
विषय : रतन टाटा मृत्यू विश्लेषण
लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : स्व अभ्यास
जन्म व मृत्यू तारीख वेळ संदर्भ : गुगल आंतरजाल
नमस्कार,
रतन जी टाटा
जन्म : २८ डिसेंबर १९३७ सकाळी ०६.३० वा. मुंबई येथे
मृत्यू ०९ ऑक्टोबर २०२४ रात्री ११.३० वा. बीच कॅन्डी हॉस्पिटल
धनु लग्न व तूळ रास
अष्टम स्थान कर्क रास भावारंभ नक्षत्र स्वामी गुरु उपनक्षत्र स्वामी राहू उपउप नक्षत्र स्वामी शुक्र
सप्तम स्थान (मारक) : मिथुन रास भावारंभ नक्षत्र स्वामी मंगळ; उपनक्षत्र स्वामी शुक्र उपउप नक्षत्र स्वामी शुक्र
द्वितीय स्थान (मारक) : मकर रास भावारंभ नक्षत्र स्वामी रवी; उपनक्षत्र स्वामी गुरु उपउप नक्षत्र स्वामी राहू
षष्ठ स्थान : वृषभ रास भावारंभ नक्षत्र स्वामी रवी; उपनक्षत्र स्वामी गुरु उपउप नक्षत्र स्वामी राहू
व्यय स्थान : वृश्चिक रास भावारंभ नक्षत्र स्वामी गुरु उपनक्षत्र स्वामी राहू उपउप नक्षत्र स्वामी शुक्र
मृत्यू समयी दशा : चंद्र महादशा गुरु अंतर्दशा रवी विदशा बुध सूक्ष्म दशा राहू प्राण दशा शुक्र देह दशा
१) महादशा स्वामी चंद्र अष्टमेश असून षष्ठेश शुक्राच्या तूळ राशीत गुरूच्या नक्षत्री (गुरु मारक द्वितीय स्थानात स्थित आहे), गुरूच्या उपनक्षत्री व व्यय स्थानातील राहूच्या उपउप नक्षत्री स्थित आहे.
२) अंतर्दशा स्वामी गुरु आहे. गुरु रविच्या नक्षत्री असून रवी षष्ठेश शुक्राच्या युतीत आहे. गुरूचा उप नक्षत्र स्वामी षष्ठेश शुक्र असून व्यय स्थानातील राहूच्या उपउप नक्षत्री स्थित आहे.
३) विदशा स्वामी षष्ठेश शुक्राच्या युतीतील रवी असून षष्ठ भावातील केतूच्या नक्षत्री व मारकेश बुधाच्या उपनक्षत्री आणि गुरूच्या उपउप नक्षत्री स्थित आहे.
४) सूक्ष्मदशा स्वामी मारकेश बुध असून षष्ठेश शुक्राच्या नक्षत्री आहे.
५) प्राण दशा स्वामी व्ययातील राहू असून मारकेश शनीच्या नक्षत्री राहू च्याच उप व उपउप नक्षत्री आहे.
६) देह दशा स्वामी शुक्र आहे.
७) जन्मता: महादशा गुरूची होती मृत्यु समयी चंद्र या नैधन्य नक्षत्राची (७ वे) महादशा होती.
८) बुध या विपत नक्षत्राची (३ रे) सूक्ष्म दशा होती.
९) प्रत्यर (५ वे) नक्षत्राची देह दशा होती.
१०) गोचर मध्ये लग्नेश व जीव कारक गुरु षष्ठातील वृषभ राशीत, अष्टमेश चंद्र षष्ठस्थ केतूच्या मूळ नक्षत्री लग्नी व सूर्य षष्ठस्थ केतूच्या युतीत अष्टमेश चंद्राच्या नक्षत्री आहे.
ही ग्रह व दशा स्थिती पुरेशी बोलकी आहे व त्यामुळे रतनजी टाटा यांचेसारखे एक अनमोल रत्न ०९ ऑक्टोबर २०२४ रात्री ११.३० वा. बीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये काळाच्या पडद्या आड गेले.
या महान विभूतीस भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)