Category: Uncategorized

ग्रह विचार : शनी (Saturn)


नमस्कार,

आज आपण शनि या ग्रहाविषयी माहिती घेणार आहोत.

खगोलशास्त्र : शनिला शनिश्वर म्हणतात (शनै+चर) कारण हा राशिचक्रातील अन्य ग्रहांपेक्षा मंद गतीने भ्रमण करतो. हा सर्वात दूरचा बाह्य ग्रह आहे. (पूर्वीच्या काळी फक्त सात ग्रहांचा शोध लागला होता. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनि. युरेनस, नेपच्यून ई. ग्रहांचा शोध वर्तमान मध्ये लागला आहे.) शनिला डोळ्यांनी ने पाहिले जाऊ शकते.

शनी तीन सम केन्द्रीय वाल्यांनी घेरलेला आहे. हे वलय वेगवेगळे आहे. व दोन वलयांमधील जागा पोकळ आहे. शनि एक निळ्या चेंडूला तीन बांगड्यांनी घेरल्याप्रमाणे दिसतो.

शनि सूर्यापासून ८८ कोटी ६० लक्ष मैल दूर आहे. हा गुरु पेक्षा लहान आहे. याचा व्यास ७५००० मैल आहे, याचे ९ चन्द्र आहेत. पृथ्वीची चंद्राशी तुलना केली तर आकारामध्ये हा ७७० वेळा मोठा आहे. पण वजनामध्ये १०० गुणापेक्षा काही कमी आहे.

शनि सूर्याचे आसपास साडेएकोणतीस वर्षामध्ये एक चक्कर लावतो, म्हणून साधारण मानाने शनि प्रत्येक राशि मध्ये अडीच वर्ष असतो.

पौराणिक : शनिला यम म्हणतात का. हा दीर्घायुचा कारण आहे. हाला भगवान शिव वा इंद्राचे कर्तव्य पालन करावे लागते. शनि बर्फा प्रमाणे थंड ग्रह आहे. हेच कारण की मृत पावल्यानंतर म्हटले जाते की व्यक्तिचे हाय-पाय थंड पडले आहेत.

शनिला दोन पाप ग्रह आहेत. “गुलिका व “मंदी” चा पिता मानला जातो. शनिला नील व मंद पण म्हटले जाते. शनिला अपंग म्हटले जाते, याची एक गोष्ट आहे. जेव्हा रावणाचा पुत्र इंद्रजीत चा जन्म होणार होता, तेव्हा शनि ने आपला एक पाय ११ व्या स्थानाहून १२ वे स्थानी ठेवला. ज्या मुळे शनि बालकास गर्वित करू शकेल व वेळ आल्या वर त्याचे पतन होऊ शकेल. रावणाने त्याचा पुत्र इंद्रजीतचे जन्मवेळी सर्व ग्रहाना ११ व्या स्थानी ठेवण्याचा प्रयत्न केला, कारण ११ वे (लाभ) स्थानी स्थित ग्रह निःसंदेह रुपाने जातका करित चांगला असतो. बारा स्थाना मध्ये फक्त ११ वे स्थानच असे आहे की, तो जातकाची समस्त इच्छा व महत्वाकाक्षांची पूर्ति करतो. परंतु देवाना हे परिणाम माहित असल्याने त्यांनी शनिची प्रार्थना केली. व शनीने मुळे देवांना आश्वस्त केले. शनि ११ वे स्थानामध्ये फार शुभ असतो आणि १२ वे स्थानामध्ये पुष्कळ वाईट असतो, म्हणून शनि ने आपला पाय १२ वे स्थानी ठेवला. जेव्हा रावणास सूचना दिली गेली की त्याला मुलगा झाला त्यावेळी शनी ग्रह ११ वें स्थानी नसून १२ वे स्थानी आहे. रावनामे शनिचा एक पाय काढून टाकला म्हणून शनिला अपंग ही म्हणतात व की शनिला मंद ही म्हणतात.

शनि सूर्याचा पुत्र आहे. त्याचे गुण व विशेषता पहा – दोन्ही एक दुस-याचे विरुद्ध आहेत. चंद्राचा पण विचार करा, शनिशी त्याचा पण मेळ बसत नाही. हेच कारण की, शनिला मकर व कुंभ राशि दिलेली आहे, जी सूर्य व चंद्राच्या विरुद्ध आहेत.

पश्चिमी विद्वानाचा अनुसार शनि यूरेनस चा पुत्र व गुरु नातू आहे. जेव्हा त्याला हे समजले की त्याचा पुत्र, संसाराचा नाश करेल, तेव्हा त्याने त्याला मारले.  ईश्वर नेहमी प्रत्येकाच्या करणीनुसार फळ देत असतो, शनिने यूरेनसला राज्यावरून हटवले, तेव्हा गुरुने शनिला ठेवून घेतले व प्रकृतिच्या नियमाची दिक्षा दिली. अश्या प्रकारे अनेक कथा आहेत.

काही लेखकांच्या मते शनि ब्रम्हाचा प्रतिनिधी आहे. परन्तु सामान्यपाने त्याचे कार्य पहाता त्याशी सहमत नाही की शनि मानवीय जीवनाचे कार्य करतो. त्याला भगवान शिवरुद्रचा प्रतिनिधि हा  सिद्धांत जास्त योग्य वाटतो. सूर्यास  वा गुरु ला ब्रम्ह म्हटले जाऊ शकते. परंतु शनि मध्ये शिवाची विशेषता आहे. शनिला नील ही म्हटले जाते व शिवास नीलकंठ. शनि शिशिर ऋतु, फेब्रुवारी, मार्च ह्या थंड महिन्यांचा अधिपति असतो.

ज्योतिषशास्त्र : शनि निष्फळ, थंड, बंधनकारक, स्थिर, शुष्क, सुरक्षात्मक, कठोर, निराश व गुप्ततेचा ग्रह आहे. हा मकर व कुंभ राशींचा स्वामी आहे. मूळ त्रिकोण अथवा दिवसाची राशि कुंभ आहे व रात्रिचे स्थान मकर आहे. शनिची उच्च राशि तुळ आहे जेथे सूर्य नीचेचा असतो. शनिची नीच राशि मेष आहे, जी सूर्याची उच्च राशि आहे. सूर्याची राशि सिंह व चंद्राची कर्क राशि आहे. या दोन्ही शनिच्या पतन राशि आहे.

शनि बुध राशि मिथुन व कन्या व शुक्र राशि वृषभ व तुळ मध्ये स्थित असल्यास मित्रगृही मानले जाते व अन्य स्थानी स्थित असल्यास शत्रुचे घरी म्हटले जाते. शुक्राची बुधाची राशि मध्ये जन्मलेले व्यक्ति करिता शनि पुष्कळ शुभ म्हटला जातो. उत्तर कालामृत च्या अनुसार शनि स्वत:च्या राशि मध्ये अथवा गुरुच्या राशि मध्ये उच्चचा असेल तर तो शुभ फलदायक ठरतो.

कालिदासाचा विचार आहे की की जर शनि स्वामित्व द्वारे शुभग्रह आहे, तेव्हा’ त्यांना स्वक्षेत्री, उच्च वा वर्गोत्तम मध्ये असणे शुभ फळ देण्याकरिता शुक्राचे अंतर दशेमध्ये आवश्यक नाही, शुक्र दशा मध्ये बली, राजयोगा मध्ये शनि, राजा कुबेर पण दारोदार चा भिकारी बनतो.

कृष्णमूर्ति पद्धतिचे अनुसार शनि पुष्य, अनुराधा व उत्तरा भाद्रपदाचा स्वामी होत असल्याने या तिन्ही मधून एखादे नक्षत्रामध्ये स्थित ग्रहांस अश्या तो शनि स्वामित्व, स्थिती, द्वारे फळ देईल.

शनि उशीर करतो. हा फळापासून वंचित हि करू शकतो. हा निराश पण करू शकतो. प्रतिकुल फळ, तंटा, अडचणी, ई. वाईट शनि चे परिणाम आहेत, तर परिश्रम करणे, धैर्य, धैर्यतापूर्वक कार्य करणे, दूरदर्शिता, कमी खर्च, बचत, उद्योग, गुप्त रहाणीची शक्ति, स्थिरता, आत्मनियंत्रण, कर्तव्य परायणता ई. शुभ शनीचे कारण आहेत.

सुप्त, आळशी, बेकार, कुप्रभाव मध्ये असणारे, शनि द्वारे दर्शित होतात, त्याचा कधीही काम करण्याचा विचार होणार नाही. जर कधी ते कार्य प्रारंभ करतील तर अडचणी, बाधा, उत्पन्न होते अथवा त्याना निराश करतात. ते शंकाखोर होतात, त्यांना भीति वाटत राहते की, त्यांना एखाया कामामध्ये यश मिळेल किंवा नाही, म्हणून ते व्याकुळ होतील. ते दुस-यावर शंका घेतील, शनि मनात अविश्वास उत्पन्न करतो.

शनि जातक नेहमी गाडी चुकवितो, ते अधिकांश तर उशीरा रवाना होतील. कार्य करण्याकरिता लाभ प्राप्त करण्या करिता, ते स्टेजवर बोलल्याचा ही प्रयत्न करतील, ते चांगली तयारी करु शकतील, पण ऐनवेळी फक्त काही मुद्देच आठवू शकतात. शनिशी प्रभावित विद्यार्थी ना परीक्षेदरम्यान गोष्टी आठवणार नाहीत. पण जेव्हा ते परीक्षा भवनचा बाहेर येतात, तेव्हा त्यांना सर्व आठवते. एक शनिजातक आपल्या मित्राकडे एखादे कामानिमित्त जातो, तेथे पोहचल्यावर वेगळ्या गोष्टी मध्ये गुंतून जातो. तिथे काही बाधा उत्पन्न होते व त्याचे कार्यामध्ये अडचणी उत्पन्न होतात. शनि एक शक्तिशाली ग्रह आहे मग तो शुभ ग्रह वा रूपाने असो वा अशुभ ग्रहाचा रूपाने, हे पहावयास हवे की अंतर्दशा शनि चे काय फळ मिळू शकेल.

अश्या प्रकारे ज्या व्यक्तिचा जन्म मकर वा कुंभ लग्नामध्ये अथवा पुष्य, अनुराधा या उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये झाला असेल, ते शुभ या अशुभ शनिच्या त्याचे दशेमध्ये फळ देतील. शनि दीर्घायुचा कारक ग्रह आहे. दीर्घायु स्थानावर अर्थात अष्टम स्थानामध्ये स्थित असेल तर तो जातकास दीर्घायु बनवितो. “कारको भव नाशम:” हा श्लोक शनि बद्दल लागू होत नाही.

गुरु उत्पत्ति व विस्तारचा कारक ग्रह आहे. म्हणून गुरु उत्पादन करतो व शनि नष्ट करतो. ज्यामुळे समतोल राहतो. शनिच्या प्रभावामध्ये जन्मलेले लोक, गरम वस्तु पसंत करीत नाहीत. ते थंड वस्तु पसंत करतात. विशेष रूपाने थंड स्थानी ठेवलेली थंड वस्तु पसंत करितात. कारण शनि थंड ग्रह आहे. ते शिळे पण सुरक्षित खाण्यालायक अन्न खाऊ शकतात., शनि आंबट चव पसंत करतील.

शनि जेव्हा लाभदायक असेल तेव्हा खरा, ईमानदार, कार्य करणारा, विश्वास पात्र, शुद्ध व्यक्ति असतो. हा ध्यान, पतन, प्रार्थना, इ. मध्ये रमणारा असतो. पण शनि जातक जो सर्व कार्याकरिता उपदेश देत नाही. मौन धारण करतो, शांति धारण करती, भोज्य पदार्थाचे त्याग करतो, एकांत पसंत करतो. समाजाशी तूटक राहतो. शनि कधीही दुस-याचा विचाराची पर्वा करणार नाही. तो एकाग्री, मितव्ययी व गणना करणारा असतो. शनीचा रंग नीळा आहे. जेव्हा दुःखी, उदास, हताश, पराभूत मानत असाल, तर कधीही निळ्या रंगाचा पडदा, टेबल क्लाथ, भिंतींचा रंग अथवा अंगठी नीलम घेऊ नका. लाल रंग वापरा, जो मंगळाचा आहे, तो हिंमत देईल, सक्रिय करेल,

शनी दशेत त्याला निळा रंग आकर्षित करेल. म्हणून त्यास बळी पडायला नको. उलट रंगाचा वापर करा. शनिचा वाईट प्रभाव गुरु आठवा बळी मंगल द्वारे परास्त केला जाईल. मंगळ शनी ला शुभ दृष्टीने पहात असेल तर लाल रंगाचा प्रयोग करा. जर शुभगुरु शनिची पीडा कमी करतो म्हणून शुद्ध सोने वापरा.

ज्यांचे चंद्र व बुध शनिवारे पीडित असेल, तर हीनताचा अनुभव करतील व भीतीयुक्त भावना राहील. अशा स्थिती मध्ये लाल रंगाचा वापर करा. मूर्खता, मंदबुद्धी, मौलिकत्वाचा अभाव व विचार शून्यता शनिच्या खराब स्थितीच्या कारणामुळे होते.

हिन्दू संतांनी म्हटले गेले आहे की, व्यक्तिचा जन्म दिवसा होतो, तर त्याचा पिता सूर्य द्वारे दर्शित होतो व रात्रीमध्ये असेल, तर त्याचा पिता शनि द्वारे दर्शित होतो. शनिला सेंट पीटर म्हटले जाते. हा एखादे करिता स्वर्ग या नरकाचे दार उघडतो. शनि नीळ्या रंगाचा अधिपति आहे. काळा, भूरा व नील रंग पश्चिमी विद्वानाद्वारे शनीस मान्य केले आहे.

शनि लपलेल्या गुप्त गोष्टी, खाण व खाणीतून काढलेल्या वस्तु, कालव्याचे खोदकाम, नाले, कबर, खोदणे व जनाना, भूगर्भशास्त्र, भूमि व राज्यास दर्शवितो. शनि बटाटे, शेंगा ई जमिनीच्या आत उत्पन्न होणा-या वस्तुना दर्शवतो.

शनि दीर्घ काळाचे आजार, हाडां संबंधित आजार वा रोग, खाज, अंगभंग ई दर्शवतो.

शारीरिक : शनि दुबला, हडकुळा, पिवळा अथवा काळ्या रंगाचा व्यक्ति उत्पन्न करतो, चेहरा उदासीन असतो. या तर वास्तविक वयापेक्षा अधिक वयाच्या दिसतात. त्याची दृष्टिही अशी असते कि अतिशय निरखुन पहात आहे. तेज डोळे व बाहूबल, ही शनि जातकाची विशेषता असते. सामान्यपणे शनि जातक काही बहिरा असतो. तो लोकांना पुन्हा सांगण्याची विनंती करतो.

व आपला हात कानाजवळ नेईल, व जोराने बोलण्याचा इशारा करेल. शरीर उंच व पातळ असते.

शरीराचे भाग : अस्थी प्रणाली, हाडे, केस व त्याचे वाढणे, कान, दात इत्यादि.

आजार व रोग : शनि व चंद्राची प्रतिकूल दृष्टि असेल, तर मनामध्ये प्रश्नसंबंधी गोंधळ. शरीरामध्ये जेवणातील खराब गोष्टी साठणे, त्वचा कठिण होणे, पायरिया ई. उद्भवते. शनि मंगळ व चंद्राची अशुभ दृष्टि मध्ये देवी होतात, चालण्या फिरण्याचे बळ समाप्त होउन जाते,

शनि व मंगळाची वाईट दृष्टि असेल तर पडणे, घाव, जखम, शस्त्रक्रिया, अंग विछेद, हाड मोडणे इ. होते.

बुध व शनि पीडित असेल तर भीती वाटेल, कानामध्ये कष्ट, बहिरेपणा (चंद्रपण पीडित असेल तर कानामध्ये पू होतो) सर्दी, थंडी लागणे, दमा, फुफ्फुसा संबंधी, क्षय रोग, बोलण्यात दोष, लकवा, विटामिन बी कमी होणे इ. होते.

शनि व गुरु परस्पर पीडीत असेल, तर नपुंसकता, कब्ज, मनात मळमळणे, कैन्सर रोग होतो.

सूर्य व शनि विपरित दृष्टि मध्ये असेल तर ब्लडप्रेशर, एनीमिया, गाठी, हृदयरोग ई. होते.

शुक्र व शनि विपरित दृष्टि मध्ये असेल, तर तो मैथुनिक आजार, कोड, टक्कल, काळे निळे डाग,  रक्तदोषाने पीडित असतात.

वनस्पती, जड़ी व बूटी : द्विदलीय बीज, सीसम, केळाचे झाड, महुआ, काळे धान्य ई.

स्थान : एकांत, पहाडी टापू, जंगल, वाळवंट, गुहा, समाधि स्थान, घनदाट भाग, घातक नाशकारी जुने घर, चर्च, मंदिर, खड्डे, दरी, कोळश्याचे खड्डे, पायदान, विहीर, दुर्गन्धयुक्त स्थान, दलदलचे क्षेत्र, घाणेरडी जागा, सलून, चामडे, चप्पल कारखाना व असे स्थान ज्या मुळे मळमळते.

राजनैतिक : मोठ-मोठ्या भवनांचे निर्माण, कायदा, लोकसभा, सदस्यांची असहमति वा विचाराची भिन्नता, एखाद्याचा मृत्यु किंवा राज्य गमविणे, राज्याचे प्रतिष्ठेस धोका, निषेध, नियंत्रण, राशनिंग, आपत्कालीन अधिकार, प्रजा तंत्र चा दुरुपयोग, दुष्काळ,भूकंप, जनतेच्या पैश्याची बरबादी, भौतिक सर्वेक्षण ई. गोष्टी दर्शवतो.

आर्थिक : अधिक कर लावणे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये उदासी, निर्यातीत मंदी, विदेशी विनिमय मध्ये अडचणी, संप, अयशस्वी मध्यस्थी, नैसर्गिक आपत्ती मुळे बेकारी, राष्ट्रीयीकरण, प्रायवेट लोकाची संपति, राज्यकर्त्याची प्राप्ति व त्याचा धंदा, लुट, यातायात मध्ये अडचणी, अस्त्र शस्त्राची हानि, सर्व पदार्थाची कमी ई.

उत्पादन : जस्त (सूर्याच्या जोडीस), काजळ (चंद्रा बरोबर), घासलेट (शुक्र व चंद्राबरोबर), पेट्रोल (चन्द्र शुक्र मंगळ), पैट्रोलियम उत्पादन (चन्द्र व मंगळ), कोळसा (मंगळा बरोबर), खनिज पदार्थ (मंगळ व बुधा बरोबर), ह्युम पाईप (मंगळ व शुक्र), सिमेंट, हाडे, चामड़े (मंगळ), धातु शोधन विद्या (मेटेलर्जी)(शुक्रा बरोबर) लाकूड ई.

धंदा : जस्त, लोखंड वाले पदार्थ, केस, लोकर, चामडे, दगड खाण, धातु खनिज चा व्यापारी व उत्पादक.

सूर्य व शनि व्यवसाय दर्शवितात तर जातक मोठे उद्योग, जे शासन द्वारा चालतात, स्थानीय परिषद, पंचायत, कार्य, शासन जिल्हा बोर्ड, मध्ये नोकरी, सृजन ई.

चंद्र व शनि : शेतीविषयक, जुन्या विचारांचा उपदेशक, जुने रिवाज पाळणारा, परंपरा वादी, म्युझियम स्टेडियम मध्ये नौकरी करणारा.

मंगळ व शनि : मिस्त्री, नकाशे करणारा, सर्वेयर (बुध) इंजीनिअर, ठेकेदार भवन निर्माता (शुक्र), गुप्त रोग विशेषज्ञ (शुक्र व यूरेनस), एक्स-रे टेक्नीशियन ई.

बुध व शनि : इंजिनियर प्राचीन पुराण लेखक, कादंबरीकार, सेन्सर विभाग, लेखक (मंगळाच्या जोडीस), स्टेनोग्राफी, निगरानी विभाग, खोटा प्रचार, कथाकार, काळाबाजारी (शुक्राचा जोडीस) लाकूड तोड़े, शिक्षण, वैज्ञानिक ई.

गुरु व शनि : चिकित्सक, भूसंपत्तीचे दलाल, खाण मालक, बैंक मध्ये नौकरी, धार्मिक संस्था मध्ये कार्य, राजनैतिक कार्यालय, वैज्ञानिक लेबोरेटरी, मोठी कंपनी, क्लब, सोसायटी मध्ये नोकरी व जन्म नियंत्रणाचा साधनामध्ये कार्य व प्रचारक होती.

शुक्र व शनि : अभ्रकचा व्यापारी, अभ्रक खाणीमध्ये कार्य करणारा, शिंपी, पुंगी वाजविणारा, संगीत निर्देशक, सिनेमा जातक, एक्स्ट्रा व्यक्ति, ड्राफ्टमन, घोडे व हत्ती प्रशिक्षण देणारे, चर्मरोग, कोड व मैथुन रोग मध्ये तज्ञ ई.

आज येथेच थांबू.

ज्योतिष मित्र मिलिंद

संपर्क : ७०५८११५९४७

(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

कुंडलीतील रिक्त स्थान


नमस्कार,

आज आपण कुंडलीतील रिक्त स्थान याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.

प्रत्येक कुंडलीत १२ स्थान असतात. त्यामध्ये कोणता ग्रह किती अंश कलांवर आहे त्यानुसार नवग्रह व हर्शल, नेपच्यून, प्लुटो असे मिळून १२ ग्रह मांडलेले असतात.असे होत नाही कि प्रत्येक स्थानात १ ग्रह या प्रमाणे सर्व स्थाने व्यापून गेली. कोणते ना कोणते स्थान हे रिकामे च राहणार असते. पण याचा अर्थ असा नाही कि कोणता ग्रह नाही म्हणजे ते स्थान फळ देण्यास सक्षम नाही. उलट माझी मते रिक्त कुंडलीचा अभ्यास आधी प्राधान्याने करावा. त्यातून अनेक गोष्टी आपल्याला जसजसे सराव कराल तसे नजरेस पडतात, ज्याचा कुंडली सोडवताना नक्कीच फायदा होतो.

वस्तुत: ते स्थान रिकामे दिसत असले तरी, अनेक घटक त्या स्थांचे फळ देण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. त्याचाच आपण इथे थोडक्यात विचार करणार आहोत.

प्रथम ज्या स्थानाचे फळ पाहायचे आहे, त्या स्थानाची कारकात्वे कोणती आहेत याची आधी मनाशी उजळणी करावी.

उदा. १ ले स्थान : डोके, रंग, रूप, शरीराची ठेवण, शरीर सुख, आवड, स्वभाव, शील आरोग्य, आयुष्य, प्रश्न कर्ता, धर्म त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.

२ रे स्थान : धन, कुटुंब, वाणी, कुटुंबातील वाढ, वक्तृत्व. उजवा डोळा, आरोग्यासाठी मारक स्थान, अर्थ त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.

३ रे स्थान : कर्तुत्व, भावंडे, लेखन, वाचन, छोटे प्रवास, बदल, पत्र व्यवहार, दस्त, प्रकाशन, सन्मान, करार, अफवा, कान, कंठ, बाहू, काम त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.

४ थे स्थान : सुख, आई, जमीन, मालमत्ता, शेतीवाडी, जलाशय, गुरे ढोरे, स्थावर, वाहन सौख्य, छाती, मोक्ष त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.

५ वे स्थान : संतती, करमणूक, नाटक, सिनेमा, कला, क्रीडा, प्रेम प्रकरण, जुगार, पूर्व जन्म, छंद, प्रेम विवाह, धर्म त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.

६ वे स्थान शत्रू, कालः, वाद, संकटे, संघर्ष, आजार, नोकर, नोकरी, कोर्ट कचेरी, कर्ज, पाळीव प्राणी, भाडेकरू, कंबर, वासना, अर्थ त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.

७ वे स्थान : विवाह, जोडीदाराचा स्वभाव, लैंगिक सुख, व्याभिचार, प्रतिस्पर्धी, आयुष्य, चोर, चोरी, प्रवासा दरम्यान थांबा, व्यवसाय, पश्चिम दिशा, आरोग्यास मारक स्थान, काम त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.

८ वे स्थान : मृत्यू, आयुष्य, कर्ज मुक्ती, स्त्री धन, गुप्त धन, शत्रू वारसा हक्क, लाचलुचपत, मानहानी, संकटे, पीडा, दुर्भाग्य, मोक्ष त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.

९ वे स्थान : भाग्य, वडील, गुरुजन, धर्म, लांबचा प्रवास, प्रगती, कीर्ती, उच्च शिक्षण, पूर्व पुण्याई, अंतर्ज्ञान, मांड्या, धर्म त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.

१० वे स्थान : कर्म, नोकरी, उद्योग, अधिकार, प्रतिष्ठा, भागीदार, वैद्य, दक्षिण दिशा, अर्थ त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.

११ वे स्थान : सर्व प्रकारचे लाभ, इच्छापूर्ती, मोठे भावंड, मित्र, शेजारी, काम त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.

१२ वे स्थान : त्रिक स्थान, मोक्ष त्रिकोण, हानी, खर्च, कर्जमुक्ती, परदेश गमन, गुंतवणूक, दिवाळखोरी, दान, गुप्त शत्रू, डावा डोळा ई. गोष्टी दर्शवते.

हे झाले बहुतांशी लग्नाच्या अनुरोधाने. त्यानंतर इतर स्थानांशी त्या स्थानाचा संबंध पापासून पहावा.

उदा. लग्नापासून ३ रे स्थान आपले धाकटे भावंड दाखवते. लग्नापासून ५ वे स्थान प्रथम संतती दाखवते, मग आपल्या दुसर्या संततीचा विचार करायचा झाल्यास प्रथम संततीचे धाकटे भावंड, म्हणजे ५ वे स्थानापासून ३ रे स्थान म्हणजेच लग्नापासून ७ वे स्थान आपली द्वितीय संतती दर्शवते.

४ थे स्थान आई दर्शवते मग आई चे धाकटे भावंड म्हणजेच लग्नापासून ६ वे स्थान आपला मामा, मावशी दर्शवतो.

२ रे स्थान कुटुंब स्थान मानले जाते, मग जोडीदाराचे(७ वे स्थान) २ रे स्थान म्हणजेच लग्नापासून ८ वे स्थान बायकोचे कुटुंब आणि आपली सासुरवाडी दर्शवते.

४ थे व ३ रे स्थान विचारात घेतले तर घरात बदल, घर विक्री, आईस आपल्या भावाव्दारे त्रास, आईचा खर्च, आईची यात्रा

९ वे १० वे स्थान विचारात घेतले तर, नोकरी व्यवसायातील स्थित्यंतरे, कामाच्या स्वरूपातील बदल, ई फळे विचारात घ्यावी.

अशा प्रकारे प्रत्येक स्थानापासून वेगवेगळी फळे निर्माण होतात. जातकाच्या प्रश्नाच्या अनुरोधाने त्याचे परीक्षण करावे.

त्यानंतर त्या स्थानात कोणती रास आलेली आहे याचे अवलोकन करावे. कोणत्या स्थानात कोणती रास आलेली आहे, त्या राशीची वैशिष्ट्ये व त्या राशीचा स्वामी त्याचे गुणधर्म या सर्व बाबी नीट तपासून त्याप्रमाणे फलादेशाची एक रूपरेखा तयार होईल.

येथे काही मुद्दे देत आहे ते ध्यानात घ्यावेत-

१. तो राशी स्वामी कोणत्या स्थानात स्थित आहे, त्याची २ री रास कोणते स्थान दर्शवते.

२. राशी स्वामी त्रिक स्थानाशी ( ६ वे, ८ वे, १२ वे) संबंधित आहे का.

३. ज्या स्थानाचे फळ बघायचे आहे त्या स्थानापासून अनिष्ट स्थानाशी संबंधित आहे का.

४. राशी स्वामी ग्रहावर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे का.

५. राशी स्वामी कोणत्या ग्रहाच्या युतीत आहे का.

६. त्या स्थानावर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे.

७. कृष्णमूर्ति पद्धती अनुसार रिक्त स्थानाचे अधिपतिच्या नक्षत्रात स्थित ग्रह त्याचे फल दर्शवितात. भावारंभास देखील महत्व दिले जाते. तो कोणत्या राशीत, नक्षत्रात व उपनक्षत्रात आहे हे तपासले जाते.

एका पित्याचा जन्म कन्या लग्न, चित्रा नक्षत्र प्रथम चरण मध्ये झाला. त्याला शनिची दशा चाललेली आहे. व चंद्र सुद्धा लग्नी स्थित आहे. जन्मवेळी शनि मेष मधे ८ वे स्थानात होता. याचे तात्पर्य पुढील प्रमाणे काढावयास हवे –

शनि मकरेचा अधिपति आहे व तो कन्या लग्ना पासून पंचम स्थानात आहे. मेषमध्ये स्थित असल्याने पंचम स्थानापासून केंद्रात आहे (अनेक ज्योतीषाचार्यांनी प्रतिपादन केले आहे एखाद्या स्थानापासून ४, ६, ८, १२ वे स्थानी पाप ग्रह असता ते स्थानाचे फळ नष्ट करू शकतील, आणि  अन्य स्थानात स्थित ग्रह त्या स्थानांच्या फळामध्ये वाढ करतील.)

म्हणून अडचणी ज्या व्यक्तिस होतील, त्या पंचम स्थानाशी संबंधित व त्याचे द्वारा दर्शित होतील. खेळात त्याला अपयश येईल. प्रथम संततीची हानि होईल. त्याच्या मुलाचे संतुलन ठीक राहणार नाही, ज्या मुळे उत्तम स्वास्थ लाभणार नाही, त्याला स्वत:ला नेहमी पैसा कमविण्याची चिंता राहिल (शनि पंचमापासून दुस-या स्थानाचा पण अधिपति आहे) शनि षष्ठेश असून अष्टम असल्याने आपल्या स्थानावर शुभ दृष्टि देतो. म्हणून त्याचे कर्ज वाढू शकते व हे करताना त्याला अडचणी येणार नाही, कारण ती स्थिति शुभ आहे. जर एखादा ग्रह लाभ स्थानाचा अधिपति असून नुकसान दायक असता त्याच्या दशेमधे शुभ ग्रहाच्या मुक्तित लाभ प्राप्त होईल व अशुभ ग्रहाच्या मुक्ति मधे त्यास नुकसान होईल.

काही जणांची ही विचारधारा आहे कि, एखाद्या शुभ स्थानांचा अधिपतित्व द्वारा दर्शित शुभफल निरस्त होईल, कारण तो अशुभ स्थानाचा पण अधिपति आहे. माझ्या अभ्यासाप्रमाणे हे योग्य नाही. त्याला दोन्ही प्रकारचे फळ अनुभवास येतील. तो एक माध्यम द्वारा लाभ प्राप्त करेल व दुस-या माध्यम द्वारा नुकसानीत राहिल. त्याच्या खात्यात दोन प्रकारच्या घटना होतील १ जमा २ खर्च (लाभ व हानि). असे दोन्ही प्रकारचे फळ दिल्या विना दशा समाप्त होणार नाही. शेवटी तर त्याच्या दशेत अशुभ ग्रहांच्या अंतर्दशे/विदशे मधे त्याचा एक्सीडेन्ट होवून तो जखमी होईल, पण शुभ ग्रहाच्या अंतर्दशे/विदशे मधे तो ठीक पण होईल व त्याचे स्वास्थ्य उत्तम राहिल. चांगल्या स्थानाचे शुभफळ वाईट स्थानाचा वाईट फळाद्वारा निरस्त होणार नाही. जर ग्रह दोन्ही स्थानाचा अधिपति असेल.

अशा पद्धतीने अभ्यास व सराव करत गेले तर कोणीही माणूस एक चांगला ज्योतिषी बनू शकतो.

ज्योतिष मित्र मिलिंद

पुणे

संपर्क : ७०५८११५९४७

(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष शास्त्रीय छोटा उपाय / तोडगा


मंगळाची पीडा असेल तर, तिळगुळाच्या रेवड्या विकत घेऊन वाहत्या पाण्यात सोडाव्यात. अनिष्ट प्रभावापासून रक्षण होते.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Passed 50k Views


Happy to announce that

jyotish mitra milind web site

has passed 50,000 all-time views ✌🏻😊

Thank you all for your great support 🙏

and hoping the same always…

For any query or Astrological guidance
feel free to contact on 7058115947
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

jyotish mitra milind

Pune

ग्रह विचार (Planets)


१. ग्रह विचार : सूर्य (Sun)

२. ग्रह विचार : चंद्र ( Moon )

३. ग्रह विचार : मंगळ (Mars)

४. ग्रह विचार : बुध ( Mercury )

५. ग्रह विचार : गुरु (Jupitor)

६. ग्रह विचार : शुक्र (Venus)

७. ग्रह विचार : शनी (Saturn)

ग्रह विचार : गुरु (Jupitor)


नमस्कार,

आज आपण गुरु या ग्रहाबद्दल माहिती घेणार आहोत.

खगोलशास्त्र : गुरु नक्षत्रांच्या समूहापासून पुष्कळ लांब आहे. हा सूर्यापासून ५० करोड़ मैल दूर असून पुष्कळ मोठा ग्रह आहे. याचा ८८००० व्यास आहे, जो पृथ्वीच्या व्यासापेक्षा जवळ-जवळ दहा पट मोठा आहे. गुरुच्या ग्रह मार्गातील अर्थ व्यास ज्याचे वर गुरु भ्रमण करतो, तो जवळ-जवळ १४ करोड़ ३० लक्ष मैल आहे. गुरूला सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण करण्यास १२ वर्षापेक्षा थोडा कमी काळ लागतो.

गुरु मंगळ व शुक्रास सोडून इतर सर्व ग्रहापेक्षा तेज प्रकाशवाला ग्रह आहे. जेव्हा हा सूर्य व चंद्र यांच्या विपरित असतो, तेव्हा शुक्ल प्रतिपदे च्या दरम्यान रात्रिच्या वेळी हा स्पष्ट दिसतो. आकाशा मध्ये चंद्र प्रकाशित असेल तरीही, गुरु लहान डोळ्यांनी देखील पाहिला जाऊ शकतो.

गुरु गोल आहे. हा धृवावर चपटा आहे. हा पृथ्वीप्रमाणे त्याचे धुरीवर फिरतो. गुरुच्या वरील भागावर पूर्णपणे एकसारखा नाही म्हणून गुरुच्या सर्व भागावर भ्रमणचा काळ समान रूपाने नाही. हा आपल्या स्वत:भोवती पूर्ण एक चक्कर १० तास ला १० मिनीटे कमी असताना पूर्ण करतो.

गुरुचे ११ चंद्र आहेत, जेव्हा की पृथ्वीचा फक्त १ आहे व मंगळाचे २.

पौराणिक : गुरुला शिक्षक म्हटले जाते. अज्ञानाचे अंधकारास दूर करण्याकरता व ज्ञानाच्या प्रकाशास दीप्त करण्याकरता देवता गुरु द्वारे प्रदर्शित होते. प्राचीन ग्रीक लोक गुरुला ZEUS देवता वा पिता मानतात. इतर काही देशांमध्ये गुरुस AMMON, THOR, MERDACH ई. नावे आहेत. गुरु ईमानदारी व न्यायाची देवता आहे. हे बुद्धिमानीचे चिन्ह आहे. शैव लोक गुरुला “दक्षिणमूर्ती मानतात, वैष्णव लोक नारायण म्हणतात. गुरु हा देवांचा गुरु आणि शुक्र असुरांचा गुरु मानतात. त्यामुळे हे दोघे एकमेकांचे शत्रु आहेत असा समज आहे. परन्तु आदरणीय कृष्णमुर्ती यांचे असे मत आहे की-

१) जेव्हा गुरु व शुक्राची आकाशामध्ये युति असते, तेव्हा फक्त समृद्धीचे फल प्राप्त होते ते आकाशात भांडत नाहीत.

२) गुरु आत्माच्या विकासा करिता आहे, परलोक साधना करिता जाहे. सांसारिक जीवनात आत्मिक शांतीसाठी आहे.

शुक्र सर्व भौतिक सुखाकरिता आहे. यामध्ये ज्या मध्ये कार, फर्नीचर, ई आरामदायी वस्तू, पत्नी, प्रेम करिता इत्यादि अंतर्भूत. म्हणून जातकाचे मन हे संसाराच्या जीवनाच्या सुखाचा अधिक भोग घेण्यामध्ये रमतो. इहलोक सुख जास्त भोगतो. त्याला ईश्वराचे चिंतन करता, आध्यात्मिक विकासा करता वेळ कुठे आहे.

थोडक्यात दोन्ही ग्रहांद्वारा प्राप्त विचारधारा, चरित्र एक दुसर्याचे विपरित आहे, म्हणून ते शत्रु समाजले जातात.

(3) जर शुक्र गुरुचा शत्रु असता तर तो शत्रुची राशि मीन मध्ये उच्चचा कसा होऊ शकेल, ज्याचा स्वामी गुरु आहे. म्हणून ग्रहाचा शत्रूते बाबत बोलले जाते, त्याला वरील प्रमाणे समजून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

परन्तु हे काही अर्थी ठीक आहे की, जे लोक शुक्राच्या २ राशिमधून कोणत्याही एका मध्ये जन्मतात. तर गुरु ६ व ८ चा स्वामी असेल. अश्या प्रकारे जे लोक गुरु राशि धनु वा मीन मध्ये जन्मलेले असतील, त्याचे ६ व ८ चा स्वामी होईल, म्हणून गुरु शुक्र वाईट फल देईल. ज्या प्रकारे बुध जातका करिता व मंगळ व मंगळ जातका करिता बुध यांची मानसिक विचारधारा बिल्कुल विपरित असेल. बुध जातक एकदा दोनदा, तीनदा विचार करतात व मगच कार्य करितात, जेव्हा की मंगळ जातक पहिले कार्य करतील, मग विचार करितात.

जर गुरु आपल्या करिता लाभदायक आहे. स्थिती या स्वामित्व द्वारे व जर गुरु अन्य ग्रहा बरोबर युति मध्ये असेल, किंवा राशि नक्षत्रे किंवा स्थितीच्या मुळे संबंधित असेल, तर तो त्याचे प्रति आपला ठीक निर्णय करू शकतो व दृढ स्वभाव, चिंतन, मनन, ध्यान व प्रार्थना करणे यासाठी खालील स्तोत्र  उपयुक्त ठरतील.

  • गुरु सूर्य : सूर्य नारायण, सूर्य, नवग्रह
  • गुरु चंद्र : राजेश्वरी देवी लक्ष्मी
  • गुरु मंगळ : बाळ सुब्रम्हण्यम्, कुमारम्
  • गुरु बुध : सत्य नारायण
  • गुरु : नारायण या दक्षिण मूर्ति
  • गुरु शुक्र : लक्ष्मीनारायण
  • गुरु शनी : कृष्ण (गीता पारायण) इत्यादि.

गुरु इंद्रचे प्रतिनिधित्व करतो. हा शक्तिचा आधिपति आहे. हा ऋग्वेद व  हेमंत ऋतु (डिसेम्बर-जानेवारी) चा स्वामी आहे. हा सतगुणी म्हटला जातो. आपले भाग्य गुरु द्वारे दर्शित होते. तो धनाचा व परिवाराचा अधिपती ग्रह आहे.

ज्योतिष : एखादे जातकाचे कुंडली मध्ये गुरु व ९ वें स्थान त्याचे पूर्व जन्मात केले गेलेले पुण्य कार्यांना दर्शवतों. व या जन्मा मध्ये त्याला किती सफलता, मान, सन्मान, भाग्य व कीर्ति प्राप्त होईल, याची सीमा निर्धारित करतो. मग तेही अन्य ग्रह खराब स्थिति मध्ये स्थित असता व जातकाला अनेक अडचणी ना पार करणे व वाईट फळांपासून मुक्ति प्राप्त करण्या करिता कमीत कमी शेवटच्या वेळी दैवी सहाय्यता देतो. वाईट ग्रह अश्या वाईट फला’ करिता कारणीभूत होईल, परंतु गुरु ऐनवेळी दोस्त झाल्याने अंतिम क्षणी उपस्थित होईल व जातकास वाचवेल. जेव्हा की तो म्हणेल स`नकात आले होते, पण देवाने वाचवले..

उदा. एकदा एक मोटार सायकल सारखी बंद पडत होती व चालू करणे त्रासदायक वाटत होते. पोलीसामुळे त्याला थांबावे लागले होते. जेव्हा जाण्याचा संकेत दिला गेला, तेव्हा मोटर सायकल चालूच होईना. त्यावेळी अचानक मागील एक मोटरकार चा त्याला धक्का बसला, ज्या मुळे मोटर सायकल बिना काही प्रयत्न करता एकदम चालू होऊन गेली, कार त्याचे करिता ईश्वर होती.

गुरु अग्निमय, योग्य, लाभदायक, फलदायक, पुरुष ग्रह प्रसन्न, प्रसन्न आशावादी, खर्चिक, सकारात्मक ग्रह आहे, जातकाचा स्वभाव स्पष्ट व उदार असेल. गुरु उच्च आर्थिक योग्यता व योग्य निर्णय प्रदाण करितो. उच्च मेंदू व आत्मोन्नति गुरु द्वारे दर्शित होतात, म्हणून हा शिक्षण, कायदा, धर्म, देवदर्शन, बैंकिंग व्यवस्था व अर्थ व्यवस्था दर्शवितो. गुरु धार्मिकता, किती मोठ्याना सम्मान देईल, उपदेशक, पौराणिक कथा वाचक, उपनिषद, सन्मान दर्शवतो.

गुरु धनु व मीन राशिचा स्वामी आहे. हा कर्क राशि मध्ये उच्च असतो. धनु राशि चे चिन्ह धनुर्धारी आहे. म्हणून गुरुप्रधान व्यक्ती वा दशाकाळात ते नेम (निशाण लावण्यामध्ये तरबेज असतात), ते बाह्य खेळ व व्यायाम पसंत करितात. धनु राशि प्रवास दर्शवते., कारण ही राशि चक्रातील ९ वी राशि आहे व ९ वे स्थान दीर्घयात्रा ला दर्शित करते. ही एक द्विस्वभाव राशि आहे, जी लोलकाप्रमाणे हलणे फिरणे व एका स्थानापासून दूसरे स्थानी परत येणे दर्शित करते. गुरु मीन राशिचा स्वामी असल्याने जातक शांत होईल. आराम, दीर्घयात्रा व विदेशात जीवन व्यतीत करणे पसंत करेल. जातक धर्मा मध्ये विश्वास ठेवील. भावात्मक विचारधारा असू शकते. हा रहस्या मध्ये रुचि ठेवतो, कोणी व्यक्ति गुप्तचर असू शकतो, कादंबरीकार ही होऊ शकतो.

गुरु नियमाचा अधिपति आहे म्हणून जातक कायदे मानणारा, खरा, ईमानदार, विश्वसनीय वक्तव्यशील होईल. जातक तर्कयूक्त व विस्तृत विचारधारा ठेवेल. गुरु मीन राशिचा स्वामी आहे, जी राशि चक्रातील १२ वी राशि व ६ व्या राशि पासून ज्याला राशि चक्राचा दवाखाना म्हटला जातो, त्याचे विपरित आहे. कारण १२ वी राशि मीन जलराशी असल्याने हे दर्शविते की तोंडाने औषध घेण्याने तो ठीक होऊ शकतो. प्राचीनकाळी चिकित्सक लोक गुरुच्या अधिपत्या मध्ये औषध घेत असत. म्हणून गुरु जातक सामान्य पणे संभव असेल तर शल्य चिकित्सा पेक्षा औषध घेणे पसंत करतात. गुरु अधिपत्य द्वारे शुभग्रह असल्याने प्रसन्नता व उदारता, आनंद व उल्हास प्रदान करतो. याचा दशेमध्ये कोणी व्यक्ति सम्मानाची आशा करू शकतो. याचे द्वारे अनुकूल वातावरणाची प्राप्ति होईल. जीवनामध्ये उन्नति, समृद्धि, दार्शनिक व विश्वबन्धुत्वचा स्वभाव, चांगले चरित्र व नैतिकता शांति व समृद्धि स्वास्थ्य, धन, पण गुरुद्वारे मिळते.

गुरु पीडित असेल तर व वाईट स्थानांचा अधिपति असेल तर तो जातक अतिवादी होईल. हा पुष्कळ उदार, खर्चिक पण असेल अत्यंत आशावादी, खोट्या आशा, असावधानी, कर्ज, तंटे, सट्ट्यामध्ये असफलता, निराशाजनक कार्य, जुगार, बैकाचा दबाव, मुलाद्वारे कष्ट, खोटी प्रतिष्ठा, आपल्या क्षमतेपेक्षा अधिक संस्थाना दान देणे, मंदिर व धार्मिकतेचा देखावा, दुस-यावर विश्वास केल्याने नुकसान, सस्ती लोकप्रियता, कोप व कलंक, अत्यंत कष्टी, लंबोदर, चूकीचे निर्णय, चुकीची गणना हे सर्व कार्य गुरुचे आहे, जेव्हा अन्य ग्रहांची गुरुवर वाईट दृष्टि असेल.

शारीरिक आकृति : गुरुला एक न्यायाधीश म्हटले जाते व सेक्सपीयर ने न्यायाधीशचे सुदृढ शरीरवाला, लट्ठ, मोठ्या पोटाचा व्यक्ति असे वर्णन केले आहे. अश्या प्रकारे गुरु जातक युवावस्था मध्ये चांगल्या शरीराचा, मांसपेशी युक्त शरीर, बाह्य खेळामुळे असे धष्ट-पुष्ट होऊन जातात की ते आपल्या शरीर विकासाचा कारणाने सन्मानित केले जातात. जर कोणी व्यक्ति पूर्वी पासून एखाद्या सीट वर बसला असेल, ज्यामध्ये दोन व्यक्ति बसू शक्तात व जर गुरु जातक नंतर प्रवेश करितो तर व्यक्ति सीट रिक्त करून गुरु जातकास देतो. दूसरे लोकाना हे दिसले कि गुरु जातकाचे आदरामुळे असे झाले, यद्यपि त्या व्यक्तिने या करिता जागा रिकामी केली असती ज्यामुळे तो दबून जातो..

हा लिव्हर, गाठ, रक्त नळ्यांमध्ये रक्तसंचार व शरीरामध्ये चरबी दर्शवितो.

गुरु मुळे उत्पन्न होणारे रोग : लिव्हर, पीलिया, जलोदर, पोटामध्ये वायु विकार, मंदाग्नि, फोड, हर्निया, चर्मरोग इत्यादि.

प्राणी : घोड़े, हत्ती व बैल

पक्षी : मोर

स्थान : मंदिर, न्यायालय, कॉलेज, शाळा व मोठ-मोठे महाल, दरबार हॉल, विधानसभा सदन , , पुरोहित लोक व्याख्याने देतात, अथवा पुराणाचे वाचन, करितात, जेथे धार्मिक चर्चा होते, असे स्थान.

राजनैतिक : मोठ-मोठ्या योजना ज्यामध्ये अधिक खर्च होईल, मोठ-मोठे व्यापारी, अधिकारी, शासनद्वारे निर्मिती केली जाईल, शाष्ठा-कालेज-विश्वविद्यालय, दान योग्य संस्था, हॉस्पिटल, आश्रम, चिकित्सालय, वस्तीपासून दूरचे चिकित्सालय, जहाज, नोकरा करिता क्वाटर्स, बैंक बिल्डींग, चर्च, मशीद, कोर्ट मध्ये सुधारणा इत्यादि मोठ्या प्रमाणात केले जाईल.

आर्थिक : मुक्त व्यापार, अनियंत्रण, दीर्घ उत्पादन, मोठ्या प्रमाणात उत्पत्ति, मुद्रांचे चलन, रिजर्व बैंक मध्ये अधिक प्राप्ति व जमा, विदेशा मध्ये लाभ, विदेशी विनिमय ई पासून लाभ. परिणाम स्वरूप stock एक्सचेंजची गतिविधी, सामान्य पणे अधिक होतील, शेअरची किमती मध्ये अधिक दृढ़ता मध्ये वृद्धि होईल, नव्या-नव्या कंपन्या उद्द्मवतील, उत्पादन संतोषकारक राहिल, बोनस, शेअर्स दिले जातील, शासन, आयकर व अन्य अप्रत्यक्ष करामध्ये अधिक प्राप्ति करेल.

उत्पादन : सर्व चरबीयुक्त खाद्य पदार्थ, लोणी, तूप इत्यादि, मिष्ठान्न युक्त पदार्थ, मोठ-मोठे वृक्ष, रबर, धातु, सोने, टीन हत्यादि.

गुरुवर सूर्याची शुभ दृष्टि :

सूर्य जर गुरुवर शुभ दृष्टि असेल तर, तो जातक विस्तृत विचारधारा वाला असेल, विफलता व भयानक आजारापासून लवकर मुक्त व्हाल. जातकाचे प्रसन्नचित दयाळू व सहानुभूतिची प्रवृत्ति ने सर्वांशी मैत्री होईल. तो स्पष्ट रूपाने विचार करेल, कामात तरबेज असेल व योग्य तो निर्णय घेईल. तो योग्य मार्गाने कमवेल व त्याची प्राप्ति काळे धन नसेल, तो दुस-याचे नुकसान करून लाभ प्राप्त करणार नाही. तो धार्मिक असू शकतो व धार्मिक संस्थामध्ये अनेक संस्था पैकी तो एक स्वतः असू शकतो, न्याय, अर्थ, राजनीति, बैंक व शिक्षा विभाग व शिक्षण संस्था मध्ये तो कार्य करु शकतो. अध्यक्ष, मेयर, कौन्सलर, लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य, सम्माननीय पद, हे सूर्य वा चन्द्र यांच्या गुरुवर शुभ दृष्टिद्वारे प्रदर्शित होतात.

गुरुवर चंद्राची शुभ दृष्टि :

चंद्राची गुरुवर शुभ दृष्टि असेल, तर तो योग्य, महान तत्पर व आशावादी स्वभाव प्रदान करतो तो प्रसिद्ध, ईमानदार, वरिष्ठ असेल व जसजशी त्याचे वय वाढेल त्याचे शरीर रचना मजबूत होईल व तर्कबुद्धीत वाढ होईल. त्याचे आदर्श उच्च व त्याची कल्पना उपजाऊ व फलदायी होईल. कोर्ट कचेरी द्वारा कोणी त्रास व वायफळ खर्च होणार नाही. तो सट्टा वा जुगारा मध्ये निराशा चे अवसर प्राप्त करणार नाही.

गुरुवर मंगळाची शुभ दृष्टि :

मंगळ गुरु शुभ दृष्टि मध्ये असेल तर जातकास ईमानदार, विश्वसनीय व योग्यता प्रदान करतो, तो स्पष्ट वक्ता होईल व तो न हि उधळ्या व अधिक कंजूसही होणार नाही. तो व्यापारा मध्ये सफल व समाजामध्ये प्रसिद्ध होईल. कारण तो फार चतुर होईल. त्याचे मध्ये रचनात्मक योग्यता असेल. कोणतेही कार्य त्याला पूर्ण शक्ति द्वारे पूर्ण करेल, बाह्य खेळांची त्याला आवड असेल व तो उत्तम खेळाडू असेल व त्याचा नोकरीत लाभ होईल. जनरल मैनेजर ज्याचा तो स्पोर्टमन आहे प्रवासाची आवड, उच्च आदर्शाची इच्छा, जनरल मैनेजर, मैनेजिंग डायरेक्टर, एखादे समाजाचा अध्यक्ष, न्यायाधीश, धार्मिक प्रमुख, उत्तम स्वास्थ्य, चेतना, शक्ति व धैर्य हे लाभदायक दृष्टि द्वारा प्राप्त करेल, जेव्हा जातक या दोन ग्रहाची अंर्तदशा मध्ये असेल.

गुरुवर मंगळाची शुभ दृष्टि :

बुध व गुरु शुभ दृष्टि जातका करता एक संपत्ती आहे. तो नेहमी काही वस्तुच्या चांगल्या गोष्टीनाच पाहिल. प्रतिकुल वेळी सुद्धा तो उत्साह कायम ठेवेल, त्याचे मन पुष्कष्ठ विस्तृत राहील. तो चंचल राहील. बुद्धिमान पूर्ण सावधानी द्वारा शुम स्थिती निर्माण करेल. तो प्रामाणिक पणे कार्य करेल, तो बुधाला मुळे विचारधारा तयार करण्यामध्ये थोडा सावकाश असू शकतो. परन्तु त्यांना निश्चय वा अंतिम निर्णय विवादरहित असेल.

विधी, साहित्य विदेशाशी सम्पर्क, विदेशी सहयोग, आयात, निर्माण, ससंपादन, प्रकाशन, प्रसारण, गणित, बैंकिंग, अकाउन्ट्स, ऑडीटिंग, सिव्हील इंजीनियरिंग व तसेच अनेक व्यवसाय असू शकतात व एकापेक्षा अधिक व्यवसायामध्ये तो निपुण असू शक्तो, बुधा द्वारे आवडीची विविधता आढळून येते,

गुरुवर शुक्राची शुभ दृष्टि :

शुक्र व गुरु ला जर शुभ दृष्टिने पहात असेल, तर महान सफलता व उत्तम भाग्य निश्चित रुपाने दिसते. जातक धनाचा संग्रह करेल, जीवनामध्ये सर्व सुख प्राप्त करेल व चांगल्या स्त्रीशी विवाह होईल, तो अधिक सामाजिक सन्मान मिळवेल. तो नेहमी हसतमुख, प्रसन्न, आशावादी व विशाल हृदयी असतो. तो अत्याधिक आनंद आयुष्यातील सर्व सुख प्राप्त करेल. यात्रा द्वारे तो बऱ्याच मित्रांना आपलासा करेल. आपल्या इच्छांची पूर्ति मध्ये काही कमी ठेवणार नाही. तो दुस-या द्वारे विश्वासघात अथवा नुकसान प्राप्त करणार नाही. तो व्यापारा मध्ये असे जोडीदार निवडेल जे जन्मजात भाग्यशाली असतील. तो सोसायटी, क्लब, ई. मध्ये प्रिय असेल. राजनीतिज्ञ, असल्यामुळे जनता द्वारे प्रशंसनीय, सन्मानित व प्रेम प्राप्त करेल. सावकार पण त्याला सहायता देण्याकरिता तत्पर राहतील. वकील व न्यायाधीश पण त्याचे हिताचे भेटतील.  गुरु व शुक्र हे दोन्ही ग्रह त्याचे पेन्शनचा हिशोब, वेतनशीट इत्यादि वेळेवर देईल व तो कष्ट भोगणार नाही. परन्तु ज्याचा गुरु व शुक्र वाईट दृष्टियुक्त असेल, तर कितीही प्रयत्न केले तरी तो आपली पेन्शन वेळेवर प्राप्त करणार नाही.

जातक वस्तुतः अकाउन्ट्स, ऑडीट, संगीत, पशु चिकित्सा, सट्टा व स्वयंचलित यंत्र जसे कार चा व्यापार, जवाहिर, बहुमूल्य विलासिताच्या वस्तु, सुगंधित पदार्थ ई. द्वारे कमाई करू शकतो.

गुरुवर शुक्राची शुभ दृष्टि :

जर जातकाचे कुंडली मध्ये गुरु, शनि द्वारे शुभ दृष्टि प्राप्त करत असेल, तर त्याचे मन दार्शनिक होईल व तो आपल्या संबंधीयाना व मित्राशी अधिक संबंध ठेवणार नाही. त्याचे मध्ये न्यायाची भावना अधिक दृढ राहील व नैतिक कार्य द्वारे तो वृद्ध, लहान, सर्वांचे प्रेम प्राप्त करेल व समाजामध्ये उच्च सन्मान प्राप्त करेल.

जर तो खाण मालक, सिमेन्ट व्यापारी, सरकारी योजनाचा अंतर्गत घरांचा ठेकेदार असेल तर कमाईत भाग्यवान असेल. तो आपल्या मुलाबाळा मध्ये सुखी व धार्मिक जीवन व्यतीत करेल. उत्तम स्वास्थ्य व धनाचे सुख प्राप्त करेल. निवृत्तीनंतर योगासन चा अभ्यास वा सन्यस्त आयुष्य जगायची इच्छा ठेवेल.

आज येथेच थांबू.

ज्योतिष मित्र मिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

ज्योतिष शास्त्राचे एक अंग : शकून ज्योतिष (Omen)


नमस्कार,

ज्योतोष शास्त्राचा विकास अनेक नानाविध शाखांनी व वेगवेगळ्या भविष्यवाणी करण्याच्या पद्धतींनी झालेला आहे कि भरपूर पारंब्या असलेला एक डेरेदार वटवृक्षच जणू, अडलेल्या पांतस्थाला शीतल सावली देत आहे. अशीच एक वैशिष्ट्य पूर्ण शाखा म्हणजे शकून आठवा संकेत शास्त्र. पूर्वीच्या काळी अनेक ज्योतिषाचार्य व आजही काही जाणकार हे मानतात कि एखादा प्रश्न मांडताना कान, दृष्टी सजग ठेवून शकून पाहणे आवश्यक आहे, जे निश्चित व स्पष्ट भविष्यवाणी करण्यामध्ये फार उपयोगी सिद्ध होतील, कारण शकून स्पष्ट सूचना देउन ज्योतिषास चांगले मार्गदर्शन करतात.

“प्रश्नज्ञान’ ग्रंथामध्ये भटोत्बळ म्हणतात की, अंतरीक्ष अथवा बाह्य शकूनाच्या द्वारे जी निश्चयकारी तत्व आहेत, चांगले अथवा वाईट भविष्य कथन केले जाऊ शकते. असेही लोक आहेत जे शकून पाहिल्या नंतरच काही मनोमन काही निश्चित करतील. जर खराब शकून असला तर विवाह, घर खरेदी ई. कार्य ते करीत नाहीत व पुढे ढकलतील.

वराह मिहीरचे असे सांगणे आहे की शकून हे पूर्व जन्मातील चांगले व वाईट कर्माचे परिणाम दर्शवित असतात. शकून अंधविश्वास नाही.

शकुनास इंग्रजीमध्ये Omen म्हणतात. हा एक विस्तृत विषय आहे, या मध्ये मविष्यवाणी करता फार नियमांची गरज नाही. जर एखादे वेळी शकुन आढळले, तर त्याचा अर्थ काढणे हे व्यक्तीवर अवलंबून राहते, म्हणून तो बुद्धीमान मात्र असावा.

याप्रीत्यर्थ काही उदाहरणे देतो-

१) एक दिवस एक गुरु जापल्या शिष्या बरोबर शकुन व ज्योतिषा बद्दल विचार विनीमय करीत होते, एक जण अचानक आला व एक अतिमहत्त्वाचा प्रश्न शिष्या समोर विचारायला संकोच करू लागला. शेवटी गुरूने आश्वस्थ केल्यावर तो म्हणाला – माझी बायको मला सोडून गेली व काही गुप्त कारणास्तव ती वेगळी रहाते. तिचे अनेक महिन्या पासून पत्र वा संपर्क नाही. मी अत्यंत दु:खी आहे. माझ्या वैवाहिक जीवनाबद्दल भविष्य जाणू इच्छितो.

जेव्हा तो आपले दुःख प्रकट करत होता, त्या वेळेस गुरुपत्नी रस्त्यावरील सार्वजनिक विहीरीवर बादली व दोर घेऊन पाणी भरण्यास गेली व त्याचे म्हणणे पूरे होण्यापूर्वीच आत आली व तिने सांगितले की, ती पाणी भरत असतानाच दोरी तुटली व विहीर मध्ये बादली पडली, तरी ती वर काढा.

गुरुनी शिष्यांना विचारले की हा शकून पाहून या माणसाच्या प्रश्नाबद्दल तुमचे काय सांगणे आहे. ते सावधानपूर्वक विचार करून भविष्य सांगा. अधिकांश विद्यार्थी बोलले की पती व पत्नीचे बंधन मंगळसूत्र असते. शकुना मध्ये दोरी तुटली याचा असा अर्थ निघतों की, मंगळसूत्र तुटले, म्हणून पत्नी परत येणार नाही. पती-पत्नीचे बंधन आता राहणार नाही.

परंतु एका शिष्याने वैगळाच अर्थ घेऊन भविष्य सागितले की, ज्याच्या म्हणण्यास गुरूंनीही दुजोरा दिला.

तो म्हणाला कि, माझ्या दृष्टीने पत्नी लवकर भेटणार आहे. पती-पत्नी एकाच परिवाराचे असतात व नेहमी सोबत असतात. दोरी व बादली ही बाह्य विरोधी शक्ती आहे, जी पाण्यास पाण्यापासून वेगळे करू पाहत होते.. वाईट काळ टळला आहे. म्हणून दोरी तुटून बादलीतील पाणी पुन्हा विहीरीतील पाण्यास जाऊन मिळाले आहे. म्हणून व्यक्तीचे ही वाईट दिवस संपले आहेत व याची बायको पुन्हा येऊन आपल्या परिवाराबरोबर राहील.

अश्या प्रकारे अनेक पर्याय प्राप्त होतात व त्यातून शहाणपणाने तात्पर्य काढावयास हवे. जर पाणी काढल्यानंतर दोरी तुटली असती आणि पाणी बाहेर सांडले असते, तर पाणी विहीरी पासून वेगळे झाले म्हणून पती-पत्नी वियोग असा शकून झाला असता.

२) एक व्यक्ती आपल्या मुलाचे लग्न एका मुली बरोबर निश्चित करु या नको अश्या उद्वीग्न अवस्थेत होता. तो एका ज्योतिषाकडे गेला व ते या संदर्भात चर्चा करीत होते, तेव्हाच एका पोस्टमनने येउन एक लग्न पत्रिका दिली. हे पाहून ज्योतिषाने काही विचार न करिता सांगितले की, जी मुलगी पाहिली आहे तीच नक्की करा. कारण कोणतेही विवाहाचे निमंत्रण शकुन विचारात लाभप्रद होत असते. त्याने समजाविले की जर पोस्टमनने असे पत्र दिले असते, ज्या मध्ये विवाहा करिता कुंडल्या तपासण्यासाठी असत्या, तर मी सांगितले असते की आणखी मुली पहा. परन्तु पत्र हे सांगत आहे, की लग्न नक्की झाले. व काही दिवसात योग आहे म्हणून मी सांगू शकतो, की मुलगी डोळ्या समोर आहे तिच्याशी विवाह नक्की करा. काही जाठवड्या नंतर हा विवाह नक्की झाला. दोघेही उत्तम वैवाहिक जीवन उपभोगीत आहे. कोणी विवाह ज्योतिषास विचारून करत असोत वा नसोत, वैवाहिक जीवन त्याचा भाग्यानुसार होत असते, व हेच शकुनाद्वारे दर्शवले जाते.

देव ही नेहमी ज्योतिषास खरे भविष्य वर्तविण्या बद्दल मार्ग- दर्शन देत असतो. तो ज्याला शकून देतो, त्याचे पूर्व जन्म सकृत्य असावे. फक्त ते ज्यानी पूर्व जन्म पाप केले असेल त्यांना या जन्मी प्रत्येक कार्यामध्ये विपरीत परिणाम मिळतील. एवढेच नव्हे तर तो जाणकार ज्योतिषी देखील चुकीचे अर्थ घेऊन, चुकीच्या गणना आधारे सांगितलेले भविष्य चूकीचे असेल.

तेव्हाच भविष्य नीट असतील जेव्हा की दोघांचा ही काळ चांगला चालला असेल. जर त्यांचा काळ विपरीत असेल, तर प्रत्येक गोष्ट उलट होईल व जातकासही शांती प्राप्त होणार नाही. म्हणून फक्त चांगले कर्मच चागले फल देतात. म्हणून ज्योतिषशास्त्र आम्हास चांगले कार्य करणा-यांची आठवण देते. त्यामुळे लाभलेल्या ज्ञानाचा योग्य तो उपयोग करावा.

गर्ग मुनींनि देखील शिका प्रश्न, पल्ली पतन, काकशकून ई.वर लिहिले आहे ते येथे देत आहे..

शिंका प्रश्न :

शिंकेचा आवाज ऐकू आल्यावर लगेच आपली सावली आपल्या पावलांनी मोजावी. जितकी पावलें होतील त्यांत १३ मिळवावे, आणि त्या बेरजेस ८ ने भागावें. बाकी १। २। ६ उरले तर लाभ, आणि ३।४।५।७।० उरले तर कार्य होणार नाहीं असें समजावें.

आसनावर, शयनस्थानावर, दान देतेवेळी, भोजनाचे वेळीं, डाव्या बाजूस किंवा पाठीमागे अशा सहा ठिकाणच्या शिंका शुभ मानल्या आहेत. आपण महत्त्वाची गोष्ट बोलत असतां कोणी शिंकले तरच प्रश्न पहावा. एका शिंकेपेक्षा अधिक शिंका एकाच वेळी आल्यास प्रश्न पाहू नये.

 दिशापरत्वें शिंकाफल :

पूर्वेची शिंक अशुभ, आग्नेयीची दुःखकारक, दक्षिणेची विपत्ती कारक, नैर्ऋत्येची शुभ, पश्चिमेची मिष्टान्न भोजन देणारी, वायव्येची धनदायक, उत्तरेची कलह कारिणी, आणि ईशान्येची शुभ, असें जाणावें. तसेंच स्वतः आपल्याला शिंक आली तर भीति, ऊर्ध्व (वर) झाली तर शुभ, आणि मध्ये झाली तर मोठें भय याप्रमाणें समजावें.

काकशब्द शकुन :

आपण एखादी महत्त्वाची गोष्ट बोलत असतां कावळा ओरडला, तर लगेच प्रश्न पहावा. तो असा कीं, आपली सावली पावलांनी मोजून त्यांत १३ मिळवावे आणि त्या बेरजेस ६ ने भागावें. शेष राहील त्याचें फळ – १ उरेल तर लाभ, २ खेद, ३ सौख्य, ४ भोजन, ५ धनलाभ आणि उरलें तर अशुभ जाणावें, असें गर्गऋषींचे मत आहे. कोणाच्या मस्तकाला काकस्पर्श घडेल तर त्यापासून धनचिंता, रोग किंवा कलह हीं उत्पन्न होतात. स्त्रियांच्या मस्तकाला काकस्पर्श होईल तर पतीला किंवा अपत्याला अनिष्ट होय. परंतु एखाद्या वृक्षाखालीं राहिलें असतां, शिजलेलें अन भक्षण करीत असतां किंवा दहीं इत्यादि पदार्थ घेऊन जात असतां काकस्पर्श घडेल तर मात्र दोष नाहीं. काकमैथुन दृष्टीस पडेल तर तें अत्यंत अनिष्ट होय. म्हणून त्याबद्दल शांति करावी असें शांतिग्रंथांत सांगितलें आहे.

नेत्रस्फुरण :

थोडा वेळपर्यंत थांबून थांबून जर डोळा लवत असला तरच प्रश्न पहावा. कधीं कधीं दोनतीन दिवस पर्यंत देखील एकसारखा डोळा लवत असतो. तो बरेचदा वातविकारानें लवत असतो. अशा वेळेस प्रश्न पाहूं नये. नेत्राच्या वरील पापण्या स्फुरण झाल्या तर मनाचें दुःखहरण किंवा धनप्राप्ति, भिवयांच्या मध्ये स्फुरण होईल तर प्रियाची भेट, नासिकाजवळची स्फुरण झाली तर रोग, अधरप्रांत स्फुरण झाल्यास अपजय, असें जाणावें. पुरुषाचा उजवा डोळा लवत असला तर हीं फळें घ्यावी. डावा लवत असला तर त्याच्या उलट फळें घ्यावी. तसेंच स्त्रियांचा डावा लवत असला तर शुभ, आणि उजवा लवत असला तर अशुभ होय असें जाणावें.

पल्लीपतन :

अंगावर पाल पडली तर सचैल (त्या वेळेस अंगावर जीं वस्त्रे असतील त्यांसुद्धां) स्नान करावें. आणि शंकराचे देवळांत जाऊन तुपाचा दिवा लावून ॐ नमः ‘शिवाय’ या षडक्षरी मंत्राचा अकराशें निदान १०८ जप करावा, म्हणजे दोष दूर होतो असे ग्रंथांत सांगितलेलें आहे.

शरीरस्थान परत्वें शुभाशुभ फलें :

मनुष्य प्रयाणास निघाला असतां जर अंगावर पाल पडली तर त्याची फळें खालीं लिहिल्याप्रमाणे समजावीं. अशुभ फल असतां प्रयाण करूं नये.

उजवें मनगट… धनक्षय. डावें मनगट… धनकीर्तिलाभ, नखें… धान्यलाभ. मुख… मिष्टान्नभोजन. केस….रोग.. दक्षिणपाद… मार्ग चालणे. वामपाद…बंधुनाश. पावलांचा मध्य… विनाश. पावलांचा अंत… रोग. स्तन दुर्भाग्य, उदर…. आश्रयप्राप्ति. दक्षिणबाहु… राजाश्रय. वामबाहु… राजक्षोभ, पाठ…….बुद्धिनाश. ढोंपर, पोटऱ्या… शुभ. दोन्ही हात… वस्त्रलाभ. खांदा… विजय, नाभि …बहुधन,. मांड्या…वाहनलाभ. ई.

तर असे हे शकून शास्त्र आजच्या ज्योतिषांनी त्यावर काळानुसार संशोधन करून, त्यातून काही चांगले निष्कर्ष हाती लागत असतील तर त्याचा सर्वांना उपयोगच होईल, असे मला वाटते.

ज्योतिष मित्र मिलिंद

संपर्क : ७०५८११५९४७

(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

माया विचार (अध्यात्मशास्त्र)


नमस्कार,

आज आपण माया म्हणजे काय हे उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वात प्रथम मला हे स्पष्ट करणे आवश्यक वाटते कि, मी कोणी या क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती नाही तर एक सामान्य सांसारिक माणूस आहे.. परंतु लहानपणापासून प्रचंड वाचन व एक ज्योतिष अभ्यासक म्हणून ज्या गोष्टींचे चिंतन व मनन करत गेलो त्याचा परिपाक म्हणून माया या विषयाला हात घालायचे धाडस करतोय.

जसजसे या विषयांवर वाचन वाढत गेले, तसतसे हे जाणवत गेले कि, या विषयावर लिहिली गेलेली अनेक पुस्तके हा विषय समजून सांगण्यापेक्षा अनेक संतपुरुष, महाराज यांच्या अनुभूती, साक्षात्कार आणि चमत्कारांच्या वर्णनानेच जास्त पाने भरलेली आहेत. त्यातून कुतूहल तर निर्माण व्हायचे पण अज्ञानाचा भोपळा कायम तसाच राहायचा आणि अनेक प्रश्न मनात फेर धरून नाचायचे. उदा. ब्रह्म नि माया म्हणजे काय? माया जर मिथ्या असेल, तर ब्रह्म या सत्यमय ज्ञानाला ती कशी झाकाळू शकते? मायेमुळे सामान्यजनाला ब्रह्माचे ‘सत्य’ दर्शन होऊ शकत नाही, असे म्हटले जाते. तेव्हा माणसाने या मायेच्या तावडीतून आपली मुक्तता तरी कशी करायची? ई.

तर माझ्या अल्पबुद्धीला जे माया या विषयी आकलन झाले ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

ब्रह्म आणि माया या गूढांची उकल करण्यापूर्वी आपणाला खरे नि मायावी काय हे प्रथमत: समजून घ्यायला हवे. माया व ब्रह्म ही दोन्हीही तत्त्वतः काल्पनिक व प्रत्यक्षात दिसणारी नसल्याने, त्यांच्या बद्दलचा समज किंवा ज्ञान उपमा नि रूपकांनीच करून घ्यावे लागेल. कारण माया व ब्रह्म यांची सुस्पष्ट जाण येणे हा एक अनुभवच आहे. व्यक्तिपरत्वे, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार. उदा. ऊन तळपत असता मृगजळ दिसते ते सर्वांनीच पाहिलेले असेल. तो भास इतका खरा असतो की, ज्याला त्याबद्दलचे पूर्वज्ञान नाही, त्याला ते पाणीच वाहत आहे असे वाटते. कोणी त्या अज्ञानी माणसाला पाणी नाही म्हणून, कितीही पटविण्याचा प्रयत्न केला तरी, जे डोळ्यांना प्रत्यक्ष दिसतेय तेच नाही म्हणणाऱ्या नि तसे समजावून देणाऱ्या व्यक्तीला बरेच वेळा मूर्ख ठरवले जाते. कारण इथे प्रत्येक जन स्वतःला शहाणा समजत असतो. समाधान व्हायचे म्हणजे स्वत: अनुभव घेऊन खोटेपणा पटणे याशिवाय अन्य मार्ग नाही. फार कशाला, ज्याला जीवनशक्ती किंवा चैतन्य किंवा ब्रह्म म्हणतात त्याच्याचमुळे ही माया उत्पन्न होते असे म्हटले तर ते सहज कोणाला पटेल अगर समजेल असेही नाही.

सारांश काय तर मायेचे खोटेपण हे अनुभवानेच येणारे शहाणपण असल्यामुळे नुसते सांगून समजणारी ती गोष्ट नव्हे. सूर्य जोपर्यंत तळपत आहे तोपर्यंतच मृगजळाचे अस्तित्व असते. सूर्य उगविण्यापूर्वी किंवा सूर्य मावळल्यावर त्याचे अस्तित्वच नाही. माया सुद्धा तेव्हाच अस्तित्वात येते की, जेव्हा ब्रह्म’ किंवा चैतन्य शक्ती  जोमात कार्य करत असतात. जेवढे चैतन्याचे स्फुरण जास्त कार्यक्षम, तेवढे मायेचे अस्तित्वही सुस्पष्ट. मृगजळातही झाडेझुडपे दिसतात. प्रतिसृष्टी तिच्यात उत्पन्न होते. मृगजळ संपले की, त्या सृष्टीची नामोनिशाण राहत नसते. सूर्य उगवताना तेवढा तीव्र नसतो, त्या वेळी मृगजळही नाही. पण जेव्हा तो माथ्यावर येऊन भोवतालची सृष्टी तापते तेव्हाच मृगजळही सुस्पष्ट होते आणि आपल्यापुढे झऱ्याप्रमाणे वाहताना दिसते. माया नि ब्रह्माचे परस्परावलंबित्व असेच आहे. ब्रह्माबरोबरच मायेचे अस्तित्व व नसतेपण अवलंबून आहे. हीच उपमा पुढे पुढे नेली, तर सूर्य कधीच उगवत नसतो किंवा मावळत नसतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना त्याच्या सामोरी येते किंवा पाठ फिरवते नि आपण म्हणतो, की सूर्य सकाळी उगवला नि संध्याकाळी मावळला. वस्तुतः सूर्य आहे तिथेच असतो. तो अपरिवर्तनीय, अविनाशी, चैतन्यस्वरूप आहे. आणि आपण मात्र दर दिवशी गोल फिरून त्याचे समोर उगवत असतो, तसेच मृगजळ क्षणजीवी आहे, त्याचा जन्म अगर मृत्यू अगर विनाश सूर्याच्या अस्तित्वावर आणि सूर्याच्या तळपण्यावर अवलंबून आहे.  त्याच अनुरोधाने तुमच्या लक्षात आले असेल की, ब्रह्म हे जीवनशक्ती स्त्रोत- चैतन्यस्वरूप आहे. त्याला जन्म नाही नि मृत्यूही नाही. पण मायेच्या बाबतीत मात्र ती गोष्ट खरी नव्हे. ज्याला ज्याला जन्म-मृत्यू आहे, आदि-अंत आहे, जे नाशवंत आहे, नश्वर आहे, अशाश्वत आहे ते सर्व, थोडक्यात म्हणायचे म्हणजे ‘माया’स्वरूप आहे.

ब्रह्मावर मायेचे आवरण कसे?

सूर्यामुळे मृगजळ उत्पन्न होते हे आपण पाहिले. मृगजळाचे अस्तित्व सूर्यावर अधिष्ठित तसाच त्याचा शेवटही. पण तुम्ही जर मृगजळाचे नीट निरीक्षण केले असेल, तर त्या मृगजळात ज्याप्रमाणे झाडेझुडपे दिसतात, त्याप्रमाणे त्याच्या पाण्यात सूर्याचे प्रतिबिंबही उमटलेले दिसते. हा सारा विलोभनीय चमत्कार बघताना क्षणभर स्वतःला त्या मृगजळात स्थापन करून पाहण्याचा प्रयत्न करा. स्वतः सूर्यच ते मृगजळ घडवून आणण्यात मश्गूल झाला आहे व ते घडवून आणण्यात त्यालाच एक विशिष्ट आनंद वाटत आहे, तोच मृगजळात आनंदाने डुंबतो आहे, असे तुम्हाला वाटेल. हे असे वाटणे त्याच्या अनुभवाप्रमाणे बरोबर असेल कदाचित. पण वस्तुतः या म्हणण्यात काहीही सत्यांश नाही. सूर्याला या मृगजळाशी काहीही कर्तव्य नाही; त्याच्या किरणांनी गुंफले गेलेले ते एक फक्त हलते-चालते चित्र आहे. फार काय तर, आपल्यामुळे मृगजळे निर्माण होत आहेत याची जाणीवसुद्धा सूर्याला नसते. मग मृगजळाबाबत त्याला कसला आलाय खेद आणि खंत. मृगजळ उत्पन्न झाले काय, दिसले काय नि नाहीसे झाले काय, सूर्याला त्याबाबत कसलीही फिकीर नसते.  त्याचप्रमाणे, ब्रह्म चैतन्य, ‘माया’जालात कधीही गुरफटत नाही वा ‘माया’ त्यावर कसलेही आवरण घालू शकत नाही. तिच्या अस्तित्वाबद्दल ना ब्रह्म-पुरुषाला आनंद किंवा नसण्याबद्दल खेद. मायेच्या अस्तित्वाची त्याला जाणीवच नसते मुळी….

मनुष्य मायेत गुरफटतो म्हणजे काय, नि मायेतून बाहेर कसे पडायचे?

पुन्हा पूर्वीचीच सूर्य व मृगजळाची उपमा डोळयांपुढे ठेवा. सूर्याची उष्णता ही नेहमीच कायम आहे. ऋतुपरत्वे त्या तापमानात आपल्याला फरक वाटतो. त्याच्या उष्णतेने जीवसृष्टी निरनिराळी रूपे घेते. आपण सूर्याची उष्णता ग्रहण करतो, ती बदलत्या कोनांतून कधी तिरकी तर कधी सरळ किरणांतून ग्रहण करीत असतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते नि सूर्याभोवतीही निरनिराळ्या कोनांतून फिरत असते. त्यामुळे कालमानाप्रमाणे सृष्टीतील वातावरणात सारखे बदल होत असतात; आणि त्याला इतरही भौगोलिक किंवा तात्कालिक कारणे असतात. सूर्याच्या उष्णता प्रदान करण्याच्या कार्यावर व शक्तीवर या कारणांचा काहीही परिणाम होत नसतो. चैतन्याबाबतसुद्धा हाच नियम लागू पडतो. जीवसृष्टीत चलनवलन होते ते या जीवनशक्तीमुळेच; शून्याकार अवकाशातूनच ती शक्ती सृष्टीवरील वस्तूंवर संक्रमित होते; नि त्यातूनच ‘माया’ उत्पन्न होते. सूर्याने मृगजळ जन्मते, पण पृथ्वीच्या प्रत्येक पृष्ठभागावर ते निर्माण होत नाही; तर सहारा वाळवंटासारख्या प्रदेशात किंवा माळरानावर ई. ठिकाणी ते दृश्य उमटते. मायेचा जन्म जीवनाच्या पोकळीत उत्पन्न व्हायलाही काही गोष्टींची आवश्यकता आहेच. परंतु, त्यांचा चैतन्याशी काहीही संबंध नाही.

आधी सांगितल्याप्रमाणे मृगजळ खरे त्याला वाटते, ज्याला त्याचा अनुभव नाही, ज्ञान नाही. आपल्या सर्वांच्या ऐकण्यातला, पाहण्यातला हा अनुभव आहे की, पाण्याने भरलेल्या बादलीत जेव्हा सूर्याचे किंवा चंद्राचे प्रतिबिंब पडते, तेव्हा लहान मुलाला वाटते की, सूर्य किंवा चांदोबा पाण्यात पडला आहे. यावरून हेच सिद्ध होते की, ज्ञान व अनुभव यांच्या समन्वयानेच मायेपासून सुटका होत असते. ब्रह्म आणि माया यांचा परस्परसंबंध स्पष्ट व्हावा म्हणून केवळ, वरील सर्व उपमांचा उपयोग केला आहे.

यावरून तुम्हाला लक्षात आले असेल की, मायेला जन्म देणे हा ब्रह्मतत्त्वाचा कधीही हेतू होऊच शकत नाही. ‘ब्रह्म’ हा एक चैतन्य स्त्रोत – शक्ती आहे आणि अखिल विश्वात ती संक्रमित झालेली आहे. म्हणूनच ब्रह्माची शक्ती व प्रभाव विश्वातील सजीव व निर्जीव दोन्ही सृष्टीत दृग्गोचर होतो. म्हणजेच मायेच्या साऱ्या सृष्टीतही तो आढळतो. या विश्वात असंख्य योनी व सृष्ट पदार्थ आहेत. त्यांचा आकार कसाही का असेना, अखिल विश्वाच्या कणाकणांत ब्रह्म व्यापून राहिले आहे. ते चैतन्य प्रत्येक वस्तूं मध्ये, प्राणिसृष्टी मध्ये दिसेल. ती चैतन्य शक्ती कधी दृश्यमान होईल, तर केव्हा सुप्तरूपाने ती वसत असेल, पण तिच्या विरहित असा कुठलाही अवकाशच नाही.

उदा. आपणा सर्वांना वीज ठाऊक आहे. समजा दिवाणखान्यात आपण सर्वजण बसलो आहोत. इथे किती तरी दिवे लागलेले आहेत. विद्युतकेंद्रात किती वीज तयार होते याचे आपल्याला ज्ञान नसते किंवा ते करून घेण्याची दैनंदिन जीवनात आवश्यकताही वाटत नाही. परंतु त्या विजेचा निरनिराळे उपयोग मात्र आपणाला माहीत असतात. बटण दाबले की दिवा लागतो, इस्त्री वगैरे साधने कार्यक्षम होतात, मोठमोठ्या अवाढव्य यंत्रांना गती मिळते. आता कुणी असे म्हणेल की, जिथे दिवा जळत असतो तिथेच फक्त विजेची शक्ती आहे किंवा विजेची उपकरणे अगर यंत्रे जिथे काम करतात तिथेच फक्त विजेचे अस्तित्व आहे; ज्या तारांतून ती वीज दिव्यांपर्यंत किंवा यंत्रांपर्यंत पोचली त्या तारेत तिचे अस्तित्व कोठेही दिसत नाही, तर ते म्हणणे बरोबर होणार नाही. कारण त्या तारांव्दारेच वीज वाहत येते आणि जिथे तिथे त्या तारांना तोंड फुटते, तेथे तेथे तिचा आविष्कार होतो. तीच गोष्ट ब्रह्म, चैतन्य, ईश्वरी सत्ता यांना लागू आहे….

चित्स्वरूप सर्वव्यापक आहे. सर्व विश्वात, अणूरेणूत भरून राहिले आहे. त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येक सृष्ट पदार्थातून होत असते. यावरून हे स्पष्ट होईल की, मायेनेच ब्रह्म प्रकट होत असते. माया ही ब्रह्माची प्रकट दशा आहे. विश्वातील प्रत्येक वस्तूत ब्रह्मत्वाचा, अगर चैतन्याचा आविर्भाव तुम्हाला आढळेलच आढळेल. फरक एवढाच की काहींमध्ये तो चैतन्याचा प्रभाव बराच काळ टिकून राहील, तर काहींमध्ये तो क्षणभरच टिकेल. हा फरक पडण्याचे एकमेव कारण हेच की, प्रत्येक वस्तूचे घटक व गुणवत्ता वेगवेगळे असतात. पण प्रत्येक वस्तू आज ना उद्या नष्ट होणार हे अपरिवर्तनीय तत्त्व मात्र प्रत्येक वस्तूबाबत खरे आहे, मग नष्ट व्हायला कमी अधिक वेळ का लागेना.

जेव्हा विजेच्या दिव्याची झगझगीत तार तुटते तेव्हा, बल्ब काळवंडून पुन्हा प्रकाश देण्याचे त्याचे सामर्थ्य संपते. तेथे पुन्हा उजेड यावा म्हणून आपण विजेचा नवा प्रवाह आणत नाही, तर फक्त बल्ब नवा आणून लावतो. विजेचा प्रवाह अखंड व अव्याहत चालूच असतो नि तो प्रकट होतो, तो फक्त बल्ब बदलल्यामुळे, म्हणजेच नाशवंत गोष्ट बदलल्यामुळे किंवा आयुष्य संपलेला बल्ब फेकून देऊन नवा लावल्याने. म्हणजेच, ज्या माध्यमातून विजेचे प्रकाश-तत्त्व प्रकट होते तो बल्ब ही वस्तू मुख्य नाही. कारण ती नादुरुस्त होते. तिला एक तर दुरुस्ती करावी लागते किंवा तिच्या जागी दुसरी वस्तू आणावी लागते. जे काम देईनासे झाले, मृत झाले ते फेकून द्यावे लागते. मूळ विजेचा प्रवाह व त्याची प्रकाश देण्याची शक्ती कायमच असते. हा न्याय सृष्टीनिर्मितीला लावून पाहिलात, तर सारे विश्व निरनिराळ्या आकाराच्या सजीव किंवा निर्जीव वस्तुरूपाने बनलेले असते; त्यांच्यात जीवचैतन्य, प्रकाश, जोम, उत्साह ज्या शक्तीने उत्पन्न होतात ते अनादी अनंत, सतत स्फुरण पावणारे खरे महत्त्वाचे. ते चैतन्यच त्या वस्तूंच्या माध्यमाने प्रगट होते.

एक बल्ब मंद प्रकाश देईल तर इतर काही त्यापेक्षा अधिकाधिक प्रखरपणे प्रकाश देतील. बल्बच्या प्रकाश देण्याच्या शक्तीवर ते अवलंबून असते. वस्तुवस्तूतील प्रकाशमान होणारे तत्त्व, ती वस्तू ज्या गुणवत्तेची असेल त्यावर अवलंबून असते तसेच मानवी जीवनातही, ज्याच्या चरित्रातून अगर आयुष्यातून ते चैतन्यतत्त्व जास्त प्रगल्भपणे व भोवतालच्या मानवांना प्रकाश देण्याइतके प्रखरपणे प्रकट होते, त्यांना आपण ‘अवतार’ म्हणतो, महान सद्विभुती म्हणतो. वस्तू बनविण्यात उत्तमोत्तम, सूक्ष्म व शुद्ध पदार्थाचा आपण जितका उपयोग करू तेवढी ती वस्तू सतेज, तल्लख व शक्तीचा प्रकाश सहजपणे प्रकट करण्यास अधिक कार्यक्षम होईल तसेच मानवाचे जगणे जेवढे पवित्र, तेवढे त्याचे ज्ञान लखलखीत. सूक्ष्म, विचार, समज व अनुभव जितके विशाल व समृद्ध, तेवढे त्याच्यातील चैतन्य, ब्रह्मतत्त्व किंवा ईश्वरी पुरुषोत्तम तत्त्व जास्त ठळक होत जाते.

सरते शेवटी एवढेच सांगेन कि जेवढे आपण आपले शरीरधर्म, मानसिकता शुद्ध ठेवू. दृष्टी निर्मळ ठेवू तेवढे आपण मायेपासून मुक्त होऊन पुढील पायरीकडे वाटचाल करू. आपल्या अनुभवाचे जेवढे तटस्थ राहून मनन चिंतन करू तेवढे, तेवढे ज्ञान चक्षु शुद्ध होतील व सर्व गोष्टी उलट्या नसून, आपण उलट्या पाहतोय हे समजेल. मग गाडी सुरु झाल्यावर तुम्ही झाडे मागे पळत आहेत असे न म्हणता, हेच मनोमन म्हणाल कि, आपण योग्य मार्गाने पुढे चाललो आहोत.

ज्योतिष मित्र मिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

नक्षत्र धार्योषधि आणि त्याचा उपयोग


नमस्कार,

आज आपण नक्षत्र धार्योषधि म्हणजे काय आणि त्याचा उपयोग पाहणार आहोत.

विश्वातील (ब्रह्मांडातील) प्रत्येक ताऱ्यापासून तसेच तारका समुहांपासून शक्तीरूपी वैश्विक किरणे पृथ्वीवर येत असतात त्यांच्या वारंवारतेचे, तसेच तीव्रतेचे परिणाम मानवी शरीरावर होतात. या ऊर्जास्रोतांचा अभ्यास करून आमच्या पूर्वजांनी ज्योतिषशास्त्र विकसित केले. यातूनच माणसाचे जन्माचे वेळेस जन्मस्थळाचे बरोबर डोक्यावर जे तारे, नक्षत्रसमूह व ग्रह असतात तेथून येणाऱ्या ऊर्जास्रोतांचा माणसाचे शरीरावर कसा चांगला अथवा वाईट परिणाम होतो याचा अभ्यास केला गेला. ज्या नक्षत्रावर माणसाचा जन्म होतो त्या नक्षत्रापासून येणाऱ्या ताऱ्यांचा ऊर्जास्रोत जर माणसास हानीकारक असेल तर त्या नक्षत्रास वाईट नक्षत्र म्हणतात व जर परिणाम चांगला असेल तर चांगले नक्षत्र म्हणतात. वाईट नक्षत्र याचा अर्थ असा की, उत्तम आरोग्यास अथवा भाग्यास ज्या ऊर्जाशक्तीची गरज असते ती ऊर्जाशक्ती माणसास न मिळणे अथवा येणाऱ्या स्रोताचा प्रतिकूल परिणाम आरोग्यावर होणे असा आहे. यासाठी ज्या प्रकारच्या ऊर्जेची कमतरता जन्माचे वेळेस आहे ती भरून काढल्यास उत्तम आरोग्य व भाग्य प्राप्त होऊ शकते, असे आमचे पूर्वजांनी शोधून काढले. येणाऱ्या प्रत्येक वैश्विक किरणांची वारंवारता त्यांनी जाणून घेतली व ती मिळवण्यासाठी अन्य उपाय शोधले.

पूर्वीचे काळी ऋषीमुनींनी ह्या कंपन वारंवारतेचा सखोल अभ्यास करून ज्या कंपनांच्या कमतरतेमुळे मानवास अनारोग्य प्राप्त होते अशी कंपने कशी प्राप्त करता येतील याबाबत संशोधन करून ज्योतिष शास्त्राद्वारे आम्हास प्राप्तीचे उपाय सांगितले. उत्तम आरोग्य व भाग्य प्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या कंपन प्राप्तीसाठी उपलब्ध असलेल्या असंख्य वनस्पतींचा विचार त्यांनी केला असला पाहिजे. प्रत्येक झाडांचे रासायनिक घटक (Chemical Composition) हे वेगवेगळे आहेत. हे आज आम्हास ज्ञात आहे. बऱ्याच संशोधनानंतर ज्या वारंवारतेच्या कंपनांची जरूरी होती अशी कंपने देणारी झाडे, वनस्पती त्यांनी शोधल्या व त्या वनस्पतींना त्या त्या नक्षत्राचे आराध्य वृक्ष ही संकल्पना आमचे समोर ठेवली. याचाच अर्थ अमूक एका नक्षत्रावर जन्म झाल्यास कमतरता असणारी ऊर्जास्रोते ही अमूक एक वनस्पती अथवा वृक्षापासून प्राप्त होतात असा होतो. त्याचप्रमाणे रोग होऊ नयेत म्हणून किंवा झाल्यास त्यातून लवकर मुक्तता व्हावी म्हणून विशिष्ट गुणधर्म असलेले झाडाचे मूळ, खोड, साल, फूल, फळ किंवा इतर कोणतेही अंग, मनगटावर, गळ्यात, कंबरेला किंवा शरीरावर कुठेही धारण करावे, असे सांगितले आहे. त्यालाच नक्षत्र धार्योषधि असे म्हणतात.

नक्षत्रकष्टावलि या नावाचे कोष्टक काही पंचांगांत दिले जाते. त्यात वरील आराध्यवृक्षाबरोबर धार्योषधि सांगितल्या आहेत. हा आराध्यवृक्ष नसल्याने जन्मनक्षत्रानुसार येणारी धार्योषधि वनस्पती औषधासाठी वापरणेस हरकत नाही.

येथे नक्षत्रानुसार कोणत्या धार्योषधि वनस्पती उपयोगी आहेत ते पाहू.

अश्विनी, रोहिणी, ज्येष्ठा आणि श्रवण या जन्मनक्षत्रांसाठी अपामार्ग म्हणजे आघाडा आहे.

जास्तीतजास्त वर्षभर हे झुडुप टिकते. पावसाळयात आपोआप उगवते. पांढरा आणि लालसर असे दोन प्रकार आहेत. पाने अंडाकृती, मागील बाजू पांढरट असते. शीतकालात फूल येते. आघाड्यात पोटॅश हा क्षार असतो. पित्तामुळे होणाऱ्या मूतखड्यावर, दातांच्या तक्रारींवर, वेदना, व्रण, दंश यावर पानांचा रस उपयोगी. बियांचा उपयोग मूळव्याध, सूज, मूतखडा, कृमी, भस्मक (सतत भूक) यावर गुणकारी. तर मूळ विषमज्वर, सुलभ प्रसूतीसाठी उपयोगी, दंतरोगावर पाने, मुळे चघळावीत. शरीरातील पाण्याचा मार्ग शुद्ध होतो.

कल्प : आपमार्ग क्षार सिद्ध तेल, अगस्ति हरितकी लेह, अग्निमुख, मयूर दंतमंजन

आर्द्रा, उत्तरा भाद्रपदा, रेवती जन्मनक्षत्रांसाठी अश्वस्थ पिंपळ सांगितला आहे.

हा पिंपळभारतातच आढळतो. हा नित्य परिवर्तनशील व टवटवीत असतो. पिंपळ फळ हृदयाला बळ देणारे आणि शीतल आहे. विषमज्वर, कृमी, कुष्ठ, दाह, वाचा दोष, क्षय ई रोगांवर पिंपळाचे पंचांग उपयुक्त आहे. सालींचा काढा श्वेत प्रदरावर उपयुक्त आहे. पिंपळ कफ पित्त शामक आहे. उदार शुलात फळ, वरण जखमांवर सालींचे चूर्ण, वेदना, सूज, व रक्त स्त्रावावर चिक उपयुक्त आहे. पिंपळाच्या सालीचा चहा साखर व गुल घालून रोज घेतल्यास तो धातुवार्धक, पौष्टिक, शक्तीदायक व स्फूर्तीदायक ठरतो. रोगी व निरोगी दोघांना गुणकारी आहे. दम असणार्यांना उत्तम, पानाचे चूर्ण गुल दुधाबरोबर घेतल्यास मलावरोध दूर होतो. आर्द्रासाठी चंदनासह अश्वस्थ दिला आहे.

कल्प : लाक्षादी चूर्ण, लाक्षादी मलम, लाक्षादी गुग्गुळ, लाक्षाधृत

कृत्तिका, पूर्वाषाढा, उत्तराषाढा या तीन जन्मनक्षत्रांसाठी कार्पास (कापूस) सांगितला आहे.

कापूस आणि कापसाच्या राखेच्या बाह्य उपचाराने व्रण भरून येते. वेदना कमी होतात. सर्पदंशावर पानांचा रस, फुलांचा काढा, मानस रोगात, मुळाचा काढा पाळीच्या व प्रसूतीच्या तक्रारींवर, गरोदरपणी मुळांचा काढा दिल्यास गर्भपाताची शक्यता असते. कर्णस्राव, कर्णनादावर कापूस पानांच्या रसाने सिद्ध केलेले तेल चांगले. सरकीच्या काढ्याने अंगावरील दूध वाढते.

मघा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपदा या तीन जन्मनक्षत्रांसाठी भृंगराज (माका) सांगितला आहे.

पांढरा, पिवळा व निळा असे तीन प्रकार फलांच्या रंगावरून होतात. यात भरपूर राळ व एक्लिप्टिन नावाचे घटक द्रव्य असते. कफ वाताच्या विकारावर उपयोगी. पानाच्या रसाचा बाह्योपचार पद्धतीने सूज, वेदना, व्रण, गातीवर लेप देतात. त्वचेला मूळचा रंग येतो. कपाळदुखीवर कपाळावर चोळतात. पांढरे केस काळे करण्यासाठी रसाने सिद्ध केलेले तेल वापरतात. अस्थिधातू, आम्लपित्त, अग्निमांद्य, अजीर्ण, यकृत प्लीहा, वृद्धी, कावीळ, मूळव्याध, पोटदुखीवर पाच प्रकारच्या खोकल्यावर उपयोगी. माका रस एरंडेलाबरोबर दिल्यास पोटातील कृमी पडतात. मळाची दुर्गंधी नाहीशी होते. रक्तदाब कमी करणारा आहे. आयुर्वेदात त्याला रसायन म्हटले आहे.

कल्प : मट्टा भृंगराज तेल, चूर्ण, आसव, घृत, षबिंदूतेल, सूतशेखर, लघुसूतशेखर

पुनर्वसू आणि मूळ या दोन नक्षत्रांसाठी अर्क(रुई) आहे. पांढर्या रुई ला मंदार म्हणतात. गणपती मारुतीला याची फुले प्रिय आहेत. पान, फुले, मुले औषधात वापरतात. चीक सुद्धा उपयोगी आहे. पण तो अंगावर उततो, त्यामुळे वैद्यांचा सल्ला घ्यावा.  रुई च्या मुलांचा उपयोग पोटातील सर्व तक्रारी, कफ, खोकला, हत्तीरोग, सूज, कुष्ठ, विंचूदंश, सर्पदंश, घटसर्प, श्वास, श्वान दंश गंडमाळा, गुडघी रोग, तोंडावर काळे, डाग, मुत्राघात, गाठी यासाठी उपयुक्त आहे. पानाचा उपयोग कर्णशूल, नाळगुंड, मुलांची पोटफुगी, अंग ठणकणे, सुखप्रसुती यावर होतो. रुईचा चीक उतल्यास चिंचेचा पाला वाटून लेप करावा. अर्ज झाडावर साखरे सारखा पांढरा डिंक येतो. तो विषारी असतो. मुळाची साल उष्ण असल्याने कफ वात शामक आहे. हृदय दुर्बलता, सूज यावर वापरतात. सूज वेदनांवर पाने गरम करून बांधावीत. स्वेद (घाम), कुष्ठ त्वचारोगावर उपयोगी, जास्त दिल्यास दाह होतो.

कल्प : अर्कलवन, अर्कतेल, अर्कादी चूर्ण, प्रवाळ पंचामृत, महावात विध्वंस.

आश्लेषा आणि उत्तरा या दोन नक्षत्रांसाठी पटोल (कडू पडवळ) सांगितले आहे.

वर्षभर जगणारी, लांब वाढणारी ही वेल, पाने हृदयकार, खरखरीत, दोन्ही बाजूस निमुळती, फूल पांढरे, फळ लंबगोल, दोन्ही बाजूस निमुळते, फळावर पाच पांढऱ्या रेषा असतात. पिकल्यावर पिवळसर तांबट होते. ही जंगलात आपोआप उगवते. आपल्या खाण्यातले भाजीचे गोड पडवळ पटोल जातीचे नाही. कडू पडवळ त्रिदोषशामक आहे. जखमेवर आणि टकलावर पानांचा रस लावावा. जास्त खाल्ल्यास उलटी व जुलाब होतात. रक्तविकार व सूज यावर उपयोगी ज्वर, कुष्टावर गुणकारी.

कल्प : पटोलादि क्वाथ, पटोलादि चूर्ण.

हस्त व स्वाती नक्षत्रासाठी जाई-जुई चमेली या वेली सांगितल्या आहेत.

वेल खूप मोठे व मजबूत असतात. मूळ, पान, काळ्या, फळ, गुणयुक्त आहेत. मुख रोग, नेत्र रोग, जखमा, विष, कृमी, कुष्ठ या वर उपयुक्त. जाईला ५ पाकळ्यांचे फुल व ७-९ पानाचे पत्रक असते. जूईला ८ पाकळ्यांचे फुल व ३ पानाचे पत्रक असते. चामेलीला रंगीत फुले असतात. तिघांचे गुण सारखेच आहेत.

कल्प : जात्यादी तेल- मलम, पाठादी तेल.

भरणी नक्षत्रासाठी धार्योषधि अगस्ता (हृदगा) आहे. दक्षिण आकाशात अगस्ति ताऱ्याचे दर्शन ऑगस्टमध्ये होऊ लागल्यावर हादग्याला होडीसारखी दिसणारी पांढरी फुले येतात. क्वचित लाल, पिवळ्या, निळ्या फुलांचे झाडसुद्धा आढळते. साल व पाने सूज व जखमेवर उपयोगी. बुद्धिवर्धक व विषनाशक आहेत. फुले व पानांची भाजी जंत व पोटाच्या विकारावर गुणकारी. फुफ्फुसाची सूज, खोकला, पडसे, श्वेत प्रदर व तापावर पानांचा रस उपयोगी. शेंगाचे लोणचे, भाजी करतात. फुले, पाने, शेंगा वैरणीत घातल्यावर दूध, दही, लोणी, औषधी गुणाचे होते. कफपित्तनाशक आहे पण जास्त प्रमाणात घेतल्यास वातवर्धक आहे. मनशीळ शुद्धिसाठी पाने उपयोगी.

कल्प : अगस्तिप्राश

मृग नक्षत्रासाठी यंती (शेवरी) धार्योषधि आहे.

हे झाड ८ ते १० फूट उंच असते. पाने चिंचेच्या पानासारखी पण कडू असतात. शेंगा शेवग्याप्रमाणे असतात. त्यात २०/२५ लहान बिया असतात. मूळ, साल, पाने व फुले त्रिदोषशामक. लेपाने जखम वेदना बरी होते. मूळ हातात धरल्यास विंचवाचे विष उतरण्यास मदत होते. अग्निमांद्य व अतिसारात आणि पाळी सुरू होण्यासाठी बियांचे चूर्ण देतात. नेहमी पडसे येणाऱ्यांना पानांची भाजी देतात. गर्भधारणा न होण्यासाठी कांजीमध्ये फुले वाटून गूळ घालून देतात.

पुष्य नक्षत्रासाठी (तुषार) कापूर धार्योषधि आहे.

औषधासाठी शुद्ध कापूर वापरतात. नेत्ररोग, दंतरोग, डोकेदुखी, यावर उपयोगी. वात व्याधी, मुखरोग, अरुचि, अतिसार, यात देतात. मूत्रल व जंतुनाशक गुण आहेत. अधिक प्रमाणात पोटात गेल्यास विषासारखा परिणाम होतो. मेंथाल म्हणजे पुदिना अर्क आणि ओव्याचे फूल वात यात मिसळल्यास अमृतधारा नावाचे द्रव औषध तयार होते. पोटाच्या अनेक तक्रारींवर सर्दी खोकल्यावर ते गुणकारी आहे.

कल्प : कर्पूररस, कर्पूरासव, अमृतधारा, कर्पूरादिवटी, चंद्रप्रभा, दंतमंजन

पूर्वा नक्षत्रासाठी कंटकारि (रिंगणी, काटेरिंगणी, भुईरिंगणी) ही वनस्पती आहे.

हे लहान काटेरी झाड चकचकीत हिरव्या रंगाचे असते. पानांच्या मागे तीक्ष्ण काटे असतात. फुले निळी क्वचित पांढरी असतात. फळे गोलाकार बोराएवढी असतात. कच्ची फळे हिरवी आणि पांढऱ्या रेषा असणारी, तर पक्क फळे पिवळी होतात. खोकल्यावर याचे चूर्ण मधातून चाटल्यास खोकला बरा होतो. फळांचा धूर दिल्यास दातांतील कृमी पडून जातात. घाम आणण्यास, फकज्वर नाहीसा होण्यास उपयोगी, मूत्ररोग, घशाच्या तक्रारीवर, संधिवात, अंग दुखणे यावर गुणकारी, रिंगणी मूळ अनेक आसवात काढ्यात अरिष्टात वापरतात.

कल्प : निदिग्धादि काढा, व्याघ्री हरीतकी, कंटकारी धृत, नागरादि कषाय, दमा गोळी

चित्रा नक्षत्रासाठी मरुबुक (मदनफळ गेळफळ) आहे.

मध्यम उंचीचे हे झाड जाळी व काट्याने युक्त असते. फुले पांढरट पिवळी तर फळे नासपातीच्या आकाराची, गोल, पिवळट, धुरकट, सुपारीसारखी असतात. फळातील मगज कडूगोड असतो. फळांचा गोडसर वास आजूबाजूस पसरतो. फळाची साल, सूज, जखम, गालफुगी, वेदनांवर लेपासारखी वापरतात. सालींचा काढा वातशामक आहे. पोटातील विषदोष उलटीद्वारे बाहेर काढण्यासाठी आमाशयातील कफपित्त, आम्लपित्त काढण्यासाठी फळाचे चूर्ण वैद्याच्या सल्लयांनी वापरावे..

कल्प: मदनादि लेप, मदन कल्प, लेप गोळी.

विशाखा नक्षत्रासाठी गुंजा ही धार्योषधि आहे.

पुष्कळ फांद्या असलेली ही वेल आहे. पाने चिंचेच्या आकारची, फुले गुच्छांने येणारी, बिया पांढऱ्या किंवा लाल असतात. त्यांना काळा ठिपका (मुख) असतो. पाने व मुळे त्रिदोषात्मक, पण बिया विषारी असतात. घसा बसल्यास मूत्ररोग, दुर्बलता, यावर गुंजेच्या पानांनी सिद्ध केलेले दूध देतात. पानांचा लेप, जखम, सूजेवर लावतात. पानांच्या काढ्यांनी गुळण्या केल्यास मुखरोग दूर होतो.

अनुराधा नक्षत्रासाठी सुपुष्प ही धार्योषधी आहे.

मुचकुंद वृक्षाला सुपुष्प नाव आहे. सुगंधी लालसर पांढऱ्या फुलांचा वृक्ष. ढालीसारखा खूप बारीक लव असलेली पाने. वरून हिरवी खालून पांढरी, फळ लंबगोल, आतल्या बियांना पंख असतात. फुलाचे चूर्ण मूळव्याधीवर तूपसाखरेबरोबर देतात. कफपित्तनाशक, विषनाशक, त्वचारोगात उपयोगी, दाह शांत करणारे.

शततारका नक्षत्रासाठी कमल धार्योषधि आहे.

कमळ कफ पित्तशामक, दाह कमी करणारे, बुद्धिवर्धक, निद्रा आणणारे, गर्भवृद्धी करणारे, उष्णतेपासून हृदयाचे रक्षण करणारे, तीव्र ज्वरात उपयोगी आहे. लहान मुलांना क्षीण करणाऱ्या अनेक विकारात उपयोगी आहे. पांढऱ्या कमळाला पद्म, तांबड्याला कोकनाद आणि निळ्या कमळाला इंदीवर म्हणतात. पद्म म्हणजे पांढरे कमळ इथे अपेक्षित आहे.

(टीप : या धार्योषधी धारण करण्यास प्रत्यवाय नाही. पण जर सेवन, लेपण ई. उपाय करायचे असल्यास जाणकार वैद्याच्या सल्यानुसार उपयोग करावा.)

ज्योतिष मित्र मिलिंद

संपर्क : ७०५८११५९४७

(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

नाम आणि नाम स्मरण


नमस्कार,

आज आपण नाम व नामस्मरण या विषयावर थोडा उहापोह करणार आहोत.

परमशक्ती मिळवण्याचा रामबाण मार्ग म्हणजे नाम, असे सर्व प्रमुख धर्मात समजले जाते. मात्र धर्मातील या धनुष्याला कल्पनेचे किंवा प्रत्यक्ष असे फुलांचे बाण लावलेले असतात. आणि नको त्या गोष्टींचे अवडंबर माजवले जाते. असो.

नाम हा शब्द ‘नम्’ धातूपासून तयार झाला आहे. संपूर्णपणाने योग्य वस्तूपाशी नमणे वा शरण जाणे, हे नाम. नाम घेणे याचा अर्थ फक्त प्रत्यक्ष उच्चार करणे असा अर्थ होत नाही, तर मोठ्या अर्थाने नमणे, असा तो अर्थ आहे. नमण्याची क्रिया म्हणजे मूलतः मन अहंकारमुक्त करण्याची क्रिया असते. त्यासाठी एखादी श्रेष्ठ शक्ती मनात आठवायची किंवा उच्चारायची.

त्याच्या पातळ्या म्हणजे परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी. उतरत्या मोजणीने या पायऱ्या अशा :- (१) मानसिक आठवण (२) मनाच्या डोळ्याने पाहणे (३) उच्चार आणि अनुच्चार याच्या मधली अवस्था, पुटपुटणे (४) प्रत्यक्ष उच्चार.

‘विचारपूर्वक शब्द’ हा मेंदूशास्त्रा प्रमाणे डाव्या भागाशी संबंधित आहे. पण शब्दशून्य मनकल्पना, हा उजव्या मेंदूचा भाग आहे. साधारणतः त्या भागावरच, नाम घेणारे लोक, टिळा लावतात. दुःखी किंवा भांबावलेला माणूस, शब्दासह किंवा शब्दातीत अवस्थेत डोके धरून बसतो, तेव्हा मेंदूतल्या त्याच शक्तीचे संतुलन होते.

अहंकार सोडून आपल्यापेक्षा उच्च अशा प्रतीकासमोर नम्र होणे, ही नामशक्ती घेण्याची खुबी आहे. त्या खुबीतूनच नामशक्तीचा फलस्वरूप म्हणजे आपल्या आत्मशक्तीचे पोषण. ज्याच्या मुखात नाम आहे तो विनम्रतेने जगात संचार करतो. अहंकाराचा वारा त्याला स्पर्श करू शकत नाही आणि विरोधी लोकही त्याबद्दल आवाज उठवू शकत नाही, असे सर्वश्रेष्ठ नाम सर्वांनी घेतले पाहिजे. त्यात असणारे सामर्थ्य अमाप आहे. अंतरंगात नाम आणि आपले कर्म असा अंतर्बाह्य समतोल मात्र त्यासाठी आवश्यक आहे.

सद्गुणांच्या व सद्विचारांच्या आधारे आपले व्यक्तित्व प्रकाशमान करण्यासाठी नामस्मरण अत्यंत उपयोगी ठरते. आपल्या मनातील विकारांचे उच्चाटन करण्यासाठी नामसाधना अत्यंत प्रभावी आहे. नामात साधक एकरूप होत असल्याने अहंकाराचा नकळत लय होतो. अहंकार नाहीसा झाला म्हणजे संकुचितपणाही नाहीसा होतो.

नामस्मरणाचे महत्व अनेक संतांनी सांगितले आहे. संत ज्ञानेश्वरांनी जे हरिपाठाचे अभंग लिहिले त्यातही त्यांनी ‘हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी’ असे म्हटले आहे. वास्तविकत: सर्वच संतांनी नाम महात्म वर्णन केले आहे. ,‘नामस्मरण’ म्हणजे ‘ईश्वर शक्तीचे वारंवार स्मरण’ करणे होय. रोजचे काम करताना मुखी नाम असावे म्हणजे कर्म नकळत सुकर्मात बदलायला लागते. नाम आणि रूप यांच्या संबंधातील अन्योन्यता संतांच्या अभंगांमध्ये दिसते.

नामस्मरणात मनाला विषयापासून दूर ठेवले जाते. भरकटणारे मनाची बाहेरची ओढ आत वळते. नाम एका बाजूला षड रिपूंचे हरण करते, तर दुस-या बाजूला नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीचा मनोमय कोश शुद्ध करते. भारतीय तत्त्वज्ञानानुसार प्रकाश आणि अंधार यांचा सिध्दान्त असे सांगतो की, अंधार ही संकल्पना स्वतंत्रपणे नाहीच. प्रकाशाची अनुपस्थिती म्हणजेच अंधार. नामाचे महत्त्वदेखील प्रकाशासारखेच. त्याची अनुपस्थिती म्हणजेच अज्ञानरुपी अंधार. नामस्मरणाने स्वभावात प्रेमळता, स्नेह, आस्था, जिव्हाळा या भावना वाढीस लागतात. विचारांत सर्वसमावेशकता येते.

संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात-

वेद अनंत बोलिला,

अर्थ इतुकाचि साधिला।

विठोबासी शरण जावे,

निज-निष्ठे नाम गावे।।

या तुकारामबुवांच्या अभंगात वेदांनी सांगितलेला नाममहिमा विस्ताराने येतो. वेदांचे सार हेच परमेश्वराचे नाम आणि सर्व वेद ईश्वराच्या नामाचे व्यापकपणे चिंतन मांडताना, तुकारामबुवांनी केलेली मांडणी विचारांना चालना देते.

सदगुरूंकडून मिळालेले नाम हृदयापासून आणि भौतिकतेचा विसर पडून जर आपण घेत राहिलो, तर त्यापासून येणारी अनुभूती ईश्वरसमीप नेते.

सद‍्गुरूंकडून मिळालेले नाम, नामस्मरणाची क्रिया, सदाचरण आणि सत्संग ही नामस्मरणाची पंचांगे मानली जातात. आत्मशांती, आत्मशक्ती, आत्मसुख आणि आत्मानंद या शब्दांच्या अर्थ शोधार्थ कितीही ग्रंथ धुंडाळले तरी हाती काही लागणार नाही. उलट या शब्दांचा अर्थ अनुभूतीतून कळतो. म्हणून संत म्हणतात की, नाम घ्यावे आणि हा भवसिंधू तरून जावा.

ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सहज पेलता न येणारे विषय आहेत; तसे नाममार्गाचे नाही. नाम हाच धर्म व कर्म हे ज्याला कळले तो सहज नामसाधना करू शकतो.

सिद्धयोगातही नामस्मरणाची गरज वर्णिली आहे. योगप्रक्रियेत जेव्हा विघ्न येऊ लागतात, तेव्हा दीर्घ प्रमाणात प्रणवाचा अथवा गुरूने सांगितलेल्या नामाचा जप केला पाहिजे. पुढे तर श्वासावर नाम चालवणाऱ्या व्यक्तींना ‘अजपाजप’ साध्य होतो; त्यामुळे त्या व्यक्तीच्या ठिकाणी निरलस, निर्भय वृत्ती वस्तीला येते. येता-जाता, उठता-बसता जर नामजप घडला, तर मन आणि प्राण एक होतील आणि चैत्यन्यरूपाचा अविष्कार दिसेल. अविद्येचा म्हणजे अज्ञानाचा भेद नामोच्चाराने दूर होतो.

एखादा माणूस झोपेत असताना त्याला जर आपण त्याच्या नावाने आवाज दिला, तर तो खडबडून जागा होतो. तशी आपल्या अंतर्मनास जाग आणण्याचे काम नाम करते. हेच वेद-पुराणे, उपनिषदे, महाकाव्य यांनी वेगवेगळया शब्दांत वर्णिले आहे. त्या निर्गुण निराकार परमात्म्याशी एकरूप व्हायचे असेल तर आपण आपल्या गुण अवगुणांपासून अलिप्त राहून आपल्या अहंकाराची साथ सोडायला हवी. तर आणि तरच सोहम ची म्हणजे तो परम आत्मा माझ्या आतच दडलेला आहे याची अनुभूती येईल. आणि परमानंद प्राप्तीचा मार्ग मोकळा होईल.

ज्योतिष मित्र मिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in