गोचर ग्रहांचा फलदायी काळ कोणता


गोचर ग्रहांचा फलदायी काळ

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : ज्योतिर्मयुख

मूळ लेखक : ज्यो. गोविंद मोघे गुरुजी

नमस्कार,
आज आपण गोचर ग्रह व त्या ग्रहांचा फलदायक काळ कधी असतो हे पाहणार आहोत.

सूर्य

सूर्य गोचरीत कोणत्याही राशीत गेल्यावर पहिल्या ५ दिवसात फळ देतो.

चंद्र

चंद्र गोचरीत कोणत्याही राशीत गेल्यावर शेवटच्या ३ घटिका फळ देतो.

मंगळ

मंगळ गोचरीत कोणत्याही राशीत गेल्यावर पहिल्या ८ दिवसात फळ देतो.

बुध

बुध गोचरीत कोणत्याही राशीत गेल्यावर राशीच्या पूर्ण भोग काळात त्याचे फळ देतो.

गुरु

गुरु गोचरीत कोणत्याही राशीत गेल्यावर राशीच्या मध्यातील २ महिन्यांच्या भोग काळात त्याचे पूर्ण फळ देतो.

शुक्र

शुक्र गोचरीत कोणत्याही राशीत गेल्यावर राशीच्या मध्यातील ७ दिवसाच्या भोग काळात त्याचे पूर्ण फळ देतो.

शनी

शनी गोचरीत कोणत्याही राशीत गेल्यावर शेवटचे ६ महिने त्याचे पूर्ण फळ देतो.

राहू

राहू गोचरीत कोणत्याही राशीत गेल्यावर शेवटचे २ महिने त्याचे पूर्ण फळ देतो.

केतू

केतू गोचरीत कोणत्याही राशीत गेल्यावर शेवटचे २ महिने त्याचे पूर्ण फळ देतो.

गोचरीत कोणताही ग्रह उच्च राशीस असता पूर्ण फळ देतो. स्वगृही असता अर्ध फळ देतो. मित्र गृही असता चतुर्थांश फळ देतो. शत्रुगृही असता साधारण अष्टमांश फळ देतो. स्वकीय त्रिकोणात असता ३/४ फळ देतो. नीच राशीस अथवा अस्तंगत असल्यास शून्य फळ देतो.

निर्बली ग्रह

सामान्यतः कोणताही ग्रह शुभ स्थानी असून पापग्रह युक्त अथवा दृष्ट असेल अथवा अशुभ स्थानी असलेला ग्रह हुभ किंवा मित्र ग्रहाने युक्त अथवा दृष्ट असता ग्रह शत्रू स्थानी असता किंवा अस्तंगत, वक्री, नीच स्थानी असता निर्बली समजावा. रवी युक्त शनी आणि चंद्र युक्त बुध असता, चंद्र निर्बल व पापग्रह युक्त असेल, तर निर्बली समजावा.

लग्नी किंवा गोचरी असलेले नवग्रह २७ अंशाच्या पुढे गेले की पुढील राशींचे फळ देतात. वक्री ग्रह मागील राशींचे फळ देतात.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment