D-60 (षष्ठ्यांश) कुंडलीतील ६० देवता


विषय : D-60 (षष्ठ्यांश) कुंडलीतील ६० देवता
संदर्भ : जातक पारिजात व इतर संदर्भ पुस्तके
लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)

नमस्कार,
प्रत्येकाचे आयुष्य हे खरेतर एक कोडे आहे. प्रत्येकाला क्काही णा काही प्रश्न पडलेले असतात, समस्या असतात. प्रत्येक जन आपापल्या परीने त्या कोड्याची उकल करण्याचा प्रयत्न करत असतो.
बरेच वेळा आपल्या आजूबाजूला असे प्रसंग आपल्या कानावर पडत असतात की, माझे शिक्षण, अनुभव, काम चांगले आहे, पण तरीसुद्धा अपेक्षित प्रगती मात्र आयुष्यात होत असताना दिसत नाही. किंवा मी कोणतेही व्यसन करत नाही, चुकीचे काही करत नाही, आणि अमुक अमुक व्यक्ती व्यसनी आहे, दुराचारी आहे, त्याची मात्र भरमसाठ प्रगती होत आहे. मग माझ्याच बाबतीत असे का?
ज्योतिष शास्त्र या साठी प्रभावी मार्गदर्शन करते. बहुतांशी वेळा जन्म कुंडली व इतर कुंडल्या त्याचे कारण शोधायला उपयुक्त ठरतात. पण काही विशिष्ट जातकाच्या बाबतीत ज्योतिषी सुद्धा निष्कर्षावर येताना गोंधळात पडतो. कुंडलीतील स्थिती चांगली दिसत असते, पण प्रत्यक्षात मात्र त्या जातकाच्या आयुष्यात विपरीत घडत असते.
कर्म सिद्धांतानुसार पूर्व जन्मातील चांगली वाईट फळे भोगण्यासाठी आपण जन्म मरणाच्या चक्रात अडकलेले असतो. जेव्हा ज्या जन्मात ते संचित फळ पक्व होते, तेव्हा ते भोगायला लागते. मग ते चांगले असो वा वाईट. हा जन्मं त्यासाठी एक माध्यम असते.
त्या जन्मातील काही विशिष्ट दोष अथवा गुणधर्म, सवयी या जन्मात उतरलेल्या असतात. त्या विशिष्ट कर्माचा आढावा घेऊन त्यात सुधारणा, बदल करून या आयुष्यातील अडथळे दूर करता यावे, यासाठी हा सगळा आटापिटा असतो.
या दृष्टीने वैदिक ज्योतिषशास्त्रात D-60 (षष्ठ्यांश) कुंडली ही सर्वात सूक्ष्म आणि सविस्तर मानली जाते. प्रत्येक राशीचे ६० समान भाग करून ही कुंडली तयार होते. यातून व्यक्तीच्या पूर्वजन्माची कर्मे, गुप्त स्वभाव आणि आयुष्यातील अचानक घडणाऱ्या घटनांचे मूळ रहस्य समजून घेता येते.
संपूर्ण राशीचक्र ३० अंशांचे असते. D-60 तयार करण्यासाठी प्रत्येक राशीचे ६० भाग केले जातात, ज्यातील प्रत्येक भाग अवघ्या ३० कला किंवा अर्ध्या अंशाचा असतो.
महर्षी पराशरांनी या पत्रिकेला अत्यंत सर्वोच्च स्थान दिले आहे. मुख्य जन्मकुंडलीत (D1), नवमांश (D9) किंवा इतर पत्रिकेत एखादा ग्रह संमिश्र फळ देत असेल, तर त्याचे अंतिम फळ D-60 द्वारे ठरवले जाते.
पूर्वजन्माचे कर्म : ही कुंडली आत्म्याची पत्रिका मानली जाते. आपण केलेल्या भूतकाळातील चांगल्या-वाईट कर्मांचे (संचित कर्म) प्रतिबिंब या पत्रिकेत दिसते, जे आपल्या वर्तमान जीवनाला आकार देते.
या ६० भागांचे वेगवेगळे स्वामी किंवा देवता असतात (उदा. देव, अमृत, कुबेर, घोर, राक्षस इ.). जर तुमचे ग्रह चांगल्या देवतांच्या अंशात असतील, तर आयुष्यात सुख-शांती लाभते; अन्यथा कठीण आव्हानांना सामोरे जावे लागते. या सूक्ष्म पत्रिकेचा अचूक अभ्यास करण्यासाठी जन्माची अचूक वेळ (मिनिट आणि सेकंदासकट) असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यात जाराशी चूक झाली तरी प्रत्येक भाग अवघ्या ३० कला किंवा अर्ध्या अंशाचा असल्याने परिणाम बदलू शकतो.
जे फळ पहायचे आहे त्या जन्म कुंडलीतील स्थाना वरील चांगल्या-वाईट कर्मांचे (संचित कर्म) फळ प्राप्त होण्यासाठी कोणत्या देवतेचा प्रभाव आहे, हे पाहण्यासाठीची रीत येथे देतो.
जे फळ पहायचे आहे त्याचा स्थानाचा स्वामी जन्मकुंडलीत कोणत्या राशीत किती अंशावर सम अथवा विषम राशीत आहे.
दिलेल्या तक्ता नुसार जो क्रमाक येईल, त्या क्रमांकाच्या देवतेनुसार आपल्या कर्मात सवयीत बदल करून अडचणीमध्ये दिलासा मिळू शकतो.
उदा.
मीन लग्नाची जन्म कुंडली आहे.
आणि जातक त्याच्या करियर मध्ये अडकून बसला आहे. काही केल्या मार्गी लागत नाहीय.
तर त्या जातकाच्या कुंडलीत दशम स्थानी धनु रास येत असून त्या राशीचा स्वामी गुरु लग्नी मीन या सम राशीत २७ अंशावर आहे.
देवता क्रमांक = ७
देवता (नावे) च्या तक्त्यामध्ये ७ क्रमांक समोर भ्रष्ट असे दिलेले आहे.
याचा अर्थ पूर्वजन्मात त्या जातकाचे आचरण भ्रष्ट, अनीतीकारक होते. जो गुणधर्म या जन्मात नडत आहे. त्यामुळे चालू जन्मात नीतिमत्तेने व प्रामाणिकपणे कर्म करत राहणे त्यास विनाशापासून वाचवू शकते अन्यथा अजून वाईट अवस्था होऊ शकते.
अशा प्रकारे आपण केलेल्या भूतकाळातील चांगल्या-वाईट कर्मांचे (संचित कर्म) प्रतिबिंब या पत्रिकेत दिसते.
(टीप : ही संकल्पना समजण्यासाठी सोपे उदाहरण दिले आहे. कुंडलीचे सूक्ष्म अवलोकन करण्यासाठी जन्म कुंडली, नवमांश कुंडली व षष्ठ्यांश कुंडली यांचे एकत्रित अवलोकन करून अंतिम निष्कर्ष काढावा लागतो. त्यामुळे जाणकार ज्योतिषाचा सल्ला आवश्यक आहे.)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment