ज्योतिष-अभ्यासकाच्या नजरेतुन”
आयुष्य म्हटले की अनेक चढ-उतार, संधी व संकटे, खाच-खळ्गे, नफ़ा-तोटा, आशा-निराशा, सुख-दु:ख या आणी अशा अनेक अनुभवातुन जावेच लागते. आणी यातुनच अनेक प्रकारच्या गुंतागुंत, शंका, गोंधळ मनात आकार घेत असतात. या जगात वावरताना कोणत्या ना कोणत्या वळणावर माणसाच्या मनात काही प्रश्न हे डोकावतातच. हे असे माझ्या बाबतीतच का? कसे होणार माझे? पुढे काय होणार? हे सर्व बदलणार आहे की नाही?
जेव्हा योजना, तर्क, प्रयत्न, अन्दाज या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकत नाही तेव्हा माणसाला कोणाचा तरी सल्ला घ्यावासा वाटू लागतो. माणसाला स्वत:च्या भविष्यातील घटनेचा आधिच मागोवा घेण्याची नेहमीच उत्सुकता वाटत आली आहे. आणि मग यातुनच तो तांत्रिक, मांत्रिक, गुरुजी, सिद्ध पुरुष, ज्योतिषी यांचेकडे धाव घेतो. अर्थात हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा, विश्वासाचा भाग आहे.
श्रद्धा ही जरुर असावी, पण ती अंध नसावी. विश्वास हा नेह्मी डोळ्स असावा. तो तर्क, अनुभव, अभ्यास या सर्वांच्या कसोटीवर पारखुन घेतलेला असावा. जिथे भोळेपणा, अंधश्रद्धा, अंधविश्वास असतो, तिथे बुवाबाजी, ठगबाजी, अघोरीपणा याला ऊत येतो आणी आपणच आपल्या विनाशाला कारणीभूत होतो. श्रद्धा जर योग्य टिकाणी, योग्य प्रकारे जोपासली तर नक्कीच त्याचा सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी व आयुष्याला दिशा देण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो.
आपली श्रद्धा एवढी स्वस्त ही नसावी कि कोणी कर्मकांड, वेगवेगळे चमत्कार सद्रुश्य हातचलाखी करुन दाखवली की त्यास महानत्व बहाल करावे. आपणच अवास्तव कल्पना मनात ठेऊन गेलो की, योगी चमत्कार करुन आपल्याला सुखी, श्रीमंत बनवेल, मुलीचे लग्न लगेच जमेल, मुलाला लट्ठ पगाराची नोकरी लगेल वगैरे वगैरे. तर एक निश्चित समजा की तुमच्या अडचणी हुन त्यावरचे उपाय तुम्हाला महागात जातील. गुरुजी, सिद्ध पुरुष, ज्योतिषी कोणीही असो तो एक मार्गदर्शक म्हणुनच त्याचेकडे पाहणे योग्य ठरेल. जेवढे आवश्यक तेवढेच जाणुन घेऊन कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची आपली मानसिकता भक्क्म कशी करता येईल हे पाहणे आवश्यक आहे.
हे सर्व मांडायचे कारण एवढेच की मी ही एक रोजची कसरत करणारा एक सर्वसामान्य माणुस आहे. मलाही २००९ साली असेच काही प्रश्न मनात निर्माण झाले आणी ज्योतीष अभ्यासाकडे वळालो. आणी अभ्यास करत असताना ज्योतीष अभ्यासातील दिग्गज लोकांची मत मतांतरे, विरोधाभास, मी म्हणतो तसे घडणारच असे छातीठोक दावे पाहून कालचा गोंधळ बरा होता अशी माझी अवस्था झाली. हा प्रवास करत असताना आपल्याशी हितगुज करावे, यासाठी हा खटाटोप : “ज्योतिष अभ्यासकाच्या नजरेतुन”
-ज्योतिषमित्रमिलिंद