Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थेचे (मुंबई) वार्षिक स्नेहसंमेलन (तृतीय)


(इतर सर्व फोटो पीडीएफ साठी download क्लिक करा)

अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थेचे (मुंबई) वार्षिक स्नेहसंमेलन (तृतीय)

सालाबादाप्रमाणे या वर्षी रविवार दि.०५ जानेवारी २०२५ रोजी अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष (मुंबई) या आएसओ प्रमाणित संस्थेचे राधा कृष्ण बँक़्विट, बोरीवली येथे आयोजित करण्यात आला होता.
नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट नियोजन आणि त्या नुसार सर्व व्यवस्था असल्यामुळे एक अतिशय उत्कृष्ट, संस्मरणीय कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

या कार्यक्रमाचे व्यासपीठ ज्यो. अजिंक्य नलोले, ज्यो. अनिल महामुनी गुरुजी, ज्यो. अजय पाठक, ज्यो. सतीश नाईक सर या मान्यवरांनी भूषविले. तसेच अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष ज्योतिष संस्थेच्या संचालिका डॉ. समीक्षा दारवलिकर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. तांत्रिक व इतर व्यवस्थापन संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत उपासनी, डॉ. ज्योतिष मित्र मिलिंद आणि सल्लागार श्री दीपक पाटील यांनी पहिले.

मान्यवरांचे विविध विषयांवरील मार्गदर्शन संमेलनाची शोभा वाढवणारे ठरले.
तसेच नवोदित ज्योतिषी यांचे विचार मांडण्याची मिळालेली संधी गोष्टी हम भी कुछ कम नाही हे सर्वांना दाखवून देणारे होते.
तसेच या समारंभासाठी बडोदा, बंगलोर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई अशा विविध कानाकोपऱ्यातून सर्वजन आवर्जून संमेलनास आले होते.

बाहेरगावाहून बरेचसे ज्योतिषी आले असल्यामुळे सकाळी १०३० वाजता गरमागरम नाश्ता व चहापान आयोजित केले होते.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यो. अजिंक्य नलोले तसेच ज्यो. अनिल महामुनी गुरुजी, ज्यो. अजय पाठक, ज्यो. सतीश नाईक सर व सामिक्षाताई या मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून प्रमुख कार्यक्रमास सुरुवात झाली. मा. अध्यक्षांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केल्यानंतर यांचे बहुमुल्य ज्योतिष मार्गदशन सर्वांना ज्योतिषाची वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी ठरले. त्यानंतर पहिल्या व दुसर्या सत्रात ज्यो. संतोष आंबवले, डॉ. हेमंत उपासनी, डॉ. ज्योतिष मित्र मिलिंद, डॉ.सौ. भारती खटावकर, ज्यो. मोरेश्वर मराठे, सुहास समुद्रे काका, ज्यो. अनंत आठल्ये, दीपक पाटील ई. ची त्यांच्या अभ्यासातून व अनुभवाने समृद्ध अशी विविध विषयांवरील मौलिक मार्गदर्शन सत्रे झाली.
दुसरे सत्रात डॉ.सौ. भारती खटावकर लिखित आराधना या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सर्वांना स्मृतीचिन्हे, पुस्तक, पंचांग, ई. देऊन कौतुक करण्यात आले.
दोन सत्रांच्या मध्ये उत्कृष प्रीती भोजनाची चोख व्यवस्था होती. व त्यानंतर चहापान झाल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये म्हणजे डॉ. सौ. समीक्षा दारवलिकर यांनी अथक प्रयत्नामुळे व यशस्वी व उत्कृष्ट नियोजन. त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच. तसेच या स्नेह संमेलनामुळे. सर्वांना मान्यवरांच्या अनुभवातून ज्योतिष अभ्यासास नविन दिशा व प्रेरणा मिळाली. सर्वजण एकत्र येऊन ओळख झाली व एकमेकांच्या विचारांचे आदान प्रदान करण्यास एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध झाले.
असा हा सोहळा नीटनेटका, हसत खेळत ज्योतिष ज्ञान देणारा एक संस्मरणीय सोहळा ठरला.

जय ज्योतिष 🚩

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)

संमेलनात जुळ्या मुलांच्या कुंडलीबाबत मार्गदर्शन करताना
डॉ.भारती खटावकर यांचे आराधना या पुस्तकाचे प्रकाशन करताना
स्नेह संमेलनातील भेटीगाठींचे क्षण

इतर सर्व फोटो पीडीएफ साठी download क्लिक करा