वारी लागता जेष्ठा ची चाहूल लागे पालखीची आस हरीनामा च्या घोषात मनी विठूचाच ध्यास नाही कोणा आवतण ना पत्रिका अक्षत विठुराया च्या भेटीसाठी वेड जीवा लागत निघता माऊलींची पालखी कसा कळस डोलतो ज्ञानियाला निरोप देता कंठ का ग दाटतो पंढरी च्या वाटेवरी चाले भक्त जनांचा हो मेळा दिंड्या पताका झळकती कधी दिसेल विठू डोळा भजन कीर्तनाची गोडी साखरेहूनी गोड विठू च्या नामघोषाला त्या फुगडी ची जोड अश्व घालती रिंगण सोहळा तो वाखरीत वारकरी होती दंग भक्ती भावा च्या रंगात विठू च्या नामघोषात दुमदुमली पंढरी हरिनामा च्या गजरात रंगली वैखरी विठुराया च्या दर्शनाने होई वारी ची सांगता माहेरा च्या भेटीने होते मनास शांतता विठू आमची माऊली आम्ही तिची लेकरं कृपावंत हो विठाई घाली मायेची पाखर.
मिडीयावर अनेक पोस्ट फिरत असतात. त्यातील अशीच एक पोस्ट समोर आली व चांगली वाटली. त्याच छोट्याशा रूपक कथेचा स्वैर अनुवाद येथे देत आहे.
फार पूर्वी एका राज्यात एक ज्ञानी व अनुभवी राज ज्योतिषी रहात होते. त्यांचा मुलगासुद्धा ज्योतिर्विद्येत त्यांच्याइतकाच प्रवीण होता. एकदा राजाची तब्येत खालावल्याने त्यांना दरबारात पाचारण करण्यात आले. दोघे दरबारात गेले. दोघांनी राजाच्या कुंडलीचे सूक्ष्म परीक्षण केले.
मुलगा म्हणाला, हे राजा तुम्हाला वाईट वाटेल, पण सत्य सांगणं हे माझं काम आहे. तुम्ही फार काल जगाल असे वाटत नाही. माझ्या अभ्यासानुसार तुमचं आयुष्य आता सात दिवसांचं उरलेलं आहे.
भर दरबारात ही क्लेशदायक भविष्यवाणी ऐकून त्यास अपमान झाल्याचे वाटले आणि हे ऐकून राजा भयंकर संतापला. त्याने त्या ज्योतिष्याच्या मुलाला अभद्र भविष्य वाणी केल्याबद्दल चाबकाचे फटके मारून हाकलून देण्याचा आदेश दिला.
आता वडील पुढे सरसावले. ते म्हणाले, हे राजन माह्या कुंडली निरीक्षणानुसार तुमचं साम्राज्य लवकरच विस्तारणार आहे आणि तुमच्या सगळ्या चिंता-विवंचनांमधून तुम्ही लवकरच मुक्त होणार आहात. तुमच्या कुलदेवतेची उपासना करून पुढील मार्ग सुकर होवो असा आशीर्वाद घ्या.
हे ऐकून राजा प्रसन्न झाला व वडिलांचा सुवर्णमुद्रा देऊन सत्कार केला.
दरबारातून बाहेर पडल्यानंतर पाठ चोळत वडिलांबरोबर निघालेला मुलगा रागाने म्हणाला, तुम्हालाही माहिती आहे की, सम्राट सात दिवसांच्या वर जगणार नाही. तुम्ही त्याला ते का नाही सांगितलंत? खोटं का बोललात?
वडील म्हणाले, मीही त्याला तेच सांगितलं, पण त्याला रूचणाऱ्या भाषेत.
सांगायचे तात्पर्य ज्योतिषी कितीही पारंगत असला, तरी भविष्य कथन करताना जातकाचा स्वभाव, भावना, आजुबाजूची परिस्थिती लक्षात घेऊन योग्य व सकारात्मक रीतीने सत्य कथन करून त्यावर शक्य असल्यास उपाय सुचवणे खूप महत्वाचे आहे.