Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

मुखसामुद्रिक शास्त्र (FACE READING) : चेहरा वाचाल तर वाचाल


नमस्कार,

आपला चेहरा हा स्वभावाचा आरसा मा नला जातो. न बोलताही चेहरा बरेच काही सांगून जातो. आपल्या नेहमी सहवासात असलेल्या व्यक्तीची चेहऱ्यावरची रेघ आणि रेघ आपल्याला माहित असते. थोडासा झालेला बदल देखील त्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे, याचा अंदाज देऊन जातो. चेहरा ओंजळीत लपवला, तर तो लाजण्यासाठी कि रडणे झाकण्यासाठी हे आपण सहज ओळखून जातो. हे झाले जवळच्या व्यक्तीबाबत. पण समाजातील अशा अनोळखी, बहुरूपी बहुविध चेहर्यांचा देखील अभ्यास करून सूक्ष्म निरीक्षणे नोंदली गेली आहेत. देहबोलीचाच हा एक भाग आहे.

दोन व्यक्ती अगदी अपवादात्मक एकमेकांसारख्या दिसतात. प्रत्येकाची रचना वेगळी, ठेवण वेगळी, दोन डोळे, दोन कान, एक नाक व दोन ओठ ह्यांच्या अब्जावधी रचना होऊनही जगात दोन व्यक्ती सारख्या दिसत नाहीत हे विधात्याचे केवढे कौशल्य आहे. आणि चेहऱ्यावरून प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव कळतो हे अजून आश्चर्यकारक आहे.

अर्थातच देश-प्रदेश, काळ याप्रमाणे मुखसामुद्रिक शास्त्र सापेक्ष फलिते वर्तवीत असते. व्यक्तीचा जसा स्वभाव असतो, त्याप्रमाणेसुद्धा तिचा चेहरामोहरा, अंगकाठी, अंगकांती इत्यादींवर परिणाम होतो. भारतीय संशोधक देखील या बाबतीत मागे नाहीत. भारतीय व्यक्तिपुरता पूर्वजांनी ह्या नोंदवलेल्या निरीक्षणातून व्यक्तिमत्त्वाच्या कोणत्या पैलूंव्दारे स्वभावदर्शन होऊ शकते हे आपल्यासमोर ठेवत आहे. हे वर्णन वाचून कोणत्याही व्यक्तीबद्दल समाज गैरसमज करून घेऊ नये. व्यक्तिमत्व घडण्यास अनेक घटक कारणीभूत असतात हे ध्यानात ठेवावे.

आपल्याकडे पुरुषाची सरासरी उंची साडेपाच फूट व स्त्रीची सरासरी उंची पाच फूट धरतात. अति उंच व्यक्ती शांत प्रवृत्तीच्या, फार महत्वाकांक्षा नसलेल्या, कोणताही निर्णय सावकाश घेणाऱ्या असू शकतात. तर अत्यंत बुटक्या व्यक्ती शीघ्रकोपी, जबरदस्त महत्वाकांक्षी, कर्तबगार, सावधचित्त, दुसऱ्यावर हुकूमत गाजविणाऱ्या असू शकतात. व्यक्तीमत्वातील खुजेपणा त्या कर्तबगारीने भरून काढतात. एकंदरीत उंच व्यक्तीपेक्षा बुटक्या व्यक्तीच जास्त कर्तृत्ववान आढळून येतात.

कृष्णवर्णाच्या व्यक्ती निराश वृत्तीच्या, पापभिरू, कोठेतरी पक्की श्रद्धा ठेवणाऱ्या असू शकतात. तर गोऱ्यापान व्यक्ती फटकळ, अहंकारी, कमी मित्र-मैत्रिणी असलेल्या आढळतात. त्यातल्या त्यात तांबूस गौरवर्णी असलेल्या व्यक्ती तर फारच शिष्ट असू शकतात. क्षुल्लक चुकीलासुद्धा त्या क्षमा करीत नाहीत. सावळ्या रंगाच्या व्यक्ती मनमिळावू , प्रणयी स्वभावाच्या, रसिक आढळतात.

डोक्यावरील दाट कुरळे केस कलाकार मनाचे लक्षण असते. अति कुरळ्या केसांच्या व्यक्ती कामुक असू शकते. ज्या व्यक्तीच्या डोक्याच्या मागील बाजुचे केस उभे राहतात ती अत्यंत चतूर, हजरजवाबी, जागरूक, हिशोबी आढळते. विरळ केसांच्या व्यक्ती काळजी करणाऱ्या, गंभीर वृत्तीच्या, क्वचित कमनशिबीही असू शकतात.

कानाच्या बाजूचे केस व बाकीचे टक्कल असलेल्या व्यक्ती विनोदी, गमत्या स्वभावाच्या व उतार वयापर्यंत शरीरसुखाचा हव्यास असणाऱ्या असू शकतात. कोणत्याही गोष्टीकडे फार गंभीरपणे पहाणे त्यांना जमत नाही. कपाळ भव्य, परंतु मध्येच फुगीर असलेल्या व्यक्ती चांगल्या गोष्टींवर प्रेम करणाऱ्या व वाईट गोष्टींपासून कटाक्षाने दूर रहाणाऱ्या, करारी स्वभावाच्या, भाग्यवान असतात, अति भव्य कपाळ असलेली स्त्री सुलक्षणी, जोडीदाराला भाग्यवर्धक व सौभाग्यशाली असते.

कपाळाचा आकार खूप लहान व उतरता असलेल्या व्यक्ती खडतर नशीब असलेल्या, अपयशी व त्यामुळे वैतागलेल्या आढळतात.

कानाच्या पाळ्या चेहऱ्याला घट्ट चिकटलेल्या असल्यास व्यक्ती कमालीची हट्टी, कोणावरही विश्वास न ठेवणारी, छळवाद करणारी, शंकेखोर, गलिच्छ विचारसरणीची असू शकते, तर कानाच्या पाळ्या चेहऱ्यापासून काटकोनात असणाऱ्या व्यक्ती भोळसट, बडबड्या, निष्पाप असतात. कानाचा आकार वरून मोठा असून खाली अरुंद, चिंचोळा होत जाणाऱ्या व्यक्ती बहुश्रुत, हुशार, ग्रहणशील असतात.

कान चेहऱ्याच्या मानाने फारच लहान असता, व्यक्ती बेरक्या स्वभावाची असते. श्रवणशक्ती तीक्ष्ण असून, स्वभावात लुच्चेपणा असतो.

डोळे मोठे व बटबटीत असणारी व्यक्ती अत्यंत निरुपद्रवी, आळशी, तसेच अल्पबुद्धी असू शकते, तर डोळे चेहऱ्याच्या मानाने फारच लहान असता संधिसाधू, कारस्थानी आढळते. काळेभोर, मासोळीसारखे डोळे प्रेमळ, निष्कपटी स्वभाव दर्शवतात. घारे डोळे (विशेषत: हिरवट झाक असलेले) कंजुषवृत्ती, कपटीपणा, छद्मीवृत्ती, नास्तिकता, कमालीचा लोभी व स्वार्थी स्वभाव दर्शवतात. निळसर अगर गर्द निळे डोळे पारंपारिक अभिमान, प्रखर ध्येयवाद दर्शवतात, एखाद्या गोष्टीसाठी अगर तत्वासाठी त्या वाट्टेल तो त्याग करतात, ज्वाज्वल्य अभिमान असून निर्भिड वृत्ती आढळते.

केसरी रंगाचे डोळे दुर्मिळ असून, अंतःस्फुर्तीचे कारक असतात. अशा व्यक्ती स्वप्नाळू असून त्यांच्यात दैवी शक्ती असू शकते. त्यांना वाचासिद्धी असू शकते. त्यांना सूचक स्वप्ने पडतात. संधिकाळी त्यांच्यात शक्तीचा संचार होतो व त्या अगोदर पाहू शकतात, सांगू शकतात, त्यांच्या आयुष्यातही त्यांना आश्चर्यकारक दैवी साक्षात्कार होतात. लाल रंगाचे डोळे तापट व व्यसनी स्वभावाचे कारक असून उष्णतादर्शक असतात. ह्या व्यक्ती जुलुमी स्वभावाच्या असतात. निस्तेज डोळे पराक्रमशून्य, निराश वृत्तीचे, रोगट शरीराचे निदर्शक असतात..

लांबसडक व कुरळे दाट केस असलेल्या स्त्रिया अतिशय हौशी, रसिक, चारित्र्यवान असून लोकप्रिय असतात. त्या उत्तम संसार करतात व जोडीदाराला सर्वार्थाने सुखी करतात. त्या स्त्रियांच्या स्वभावात विनय, नम्रपणा असूनही शृंगारकला असते. म्हणूनच अशी ‘लंबकेशा’ स्त्रियांच्या स्वभावात आज्ञाधारक सून, आवडती वहिनी, तसेच मोहक पत्नी असते, अशी स्त्री अत्यंत सद्गुणी असते. अति कुरळे परंतु तोकडे केस असलेली स्त्री कामुक वृत्तीची व सुखोपभोगाकडे कल असलेली आढळते.

दोन भुवयांच्या मध्ये केस असलेली व्यक्ती उतारवयात खूप श्रीमंत, परंतु उधळी बनते. लांब पोपटी नाक असलेल्या व्यक्ती आढ्यताखोर, अति मानी परंतु कर्तबगार असतात. सर्वांनी त्यांना मान दिल्यास त्या खूष असतात. दुसऱ्यांना आपल्या तालावर नाचवणे त्यांना जमते व आवडते.

आखुड व पसरट नाकाची मंडळी शामळु, आत्मविश्वास कमी असलेली असतात. सरळ व नाजूक (चाफेकळी) नाकाच्या व्यक्ती हौशी, यशस्वी व सत्शील वृत्तीच्या असतात. नाकाच्या मानाने नाकपुड्या फेंदारलेल्या, मोठ्या असल्यास स्वभाव चिडका, पोकळ डौल अगर भपका दाखवण्याचा असतो.

अति स्थूल व्यक्ती तडजोड करणाऱ्या, फारशा कोणाच्या भानगडीत न पडणाऱ्या, आळशी स्वभावाच्या असतात. तर अत्यंत कृश व्यक्ती संशयी स्वभावाच्या, क्वचित चहाडखोर, चिडचिड्या स्वभावाच्या असतात. अति स्थूल व्यक्ती तडजोड करणाऱ्या का असतात हथाला एक गमतीदार कारण देतात. ते म्हणजे त्यांना मारामारी करता येत नाही व पळताही येत नाही. काही अति कृश व्यक्ती कपटी स्वभावाच्या आढळतात.

आपल्याही माहितीत अशी काही निरीक्षणे असतील तर कॉमेंट मध्ये जरूर लिहा, जेणेकरून सर्वांनाच त्याचा लाभ घेता येईल.

ज्योतिष मित्र मिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

विशोत्तरी दशा पध्दतीतील समतोल तत्वानुसार ग्रहांची खगोलशास्त्रीय बैठक


विषय : विशोत्तरी दशा पध्दतीतील हीच समतोल तत्वानुसार ग्रहांची खगोलशास्त्रीय बैठक (ज्योतिष शास्त्र)
लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : नक्षत्र संचित दर्पण

नमस्कार,
निसर्गात प्रत्येक गोष्टीचा समतोल राखला जातो त्यामुळेच सर्व चराचरांचे अस्तित्व टिकून आहे. आग आहे तिथे पाणीही आहे. अॅसीड आहे तिथे अल्कलीही आहे. प्राणीमात्र श्वसनातून कार्बनडाय ऑक्साइड सोडतात तो शोषून घेण्यासाठी वनस्पती आहेत, ज्या आपल्यासाठी ऑक्सीजन देतात. आणि म्हणूनच समतोलत्वाच्या तत्वा प्रमाणे हे फक्त पृथ्वीच्याच बाबतीत शक्य असल्यामुळे पृथ्वीवर चराचर सृष्टी निर्माण होऊन ती अजून पर्यंत टिकून राहिली आहे.

मध्यंतरी माझा “ विंशोत्तरी दशा पद्धति : आयुष्यातील चढ़ उतार जाणून घ्यायचे एक गणिती तंत्र “ हा लेख प्रकाशित झाला होता. त्यामध्ये राशी चक्र आणि नक्षत्र चक्र यांची आपल्या पूर्वसुरींनी कशी सुंदररित्या सांगड घातली आहे हे विषद केले होते.
आज आपण थोड़े ज्योतिष शास्त्रातील विशोत्तरी दशा पध्दतीत देखील हीच समतोलत्वाची ग्रहांची खगोलशास्त्रीय बैठक गोष्ट कशी साधलेली आहे याचे विश्लेषण करणार आहोत.

पूर्वीच्या काळी हिंदू ज्योतिष शास्त्र कारांनी विंशोत्तरी, अष्टोत्तरी, योगिनी, पाराशरी अशा ४३ विविध प्रकारच्या दशा शोधल्या होत्या. नंतर काळाच्या ओघात या पद्धति लोप पावल्या. सध्या विंशोत्तरी, अष्टोत्तरी आशा मोजक्या दशा प्रचलित आहेत हे आपणांस माहित आहेच. ज्याला ज्या पद्धतीचा अनुभव जास्त आलाय, तो तो ज्योतिषी ती पद्धत भविष्य कथनासाठी स्वीकारतो. माझे गुरुजी कृष्णमुर्ती पद्धतीचे अभ्यासक होते. सहाजिकच विशोत्तरी दशेचा अभ्यास, प्रभाव व अनुभव आहे.

आपण ज्योतिषी, पृथ्वीच्या सापेक्ष प्रत्येक ग्रहाची आकाशातील स्थिती चे अवलोकन करून व गणित मांडून ग्रहांना कुंडलीतील बारा राशीत विभागतो. पण आकाशात ते सात ग्रह व राहू-केतूचे दोन बिंदू कसे भ्रमण करतात, त्याकडे कधी मान वर करून बघण्याची तसदी घेत नाही. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण केले, तर असे दिसेल की


१. पृथ्वीला मध्ये ठेवून दोन ग्रह बुध व शुक्र आतील कक्षेत आहेत
२. तर मंगळ, गुरु व शनी हे बाहय कक्षेत आहेत.
३. आतील कक्षेत बुध-शुकाबरोबर आपल्या सूर्यमालेचा मध्यबिंदू जो सूर्य तोही आतील कक्षेत आहे.
म्हणजेच तीन ग्रह आतील कक्षेत व तीन ग्रह बाह्य कक्षेत आहेत
४. सातवा ग्रह जो चंद्र तो पृथ्वीभोवता फिरून दोन्ही कक्षेत भ्रमण करीत आहे.
५. राहू-केतू हे दोन बिंदू आकाशात कुठे आहेत हे गणिताने मांडलेले आहे. केतू हा बिंदू पृथ्वीच्या आंतरकक्षेत तर राहू बिंदू बाहय कक्षेत धरला.


आपण वैश्विक किरणांचे स्त्रोत म्हणून सात ग्रहांकडे पहातो, आणि म्हणूनच जिथून हा स्त्रोत उगम पावतो त्या नक्षत्र मंडळालाही ही सात नावे व राहू-केतूची दोन नांवे देवून त्याप्रमाणेच त्यांच्याकडे स्वामित्व दिलेले आहे.


विशोत्तरी दशेत जन्मकाळी चंद्र ज्या नक्षत्रात असेल तिथुन त्या नक्षत्राच्या मालकीच्या ग्रहाची महादशा सुरु होते. प्रत्येक महादशेची वर्षे ही ठरलेली आहेत. केतू ७ बर्षे, शुक्र २० वर्षे, रवी ६ वर्षे, चंद्र १० वर्षे, मंगळ ७ वर्षे, राहू १८, गुरु १६, शनी १९, बुध १७ असे मिळून १२० वर्षे, १२० अंश पूर्ण होतात. याप्रमाणे जन्मदशा अंशात्मक विभाजन करुन अंतर्दशा, विदशा, सुक्ष्म दशा, प्राण दशा ई. शोधतात. व त्यामुळे कुंडलीत दिसत असलेले एखादे फ़ळ कधी प्राप्त होईल याचे अगदी वर्ष, महीना, दिवस असे सुक्ष्म अनुमान घेता येते.

सत्तावीस नक्षत्रांचे, तीन नक्षत्रांचा एक विभाग इयाप्रमाणे नऊ विभाग करून या नऊ ग्रहांना त्यांचे स्वामित्व दिले आहे. आश्विनी नक्षत्रांची सुरुवात धरून त्यानी स्विकारलेले स्वामित्व खालील क्रमाने येते.

केतू – शुक्र – रवि – चंद्र – मंगळ – राहू – गुरु – शनि – बुध

या क्रमातील बुध सूर्याच्या सर्वात जवळ असल्याने जर सुरुवातीस घेतला तर क्रम असा होईल.

बुध – केतू – शुक – रवि = चंद्र = मंगळ – राहू – गुरु – शनि

चंद्र हा दोन्ही कक्षेत फिरणारा ग्रह मध्य घेतला तर आंतर कक्षेतील चार ग्रह व बाह्य कक्षेतील चार ग्रह पृथ्वीच्या दोन बाजूस येतात. आपल्या विंशोत्तरी प्रमाणे या ग्रहाना देण्यात येणा-या वर्षाची बेरीज करून काय मिळते ते पाहू.

बुध १७ वर्षे + केतू ७ वर्षे + शुक २० वर्षे + रवि ६ वर्षे + चंद्र १० वर्षे एकूण ६० वर्षे
तसेच
मंगळ ०७ वर्षे + राहू १८ वर्षे + गुरु १६ वर्षे + शनी १९ वर्षे = एकूण ६० वर्षे

म्हणजेच राशी चक्रा प्रमाणेच नक्षत्र चक्र आधारित विशोत्तरी दशा पध्दतित देखील ग्रहांचे अंशात्मक अंतर पार होण्यास व त्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील घटना यांना लागणारा काल मोजताना निसर्ग रचनेप्रमाणे समतोल साधलेला आढळतो.
म्हणूनच आपण विशोत्तरी दशा पध्दती वापरून कालनिर्देश केला तर तो अचूक येतो असा माझा अनुभव आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

कोणत्या महिन्यात झाला विवाह – थोडी रंगत थोडी गंमत आपल्या वैवाहिक नात्याबद्दल (राशी प्रभाव)


विवाहित जोडपे ज्याला इंग्लिशमध्ये “soul mate” म्हटले जाते. म्हणजेच ज्यांचे आत्मा/अंतःकरण एकरूप होतात. ज्योतिष शास्त्रात सूर्यास आत्माकारक ग्रह मानतात. चला तर मग
आपले विवाह कोणत्या सुर्यराशीच्या महिन्यात झाले आहेत, याचा आपल्या नात्यावर कसा प्रभाव पडत असेल. हे ढोबळमानाने जाणून घेऊ…थोडी रंगत थोडी गंमत आपल्या वैवाहिक नात्याबद्दल

😊

टीप : हे ढोबळ अनुमान असून परस्पर पुरकता जाणून घेण्यासाठी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणे आवश्यक असते.

💞१४ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या दरम्यान झालेला विवाह

💞१४ फेब्रुवारी ते १३ मार्च या दरम्यान झालेला विवाह

💞१४ मार्च ते १३ एप्रिल या दरम्यान झालेला विवाह

💞१४ एप्रिल ते १३ मे या दरम्यान झालेला विवाह

💞१४ मे ते १३ जून या दरम्यान झालेला विवाह

💞१४ जून ते १३ जुलै या दरम्यान झालेला विवाह

💞१४ जुलै ते १३ ऑगस्ट या दरम्यान झालेला विवाह

💞१४ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या दरम्यान झालेला विवाह

💞१४ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर या दरम्यान झालेला विवाह

💞१४ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या दरम्यान झालेला विवाह

💞१४ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या दरम्यान झालेला विवाह

💞१४ डिसेंबर ते १३ जानेवारी या दरम्यान झालेला विवाह

टीप : हे ढोबळ अनुमान असून परस्पर पुरकता जाणून घेण्यासाठी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणे आवश्यक असते.


-ज्योतिषमित्र मिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क :

7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in