
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

अविवेकाची काजळी विवेक दीपाने दूर करण्याचा हा मंगल सण. या सणाला आपल्या शरीरावरीलच नाही तर मनावरील मालिन्य दूर करून मन लख्ख करूया खऱ्या मोत्यासारखे तेजस्वी होण्यासाठी…!
शुभदिपावली !!
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : कौटुंबिक सौख्य आणि रंग विचार
स्वैर अनुवाद : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : ज्यो. मुर्तीदेवी प्रजापत यांचा लेख
नमस्कार,
आपण आणि आपले कुटुंबीय हा एक जिव्हाळ्याचा व तेवढाच संवेदनशील विषय असतो. सर्वांचीच इच्छा असते की आपल्या घरात नांदा सौख्य भरे असेच वातावरण असावे. परंतु वास्तवात बरेच घरात याचे विपरीत वातावरण आढळून येते. घर एकच असते, पण एकाच घरात चार लोक रहात असतात. प्रत्येकाचे स्वभाव, आवड निवड भिन्न कारण प्रत्येकाची जन्मतारीख वेगवेगळी असते. चौघांच्या जन्माच्या वेळी घरातील घटकांचा प्रभाव वेगवेगळा असतो. प्रत्येकावर त्याच्या त्याच्या जन्मकालीन ग्रह स्थितीमुळे फरक असतो. आता एकाच घरात अशा विविधतेतून एकता साधायची म्हणजे तसे कठीणच. एखाद्या वसतिगृहात राहणार्या शांत स्वभावाच्या व्यक्तीला सतत चिडचिड करणारा रूममेट मिळाला तर त्याची काय अवस्था होईल? इथे रूम बदलू शकतो, घराचे काय? मग वास्तुशात्रीय उपाय, शांती, होम, हवन, मंत्र, तंत्र आदी उपाय सुचवले जातात. ते योग्यच आहेत. या मागे घराचे संतुलन साधले जाणे हाच उद्देश असतो.
असाच एक फरक पाडणारा घटक म्हणजे घराच्या भिंतीना दिलेला रंग, घरातील पडद्यांचे रंग. कारण जेथे आपला सहज वावर असतो, त्या वास्तूतील रंग प्राधान्य हा एक सर्वांवर मोठ परिणाम करणारा प्रमुख घटक आहे. रंगांचा ज्योतिष शास्त्रीय उपयातील वापर हा पूर्वापार चालत आला आहे. त्यामुळे एकाच्या आवडीची रंगसंगती त्याच्या तत्वास सुसंगत असते, पण त्याच घरातील विरुद्ध तत्वाच्या व्यक्तीस ती नुकसान देणारी ठरते. एक भाऊ भरपूर कमावतो आणि दुसरा बेरोजगार आढळून येतो. आणि त्यात एखादा भाऊ विवाहित असेल, तर अजूनच वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. एकाच घरात ही अवस्था. त्यामुळे स्वत:चे घराचे संतुलन साधण्यासाठी घरातील वा कपड्यांमधील रंगसंगती साधणे, हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. समान वा मित्रता दर्शक तत्वांची व्यक्ती घरात असतील, तर समस्या कमी उद्भवतील, पण अनावधानाने विरुद्ध तत्वाची रंगसंगती नकळत त्यांच्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव टाकू शकते. तुमच्या घटकानुसार रंग निवडा, आता सर्वांचे घटक सारखे असतील सोपे होईल, नाहीतर घरातील प्रत्येकाचे घटक तपासून त्यातील मित्र व सम श्रेणीतील ग्रह तत्वांचे रंग निवडल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. अन्यथा हा एक प्रकारचा वस्तू दोष वा परिणाम पुढील पिढ्यांवरही होऊ शकतो. पण आज प्रत्येक जन व्यक्तिगत उत्कर्षाच्या मागे लागला आहे. त्याला असल्या गोष्टी वाचण्यात, करण्यात काही स्वारस्य नाही आणि वेळ ही नाही. हे सगळे जुन्या पिढीचे विचार असून आधुनिकतेत याला काही महत्व नाही असे मानणारे वाढत चाललेत.
असो. मला या लेखाचा आशय आवडला व उपयुक्त वाटला म्हणून, माझ्या शब्दात आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न. पटले तर घ्या, अन्यथा द्या सोडून…
सर्वाना भरपूर कुटुंब सौख्य लाभो हीच या निमित्ताने सदिच्छा व देवास प्रार्थना.
शुभम भवतु I
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : चंद्र भ्रमणाचे गोचर प्रमाणे फळ
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : जातक वेध
नमस्कार,
माणसाला कायमच भविष्य या विषयाबद्दल उत्सुकता वाटत आलेली आहे. बहुतांश व्यक्ती किमान दिनमान, साप्ताहिक भविष्य वाचताना आढळून येतात. स्थूलमानाने भविष्य कथन करण्याच्या असंख्य पद्धती अगदी पूर्वीपासून चालत आल्या आहेत. त्यात नवनवीन संशोधनाची दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. जातक वेध या पुस्तकात अशीच एक पद्धत दिलेली आहे, ज्यात चंद्र भ्रमण हे गोचर प्रमाणे फळ देते. ज्यावरून जातक सध्या कशा प्रकारच्या परिस्थितीत आहे हे सांगता येते. दिनवर्ष पद्धतीवर आधारित ही भविष्य कथन पद्धत आहे.
दिनवर्ष पध्दतीमध्ये एक दिवस म्हणजे एक वर्ष समजून जन्मानंतर पुढील ६०- ७० दिवसांतील ग्रहांचे भ्रमण व त्यांचे एकमेकांशी योग किंवा लग्नबिंदू व दशमबिंदू बरोबर होणारे ग्रहांचे योग त्या त्या वर्षी शुभ किंवा अशुभ फले देतात. आपल्याला माहित आहेच की, चंद्र २७ दिवसांत एक भ्रमण पूर्ण करतो. म्हणजे दिनवर्ष पध्दतीमध्ये २७ वर्षाचा एक भ्रमण काळ (१२ राशींचा काळ) पूर्ण करतो. चंद्रास एक राशी पूर्ण करण्यास २७ महिने म्हणजेच सव्वा दोन वर्ष लागतात. म्हणून चंद्राला मूळ चंद्रापासून २७/२७ महिन्यांनी एकेका राशीतून पुढे सरकवले असता त्याचे हे भ्रमण गोचर भ्रमणाप्रमाणे फळ देते.
१) पहिला चंद्र (वर्षे २.२५ पर्यंत) – चांगली परिस्थिती, उत्तम मानसिक स्थिती, आहार, वगैरे
२) दुसरा चंद्र (वर्षे ४.५० पर्यंत)- खर्च.
३) तिसरा चंद्र (वर्षे ६.७५ पर्यंत)- धनलाभ.
४) चवथा चंद्र (वर्षे ९.०० पर्यंत)- अपघात व अनारोग्य,
५) पाचवा चंद्र (वर्षे ११.२५ पर्यंत)- दुःखी अवस्था.
६) सहावा चंद्र (वर्षे १३.५० पर्यंत)- शुभकार्य, मंगल वातावरण.
७) सातवा चंद्र (वर्षे १५.७५ पर्यंत)- मैत्री व अर्थलाभ.
८) आठवा चंद्र (वर्षे १८.०० पर्यंत)- त्रास व खर्च,
९) नववा चंद्र (वर्षे २०.२५ पर्यंत)- चिंता व भीति.
१०) दहावा चंद्र (वर्षे २२.५० पर्यंत)- अर्थलाभ सुव्यवस्था.
११) अकरावा चंद्र (वर्षे २४.७५ पर्यंत)- सुख, आर्थिक सुबत्ता.
१२) बारावा चंद्र (वर्षे २७.०० पर्यंत)- दुःख व तोटा.
हे फळ कसे मिळेल पाहण्याची पद्धत :
१. जातकाची सायन कुंडली बनवा.
२. भ्रमणा नुसार सध्या जन्म चंद्रापासून कितवा आहे ते पहा.
३. सायन जन्मकुंडलीतील लग्न स्थानापासून गोचर चंद्र कोणत्या स्थानात आहे ते पहा. त्या स्थानाने निर्देशित व्यक्तीचे संदर्भात ही घटना घडू शकेल.
उदा.
१. समजा एका जातकाचे वय आत्ता ४० वर्षे आहे.
२. जातकाचे सायन जन्म कुंडलीत तूळ लग्न आहे.
३. जातकाचे सायन जन्म कुंडलीत चंद्र तुळ राशीत आहे.
४. म्हणजेच ४० वर्षे वय वजा २७ वर्ष (एक भ्रमण) = १३ वर्षे
५. म्हणजेच भ्रमण चंद्र जन्म चंद्रापासून ६ वा आहे.
५. जातकाचे सायन जन्म कुंडलीत तूळ लग्न असल्याने लग्नापासून भ्रमण चंद्र ६ वे स्थानात आला आहे.
६. सहावा चंद्र – शुभकार्य, मंगल वातावरण हे फळ दाखवतो.
७. सहावे स्थान मामा निर्देशित करतो.
म्हणजे फळ असे सांगावे लागेल की, जातक ४० वर्षाचा असताना मामाचे घरी एखादे मंगल कार्य होईल.
समजा जातक ४३ वर्षाचा असताना भ्रमण चंद्र ७ वा येईल तेव्हा सातवा चंद्र मैत्री व अर्थलाभ हे फळ दाखवतो. ७ स्थान जोडीदार निर्देशित करतो.
तर जोडीदाराशी त्या सव्वादोन वर्षाच्या काळात मैत्रीपूर्ण सलोख्याचे संबंध असतील व अर्थ लाभ होईल असे फळ सांगावे लागेल.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)