
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947 / 9272114292
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
विषय : विंशोत्तरी दशावर्ष व्युत्पत्ती
लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : ज्योतिष तत्व दर्शन (१९४३)
मूळ लेखक : ज्यो.शंकरदादा शास्त्री (राज ज्योतिषी, ग्वाल्हेर)
नमस्कार,
विंशोत्तरी दशा हा वर्षानुवर्षे माझा अभ्यासाचा, अनुभवाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे या विषयावर कुठे काही लिहिलेले आहे का याच्या सतत शोधातच असतो. मराठी व इतर साहित्यात दशाफळांची भरभरून वर्णने लिहिलेली आढळतात. पण या पुरातन भविष्य कथन पद्धतीच्या व्युत्पत्तीविषयी मात्र लिखाण मात्र अगदी नाही म्हणण्या इतके आहे. असेच वाचत असताना अगदी पत्रावळ्या झालेले काही जीर्ण कागद (पुस्तक) माझ्या माझ्या हाती लागले.
आणि खजिना सापडल्याचा आनंद झाला. कारण त्यामध्ये मध्य पाराशारीतील एक संस्कृत श्लोक होता, जो विंशोत्तरी दशांची वर्षसंख्या कशी उत्पन्न झाली याचे वर्णन विषद करत होता. त्याचे विवेचन येथे देत आहे. ही मौलिक माहिती आपणास नक्की आवडेल.
आदित्यचंद्रकुजराहु सुरेशमंत्रीमंदज्ञकेतुभृगुजा नव कृत्तिका द्याः
तेनो नय सीन दया तट धन्य सेव्य सेना नरा दिनकरादि दशाब्द संख्या ॥ १ ॥
कादयोंकाष्ठावयोंका पाद्या पंच प्रकीर्तिर्ता, पादयोष्ठौतथा प्राज्ञः गणकैः बुद्धिमत्तरैः ॥२॥
याचे विश्लेषण सोबत तयार केलेल्या कोष्टकांमध्ये दिले आहे, ज्यात कंसात त्याचा दर्शक अंक दिला आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)ज्योतिर्विदया वाचस्पतीसंपर्क : 7058115947 / 9272114292(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947 / 9272114292
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : राशीचक्राचे अंश स्वरूप मालिका (वृषभ अंश स्वरूप)
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : सुलभ जातक
मुळ लेखक/आभार : ज्यो. विष्णू गोपाळ नवाथे
नमस्कार,
जसे आपल्या भारत देशात अनेक व्यासंगी, ज्ञानी व नामांकित ज्योतिषी होऊन गेले. तसेच पाश्चात्य देशांतही अनेक उत्तम ज्योतिष अभ्यासक होऊन गेले. आपल्या कडील जैमिनी ऋषींनी जशी ज्योतिष शास्त्रीय तत्वे गूढ भाषेत सूत्रबद्ध केली. तसे चारुबेल, सेफारिअल, राफेल या पाश्चात्य ज्योतिष अभ्यासकांची नावे डोळ्यासमोर येतात, ज्यांनी चित्र वर्णनात्मक भाषेत ३६० १६ व्या शतकामध्ये झालेल्या जोन आंग्ले या आंग्ल अभ्यासकाने केलेले अंश वर्णन राफेल याने “द फेसीस एन्ड डिग्रीज ऑफ झोडिआक” या पुस्तकात अंशाच्या राशीचक्रातील प्रत्येक अंशांची फळे लिहून ठेवली आहेत. “द डिग्री ऑफ झोडिआक सिम्बोलाईज्द” या पुस्तकात चारुबेल आणि सेफ़ारिअल यांनी १८९८ च्या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात राशीचक्रातील प्रत्येक अंशांची फळे लिहून ठेवली आहेत.
त्याचे रुपांतर पूर्वीचे नामांकित ज्योतिषी कै.विष्णू गोपाळ नवाथे यांनी त्यांचे १९२९ साली प्रकाशित झालेल्या सुलभ जातक या ग्रंथ मालिकेतील चतुर्थ खंडात दिलेले आहे. अर्थात त्या वर्णनांचा मतितार्थ हा प्रत्येक जन आपली तर्कबुद्धी प्रमाणे घेत असतो. त्यामुळे अर्थामध्ये मत मतांतरे असू शकतात.
प्रत्येक लग्नांश साधारण ४ मिनिटाने बदलतो. या पुस्तकात दिलेली अंश वर्णने व ज्यो. नवाथे यांनी केलेले रुपांतर पाश्चात्य पद्धतीची असल्याने ती सायन राशिना लागू होतात. त्यामुळे सायन कुंडलीनुसार फळे पडताळून पहावीत.
आज आपण राशिचक्रातील वृषभ मधील प्रत्येक अंशाचे स्वरूप पाहणार आहोत.
१. वृषभ अंश स्वरूप
अंश १ ला
राफेल : एक मनुष्य एका बैलास कत्तलखान्यात नेत आहे.
चारुबेल : एक हिऱ्यासारखी आकृति पण काळी दिसणारी.
सेफारिअल : एक आनंदी दिसणारी स्त्री, पोषाख नीटनेटका, हातात तलवार असून तिचे टोक जमिनीकडे आहे. उत्तराभिमुख उभी असून तिच्या मस्तकावर सूर्याचे किरण पडत आहेत.
अंश २ रा
राफेल : एक स्त्री घोड्याची शेपटी धरून उभी आहे.
चारुबेल : मनुष्याचे विशाल चित्र.
सेफारिअल : जमिनीवर पडलेला मरणोन्मुख मनुष्य. ढगात सूर्यास्त होत आहे.
अंश ३ रा
राफेल : एका नग्न अशा वृद्ध स्त्रीचे चित्र, जिने आपला डावा हात जननेंद्रियावर ठेवलेला आहे. चारुबेल: दुहेरी रेघांची फुली (क्रॉस ).
सेफारिअल : टोपल्यात पुष्कळशी द्राक्षे भरीत असलेली एक स्त्री. आजूबाजूला अशा पुष्कळ टोपल्या भरलेल्या आहेत.
अंश ४ था
राफेल : उजव्या हातात चाबूक घेतलेली स्त्री
चारुबेल : एक मेंढा एकटाच उभा असून तो पुढे चाललेल्या कळपातील मेंढीकडे पाहात आहे.
सेफारिअल : एक संतापलेला सिंह. हाताखाली जळता कोलीत ठेवलेला आहे व त्याच्यावर नाराज आहे.
अंश ५ वा
राफेल : एक फार मोठ्या कढईत बसलेला पोळ.
चारुबेल : मोठ्या सरोवरात एक लहानशी नाव दोन पुरुष बसून चालवत आहेत.
सेफारिअल : एक दयार्द्र चर्येचा पुरुष एका लहानशा झोपडीजवळ उभा आहे व लाकडे तोडत आहे. त्याच्या सभोवती फळानी परिपूर्ण अशा बागा आहेत व जवळच एक शेळी चरत आहे.
अंश ६ वा
राफेल : ज्याला तीन डोकी आहेत, असा पुरुष आपला हात जमिनीकडे दाखवीत आहे.
चारुबेल : लंबवर्तुळात उभा राहिलेला पुरुष.
सेफारिअल : एक तरुण उच्चासनावर उभा आहे. उजव्या हातात कागदाचा गुंडाळी व डोक्यावर पुष्पमाळा आहेत.
अंश ७ वा
राफेल : देखणी तरुण स्त्री नग्न उभी आहे.
चारुबेल : भयावह देखावा. एक नग्न पुरुष एका तुळईला उलटा बांधला असून हातपाय छिन्नविच्छिन्न झाले असून शरीरातून रक्त वाहत आहे.
सेफारिअल : एका कुटुंबाची आवडती अशी गाय, एका बागेत दोन झाडाच्या सावलीत चरत आहे.
अंश ८ वा.
राफेल : एका लहानशा स्टुलवर बसलेली दुःखी स्त्री.
चारुबेल : जमिनीवर दोन तलवारी क्रॉस करून पडल्या आहेत व त्याच्यावर एक पुरुष पाय देऊन उभा आहे व त्याच्या राजदंडाचे शिर आकाशाकडे आहे.
सेफारिअल : फाटकी वस्त्र घातलेला एक गरीब म्हातारा मनुष्य नदीच्या किनाऱ्यावर उभा असून नदीत वाहत जाणारे गवत ई. काढत आहे.
अंश ९ वा
राफेल : शेतात मेंढ्या आणि शेळ्या चरण्यासाठी हातात चाबूक घेतलेला पुरुष.
चारुबेल : काळ्या भोर आकाशात किशोर चंद्र (शुद्ध द्वितीयेचा)
सेफारिअल : आसपास पारवे घेऊन चालत असलेला बलदंड शरीराचा पुरुष. ज्याच्या भोवती आणखी पारवे गोळा होत आहेत.
अंश १० वा
राफेल : दोन पुरुष उभे असून त्यांच्यामध्ये एक कुत्रे खेळत आहे.
चारुबेल : पाणचक्कीवर चालणारी धान्य दळण्याची गिरणी.
सेफारिअल : उन्हात झोपी गेलेला बैल. त्याच्या पाठीवर दोन पक्षी बसले आहेत.
अंश ११
राफेल : जमिनीवर उभा असलेला कावळा आपली पिसे चोचीने उपटून काढीत आहे.
चारुबेल : लेखणीने काढलेला एक फराटा.
सेफारिअल : हातात राजदंड, शिरावर मुकुट असा सिंहासनावर बसलेला व आसपास सांपत्तिक चिन्हे असलेला पुरुष
अंश १२ वा
राफेल : दोन स्त्रिया हातात हात घालून उभ्या आहेत.
चारुबेल : एक काटेरी दात्याचे औत, ज्याचा शेतीकडे उपयोग होतो व ज्यात चार काटे आहेत. सेफारिअल : गहिऱ्या नारंगी रंगाचे फूल, ज्यावर दोन फुलपाखरे बसून पंख फडफडत आहेत.
अंश १३ वा
राफेल : दोन स्त्रिया हातात काठ्या घेऊन एकमेकींना मारीत आहेत.
चारुबेल : जहाजाच्या साखळीला बांधलेला नाही असा एक नांगर, ज्याचे आकडे खडकावर मजबूत रुतलेले आहेत व त्याची दोरी तुटलेली आहे.
सेफारिअल : दोन कुत्रे धावत आहेत; एक हाड नेत आहे व दुसरा त्याच्या पाठीस लागला आहे.
अंश १४ वा
राफेल : हातात मोठी काठी घेतलेला पुरुष
चारुबेल : एका काठीवर लावलेला काळा पडदा.
सेफारिअल : एका टेबलावर एक काटकोन व एक रंधा अशा दोन वस्तू ठेवलेल्या आहेत.
अंश १५ वा
राफेल : हवेत उडणारे ७ पक्षी.
चारुबेल : शेवाळलेले दगड असलेली एक विहीर असून तिच्या तोंडावर लहान लहान काटेरी झुडपे आहेत. पाणी स्वच्छ व गार, आसपासचा प्रदेश रुक्ष आहे.
सेफारिअल : एक आदरणीय असा मनुष्य अंधुक उजेडात बसलेला आहे. आसपास पुष्कळ पुस्तके व शास्त्रीय उपकरणे (कंपास वगैरे) पडलेली आहेत.
अंश १६ वा
राफेल : एका गाढवावर बसलेला पुरुष.
चारुबेल : दोन लघु कोनाचे समभुज त्रिकोण, ज्यांचे पाये एका खांबाला बसविलेले असून ज्यांची टोंके डाव्या बाजूस रोखलेली आहेत.
सेफारिअल : जंगलात उभ्या असलेल्या दोन शुभ्र वर्णाच्या गाई, त्यांच्यामागे एक वाघ उडी मारण्यासाठी सज्ज आहे.
अंश १७ वा
राफेल : झाडाला बांधलेला एक मोठा पोळ.
चारुबेल : एका उंच पर्वताच्या पायथ्याशी असलेली झोपडी. तिच्या वरच्या बाजूस खडकाचे मोठाले तुकडे पुढे आले आहेत. ती झोपडी कधीही पडेल अशा स्थितीत दिसत आहे.
सेफारिअल : नदीत प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा मनुष्य ज्याला पुढे जाववत नाही.
अंश १८ वा
राफेल : एकमेकांशी भांडणारे दोन पोळ.
चारुबेल : गाढवाला मारीत असलेला पुरुष.
सेफारिअल : एकमेकांशी भांडत असलेले दोन पोळ.
अंश १९ वा
राफेल : एका भांड्यातून दुसऱ्या मांड्यात पाणी ओतणारी स्त्री
चारुबेल : पश्चिम आकाशावर असलेला मोठा तारा. ज्याचा आकार चंद्राच्या अर्धा, तेजःपुंज, उपाची किरणे एकवटलेली आहेत व आसपासचे आकाश काळे आहे.
सेफारिअल : तलम व वजनाने हलका पोषाख केलेली स्त्री, जिच्या आसपास जांभळी फुले असून ती शेतात लोळत आहे.
अंश २० वा
राफेल : भांडत असलेले दोन कुत्रे.
चारुबेल : अति उंच अशा पर्वताच्या शिखरावर रोवलेला झेंडा. त्याचा दांडा फार उंच आहे. सेफारिअल : एक कावळा पाण्याच्या घागरीवर बसला आहे.
अंश २१ वा
राफेल : मागे खोल ठिकाणी पहात असलेला अस्वल.
चारुबेल : एका शेतातून दुसऱ्या शेतात जाण्यासाठी लाकडी पायऱ्यांची गव्हाण.
सेफारिअल : एका झाडाच्या खांदीला विळखा घातलेला साप असून त्याला एक घुबड पाहत आहे.
अंश २२ वा
राफेल : तीन पुरुष एकमेकांचे हात धरून उभे आहेत.
चारुबेल : एक कात्री.
सेफारिअल : अतिशय गवताळ जमिनीवर असलेला वृक्ष. त्याच्या सभोवती मधमाशा आहेत.
अंश २३ वा
राफेल : मागच्या बाजूस पडत असलेला पुरुष.
चारुबेल : धातू वितळविण्याची भट्टी.
सेफारिअल : सिंहासनावर बसलेला राजा, त्याच्यामागे काळ्या वस्त्रात झाकलेला पुतळा.
अंश २४ वा
राफेल : काठी धरून उभा असलेला वाकडा मनुष्य.
चारुबेल : मी पृथ्वीपासून वर गेलो आहे, क्षितिजातून सूर्य वर येत आहे, परंतु ज्या गोलार्धांकडे तो येत आहे तिकडे अजून अंधार आहे.
सेफारिअल : सुकून गेलेल्या नदीचे पात्र, ज्यात कावळे काही वेचून खात आहेत.
अंश २५ वा
राफेल : हातात काठी घेऊन सरळ उभा असलेला मनुष्य.
चारुबेल : काळा परंतु पुढे चालत असलेला असा एक लोट आकाशात उंच दिसत आहे.
सेफारिअल : उच्च जागेवर उभा असलेला सुदृढ सिंह.
अंश २६ वा.
राफेल : जो आपले हात दाखवीत आहे, असा उभा असलेला पुरुष.
चारुबेल : एक हत्ती.
सेफारिअल : एक सुंदर स्त्री आपल्या हातात मूल घेऊन त्याला मार्ग दाखवीत आहे व वाटेत फुले वेचत आहे.
अंश २७ वा.
राफेल : ज्याची कापणी झाली नाही असे गव्हाचे किंवा दुसऱ्या एखाद्या धान्याचे शेत.
चारुबेल : पृथ्वीच्या काही भागावरून चालत असलेला एक काळा मेघ ज्याचे विचित्र आकार होऊन ते उदासवाणे दिसताहेत.
सेफारिअल : किमयागार आपल्या प्रयोगशाळेत काम करीत आहे व समोर टेबलावर पुष्कळ सोने ठेवले आहे.
अंश २८ वा
राफेल : घोड्याचा लगाम धरून नेत असलेली स्त्री.
चारुबेल : लांबच लांब असा एक सरळ रस्ता.
सेफारिअल : एका सरळ दांड्यावर चढत असलेला पुरुष. तो दांडा उंच ठिकाणी लावलेला आहे.
अंश २९ वा
राफेल : लगाम घातलेल्या गाढवाला धरून नेत असलेली स्त्री. एका बकऱ्याला दोन्ही शिंगे धरून नेत असलेली स्त्री
चारुबेल : एक क्रॉस.
सेफारिअल : ज्याच्या उजव्या हातात चाबूक आहे असा शक्तिमान् पुरुष दोन गुलामांना कोंडवाड्यात नेत आहे.
अंश ३० वा
राफेल : एक सुंदर इमारत.
चारुबेल : अतिशय खवळलेला समुद्र. त्यात एक जहाज फुटले आहे, प्राणरक्षक होडी पाठविलेली आहे. अखेरीस सर्व लोक वाचवले गेले आहेत.
सेफारिअल : उंची वस्त्रे परिधान केलेला व भोवती चाकर माणसे व आश्रित आहेत, असा एका कोंचाला टेकून उभा असलेला काळा पुरुष.
वृषभ अंशफल सार
१ भांडखोर वृत्ति, शत्रू पुष्कळ, झगडण्यात यश व तीव्र इच्छाशक्तीचा.
२ सर्व परिश्रम फुकट जातील व स्वतःचा नाश करून घेईल.
३ आयुष्याच्या उत्तर भागात सुख.
४ भांडखोर स्वभावामुळे सर्वत्र फाटाफूट होईल व त्याचा राग त्याच्याच नाशास कारण होईल.
५ समाधानी व मर्यादित महत्त्वाकांक्षा असलेला.
६ आपल्या बुद्धिसामर्थ्याने मोठी कामे तडीस नेणारा.
७ साहजिक सुखे भोगणारा,
८ देवावर विश्वास ठेवणारा, दुर्बल व सर्वस्व घालवणारा.
९ हा अंश विशेष चांगला नाही. गृहप्रपंचात विशेष लक्ष घालणारा; चारुबेलच्या मते दुःखी आयुष्य.
१० चारुबेलच्या मते बुद्धिवान्, गणितज्ज्ञ व निरनिराळ्या गोष्टीत प्रावीण्य मिळवणारा.
११ मोठा महत्त्वाकांक्षी. गरिबीतून नशीब काढणारा.
१२ श्रम करून मिळवणारा व आहे त्यात समाधानी.
१३ हा अंश फार वाईट गुणाचा आहे. अनेक संकटे येतील.
१४ या अंशांत अनेक चांगले गुण भरलेले आहेत. न्यायी व मनाचा उदार. तपस्वी व गूढशास्त्राभ्यासी.
१५ सृष्टीतील गूढे उकळणारा व आश्चर्यकारक बुद्धिमत्ता.
१६ हलगर्जीपणाने नुकसान पावणारा व अप्रसिद्ध.
१७ सेफारिअल म्हणतो व्यर्थ श्रम करणारा मनुष्य होतो.
१८ हा अंश वाईट गुणांचा आहे. गुन्हेगार, भांडखोर व ज्याला पुष्कळ शत्रु.
१९ नेहमी निराश.
२० द्वेषी; चारुबेलच्या मते हलक्या स्थितीतून मोठ्या पदाला चढेल.
२१ या अंशात बुद्धिमत्ता, शास्त्रप्रेम व शांतवृत्ति आहे.
२२ कारागीर, हस्तकुशल व उद्योगी.
२३ आत्मिक बलाचा परंतु सामर्थ्याच्या बाहेर धडपडणारा.
२४ चारुबेलच्या मते अलौकिक मनुष्य असेल.
२५ गर्विष्ठपणामुळे शेवटी नाश.
२६ सज्जन, प्रेमळ व गृहसौख्य मोगणारा.
२७ उद्योगी, काटकसरी, साधी राहणी व प्रत्येक कामात यश.
२८ आयुष्यात महत्त्वाच्या गोष्टी घडून येणार नाहीत. निरुपयोगी गोष्टींच्या पाठीस लागून व्यर्थ श्रम करील व अप्राप्य गोष्टींची महत्त्वाकांक्षा धरील.
२९ हा अंश चांगला नाही. सत्तेचा दुरुपयोग करील.
३० रंगेलपणामुळे आपत्ति ओढवेल.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947 / 9272114292
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947 / 9272114292
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)