
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
नमस्कार,
राशी वर्गीकरण भाग १ मध्ये आपण राशींचे १३ विभागात केलेले वर्गीकरण व सकारात्मक व नकारात्मक राशि, उतरी व दक्षिणी, विषुवीय, अयन वृत्तिय राशि याचेबद्दल माहिती घेतली. भाग २ मध्ये आपण अग्नी, पृथ्वी, वायु, जल राशि या बद्दल माहिती घेणार आहोत.
(३) अग्नी, पृथ्वी, वायु, जल राशि :
राशीचक्रातील १२ राशींना चार तत्त्वांनुसार विभागले आहे.
जागतिक ज्योतिषी एलन लियो च्या मते अग्नी तत्व आत्मा व चेतन शक्ती, पृथ्वी तत्व पार्थिव शरीर, वायू तत्व नदी स्थानापासून मेंदू पर्यंत, जलतत्व ईश्वर ज्याच्यामुळे जन्म संभवतो हे दर्शवते.
मेष, सिंह, धनु या अग्नितत्वाच्या राशी आहेत.
वृषभ, कन्या, मकर या पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत.
मिथुन, तुळ, कुंभ या वायुतत्वाच्या राशी आहेत.
कर्क, वृश्चिक, मीन या जलतत्वाच्या राशी आहेत.
(क्रमशः) ………. उर्वरित माहिती पुढील भागात
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)


नमस्कार,
आपण राशी चक्रातील १२ राशींचे वर्गीकरण व प्रभाव वेगवेगळ्या भागात पाहणार आहोत, ज्याचा कुंडली अभ्यास करताना अथवा भविष्य कथन करताना खूप उपयोग होतो.
उदा. सकारात्मक राशी –
जर लग्नरास पुरुष राशि असेल व अन्य गोष्टी देखिल सहाय्यक असतील तर एखाया आधुनिक परिवारा मध्ये जन्मलेली स्त्री देखिल पुरुष स्वरूपाची वाढते. पण पुरुष लग्न राशिमध्ये एखादा अमूक स्त्री ग्रह बसला असेल तर अथवा लग्नेश स्त्री राशि असेल तर स्त्रियोचित गुणवाला पुरुष असतो.
जर ५ व्या स्थानाचा भावारंभ पुरुष राशी असेल व पंचमेश पुरुष ग्रह असून पुरुष राशि मध्ये स्थित असेल तर अधिकांश अपत्ये पुरुष लिंगी असतात अथवा स्त्री राशि असल्यास अपत्ये स्त्री लिंगी असतात. हा सामान्य नियम आहे.
लग्नाचे भावारंभी सकारात्मक राशि चेतना देते व नकारात्मक राशि इतकी बलवान नसते जोपर्यन्त बळी पुरुष ग्रह लग्नस्थानाच्या जवळ नसतील.
पृथ्वीच्या आसपासचे वातावरण आहे त्याभोवती ३६० अंशांत सर्व ग्रह एका काल्पनिक पट्टीमध्ये फिरताना दिसतात. जो राशीमार्ग आहे. हा तो मार्ग हे ज्यामध्ये पृथ्वीवरून पाहिल्यास सूर्य पृथ्वीच्या आसपास फिरताना दिसून येतो, यास क्रांती वृत्त म्हणतात.
राशि चक्र सारख्या १२ भागामध्ये विभाजित केले आहे, सोयीसाठी त्यातल्या पहिल्या भागाला मेष, दुसरे भागास वृषभ या प्रमाणे (१) मेष, (२) वृषभ, (३) मिथुन, (४) कर्क, (५) सिंह, (६) कन्या, (७) तुळ (८) वृश्चिक, (९) धनु, (१०) मकर, (११) कुंभ, (१२’) मीन अशा १२ राशी आहेत.
प्रत्येक सौर्यमान किंवा राशि ठीक-ठीक ३० अंशाचा असतो. राशिचक्रातील प्रत्येक राशिच्या नावाची उत्पत्ति, या मध्ये असलेल्या नक्षत्र समूहाच्या तुलनेनुसार केलेली आहे.
या राशींच्या जड़ किंवा चेतन पदार्थावर पडणाऱ्या प्रभावाच्या आधारावर स्थूल प्रमाणात १३ विभागात वर्गीकरण केले जाऊ शकते.
(१) सकारात्मक व नकारात्मक राशि
(२) उत्तरी व दक्षिणी राशी, विषुवीय राशि, अयन वृत्तिय राशि
(३) अग्नी, पृथ्वी, वायु, जल राशि
(४) चर, स्थिर व उभय राशि
(५) फलदायी व निष्फल राशी
(६) मूक राशि
(७) हिंसक राशि
(८) मानवीय राशि
(९) स्वर राशि
(१०) चतुष्पाद राशि
(११) द्विसंख्या राशि
(१२) द्वि तनु राशि
(१३) लघु व दीर्घ उदित राशि
सोबत एक तक्ता दिलेला आहे ज्यामध्ये १) सकारात्मक व नकारात्मक राशि
(२) उत्तरी व दक्षिणी राशी, विषुवीय राशि, अयन वृत्तिय राशि
याचे विश्लेषण दिलेले आहे, बाकी वर्गीकरण आपण सोयीसाठी वेगवेगळ्या भागांत पाहणार आहोत…
(क्रमशः)……….. पुढील भागात
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)


वारी
पंढरपूरचा विठु काल
अचानक आला घरी
आणि म्हणाला, आवर लवकर बयो
निघालेत वारकरी ।।
मी म्हणाले निघते हं विठु घरचं एकदा बघते।
शाळा सुटेल मुलांची त्यांना घेऊन येते।।
लगबग माझी सुरू झाली
नवऱ्याचे कपडे बघू की
मुलांसाठी खाऊ करु
एवढया कमी अवधीत
सगळं कसं आवरू ?
शेवटी एकदाची तयार झाले
आणि उंबऱ्यापाशीच थबकले ।
काळजातली गलबल लपवु पाहत होते।
डोळ्यांमधले अश्रु थोपवू पाहत होते ।।
नीट राहतील सगळे तुझ्याशिवायही घरी।
मीच मला समजावत होते परोपरी ।
घालमेल बघून तो हलकेच हसून म्हणाला,
यंदा असु दे,बघु पुढे केंव्हातरी ।।
माझा एक पाय आत,एक पाय बाहेर।
वाट अडवत होतं सासर, खुणवत होतं माहेर ।।
आता डोळ्यांमधलं पाणी काही केल्या थांबेना।
मला सोडून मग त्याचाही पाय निघेना।।
मी म्हणाले, सोपं नसतं रे विठु हे दुहेरी जगणं।
संसाराचे पाश तोडून तुझ्या मागे लागणं ।।
उपाय खूप सांगितलेत रे, मीच पडते कमी।
तूच आता काहीतरी दे बाबा हमी।।
कुणी म्हणतं ममत्व सोड ।
कुणी म्हणतं चाललंय ते मानून घे गोड ।
गोड मानता मानता ममत्व येणारच ना रे ।
गुंतलेला जीव प्रवाहात दूरवर जाणारच ना रे।।
एकच भीती वाटते विठु,
प्रवाहात पोहताना एकदिवस अचानक
तुटून जाईल ही श्वासाची दोरी ।
आणि कधीच घडणार नाही रे,
तुझ्या पंढरपूरची वारी ।।
माझ्या डोळ्यातले अश्रु त्याने अलगद पुसले ।
त्याच्याही डोळयांत कुठेतरी मला ते दिसले।।
माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला,
संसार सोडू नकोस,एक फक्त कर
श्वासाच्या दोरीवर नाव माझं झुलत ठेव।
चित्ताच्या पटलावर रूप माझं फुलत ठेव ।।
इंद्रियांना करू देत त्यांचं काम ।
मनावर मात्र घाल चांगला लगाम ।।
मग विषयांच्या गर्तेत मन तुला नेणार नाही।
प्रवाहात पोहताना दमछाक तुझी होणार नाही।।
तुझ्या हृदयातला माझा अंश ,त्याला ठेव साक्षी
त्याचीच असू दे तुझ्यावर सत्ता ।
मग बघ
मन,बुद्धी ,चित्त,अहंकार..
हळूहळू सुटेल आपोआप सगळा गुंता ।।
हळूहळू मग अहंकाराचं बंधन तुटेल।
हळूहळू संसाराची भ्रांत फिटेल ।।
अहंकार गेला की ममत्वही सुटेल ।
रज-तमाचं कवाड एक एक करून मिटेल ।।
हळूहळू गळून पडेल मग एक एक पाश ।
हळूहळू निरभ्र होईल मनाचं आकाश ।।
निर्विकल्प मनाला मग पैलतीर दिसेल।
आणि विश्वास ठेव पोरी!
पैलतीरावर हात देण्यासाठी, चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल ।।
पैलतीरावर हात देण्यासाठी, चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल ।।
🚩 जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल 🚩
🙏🙏
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
सौजन्य: व्हॉटसअप जग
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)