सूर्याचे नक्षत्री ग्रह स्थित असता (केपी प्रमाणे) मिळणारे फळ


नमस्कार,

आज आपण सूर्याचे नक्षत्री ग्रह स्थित असता (केपी प्रमाणे) मिळणारे फळ पाहणार आहोत.

सूर्य हा कृतिका, उत्तराफाल्गुनी व उत्तराषाढा या नक्षत्रांचा अधिपति ग्रह आहे.

नक्षत्रांचे पारंपारिक संक्षिप्त वर्णन :

कृत्तिका नक्षत्र : नक्षत्र मालिकेतील ३ रे नक्षत्र आहे. हे नक्षत्र त्रिपाद असून त्याचा पहिला चरण मेषेत व पुढील ३ चरण वृषभेत आहेत. या चार चरणांवर अनुक्रमे गुरु शनि, शनि व गुरु यांचे स्वामित्व आहे. नक्षत्र क्रूर अधोमुखी व सुलोचनी आहे. नक्षत्राचा स्वामी रवि, राशीस्वामी मंगळ वा शुक्र असल्याने या नक्षत्रात रवीचा करारीपणा, मंगळाचा तापटपणा व शुक्राचे सौंदर्य यांचा सुरेख संगम झालेला दिसून येतो. दैवत अग्नी असल्याने त्या अग्नीप्रमाणेच नक्षत्र प्रखर, व कोपिष्ठ आहे. कृत्तिका नक्षत्र अंतर्गत अंत्य नाडी, मेष योनी व राक्षस गण अंतर्भूत असून आ ई ऊ ए ही चरणाक्षरे येतात.

उत्तराफाल्गुनी नक्षत्र : नक्षत्र मालिकेतील १२ वे नक्षत्र आहे. नक्षत्राचा पहिला चरण सिंह राशीत व पुढील ३ चरण कन्या राशीत येत असल्याने हे नक्षत्र त्रिपाद आहे, तसेच ते ऊर्ध्वमुखी, स्थिरमिश्र, मनुष्यगणी व अवलोचनी आहे. या नक्षत्रात प्रामुख्याने रवीचे विविध गुणधर्म आढळून येतात. विशेषतः रवीची नक्षत्राचा स्वामी रवि, राशी स्वामी रवि व बुध व दैवत सूर्यदेव असल्याने कर्तबगारी व कर्तृत्व, उदात्तपणा, राजाचे शुभ गुण व बुधाचा चुणचुणीतपणा यांचा सुंदर मिलाफ झालेला दिसून येतो. अग्नीसारखा प्रखर रवि या नक्षत्रात शीतल फलादेश देतो. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र अंतर्गत आद्य नाडी, गो योनी, मनुष्य गण तसेच टे टो पा पी ही चरणाक्षरे येतात.

उत्तराषाढा नक्षत्र : हे नक्षत्र मालिकेतील २१वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा पहिला चरण धनु राशीत व पुढील तीन चरण मकर राशीत येत असल्याने हे नक्षत्र त्रिपाद आहे. नक्षत्राचा स्वामी तेजस्वी असल्याने रवि, राशी स्वामी गुरु व शनी आणि दैव विश्वदेव नावाची देवता असल्याने या नक्षत्रात रवीची कीर्ती व उदात्तपणा, गुरूचा न्यायीपणा, शनीची चिकाटी व निश्चय आणि विद्येप्रमाणे समाजावर उपकार करणारे अशा सुंदर व सात्विक गुणांचा प्रभाव दिसून येतो. नक्षत्राचे वैशिष्ट्य महणजे शनिव रवि या विरोधी तत्वांच्या व शत्रुग्रहांचे शुभगुणधर्म विकसित झालेले दिसून येतात. म्हणजे शनीचा कंजूषपणा व संशयीपणा नसून चिकित्सक वृत्ती व कष्टाळूपणा दिसतो व रविचा स्थिर व उदात्तपणा दिसून येतो. हे मंदलोचनी, अधोमुख, स्थिर व रजोगुणी नक्षत्र आहे. उत्तराषाढा नक्षत्रा अंतर्गत अंत्य नाडी, मुंगूस योनी, मनुष्य गण व भे भो जा जी ही चरणाक्षरे येतात.

कृष्णमुर्ती पद्धतीमध्ये नक्षत्र स्वामीला अनन्य साधारण महत्व आहे. कारण ही नक्षत्राधारित पद्धत आहे. पारंपारिक पद्धतीत देखील नक्षत्र फळाचा उत्तम वापर करू शकता.

सूर्य हा कृतिका, उत्तराफाल्गुनी व उत्तराषाढा या नक्षत्रांचा अधिपति ग्रह आहे.

कोणताही ग्रह असो व तो कोणत्याही स्थानाचा स्वामी असो किंवा तो कोणत्याही स्थानी स्थित असो, जर तो सूर्याच्या नक्षत्रामध्ये स्थित असेल, तर तो सुर्याची स्थिति व त्याचे अधिपत्यानुसार सूर्य द्वारा दर्शित फल देईल.

उदा. समजा एखाया जातकाचा जन्म कर्क लग्नी झाला आहे व सूर्य मेष राशी मध्ये दशम भाव मध्ये आहे. कोणताही ग्रह सूर्य द्वारा दर्शित फल प्रमुखपणे दशम स्थानाचे देईल व त्यानंतर सूर्य द्वितीयेश असल्याने दुस-या स्थानाचे फळ पण देईल.

समजा की शुक्र वृषभ राशीमध्ये कृत्तिका नक्षत्रामध्ये आहे. तेव्हा शुक्र प्रमुखपणे दशम स्थानाचे फल देईल, त्यानंतर द्वितीय स्थानाचे फल देईल. हा फला करिता मुख्य स्त्रोत शुक्र आहे, जो स्वत:चे स्वामित्व, स्वभाव व स्थितिच्या अनुसार पूर्ति करेल.

थोडक्यात शुक्र फळ (१०) २ (११) ४ ११ असे असेल, कारण कर्क लग्नाला शुक्राच्या वृषभ व तूळ राशी ४ थे व ११ वे स्थानी येतील.

सूर्य १ ले स्थाना मध्ये अथवा १ चा अधिपती आहे याचे तात्पर्य कि, जर सूर्य लग्न स्थानी अथवा सूर्य लग्न स्वामी असला तर, प्रथम स्थान अथवा अधिपतिचे फळ त्या ग्रहा द्वारा मिळेल, जो सूर्याच्या नक्षत्री असेल. जन्म लग्न अनुसार सूर्य प्रथम स्थानी असता अथवा सिंह लग्न असता सूर्य प्रथमेश असेल, तेव्हा वरील विश्लेषण लागू होईल.

अश्या प्रकारे सर्व लग्ना चे जातका करिता जर सूर्य पंचम ‘स्थानी स्थित असता उत्तरा फालुनी नक्षत्रामध्ये स्थित ग्रह प्रमुखपणे पंचम भावाचे फळ देईल, मग तो कोणत्याही स्थानी का असेना. अश्याच प्रकारे फळ मेष लग्नास, सूर्य पंचमेश असेल तेव्हाही मिळेल.

सूर्याच्या मालकीची तीन नक्षत्रे कृतिका, उत्तरा फाल्गुनी व उत्तराषाढा मध्ये जो ग्रह स्थित असेल त्याची दशा चालू असताना हे फळ जातकास मिळेल.

इथे अशाप्रकारे निर्माण होणार्या १२ स्थितींचे फळ आपल्या माहितीसाठी देत आहे.

(१) सूर्य प्रथम स्थानामध्ये स्थित असता अथवा प्रथम स्थानाचा अधिपती (प्रथमेश) असता :

जातक उदार, निश्चयी, स्पष्टवादी असेल. सन्मानाची प्राप्ती होईल. जातक स्वतंत्र विचारांचा व आशावादी असेल. उत्तम शरीर प्रकृति असेल. जातक प्रयत्नामध्ये सफलता प्राप्त करेल. अधिकारी वर्गाशी उत्तम व सलोख्याचे संबंध प्राप्त करेल. सरळ, सुलभ आयुष्य असेल. कामाचे ठिकाणी अधिकारी असेल किंवा पदोन्नति प्राप्त करेल. दृष्टी थोडी अधू असू शकते.

(२) सूर्य द्वितीय स्थानामध्ये स्थित असता अथवा द्वितीय स्थानाचा अधिपती (द्वितीयेश) असता :

जातकास उत्तराधिकार प्राप्त होईल, एखादा उद्योग व्यवसाय असू शकतो. शासकिय योजनेचा लाभ मिळू शकतो. जातक कामाचे ठिकाणी जबाबदारीचे पदावर नियुक्त होईल. जातक उदार, सामाजिक व्यक्तिमत्व, खेळाची आवड असलेला, मनोरंजन प्रिय असेल.

सूर्य पीड़ित असता धनहानि होईल. अनैतिक मार्गाने आयुष्य जगणारा, बोलण्यात विखार असलेला, पैशाचा अपव्यय करणारा, पैसे उडवणारा असू शकतो.

(३) सूर्य तृतीय स्थानामध्ये स्थित असता अथवा तृतीय स्थानाचा अधिपती (तृतीयेश) असता :

जातकास मान सम्मान प्राप्त होईल. तो दृढ, साहसी व पराक्रमी, कर्तुत्ववान असेल. जातकास नातेवाईकाकडून लाभ मिळतील. शेजा-याशी चागले संबंध राखण्यात यशस्वी होईल. ट्रेडिंग व्यवसाय, एजेन्सी वा व्यापारामध्ये मध्ये सफलताप्राप्त करेल. जातक कार्यशील, शत्रु वर विजय मिळवणारा, असेल. उत्तम प्रकृति लाभेल.

सूर्य पीड़ित असता जातकास दुःख, कष्ट, खोट्या तक्रारी, अडचणींचा सामना करावा लागेल.

(४) सूर्य चतुर्थ स्थानामध्ये स्थित असता अथवा चतुर्थ स्थानाचा अधिपती (चतुर्थेश) असता :

जातकाच्या महत्वाकांक्षांची पूर्ति होते. मालमत्ता खरेदी, जमिनीची प्राप्ति अथवा भू-संपत्तीच्या माध्यमाने फायदा, पैतृक संपत्तीची प्राप्ति होते.

सूर्य पीड़ित असता कष्ट, म्हातारपणी अडचणी, ब्लड प्रेशर, परिवारामध्ये कलह व संपत्तीची हानि होते.

(५) सूर्य पंचम स्थानामध्ये स्थित असता अथवा पंचम स्थानाचा अधिपती (पंचमेश) असता :

जातकास सट्टा व्दारे फायदा होतो. मनोरंजन, सिनेमा, खेळ ई. ची आवड असते. जातकास जंगला मध्ये फिरण्याची आवड असू शकते. संतति जन्माच्या वेळी अडचणी येऊ शकतात. पोटाच्या आतड्या मध्ये दोष उद्भवू शकतात.

सूर्य पीड़ित असता जातकास हानि, प्रेम प्रकरणामध्ये अपयश, मुलांना कष्ट, लग्नाची बोलणी बिघडू शकतात.

(६) सूर्य षष्ठ स्थानामध्ये स्थित असता अथवा षष्ठम स्थानाचा अधिपती (षष्ठमेश) असता :

जातकाच्या आरोग्यामध्ये बिघाड होतो. कमजोर शरीर रचना असते. नोकरी मध्ये भाग्योदय, पदोन्नति प्राप्त होऊ शकते.

पिडीत असता शरीरातील रसायन, हृदय रोग, अंग रोग संबंधी त्रास होऊ शकतो. औषधे, दवाखाना मागे लागू शकतो. बुद्धिमानी व दृढ़ निश्चयाने शत्रुवर विजय मिळवतो. मोठा परिवार असू शकतो. प्रयत्नपूर्वक आत्मसन्मान मिळवतो.

(७) सूर्य सप्तम स्थानामध्ये स्थित असता अथवा सप्तम स्थानाचा अधिपती (सप्तमेश) असता :

जातकाचा लग्नानंतर भाग्योदय होतो. निश्चित व स्थायी संबंध प्राप्त होतात. प्रसिद्ध व्यक्ती होतो. मध्यस्थता द्वारा कोर्ट मुकादम्यात मध्ये बचाव वा तडजोड केली जाते. व्यापारा द्वारा लाभ मिळतो.

पीड़ित असता नैतिक पतन, उशीरा विवाह, बायकोच्या धाकात राहणारा, यात्रा करणारा, पति-पत्नी दोघांचे चरित्र संदिग्ध, शुभ दृष्टि असता गुणी अन्यथा दोन बायका, जोडीदाराचे आजारपण, दृष्टि मध्ये दोष, अधिकारी वर्गाची अवकृपा वाट्यास येते.

(८) सूर्य अष्टम स्थानामध्ये स्थित असता अथवा अष्टम स्थानाचा अधिपती (अष्टमेश) असता :

जातकास लग्नानन्तर उत्तम माग्योदय लाभतो. पार्टनरशिप मध्ये लाभ, आत्मबलिदान अथवा एखाया दिव्य कार्य द्वारा अंत. दीर्घायु असू शकतो. कमी संतान असू शकते.

सूर्य जर पीडीत असता कमजोर शरीर, अधू डोळे, मितव्ययी, हिंसे द्वारा मृत्यु, स्त्री च्या कुंडली मध्ये असता वैधव्य, धन हानि, अनैतिक संबंध, कोर्ट कचेरी व दरिद्रता.

(९) सूर्य नवम स्थानामध्ये स्थित असता अथवा नवम स्थानाचा अधिपती (नवमेश) असता :

जातक आत्मविश्वासू, धार्मिक, विश्वसनीय असतो. महाविद्यालय अथवा न्याय विभागाशी संबंधित असतो. प्रवासाद्वारे लाभ मिळतो. शोध कार्य करण्याची इच्छा असते, समुद्र यात्रा मध्ये सफलता मिळते. प्रसिद्धीत वाढ होते व जातक कीर्तिमान कार्य करणारा होतो. प्रयत्ना मध्ये सफलता, स्वअर्जित अपार संपत्तीचा मालक असतो.

(१०) सूर्य दशम स्थानामध्ये स्थित असता अथवा दशम स्थानाचा अधिपती (दशमेश) असता :

जातकाच्या प्राप्ति मध्ये वाढ होईल. सामाजिक व जीवनस्तर उंचावेल. सन्मान प्राप्त होतील व अधिकारामध्ये वाढ होईल.उत्तराधिकार प्राप्त होईल. व्यापार व्यवसायामध्ये विकास, नोकरीमध्ये पदोन्नति,  हीरे-जवाहरात संपन्न, व्यवहार कुशल, संगीत व कलेचा शौकीन, समाजाचा अध्यक्ष, राजनैतिक जीवना मध्ये सफलता. ग्रामसेवक ई.

(११) सूर्य लाभ स्थानामध्ये स्थित असता अथवा लाभ स्थानाचा अधिपती (लाभेश) असता :

जातक महत्वाकांक्षी, हच्छापूर्ति होणे, सम्मानित, ईमानदार, शक्तिसंपन्न लोकाशी संबध, आशावादी, स्थायी मित्र, सामाजिक सफलता, उत्तम व्यापार, अनेक सुविधा, राजनीतिज्ञशी मैत्री, सिद्धांतयुक्त असतो.

(१२) सूर्य व्यय स्थानामध्ये स्थित असता अथवा व्यय स्थानाचा अधिपती (व्ययेश) असता :

जाताकास चिकित्सा, रसायन, रहस्य विज्ञान मध्ये यश मिळते. दवाखाना, तुरुंग, स्वास्थ्य लाभ गृह, ई. शी संबंधित असतो. एकांतप्रिय, आत्म बलिदानी असतो.

पीड़ित असता जातकास वाढीव खर्च, गरीबी असते, दुष्ट, विधवा स्त्रीस पसंत करणारा, शंका रहित, पत्नीशी विवाद, मुलांना संकटे, विदेशा मध्ये नुकसान ई. फळे प्राप्त होतात.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)

संपर्क : ७०५८११५९४७

(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

6 thoughts on “सूर्याचे नक्षत्री ग्रह स्थित असता (केपी प्रमाणे) मिळणारे फळ

Leave a comment