
सर्वाना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏
नवरात्रीत करावयाचे काही उपाय (संकलन)
नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. देवीतत्त्वाचा दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती तत्त्वांचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप जास्तीत जास्त करावा. अखंड दीपप्रज्वलन, त्या देवतेचे माहात्म्यपठन (चंडीपाठ), सप्तशतीपाठ, देवीभागवत, ब्रह्मांड पुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललिता- पूजन, सरस्वतीपूजन, उपवास, जागरण ई. कराव्यात.
दुर्गा मातेला समर्पित ९ दिवसांच्या या खास उत्सवात दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी भक्त विविध उपाय करतात.
दुर्गा मातेला सर्वात प्रिय असणारी वस्तू आणि त्यासंबंधी उपाय केल्याने दुर्गा माता प्रसन्न होऊन भाग्य उजळते अशी भक्तांची श्रद्धा आहे. दुर्गा देवीला लवंगाची जोडी सर्वात प्रिय आहे आणि तिच्या पूजेमध्ये लवंग अर्पण करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. नवरात्रीच्या काळात लवंगाच्या जोडीचे उपाय खूप प्रभावी मानले जातात.
आर्थिक संकटावर मात करण्यासाठी उपाय
नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कापडात ५ वेलची आणि ५ सुपारी सोबत एक लवंगाची जोडी ठेऊन देवी मातेला अर्पण करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कपड्यांसह तिजोरीत ठेवा. असे केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होऊन घरात सुख-समृद्धी आणि आणि आर्थिक संपन्नता वाढते.
नोकरी अथवा नोकरीत अपेक्षित यश मिळण्यासाठी उपाय
खूप दिवसापासून खूप मेहनत करूनही जर नोकरी अथवा नोकरीत अपेक्षित यश मिळत नसेल, तर नवरात्रीच्या काळात रोज ७ वेळा लवंगाची जोडीने नजर उतरवून देवी दुर्गेच्या चरणी अर्पण केल्याने नोकरी संबंधित सर्व समस्या दूर होतात.
राहू-केतूचा अशुभ प्रभाव दूर करण्याचा उपाय
राहू-केतूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये दररोज शिवलिंगाला लवंगाची जोडी अर्पण करा. असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि राहू-केतूचा अशुभ प्रभाव कुंडलीतून दूर होईल.
घरातील नकारात्मकता कमी करण्याचा उपाय
नवरात्रीच्या ९ दिवसांत दररोज लवंग आणि कापूरचा धूर घरभर पसरवल्याने घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते. हा उपाय रोज सकाळी ९ दिवस केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कमी होते.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)