Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

दत्त जयंती च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏


दत्त सुंदर नाही, दत्त सुंदरता आहे…
दत्त एकटाच नाही, दत्त एकरूपता आहे…
दत्त सत्य नाही, दत्त सत्यता आहे…
दत्त मार्ग नाही, दत्त मार्गदर्शक आहे…
दत्त प्रेमळ नाही, दत्त प्रेम आहे…
दत्त व्यापक नाही, दत्त व्यापकता आहे…
दत्त विश्व नाही, दत्त विश्वात्मक आहे…
दत्त साधारण नाही, दत्त साधा आहे…
दत्त सूर्य नाही, दत्त तेज आहे…
दत्त चंद्र नाही, दत्त शितलता आहे…
दत्त मानण्याचा नाही, दत्त जाणण्याचा विषय आहे…
दत्त मन नाही, दत्त आत्मा आहे…
दत्त आत्मा म्हणजेच माझा सद्गुरू आहे !

|| श्री गुरुदेव दत्ता ||
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

|| श्री स्वामी समर्थ ||

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष स्नेह संमेलन (तृतीय)


नमस्कार,
अनिरुध्द नक्षत्र ज्योतिष संस्थेचे हे तिसरे स्नेह संमेलन मागील वर्षीच्या अत्यंत नीट नेटक्या व यशस्वी स्नेह संमेलनाचा अनुभव पाठीशी घेऊन परत एकदा उत्साहाने व आपुलकीने आपल्या सर्वांसाठी
रविवार दि. ५ जानेवारी, २०२५ रोजी
सकाळी १० ते दुपारी ३ वा. पर्यंत
राधाकृष्ण बँक्वेट हॉल बोरिवली येथे आयोजित करण्यात आले आहे.

या संमेलनाची वैशिष्ट्ये :

🚩आपल्या माणसांचे आपल्यासाठीच असलेले आपुलकीचे संमेलन

🚩प्रमुख पाहुणे मान्यवर ज्यो. अजय पाठक सर, ज्यो. सतीश नाईक सर ज्यो. अनिल महामुनी सर यांचे बहुमूल्य विचार व मार्गदर्शन

🚩ज्योतिषी व नवीन अभ्यासकांना व्यासपीठावर बोलण्याची संधी

🚩एकमेकांच्या ज्ञानाची, विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी योग्य मंच

🚩उपस्थित सदस्यांना एक संस्मरणीय स्मृतिचिन्ह भेट

🚩स्नेह भोजनाची व्यवस्था

🚩माफक नोंदणी शुल्क रु. २५००/- प्रती व्यक्ती

🚩प्रायोजक, जाहिरातदार, स्टॉल धारक यांना आपले उत्पादन योग्य समुहापर्यंत पोहोचण्याची उत्तम संधी

आणि बरेच काही… याल तर समक्ष अनुभवाल…

मर्यादित नोंदणी नोंदणी व जाहिरात, स्टॉल, प्रायोजकत्व, बॅनर ई. साठी त्वरित संपर्क करा.

संपर्क व जी पे क्र.:
सौ. समीक्षा दारवलिकर ९८२१२५२५५६

डॉ. सौ. समीक्षा दारवलिकर (संस्थापक अध्यक्ष)

डॉ. हेमंत उपासनी (कार्यवाह)

ज्योतिष मित्र मिलिंद (कार्यवाह)

आनंदादि योग व त्याची फळे


विषय : आनंदादि योग व त्याची फळे

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : दाते पंचांग व स्व अभ्यास

नमस्कार,

एखादे काम करताना आपल्याला काम होईल का नाही अशी खातरजमा करायची असते. परंतु दरवेळेस आपण कुंडली अथवा पंचांग काढून बघू शकत नाही. अशावेळेस तातडीच्या कामास सुरुवात करण्यापूर्वी आनंदादि योग, गोरक्ष मते, माहेंद्र, शिवलिखित, होरा यापैकी नेहमीचे वापरातील कोष्टक पूर्वीचे लोक पहात असत. यापैकी आनंदादि योग याची माहिती आज आपण घेणार आहोत.

चंद्र आणि सूर्याच्या राष्यांतराच्या आधारे जसे विष्कुंभ इत्यादि २७ योग हे तयार होतात, त्या पेक्षा भिन्न योग हे अभिजित नक्षत्रासह २८ नक्षत्र आणि ७ वार एकत्रित केल्याने २८ आनंदादि योग तयार होतात.

पहिले नक्षत्र अश्विनी पहिल्या दिवशी म्हणजे रविवारच्या यांच्या संयोगाने आनंद  योग तयार होतो. म्हणजेच अश्विनी नक्षत्र हे रविवारी येत असेल, तर त्या दिवशी आनंदयोग असेल.

या योगांचे कोष्टक तयार करण्याची पद्धत :

रविवार आणि अश्विनी नक्षत्र या संयोगानंतर ओळीने सर्व नक्षत्र व एकूण २८ योग येतात. जे आपल्याला त्या दिवसाची शुभ अशुभतेची कल्पना देतात.

यानंतर सोमवारी अश्विनी नक्षत्रा पासून ५ वे नक्षत्र मृग येते. मृग नक्षत्र व सोमवार मिळून सोमवारी १ ला योग आनंद योग तयार होतो.

या प्रमाणे

सोमवार + मृग नक्षत्र

मंगळवार + आश्लेषा नक्षत्र

बुधवार + हस्त नक्षत्र

गुरुवार + अनुराधा नक्षत्र

शुक्रवार + उत्तराषाढा नक्षत्र

शनिवार + शततारका

असे ७ वार आणि सात नक्षत्र एकत्र करून आनंद योग तयार होतो.

याच प्रमाणे रविवार आणि दुसरे नक्षत्र भरणी मिळून काल योग तयार होतो. यानंतर सोमवार +  आर्द्रा, मंगळवार + मघा, बुधवार + चित्रा, गुरुवार + ज्येष्ठा,  शुक्रवार + अभिजित आणि शनिवार + पूर्वा भाद्रपदा यांच्या संयोगाने काल योग तयार होतो.

याच क्रमाने उर्वरित २८ योग तयार होतात, त्याबद्दल जाणावे.

आनंदादि योग हा सकाळच्या नक्षत्रावर आधारित आहे, त्यामुळे तोच योग दिवसभर मानला जातो, तर इतर योग वेळेवर आधारित असतात.

सोयीसाठी नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने तयार होणारे योग यांचे कोष्टक फळा सहित दिले आहे.

१. आनंद, प्रजाप, सौम्य, श्रीवत्स, छत्र, मित्र, मानस, पदम, सिद्धी, शुभ, अमृत, मातंग, स्थिर आणि वृद्धि योग हे नेहमीच शुभ असतात.

२. काल, उत्पात, मृत्यू आणि राक्षस योगात सुरू केलेले कार्य अडथळे निर्माण होऊन अपूर्ण राहते.

इष्ट वाराच्या दिवशी नक्षत्र समाप्ति वेळ पंचांगात पहावी. त्यावेळेपर्यंत त्या फळाची मर्यादा असते.

याप्रमाणे योग फळाच्या नावानुसार प्रत्येक योगाची इष्ट अनिष्ट फळे जाणावी.

शुभं भवतु !!!

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)