Category: Uncategorized

अध्यात्म आणि अध्यात्मिकता


अध्यात्म आणि अध्यात्मिकता

काळ आणि जडविश्व यांच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्त्वाचा अभ्यास करणारे शास्त्र. हे दृष्य विश्व पंचमहाभूतांचे आहे. पृथ्वी, आप (पाणी), तेज (उष्णता), वायू, आकाश, या पंचभौतिक प्रकृतीत तीन गुण १) सत्व,२) रज, ३) तम यांची मिळून अष्टधा प्रकृती निर्माण झाली. प्रत्येक प्राणी मात्रांचे शरीर ह्या अष्टधा प्रकृतीने बनलेले आहे. शरीर हे जड (जे डोळ्यानां दिसते) आहे. परमात्मा अजड आहे (अदृष्य आहे, जो चराचरात भरला आहे, प्रत्येक प्राणीमात्रांच्या ह्रदयात आहे ज्याची या जगावर सत्ता आहे तो परमात्मा, ईश्वर) त्याचा अभ्यास म्हणजेच अध्यात्म.
अधि म्हणजे बुद्धी. बुद्धी आत्म्याकडे वळवणे म्हणजे अध्यात्म. देह बुद्धीच्या पलीकडे जाऊन स्वानंद मिळवणे म्हणजे आध्यात्म. देह बुद्धी विसरणे म्हणजे देह विसरणे नव्हे तर एक प्रकारे देहाच्या अनावशक क्रिया विसरणे. परमेश्वर निर्मित सृष्टी रचना व नियम (जन्म, मृत्यू, संकटे, आनंद, दु:ख ई) समजून चित्त शांत व स्थिर करुन भौतिकतेकडे ओढ असलेली मनोवासना नियंत्रित करणे हे अध्यात्म शिकवते.
अध्यात्म- ‘अधि आत्म’- म्हणजे स्वतकडे पाहणे. अर्थातच आत्मपरीक्षण. ऐहिक गोष्टींपेक्षा मोठे काहीतरी, परिपूर्ण असलेले, खोलवर अर्थ प्राप्त करून देणारे आयुष्यात काही आहे याचा विचार आणि एक ‘पूर्णत्वा’ची आस निर्माण होणे. त्याचा वेध घेऊन त्यात आपले म्हणजे मानवाचे स्थान काय, कार्य काय, हे शोधून काढण्याची प्रक्रिया म्हणजे आध्यात्मिकता.
मनात चांगल्या विचारामुळे चांगल्या इच्छा निर्णाण होतात ज्या मनाला समाधान देतात. मनुष्य चुकीचा विचार करून, चुकीच्या मार्गाने जाऊन अनावश्यक चिंता ओढावून घेत असतो. नि:शंक व निर्भय मन शरीराला पुरेशी झोप / ताकद / आरोग्य देते. भीती फक्त मनात असते. नि:शंक निर्भय होण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म. प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता, काळजी आहेच. ती मनाची तगमग थांबवण्याचे शास्त्र अध्यात्म. हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे.
अध्यात्म आणि धर्म हे दोन्ही संस्कृतीचा भाग आहेत. मानवापेक्षा श्रेष्ठ असा देव वा शक्ती असते हे आध्यात्मिक माणूस मानेलच असे नाही. आस्तिक आणि नास्तिक दोघेही आध्यात्मिक असू शकतात. धर्म माणसाला जगण्याचा मार्ग दाखवतो. पण खूप वेळा धार्मिकता ही रूढी-परंपरा, परमेश्वरस्तुती, पूजा-अर्चा, प्रार्थना यातून व्यक्त होते. याउलट आध्यात्मिकतेला कर्मकांडाचे बंधन नाही. असे असले तरी धार्मिकता, धर्मश्रद्धा ही आध्यात्मिकता वाढवणेसाठी फ़ायदेशीर होऊ शकते.

आजच्या संघर्षमय जीवनात, मनशांती मिळवणे अधिकाधिक गरजेचे वाटू लागले आहे. सभोवताली अनेक भौतिक प्रलोभने, जीवनात यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी स्पर्धा, अत्यंत धकाधकीचे आणि असुरक्षित दैनंदिन जीवन या सगळ्यात जीव मेटाकुटीस येतो. मनात निर्माण होणाऱ्या चिंता, विषाद, एखाद्या आपत्तीनंतर मनावर होणारा आघात या सर्वाचा यशस्वीपणे सामना करताना इतर अनेक गोष्टींप्रमाणे आध्यात्मिक दृष्टिकोनाचा खूप फायदा होतो हे आत्तापर्यंतच्या विविध शास्त्रीय संशोधनातून क्षात आले आहे.
अध्यात्माकडे कल असलेल्या व्यक्तीच्या मेंदूतील मज्जातंतूंच्या जाळ्यात बदल होतात. अंत:स्राव करणाऱ्या संस्था आणि प्रतिकारशक्ती यांमध्ये अनुकूल बदल घडतात. त्यामुळे त्या व्यक्तीचे रोगांपासून, शारीरिक आणि मानसिक संरक्षण होते. विषादाच्या मनोविकाराचा आध्यात्मिक दृष्टिकोनातून सामना केला तर उदासी कमी होते. आयुष्यात समाधानी असलेला आणि ‘आपल्या जीवनात काही शुद्ध हेतू आहे’ असे मानणारा कमी निराश होतो.
कॅन्सर, हृदयरोग सारख्या विकाराचा सामना करताना किंवा मज्जारज्जूच्या शस्त्रक्रियेतून बरे होताना जी अति चिंता निर्माण होते ती नियंत्रणात आणण्यासाठी आध्यात्मिकतेचा उपयोग होतो. मानसिक विकारांची रुग्णाकडून माहिती घेताना त्याचा धार्मिक, आध्यात्मिक दृष्टिकोन समजून घेणे दिवसेंदिवस महत्त्वाचे बनले आहे. मानसिक उपचारांमध्येदेखील आध्यात्मिकतेचा उपयोग केला जाऊ लागला आहे.
देऊळ, देवळातले वातावरण, भजन-कीर्तन, नामस्मरण, चर्च- मशिदीतील वातावरण या सगळ्याचा आध्यात्मिकता वाढण्यासाठी उपयोग होतो. प्रार्थनेत, निसर्गाच्या सान्निध्यात अंतर्मुख करण्याची, लीनता निर्माण करण्याची, विनम्र भाव निर्माण करण्याची शक्ती असते. मोठय़ाने उच्चारलेले मंत्रोच्चारण, ठेक्यात आणि तालात एकत्र म्हटलेले भजन, चर्चमध्ये गायली जाणारी ईशस्तुती, प्रवचन या सगळ्यातून अमाप मनशांती आणि समाधान मिळते.
आध्यात्मिक मनोवृत्तीतून आशा, समाधान, क्षमाशीलता आणि प्रेम निर्माण होते. मानसिक स्वास्थ्य वाढीस लागते. नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला या कालाविष्कारांतूनही आध्यात्मिकता व्यक्त होते. एक अवर्णनीय मानसिक शांती प्राप्त होते. येणारी अनुभूती स्वतचा शोध घ्यायला लावणारी असते.
अशी अनुभूती मनाला उभारी देते, भविष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करते.
आपल्याकडे संतसाहित्यही आध्यात्मिकतेतून मनाचा विचार मांडताना दिसते.
समर्थ रामदासांनी तर ‘मनाचे श्लोक’ लिहिले. आपले दुख आणि चिंता कमी करण्यासाठी स्वतपलीकडचा व्यापक विचार करण्याचा एक उत्तम परिपाठच.
II मना मानसी दुख आणू नको रे II II मना सर्वथा शोक चिंता नको रे II
II विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी II II विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी II
माझ्या अल्पबुद्धीनुसार घेतलेला हा अध्यात्मिकतेचा बोध. आपण आपला आत्मशोध घेऊन समाधानी व्हावे ही सदिच्छा…

– ज्योतिषमित्रमिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

श्रीकृष्णाची कुंडली


श्रीकृष्णाची कुंडली

श्री कृष्णाय नमः 🙏
भगवान श्री कृष्ण असा असाधारण अवतार आहे की, त्याचे आयुष्यावर, गीता उपदेशावर संशोधन करण्यासाठी आपले आयुष्य वाहणारे सर्वधर्मिय जगभर पसरलेले आहेत. त्या श्री कृष्णाची ज्योतिष शास्त्रकारांच्या मते जी कुंडली प्रचलित आहे, ती आपण थोडक्यात पाहू.

श्री कृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्ष अष्टमीला रात्री ठीक १२ वा. झाला. त्यासमयी वृषभ रास पूर्वेस उदीत हो्ती व चंद्र वृषभ राशीतील च रोहिणी नक्षत्रात होता. म्हणजेच श्री कृष्णाची जन्म रास व चंद्र रास दोन्ही वृषभ आहेत.
१ ले स्थानी म्हणजेच लग्नी चंद्र स्वत:च्या उच्च राशीत असल्याने व चंद्र मनाचा कारक असल्याने ते सर्वांची मनस्थिती जाणन्यात माहिर होते. तसेच चंद्राची कर्क रास ३ रे स्थानात असल्याने ते अत्यंत पराक्रमी, बुद्धिवाण आणि वाणी वर अत्यंत प्रभुत्व असणारे होते. लग्न व चंद्र राशीचा स्वामी शुक्र यामुळे तो रसिक, कलासंपन्न, मनमोहना असा होता.
४ थे स्थानात सुर्य सिंह या स्वत:च्या राशीत असल्याने सुखस्थानात असल्याने प्रत्येक समस्येचे निराकरण व समाधान ते करु शकले.
५ वे स्थानात बुध कन्या या स्वत:च्या राशीत असल्याने विलक्षण बुद्धी व अनेक गुप्त विद्या लीलया अवगत होत्या.
६ वे स्थानात शनी तुळ या स्वत:च्या उच्च राशीत असल्याने व भाग्य (९) व कर्म (१०) स्थानाचा मालक असल्याने दिग्गज शत्रूलाही (राक्षस, कंस ई.) नामोहरम केले.
६ वे स्थानात १ ले स्थानाचा मालक शुक्र शनी व केतूबरोबर असल्याने जन्म काळ्कोठडीत (तुरुंगात) झाला.
९ वे स्थानात ७ वे व १२ वे स्थानाचा मालक मंगळ मकर या उच्च राशीत असल्याने प्रतिस्पर्धी व गुप्त शत्रूचा पाडाव, प्रसंगी राजकारण वा धुर्तपणा दाखवून सहज केला.
११ वे स्थानात गुरु हा मीन या स्वत:च्या राशीत असल्याने व ८ वे स्थान मृत्यू स्थानाचा मालक असल्याने जन्म मृत्यूचे गूढ विवेचन गीतेद्वारे विषद केले.
१२ वे स्थानात राहू हा ७ वे व १२ वे स्थानाचा मालक मंगळाच्या राशीत असल्याने श्रीकृष्णाच्या रासलीला व प्रेम अध्याय व स्त्रियांना लोभवणारे व्यक्तीमत्व लाभले.
जन्माष्टमीचे निमित्त साधून या लेखाद्वारे श्री कृष्णाला कोटी कोटी दंडवत.
II जय श्रीकृष्ण II 

– ज्योतिषमित्रमिलिंद

“नवपंचम योग / त्रिकोण योग”


“नवपंचम योग / त्रिकोण योग”

आपल्याला खुप वेळा आपल्या गुरुजींच्या मुखातुन नवपंचम अथवा शुभ पंचम योग आहे असे शब्द प्रयोग कानावर पडत असतात.
म्हणजे नक्की काय हे आपल्याला कळत नसते पण नवपंचम व शुभपंचम या शब्दांवरुन काही तरी खास आहे असे आपण तर्क लावत असतो. आज आपण याच योगाविषयी जाणून घेणार आहोत.

दोन ग्रहांच्या मधील अंतर हे १२० अंश असते तेव्हा नवपंचम योग तयार होतो. या योगाचे वैशिष्ट्य म्हणजे तत्वाच्या राशीतून हा योग आकारास येतो, त्यात तत्व हे समान असते.
म्हणजेच १-५-९ (मेष-सिंह-धनु) या अग्नी तत्वाच्या राशी, २-६-१० (वृषभ-कन्या-मकर) या पृथ्वी तत्त्वाच्या राशी, ३-७-११ (मिथुन-तुळ-कुंभ) या वायु तत्वाच्या राशी व ४-८-१२ (कर्क-वृश्चिक-मीन) या जलतत्वाच्या राशीं मधून हा योग साकारला जातो.
नक्षत्र चक्राचा विचार केला तर योग अचुक १२० अंशाचा असेल तर एकाच नक्षत्र स्वामीच्या विभागातुन साकारला जातो. कारण १२० अंशांवर केतू पासून सुरु झालेली एक माला पूर्ण होऊन एकूण ३ वेळा अशी माला येऊन २७ नक्षत्रे ३६० अंशाचा फ़ेरा पूर्ण करतात.

याप्रमाणे १-५-९ (मेष-सिंह-धनु) हा धर्म त्रिकोण (धर्म, कर्तव्य, पूर्वकर्म, कीर्ती कारक योग)
२-६-१० (वृषभ-कन्या-मकर) हा अर्थ त्रिकोण (संपत्ती कारक, चालू कर्म कारक योग)
३-७-११ (मिथुन-तुळ-कुंभ) हा काम त्रिकोण (वैवाहिक / शरीर सुख, मैत्री कारक योग)
४-८-१२ (कर्क-वृश्चिक-मीन) हा मोक्ष त्रिकोण (मुक्ती, मोक्ष, अध्यात्म कारक योग)

या चार त्रिकोणां मधुन नवपंचम योग / त्रिकोण योग होतो.

थोडक्यात नवपंचम वा त्रिकोण योगात संकल्पना पुढे नेणे, विस्तार वा नवनिर्मिती करणे हे सूत्र दिसते. अर्थात या योगाशी पूरक ग्रह त्यामधे स्थित असतील व त्या संबंधित ग्रहांची दशा चालू असतील तेव्हा ही फ़ळे प्राप्त होतील.

– ज्योतिष मित्र मिलिंद jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

विंशोत्तरी दशा पद्धति : आयुष्यातील चढ़ उतार जाणून घ्यायचे एक गणिती तंत्र


विंशोत्तरी दशा पद्धति :
आयुष्यातील चढ़ उतार जाणून घ्यायचे एक गणिती तंत्र

आज आपण थोड़े ज्योतिष शास्त्रातील दशा पध्दति चे विश्लेषण करणार आहोत. आपण बऱ्याच वेळा ऐकत असतो, काय दशा झाली आहे त्याची. दशा म्हणजे स्थिती. आपली आयुष्यात काळा नुसार चांगली अथवा वाईट स्थिती बदलत राहते. वाईट काळ कधी संपेल व चांगला काळ कधी असेल हे आधीच जाणून घ्यायची माणसाला नेहमीच उत्सुकता वाटत आली आहे. दशा पद्धति म्हणजे आयुष्यातील चढ़ उतार नक्की केव्हा असतील है जाणून घ्यायचे एक गणित तंत्र.
पूर्वीच्या काळी हिंदू ज्योतिष शास्त्र कारांनी विंशोत्तरी, अष्टोत्तरी, योगिनी, पाराशरी अशा ४३ विविध प्रकारच्या दशा शोधल्या होत्या. नंतर काळाच्या ओघात या पद्धति लोप पावल्या. सध्या विंशोत्तरी, अष्टोत्तरी आशा मोजकया दशा प्रचलित आहेत.
जसे ३६० अंशाचे १२ विभाग केले असता राशी चक्र तयार होते, तसेच ३६० अंशाचे २७ नक्षत्रांमधे विभाजन करून नक्षत्र चक्र तयार होते. एका ग्रहाच्या मालकीची ३ नक्षत्रे असतात. या नक्षत्र चक्र आणि राशी चक्राची फ़ार सुंदर गुफ़ण करण्यात आली आहे. थोड्क्यात १ नक्षत्र म्हणजे १३ अंश २० कला चा एक विभाग. सहाजिकच राशीफ़लात सुक्ष्मता आणण्यासाठी नक्षत्र विभागाचा उपयोग होतो. या नक्षत्रांचा क्रम ठरलेला असतो. मेष राशीतील अश्विनी हे पहिले नक्षत्र जे केतूचे आहे तिथुन सुरु होऊन केतू, शुक्र, रवी, चंद्र, मंगळ, राहू, गुरु, शनी, बुध व परत केतू पासून बुध पर्यंत असा ३ वेळा ९ ग्रह मिळून २७ नक्षत्रांचे एक चक्र पूर्ण होते. थोडक्यात ९ ग्रहांची एक माला १२० अंशात पूर्ण होते. १२० अंश गुणिले ३ माला बरोबर ३६० अंश.
अशी रचना करण्याचे काय कारण असावे हे मला विशोत्तरी दशेचा अभ्यास करताना लक्षात आले. विशोत्तरी दशा ही एक सुक्ष्मता व अचुकता देणारी नक्षत्राधारित कालमापन पध्दति आहे. १२० वर्ष हे माणसाचे जास्तीत जास्त आयुष्य मानुन ते या नक्षत्र मालेशी संबंधित आहे. जन्मकाळी चंद्र ज्या नक्षत्रात असेल तिथुन त्या नक्षत्राच्या मालकीच्या ग्रहाची महादशा सुरु होते. प्रत्येक महादशेची वर्षे ही ठरलेली आहेत. केतू ७ बर्षे, शुक्र २० वर्षे, रवी ६ वर्षे, चंद्र १० वर्षे, मंगळ ७ वर्षे, राहू १८, गुरु १६, शनी १९, बुध १७ असे मिळून १२० वर्षे १२० अंश पूर्ण होतात. याप्रमाणे जन्मदशा अंशात्मक विभाजन करुन अंतर्दशा, विदशा, सुक्ष्म दशा, प्राण दशा ई. शोधतात. व त्यामुळे कुंडलीत दिसत असलेले एखादे फ़ळ अथवा योग उदा. विवाह योग, संतती योग कधी प्राप्त होईल याचे अगदी वर्ष, महीना, दिवस असा सुक्ष्म अनुमान घेता येते. यासाठीच अंशात्मक जन्मकुंडली व्दारे वर्तवलेले फ़ळ गोचर फ़ळांपेक्षा बहुतांशी जास्त सुक्ष्म व अचुक येते असा अनुभव आहे.
धन्य ते आपले पूर्वज ज्यांनी अवघ्या मानव जगताचे आकलन एका जन्मकुंडली व्दारे रेखाटले.

– ज्योतिषमित्रमिलिंद

मानवी शरीर व त्यावरील राशींचा प्रभाव


मानवी शरीर व त्यावरील राशींचा प्रभाव

मानवी शरीरातील कोणता भाव पीडीत वा प्रभावित झाला आहे हे कुंडलीद्वारे तपासताना स्थान, योग, दशा, गोचर ई. गोष्टी बघताना राशींचा प्रभाव त्या त्या अंगाने बघणे योग्य ठरेल.

१. मेष : मस्तक, कपाळ, मेंदू
२. व्रुषभ : मान, गळा, कंठ, श्वास नलिका, अन्न नलिका
३. मिथुन : खांदे, हात, बाहू, फुप्फ़ुस
४. कर्क : छाती, स्तन
५. सिंह : पाठ, पाठिचा मणका, ह्रुदय
६. कन्या : पोट, लहान मोठे आतडे, जठर
७. तुळ : कंबरेचा भाग, मूत्रपिंड
८. व्रुश्चिक : गुप्तेंद्रिये
९. धनु : मांड्या
१०. मकर : गुडघे
११. कुंभ : पोटरी, पिंढरी
१२. मीन : तळपाय, घॊटा

वास्तवत: वैद्यकिय क्षेत्रातील मंडळीनी सुध्दा याबाबतीत तुलनात्मक अभ्यास करुन व सखोल निरीक्षणे नोंदवावीत व आपल्या प्राचिन शाखेचा सर्वांच्या आरोग्यरक्षणासाठी कसा उपयोग करुन घेता येईल याचा विचार करावा.

-ज्योतिषमित्र मिलिंद

कुंडली तील १२ स्थाने काय फळ देतात हे दाखवणारा चार्ट


नमस्कार मित्रांनो,आज आपण कुंडलीतील १२ स्थाने कशाप्रकारचे फळ देऊ शकतात हे पाहणार आहोत. स्थान आणि रास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सूर्य मालेत ग्रह ज्या ३६० अंशाच्या वर्तुळाकार कक्षेत फिरत असतात. ती कक्षा ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण पट्टया प्रमाणे १२ भागात विभाजित करून त्या प्रत्येक भागास मेष, … Continue reading कुंडली तील १२ स्थाने काय फळ देतात हे दाखवणारा चार्ट

न्यूटन चा गती प्रतिगती चा नियम आणि कुंडली


न्यूटनचा गती व प्रतिगती चा नियम व कुंडली आज आपण न्यूटनचा गती व प्रतिगती चा जो नियम आहे, त्याची कुंडली अनुसार सोप्या भाषेत उकल करण्याचा प्रयत्न करु. NEWTON’S LAW : To every Action there is equal & opposite Reaction provided that there is no external … Continue reading न्यूटन चा गती प्रतिगती चा नियम आणि कुंडली

ठोकळा कुंडलीद्वारे जन्म काळ, जन्म तिथी, जन्म महिना व जन्म वर्ष ओळखण्याची युक्ती


ठोकळा कुंडलीद्वारे जन्म काळ, जन्म तिथी, जन्म महिना व जन्म वर्ष ओळखण्याची युक्ती

एखाद्या ज्योतिषासमोर आपण आपली ठोकळा कुंडली समोर ठेवताच क्षणार्धात काही गोष्टी आपल्याला सांगतो व भोळे लोक त्याला चमत्कारी, सिद्धी पुरुष अशी विशेषणे लावून मोकळे होतात आणि अनावश्यक उपायांसाठी तयार होऊन खर्चास बळी पडतात. या विद्येचा योग्य मेहनताना घेऊन लोकांना दिशा देण्यासाठी उपयोग करणे चांगलेच. पण लोकांच्या श्रद्धेचा गैरफ़ायदा घेऊन लुटणे हे वाईटच. वास्तविक त्यामागे कुंडलीतील मूलभूत तत्वांचा अभ्यास त्यामागे असतो. व जेवढे त्यचे निरीक्षण उत्तम तेवढे उत्तर अचुक.

आपणा सर्वांना महित आहेच सुर्य सकाळी ६ ते ८ वा. दरम्यान उगवतो व ३६० अंश चे चक्र पूर्ण करून २४ तासांनी परत पुर्व दिशेला त्याच राशीत उगवतो. ती रास लग्न स्थान १ ले स्थान असते. २४ तास १२ स्थानात विभागले असता लक्षात येईल कि सूर्य एका स्थानात सुमारे २ तास असतो. आता सुर्य त्या राशीपासून किती पुढे सरकलाय त्यावरून कोणीही अनुमान लावू शकतो कि जन्म किती वाजण्याच्या सुमारास झाला आहे. उदा. सूर्य १ ले स्थानात असेल तर सकाळी ६ ते ८ वा दरम्यान १२ व्या स्थानात असेल तर सकाळी ८ ते १० वा. दरम्यान अजुन एक स्थान पुढे सरकला ११व्या स्थानात असेल तर सकाळी १० ते १२ वा.

आपणा सर्वांना महित आहेच सुर्य साधारण १ महीना एका राशीत असतो. १४ जानेवारीच्या सुमारास मकर संक्रांतीला मकर राशीत प्रवेश करतो. म्हणजेच १४ फ़ेब्रुवारीच्या सुमारास कुंभ राशीत प्रवेश करेल. याचाच अर्थ कुंडलीत सूर्य मकर राशीत दिसत असेल तर जन्म १४ जानेवारी ते १४ फ़ेब्रुवारीच्या दरम्यान झाला असेल. सूर्य कुंभ राशीत दिसत असेल तर जन्म १४ फ़ेब्रुवारी ते १४ मार्च च्या दरम्यान झाला असेल. सूर्य मीन राशीत दिसत असेल तर जन्म १४ मार्च ते १४ एप्रिल च्या दरम्यान झाला असेल.

अमावस्येला कुंडलीमधे सूर्य व चंद्र एकाच राशीत असतात आणि पौणिमेला एकमेकांपासून ७ व्या राशीत असतात. एक रास अंतर पुढे जाण्यासाठी साधारण सव्वा दोन दिवस वा २ तिथी लागतात. त्याप्रमाणे जन्म तिथी ओळखता येते.

जन्म वर्ष ओळ्खण्यासाठी शनी व गुरु भ्रमणाचा एकत्र विचार करावा. शनी एका राशीत अडीच वर्ष असतो. सध्या कोणत्या राशीत आहे व जन्मकुंडलीत कोणत्या राशीत यातील किती घरे पुढे सरकलाय गुणिले अडीच वर्ष यावरुन वयाचा अंदाज बांधता येतो. ज्याचा अंशात्मक अभ्यास जास्त त्याचे उत्तर जास्त अचुक येते.

– ज्योतिष मित्र मिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

ज्योतिष मित्र सेवा


  • वैयक्तिक भेट व ज्योतिष मार्गदर्शन
  • रु.५००/- प्रति सत्र
  • विवाह योग, संतती योग मार्गदर्शन
  • नोकरी, व्यवसाय समस्या मार्गदर्शन
  • शिक्षण, करियर योग मार्गदर्शन
  • वैयक्तिक समस्या ज्योतिष समुपदेशन

कुंड्लीतील राशींची मांडणी


कुंड्लीतील राशींची मांडणी

सामान्य माणसांचा तसा कुंडलीशी फ़ारसा संबंध येत नाही. बहुतांश वेळा घरातला जुना पसारा आवरत असताना जीर्ण झालेली वडीलधारी मंडळीनी आपल्या जन्मा वेळी गुरुजींनी बनवलेली ठोकळा कुंडली सापडते किंवा मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमवताना कुंडली आणली आहे का बरोबर असे विचारले जाते तेव्हा आठ्वण होते. काही चॊकोनात ग्रह व राशी कोंबलेल्या असतात, कसले तरी आकडे लिहिलेले असतात त्यावरुन काही बाही भविश्य वगैरे बघतात हे आपली अगाध माहिती. वधुपिता या बाबतीत थोडे प्रगत असतात व मंगळ तीव्र वा निर्दोष आहे, शुक्र बिघडलाय, षडाष्टक आहे वगैरे चर्चा करताना दिसतात.

वास्तविकपणे पृथ्वी वरुन पाहिल्यास आकाशस्थ आपली सुर्यमाला व त्यातील ग्रह तारे एखाद्या विशिष्ट वेळी कोणकोणत्या भागात आहेत व आपल्याशी कोणता कोन साधत आहेत. व त्यांच्या गुरुतवाकर्षण शक्तीचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो या साठी मांडलेला चित्रालेख म्हणजे कुंडली.

एखादा ग्रह कोणत्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण पट्ट्यात फ़िरत आलेला आहे ते भाग म्हणजे राशी.
चंद्र हा उपग्रह देखील त्याचा आकर्षणाचा मोठा प्रभाव टाकत असल्याने त्याचाही समावेश केला आहे. परिभ्रमणाचा हा चक्राकार मार्ग त्या ग्रहांच्या पट्ट्यांप्रभाणे १२ भागात विभागूण त्या त्या ग्रहांच्या अधिपत्यांप्रमाणे राशीना नाव दिले गेले.
उदा. सुर्याच्या मालकीची सिंह(५) राशी त्या बरोबर चन्द्राच्या मालकीची कर्क(४) राशी.
त्यानंतर सुर्याच्या जवळ्चा ग्रह बुधाच्या पलिकडे कन्या(६) राशी अलिकडे मिथुन(३) राशी. त्यानंतरचा जवळ्चा ग्रह शुक्र च्या तुळ(७) व व्रुषभ(२) राशी.
त्यानंतर मंगळाच्या पलिकडे व अलिक्डे ब्रुश्चिक(८) व मेष(१) राशी.
त्यानंतर गुरुच्या अलिकडे पलिकडे धनु(९) व मीन(१२) राशी,
व शेवटी शनीच्या मकर(१०) व कुंभ(११) राशी

अशी वास्तविक चित्रालेखाद्वारे वैशिश्ट्यपूर्ण मांडणी म्हणजे कुंडलीचा साचा व त्या भागाप्रमाणे ग्रह कोणत्या भागात आहे हे समजणे सोपे जाते. सुक्ष्मता साधण्यासाठी अंशात्मक ग्रह, नक्षत्र, चरण, उपनक्षत्र असे अनेक विस्त्रुत अध्ययन आहे.

तर मित्रांनो अशी आहे कुंड्लीतील राशींची मांडणी.

  • ज्योतिषमित्रमिलिंद