकत्व देखील विचारात घेणे महत्वाचे ठरते.
उदा. ५ वे स्थान खेळ, कला ई. गोष्टी दर्शवते. जरा ५ वे स्थानाचा संबंध अर्थ त्रिकोणाशी येत असेल तर तर तो क्रीडा शिक्षक अथवा कलेच्या क्षेत्रात आपली आमदानी प्राप्त करू शकतो.
येथे स्थूल मानाने राशी दर्शित काही नोकरी व्यवसाय देत आहे ज्यात राशी चा प्रमुख ग्रह व इतर ग्रहांच्या संयोगाने काही नोकरी व्यवसाय दर्शवले आहेत.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : नवांश व जातकाचे व्यक्तिमत्व
लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : कृष्णमुर्ती पंचांग व आपले नशीब आले ग्रहयोग
नमस्कार,
हिंदू ज्योतिषशास्त्रामध्ये वर्ग कुंडलीतील नवमांश कुंडली ही सूक्ष्म फळ कथनासाठी फार प्रचलित असून लग्न कुंडली नंतर अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही कुंडली वैवाहिक जीवन, जोडीदार, स्वभाव, स्वभाव, जोडीदाराचे चारित्र्य, वैवाहिक जीवनातील सुख-दुःख इत्यादींसाठी पाहिली जाते. ३०° ची राशी ३°२०’ च्या ९ भागांमध्ये विभागली जाते. पंचागात जे अवकहडा चक्राचे कोष्टक दिलेले असते. त्यात एका राशीत सव्वा दोन नक्षत्रे व ४ चरण दिलेले असतात. हे एक चरण म्हणजेच एक नवमांश असतो.
नवमांश रास व स्वामी ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे पंचागात जे अवकहडा चक्राचे कोष्टक मध्ये चरणाच्या आकड्याखाली मेष पासून मेष (मं), २ रे चरण खाली वृषभ (शुक्र), ३ रे चरण खाली मिथुन (बुध)…..अशा क्रमाने ओळीने लिहित गेले की तुम्हाला मेध राशीचे नवांश मिळतील. त्या नंतर वृषभ राशीचे चरण सुरु होतील. तिथे धनु राशी पर्यंत मेषेचे नवांश झाल्यामुळे मकर रास १ ले चरण खाली येईल, २ रे चरण खाली कुंभ रास येईल…..असे कुठेही राशींचा क्रम बदलू न देता लिहित जावे. या प्रमाणे मिथुन राशीचा पहिला नवांश तुळ रास येईल. कर्क राशीचा १ ला नवांश कर्क रास येईल.
यानंतर हा पूर्ण चार राशींचा नवांशाचा क्रम सिंह व धनु राशीपासून तोच म्हणजे मेष नवांशापासून सुरु होतो.
याचाच अर्थ निरीक्षण केले असता लक्षात येईल.
अग्नी तत्वाच्या राशी मेष, सिंह, धनु यांचे नवांश मेष पासून धनु पर्यंत असतात.
पृथ्वी तत्वाच्या राशी वृषभ, कन्या, मकर यांचे नवांश मकर पासून कन्या पर्यंत असतात.
वायू तत्वाच्या राशी मिथुन, तुळ, कुंभ यांचे नवांश तुळ पासून मिथुन पर्यंत असतात.
जल तत्वाच्या राशी कर्क, वृश्चिक, मीन यांचे नवांश कर्क पासून मीन पर्यंत असतात.
प्रत्येक कुंडलीचा स्वत:चा असा ढाचा असतो. जन्मकुंडली द्वारे बर्याच गोष्टींचा उलगडा होतो.पण काही गोष्टींत सूक्ष्म अवलोकनाची आवश्यकता असते. अशावेळी हि कुंडली अत्यंत उपयोगी सिद्ध होते. पराशर संहितेनुसार, ज्या व्यक्तीच्या जन्मकुंडली मध्ये आणि नवमांश कुंडलीमध्ये एखादा ग्रह एकाच राशीत येत असेल, तर त्यास वर्गोत्तम मानले जाते. एखादी रास व्यक्तीच्या जन्मकुंडली मध्ये आणि नवमांश कुंडलीमध्ये एकच येत असेल, तर त्यास वर्गोत्तम लग्न मानले जाते. तो जातक शारीरिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या निरोगी असतो. जन्म कुंडलीत एखादा ग्रह शक्तिहीन असेल आणि नवमांश कुंडलीमध्ये बलवान असेल तर तो शुभ परिणाम देतो, यावरून नवांश कुंडलीचे महत्त्व लक्षात येते.
या कुंडलीमध्ये
सूर्य वर्गोत्तम असेल तर, जातकास प्रतिष्ठा आणि मान-सन्मान मिळतो.
चंद्र वर्गोत्तम असेल तर, व्यक्ती सभ्य असते आणि चांगली स्मरणशक्ती दर्शवतो.
मंगळ वर्गोत्तम असेल तर, जातकास अतिउत्साह आणि नेतृत्व क्षमता प्रदान करतो.
बुध वर्गोत्तम असेल तर, जातकास बुद्धिमत्ता आणि तार्किक बनवतो.
गुरु वर्गोत्तम असेल तर, जातकास ज्ञानी आणि आदरणीय बनवतो.
शुक्र वर्गोत्तम असेल तर, जातकास सौंदर्य आणि कलाप्रेमी बनवतो.
शनि वर्गोत्तम असेल तर, जातकास न्यायी आणि चिंताहीन बनवतो.
जन्मकुंडलीत लग्न स्थानी कोणती रास असते, त्या राशीत नवांश काय असतात याप्रमाणे त्याचे व्यक्तीमत्व कसे असेल याचे स्थूल भविष्य कथन करता येऊ शकते. जन्मकुंडलीत लग्न स्थानी मेष ते मीन या प्रत्येक राशीमध्ये निरनिराळ्या नवांशाला निरनिराळी फळे मिळतात, त्याचे विवेचन पाहू..
१) मेष राशी
मेष नवांश : छोटे हात, छोटे नाक, मोठा आवाज, नशिबवान व वर्गोत्तम
वृषभ नवांश : सुबक बांधा, लांब नाक, हळुवार आवाज, धीमे बोलणे
मिथुन नवांश : उमदे व्यक्तीमत्व, आकर्षक डोळे, चतुर बोलणे, वयापरत्वे टक्कल पड़ते
कर्क नवांश : प्रवासाची आवड, जीवनऊर्जा कमी, दिसायला क्रूर व चंचल वृत्ती
सिंह नवांश : स्वाभीमानी, हत्तीसारखे छोटे डोळे, मजबूत हात-पाय, भाग्यशाली, उष्ण प्रकृती
कन्या नवांश : हरणासारखे डोके, हात लांब, बडबड्या स्वभावाचा, समाजामध्ये चमकणारा, जीवनशक्ती दुर्बल, चिकित्सक वृत्ती
तुळ नवांश : रुंद डोळे, निष्ठुर वृत्तीचा, बायको वादग्रस्त प्रवृत्तीची
वृक्षिक नवांश : बोलण्यात दुसऱ्याला गुंगवणारा, गुह्य रोगी, सहजपणे खोटे बोलणारा, शिकारी, माकडासारखे डोळे, बुटका, उष्ण प्रकृतीचा.
धनु नवांश : खेळाची आवड असणारा, दिलदार वृत्तीचा, प्रसन्न व्यक्तीमत्वाचा, फार बोलणारा, उंच शरीराचा
२) वृषभ रास
मकर नवांश : मध्यम उंचीचा, उत्तर आयुष्यात चिकाटीने यश संपादन करणारा, धनलोभी
कुंभ नवांश : आळशी, बडबड्या, अव्यवहारी.
मीन नवांश : भावनाविवश होणारा, धार्मिक, बऱ्यापैकी व्यक्तीमत्त्व
मेष नवांश : पोटाचे दुखणे असलेला, अभागी.
वृषभ नवांश : उंचावलेले नाक, लांब हात, उदार दृष्टीकोन असलेला, वर्गोत्तम
मिथुन नवांश : एकाच वेळेला दोन कामे करणारा, हसत-हसत बोलणारा, हुशार
कर्क नवांश : घरात रमणारा, नाक लांब, मुलांवर अपार प्रेम करणारा.
सिंह नवांश : प्रसन्न चेहऱ्याचा, बोलण्यात हुशार, सरकारी कामाशी संबंध
कन्या नवांश : व्यापारी, रागीट वृत्तीचा, अर्थहीन बोलणारा.
३) मिथुन रास
तुळ नवांश : धारदार नाक, सुंदर नेत्र, लांबसडक केस, आकर्षक व्यक्तीमत्त्व, बुद्धीवादी.
वृक्षिक नवाश : नाकामध्ये वक्रपणा, टापटीप रहाण्याची आवड नसलेला, कलहप्रिय, अभागी.
धनु नवांश : हुशार, सुदृढ शरीराचा, धुर्तपणे काम करुन घेणारा
मकर नवांश : व्यक्तीमत्वाचा ठसा उमटणारा, कामजीवनात रस घेणारा
कुंभ नवांश : चेहऱ्यावर बुद्धीमत्तेची झाक असलेला, फसवा चेहरा, मोठे डोळे.
मीन नवांश : अकारण बडबड करणारा, जुगारी वृत्तीचा, दंतरोगी.
मेष नवांश : संधीचे सोने करणारा, पराक्रमी.
वृषभ नवांश : गोडबोल्या, प्रामाणिक, उच्च शिक्षणाची आवड असणारा.
मिथुन नवांश : वर्गोत्तम असल्यामुळे बुद्धीवान, प्रणयी, चतुर, कवी, धनवान,
४) कर्क रास
कर्क नवांश : वर्गोत्तम, नशिबवान्, समाजप्रिय, तेजवान, विशिष्ट हेतूने जगणारा.
सिंह नवांश : स्वाभिमानी, उच्च शिक्षण, विद्वान असणारा.
कन्या नवांश : चतुर, आळशी, व्यापारी वृत्ती.
तुळ नवांश : सामाजिक कार्यात गुंतलेला, शक्तीवान, सामाजिक बांधिलकी पत्करणारा.
वृक्षिक नवांश : लांब बाहू, नोकरीत रमणारा, संकुचिक वृत्तीचा.
धनु नवांश : सुंदर दांत, गोड बोलून काम करुन घेणारा, लोभस व्यक्तीमत्त्वाचा.
मकर नवाश : रक्तवाहिन्या दृष्टोपत्तीस असणाऱ्या, वेडेवाकडे बोलणारा.
कुंभ नवांश : अकारण विचार करणारा, धंद्यापेक्षा नोकरीत गुंतणारा, संशोधक वृत्ती.
मीन नवांश : मत्स्य नयनी, स्वप्नील, भाग्यवान
५) सिंह रास
मेष नवांश : जिद्दी, मांसल शरीर, स्वाभिमानी, नशीबवान
वृषभ नवांश : आळशी, मोठे कपाळ असलेला
मिथुन नवांश : आवाजात विविधता, लांब हात, बडबड्या
कर्क नवांश : अस्थिर मन, दयाळू, लांब हात
सिंह नवांश : उच्चपदस्थ, धनिक, कर्तुत्ववान
कन्या नवांश : उमदे व्यक्तीमत्त्व, बोलण्याने छाप पाडणारा, धन संचय असणारा.
तूळ नवांश : स्वतंत्र विचाराचा, हटवादी वृत्तीचा, अस्थिर असणारा
वृश्चिक नवांश : सफाईदार वागणे बोलणे, भविष्य उज्ज्वल असणारा, राजकारणाची आवड
धनु नवांश : प्रभावी व्यक्तीमत्त्व, उदारमतवादी, मोठ्या वर्तुळात उठबस.
६) कन्या रास
मकर नवांश : नशिबाची साथ , दानधर्म करणारा, धनिक, प्रतिष्ठित.
कुंभ नवांश : आकर्षक डोळे, धीमे बोलणारा, अस्थिर मन.
मीन नवांश : दोषयुक्त बोलणे, विसराळू, स्वप्नील, भोळा
मेष नवांश : साहित्याची आवड जोपासणारा, कामुक
वृषभ नवांश : परावलंबीत्व, ऐशोआरामी, लांब केसयुक्त.
मिथुन नवांश : जुगारी वृत्ती, लहरी, सफाईदार बोलणे.
कर्क नवांश : पाण्याची भीती असणारा, मोहक व्यक्तीमत्त्व
सिंह नवाश : उमदे व आदरणीय व्यक्तीमत्व.
कन्या नवाश : व्यापारी, भिन्न लिंगी व्यक्तीत लोकप्रिय
(७) तुळ रास
तुळ नवांश : वर्गोत्तम, पैसेवाला, आकर्षक व सुंदर गोष्टीची आवड, उंची वस्तुंचा व्यापार
वृक्षिक नवांश : दुर्बल शरीर, विसरभोळेपणा, आतल्या गाठीचा
धनु नवांश : सुंदर दात, कर्तुत्ववान
मकर नवांश : लांब बाहू, भित्रा, चिकट, खोडकर
कुंभ नवांश : नाकात वक्रपणा, स्थिर वृत्ती, बौद्धिक कामाची आवड
मीन नवांश : वेदशास्त्र संपन्न असलेला, मोठ्या डोळ्यांचा.
मेष नवांश : मोठ प्रस्थ, हटवादी, हुशार
वृषभ नवांश : सुदृढ, भाग्यवान, व्यापारी वृत्ती
मिथुन नवांश : हुशार, मध्यस्थ, दलाल, उच्च शिक्षणाची आवड, मिस्कील.
८) वृश्चिक रास
कर्क नवांश : चांगले नशीब, राजकारणी, आकर्षक कपाळ व व्यक्तीमत्त्व
सिंह नवाश : जिद्दी, लोकांत मिसळणारा, उच्च जीवनऊर्जा, आर या पार वृत्ति
कन्या नवाश : किरकिरां स्वभाव, लेखनाची आवड, समीक्षक, कंजुष
तुळ नवांश : दुसऱ्याच्या चुका काढणारा, दुर्बल शरीर, कला-कौशल्याची आत्यंतिक आवड, ज्योतिषी.
वृक्षिक नवांश : वर्गोत्तम, साहसी, अतिरेकी भूमिका घेणारा, प्रसिध्दी मिळविणारा
धनु नवांश : दयाळू, साहसी, भाग्यवान
मकर नवांश : आतल्या बाजूला झुकलेले दात, चंचल वृत्ती, दुर्बल शरीर
कुंभ नवांश : बुद्धीवादी, निर्णयात दिरंगाई, मोठी नाकपुडी
मीन नवांश : दानशूर, प्रसिद्ध, लोकप्रिय, शांत स्वभावाचा.
९) धनु रास
मेष नवांश : स्पष्ट कल्पना देणारा, आकर्षक व्यक्तीमत्त्व, मोठे नाक
वृषभ नवांश : डोळ्यात फरक, ज्ञानी.
मिथुन नवांश : वेदशास्त्र पारंगत, भिन्नलिंगी व्यक्ती प्रती आदर
कर्क नवांश : हुशार, लांबसडक केसांचा, उठावदार व्यक्तीमत्त्व
सिंह नवांश : मोठा चेहरा, खेळकर स्वभाव, लोकप्रिय, दानशूर, सुदृढ, निश्चयी
कन्या नवांश : कला व साहित्याची आवड, मोठे कपाळ, उच्च राहणी.
तुळ नवांश : नशिबवान, उंच, मोठे डोळे, दयाळू स्वभाव, संगीताची आवड
वृक्षिक नवांश : अर्थहिन बोलणे, खुनशी, धोकादायक.
धनु नवांश : वर्गोत्तम, मोठ्या लोकांत उठबस, उद्योजक, मोजून-मापून बोलणे, औषधांची आवड
१०) मकर रास
मकर नवाश : प्रवास व संगीताची आवड, विनोदी स्वभाव, दातामध्ये फट, वर्गोत्तम
कुंभ नवांश : कामातुर, आळशी, रागीट, उत्तम शरीरयष्टी
मीन नवांश : चंचल वृत्ती, प्रवासाची आवड, कला कौशल्याची आवड, मित्र व नातेवाईकांत रमणारा
मेष नवांश : गोलाकार डोळे, विशाल कपाळ, मितभाषी.
वृषभ नवांश : व्यापारी वृत्ती, उठावदार व्यक्तीमत्त्व.
मिथून नवांश : कपड्यांची आवड, बोलण्यात चतुर, कामुक
कर्क नवांश : सुखासिन, व्यवसाय मग्न, शांतपणे निर्णय घेणारा.
सिंह नवांश : सुंदर नाक, उत्तम शरीरयष्टी, सपाट कपाळ, खोल डोळे
कन्या नवांश : व्यापारी वृत्ती, कलाकार, दयाळू, उच्च विचारसरणी, समाजप्रिय.
(११) कुंभ रास
तुळ नवांश : वेदशास्त्राची आवड, कामुक, प्रभावी व्यक्तीमत्व
वृश्चिक नवांश : त्वचा रोग, शांतवृत्ती, उंच, मंद बुद्धी.
धनु नवांश : काम जीवन बेताचे, पारंपारिक शास्त्राची आवड, हुशार
मकर नवांश : जोडीदाराशी प्रामाणिक, बौद्धिक कामात रस
कुंभ नवांश : वर्गोत्तम, निष्ठुर वृत्ती, अनेक शास्त्रांची आवड
मीन नवांश : प्रथम दर्शनी भीतीदायक वाटणारा, चलाख, कुरळे केस, शिकारी, राजकारणी.
मेष नवांश : जिद्दी, शांत डोक्याचा, निष्ठुर कामे करणारा
वृषभ नवांश : विशाल डोळे, व्यापारासाठी देश-परदेश हिंडणारा.
मिथुन नवाश : पूर्ण चंद्रासारखा चेहरा, भाग्यवान, संतती, राजकारणी, ताकदवान्
(१२) मीन रास
कर्क नवांश : छोटी मान, भिन्नलिंगी व्यक्तीशी जपून बोलणारा, सुंदर शरीर
सिंह नवांश : मांसल शरीर, जंगल दऱ्यात भटकंती, एकांतवासाची आवड, सुदृढ शरीर
कन्या नवांश : उच्च शिक्षण, दयाळू आळशी, शिक्षण क्षेत्राची आवड
तुळ नवांश : व्यसनी गुरुजनांबद्दल आदर, शांत डोक्याचा, गरुडासारखे नाक.
वृश्चिक नवांश : कामुक, माफक उंची, हटवादी.
धनु नवांश : मोठ्या लोकांचा सल्लागार, प्रतिष्ठित, विश्वासार्ह
मकर नवांश : स्वाभिमानी, दुसऱ्यांशी आदराने वागणारा, भटक्या.
कुंभ नवांश : अल्प संतती, दीर्घ बाहू, आळशी.
मीन नवांश : वर्गोत्तम, विशाल डोळे, मोठे नाक, चकाकते शरीर, तीव्र बुद्धीवान, विश्वासार्ह, नशिबवान
ज्यांची जन्मपत्रिका (म्हणजेच जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण) याबद्दल शंका असेल त्यांची पत्रिका कशी बघावयाची व त्यातील नेमकी पत्रिका कशी सुधारून (रेक्टीफिकेशन) घ्यायची हे ठरविण्यासाठी, तज्ज्ञ ज्योतिषी काही निकष लावतात, त्यामधील प्रमुख लग्न रास व त्याचा नवांश पाहून त्याचे व्यक्तीमत्वाप्रमाणे लग्नाचे नवांश ठरविणे सोपे जाते.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)