Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

अतुल परचुरे यांना भावपूर्ण आदरांजली 🙏


सुन्न !!!
आधीच आमच्या पिढीमध्ये हयात आदर्श व्यक्तिमत्त्वांची कमतरता आहे. त्यातही जी व्यक्तिमत्त्वं आहेत ती एकेक सोडून जायला लागल्यावर आमच्या पिढीने कोणाकडे आशेने बघायचं? रतन टाटांचा धक्का नुकताच लोक पचवत होते. आणि अगदी कितीही नाही म्हटलं तरी त्यांच्या वयामुळे कधी ना कधी ही वेळ येणार याची कल्पना होतीच. पण अतुल परचुरे? आधीच कॅमेरासमोर उभं राहून न विसरता वाक्य म्हटली म्हणजे अभिनय जमला असे मानणारे तरुण हौशी नट आणि अभिनयाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊनही वैश्य आणि वेश्या यातला फरक न समजणारे नट ( सन्माननीय अपवाद वगळता)यांच्या सद्दीत आम्ही असताना अतुल परचुरे सारखे अभिनेते नैसर्गिक अभिनय आणि अभ्यासू वृत्ती यांचा एक वस्तुपाठ घालून देत होते. कोणत्याही चित्रपटातली अतुल परचुरेची एका मिनिटाची भूमिका काढून पाहिली, तरी अभिनय काय असतो हे कळतं. मधुकर तोरडमलांनी अतुल असल्याशिवाय तरुण तुर्कचा प्रयोग करायचा नाही असं का म्हटलं असेल हे कुंदा भागवत पाहून कळतं. स्त्रैण भूमिका, शारीर होऊ न देता विनोदी कशी करायची हे कोणत्याही नटाने शिकावं असा कुंदा ! एखादी पंचलाईन सुद्धा शिळी होऊ न देता पूर्ण चित्रपटात कशी खुलवावी यासाठी गोलमाल (मराठी) मधला डिटेक्टिव्ह भाभि बघावा. मार खाऊन सुद्धा मजा आली…पण पूर्वीचा दम नाही राहिला तुझ्यात या लाईनवर लाफ्टर कसा काढावा यासाठी बे दुणे साडे चार मधला धोडपकर बघावा. काका किशाचा मधला विसरभोळा बापट, नवरा माझा नवसाचा मधला वॅकीचा मित्र, नारबाची वाडी‌मधला ज्योतिषी, वादळवाट, होणार सून मी, किती नावं घ्यायची…आणि अर्थात आमच्या पिढीसाठी पुलं पुन्हा जिवंत करणारा अभिनेता म्हणूनही त्याचं आमच्यावरचं ऋण मोठं आहे.
आधी रसिका जोशी आणि आता अतुल परचुरे…कर्करोगाने आमचे दोन लाडके मोती आमच्यापासून अकाली हिरावून घेतलेत, आधीच आमच्या पिढीत ज्यांचे पाय धरावेत असे लोक कमी, त्यात ज्यांचे पायही धरावे आणि गळाभेटही घ्यावी अशी ही माणसं जर अकाली हिरावून घेतली, तर उथळ मनोरंजनाच्या जमान्यात सकस खुराकाची कमतरता आमच्यासारख्यांनी कशी भरुन काढायची?
या प्रश्नांची उत्तरे कधीच न‌ मिळणारी आहेत. आणि काळ पुढे जाताना त्यात भरच पडत्ये.
श्रद्धांजली हा शब्द इतक्या लवकर अतुल परचुरेसाठी असूच शकत नाही.
एरंडाच्या झुडपांमधल्या मोजक्या कल्पवृक्षांपैकी एक होतात तुम्ही ! आणि राहाल !!

घनश्याम सारडा
पुणे🙏🙏

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

कालनिर्णय २०२५ (संग्रहित)


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विजया दशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

रतन टाटा निधन जन्मकुंडली विश्लेषण


विषय : रतन टाटा मृत्यू विश्लेषण

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : स्व अभ्यास

जन्म व मृत्यू तारीख वेळ संदर्भ : गुगल आंतरजाल

नमस्कार,

रतन जी टाटा
जन्म : २८ डिसेंबर १९३७ सकाळी ०६.३० वा. मुंबई येथे
मृत्यू ०९ ऑक्टोबर २०२४ रात्री ११.३० वा. बीच कॅन्डी हॉस्पिटल
धनु लग्न व तूळ रास
अष्टम स्थान कर्क रास भावारंभ नक्षत्र स्वामी गुरु उपनक्षत्र स्वामी राहू उपउप नक्षत्र स्वामी शुक्र
सप्तम स्थान (मारक) : मिथुन रास भावारंभ नक्षत्र स्वामी मंगळ; उपनक्षत्र स्वामी शुक्र उपउप नक्षत्र स्वामी शुक्र
द्वितीय स्थान (मारक) : मकर रास भावारंभ नक्षत्र स्वामी रवी; उपनक्षत्र स्वामी गुरु उपउप नक्षत्र स्वामी राहू
षष्ठ स्थान : वृषभ रास भावारंभ नक्षत्र स्वामी रवी; उपनक्षत्र स्वामी गुरु उपउप नक्षत्र स्वामी राहू
व्यय स्थान : वृश्चिक रास भावारंभ नक्षत्र स्वामी गुरु उपनक्षत्र स्वामी राहू उपउप नक्षत्र स्वामी शुक्र
मृत्यू समयी दशा : चंद्र महादशा गुरु अंतर्दशा रवी विदशा बुध सूक्ष्म दशा राहू प्राण दशा शुक्र देह दशा
१) महादशा स्वामी चंद्र अष्टमेश असून षष्ठेश शुक्राच्या तूळ राशीत गुरूच्या नक्षत्री (गुरु मारक द्वितीय स्थानात स्थित आहे), गुरूच्या उपनक्षत्री व व्यय स्थानातील राहूच्या उपउप नक्षत्री स्थित आहे.
२) अंतर्दशा स्वामी गुरु आहे. गुरु रविच्या नक्षत्री असून रवी षष्ठेश शुक्राच्या युतीत आहे. गुरूचा उप नक्षत्र स्वामी षष्ठेश शुक्र असून व्यय स्थानातील राहूच्या उपउप नक्षत्री स्थित आहे.
३) विदशा स्वामी षष्ठेश शुक्राच्या युतीतील रवी असून षष्ठ भावातील केतूच्या नक्षत्री व मारकेश बुधाच्या उपनक्षत्री आणि गुरूच्या उपउप नक्षत्री स्थित आहे.
४) सूक्ष्मदशा स्वामी मारकेश बुध असून षष्ठेश शुक्राच्या नक्षत्री आहे.
५) प्राण दशा स्वामी व्ययातील राहू असून मारकेश शनीच्या नक्षत्री राहू च्याच उप व उपउप नक्षत्री आहे.
६) देह दशा स्वामी शुक्र आहे.
७) जन्मता: महादशा गुरूची होती मृत्यु समयी चंद्र या नैधन्य नक्षत्राची (७ वे) महादशा होती.
८) बुध या विपत नक्षत्राची (३ रे) सूक्ष्म दशा होती.
९) प्रत्यर (५ वे) नक्षत्राची देह दशा होती.
१०) गोचर मध्ये लग्नेश व जीव कारक गुरु षष्ठातील वृषभ राशीत, अष्टमेश चंद्र षष्ठस्थ केतूच्या मूळ नक्षत्री लग्नी व सूर्य षष्ठस्थ केतूच्या युतीत अष्टमेश चंद्राच्या नक्षत्री आहे.
ही ग्रह व दशा स्थिती पुरेशी बोलकी आहे व त्यामुळे रतनजी टाटा यांचेसारखे एक अनमोल रत्न ०९ ऑक्टोबर २०२४ रात्री ११.३० वा. बीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये काळाच्या पडद्या आड गेले.
या महान विभूतीस भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏


श्रद्धांजली 🙏
मी तुमचा चेहरा आठवणीत ठेवू इच्छितो, कारण मी जेंव्हा स्वर्गात भेटेल तेंव्हा मि तुम्हाला ओळखू शकेल, आणि पुन्हा एकदा तुमचे आभार मानु शकेल.

एका टेलीफोन मुलाखतीत अरबपती रतनजी टाटा याना विचारले ” सर तुम्हाला काय आठवते की जीवनात सर्वाधिक आंनद केंव्हा मिळाला”?

रतनजी बोलले “मि जीवनात आनंदाच्या चार टप्प्यातून मार्गक्रमण केले आहे आणि शेवटी मला आनंद आणि खऱ्या सुखाचा शोध लागला किंबहुना समजला !”

पहिल्या चरणात मि धन आणि सम्पति चा संचय केला !
पण मला ते सुख नाही मिळाले ज्याच्या शोधात मि फिरत होतो

मग दुसऱ्या चरणात मि जगातल्या महागड्या वस्तु सामान घेतले आणि वापरले!

पण मि अनुभवले मला साक्षात्कार झाला याचा प्रभाव क्षनिक आहे आणि या महागड्या वस्तूंचे आकर्षण भौतिक आहे. हा आनंद चिरकाल नाही

नंतर मला मोठ मोठे प्रकल्प मिळायला लागले या तिसऱ्या चरणात भारत आणि आफ्रिकेत डीजल ची 95% पुरवठा माझ्याकडे होता . आणि मि एका मोठ्या स्टील कारखान्याचा मालकही होतो

परन्तु तेथेही मला तो आनंद किंवा समाधान सुख नाही मिळाले ज्याच्या मि शोधात होतो!

चौथ्या स्थितीत ती वेळ होती जेंव्हा माझ्या एका मित्राने मला काही अपंग मुलांसाठी व्हील चेयर विकत घेण्यासाठी सांगितले!

जवळपास 200 मूल मूली असतील,मित्रांच्या बोलण्यावर मि लगेच 200 व्हील चेयर खरेदी केल्या

नतर मित्रानी केलेल्या आग्रहाखातर मि स्वतः त्या व्हील चेयर माझ्या हातानी त्या मुलाना भेट दिल्या
त्यावेळी त्या मुलांच्या चेहरयावर वेगळाच आनंद आणि एक प्रकारची चमक मला पाहायला मिळाली
ते सर्व मस्ती करत होते त्या व्हील चेयर वरुण फिरत होते मी ते पाहुन हरखुन गेलो होतो

असे वाटत होते एखाद्या पिकनिक च्या ठिकाणी आले आहेत आणि त्याना खुप मोठा पुरस्कार मिळाला आहे !

त्या दिवशी त्या क्षणी मला जो आनंद आणि सुख मिळाले असे वाटत होते सुखाचा शोध संपला!
मी जेंव्हा परतीला निघालो त्यावेळी एका मुलाने माझे पाय घट्ट धरले

मी माझे हळू हळू माझे पाय सोडवू पाहात होतो तसे तो अधिक घट्ट धरत होता आणि एकटक माझ्या चेहऱ्या कड़े पाहात होता आणि पाय सोडत नव्हता
मी वाकुन त्याला विचारले : तुला आणखी काही हवय काय ?

त्यावेळी त्या मुलाचे उत्तर एकूण मी स्तब्ध झालो. आतुन बाहेरून हादरून गेलो
माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलून गेला मी पूर्ण बदललो!

तो मुलगा म्हणाला. —
मला तुमचा चेहरा मनात हृदयात कायम कोरुन ठेवायचा आहे साठवून ठेवायचा आहे कारण मी जेंव्हा स्वर्गात आपणास भेटेन तेंव्हा तात्काळ तुम्हाला ओळखू शकलो पाहिजेत

कथेचा मातीतार्थ एव्हढाच आहे अस काहीतरी करा कोणाला तरी तुमचा चेहरा आठवणीत ठेवायला बाध्य करेल

काय ? तुमचा चेहरा कोण्ही पुन्हा पुन्हा पाहु इच्छितो काय याला जीवनात खुप महत्त्व आहे.

(संग्रहित)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)