
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : स्वाती नक्षत्र विचार
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : नक्षत्र ज्योतिष
नमस्कार,
आज आपण स्वाती नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. स्वाती हे नक्षत्र चक्रातील १५ वे क्रमांकाचे नक्षत्र असून इंग्रजी नाव ‘आर्कटयूरस’ असे आहे. या नक्षत्रामध्ये एकच तारा असून तो सोन्यासारखा पिवळा, टपोरा, ठळक व व्याधासारखा अप्रतिम तेजस्वी आहे. काहींच्या मते याची आकृती प्रवाळासारखी आहे. पूर्व दिशेला उगवताना तर हे नक्षत्र मोठ्या चेंडूसारखे भासते. वैशाख महिन्यात ते रात्रभर आकाशात दिसते.
स्वाती या शब्दाचा अर्थच सु + अति स्वाती. जणू काही सुंदर सरोवरात विहार करणारा दुसरा हंस पक्षी होय. स्वाती याचा अर्थ खोल, खोलात शिरा, खोल संशोधन करा असाच आहे.
स्वाती हे नक्षत्र संपूर्ण तूळ राशीत असल्याने चतुष्पादी तीर्यड्मुखी चर, सुलोचनी व चल आहे. नक्षत्राचा स्वामी राहू, राशीस्वामी शुक्र व दैवत वायुदेवता आहे. नक्षत्राच्या ४ चरणांवर अनुक्रमे गुरु, शनि व शनि आणि गुरु यांचे स्वामित्व आहे. या नक्षत्रात वाऱ्याची अचाट बुद्धीमत्ता, राहूचा चाणाक्षपणा, धूर्तपणा व शुक्राची सौंदर्यदृष्टी व कला यांचा सुंदर संगम झालेला दिसतो.
कुंतीपुत्र महापराक्रमी भीमाचे हे नक्षत्र आहे.
स्वाती नक्षत्र देवनक्षत्र असून शुभ आहे व सत्त्वगुणी व नीतिमान आहे. स्वाती नक्षत्रावर जन्म झाल्यास जातक विद्वान, बुद्धीमान, गुणी, ईश्वरभक्त, सदाचारी, धार्मिक, विनयशील, आत्मसंयमी, व्यवहार कुशल, होशी, रसिक, आनंदी, कलाकुशल व उत्तम सौंदर्यदृष्टीयुक्त, पारखी, चैनी, उपभोगी पण विवेकी असतो. स्वाती नक्षत्र शरीरप्रकृती, सौंदर्य, लक्ष्मी, सरस्वती व कला या सर्वांनाच चांगले आहे. मात्र अधिकार योगाच्या दृष्टीने ते फारसे अनुकूल नाही. या नक्षत्र जातकांना निवड करणे, पारखून घेणे, तोलून मापून बघणे यांची फार सवय असते.
पुरुष व स्त्रिया या दोघांनाही हे नक्षत्र चांगले आहे.
स्वाती नक्षत्रावर जन्मणाऱ्या पुरुष जातकांचा बांधा उंच, सडपातळ, सुडौल, अवयव उंच पण थोडे गोल व भरीव, हातापायाची बोटे जरा लांब व जाड, कपाळ उंच, चेहरा उभट, नाक सरळ, डोके लांबट असते. चेहरा सुरेख पण जरा गंभीर व प्रौढ वाटतो. शारीरिक जीवन व रोगप्रतिकारक शक्ती बरी असते. हे जातक बुद्धीमान, हुशार, हौशी, रसिक, आनंदी, उपयोगी पण रजोगुणी आढळून येतात. वागण्यात समतोलपणा चांगला दिसून येतो. तशा आळशी नसून गतिमान व नेहमी काही उद्योगात व्यस्त असतात. स्वाती नक्षत्र बिघडल्यास या व्यक्ती स्वार्थी व कंजूष वृत्तीच्या होतात.
स्वाती स्त्री जातकांना हे नक्षत्र अनुकूल आहे. सौंदर्य, वात्सल्य, प्रेमभावना, कोमलपणा व संगोपन करण्याची वृत्ती हे गुणधर्म या नक्षत्रात विकसित झालेले आहेत. स्त्रियांना ते रूप, कला, गुण व लक्ष्मी आणि बुद्धी यांची खैरात करणारे आहे. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रिया उंच पण थोडे भारदस्त शरीर असणाऱ्या अवयव लांबट व गोल मात्र प्रमाणशीर, रेखीव, सुडौल असतात. कपाळ जरा गोल पण चेहरा उभट असतो. गाल फुगीर पण फार पुष्ट नसतात. नाक सरळ पण ठसठशीत, डोळे काळेभोर व टपोरे असतात. भुवया कोरीव असतात. चेहरा सुंदर, देखणा, पण थोडी उदासीनतेची झाक असणारा असतो. केस काळेभोर व लांब असतात. शरीर भरलेले असले तरी त्यांच्या हालचाली मात्र वाऱ्याप्रमाणे चपळ असतात. स्वभाव होशी, रसिक, उपभोगी, कलाकौशल्य व जगातील सर्व सुंदर वस्तू, चैन, आराम यांचा हव्यास असणाऱ्या असतात. त्यांना गायन, वादन, उंची कपडालत्ता, अलंकार, फुले, अत्तरे, सुगंधी पदार्थ यांची आवड असून राहणी नीटनेटके व व्यवस्थित असते. त्या आधुनिक विचाराच्या असल्या तरी अति फॅशनेबल नसतात. भडक रंगापेक्षा त्यांना आपल्या वर्णाशी व रंगाशी जुळणारेच कपडे आवडतात. मॅचिंग साडी व ब्लाऊजपेक्षा किंवा प्रिंटिंग वायल्सपेक्षा उंची व तलम साड्या व भरजरी शालूच जास्त प्रिय असतात. लांबसडक वेणी किंवा भरगच्च अंबाडे प्रिय असून त्यावर १-२ टपोरी फुले अथवा वेणी आवडते. तंग किंवा पुरुषी पोषाख फारसा आवडत नाही. रोहिणीप्रमाणे भरमसाट दागिन्यांनी मढण्यापेक्षा एखादी अंगठी किंवा नेकलेस त्यांना प्रिय असतो. वाहनांची फार हौस असते. स्वाती नक्षत्र स्त्री ही आधुनिक व सुधारक आहे. तेजस्वी असते, तसेच. चैनी, विलासी पण चपळ, तरतरीत व चुटचुटीत आहे. स्वातीला श्रीमंतीचा अभिमान असू शकतो. स्वाती स्त्री जातक कलावंत व कलाकुशल असू शकतात. स्वाती जातक स्त्रियांच्या कुंडलीत चंद्र व शुक्र असता या स्त्रिया चित्रकला, रंगकाम, विणकाम, रांगोळी काढणे, फुलांचे दागिने किंवा सुरेख वस्तू तयार करणे, कोरीव काम यांच्यात पारंगत असतात.
स्वाती नक्षत्राखाली बराचसा सघन, श्रीमंत व कलाकार वर्ग येतो. हे नक्षत्र सर्व प्रकारच्या व्यापाराला फार चांगले. या नक्षत्राखालील सर्व ठिकाणच्या घाऊक व्यापाऱ्याच्या जागा शेअरबाजार व ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैशाच्या उलाढाली होतात अशी ठिकाणे येतात. या नक्षत्राखाली धान्य, तेले, डाळी, कापड, सोने, चांदी, हिरे, माणके, सुगंधी पदार्थ व चैनीच्या वस्तूचे घाऊक व्यापारी, सिनेमा नाटके यात काम करणारा वर्ग, नट, नट्या, चित्रकार, पेंटर्स, आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, शेअर बाजारातील दलाल, टी.व्ही., फ्रीज, मोटारी, रेडिओ, उंची फर्निचर यांचे व्यापारी, तसेच न्यायसंस्थेत काम करणारा वर्ग, न्यायाधीश, वकील बॅरिस्टर्स, अॅडव्होकेटस् किंवा मोठमोठ्या खाजगी कंपन्या, स्वायत्त मंडळे या ठिकाणी लठ्ठ पगारावर काम करणारा वर्ग ई. सर्वजण येतात.
या नक्षत्रामध्ये सर्व ग्रह निरनिराळे फलादेश देतात. कोणी शिक्षण, कोणी व्यापार, कोणी धन तर कोणी कला देतो.
स्वाती नक्षत्री रवि शरीरप्रकृती व गुणाच्या दृष्टीने साधारण असतो. सत्त्वगुणी, उदार व परोपकारी असतो. अधिकारयोगाच्या दृष्टीने अनुकूल असतो. मात्र विद्या व धनाच्या दृष्टीने मध्यम असतो.
स्वाती नक्षत्री चंद्र अनुकूल असतो. जातक सुंदर, आनंदी व देखणा असतो. विद्वत्ता व बुद्धीमत्ताही चांगली असते. रजोगुण जास्त दिसून येतात. तोलून बघण्याची वृत्ती फार आढळते.
स्वाती नक्षत्री मंगळ असता इंजिनिअरिंगच्या शिक्षणाला चांगला. यांचा उंच, सडपातळ, सडसडीत असतो. धनाच्या दृष्टीनेही चांगला.
स्वाती नक्षत्री बुध उत्तम प्रकारची बुद्धीमत्ता देतो. गणित विषय चांगला, स्मरणशक्ती, पाठांतरशक्ती, ग्रहणशक्ती चांगली असते. हे जातक हुशार, चुटचुटीत, व्यवहार कुशल व तरतरीत असतात. शरीरप्रकृतीही उत्तम असते. थोडे बुटके पण चपळ असतात.
स्वाती नक्षत्री गुरु बुद्धी व विद्येच्या दृष्टीने अनुकूल असतो. हे जातक अतिशय हुशार, ज्ञानी, बुद्धीमान व विद्वान असतात. बुद्धी खोल, विचारी, संशोधक असून तुलनात्मक अभ्यासाची बरीच आवड असते. स्मरणशक्ती, पाठांतर, ग्रहण व आकलनशक्ती उत्तम असून त्या सर्व शास्त्रांत पारंगत असतात. शिक्षक व प्रोफेसर्स यांना हा गुरु बरा. धनाच्या दृष्टीनेही बरा. पण शरीरप्रकृतीच्या दृष्टीने मध्यम. सत्वगुणाचा पुतळा असतात.
स्वाती नक्षत्री शुक्र भाग्याचे होय. हे जातक गोंडस, सुडौल व सुंदर शरीर, चेहरा तेजस्वी, आकर्षक, मोहक व टवटवीत असतात. धन भरपूर मिळते व कला कौशल्य पारंगत असतात. शुक्र उंची व चैनीच्या वस्तूंच्या व्यापारास, सिनेमा, नाटकात काम करण्यास फारच अनुकूल असतो. हे जातक फार हौशी, विलासी, शौकीन, शृंगारी, चैनी व उपभोगी असतात.
स्वाती नक्षत्री शनि बुद्धी, विद्या व धनाच्या दृष्टीने चांगला. शरीरप्रकृतीही कणखर व सशक्त असते. हाडापेराने मजबूत, काटक व भारदस्त शरीर असते. जातक बुद्धीमान, संशोधक, चिकित्सक, चौकस, सखोल बुद्धी व विद्येसाठी बरेच कष्ट व श्रम घेणारे असतात. जातक उत्तम संशोधक, शास्त्र, कायदेपंडित, प्रबंध लिहिणारे असू शकतात. व्यापाऱ्याच्या कुंडलीत स्वाती नक्षत्री शनी असता कोणत्याही वस्तूंचे विशेषतः धान्य, तेले, कापूस, कपडे यांचे घाऊक व्यापारी, गिरण्यांचे व कारखान्यांचे मालक असतात. लक्षाधीश व कोट्याधीश होऊ शकतात. स्वभावाने मात्र या व्यक्ती अति कंजूष, अरसिक, चिकित्सक असतात. धन असूनही उपभोग घेण्याची वृत्ती नसते. धनसंचयाकडे विशेष लक्ष असते.
स्वाती नक्षत्री राहू अप्रतिम बुद्धी, संशोधन व कला यांना अनुकूल असतो. स्वनक्षत्र असल्याने तो बलवान असतो. पेंटिंग, ड्रॉइंग, फोटोग्राफी, आर्किटेक्ट, कोरीव काम यांना राहू चांगला असतो. शरीरप्रकृती व बांचा ऐटबाज व आकर्षक असतो.
स्वाती नक्षत्री केतू असता जातकास रसिक, धार्मिक, पारमार्थिक, आध्यात्मिक विद्येची आवड दर्शवतो.
स्वाती नक्षत्री हर्षलल असता बुद्धी, विद्या, उच्च शिक्षण, स्वतंत्र कर्तृत्व, हुशारी दाखवल्यास तो उत्तम असतो. या जातकामध्ये बुद्धी वैशिष्ट्य दिसून येते. संशोधन करणे, नावीन्यपूर्ण कल्पना, नवीन नवीन शोध लावणे यांना तो चांगला असतो. स्वाती नक्षत्री दशमात हर्षल असता हे जातक धडाडी, कार्यकुशलता व कर्तबगारी असून आपल्या अलौकिक बुद्धी व कार्याने आपली कारकीर्द उज्ज्वल करतात.
स्वाती नक्षत्री नेपच्यून अंतःस्फूर्ती, प्रतिभाशक्ती, कल्पनाशक्ती, दुसऱ्याच्या मनातील विचार जाणण्याची शक्ती, आत्मसंशोधन यांसाठी चांगला.
स्वाती नक्षत्रावर होणारे रोग फारसे दाहक किंवा क्रूर नसले तरी बराच काळ मुरणारे असतात. विशेषतः मूत्रपिंडाचे विकार (किडनी), लघवीचे विकार, कंबर दुखणे, गुरु अनिष्ट असता रक्ताभिसरण किंवा रक्तदाबाचे विकार. चंद्र शुक्र अनिष्ट असता मधुमेह, वाताधिक्य, सर्दी, कफ यांचा फार त्रास होतो. मंगळ- शुक्र युति असून ते अनिष्ट असता गुप्तरोग व चंद्र शनि युती असता दमा अथवा श्वासोच्छ्वासाच्या विकाराचा संभव असतो. कधी कधी ओकाऱ्या, मळमळ किवा काविळीपासूनही त्रास होऊ शकतो.
स्वाती हे राहूचे नक्षत्र असल्याने काही वेळा यात शनि, राहू, मंगळ असे ग्रह असता काळी विद्या, जादूटोणा, पिशाच्च विद्या, अघोरी विद्या यात यश देते.
स्वाती नक्षत्र सुलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास कितीही प्रयत्न केला, तरी ती परत मिळणे कठीण असते. वस्तू उत्तरेला गेलेली असते. या नक्षत्राचा भाग्यांक ६ किंवा ८ असतो. शुक्राचा हिरा किंवा शनीचा नीलमणी लाभदायक असतो, हस्ताक्षर अतिशय सुरेख, वळणदार, स्पष्ट व ठळक असते. विशेषतः व, ब, क अशा अक्षरातील गोलाकार वळण फारच सुंदर दिसते.
स्वाती नक्षत्र शुभ व देवगणी असल्याने मुहूर्तशास्त्रात या नक्षत्राचे महत्त्व फार आहे. यावर नांगर धरणे, बी पेरणे, सुगंधी पदाचांची झाडे लावणे, जनावरे घेणे, नवीन वाहन विकत घेणे व चालू करणे, नवीन वस्त्रे व अलंकार घालणे, विद्यारंभ, नवीन दुकान सुरू करणे, विहिरी खणणे, मौजी, बारसे, विवाह, गृहप्रवेश, वधू प्रवेश, औषध घेणे इत्यादी कार्यांना फारच चांगले.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : कर्म सिद्धांत (भाग २)
संकलक व स्वैर अनुवाद : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : THEORY OF KARMA (श्री हीराभाई ठक्कर)
नमस्कार,
आज पहिल्या भागात आपण कर्म सिद्धांत, क्रियमाण कर्म, संचित कर्म, प्रारब्ध कर्म याविषयी जाणून घेतले. आज या विषयाचा पुढील टप्पा क्रमश: व थोडक्यात पाहणार आहोत.
धार्मिंकावर संकटे, तर अधार्मिकाची चंगळ :
कर्माचा अटळ सिद्धांत आहे की ‘जे पेराल ते उगवेल’ ‘जसे कराल तसे नीति- भराल.’ परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपण अनुभवतो, की न्याय-धर्माने वागणार्याला, आयुष्यात खूप दुःखे भोगावी लागतात, आणि अधर्म अनीतीने वागणारे काळाबाजार, तस्करी करणारे आयुष्यात मौज-मजा करत असतात. गाडी बंगला सर्व तरहेच्या सुखसोयी यांची दारी असतात..
हे सतत पाहिले की, देवावरील आपली श्रद्धा डळमळू लागते व कर्म सिद्धांत ही एक भ्रामक कल्पना आहे असे वाटू लागते. आपणही अनीति, अधर्माने पैसा मिळवण्यास प्रेरीत होतो. परंतु ही फार चुकीची समजूत आहे. नेहमी पुण्याचे फळ हे सुख व पापाचे फळ हे दुःख च असते. पाप करणारा माणूस आपल्याला सुख-समृद्धित वावरताना दिसतो, ते त्याच्या पापकर्माचे फळ नसून, त्यांने पूर्वी केलेली काही पुण्यकर्मे त्याच्या संचितात जमा असतात, ती आता पक्व होऊन त्याला सुख-रुपी फळें देत असतात. सध्यां तो करीत असलेली पापकर्मे, त्याच्या पूर्वपुण्याईचा जोर असल्याकारणे, फळ दिल्याविना त्याच्या संचितांत जमा होऊन राहातात, आणि पूर्वपुण्याईचा जोर ओसरतांच, प्रारब्ध बनून त्याच्या समोर उभी राहतात. पूर्वपूण्याईचा जोर असेपर्यंत पाप कर्मे आपला प्रभाव दाखवू शकत नाहीत.
संत कबीर म्हणतात :
कबीरा तेरा पुण्यका जब तक रहो भंडार । तब तक अवगुण माफ है करो गुनाहहजार ॥
या जन्मी न्याय-नीतिने वागणारी कित्येक माणसे दुःख-दारिद्र्यांने गांजलेली दिसतात, याचे कारण त्यांची पूर्वकृत दुष्कृत्यें आता आपला प्रभाव दाखवित असतात. त्यांची या जन्मातील सतकृत्ये कालांतराने या वा पुढील जन्मी त्याना सुख-समृद्धि देणारच यांत तिळमात्र शंका नाही, कारण कर्म- सिद्धांत हा अटळ आहे त्यामुळे कर्म-सिद्धांत कायद्यावर आपला पूर्ण विश्वास ठेवावा आणि निर्धारपूर्वक न्याय-नीतिचा खरेपणाचा राजमार्ग अंगीकारावा.
ग्रामीण भागांत लोकांच्या घरात धान्य साठविण्यासाठी मोठमोठाली कोठारें असतात. त्याना बळद अथवा बळत म्हणतात. ‘बळद’ म्हणजे भिंतीत धान्य साठविण्यासाठी मोठी पोकळ जागा ठेवतात. त्यांत वरील मजल्यावरुन साठवणीचे धान्य ओततात. बळदाच्या तळाशी, खालच्या मजल्यावर धान्य बाहेर काढण्या साठी एक गवाक्ष (छोटा दरवाजा) असते, त्यांतून जरूर पडेल, तेव्हा आवश्यक धान्य काढून घेतां येते. समजा एखाद्या शेतकर्याचें बळद उत्कृष्ट समजले जाणारे धान्य जे गहू (उत्कृष्ट कर्माने, पुण्याने) त्याने भरलेले आहे. आणि दुसरया एकाद्या शेतकारयाचे बळद हलक्या प्रतीचे समजल्या जाणारूया बाजरी अथवा नाचणीने (निकृष्ट कर्माने, पापकर्माने) भरलेले आहे नंतर पहिला शेतकरी, यंदा त्याने बाजरीचे पीक घेतल्याने, आपल्या बळदांत वरुन बाजरी ओतू लागला (हलके पापकर्म), तरी जेव्हा जेव्हा तो खालचा दरवाजा उघडून धान्य बाहेर काढील तेव्हा तेव्हा, जो पर्यंत आंतील गव्हाचा साठा (उत्कृष्ट संचित कर्म-पुण्यकर्म) समाप्त होत नाही तो पर्यंत (तो जरी वरच्या दरवाज्यांतून बाजरी सारखे हलक्या प्रतीचे धान्य (पापकर्म) ओतीत असला तरी) त्याला गव्हाचाच पुरवठा होत राहाणार.
या उलट ज्या दुसऱ्या शेतकऱ्याचें बळद नाचणीने (निकृष्ट संचिताने, पापकर्माने) भरलेले आहे पण यंदाचे हंगामात त्याने गव्हाचे पीक घेतले. आणि आतां तो बळदांत वरील बाजूने गहू साठवू लागला (उत्कृष्ट कर्म- पुण्यकर्म), तरी जोपर्यंत आंतील नाचणीचा साठा (निकृष्ट संचित – पापकर्म) संपत नाही, तो पर्यंत (जरी तो गहू साठवू लागला आहे), तरी जेव्हां जेव्हां तो बळदाचे खालचे द्वार उघडील. तेव्हा तेव्हा त्याला त्यातून नाचणीच मिळत राहाणार.
परंतु असा एक दिवस निश्चित उगवणार, की जेव्हा पाहिल्या शेतकरयाचा गहू- साठा (पुण्यकर्म) संपणार, व त्याला नंतर साठविलेली बाजरी खाण्याची वेळ येणार. या उलट त्याँ दुसऱ्या शेतकरयाची नाचणीही (पापकर्म-निकृष्ट कर्म) संपणार, व मग त्याला मागाहून साठविलेले गहू (उत्कृष्ट-पुण्यकर्म) खाण्याचे भाग्य प्राप्त होणार. फक्त असे होण्यास त्याला थोडा फार काळ धीर धरावा लागणार.
म्हणून परमेश्वरावरील दृढ श्रद्धा, व कर्म सिद्धांत तत्वावरील आपला विश्वास, किंचितही ढळू न देतां. प्रत्येक मनुष्याने, जरी त्याला दुःख, हाल-अपेष्टा भोगाव्या लागत असल्या, तरी नाउमेद न होतां त्यां सहन कराव्या, व न्यायनीतिच्या मार्गावरून न ढळता, अविरतपणे सत्कर्म करीत राहावें.
एकाद्यां बैंकेचा मेनेजर जरी आपला मित्र व नातलग असला, तरी आपल्या बँक खात्यात आपली काही जमा (संचित) नसेल, तर आपण पाठविलेल्या चेकवर, तो आपल्याला काहीही रक्कम देऊ शकणार नाही, उलपटपक्षी सदर बँक मेनेजरच्या शत्रूनेही जरी काही रकमेची चेकद्वारे मागणी केली व त्याचे खात्यांत पुरेशी रक्कम शिल्लक असेल, तर चेक प्रमाणे त्या इसमाला पैसे देण्याशिवाय मेनेजरला पर्याय नसेल. त्यामुळे प्रयत्नपूर्वक आपल्या ख्यात्यातील शिल्लक वाढविणे हेच श्रेयस्कर आहे. त्याच प्रमाणे आपल्या दुःखा बदल ईश्वराला दोष देण्यात शहाणपणा नाही, तर आपले संचित, सत्कर्म करून वाढविणे हेंच आपले कर्तव्य आहे. ते पंर पाडा मग पहा भगवंत तुमच्या हाकेला धाऊन येतो की नाही ?
कोणतेही कर्म फळ देऊनच शांत होतें :
समजा की एकाद्या माणसाने काही पापकर्म केले आहे, की ज्याच्या फलस्वरूप त्याला एक दिवस उपाशी राहाण्याचें प्रारब्ध तयार झालेले आहे. हे प्रारब्ध भोगल्या शिवाय त्याची त्यापासून मुक्तता होणार नाही, कारण कर्मकायद्यानुसार कोणाचीही फळ भोगल्यावाचून सुटका होत नाही.
आतां तो मनुष्य जर सत्वगुणी असेल, तर त्याला एकादशीचा उपवास करण्याची व सर्व दिवस देवाचे चिंतन करत व्यतित करण्याची बुद्धि होईल. अशा तर्हेने तो आपले प्रारब्ध भोगून संपविल.
तो जर रजोगुणी असेल तर एखादे दिवशी त्याची पत्नी वा मुले अचानक आजारी होतील, त्याना होस्पिटल मध्यरे किंवा दवाखान्यात घेऊन जाण्याची त्याच्यावर वेळ येईल तेथे दोन तीन तास खर्च झाल्याने, त्याला ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी, उपाशी पोटीच घरुन निघावे लागेल, नेमका त्याचदिवशी ऑफिस कँटीनमध्ये संप असेल. घरी परत आल्यावर, गृहपरिस्थिति अधिक बिघडल्याने त्याला रात्री उपाशीच झोपावे लागेल. अशा तरहेने धावपळ करीत त्याला आपले प्रारब्ध भोगून संपवावे लागेल.
समजा तो माणूस तमोगुणी असेल, तर अशी एखादी घटना नेमकी जेवणाचे वेळी घडेल, की राग अनावर होऊन तो पुढे वाढलेले ताट रागाने उडवून देईल, व उपाशी पोटींच कचेरीत जाईल. पोटांत अन्ना अभावी त्याचे डोकें अधिकच भडकेल, व आपल्या सहकारयांशी भांडण होऊन त्याला शांति मिळणार नाही. संध्याकाळी घरी आल्यावर, बायकोशी भांडून तिला मारझोड केल्याने ती रात्री जेवणच करणार नाही. अशा तर्हेने खूप मनस्ताप सोसून तो आपले उपाशी राहाण्याचे प्रारब्ध भोगून संपवील.
सत्वगुणी व्रत उपवास करुन शांत मनाने आपले प्रारब्ध संपवील, व तसे करताना ईश्वरचिंतनात त्याचा वेळ व्यतित झाल्याने, तो थोडीशी पुण्याई जोडील व त्याचे नवीन चांगले क्रियमाण निर्माण होईल
रजोगुणी जीव बायको मुलांची सेवा चाकरी आपले कर्तव्य म्हणून करीत, आपले उपोषणाचे प्रारब्ध संपविल व असे करताना, त्याचे कोणतेही नवे पाप-पुण्य निर्माण होणार नाही.
तमोगुणी जीव आपलें उपाशी राहाण्याचे प्रारब्ध स्वतःला व दुसऱ्याना त्रास देत भोगील. व असे करताना नवे वाईट क्रियमाण निर्माण करील, की जे एक दिवस त्याचे प्रारब्ध बनून, त्याला नवीन क्लेश यातना भोगाव्या लागतील
क्रियमाण कर्म पक्व होऊन प्रारब्ध रूपाने भोगल्या शिवाय कोणाचीही सुटका होत नाही, पण वरील उदाहरणाप्रमाणे सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी माणसांची ते भोगण्याची पद्धत भिन्न असते.
समजा एखाद्याचे ५०००० रुपये फायदा मिळण्याचे एखादे संचित आहे. त्याने काही जमीन ५ लाख रुपयांस विकण्याचे ठरवले आहे. एक दिवस एक गरजू माणूस त्याच्याकडे येऊन, ती जमीन घेणे गरजेचे व फायद्याचे असल्यामूळे, आपण होऊन साडेपाच लाख देऊ लागला. जर तो रजोगुण प्रधान असेल, तर आल्या संधीचा फायदा घेऊन साडेपाच लाखास व्यवहार करेल. व अशा रीतीने त्याचे प्रारब्धात असलेले ५०००० रुपये मिळवेल. असे करण्यात त्याचे काही नवीन क्रियमाण तयार होणार नाही. केवळ प्रारब्ध त्याला सुख भोग देऊन शांत होईल.
तो सत्वगुणप्रधान असेल, तर ५०००० रुपये अधिक घेण्याचे नाकारेल आणि सदर माणसाचा लाभ न उठवता, जमीन ५ लाख रूपयाना विकून व्यवहार पूर्ण करेल. या परिस्थितित, त्याचे ५०००० रुपये फायदा मिळण्याचे संचित संधीची वाट पहात फिरत राहील व सत्कर्माचे थोडे पुण्य फळ त्यात वाढेल.
तो तमोगुणप्रधान असेल, तर जास्तीत जास्त किंमत मिळवून देखील, जमिनीचा निकृष्ट भाग त्याच्या माथी मारण्याचा हेतू मनात बाळगेल व निंद्य मार्ग अवलंबिल्यामुळे, नवे पापरूप क्रियमाण निर्माण करेल.
अशा प्रकारे प्रारब्ध भोगण्याचे सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी माणसांचे भिन्न मार्ग असतात, पण प्रत्येकाला त्याचे प्रारब्ध भोगावेच लागते त्या शिवाय पूर्वीचे क्रियमाण समाप्त होत नाही.
सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी या तीन प्रकारच्या जीवांची क्रियमाण करण्याची कल्पना :
सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी या तीन प्रकारच्या जीवांची क्रियमाण करण्याची कल्पना पण वेगवेगळी असते :
(१) सत्वगुणी जीव म्हणतो, फळ मिळो वा न मिळो मी चांगले कर्म करीन.
(२) रजोगुणी जीव म्हणेल, मी कर्म करीन, पण मला त्यांचे फळ मिळालेच पाहिजे.
(३) तमोगुणी जीव म्हणेल, दामदुप्पट फळ मिळणार असेल तरच मी कर्म करीन.
सत्त्वगुणी जीवाला त्याच्या फळा बरोबर देणारयाच्या सदिच्छा व आशीर्वाद मिळतात.
रजोगुणी जीवाला त्याचे फळ मिळते, पण सदिच्छा मिळत नाही.
तमोगुणी जीवाला त्याचे फळ मिळते, पण गरजेचा फायदा घेण्याची त्याची वृत्ति पाहून देणारा मनातून नाराज होतो, तळतळाट देतो..
प्रारब्धांत असतें तेवढेच मिळतें :
क्रियमाण कर्मे जेवढी आणि ज्या प्रकारची कराल, तेवढेच आणि त्या जातीचेच प्रारब्ध तयार होते, आणि तेवढेच आणि त्या प्रकारचेच फळ तुम्हाला मिळते, त्यांत किंचिंतही कमी- जास्त होत नाही. जन्म घेतेवेळी, जेवढे संचित कर्म पक्व होऊन प्रारब्धांत रुपांतरित झालेले असते, तेवढेच भोगण्याला अनुरूप असा जन्म मिळतो. मिळणारे माता-पिता, स्त्री-पुरुष, कन्या नातलग, हे सर्व प्रारब्धानुसार प्रारब्ध भोगण्यापुरतेच मिळतात, त्यांचे तुमचे पूर्व ऋणानुबंध असेपर्यंतच ते लाभतात. प्रारब्धानुरूप उच्च, नीच कुळांत जन्म मिळतो, प्रारब्धानुसार सुख-सोई आयुष्यात लाभतात.
कोणत्या माता-पित्यांच्या उदरी जन्म घ्यायचा हे, आपल्या हातांत असतें, तर आपण प्रत्येकाने टाटा-बिर्ला ई. कुळांतच जन्म घेणे पसंत केले असते, की जेथे जन्म होतांच आपण पांच-पंचवीस बंगले, मोटारी, कारखाने यांचे धनी झालो असतो, पण अशी निवड करणे आपल्या इच्छेवर अवलंबून नसते. आपल्या प्रारब्धानुसार या जीवनात आपले संबंध घडतात. आपले स्त्री-पुत्रादि, नातलग आपल्या व त्यांच्या पूर्वकर्मानुसारच आपल्याला सुख-दुःख देतात, आपले व त्यांचे ऋणानुबंध असेतोपर्यंतच आपण एकत्र नांदतो. ऋणानुबंध संपले की आपण लाख प्रयत्न केले, तरी कौटुंबिक एकोपा राहू शकत नाही. या जन्मासाठी नेमलेले प्रारब्ध पूर्ण भोगल्याशिवाय आत्महत्याही यशस्वी होत नाहीं. आपण जीं जीं शुभ-अशुभ क्रियमाण कर्मे केलेली असतील, त्या अनुसारच आपले प्रारब्ध बनणार, आणि नेमके तेवढेव सुख-दुःखाचे भोग आपल्याला मिळू शकतात.
सतत वर्षभर चोवीस तास पाऊस पडला, तरी पळसाच्या झाडाला त्रिदळच तीन पानेच फुटणार, तेथे चौथे पान (चौदळ) उगवणारच नाही. वसंत ऋतूत सर्व झाडान नवी पालवी फुटते म्हणून बांबू ला पालवी फुटत नाही आणि न फूटली तर त्यांत वसंत ऋतूचा काय दोष ? सूर्योदयानंतर, सर्वत्र उजेड पडून सर्वाना दिसू लागते, पण घुबडाला दिसणे बंद होते, यांत सूर्यनारायणाचा काय दोष ?
तुमचे जे प्रारब्ध तयार झाले आहे, ते ललाट-लिखित विधाताही पुसू शकत नाही-पालटू शकत नाही. परमेश्वर हा केवळ कर्म-फलदाता आहे त्याचेही हात आपल्याला कर्म फळ देण्यात बांधलेले आहेत.
हिंदू धर्मात अशी एक समजूत आहे की, जन्मानंतर सहावे दिवशी सटवी (प्रारब्ध देवता) कपाळावर या जन्मीचे सुख-दुःखाचे भोग लिहीते. ही कल्पना खरी मानली, तरी एक गोष्ट निश्चित की, तुमचे पूर्व जन्म जन्मांतरातील जे क्रियमाण (संचित) कर्म या जन्मी भोगण्यास प्रारब्ध रुपाने पक्व झाले असेल, तेवढेच ही सटवी तुमचे कपाळी लिहु शकेल, कारण ती केवळ कर्मफळ दाती-देवता आहे.
तुमचे प्रारब्धांत जेवढा पैसा लिहीलेला असेल, तेवढाच पैसा कितीही खटपट लटपट केलीत तरी मिळेल. अधिक धन मिळविण्यासाठी तुम्ही कोणत्याही वाममार्गाचा अवलंब केलात, तरी ते मिळणार नाही. आणि मिळाले तरी अचानक या, ना, त्या मार्गे हातांतून निसटून जाईल, शिवाय कुमार्गाचा आसरा घेतल्याने अनिष्ट क्रियमाण निर्माण होईल ते निराळेच.
फक्त धनासाठी उगाच धावपळ करु नको, कारण केवळ धावपळ केल्याने पैसा मिळत नाही. पूर्वजन्मीचा क्रियमाण कर्मानुसारच या जन्मी सर्व सुख-दुःखे, भोग, एश्वर्य मिळणार.
तर मग माणसाने पुरुषार्थ करूच नये ?
कर्म-सिद्धांताच्या संदर्भात पुरुषार्थाचे स्थान बरोबर न समजल्याने कित्येक कट्टर प्रारब्धवादी असे मानतात की, माणसाला कोणताही पुरुषार्थ करण्याची जरुरीच नाही. जे प्रारब्धांत असेल ते घडणारच. परीक्षेत पास होण्याचे प्रारब्ध असेल, तर आपण पास होणारच व नसेल, तर कितीही अभ्यास केला तरी व्यर्थ. म्हणून अभ्यास करण्याची काहीही आवश्यकता नाही, असा विचार करुन सर्व प्रारब्धावर सोडून देतात. असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असे म्हणून स्वस्थ बसतात.
प्रारब्धात असते, तेवढेच मिळते, तेंच घडते, ही गोष्ट निर्विवाद सत्य, पण प्रारब्ध व पुरुषार्थ यांतील सीमारेषा नेमकी कोठे याचा माणसाने विवेकयुक्त विचार केला पाहिजे. नोकरी मिळणे हे प्रारब्ध, पण नोकरीत व्यवस्थित काम करुन ती टिकविणे, बढती मिळविणे, हा पुरुषार्थ आहे. पैसा मिळणे हे प्रारब्ध, पण मिळालेल्या पैशाचा योग्य विनियोग करणे, हा पुरुषार्थ आहे. स्त्री-पुत्रादिक मिळणे हे प्रारब्ध, पण असेल त्या परिस्थितीत संसार नेटका करण्याचा प्रयत्न करणे हा पुरुषार्थ.
धन खूप मिळाले तरच माणूस सुखी होतो ही कल्पना बरोबर नाही. अघर्माने मिळविलेला पैसा हा शेवटी अनर्थकारकच होतो. वाममार्गाने मिळविलेल्या पैशाने, इतराना तो माणूस भले वैभवांत असलेला वाटो, पण तो मनांतून कधीच सुखी संतुष्ट नसतो. त्याला आंतरिक शांती, समाधान कधीच वाटत नाही. वाईट मार्गाने पैसा मिळविलेल्या माणसाची मुले बहुदा उधळी, व्यसनी निपजतात. जसे बीज तशी फळें.
पैसा असेल तर माणसाने त्या परिस्थितीचा लाभ घेवून, त्याचा विनियोग धर्ममार्गाकडे, समाजोपयोगी कार्याकडे करुन आत्मकल्याण साधणे हा त्याचा खरा पुरुषार्थ आहे. प्रारब्धस्वरूप आर्थिक स्थिति बेताची असेल, तर त्या परिस्थितीत सुद्धा मनाची शांती डळमळू न देता, समाधानाने वागून अध्यात्मिक आत्मोन्नति साधणे, यांत त्याचा खरा पुरुषार्थ आहे. कोणाचेही शिव्या शाप न घेता, थोड्याशा लाभासाठी सद्सद्विवेक बुद्धिने वागून जे प्राप्त झाले आहे, ते आपल्या लायकीहून अधिक आहे, अशी मनोभावना ठेवून, संतोषपूर्वक समाधानी आयुष्य व्यतीत करणे हा खरा पुरुषार्थ आहे.
माणसाला आयुष्यांत अनेक वस्तू प्राप्त करण्यांची इच्छा होते. धन स्त्री पुत्रादिक बंगला, मोटार, कीर्ति, दान, ध्यान, मोक्ष धर्म इत्यादि अनेक कामना तो उराशी बाळगून असतो. जीवनातल्या अशा सर्व प्रकाराच्या इच्छांचे आपल्या शास्त्रकारानी चार भाग पाडलेले आहेत.
(१) धर्म, (२) अर्थ, (३) काम (४) मोक्ष. उपरोक्त चार गोष्टी माणसाने जीवनात मिळविल्या पाहिजेत.
धर्माचे आचरण करुन माणसाने अर्थ प्राप्त करावा. धर्माने मिळविळेला अर्थ (पैसा) हा शेवटी अर्थकारकच ठरतो. धर्माने प्राप्त झालेल्या अर्थाचा योग्य उपयोग करुन, जीवनांतील सर्व कामनांची पूर्ती करुन, जीवात्म्याचे अंतिम ध्येय जें मोक्ष, ते प्राप्त करण्यांची आकांक्षा बाळगावी.
या चार पुरुषार्थी पैकी, धर्म व मोक्ष हे दोन प्राप्त करण्यासाठी माणसाने सतत प्रयत्न (पुरुषार्थ) करावा, ते कधी ही प्रारब्धावर सोडू नये. आपण नेमके उलट करतो अर्थ व काम यासाठी माणूस दिवस रात्र प्रयत्नशील असतो, व शेवटी पस्तावतो. अर्थ व काम या साठी जरूर यत्न करा, प्रण ते धर्माचा, नीतिचा राजमार्ग न सोडता, व मोक्षाची प्राप्ती करा.
प्रारब्ध व पुरुषार्थ परस्पर विरोधी नाहीत, पण एकमेकाना पूरक आहेत :
आज आपण जे क्रियमाण कर्म (पुरुषार्थ) करतो त्यातील बरेचसे संचितात जमा होऊन कालांतराने जेव्हां पक्व होतें, तेव्हां प्रारब्ध रूपाने आपणास भोगावयास लागते, आणि ते भोगण्यासाठी आपल्याला अनुरूप शरीर व परिस्थिती प्राप्त होते. आजचा पुरुषार्थच भविष्यकाळांत प्रारब्धात रूपांतरीत होतो. आजचा पुरुषार्थ हा जणू उद्याच्या आपल्या बंगल्याचा वा झोंपडीचा ‘ब्ल्यू प्रिंट’ (रूपरेखा) आहे.
म्हणजे वास्तविक पुरुषार्थ व प्रारब्ध या एकाच वस्तूच्या दोन अवस्था आहेत, आणि या दोहोंची कार्यक्षेत्रेच भिन्न असल्याने, त्यांचा एक दुसर्यार्शी विरोध ही नसतो. प्रारब्ध, शरीराला, त्याच्या चांगल्या वाईट रूपाप्रमाणे, भोग प्रदान करते, तर चालू आयुष्यांत केलेला पुरुषार्थ, कालांतराने प्रारब्धांत रूपांतरीत होऊन, भविष्य कालीन शरीराला चांगला वा वाईट भोग प्राप्त करून देतो. इंग्रजीतील “MAN IS THE ARCHITECT OF HIS OWN LIFE” ही म्हण हेच सूचित करते.
मनुष्य स्वत:चें उद्याचे प्रारब्ध, आजच्या आपल्या पुरुषार्थाने घडवत असतो. प्रारब्ध विरहित पुरुषार्थ पांगळा, तर पुरुषार्थ विरहित प्रारब्ध आंधळें.
आंधळा व पांगळा अशा दोन मित्रांच्या गोष्टीसारखे हे आहे. आंधळ्याला रस्ता दिसत नव्हता, तर पांगळ्याला चालतां येत नव्हते, त्यामुळे दोघेही विवश होते. पण दोघानी विवेकबुद्धिचा वापर केला. आंधळ्याच्या खांद्यावर बसून पांगळ्याने त्याला मार्ग दाखविला, व दोघानी आपली प्रवास यात्रा पुरी केली. आपल्या आयुष्याचा प्रवास सफल करण्यासाठी, प्रारब्ध आणि पुरुषार्थ एकमेकाना पूरक बनतात.
आपल्या प्रारब्धानुसार जीवनांत आपण सुख-दुःख अनुभवतो. दुसरे कोणीही आपल्या सुख-दुखाचे कारण असत नाहीत ते केवळ निमित्त मात्र असतात.
सुख-दुःखाचा कोणी न दाता । दुसरा देतो ही कुबुद्धि रेखा || ‘मी’ करतो हा वृथाभिमान । स्वकर्म-सूत्रे गुंफिले सर्व जन ॥
कर्म करण्यांत आपण स्वतंत्र फळ भोगण्यांत परतंत्र :
भगवद्गीतेतील सर्वपरिचित महावाक्य सांगतें :
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण फळ भोगण्यांत तुझा अधिकार नाही. कर्म करण्याचे कर्तव्य तू कर, पण अमूकच फळ मिळाले पाहिजे असा अट्टाहास करण्याचा तुझा अधिकार नाही. या महावाक्याचा अर्थ समजण्यात थोडी चूक होण्याचा संभव आहे. भगवंत असे सांगत नाहीत, की तू कर्म तर कर, पण फळाची कोणतीही आशा, अपेक्षा ठेवूच नको.
एकाद्यार्ने महिनाभर प्रामाणिकपणे मन लाऊन नोकरी केल्यावर, महिना अखेर तू पगाराची अपेक्षा ठेवू नकोस, पगार घेऊ नकोस असे सांगण्यासारखे हे होईल.
हमालाने स्टेशनात तुमचे सामान उचलून गाडींत ठेवल्यावर, जर तुम्ही त्याला सांगितलेत, की भगवद्गीतेत असे सांगितले आहे की सामान उचलून वाहाण्याची मेहनत करण्याचा तुझा अधिकार आहे त्याचे फळ (मजूरी) तू मागू नकोस, तो तुझा अधिकार नाही, तर तो तुम्हाला ठणकावून सांगेल की माझ्या मेहनतीचा योग्य मोबदला तुम्हाला दिलाच पाहिजे. गीतेचे ज्ञान तुम्ही तुमच्या जवळ ठेवा, मला माझी मजूरी द्या. कर्म केले की काहीना काही फळ मिळणारच, फळ दिल्याशिवाय कर्म शांत होणारच नाही.
म्हणजे वरील गीतावचनाचा स्पष्ट अर्थ असा कीं, कर्म करणे वा न करणे हा तुमचा अधिकार आहे, पण एकदा कर्म केलेत की जे फळ मिळेल ते तुम्हाला भोगलेंच पाहिजे. कर्म करणे, न करणे, कसे करणे, कसे न करणे, शुद्ध बुद्धिचा उपयोग करून त्यांत प्रवृत्त होणे अगर न होणे, या गोष्टी तुमच्या अधिकारांत आहेत, पण एकदा कर्म केल्यावर फळ न भोगण्यात तुम्ही स्वतंत्र नाही. म्हणजे जे फळ मिळेल (चांगले वा वाईट) ते तुम्हाला भोगलेच पाहिजे त्यांतून तुमची सुटका नाही, त्यातून कोणतीही पळवाट तुम्हाला काढतां येणार नाही.
उदा. समजा तुम्ही एखाद्या समारंभांत जेवावयास गेला असता जेवताना कोणते पदार्थ किती प्रमाणात खायचे, हे कर्म करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. बासुंदी बिलकूल सोसत नाही, पण तुम्ही बासुंदी अधिक आवडीने खात आहात, हे यजमानाच्या लक्षांत आल्यावर तो बासुंदी वाढून, अधिक घेण्याचा अगदीं प्रेमाने आग्रह करतो. आतां आपली पचनशक्ती लक्षांत घेऊन त्याच्या आग्रहाला बळी न पडण्याचा तुम्हाला अधिकार आहे. बासुंदी प्रमाणाबाहेर “न घेण्याचे कर्म” करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. परंतु आंतरिक वासनेला बळी पडून बासुंदी प्रमाणाबाहेर खाण्याचे कर्म तुम्ही एकदां केलेत (कीं जे न करण्याचाही तुमचा अधिकार होता), तर दुसऱ्या दिवशी पोट बिघडल्यावर तुमच्या कर्माची जी फळे येतील ती न भोगण्यात तुम्ही स्वतंत्र नाही तुम्हाला ती भोगलीच पाहिजेत. –
आज येथेच थांबतो. या पुढील विवेचन आपण पुढील भागांत पाहू.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : प्लुटो ग्रह विचार
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : सहज सुलभ ज्योतिष शास्त्र, स्काय कास्टर, शोन द लैंड
नमस्कार,
आज आपण प्लुटो ग्रहाबद्दल माहिती घेणार आहोत. प्लूटो हा अगदीच अलीकडे शोध लागलेला ग्रह असून सूर्यापासून ९ वा आणि सर्वांत दूरचा ग्रह आहे. प्लूटोचा शोध इ. स. १९३० मध्ये लागला.
प्लूटो व त्याचा सर्वांत मोठा उपग्रह खारॉन यांना अनेकदा जुळे ग्रह मानण्यात येते. प्लूटोला अजून निक्स व हायड्रा हे दोन छोटे उपग्रह आहेत, ज्यांचा शोध २००५ मध्ये लागला.
प्लूटोचा शोध १९३० साली लागला प्लूटो हे नाव प्रथम व्हेनेशिया बर्ने (नंतरची व्हेनेशिया फेअर) या ११ वर्षाच्या ऑक्सफर्ड,इंग्लंड येथील शाळकरी मुलीने सुचविले. व्हेनेशियाला रोमन दंतकथा तसेच खगोलशास्त्राची आवड होती. प्लूटो हे, हेडेस या ग्रीक पाताळभूमीच्या देवाचे दुसरे नाव आहे. तिला हे नाव या संभाव्य काळ्या व थंड ग्रहासाठी योग्य वाटले. तिने तिचे आजोबा फाल्कोनर मॅडन (जे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बोडलेईयन वाचनालयाचे ग्रंथपाल होते) यांच्याशी बोलतांना सुचविले. मॅडन यांनी ते नाव प्राध्यापक हर्बर्ट हॉल टर्नर यांना सांगितले व त्यांनी ते आपल्या अमेरिकेतील सहकाऱ्यांना तारेने पाठवून दिले. या नवीन ग्रहाला २४ मार्च, १९३० रोजी औपचारिकरित्या हे नाव देण्यात आले.
हिंदू पौराणिक कथांमध्ये यमराजाला मृत्यूचा देव म्हणून नियुक्त केले आहे. तो सूर्यदेव किंवा सूर्य भगवान यांचा ज्येष्ठ पुत्र आहे आणि त्याला नरकाचा राजा म्हणून ओळखले जाते. चित्रगुप्त त्याला सर्व पापांचा आणि नश्वरांच्या पुण्यांचा हिशेब ठेवण्यास मदत करतो आणि त्यानंतर यमराज त्यानुसार शिक्षा घोषित करतो. असे मानले जाते की, तो जिथे वास्तव्य करत होता, तो ग्रह प्लुटो असावा व हिंदू पुराणात प्लुटो हा यमराजाचा मूळ ग्रह यम ग्रह म्हणून ओळखला जातो.
प्लूटो एका राशीत साधारण २५-३० वर्षे असतो. प्लूटोला इंद्र किंवा गोरख असेही म्हणतात. प्लुटोला त्याच्या लहान आकारामुळे एक बटू ग्रह म्हणूनसुद्धा ओळखले जाते. प्लूटोला एक राशी भोगण्यास सुमारे २४ वर्षे लागतात. प्लूटो वक्री होण्यापूर्वी ८ दिवस स्तंभी असतो व १६० दिवस वक्री असतो. तसेच मार्गी होण्यापूर्वीदेखील पुन्हा ८ दिवस स्तंभी असतो. हर्षल, नेपच्यून, प्लूटो या ग्रहांना कोणत्याही नक्षत्राचे स्वामित्व नसल्याने, त्यांना महादशेत स्थान नाही. तसेच प्लुटोला राशी अधिपतीत्व नसल्याने व अजून खूप संशोधन गरजेचे असल्याने कारकत्वाच्या अनुरोधानेच भविष्यकथन करावे लागते.
ज्योतिषशास्त्रात, जर एखाद्या व्यक्तीवर प्लूटोचा प्रभाव असेल, तर तो फसवणूक, भ्रष्टाचार, पापी वर्तन आणि बेकायदेशीर कृत्यांमुळे येणारे मोठे संकट, भूकंपीय शक्ती, विनाशकता, परिवर्तन आणि उत्क्रांती, तात्विक परिवर्तन, शक्ती, आणि पुनर्जन्म ची फळे ई. दर्शवतो.
प्लुटो स्थित स्थानानुसार स्थूल फळे अशी सांगता येतील-
१ ले स्थानी प्लुटो : केलेल्या कामाकडे वळून न बघणे, मनासारखे काम न झाल्यास तीव्र संताप जाणवणे, आत्म-विध्वंसक विचार येणे, अंतर्मनाची शक्ती असणे. एकाग्रताने ध्यान करत असताना स्फोटक दृश्ये पाहणे, कारणाबद्दल जास्त विचार न करणे ई.
२ रे स्थानी प्लुटो : पैशाच्या बाबतीत कटू अनुभव, जोखमीचे मानसिक निर्णय, आरोग्य सांभाळा, श्रीमंती, उच्चभ्रू पद्धतीने जगणे, आधुनिकतेची इच्छा, खूप पैसे येऊन अक्षम्य चुकीने पैसा जाणे याबद्दल बेफिकिरी, कुटुंबाशी असहकार्याने वागणे टाळा.
३ रे स्थानी प्लुटो : अस्थिर मन, इतरांचे शब्द आणि कृती, विचार समजून घेण्यास सक्षम, प्रत्येक क्षेत्रातील माहिती आणि संशोधन करून ज्ञान आत्मसात करण्याची आवड, बौद्धिक संबंधित कोडी आणि खेळ सोडवण्याकडे, हेरगिरीकडे कल, कोणतेही काम करताना काही अडथळे आल्यास चिडचिड
४ थे स्थानी प्लुटो : स्वत:ची अथवा एखाद्याची प्रतिमा किंवा चित्र अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणे, अंतर्ज्ञान व त्याचा वापर, घरगुती वातावरणात रमणे, स्वत:च्या जगावेगळ्या पेहराव व वागण्याने कुटुंबातील सदस्यांना त्रास, अंतर्ज्ञानी असूनही समाजाकडून नाकारल्याची भावना, आई-वडिलांचा किंवा सासरच्या लोकांची उपस्थिति आनंदाचे किंवा त्रासाचे कारण ठरते, स्वत:च्या जन्मस्थानी काम, अभ्यास, लहानपणापासूनच डोक्यावर जबाबदारी, स्वतःने निर्माण केलेले वातावरण आणि स्वतःचे क्षेत्रफळ आणि भरभराट असू शकते.
५ वे स्थानी प्लुटो : निरुपयोगी सवयी, कार्यक्षमता आणि स्वतःचे प्रदर्शन करण्याची सवय, मुलांची मानसिकता समजून न घेणे, मुलांना उठसुठ यंत्रवत वागवणे, सतत कामे सांगणे, स्वतःच्या डोक्यातील कल्पना, अभ्यास लादणे, लैंगिक सुखासाठी अनेक कृत्रिम पद्धती वापरणे, लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी कामुक दृश्ये, कामुक आवाज, अश्लील चित्रपट, अश्लील गाणी ई. विविध पद्धतीचा आधार घेणे,अति कामुकतेने शरीर रोग प्रतिकार शक्ती ढासळणे.
६ वे स्थानी प्लुटो : कामाच्या ठिकाणी केले काम प्रदर्शित करण्याची क्षमता, हाताखालील कर्मचार्यांनी, कामगारांची संघटना, यांनी त्याचे सल्ल्याने वागावे ही इच्छा, दीर्घकाळ काम करण्याची, अडचणींशी लढण्याची क्षमता व मानसिकता, जे इतरांना जमणार नाही ते काम करण्याची आवड.
७ वे स्थानी प्लुटो : जोडीदारास स्वतःच्या पद्धतीने वागण्यास भाग पाडणे, त्यामुळे वैवाहिक आयुष्यात जोडीदाराची फरफट व तटस्थ पणा, प्रसंगी कमकुवतपणामुळे शक्तीच्या प्रदर्शनामुळे असंतोष, इतरांमध्ये चांगली किंवा वाईट शक्ती निर्माण करण्याची कला, समोरच्या व्यक्तीची प्रशंसा देखील करू शकतात किंवा मारायलाही तयार, त्यामुळे समाजात खूप प्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध होतात.
८ वे स्थानी प्लुटो : व्यावसायिक मानसिकता, विश्लेषणाची आंतरिक अद्भुत शक्ती, भूतकाळातील, वर्तमानाविषयी व भविष्य कालीन विधाने करण्यास सक्षम, धैर्यवान, ज्योतिष, हस्तरेषा, साधना, उपासना ई. द्वारे शक्ती जागृत करण्याची अद्भुत क्षमता, जीवनाचा अर्थ, मृत्यूनंतर काय होते, भूत आणि अदृश्य शक्तींकडे कल, पत्नी आणि जोडीदाराने भौतिक वस्तूंवर, कामाच्या ठिकाणी स्वयंचलित साधनांवर जास्त खर्च केल्यामुळे वादाचे प्रसंग, जमा केलेल्या पैशांची कमतरता आणि बँकांमधून बचत करण्यात अडचण, सुरक्षेबाबत खूप संवेदनशील, लोकांवर सकारात्मक प्रभाव, अत्यधिक लैंगिक इच्छा, लैंगिक संबंधात कृत्रिम साधनांचा वापर, स्वत:साठी ताकद आणि सामाजिकदृष्ट्या उच्च दाखवण्यासाठी चुकीच्या मार्गांचा वापर.
९ वे स्थानी प्लुटो : सत्ता आणि तंत्र, मंत्र यांच्याबद्दल कुतूहल जागृत ठेवण्याची कला, समाधी अवस्था, ब्रह्मांड विहार आदि सिद्धी ससू शकतात, स्वप्नावस्थेत विविध प्रकारची स्वप्ने दिसणे, धर्म आणि धार्मिक क्षेत्रात विशेष रुची. व्हिडीओ, ऑडिओ ई.क्द्च्वारे धार्मिक प्रसार, विचारमंथनात हरवणे, सत्य स्वीकारणे जड जाते, परामानसशास्त्रीय शक्तींची मदत घेऊन, समाधी इत्यादीद्वारे खूप तणाव होतो, स्वप्नात दृष्टांत, आकाश प्रवास, त्यांना विमान प्रवास आणि पॅराशूटिंगमध्ये नोकरी, भौतिक साधनांसह उंच ठिकाणाहून उडी मारणे आणि स्टंट करणे याची आवड.
१० वे स्थानी प्लुटो : असामाजिक घटकांचा कामावर आणि व्यक्तिमत्त्वावर परिणाम, लोकांकडून होणारे राजकारणाचा त्रास, स्वतःच्या विचारांवर आणि कृतींवर नियंत्रण ठेवावे. स्वत:च्या क्षमतेवर कमी विश्वास, समाजासाठी आपली शक्ती खर्च करून देखील समाजाकडून अवहेलना, जलद प्रगतीसाठी निवडलेला मार्गच अधोगतीचे कारण, जे काम करतो, ते दिसत नाही, बाकी जे काही दिसत आहे ते प्रत्यक्षात घडत नाही.
११ वे स्थानी प्लुटो : मित्रांच्या आधाराची गरज भासते, स्वतः मित्रांच्या सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न करतात, पालकांना विसरतो आणि कुटुंब आणि मित्र जे काही म्हणतील त्यावर विश्वास ठेवल्यामुळे आपल्याच लोकांवरचा विश्वास कमी करतो, मैत्रीची भावना बर्याच प्रमाणात असते. मित्र वापर करतात आणि अशाश्वत असतात. वेगवेगळ्या प्रकारची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी मैत्री, वेगवेगळ्या प्रकारचे संबंध, कामांत, सामाजिक किंवा कौटुंबिक त्याच्या भविष्यातील प्रगती आणि अधोगतीसाठी जबाबदार मानले जातात, धडा घेऊन, तो आपल्या कृतीतून समाजाचा किंवा समाजाचा प्रमुख बनून आपल्या आयुष्यात पुढे येऊ शकतो. अन्यायाविरुद्ध लढत राहावे लागते,
१२ वे स्थानी प्लुटो : प्रवृत्ती सत्य आणि सर्वोच्च शक्ती शोधण्याची, सामाजिक नियमांचे पालन, तांत्रिक कृतीची आवड, कल्पनेतून लोकांना संमोहित करणे, अचानक शारीरिक किंवा मानसिक वेदना, अहंकारी कृतीचा नंतर त्रास, दांभिकता
प्लुटोची राशी स्थित स्थूल फळे अशी सांगता येतील-
मेष राशीत प्लूटो : ध्येयर्पुर्तीसाठी, प्रतिष्ठेसाठी सातत्याने वाटचाल, मनासारखे काम न झाल्यास प्रचंड चिडचिड, आत्म-विध्वंसक विचार येणे, अंतर्मनाची शक्ती असणे
वृषभ राशीत प्लूटो : आर्थिक सुबत्तेसाठी प्रयत्न सातत्याने यश, जोखमीचे निर्णय अंगलट, अनारोग्य, श्रीमंती, उच्चभ्रू पद्धतीने जगणे, आधुनिकतेची इच्छा यात पैसा जाणे, कुटुंबाशी असहकार्य .
मिथुन राशीत प्लूटो: बुद्धिमत्ता, विचार आणि संवाद संबंधि भूमिकेत अचानक बदल. माहिती आणि ज्ञान आत्मसात करण्याची आवड, बौद्धिक संबंधित कोडी आणि खेळ सोडवण्याकडे कल, चंचल मन
कर्क राशीत प्लूटो : मनासारखे वागण्याने कुटुंबातील सदस्यांना त्रास, अंतर्ज्ञानी असूनही समाजाकडून नाकारल्याची भावना, आई आनंदाचे किंवा त्रासाचे कारण ठरते. भावना अचानक अनियंत्रित होऊ शकतात.
सिंह राशीत प्लूटो : प्रतिष्ठेच्या आणि व्यक्तिगत स्वीकृतीच्या विषयांमध्ये आग्रही भूमिका. कार्यक्षमता आणि स्वतःचे प्रदर्शन करण्याची सवय
कन्या राशीत प्लूटो: दीर्घकाळ काम करण्याची, अडचणींशी लढण्याची क्षमता व मानसिकता, जे इतरांना जमणार नाही ते काम करण्याची आवड. त्यांना आपल्या आरोग्याची पथ्ये पाळणे आवश्यक.
तुळ राशीत प्लूटो : वैवाहिक आयुष्यात जोडीदाराची फरफट, प्रसंगी स्वताच्या इच्छेप्रमाणे संतुष्टतेच्या आग्रहापायी आणि अन्याय वैवाहिक आयुष्यात स्फोटक परिस्थिती.
वृश्चिक राशीत प्लूटो : गंभीर भावना आणि आपल्या गूढ विषयांमध्ये फार रुची असू शकते. गुप्त संबंधांकडे ओढा.
धनू राशीत प्लूटो : ईश्वरी सत्ता आणि तंत्र, मंत्र यांच्याबद्दल कुतूहल जागृत ठेवण्याची कला, समाधी अवस्था, ब्रह्मांड विहार आदि सिद्धी ससू शकतात, स्वप्नावस्थेत विविध प्रकारची स्वप्ने दिसणे, धर्म आणि धार्मिक क्षेत्रात विशेष रुची. व्हिडीओ, ऑडिओ ई. संध्नानी धार्मिक प्रसार, अनिष्ट संबंध आल्यास अतिरेकी.
मकर राशीत प्लूटो : असामाजिक घटकांचा कामावर आणि व्यक्तिमत्त्वावर परिणाम, लोकांकडून होणारे राजकारणाचा त्रास, स्वतःच्या अनियंत्रित विचार आणि कृती.
कुंभ राशीत प्लूटो : नातेवाईक, कुटुंब आणि मित्र जे काही म्हणतील त्यावर विश्वास ठेवल्यामुळे नुकसान, मैत्रीची भावना बर्याच प्रमाणात असते. मित्र वापर करतात आणि अशाश्वत असतात. वेगवेगळ्या प्रकारची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी मैत्री, वेगवेगळ्या प्रकारचे संबंध.
मीन राशीत प्लूटो : सत्य आणि सर्वोच्च शक्ती शोधण्याची लालसा, सामाजिक नियमांचे पालन, तांत्रिक कृतीची आवड, कल्पनेतून लोकांना संमोहित करणे, अचानक शारीरिक किंवा मानसिक वेदना, अहंकारी कृतीचा नंतर त्रास, बुवाबाजी मुळे संकटात.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : चित्रा नक्षत्र विचार
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : नक्षत्र ज्योतिष
नमस्कार,
आज आपण चित्रा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. चित्रा हे नक्षत्र चक्रातील १४ वे क्रमांकाचे नक्षत्र असून त्याचा आकार नक्षत्राचा आकार मोत्यासारखा असून त्याचा एक ठळक व मोठा तारा आहे तारा हिरव्या रंगाचा असून अतिशय तेजस्वी आहे. आग्नेयेकडे उगवताना हे नक्षत्र दिव्यासारखे चमकत असते. चैत्र महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसू शकते व हे नक्षत्र अतिशय ठळक, मोठे असल्याने आकाशात सहज ओळखता येते. या नक्षत्राला इंग्रजीत ‘स्पायका’ असे म्हणतात.
या नक्षत्राचे पहिले २ चरण कन्या राशीत व शेवटचे २ चरण तूळ राशीत येत असल्याने हे नक्षत्र द्विपाद आहे. नक्षत्राचा स्वामी मंगळ, दैवत त्वष्ठा हा देवांचा कारागीर असून राशी स्वामी बुध व शुक्र असून हे राक्षसगणी आहे म्हणून या नक्षत्रात मंगळाचा हट्टीपणा, कर्तृत्व, बुधाची अप्रतिम बुद्धिमत्ता व शुक्राचे सौंदर्य व कलाकौशल्य व त्वष्टाची उत्तम कामगिरी यांचा अपूर्व संगम दिसून येतो. तसेच ते तिर्यङ्मुख, मध्यलोचनी व मित्रगणी आहे.
चित्रा या शब्दाचा अर्थच चित्रासारखे एखादे चित्र जसे, बराच काळ सुंदर व जशास तसे दिसते तसे चित्राने म्हणजे चिरकाल तारुण्य देणारे, नेहमी टवटवीत दिसणारे. चित्रा नक्षत्रावरच्या आई व मुली सारख्याच दिसतात. वडील व मुलगा बरोबर फिरायला निघाले की लोक त्यांना ‘भाऊ-भाऊ’ किंवा वडिलांनाच मुलगा समजतात.
चित्रा नक्षत्र राक्षसगणी असून शुभ गुणधर्मानी भरलेले आहे. तसेच लक्ष्मीदायक आहे. चित्रा नक्षत्रावर जन्मलेले जातक उग्र बुद्धीचे, सुंदर, विद्वान, कलाकौशल्याची व छानछोकीची आवड असणारे, बुद्धिमान, चळवळ्या स्वभावाचे, धडपडे, शूर, धाडसी, कर्तृत्ववान पण थोडे रागीट, तामसी व हट्टी असतात. मात्र त्यांच्यात क्रूरपणा किंवा खुनशीपणा दिसून येत नाही. तसेच त्या सदाचारी, ईश्वरभक्त, परोपकारी, कुटुंबवत्सल, व्यवहारकुशल, सेवावृत्तीच्या, संसारी आणि तडफदार असतात. हे जातक स्वकर्तृत्वाने पुढे येतात.
चित्राच्या पावसात मोती तयार होतात. म्हणून ते मोत्यांना व खड्यांना चांगले.
चित्रा पुरुष जातकांना हे नक्षत्र शरीरप्रकृती, कलाबुद्धी व सौंदर्यालाही अनुकूल आहे. पण अधिकारयोगासाठी साधारण आहे. चित्रा पुरुष जातकांचा बांधा उंच, सडपातळ, सडसडीत, हाडापेराने मजबूत, काटक व प्रमाणशीर असतो. हे जातक श्रम व कष्ट करणारे व सौंदर्यवान वस्तू ख्यालीखुशाली, चैन, कलाकौशल्य याचीसुद्धा आवड असणारे असतात व धन व सुख यात या रमणारे असतात.
चित्रा स्त्री जातकांना मात्र हे नक्षत्र फार चांगले आहे. स्त्रियांना रूप, सौदर्य कलाकौशल्य, बुद्धी, धन अशा सर्वच दृष्टीने उत्तम आहे. या सर्वच गोष्टीचा मिलाफ चित्रा नक्षत्रात दिसून येतो. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रिया उंच पण सडपातळ बांध्याच्या प्रमाणशीर व रेखीव अवयव असणान्या, कंबरेच्या खालील भाग जरा उंच, कंबर बारीक, उभार, चेहरा, लावण्य असणारा, चमकदार, आकर्षक, मोहक, नाक सरळ व सुरेख काळेभोर डोळे, कमानशीर भुवया, व ओठ धनुष्याकृती, चेहरा अगदी मुसमुसणारा असतो. या नक्षत्रावरच्या स्त्रिया चिरकाल तरुण दिसणाऱ्या असतात. चित्रा स्त्री जातक हसताना असो, रागावलेली असो, उभी असो, बसलेली असो, लाजत असो किवा काम करत असो, तिच्या सौंदर्यात गोडवाच असतो. या नक्षत्रात फणकारा, तृप्तपणा, अवखळपणा, स्वप्नाळूपणा, लाजणे, ठसठशीतपणा, मादकपणा व तेजस्वीपणा या सर्वांचे अनोखे मिश्रण आढळून येते. या नक्षत्रावरच्या स्त्रियांना कधी शेपटे, कधी अंबाडा, कधी मोकळे केस, कधी गजरा तर कधी नुसतीच फुले यांची आवड असते. त्या फाजील फॅशनेबल नसल्या तरी थोडया नटून सजणाऱ्या असतात. दागिन्यांचा हव्यास नसला तरी मोत्याच्या माळा व खड्याच्या अंगठ्या प्रिय असतात. भरदार शालू किवा गडद अथवा मॅचिंग कपड्यापेक्षा त्यांना प्रिंटेड वायल्स अथवा पातळे जास्त आवडतात. विशेषत: निरनिराळ्या डिझाईनची व सताठ कडक राहणाऱ्या साड्यांची फार आवड असते. नेसणेही व्यवस्थित व आकर्षक असते. सौंदर्यदृष्टी, चिकित्सक वृत्ती व निवड करण्याची वृत्ती अप्रतिम असते. त्या रसिक, हौशी, कलाप्रिय, आनंदी, सौंदर्यदृष्टीची आवड असणाऱ्या व विनयशील असल्या तरी रागीट, तामसी व थोड्या हट्टी असतात. त्या पटकन रागावतात व शांतही होतात. तसेच वेळप्रसंगी त्या धीट व धाडसीही बनतात. या स्त्रियांचे सौंदर्य हेच बऱ्याच वेळा त्यांच्या संकटाला कारण ठरू शकते. चित्रा नक्षत्रांच्या स्त्रियांचा आवडता छंद म्हणजे शॉपिंग होय. दोन-चार मैत्रिणींना घेऊन तीन-तीन, चार-चार तास शॉपिंग करणं यांना फार आवडते. प्रत्येक गोष्ट त्या अतिशय चिकित्सेने पहात असतात. एका साडीसाठी त्या संबंध दिवस व १५-२० दुकाने पालथी घालतील. तसेच त्या चित्रकला, नृत्य, रांगोळी. भरतकाम, शिल्पकाम, खोदकाम, कोरीव काम, कशिदा विणणे यातही पारंगत असतात. चंद्र व शुक्र या नक्षत्रात असता हे गुणधर्म विशेष आढळून येतात.
चित्रा नक्षत्राखाली येणारा वर्ग बराचसा सुखवस्तू व श्रीमंत असतो. विशेष करून कारागीरवर्ग जास्त आहे. सोनार, हिरेघासू, तांबा, पितळ अथवा इतर भांड्यांचे कारागीरी संबंधित, शिंपी, चित्रकार, पेंटर्स, शिल्पकार, सौंदर्यप्रसाधन तयार करणारे, सोने, चांदी, हिरे, माणके, रेशमी व उंची वस्त्रे यांचे व्यापारी, आर्किटेक्ट, इजिनिअर्स, शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स, डेकोरेटर्स, अत्तरे, फुले यांचे व्यापारी, पान्याचे व्यापारी, सुंदर व शोभेच्या वस्तू तयार करणारे, नाटक, सिनेमा यांना लागणारे पडदे व इतर वेशभूषा यांचे व्यापारी, चैनीच्या वस्तूंचे व्यापारी, सिनेमात करणारा वर्ग, स्त्रियांचे कपडे शिवणारे शिपी, कॉन्ट्रॅक्ट ई.
याखाली येतो.
चित्रा नक्षत्रात रवी शरीरप्रकृतीच्या दृष्टीने साधारण असतो. शरीर काटक व मजबूत असते. शारीरिक उर्जा उत्तम. बुद्धीने साधारण, अधिकार योगाला बरा.
चित्रा नक्षत्रात चंद्र नक्षत्रात अनुकूल असतो. बांधा गोंडस व प्रमाणशीर, चेहरा सुंदर, मोहक व मोठे डोळे बर्यापैकी बुद्धी, धीट, विनोदी व हुशार असतो. रूप, कला व धन प्राप्तीसाठी अनुकूल.
चित्रा नक्षत्रात मंगळ हे नक्षत्र स्वतःचेच असल्याने चांगला, बांधा उंच, सडपातळ, सडसडीत व काटक असतो. चेहरा सुंदर पण जरासा उग्र असतो. मंगळ आर्किटेक्ट, शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स, इंजिनिअर्स, यांत्रिक कलाकौशल्य यांना चांगला, पण रागीट, चैनी व कामासक्त प्रवृत्तीचा असू शकतो. बिघडला असता कामी, व्यसनी, व्यभिचारी, गर्विष्ठ व अस्थिर बुद्धीचा होतो.
चित्रा नक्षत्रात बुध फारसा अनुकूल नाही. बांधा मध्यम, चेहरा सुंदर, बुद्धी मध्यम असते. विनोदी, खुषमस्कऱ्या, आळशी व थोडा दुर्गुणी असतो. गणित व भूमितीला बरा.
चित्रा नक्षत्रात गुरु रूप व धन चांगले देतो. शरीर साधारण भरलेले, सशक्त, बुद्धी मध्यम, पण श्रीमंत व्यापारी, सोनार यांना अनुकूल असतो.
चित्रा नक्षत्रात शुक्र अनुकूल ठरतो. रूप, कला, धन या सर्वच दृष्टीने चांगला असतो. शरीर प्रमाणशीर, सुडौल, रेखीव अवयव, सुंदर आकर्षक व मोहक चेहरा असतो. तो टेक्स्टाईल इंजिनिअर, आर्किटेक्ट, गायन, वादन, नृत्य, कलाकौशल्याची कामे व उंची वस्त्रे, हिरे, माणके, सोने व सौंदर्यप्रसाधने यांच्या व्यापाराला चांगला, धन चांगले मिळते. वाहनसौख्य मिळते.
चित्रा नक्षत्रात शनि प्रतिकूल ठरतो. शरीरप्रकृती बरी, बुद्धी व रूपाने मध्यम, मात्र धनाच्या दृष्टीने उत्तम. कापड, धान्य, कापूस कारखाने, कॉन्ट्रॅक्टर व सर्व वस्तूंच्या घाऊक व्यापाराला चांगला, मात्र जरा कंजूष, लोभी व संशयी असतो.
चित्रा नक्षत्रात राहु अनुकूल ठरतो. बांधा उंच प्रमाणशीर, रेखीव ऐटबाज व डोळ्यात एक प्रकारचा मोहकपणा किंवा जादू आढळते. राहू हा आर्किटेक्ट, फोटोग्राफी, पेंटिंग, ड्रॉइंग, हस्तकला कौशल्य, जादूची विद्या यांना चांगला. मात्र हे जातक चैनी, विलासी, रंगेल, व्यसनी असू शकतात, धन मात्र चांगले मिळते.
चित्रा नक्षत्रात केतू फारसा चांगला नाही. शरीरप्रकृती बरी असली तरी बांधा जरा अप्रमाणबद्ध असतो. धन असूनही विरक्त, अरसिक, आळशी व राहणाऱ्या असतात. मात्र शस्त्रक्रियेला चांगला.
चित्रा नक्षत्रात हर्षल बुद्धीला व शरीरप्रकृतीसाठी बरा असला, तरी बांधा जरा अप्रमाणबद्ध असतो. धन असूनही जातक अरसिक, आळशी व गबाळा राहणारा असू शकतो. शस्त्रक्रियेला चांगला असतो. कल्पनाशक्ती, संशोधनवृत्ती व यांत्रिक, कलांना ठीक. इंजिनिअरिंग, मोठमोठे व्यापारी, कारखानदार यांना चांगला. पण अतिफॅशन, विलास, चैन व ख्याली- खुशालीची आवड असते. रंगेलपणा जास्त असतो. चित्रा नक्षत्रात नेपच्यून, शरीरप्रकृती व रूप यांना बरा. बांधा प्रमाणशीर, गोंडस व चेहरा सुंदर, तेजस्वी, मोहक व प्रसन्न दिसतो. तो तंतुवाद्य, संगीत, कल्पनाशक्ती, प्रतिभाशक्ती, अंतःस्फूर्ती यांना अनुकूल असतो, मात्र विलासीपणा दिसून येतो. या जातकांना गूढविद्येची आवड असू शकते.
चित्रा नक्षत्रावर होणारे आजार मोठे नसले तरी दाहक असू शकतात. अतिउष्णतेने डोके दुखणे, डोळे जळजळणे, ताप, कंबर दुखणे, कापणे, भाजणे, खरचटणे, शस्त्रक्रियेच्या जखमा, स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास होणे किंवा लघवीचे विकार, मूतखडा, किडनीचे विकार, व्यसनामुळे होणारे रोग, कावीळ, डोळयाचे विकार हे प्रमुख होत. मंगळ अशुभ योगात असता ऑपरेशनने अपघात, चिघळणार्या जखमा संभवतात.
चित्रा नक्षत्रावर जन्मणाऱ्यांचे हस्ताक्षर मोठे, ठळक व उभट व रेखीव असते. वळण छान असते. लिहिताना सरळ व वरवर लिहितात. नक्षत्रावर ६ व ९ या अंकाचे वर्चस्व जास्त असते. ६ अंक भाग्यांक वाटतो. शुक्राचा हिरा किंवा बुधाचा पाचू लाभदायक असतो. मध्यलोचनी नक्षत्र असल्याने वस्तू हरवल्यास ती बऱ्याच प्रयत्नांनी वस्तू पश्चिमेला शोधाशोध केल्यावरच मिळते.
चित्रा हे राक्षसगणी नक्षत्र असले तरी मुहूर्त शास्त्रात यांचे महत्त्व जास्त आहे. या नक्षत्रावर नवीन अलंकार व वस्त्र घेणे, धारण करणे, नृत्य, कला, संगीत शिकण्यास प्रारंभ करणे, विद्याभ्यासास आरंभ करणे, औषधे घेणे, औषधी झाडे लावणे, विहिरी खणणे, शस्त्रक्रिया करणे, जनावरे घेणे व देणे, गलबत पाण्यात लोटणे, जमीन नांगरणे तसेच जावळ काढणे, बारसे, मुलाचे नाक, कान, टोचणे, मौंजी, वधू प्रवेश, घर बांधणे, फळे व फुले यांचे वृक्ष लावणे यांना चांगले. नारदमते हे नक्षत्र विवाहालाही अनुकूल आहे.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)