विषय : राशींचे गुणधर्म, लिंग, वर्ण, तत्व, शुभांक, रत्नादि कोष्टक संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
नमस्कार, मध्यंतरी मी एक कोष्टक प्रकाशित केले होते. त्यात ग्रहांचे मित्र, शत्रु व सम प्रकारचे ग्रह, तत्व, दृष्टि, लिंग, दिशा, भाग्योदय वर्षे, भाग्यांक ई. ढ़ोबळ परन्तु उपयुक्त माहिती दिलेली होती. आज असेच एक स्वनिर्मित कोष्टक देत आहे, ज्यात राशींचे गुणधर्म, लिंग, वर्ण, तत्व, शुभांक, रत्नादि गोष्टी तुम्हाला तत्काळ पाहता येतील व उपयुक्त ठरतील. (टीप : चार्ट मध्ये भरपूर माहिती असल्याने download केला तर zoom करुन व्यवस्थित वाचता येईल.)
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे) संपर्क : ७०५८११५९४७ (सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
आज आपण सूर्याचे नक्षत्री ग्रह स्थित असता (केपी प्रमाणे) मिळणारे फळ पाहणार आहोत.
सूर्य हा कृतिका, उत्तराफाल्गुनी व उत्तराषाढा या नक्षत्रांचा अधिपति ग्रह आहे.
नक्षत्रांचे पारंपारिक संक्षिप्त वर्णन :
कृत्तिका नक्षत्र : नक्षत्र मालिकेतील ३ रे नक्षत्र आहे. हे नक्षत्र त्रिपाद असून त्याचा पहिला चरण मेषेत व पुढील ३ चरण वृषभेत आहेत. या चार चरणांवर अनुक्रमे गुरु शनि, शनि व गुरु यांचे स्वामित्व आहे. नक्षत्र क्रूर अधोमुखी व सुलोचनी आहे. नक्षत्राचा स्वामी रवि, राशीस्वामी मंगळ वा शुक्र असल्याने या नक्षत्रात रवीचा करारीपणा, मंगळाचा तापटपणा व शुक्राचे सौंदर्य यांचा सुरेख संगम झालेला दिसून येतो. दैवत अग्नी असल्याने त्या अग्नीप्रमाणेच नक्षत्र प्रखर, व कोपिष्ठ आहे. कृत्तिका नक्षत्र अंतर्गत अंत्य नाडी, मेष योनी व राक्षस गण अंतर्भूत असून आ ई ऊ ए ही चरणाक्षरे येतात.
उत्तराफाल्गुनी नक्षत्र : नक्षत्र मालिकेतील १२ वे नक्षत्र आहे. नक्षत्राचा पहिला चरण सिंह राशीत व पुढील ३ चरण कन्या राशीत येत असल्याने हे नक्षत्र त्रिपाद आहे, तसेच ते ऊर्ध्वमुखी, स्थिरमिश्र, मनुष्यगणी व अवलोचनी आहे. या नक्षत्रात प्रामुख्याने रवीचे विविध गुणधर्म आढळून येतात. विशेषतः रवीची नक्षत्राचा स्वामी रवि, राशी स्वामी रवि व बुध व दैवत सूर्यदेव असल्याने कर्तबगारी व कर्तृत्व, उदात्तपणा, राजाचे शुभ गुण व बुधाचा चुणचुणीतपणा यांचा सुंदर मिलाफ झालेला दिसून येतो. अग्नीसारखा प्रखर रवि या नक्षत्रात शीतल फलादेश देतो. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र अंतर्गत आद्य नाडी, गो योनी, मनुष्य गण तसेच टे टो पा पी ही चरणाक्षरे येतात.
उत्तराषाढा नक्षत्र : हे नक्षत्र मालिकेतील २१वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा पहिला चरण धनु राशीत व पुढील तीन चरण मकर राशीत येत असल्याने हे नक्षत्र त्रिपाद आहे. नक्षत्राचा स्वामी तेजस्वी असल्याने रवि, राशी स्वामी गुरु व शनी आणि दैव विश्वदेव नावाची देवता असल्याने या नक्षत्रात रवीची कीर्ती व उदात्तपणा, गुरूचा न्यायीपणा, शनीची चिकाटी व निश्चय आणि विद्येप्रमाणे समाजावर उपकार करणारे अशा सुंदर व सात्विक गुणांचा प्रभाव दिसून येतो. नक्षत्राचे वैशिष्ट्य महणजे शनिव रवि या विरोधी तत्वांच्या व शत्रुग्रहांचे शुभगुणधर्म विकसित झालेले दिसून येतात. म्हणजे शनीचा कंजूषपणा व संशयीपणा नसून चिकित्सक वृत्ती व कष्टाळूपणा दिसतो व रविचा स्थिर व उदात्तपणा दिसून येतो. हे मंदलोचनी, अधोमुख, स्थिर व रजोगुणी नक्षत्र आहे. उत्तराषाढा नक्षत्रा अंतर्गत अंत्य नाडी, मुंगूस योनी, मनुष्य गण व भे भो जा जी ही चरणाक्षरे येतात.
कृष्णमुर्ती पद्धतीमध्ये नक्षत्र स्वामीला अनन्य साधारण महत्व आहे. कारण ही नक्षत्राधारित पद्धत आहे. पारंपारिक पद्धतीत देखील नक्षत्र फळाचा उत्तम वापर करू शकता.
सूर्य हा कृतिका, उत्तराफाल्गुनी व उत्तराषाढा या नक्षत्रांचा अधिपति ग्रह आहे.
कोणताही ग्रह असो व तो कोणत्याही स्थानाचा स्वामी असो किंवा तो कोणत्याही स्थानी स्थित असो, जर तो सूर्याच्या नक्षत्रामध्ये स्थित असेल, तर तो सुर्याची स्थिति व त्याचे अधिपत्यानुसार सूर्य द्वारा दर्शित फल देईल.
उदा. समजा एखाया जातकाचा जन्म कर्क लग्नी झाला आहे व सूर्य मेष राशी मध्ये दशम भाव मध्ये आहे. कोणताही ग्रह सूर्य द्वारा दर्शित फल प्रमुखपणे दशम स्थानाचे देईल व त्यानंतर सूर्य द्वितीयेश असल्याने दुस-या स्थानाचे फळ पण देईल.
समजा की शुक्र वृषभ राशीमध्ये कृत्तिका नक्षत्रामध्ये आहे. तेव्हा शुक्र प्रमुखपणे दशम स्थानाचे फल देईल, त्यानंतर द्वितीय स्थानाचे फल देईल. हा फला करिता मुख्य स्त्रोत शुक्र आहे, जो स्वत:चे स्वामित्व, स्वभाव व स्थितिच्या अनुसार पूर्ति करेल.
थोडक्यात शुक्र फळ (१०) २ (११) ४ ११ असे असेल, कारण कर्क लग्नाला शुक्राच्या वृषभ व तूळ राशी ४ थे व ११ वे स्थानी येतील.
सूर्य १ ले स्थाना मध्ये अथवा १ चा अधिपती आहे याचे तात्पर्य कि, जर सूर्य लग्न स्थानी अथवा सूर्य लग्न स्वामी असला तर, प्रथम स्थान अथवा अधिपतिचे फळ त्या ग्रहा द्वारा मिळेल, जो सूर्याच्या नक्षत्री असेल. जन्म लग्न अनुसार सूर्य प्रथम स्थानी असता अथवा सिंह लग्न असता सूर्य प्रथमेश असेल, तेव्हा वरील विश्लेषण लागू होईल.
अश्या प्रकारे सर्व लग्ना चे जातका करिता जर सूर्य पंचम ‘स्थानी स्थित असता उत्तरा फालुनी नक्षत्रामध्ये स्थित ग्रह प्रमुखपणे पंचम भावाचे फळ देईल, मग तो कोणत्याही स्थानी का असेना. अश्याच प्रकारे फळ मेष लग्नास, सूर्य पंचमेश असेल तेव्हाही मिळेल.
सूर्याच्या मालकीची तीन नक्षत्रे कृतिका, उत्तरा फाल्गुनी व उत्तराषाढा मध्ये जो ग्रह स्थित असेल त्याची दशा चालू असताना हे फळ जातकास मिळेल.
इथे अशाप्रकारे निर्माण होणार्या १२ स्थितींचे फळ आपल्या माहितीसाठी देत आहे.
(१) सूर्य प्रथम स्थानामध्ये स्थित असता अथवा प्रथम स्थानाचा अधिपती (प्रथमेश) असता :
जातक उदार, निश्चयी, स्पष्टवादी असेल. सन्मानाची प्राप्ती होईल. जातक स्वतंत्र विचारांचा व आशावादी असेल. उत्तम शरीर प्रकृति असेल. जातक प्रयत्नामध्ये सफलता प्राप्त करेल. अधिकारी वर्गाशी उत्तम व सलोख्याचे संबंध प्राप्त करेल. सरळ, सुलभ आयुष्य असेल. कामाचे ठिकाणी अधिकारी असेल किंवा पदोन्नति प्राप्त करेल. दृष्टी थोडी अधू असू शकते.
(२) सूर्य द्वितीय स्थानामध्ये स्थित असता अथवा द्वितीय स्थानाचा अधिपती (द्वितीयेश) असता :
जातकास उत्तराधिकार प्राप्त होईल, एखादा उद्योग व्यवसाय असू शकतो. शासकिय योजनेचा लाभ मिळू शकतो. जातक कामाचे ठिकाणी जबाबदारीचे पदावर नियुक्त होईल. जातक उदार, सामाजिक व्यक्तिमत्व, खेळाची आवड असलेला, मनोरंजन प्रिय असेल.
सूर्य पीड़ित असता धनहानि होईल. अनैतिक मार्गाने आयुष्य जगणारा, बोलण्यात विखार असलेला, पैशाचा अपव्यय करणारा, पैसे उडवणारा असू शकतो.
(३) सूर्य तृतीय स्थानामध्ये स्थित असता अथवा तृतीय स्थानाचा अधिपती (तृतीयेश) असता :
जातकास मान सम्मान प्राप्त होईल. तो दृढ, साहसी व पराक्रमी, कर्तुत्ववान असेल. जातकास नातेवाईकाकडून लाभ मिळतील. शेजा-याशी चागले संबंध राखण्यात यशस्वी होईल. ट्रेडिंग व्यवसाय, एजेन्सी वा व्यापारामध्ये मध्ये सफलताप्राप्त करेल. जातक कार्यशील, शत्रु वर विजय मिळवणारा, असेल. उत्तम प्रकृति लाभेल.
सूर्य पीड़ित असता जातकास दुःख, कष्ट, खोट्या तक्रारी, अडचणींचा सामना करावा लागेल.
(४) सूर्य चतुर्थ स्थानामध्ये स्थित असता अथवा चतुर्थ स्थानाचा अधिपती (चतुर्थेश) असता :
जातकाच्या महत्वाकांक्षांची पूर्ति होते. मालमत्ता खरेदी, जमिनीची प्राप्ति अथवा भू-संपत्तीच्या माध्यमाने फायदा, पैतृक संपत्तीची प्राप्ति होते.
सूर्य पीड़ित असता कष्ट, म्हातारपणी अडचणी, ब्लड प्रेशर, परिवारामध्ये कलह व संपत्तीची हानि होते.
(५) सूर्य पंचम स्थानामध्ये स्थित असता अथवा पंचम स्थानाचा अधिपती (पंचमेश) असता :
जातकास सट्टा व्दारे फायदा होतो. मनोरंजन, सिनेमा, खेळ ई. ची आवड असते. जातकास जंगला मध्ये फिरण्याची आवड असू शकते. संतति जन्माच्या वेळी अडचणी येऊ शकतात. पोटाच्या आतड्या मध्ये दोष उद्भवू शकतात.
सूर्य पीड़ित असता जातकास हानि, प्रेम प्रकरणामध्ये अपयश, मुलांना कष्ट, लग्नाची बोलणी बिघडू शकतात.
(६) सूर्य षष्ठ स्थानामध्ये स्थित असता अथवा षष्ठम स्थानाचा अधिपती (षष्ठमेश) असता :
जातकाच्या आरोग्यामध्ये बिघाड होतो. कमजोर शरीर रचना असते. नोकरी मध्ये भाग्योदय, पदोन्नति प्राप्त होऊ शकते.
पिडीत असता शरीरातील रसायन, हृदय रोग, अंग रोग संबंधी त्रास होऊ शकतो. औषधे, दवाखाना मागे लागू शकतो. बुद्धिमानी व दृढ़ निश्चयाने शत्रुवर विजय मिळवतो. मोठा परिवार असू शकतो. प्रयत्नपूर्वक आत्मसन्मान मिळवतो.
(७) सूर्य सप्तम स्थानामध्ये स्थित असता अथवा सप्तम स्थानाचा अधिपती (सप्तमेश) असता :
जातकाचा लग्नानंतर भाग्योदय होतो. निश्चित व स्थायी संबंध प्राप्त होतात. प्रसिद्ध व्यक्ती होतो. मध्यस्थता द्वारा कोर्ट मुकादम्यात मध्ये बचाव वा तडजोड केली जाते. व्यापारा द्वारा लाभ मिळतो.
पीड़ित असता नैतिक पतन, उशीरा विवाह, बायकोच्या धाकात राहणारा, यात्रा करणारा, पति-पत्नी दोघांचे चरित्र संदिग्ध, शुभ दृष्टि असता गुणी अन्यथा दोन बायका, जोडीदाराचे आजारपण, दृष्टि मध्ये दोष, अधिकारी वर्गाची अवकृपा वाट्यास येते.
(८) सूर्य अष्टम स्थानामध्ये स्थित असता अथवा अष्टम स्थानाचा अधिपती (अष्टमेश) असता :
जातकास लग्नानन्तर उत्तम माग्योदय लाभतो. पार्टनरशिप मध्ये लाभ, आत्मबलिदान अथवा एखाया दिव्य कार्य द्वारा अंत. दीर्घायु असू शकतो. कमी संतान असू शकते.
सूर्य जर पीडीत असता कमजोर शरीर, अधू डोळे, मितव्ययी, हिंसे द्वारा मृत्यु, स्त्री च्या कुंडली मध्ये असता वैधव्य, धन हानि, अनैतिक संबंध, कोर्ट कचेरी व दरिद्रता.
(९) सूर्य नवम स्थानामध्ये स्थित असता अथवा नवम स्थानाचा अधिपती (नवमेश) असता :
जातक आत्मविश्वासू, धार्मिक, विश्वसनीय असतो. महाविद्यालय अथवा न्याय विभागाशी संबंधित असतो. प्रवासाद्वारे लाभ मिळतो. शोध कार्य करण्याची इच्छा असते, समुद्र यात्रा मध्ये सफलता मिळते. प्रसिद्धीत वाढ होते व जातक कीर्तिमान कार्य करणारा होतो. प्रयत्ना मध्ये सफलता, स्वअर्जित अपार संपत्तीचा मालक असतो.
(१०) सूर्य दशम स्थानामध्ये स्थित असता अथवा दशम स्थानाचा अधिपती (दशमेश) असता :
जातकाच्या प्राप्ति मध्ये वाढ होईल. सामाजिक व जीवनस्तर उंचावेल. सन्मान प्राप्त होतील व अधिकारामध्ये वाढ होईल.उत्तराधिकार प्राप्त होईल. व्यापार व्यवसायामध्ये विकास, नोकरीमध्ये पदोन्नति, हीरे-जवाहरात संपन्न, व्यवहार कुशल, संगीत व कलेचा शौकीन, समाजाचा अध्यक्ष, राजनैतिक जीवना मध्ये सफलता. ग्रामसेवक ई.
(११) सूर्य लाभ स्थानामध्ये स्थित असता अथवा लाभ स्थानाचा अधिपती (लाभेश) असता :
जातक महत्वाकांक्षी, हच्छापूर्ति होणे, सम्मानित, ईमानदार, शक्तिसंपन्न लोकाशी संबध, आशावादी, स्थायी मित्र, सामाजिक सफलता, उत्तम व्यापार, अनेक सुविधा, राजनीतिज्ञशी मैत्री, सिद्धांतयुक्त असतो.
(१२) सूर्य व्यय स्थानामध्ये स्थित असता अथवा व्यय स्थानाचा अधिपती (व्ययेश) असता :
जाताकास चिकित्सा, रसायन, रहस्य विज्ञान मध्ये यश मिळते. दवाखाना, तुरुंग, स्वास्थ्य लाभ गृह, ई. शी संबंधित असतो. एकांतप्रिय, आत्म बलिदानी असतो.
पीड़ित असता जातकास वाढीव खर्च, गरीबी असते, दुष्ट, विधवा स्त्रीस पसंत करणारा, शंका रहित, पत्नीशी विवाद, मुलांना संकटे, विदेशा मध्ये नुकसान ई. फळे प्राप्त होतात.
आज आपण ज्योतिष शास्त्रातील भाग्य सहम हा विषय घेणार आहोत.
भाग्य सहमला पुण्य सहम् असेही म्हणतात. पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात भाग्य सहमला पार्स फॉर्च्यून किंवा भाग्याचा भाग म्हणतात. अरब ज्योतिषशास्त्रात याला अरबी भाग ARABIC PARTS किंवा LOTS (प्रारब्ध किंवा नशीब) म्हणतात. भाग्य सहम हा एक खगोलीय संवेदनशील गणितीय महत्त्वाचा मुद्दा आहे, जो शुभ परिणाम देतो. पाश्चिमात्य ज्योतिषशास्त्रात त्याच्या वेगवान गतीमुळे हे खूप महत्वाचे मानले आहे आणि जन्मकुंडली तयार करताना त्याची गणना केली जाते.
भाग्य सहम् ची गती प्रति भाग चार मिनिटे आहे. हे लग्न, सूर्य, चंद्राद्वारे स्पष्ट केले आहे. या तिन्हींची गती खूप असल्यामुळे थोड्या अंतरावर जन्मलेल्या व्यक्तींमध्ये त्याच्या स्थितीत अंतर पडते. याद्वारे एकाच अक्षांश-रेखांशावर काही मिनिटांच्या फरकाने जन्मलेल्या व्यक्तीची गुणवत्ता, प्रकृती, नशीब इत्यादीतील फरक सहजपणे तपासता येतो.
भाग्य सहम पहिल्या स्थानात शुक्ल प्रतिपदेला, दुसऱ्या स्थानात तृतीया, तिसऱ्या स्थानात शुक्ल पंचमी, चौथ्या स्थानात शुक्ल सप्तमी आणि सातव्या स्थानात पौर्णिमेला असतो. शुक्ल पक्षात जन्म झाला असता तो ०१ ते ०७ व्या स्थानात राहतो आणि कृष्ण पक्षात जन्म शुक्ल पक्षात जन्म झाला असता ०७ ते १२ व्या स्थानात राहतो.
स्पष्ट चंद्रामध्ये स्पष्ट लग्न जोडणे, त्या संयोग क्रमांकातून स्पष्ट सूर्य वजा केल्याने भाग्य सहम प्राप्त होईल. सूर्य आणि चंद्रामध्ये जितके अंतर असते, लग्नापासून तितक्याच अंतरावर भाग्य सहम असतो.
जर जन्म वेळ दिवस किंवा रात्र असेल त्याप्रमाणे भाग्य सहमची गणना खालील सूत्रानुसार केली जाते.
जेव्हा जन्म वेळ दिवसा असते : भाग्य सहम = स्पष्ट लग्न + स्पष्ट चंद्र – स्पष्ट सूर्य.
जेव्हा जन्माची वेळ रात्री असते: भाग्य सहम = स्पष्ट लग्न + स्पष्ट सूर्य – स्पष्ट चंद्र.
भाग्य सहमचे तीन मुख्य बिंदू म्हणजे लग्न, सूर्य आणि चंद्र. लग्न हे भौतिक शरीराचा आणि आरोग्याचे सूचक आहे. चंद्र शरीरातील आत्म्याचा सूचक आहे. सूर्य हा जिवंत भौतिक शरीराचा, त्याच्या शारीरिक आणि सामाजिक संबंधांचा सूचक आहे. भाग्य सहम हे आरोग्य, संपत्ती, जीवनातील स्थितीचे स्तर दर्शवते. शुभ भाग्य सहम म्हणजे समाधानकारक जीवन, मजबूत शरीर, योग्य वित्त, सकारात्मक आदर, ओळख, चांगला व्यवसाय. म्हणूनच भाग्य सहमवर कोणताही नकारात्मक प्रभाव पडू नये.
भाग्य सहम वर नकारात्मक प्रभाव:
१) जर सूर्य आणि चंद्र अपायकारक (स्वराशीपासून ७ वी रास) किंवा नीच राशी मध्ये असतील तर भाग्य सहम वर नकारात्मक प्रभाव पडतो.
२) ज्या स्थानामध्ये भाग्य सहम स्थित आहे त्याचा स्वामी अशुभ (स्वतःच्या राशीतून सातवा) किंवा निर्बली असेल तर भाग्य सहम वर नकारात्मक प्रभाव पडतो.
३) जर भाग्य सहम वर शुभ ग्रहाची दृष्टी असेल आणि तो ग्रह अशुभ (स्वतःच्या राशीतून ७ वे स्थानी) किंवा निर्बली असेल तर भाग्य सहम वर देखील नकारात्मक प्रभाव पडतो.
४) जर भाग्य सहम वर शुभ ग्रहाची दृष्टी असेल, तर नकारात्मक प्रभाव पडतो आणि तोच अशुभ ग्रह अशुभ (स्वतःच्या राशीतून सातवा राशी) किंवा अपायकारक वा नीच राशी असेल तर तीव्र नकारात्मक प्रभाव पडतो.
५) प्रभावी ग्रह केंद्र केंद्र (१,४,७,१०) स्थानात असल्यास प्रभाव अधिक मजबूत होईल. जर ते पनफर (२,५,८,११) स्थानात असेल, तर त्याचा प्रभाव कमी असेल. जर आपोक्लीम (३,६,९,१२) स्थानात असेल तर त्याचा प्रभाव खूपच कमी होईल. हे तत्व शुभ आणि अशुभ दोन्ही ग्रहांना सारखेच लागू होईल.
६) जर भाग्य सहम बरोबर सूर्य किंवा चंद्राचे केंद्र योग किंवा प्रतियुती योग कोणत्याही भावातून होत असेल, तर हे भाग्य सहमसाठी अत्यंत हानिकारक आहे.
भाग्य सहम स्थानागत फलादेश :
प्रथम स्थान : प्रथम स्थान एखादे व्यक्तिची विशेषताला दर्शविते. भाग्य सहम लग्नी असल्यास जातक भाग्यशाली असेल. तो आपल्या साहसा द्वारे लाभ प्राप्त करेल. सुखी जीवन व्यतीत करेल. स्वत:चे प्रयत्न व कौशल्याने सफलता प्राप्त करेल. तो आत्मविश्वासाने कार्य करेल. व उज्जवल व सफल जीवन प्राप्त करेल.
द्वितीय स्थान : जातक भाग्यशाली असेल. जातकास धन लाभ, व्यापार द्वारा लाभ, सुखी पारिवारिक जीवन व संतोषजनक आर्थिक स्थितीचा आनंद प्राप्त होईल. जेव्हा’ की शुभ दृष्टि असेल तेव्हा कमाई मध्ये वृद्धि व जीवन स्तर मध्ये विकास होईल.
तृतीय स्थान: जातकास भावा द्वारे लाभ, लाभदायक छोटी जागा, परामर्शदाता अथवा सेक्रेटरी असेल व लाभ प्राप्त करेल, अथवा एजन्सी प्राप्त करेल जो त्याला विनाकष्ट धन प्राप्ति देईल. शेजा-यांशी चागले संबंध प्राप्त करेल.
चतुर्थं स्थान : जातकास चांगली पैतृक संपत्ति मिळेल, जमीन जुमाल्यावर विनियोग करेल, गुप्त खजिना प्राप्त करेल अथवा अकस्मात धनवान होईल, खाण संपत्ति द्वारा वा पृथ्वी वा खनिज वा धातुद्वारे एक धनवान व्यक्ति बनेल.
पंचम स्थान : जातकांस विनीयोग, सट्टा व संतति द्वारे लाभ, राजदूत वा तरुण व्यक्ति भाड्यामध्ये वृद्धि करतील, त्यास भाग्यशाली संतान होऊ शकतात. त्याला सिनेमा, औपैरा अथवा नाटक द्वारे लाभ होईल, संगीताचा शौकीन परन्तु जर भाग्य सहम पीडित असेल, तर तो जातक अधिक हानि, धोका, व मनोरंजनासाठी पैसे उधळेल.
षष्ठम स्थान : जातकाचे काका व काकी भाग्यवान असतील, ते जातकाची सहाय्यता करतील. जातक नोकरा द्वारे लाभ प्राप्त करतील. छोटे पशु व बैंकिंग द्वारा लाभ प्राप्त होईल. जातकास सावकाराचे पूर्ण सहयोग व आवश्यकता असेल, तेव्हा ओव्हर ड्राफ्टची सुविधा मिळेल.
सप्तम स्थान : जोडीदार द्वारे लाभ, जोडीदार द्वारे धनलाभ. ठेके, मुकदमा. नेमणूका, प्रतिस्पर्धा द्वारे लाभ. शत्रूवर विजय, जेव्हा भाग्य सहम वर शुभ दृष्टि असेल विवाह, परंतु जर तो पीडित असेल तर विपरित परिणाम होतील, संघ, सोसायटी व क्लब द्वारे लाभ.
अष्टम स्थान : जातकास एखादा जूना सम्बन्धी आपली संपत्तीस स्वेच्छाने मृत्युपत्र द्वारा देऊ शकतो.मित्रांद्वारे अचानक धन प्राप्त करू शकतो. या जातकाची पत्नी व्यवसायवाली असेल अथवा बीमा, व्यापार द्वारा लाभ या पैतृक संपत्ति, बोनस, ग्रेच्युटी ईत्यादि द्वारे प्राप्त करेल.
नवम स्थान : उच्च शिक्षणा करिता, महत्वाकांक्षा, उच्च स्तराची प्रेरणा, दीर्घ यात्रा, फिरता एजेंट रूपाने धन कमविणे, विदेशांशी व्यापार द्वारा लाभ, प्रकाशन द्वारे कमविणे अथवा शोध द्वारे कमविणे, शिक्षा, न्याय, धार्मिक विभागा द्वारे नोकरी अथवा आंतराष्ट्रीय व्यापार, आयात-निर्यात मध्ये नोकरी.
दशम स्थान व्यवसाया मध्ये यश, नाव व कीर्तिवान असतो. पदोन्नति जर सिलेक्शन ग्रेड मध्ये असेल तर त्याचेशी वरिष्ठ अधिकारी दबून राहतील, त्याला पदोन्नति होईल. आपल्या जीवनाची सर्वोच्च स्थिती मध्ये पोहोचेल. जर पीडित असेल तर अकस्मात पतन, चांगली दृष्टि असेल तर मालक होऊ शकतो. वाईट दृष्टिने आजारपण, दोन्ही अति असेल.
एकादश स्थान : लाभदायक मित्र, मदत करणारा, भाऊ लाभदायक, व्यवसाय सफलता, इच्छापूर्ति, आनंद, लाभ व शक्ति, प्रतिष्ठितत लोकाशी स्थायी मित्रता असेल.
व्दादश स्थान : खरेदी व विक्री मध्ये भाग्यशाली, विनियोगा मध्ये भाग्यशाली, गुप्त शत्रुची क्रिया, शेवटी लाभ मिळेल, अज्ञात सूत्राद्वारे लाभ, सम्पत्ति मध्ये वृद्धि. जर पीडित असेल तर तो अनेक प्रकारे नुकसान, बारावे स्थान सुख व शयन करिता व आरामा करिता आहे.
भाग्य सहम राशीगत फलादेश :
मेष : जातक धैर्यशील. प्रेरणादायक आणि संयमी असेल. त्याचेमध्ये ऊर्जाशक्ती भरपूर असते. त्यामुळे जातकाने उर्जेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जातक अत्माविवेकी आणि स्वावलंबी असतो. आव्हाने आणि अडथळ्यांना धैर्याने तोंड देणारा असतो.
वृषभ : जातक अनावश्यक गोष्टीचा उलगडा करण्यात वेळ घालवणारा, शांती-प्रेम अशा गोष्टींच्या उपयुक्ततेवर विश्वास ठेवणारा, भरीव काम करणारा व पूर्तीचा आनंद घेणारा, बाह्य गोष्टींची पर्वा न करता धैर्य व शांती टिकवून ठेवणारा असतो.
मिथुन : जातक जिज्ञासू वृत्तीने आयुष्याचा अनुभव घेणारा, जगण्याचा आनंद लुटणारा, सतत हालचाल करणारा, अष्टपैलु, लवचिकता आणि स्वत;ची शैली जोपासणारा, विनोदबुद्धी असलेला, प्रत्येक क्षण जगणारा, स्वत:च्या निर्णयांवर नियंत्रण नसलेला असतो.
कर्क : जातक नम्र आणि पोषण कर्ता असतो. इतरांचे पालनपोषण करण्यात आणि स्वतःचे पोषण करण्यात आनंद मानतो, तो स्वत:ची निरागसता आणि इतरांचे निरागसपण जपतो. मुलाला किंवा व्यवसायाला जन्म देण्यात, वाढवण्यात विशेष आनंद प्राप्त करणारा उर्जेचा योग्य वापर करणारा असतो.
सिंह : जातक उत्साही, उदार व आशावादी असतो. स्वत:ची बलस्थाने व प्रभुत्वावर लक्ष केंद्रित करणारा व इतरांसाठी प्रेरणादायी असल्याने संपर्कात येणारे आनंदी होतात. तो स्वत:च्या उदाहरणाद्वारे एखाद्याने स्वतःचा मार्ग कसा शोधला पाहिजे याचे मार्गदर्शन करतो. कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वतःच्या आनंदासाठी इतरांना मदत करणारा असतो. सर्जनशील, एकाग्र व मुबलक ऊर्जावान असल्याने मोठी संधी उपलब्ध होते.
कन्या : जातक तार्किक विश्लेषक, सहिष्णु, विवेकबुद्धीवान असतो. सुयोग्य वातावरणात आनंदी असतो. कार्यकुशलतेने काम करून आनंदी होतो. भूतकाळातील आठवणींचे ओझे वहात नाही.
तूळ : जातक मुत्सद्दी, विनयशील आणि कृपावान असेल. त्याला विजयी परिस्थिती निर्माण करण्याची समज असते. नाते जपण्याताला आनंद मानतो, दुहेरी जगात संतुलन राखत, सर्वांना समान आणि एक समजतो.
वृश्चिक : जातक कार्यक्षम, महत्त्वाकांक्षी, संघटक असेल. अनुभवाने पदर काढून गाभ्यापर्यंत पोहोचण्यातच माणसाचा आनंद असतो. जो व्यर्थ जीवनाला परम लाभ मानतो. तीव्र समज, तीक्ष्ण अंतर्दृष्टी आणि अज्ञाताची निर्भयता ही मूळची देणगी आहे.
धनु : जातकास मोकळेपणा, सरळपणा, प्रामाणिकपणा, नैसर्गिक नियमांची समज विकसित होते. व्यक्ती जोखीम घेण्यास घाबरत नाही आणि धैर्य आपले नशीब आजमावतो. बहुधा घरापासून दूर असलेल्या ठिकाणी भाग्योदय होतो.
मकर : जबाबदारी, संयम, चिकाटी, व्यावहारिकता विकसित होईल. व्यक्ती आपली प्रगती पाहून आनंदित होते आणि त्याला एक रचना देऊन पुढे जात रहातो. तो स्वत: स्वत:च्या नशिबाचा शिल्पकार आहे. आणि ते घडवेपर्यंत चैन नसते.
कुंभ : निष्पक्षता, मौलिकता, मानवतावाद विकसित होईल. जातक परंपरावादी पण नाही आणि फार आधुनिक हि नाही आणि फरक शुद्धता त्यांस समजते. जा जातक एका गोष्टीला दुसर्यापेक्षा श्रेष्ठ किंवा नीच मानत नाही, नियमाने बांधील नाही. इतरांच्या वेगळेपणापेक्षा स्वतःच्या वेगळेपणावर आनंदी आहे.
मीन : कल्पनाशक्ती, करुणा आणि विश्वास वाढेल. जीवनाचा प्रवाह संथगतीने वाहताना पाहून त्यास आनंद वाटतो. तो स्वभावतःच आत्म्याशी जोडलेला असतो. त्यास माहित आहे की सर्व मर्यादित काळ आहे. जो गरजा मर्यादित करण्यास सक्षम आहे आणि त्याला एकतेचे महत्त्व समजले आहे.
● भाग्य सहम ज्या स्थानामध्ये आहे त्याचेशी संबंधित क्षेत्रातून लाभ होतो. जर भाग्य सहम् अग्नि तत्वाच्या राशीत असेल तर क्रियाकलाप, नेतृत्व, अग्निपासून लाभ होतो. जर भाग्य सहम पृथ्वी तत्वाच्या राशीत असेल तर धन आणि सुख हे आर्थिक क्षेत्र आणि पृथ्वीशी संबंधित गोष्टींमधून मिळते. वायू तत्वाच्या राशीत असेल तर बौद्धिक क्षेत्र आणि वायूशी संबंधित गोष्टींमधून धन, सुख प्राप्त होते. जर भाग्य सहम जल तत्वाच्या राशीत असेल तर व्यक्तीला भावनिक क्षेत्र आणि पाण्यापासून पैसा मिळतो आणि आनंद मिळतो.
आज आपण ज्योतिषशास्त्रातील बाधक आणि मारक ग्रहांची भूमिका याविषयावर थोडे मंथन करणार आहोत.
जातकास अनिष्ट ठरणारे ग्रह शोधण्याचा प्रत्येक ज्योतिषी आपापल्या परीने प्रयत्न करत असतो.अर्थात जातकास वाईट काळाची पूर्व कल्पना असली, तर तो योग्य ती काळजी घेऊन फळ पूर्णतः नाही तरी किमान काही अंशी त्याची तीव्रता कमी करू शकतो. कितीही भाग्य अटळ, जे घडणार आहे, ते टाळता येत नाही हे कितीही खर्र मानले तरी माणूस असो वा ज्योतिषी असो, त्याने प्रयत्नवादी असायला हवे असे माझे वैयक्तिक मत आहे.
अनिष्टता तपासण्यासाठी, कोणी नैसर्गिक पापग्रहांना व त्याच्या कारकत्वास महत्व देतील, कोणी त्रिक स्थान मानणारे ६ वे, ८ वे १२ वे स्थानावर लक्ष देतील. नक्षत्रचक्र मानणारे चंद्र नक्षत्रा पासून ३ रे विपत्ती दायक, ५ वे प्रत्यरकारक, ७ वे वध नक्षत्र अनिष्ट मानून फलादेश देतील. कोणी या सगळ्या गोष्टी तपासून पाहिलं. वस्तुत: त्रिक स्थानांचे भावारंभ तपासले तर तीच नक्षत्र येतील जी नक्षत्र चक्रात अनिष्ट सांगितली आहेत.
उदा. समजा एखाद्या कुंडलीचे लग्न या भावारंभ मेष राशीत अश्विनी या केतूच्या नक्षत्रात आहे. तर
१) ६ वे स्थानाच्या भावारंभावर कन्या रास व उत्तरा फाल्गुनी हे नक्षत्र येईल जे रविचे नक्षत्र आहे. जे केतुपासून ३ रे विपत्तीकारक असेल.
२) ८ वे स्थानाच्या भावारंभावर वृश्चिक रास व विशाखा हे नक्षत्र येईल जे गुरुचे नक्षत्र आहे. जे केतुपासून ७ वे वधकारक असेल.
३) १२ वे स्थानाच्या भावारंभावर मीन रास व पूर्वा भाद्रपदा हे नक्षत्र येईल जे गुरुचे नक्षत्र आहे. जे केतुपासून ७ वे वधकारक असेल.
आता यात तुम्हाला असे लक्षात येईल कि त्रिक स्थानात ५ वे प्रत्यरकारक नक्षत्र येत नाही, जे नक्षत्र चक्रात अनिष्ट सांगितले आहे. मग ते गेले कोठे? स्वअभ्यास व संशोधन करताना मला ते सापडले मारक भावांत.
हिंदू ज्योतिष शास्त्रात ७ वे व २ रे स्थान सर्व लग्न स्थानांना मारक सांगितले आहेत.
४) २ रे स्थानाच्या भावारंभावर वृषभ रास व कृत्तिका हे नक्षत्र येईल जे रविचे नक्षत्र आहे. जे केतुपासून ३ रे विपत्तीकारक असेल.
५) ७ वे स्थानाच्या भावारंभावर तूळ रास व चित्रा हे नक्षत्र येईल जे मंगळाचे नक्षत्र आहे. जे केतुपासून ५ वे प्रत्यरकारक असेल.
या व्यतिरिक्त हिंदू ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या स्थितीच्या आधारे प्रत्येक लग्नांकरिता नियमानुसार बाधक भाव असतात. बाधक भावाच्या स्वामीला ‘बाधक स्थानाधिपती’ असे म्हणतात. चर राशींना ११ वे, स्थिर राशींना ९ वे व व्दिस्वभाव राशींना ७ वे स्थान बाधक सांगितले आहेत.
१) चर लग्नाकरिता एकादश भाव बाधकस्थान म्हणजेच त्याच्या राशीचा स्वामी बाधक स्थानाधिपती असतो.
२) स्थिर लग्नाकरिता नवम् भाव बाधकस्थान म्हणजेच त्याचा राशीचा स्वामी बाधक स्थानाधिपती असतो.
३) द्विस्वभाव लग्नाकरिता सप्तम भाव बाधक स्थान म्हणजेच त्याच्या राशीचा स्वामी बाधक स्थानाधिपती असतो.
बाधक ग्रहांचे नक्षत्रसुद्धा बाधकच ठरते आणि बाधक स्थानाधिपती तथा बाधक भावांतील ग्रहांचे, नक्षत्रांतील ग्रह आपल्या दशा- अंतर्दशांमध्ये कष्टदायक असतात. परंतु जातक पारिजात (अध्याय ११, श्लोक ४८ अनुसार) बाधक स्थानाधिपती त्याच स्थितीमध्ये अशुभ फलदायक असतो, जेव्हा तो ‘मान्दी’ आणि ‘गुलिका’द्वारा अधिष्ठित भावांचा स्वामी असेल.
कृष्णमुर्ती पद्धतीप्रमाणे निर्णय करताना सर्व ग्रहामध्ये ते ग्रह सर्वात अधिक पापग्रह आहेत, जे वरील अनिष्ट स्थानामध्ये स्थित ग्रहांच्या नक्षत्रामध्ये आहेत. त्यानंतर अनिष्ट स्थानामध्ये स्थित ग्रह विचारात घ्यावेत. त्यानंतर अनिष्ट स्थानाधिपती ग्रहांच्या नक्षत्रामध्ये स्थित ग्रह तपासावेत.
तात्पर्य कि अनिष्टता तपासताना या सर्व बाबींचा सर्वंकष विचार करावा. व एखाद्या जाणकार ज्योतिषाकडून मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे उपाय करावेत.
इतक्यात माझा एक लेख (विशोत्तरी दशा पद्धती : आयुष्यातील चढ उतार जाणून घ्यायचे एक गणिती तंत्र) प्रकाशित झाला. आपण सर्वांनी त्यास चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभार. इंदुमती ताई व इतरांनी एखादी केस स्टडी मांडलीत तर जास्त सोपे होईल अशी अपेक्षा केल्याने हा एक सोपे उदाहरण समोर ठेवत आहे. पण प्रत्येक कुंडली ही वेगळी असल्याने दशेबरोबर बाकीचे ही घटक निर्णायक ठरू शकतात. एखादा जाणकार ज्योतिषी योग्य मूल्यमापन करू शकतो.
आपला विषय विशोत्तरी दशा पद्धती हा डोळ्या समोर ठेवून हा लेख लिहित आहे.
माझे एक स्नेही श्री.विजय (नाव बदलले आहे) जूलै २०१९ च्या दुसऱ्या आठवड्यात माझेकडे आले व गंभीर चेहऱ्याने काही न बोलता बसून राहिले. थोडा वेळ मध्ये जाऊ दिल्यावर येण्याचे प्रयोजन विचारले असता म्हणाले की सध्या मी माझ्या मुली बाबत विचार करत आहे. ती हल्ली घरात जास्त बोलत नाही. घरी यायला उशीर करतेय. सतत फोन वर काही न काही करत असते. त्यामुळे काळजी वाटतेय. त्याला समजावले की आजच्या पिढीची ही सामान्य लक्षणे आहेत. तरी आपण कुंडली तील तिच्या दशा तपासू व त्याप्रमाणे तिची जन्म कुंडली मांडली.
कुमारी …………………..
जन्म तारीख ३१ जुलै २००१ सायंकाळी ५ वा. ३० मि. पुणे येथील जन्म
धनु लग्नाची ही जन्म पत्रिका. लग्न स्थानी चंद्र व केतू ६व्या स्थानात असला तरी शनी पंचम भावात, सप्तमात राहू, शुक्र, गुरु. अष्टमात रवी व बुध आणि व्यय स्थानात मंगळ अशी ग्रह स्थिती.
तेव्हाच्या दशा बघितली तेव्हा १८ जुलै २०१९ ते ०१ नोव्हेंबर २०१९ या काळासाठी तिची शुक्र महादशा गुरु अंतर्दशा व राहू विदशा व शनी सुक्ष्म दशा होती.
नुसते कुंडली कडे नजर टाकली तरी लक्षात येईल की…
वैवाहिक सौख्याचा कारक व ६ वे व ११ वे स्थानाचा अधिपती शुक्र भार्या स्थानी (७ वे स्थान) आहे ज्याची महादशा चालू आहे.
१ ले व ४ थे (सुख) स्थानाचा अधिपती गुरु सुद्धा भार्या स्थानी (७ वे स्थान) आहे ज्याची अंतर्दशा चालू आहे.
राहू ला राशी नसते पण येथे राहू व गुरु राहूच्या नक्षत्रात युतीत आहे जो भार्या स्थानी (७ वे स्थान) आहे ज्याची विदशा चालू आहे.
शुक्र मंगळाच्या नक्षत्रात असून मंगल ५ वे १२ भावाचा अधिपती आहे.
राहू विवाहात वैचित्र्य व ५ वे स्थान प्रेम व मंगळ आकर्षण दाखवतो.
शनी ६व्या स्थानात असला तरी शनी पंचम भावात असून २ रे (कुटुंब) स्थान चा अधिपती आहे.
वरील वर्णना वरून एका दृष्टीक्षेपात जाणकार ज्योतिषाच्या लक्षात येईल की विवाह योग असून प्रेम विवाहाची शक्यता आहे.
त्यामुळे तिच्या वडिलांची चिंता निराधार नव्हती. तसे त्याप्रमाणे त्यांस कल्पना देऊन सावध व शांत राहण्यास सांगितले.
इतरही अनेक गोष्टींची चर्चा केली परंतु तो या लेखाचा विषय नसल्याने तसेच गुप्ततेच्या कारणास्तव येथे देणे अप्रस्तुत ठरेल.
ही मुलगी ७ ऑगस्ट २०१९ रोजी ट्युशन क्लास ला जाते सांगून सकाळी घरातून निघाली व लग्न केले. आधी कल्पना असून सुद्धा तिच्या घरी व्हायचा तो गदारोळ व विरोध हा झालाच. तरी समाधानाची गोष्ट म्हणजे मुलगा चांगला असल्याने नंतर त्यास स्वीकारले गेले व दोघे आनंदात सहजीवन व्यतीत करत आहेत.
तर विशोत्तरी दशा पद्धती : आयुष्यातील चढ उतार जाणून घ्यायचे एक गणिती तंत्र एक घटनेविषयी भविष्य कथन करताना सहाय्यभूत ठरले.
ज्योतिष मित्र मिलिंद (7058115947) (सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
खगोलशास्त्र : शनिला शनिश्वर म्हणतात (शनै+चर) कारण हा राशिचक्रातील अन्य ग्रहांपेक्षा मंद गतीने भ्रमण करतो. हा सर्वात दूरचा बाह्य ग्रह आहे. (पूर्वीच्या काळी फक्त सात ग्रहांचा शोध लागला होता. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनि. युरेनस, नेपच्यून ई. ग्रहांचा शोध वर्तमान मध्ये लागला आहे.) शनिला डोळ्यांनी ने पाहिले जाऊ शकते.
शनी तीन सम केन्द्रीय वाल्यांनी घेरलेला आहे. हे वलय वेगवेगळे आहे. व दोन वलयांमधील जागा पोकळ आहे. शनि एक निळ्या चेंडूला तीन बांगड्यांनी घेरल्याप्रमाणे दिसतो.
शनि सूर्यापासून ८८ कोटी ६० लक्ष मैल दूर आहे. हा गुरु पेक्षा लहान आहे. याचा व्यास ७५००० मैल आहे, याचे ९ चन्द्र आहेत. पृथ्वीची चंद्राशी तुलना केली तर आकारामध्ये हा ७७० वेळा मोठा आहे. पण वजनामध्ये १०० गुणापेक्षा काही कमी आहे.
शनि सूर्याचे आसपास साडेएकोणतीस वर्षामध्ये एक चक्कर लावतो, म्हणून साधारण मानाने शनि प्रत्येक राशि मध्ये अडीच वर्ष असतो.
पौराणिक : शनिला यम म्हणतात का. हा दीर्घायुचा कारण आहे. हाला भगवान शिव वा इंद्राचे कर्तव्य पालन करावे लागते. शनि बर्फा प्रमाणे थंड ग्रह आहे. हेच कारण की मृत पावल्यानंतर म्हटले जाते की व्यक्तिचे हाय-पाय थंड पडले आहेत.
शनिला दोन पाप ग्रह आहेत. “गुलिका व “मंदी” चा पिता मानला जातो. शनिला नील व मंद पण म्हटले जाते. शनिला अपंग म्हटले जाते, याची एक गोष्ट आहे. जेव्हा रावणाचा पुत्र इंद्रजीत चा जन्म होणार होता, तेव्हा शनि ने आपला एक पाय ११ व्या स्थानाहून १२ वे स्थानी ठेवला. ज्या मुळे शनि बालकास गर्वित करू शकेल व वेळ आल्या वर त्याचे पतन होऊ शकेल. रावणाने त्याचा पुत्र इंद्रजीतचे जन्मवेळी सर्व ग्रहाना ११ व्या स्थानी ठेवण्याचा प्रयत्न केला, कारण ११ वे (लाभ) स्थानी स्थित ग्रह निःसंदेह रुपाने जातका करित चांगला असतो. बारा स्थाना मध्ये फक्त ११ वे स्थानच असे आहे की, तो जातकाची समस्त इच्छा व महत्वाकाक्षांची पूर्ति करतो. परंतु देवाना हे परिणाम माहित असल्याने त्यांनी शनिची प्रार्थना केली. व शनीने मुळे देवांना आश्वस्त केले. शनि ११ वे स्थानामध्ये फार शुभ असतो आणि १२ वे स्थानामध्ये पुष्कळ वाईट असतो, म्हणून शनि ने आपला पाय १२ वे स्थानी ठेवला. जेव्हा रावणास सूचना दिली गेली की त्याला मुलगा झाला त्यावेळी शनी ग्रह ११ वें स्थानी नसून १२ वे स्थानी आहे. रावनामे शनिचा एक पाय काढून टाकला म्हणून शनिला अपंग ही म्हणतात व की शनिला मंद ही म्हणतात.
शनि सूर्याचा पुत्र आहे. त्याचे गुण व विशेषता पहा – दोन्ही एक दुस-याचे विरुद्ध आहेत. चंद्राचा पण विचार करा, शनिशी त्याचा पण मेळ बसत नाही. हेच कारण की, शनिला मकर व कुंभ राशि दिलेली आहे, जी सूर्य व चंद्राच्या विरुद्ध आहेत.
पश्चिमी विद्वानाचा अनुसार शनि यूरेनस चा पुत्र व गुरु नातू आहे. जेव्हा त्याला हे समजले की त्याचा पुत्र, संसाराचा नाश करेल, तेव्हा त्याने त्याला मारले. ईश्वर नेहमी प्रत्येकाच्या करणीनुसार फळ देत असतो, शनिने यूरेनसला राज्यावरून हटवले, तेव्हा गुरुने शनिला ठेवून घेतले व प्रकृतिच्या नियमाची दिक्षा दिली. अश्या प्रकारे अनेक कथा आहेत.
काही लेखकांच्या मते शनि ब्रम्हाचा प्रतिनिधी आहे. परन्तु सामान्यपाने त्याचे कार्य पहाता त्याशी सहमत नाही की शनि मानवीय जीवनाचे कार्य करतो. त्याला भगवान शिवरुद्रचा प्रतिनिधि हा सिद्धांत जास्त योग्य वाटतो. सूर्यास वा गुरु ला ब्रम्ह म्हटले जाऊ शकते. परंतु शनि मध्ये शिवाची विशेषता आहे. शनिला नील ही म्हटले जाते व शिवास नीलकंठ. शनि शिशिर ऋतु, फेब्रुवारी, मार्च ह्या थंड महिन्यांचा अधिपति असतो.
ज्योतिषशास्त्र : शनि निष्फळ, थंड, बंधनकारक, स्थिर, शुष्क, सुरक्षात्मक, कठोर, निराश व गुप्ततेचा ग्रह आहे. हा मकर व कुंभ राशींचा स्वामी आहे. मूळ त्रिकोण अथवा दिवसाची राशि कुंभ आहे व रात्रिचे स्थान मकर आहे. शनिची उच्च राशि तुळ आहे जेथे सूर्य नीचेचा असतो. शनिची नीच राशि मेष आहे, जी सूर्याची उच्च राशि आहे. सूर्याची राशि सिंह व चंद्राची कर्क राशि आहे. या दोन्ही शनिच्या पतन राशि आहे.
शनि बुध राशि मिथुन व कन्या व शुक्र राशि वृषभ व तुळ मध्ये स्थित असल्यास मित्रगृही मानले जाते व अन्य स्थानी स्थित असल्यास शत्रुचे घरी म्हटले जाते. शुक्राची बुधाची राशि मध्ये जन्मलेले व्यक्ति करिता शनि पुष्कळ शुभ म्हटला जातो. उत्तर कालामृत च्या अनुसार शनि स्वत:च्या राशि मध्ये अथवा गुरुच्या राशि मध्ये उच्चचा असेल तर तो शुभ फलदायक ठरतो.
कालिदासाचा विचार आहे की की जर शनि स्वामित्व द्वारे शुभग्रह आहे, तेव्हा’ त्यांना स्वक्षेत्री, उच्च वा वर्गोत्तम मध्ये असणे शुभ फळ देण्याकरिता शुक्राचे अंतर दशेमध्ये आवश्यक नाही, शुक्र दशा मध्ये बली, राजयोगा मध्ये शनि, राजा कुबेर पण दारोदार चा भिकारी बनतो.
कृष्णमूर्ति पद्धतिचे अनुसार शनि पुष्य, अनुराधा व उत्तरा भाद्रपदाचा स्वामी होत असल्याने या तिन्ही मधून एखादे नक्षत्रामध्ये स्थित ग्रहांस अश्या तो शनि स्वामित्व, स्थिती, द्वारे फळ देईल.
शनि उशीर करतो. हा फळापासून वंचित हि करू शकतो. हा निराश पण करू शकतो. प्रतिकुल फळ, तंटा, अडचणी, ई. वाईट शनि चे परिणाम आहेत, तर परिश्रम करणे, धैर्य, धैर्यतापूर्वक कार्य करणे, दूरदर्शिता, कमी खर्च, बचत, उद्योग, गुप्त रहाणीची शक्ति, स्थिरता, आत्मनियंत्रण, कर्तव्य परायणता ई. शुभ शनीचे कारण आहेत.
सुप्त, आळशी, बेकार, कुप्रभाव मध्ये असणारे, शनि द्वारे दर्शित होतात, त्याचा कधीही काम करण्याचा विचार होणार नाही. जर कधी ते कार्य प्रारंभ करतील तर अडचणी, बाधा, उत्पन्न होते अथवा त्याना निराश करतात. ते शंकाखोर होतात, त्यांना भीति वाटत राहते की, त्यांना एखाया कामामध्ये यश मिळेल किंवा नाही, म्हणून ते व्याकुळ होतील. ते दुस-यावर शंका घेतील, शनि मनात अविश्वास उत्पन्न करतो.
शनि जातक नेहमी गाडी चुकवितो, ते अधिकांश तर उशीरा रवाना होतील. कार्य करण्याकरिता लाभ प्राप्त करण्या करिता, ते स्टेजवर बोलल्याचा ही प्रयत्न करतील, ते चांगली तयारी करु शकतील, पण ऐनवेळी फक्त काही मुद्देच आठवू शकतात. शनिशी प्रभावित विद्यार्थी ना परीक्षेदरम्यान गोष्टी आठवणार नाहीत. पण जेव्हा ते परीक्षा भवनचा बाहेर येतात, तेव्हा त्यांना सर्व आठवते. एक शनिजातक आपल्या मित्राकडे एखादे कामानिमित्त जातो, तेथे पोहचल्यावर वेगळ्या गोष्टी मध्ये गुंतून जातो. तिथे काही बाधा उत्पन्न होते व त्याचे कार्यामध्ये अडचणी उत्पन्न होतात. शनि एक शक्तिशाली ग्रह आहे मग तो शुभ ग्रह वा रूपाने असो वा अशुभ ग्रहाचा रूपाने, हे पहावयास हवे की अंतर्दशा शनि चे काय फळ मिळू शकेल.
अश्या प्रकारे ज्या व्यक्तिचा जन्म मकर वा कुंभ लग्नामध्ये अथवा पुष्य, अनुराधा या उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये झाला असेल, ते शुभ या अशुभ शनिच्या त्याचे दशेमध्ये फळ देतील. शनि दीर्घायुचा कारक ग्रह आहे. दीर्घायु स्थानावर अर्थात अष्टम स्थानामध्ये स्थित असेल तर तो जातकास दीर्घायु बनवितो. “कारको भव नाशम:” हा श्लोक शनि बद्दल लागू होत नाही.
गुरु उत्पत्ति व विस्तारचा कारक ग्रह आहे. म्हणून गुरु उत्पादन करतो व शनि नष्ट करतो. ज्यामुळे समतोल राहतो. शनिच्या प्रभावामध्ये जन्मलेले लोक, गरम वस्तु पसंत करीत नाहीत. ते थंड वस्तु पसंत करतात. विशेष रूपाने थंड स्थानी ठेवलेली थंड वस्तु पसंत करितात. कारण शनि थंड ग्रह आहे. ते शिळे पण सुरक्षित खाण्यालायक अन्न खाऊ शकतात., शनि आंबट चव पसंत करतील.
शनि जेव्हा लाभदायक असेल तेव्हा खरा, ईमानदार, कार्य करणारा, विश्वास पात्र, शुद्ध व्यक्ति असतो. हा ध्यान, पतन, प्रार्थना, इ. मध्ये रमणारा असतो. पण शनि जातक जो सर्व कार्याकरिता उपदेश देत नाही. मौन धारण करतो, शांति धारण करती, भोज्य पदार्थाचे त्याग करतो, एकांत पसंत करतो. समाजाशी तूटक राहतो. शनि कधीही दुस-याचा विचाराची पर्वा करणार नाही. तो एकाग्री, मितव्ययी व गणना करणारा असतो. शनीचा रंग नीळा आहे. जेव्हा दुःखी, उदास, हताश, पराभूत मानत असाल, तर कधीही निळ्या रंगाचा पडदा, टेबल क्लाथ, भिंतींचा रंग अथवा अंगठी नीलम घेऊ नका. लाल रंग वापरा, जो मंगळाचा आहे, तो हिंमत देईल, सक्रिय करेल,
शनी दशेत त्याला निळा रंग आकर्षित करेल. म्हणून त्यास बळी पडायला नको. उलट रंगाचा वापर करा. शनिचा वाईट प्रभाव गुरु आठवा बळी मंगल द्वारे परास्त केला जाईल. मंगळ शनी ला शुभ दृष्टीने पहात असेल तर लाल रंगाचा प्रयोग करा. जर शुभगुरु शनिची पीडा कमी करतो म्हणून शुद्ध सोने वापरा.
ज्यांचे चंद्र व बुध शनिवारे पीडित असेल, तर हीनताचा अनुभव करतील व भीतीयुक्त भावना राहील. अशा स्थिती मध्ये लाल रंगाचा वापर करा. मूर्खता, मंदबुद्धी, मौलिकत्वाचा अभाव व विचार शून्यता शनिच्या खराब स्थितीच्या कारणामुळे होते.
हिन्दू संतांनी म्हटले गेले आहे की, व्यक्तिचा जन्म दिवसा होतो, तर त्याचा पिता सूर्य द्वारे दर्शित होतो व रात्रीमध्ये असेल, तर त्याचा पिता शनि द्वारे दर्शित होतो. शनिला सेंट पीटर म्हटले जाते. हा एखादे करिता स्वर्ग या नरकाचे दार उघडतो. शनि नीळ्या रंगाचा अधिपति आहे. काळा, भूरा व नील रंग पश्चिमी विद्वानाद्वारे शनीस मान्य केले आहे.
शनि लपलेल्या गुप्त गोष्टी, खाण व खाणीतून काढलेल्या वस्तु, कालव्याचे खोदकाम, नाले, कबर, खोदणे व जनाना, भूगर्भशास्त्र, भूमि व राज्यास दर्शवितो. शनि बटाटे, शेंगा ई जमिनीच्या आत उत्पन्न होणा-या वस्तुना दर्शवतो.
शनि दीर्घ काळाचे आजार, हाडां संबंधित आजार वा रोग, खाज, अंगभंग ई दर्शवतो.
शारीरिक : शनि दुबला, हडकुळा, पिवळा अथवा काळ्या रंगाचा व्यक्ति उत्पन्न करतो, चेहरा उदासीन असतो. या तर वास्तविक वयापेक्षा अधिक वयाच्या दिसतात. त्याची दृष्टिही अशी असते कि अतिशय निरखुन पहात आहे. तेज डोळे व बाहूबल, ही शनि जातकाची विशेषता असते. सामान्यपणे शनि जातक काही बहिरा असतो. तो लोकांना पुन्हा सांगण्याची विनंती करतो.
व आपला हात कानाजवळ नेईल, व जोराने बोलण्याचा इशारा करेल. शरीर उंच व पातळ असते.
शरीराचे भाग : अस्थी प्रणाली, हाडे, केस व त्याचे वाढणे, कान, दात इत्यादि.
आजार व रोग : शनि व चंद्राची प्रतिकूल दृष्टि असेल, तर मनामध्ये प्रश्नसंबंधी गोंधळ. शरीरामध्ये जेवणातील खराब गोष्टी साठणे, त्वचा कठिण होणे, पायरिया ई. उद्भवते. शनि मंगळ व चंद्राची अशुभ दृष्टि मध्ये देवी होतात, चालण्या फिरण्याचे बळ समाप्त होउन जाते,
शनि व मंगळाची वाईट दृष्टि असेल तर पडणे, घाव, जखम, शस्त्रक्रिया, अंग विछेद, हाड मोडणे इ. होते.
बुध व शनि पीडित असेल तर भीती वाटेल, कानामध्ये कष्ट, बहिरेपणा (चंद्रपण पीडित असेल तर कानामध्ये पू होतो) सर्दी, थंडी लागणे, दमा, फुफ्फुसा संबंधी, क्षय रोग, बोलण्यात दोष, लकवा, विटामिन बी कमी होणे इ. होते.
शनि व गुरु परस्पर पीडीत असेल, तर नपुंसकता, कब्ज, मनात मळमळणे, कैन्सर रोग होतो.
सूर्य व शनि विपरित दृष्टि मध्ये असेल तर ब्लडप्रेशर, एनीमिया, गाठी, हृदयरोग ई. होते.
शुक्र व शनि विपरित दृष्टि मध्ये असेल, तर तो मैथुनिक आजार, कोड, टक्कल, काळे निळे डाग, रक्तदोषाने पीडित असतात.
वनस्पती, जड़ी व बूटी : द्विदलीय बीज, सीसम, केळाचे झाड, महुआ, काळे धान्य ई.
स्थान : एकांत, पहाडी टापू, जंगल, वाळवंट, गुहा, समाधि स्थान, घनदाट भाग, घातक नाशकारी जुने घर, चर्च, मंदिर, खड्डे, दरी, कोळश्याचे खड्डे, पायदान, विहीर, दुर्गन्धयुक्त स्थान, दलदलचे क्षेत्र, घाणेरडी जागा, सलून, चामडे, चप्पल कारखाना व असे स्थान ज्या मुळे मळमळते.
राजनैतिक : मोठ-मोठ्या भवनांचे निर्माण, कायदा, लोकसभा, सदस्यांची असहमति वा विचाराची भिन्नता, एखाद्याचा मृत्यु किंवा राज्य गमविणे, राज्याचे प्रतिष्ठेस धोका, निषेध, नियंत्रण, राशनिंग, आपत्कालीन अधिकार, प्रजा तंत्र चा दुरुपयोग, दुष्काळ,भूकंप, जनतेच्या पैश्याची बरबादी, भौतिक सर्वेक्षण ई. गोष्टी दर्शवतो.
आर्थिक : अधिक कर लावणे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये उदासी, निर्यातीत मंदी, विदेशी विनिमय मध्ये अडचणी, संप, अयशस्वी मध्यस्थी, नैसर्गिक आपत्ती मुळे बेकारी, राष्ट्रीयीकरण, प्रायवेट लोकाची संपति, राज्यकर्त्याची प्राप्ति व त्याचा धंदा, लुट, यातायात मध्ये अडचणी, अस्त्र शस्त्राची हानि, सर्व पदार्थाची कमी ई.
उत्पादन : जस्त (सूर्याच्या जोडीस), काजळ (चंद्रा बरोबर), घासलेट (शुक्र व चंद्राबरोबर), पेट्रोल (चन्द्र शुक्र मंगळ), पैट्रोलियम उत्पादन (चन्द्र व मंगळ), कोळसा (मंगळा बरोबर), खनिज पदार्थ (मंगळ व बुधा बरोबर), ह्युम पाईप (मंगळ व शुक्र), सिमेंट, हाडे, चामड़े (मंगळ), धातु शोधन विद्या (मेटेलर्जी)(शुक्रा बरोबर) लाकूड ई.
धंदा : जस्त, लोखंड वाले पदार्थ, केस, लोकर, चामडे, दगड खाण, धातु खनिज चा व्यापारी व उत्पादक.
सूर्य व शनि व्यवसाय दर्शवितात तर जातक मोठे उद्योग, जे शासन द्वारा चालतात, स्थानीय परिषद, पंचायत, कार्य, शासन जिल्हा बोर्ड, मध्ये नोकरी, सृजन ई.
चंद्र व शनि : शेतीविषयक, जुन्या विचारांचा उपदेशक, जुने रिवाज पाळणारा, परंपरा वादी, म्युझियम स्टेडियम मध्ये नौकरी करणारा.
मंगळ व शनि : मिस्त्री, नकाशे करणारा, सर्वेयर (बुध) इंजीनिअर, ठेकेदार भवन निर्माता (शुक्र), गुप्त रोग विशेषज्ञ (शुक्र व यूरेनस), एक्स-रे टेक्नीशियन ई.
बुध व शनि : इंजिनियर प्राचीन पुराण लेखक, कादंबरीकार, सेन्सर विभाग, लेखक (मंगळाच्या जोडीस), स्टेनोग्राफी, निगरानी विभाग, खोटा प्रचार, कथाकार, काळाबाजारी (शुक्राचा जोडीस) लाकूड तोड़े, शिक्षण, वैज्ञानिक ई.
गुरु व शनि : चिकित्सक, भूसंपत्तीचे दलाल, खाण मालक, बैंक मध्ये नौकरी, धार्मिक संस्था मध्ये कार्य, राजनैतिक कार्यालय, वैज्ञानिक लेबोरेटरी, मोठी कंपनी, क्लब, सोसायटी मध्ये नोकरी व जन्म नियंत्रणाचा साधनामध्ये कार्य व प्रचारक होती.
शुक्र व शनि : अभ्रकचा व्यापारी, अभ्रक खाणीमध्ये कार्य करणारा, शिंपी, पुंगी वाजविणारा, संगीत निर्देशक, सिनेमा जातक, एक्स्ट्रा व्यक्ति, ड्राफ्टमन, घोडे व हत्ती प्रशिक्षण देणारे, चर्मरोग, कोड व मैथुन रोग मध्ये तज्ञ ई.
आज आपण कुंडलीतील रिक्त स्थान याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
प्रत्येक कुंडलीत १२ स्थान असतात. त्यामध्ये कोणता ग्रह किती अंश कलांवर आहे त्यानुसार नवग्रह व हर्शल, नेपच्यून, प्लुटो असे मिळून १२ ग्रह मांडलेले असतात.असे होत नाही कि प्रत्येक स्थानात १ ग्रह या प्रमाणे सर्व स्थाने व्यापून गेली. कोणते ना कोणते स्थान हे रिकामे च राहणार असते. पण याचा अर्थ असा नाही कि कोणता ग्रह नाही म्हणजे ते स्थान फळ देण्यास सक्षम नाही. उलट माझी मते रिक्त कुंडलीचा अभ्यास आधी प्राधान्याने करावा. त्यातून अनेक गोष्टी आपल्याला जसजसे सराव कराल तसे नजरेस पडतात, ज्याचा कुंडली सोडवताना नक्कीच फायदा होतो.
वस्तुत: ते स्थान रिकामे दिसत असले तरी, अनेक घटक त्या स्थांचे फळ देण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. त्याचाच आपण इथे थोडक्यात विचार करणार आहोत.
प्रथम ज्या स्थानाचे फळ पाहायचे आहे, त्या स्थानाची कारकात्वे कोणती आहेत याची आधी मनाशी उजळणी करावी.
उदा. १ ले स्थान : डोके, रंग, रूप, शरीराची ठेवण, शरीर सुख, आवड, स्वभाव, शील आरोग्य, आयुष्य, प्रश्न कर्ता, धर्म त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.
२ रे स्थान : धन, कुटुंब, वाणी, कुटुंबातील वाढ, वक्तृत्व. उजवा डोळा, आरोग्यासाठी मारक स्थान, अर्थ त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.
३ रे स्थान : कर्तुत्व, भावंडे, लेखन, वाचन, छोटे प्रवास, बदल, पत्र व्यवहार, दस्त, प्रकाशन, सन्मान, करार, अफवा, कान, कंठ, बाहू, काम त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.
४ थे स्थान : सुख, आई, जमीन, मालमत्ता, शेतीवाडी, जलाशय, गुरे ढोरे, स्थावर, वाहन सौख्य, छाती, मोक्ष त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.
५ वे स्थान : संतती, करमणूक, नाटक, सिनेमा, कला, क्रीडा, प्रेम प्रकरण, जुगार, पूर्व जन्म, छंद, प्रेम विवाह, धर्म त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.
६ वे स्थान शत्रू, कालः, वाद, संकटे, संघर्ष, आजार, नोकर, नोकरी, कोर्ट कचेरी, कर्ज, पाळीव प्राणी, भाडेकरू, कंबर, वासना, अर्थ त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.
७ वे स्थान : विवाह, जोडीदाराचा स्वभाव, लैंगिक सुख, व्याभिचार, प्रतिस्पर्धी, आयुष्य, चोर, चोरी, प्रवासा दरम्यान थांबा, व्यवसाय, पश्चिम दिशा, आरोग्यास मारक स्थान, काम त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.
८ वे स्थान : मृत्यू, आयुष्य, कर्ज मुक्ती, स्त्री धन, गुप्त धन, शत्रू वारसा हक्क, लाचलुचपत, मानहानी, संकटे, पीडा, दुर्भाग्य, मोक्ष त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.
९ वे स्थान : भाग्य, वडील, गुरुजन, धर्म, लांबचा प्रवास, प्रगती, कीर्ती, उच्च शिक्षण, पूर्व पुण्याई, अंतर्ज्ञान, मांड्या, धर्म त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.
१० वे स्थान : कर्म, नोकरी, उद्योग, अधिकार, प्रतिष्ठा, भागीदार, वैद्य, दक्षिण दिशा, अर्थ त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.
११ वे स्थान : सर्व प्रकारचे लाभ, इच्छापूर्ती, मोठे भावंड, मित्र, शेजारी, काम त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.
१२ वे स्थान : त्रिक स्थान, मोक्ष त्रिकोण, हानी, खर्च, कर्जमुक्ती, परदेश गमन, गुंतवणूक, दिवाळखोरी, दान, गुप्त शत्रू, डावा डोळा ई. गोष्टी दर्शवते.
हे झाले बहुतांशी लग्नाच्या अनुरोधाने. त्यानंतर इतर स्थानांशी त्या स्थानाचा संबंध पापासून पहावा.
उदा. लग्नापासून ३ रे स्थान आपले धाकटे भावंड दाखवते. लग्नापासून ५ वे स्थान प्रथम संतती दाखवते, मग आपल्या दुसर्या संततीचा विचार करायचा झाल्यास प्रथम संततीचे धाकटे भावंड, म्हणजे ५ वे स्थानापासून ३ रे स्थान म्हणजेच लग्नापासून ७ वे स्थान आपली द्वितीय संतती दर्शवते.
४ थे स्थान आई दर्शवते मग आई चे धाकटे भावंड म्हणजेच लग्नापासून ६ वे स्थान आपला मामा, मावशी दर्शवतो.
२ रे स्थान कुटुंब स्थान मानले जाते, मग जोडीदाराचे(७ वे स्थान) २ रे स्थान म्हणजेच लग्नापासून ८ वे स्थान बायकोचे कुटुंब आणि आपली सासुरवाडी दर्शवते.
४ थे व ३ रे स्थान विचारात घेतले तर घरात बदल, घर विक्री, आईस आपल्या भावाव्दारे त्रास, आईचा खर्च, आईची यात्रा
९ वे १० वे स्थान विचारात घेतले तर, नोकरी व्यवसायातील स्थित्यंतरे, कामाच्या स्वरूपातील बदल, ई फळे विचारात घ्यावी.
अशा प्रकारे प्रत्येक स्थानापासून वेगवेगळी फळे निर्माण होतात. जातकाच्या प्रश्नाच्या अनुरोधाने त्याचे परीक्षण करावे.
त्यानंतर त्या स्थानात कोणती रास आलेली आहे याचे अवलोकन करावे. कोणत्या स्थानात कोणती रास आलेली आहे, त्या राशीची वैशिष्ट्ये व त्या राशीचा स्वामी त्याचे गुणधर्म या सर्व बाबी नीट तपासून त्याप्रमाणे फलादेशाची एक रूपरेखा तयार होईल.
येथे काही मुद्दे देत आहे ते ध्यानात घ्यावेत-
१. तो राशी स्वामी कोणत्या स्थानात स्थित आहे, त्याची २ री रास कोणते स्थान दर्शवते.
२. राशी स्वामी त्रिक स्थानाशी ( ६ वे, ८ वे, १२ वे) संबंधित आहे का.
३. ज्या स्थानाचे फळ बघायचे आहे त्या स्थानापासून अनिष्ट स्थानाशी संबंधित आहे का.
४. राशी स्वामी ग्रहावर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे का.
५. राशी स्वामी कोणत्या ग्रहाच्या युतीत आहे का.
६. त्या स्थानावर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे.
७. कृष्णमूर्ति पद्धती अनुसार रिक्त स्थानाचे अधिपतिच्या नक्षत्रात स्थित ग्रह त्याचे फल दर्शवितात. भावारंभास देखील महत्व दिले जाते. तो कोणत्या राशीत, नक्षत्रात व उपनक्षत्रात आहे हे तपासले जाते.
एका पित्याचा जन्म कन्या लग्न, चित्रा नक्षत्र प्रथम चरण मध्ये झाला. त्याला शनिची दशा चाललेली आहे. व चंद्र सुद्धा लग्नी स्थित आहे. जन्मवेळी शनि मेष मधे ८ वे स्थानात होता. याचे तात्पर्य पुढील प्रमाणे काढावयास हवे –
शनि मकरेचा अधिपति आहे व तो कन्या लग्ना पासून पंचम स्थानात आहे. मेषमध्ये स्थित असल्याने पंचम स्थानापासून केंद्रात आहे (अनेक ज्योतीषाचार्यांनी प्रतिपादन केले आहे एखाद्या स्थानापासून ४, ६, ८, १२ वे स्थानी पाप ग्रह असता ते स्थानाचे फळ नष्ट करू शकतील, आणि अन्य स्थानात स्थित ग्रह त्या स्थानांच्या फळामध्ये वाढ करतील.)
म्हणून अडचणी ज्या व्यक्तिस होतील, त्या पंचम स्थानाशी संबंधित व त्याचे द्वारा दर्शित होतील. खेळात त्याला अपयश येईल. प्रथम संततीची हानि होईल. त्याच्या मुलाचे संतुलन ठीक राहणार नाही, ज्या मुळे उत्तम स्वास्थ लाभणार नाही, त्याला स्वत:ला नेहमी पैसा कमविण्याची चिंता राहिल (शनि पंचमापासून दुस-या स्थानाचा पण अधिपति आहे) शनि षष्ठेश असून अष्टम असल्याने आपल्या स्थानावर शुभ दृष्टि देतो. म्हणून त्याचे कर्ज वाढू शकते व हे करताना त्याला अडचणी येणार नाही, कारण ती स्थिति शुभ आहे. जर एखादा ग्रह लाभ स्थानाचा अधिपति असून नुकसान दायक असता त्याच्या दशेमधे शुभ ग्रहाच्या मुक्तित लाभ प्राप्त होईल व अशुभ ग्रहाच्या मुक्ति मधे त्यास नुकसान होईल.
काही जणांची ही विचारधारा आहे कि, एखाद्या शुभ स्थानांचा अधिपतित्व द्वारा दर्शित शुभफल निरस्त होईल, कारण तो अशुभ स्थानाचा पण अधिपति आहे. माझ्या अभ्यासाप्रमाणे हे योग्य नाही. त्याला दोन्ही प्रकारचे फळ अनुभवास येतील. तो एक माध्यम द्वारा लाभ प्राप्त करेल व दुस-या माध्यम द्वारा नुकसानीत राहिल. त्याच्या खात्यात दोन प्रकारच्या घटना होतील १ जमा २ खर्च (लाभ व हानि). असे दोन्ही प्रकारचे फळ दिल्या विना दशा समाप्त होणार नाही. शेवटी तर त्याच्या दशेत अशुभ ग्रहांच्या अंतर्दशे/विदशे मधे त्याचा एक्सीडेन्ट होवून तो जखमी होईल, पण शुभ ग्रहाच्या अंतर्दशे/विदशे मधे तो ठीक पण होईल व त्याचे स्वास्थ्य उत्तम राहिल. चांगल्या स्थानाचे शुभफळ वाईट स्थानाचा वाईट फळाद्वारा निरस्त होणार नाही. जर ग्रह दोन्ही स्थानाचा अधिपति असेल.
अशा पद्धतीने अभ्यास व सराव करत गेले तर कोणीही माणूस एक चांगला ज्योतिषी बनू शकतो.