ज्योतिष शास्त्रातील भाग्यसहम (FORTUNA)


नमस्कार,

आज आपण ज्योतिष शास्त्रातील भाग्य सहम हा विषय घेणार आहोत.

भाग्य सहमला पुण्य सहम् असेही म्हणतात. पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात भाग्य सहमला पार्स फॉर्च्यून किंवा भाग्याचा भाग म्हणतात. अरब ज्योतिषशास्त्रात याला अरबी भाग ARABIC PARTS किंवा LOTS (प्रारब्ध किंवा नशीब) म्हणतात. भाग्य सहम हा एक खगोलीय संवेदनशील गणितीय महत्त्वाचा मुद्दा आहे, जो शुभ परिणाम देतो. पाश्चिमात्य ज्योतिषशास्त्रात त्याच्या वेगवान गतीमुळे हे खूप महत्वाचे मानले आहे आणि जन्मकुंडली तयार करताना त्याची गणना केली जाते.

 भाग्य सहम् ची गती प्रति भाग चार मिनिटे आहे. हे लग्न, सूर्य, चंद्राद्वारे स्पष्ट केले आहे. या तिन्हींची गती खूप असल्यामुळे थोड्या अंतरावर जन्मलेल्या व्यक्तींमध्ये त्याच्या स्थितीत अंतर पडते. याद्वारे एकाच अक्षांश-रेखांशावर काही मिनिटांच्या फरकाने जन्मलेल्या व्यक्तीची गुणवत्ता, प्रकृती, नशीब इत्यादीतील फरक सहजपणे तपासता येतो.

 भाग्य सहम पहिल्या स्थानात शुक्ल प्रतिपदेला, दुसऱ्या स्थानात तृतीया, तिसऱ्या स्थानात शुक्ल पंचमी, चौथ्या स्थानात शुक्ल सप्तमी आणि सातव्या स्थानात पौर्णिमेला असतो. शुक्ल पक्षात जन्म झाला असता तो ०१ ते ०७ व्या स्थानात राहतो आणि कृष्ण पक्षात जन्म शुक्ल पक्षात जन्म झाला असता ०७ ते १२ व्या स्थानात राहतो.

 स्पष्ट चंद्रामध्ये स्पष्ट लग्न जोडणे, त्या संयोग क्रमांकातून स्पष्ट सूर्य वजा केल्याने भाग्य सहम प्राप्त होईल. सूर्य आणि चंद्रामध्ये जितके अंतर असते, लग्नापासून तितक्याच अंतरावर भाग्य सहम असतो.

जर जन्म वेळ दिवस किंवा रात्र असेल त्याप्रमाणे भाग्य सहमची गणना खालील सूत्रानुसार केली जाते.

जेव्हा जन्म वेळ दिवसा असते : भाग्य सहम = स्पष्ट लग्न + स्पष्ट चंद्र – स्पष्ट सूर्य.

जेव्हा जन्माची वेळ रात्री असते: भाग्य सहम = स्पष्ट लग्न + स्पष्ट सूर्य – स्पष्ट चंद्र.

भाग्य सहमचे तीन मुख्य बिंदू म्हणजे लग्न, सूर्य आणि चंद्र. लग्न हे भौतिक शरीराचा आणि आरोग्याचे सूचक आहे. चंद्र शरीरातील आत्म्याचा सूचक आहे. सूर्य हा जिवंत भौतिक शरीराचा, त्याच्या शारीरिक आणि सामाजिक संबंधांचा सूचक आहे. भाग्य सहम हे आरोग्य, संपत्ती, जीवनातील स्थितीचे स्तर दर्शवते. शुभ भाग्य सहम म्हणजे समाधानकारक जीवन, मजबूत शरीर, योग्य वित्त, सकारात्मक आदर, ओळख, चांगला व्यवसाय. म्हणूनच भाग्य सहमवर कोणताही नकारात्मक प्रभाव पडू नये.

भाग्य सहम वर नकारात्मक प्रभाव:

१) जर सूर्य आणि चंद्र अपायकारक (स्वराशीपासून ७ वी रास) किंवा नीच राशी मध्ये असतील तर भाग्य सहम वर नकारात्मक प्रभाव पडतो.

२) ज्या स्थानामध्ये भाग्य सहम स्थित आहे त्याचा स्वामी अशुभ (स्वतःच्या राशीतून सातवा) किंवा निर्बली असेल तर भाग्य सहम वर नकारात्मक प्रभाव पडतो.

३) जर भाग्य सहम वर शुभ ग्रहाची दृष्टी असेल आणि तो ग्रह अशुभ (स्वतःच्या राशीतून ७ वे स्थानी) किंवा निर्बली असेल तर भाग्य सहम वर देखील नकारात्मक प्रभाव पडतो.

४) जर भाग्य सहम वर शुभ ग्रहाची दृष्टी असेल, तर नकारात्मक प्रभाव पडतो आणि तोच अशुभ ग्रह अशुभ (स्वतःच्या राशीतून सातवा राशी) किंवा अपायकारक वा नीच राशी असेल तर तीव्र नकारात्मक प्रभाव पडतो.

५) प्रभावी ग्रह केंद्र केंद्र (१,४,७,१०) स्थानात असल्यास प्रभाव अधिक मजबूत होईल. जर ते पनफर (२,५,८,११) स्थानात असेल, तर त्याचा प्रभाव कमी असेल. जर आपोक्लीम (३,६,९,१२) स्थानात असेल तर त्याचा प्रभाव खूपच कमी होईल. हे तत्व शुभ आणि अशुभ दोन्ही ग्रहांना सारखेच लागू होईल.

६) जर भाग्य सहम बरोबर सूर्य किंवा चंद्राचे केंद्र योग किंवा प्रतियुती योग कोणत्याही भावातून होत असेल, तर हे भाग्य सहमसाठी अत्यंत हानिकारक आहे.

भाग्य सहम स्थानागत फलादेश :

प्रथम स्थान : प्रथम स्थान एखादे व्यक्तिची विशेषताला दर्शविते. भाग्य सहम लग्नी असल्यास जातक भाग्यशाली असेल. तो आपल्या साहसा द्वारे लाभ प्राप्त करेल. सुखी जीवन व्यतीत करेल. स्वत:चे प्रयत्न व कौशल्याने सफलता प्राप्त करेल. तो आत्मविश्वासाने कार्य करेल. व उज्जवल व सफल जीवन प्राप्त करेल.

द्वितीय स्थान : जातक भाग्यशाली असेल. जातकास धन लाभ, व्यापार द्वारा लाभ, सुखी पारिवारिक जीवन व संतोषजनक आर्थिक स्थितीचा आनंद प्राप्त होईल. जेव्हा’ की शुभ दृष्टि असेल तेव्हा कमाई मध्ये वृद्धि व जीवन स्तर मध्ये विकास होईल.

तृतीय स्थान: जातकास भावा द्वारे लाभ, लाभदायक छोटी जागा, परामर्शदाता अथवा सेक्रेटरी असेल व लाभ प्राप्त करेल, अथवा एजन्सी प्राप्त करेल जो त्याला विनाकष्ट धन प्राप्ति देईल. शेजा-यांशी चागले संबंध प्राप्त करेल.

चतुर्थं स्थान : जातकास चांगली पैतृक संपत्ति मिळेल, जमीन जुमाल्यावर विनियोग करेल, गुप्त खजिना प्राप्त करेल अथवा अकस्मात धनवान होईल, खाण संपत्ति द्वारा वा पृथ्वी वा खनिज वा धातुद्वारे एक धनवान व्यक्ति बनेल.

पंचम स्थान : जातकांस विनीयोग, सट्टा व संतति द्वारे लाभ, राजदूत वा तरुण व्यक्ति भाड्यामध्ये वृद्धि करतील, त्यास भाग्यशाली संतान होऊ शकतात. त्याला सिनेमा, औपैरा अथवा नाटक द्वारे लाभ होईल, संगीताचा शौकीन परन्तु जर भाग्य सहम पीडित असेल, तर तो जातक अधिक हानि, धोका, व मनोरंजनासाठी पैसे उधळेल.

षष्ठम स्थान : जातकाचे काका व काकी भाग्यवान असतील, ते जातकाची सहाय्यता करतील. जातक नोकरा द्वारे लाभ प्राप्त करतील. छोटे पशु व बैंकिंग द्वारा लाभ प्राप्त होईल. जातकास सावकाराचे पूर्ण सहयोग व आवश्यकता असेल, तेव्हा ओव्हर ड्राफ्टची सुविधा मिळेल.

सप्तम स्थान : जोडीदार द्वारे लाभ, जोडीदार द्वारे धनलाभ. ठेके, मुकदमा. नेमणूका, प्रतिस्पर्धा द्वारे लाभ. शत्रूवर विजय, जेव्हा भाग्य सहम वर शुभ दृष्टि असेल विवाह, परंतु जर तो पीडित असेल तर विपरित परिणाम होतील, संघ, सोसायटी व क्लब द्वारे लाभ.

अष्टम स्थान : जातकास एखादा जूना सम्बन्धी आपली संपत्तीस स्वेच्छाने मृत्युपत्र द्वारा देऊ शकतो.मित्रांद्वारे अचानक धन प्राप्त करू शकतो. या जातकाची पत्नी व्यवसायवाली असेल अथवा बीमा, व्यापार द्वारा लाभ या पैतृक संपत्ति, बोनस, ग्रेच्युटी ईत्यादि द्वारे प्राप्त करेल.

नवम स्थान : उच्च शिक्षणा करिता, महत्वाकांक्षा, उच्च स्तराची प्रेरणा, दीर्घ यात्रा, फिरता एजेंट रूपाने धन कमविणे, विदेशांशी व्यापार द्वारा लाभ, प्रकाशन द्वारे कमविणे अथवा शोध द्वारे कमविणे, शिक्षा, न्याय, धार्मिक विभागा द्वारे नोकरी अथवा आंतराष्ट्रीय व्यापार, आयात-निर्यात मध्ये नोकरी.

दशम स्थान व्यवसाया मध्ये यश, नाव व कीर्तिवान असतो. पदोन्नति जर सिलेक्शन ग्रेड मध्ये असेल तर त्याचेशी वरिष्ठ अधिकारी दबून राहतील, त्याला पदोन्नति होईल. आपल्या जीवनाची सर्वोच्च स्थिती मध्ये पोहोचेल. जर पीडित असेल तर अकस्मात पतन, चांगली दृष्टि असेल तर मालक होऊ शकतो. वाईट दृष्टिने आजारपण, दोन्ही अति असेल.

एकादश स्थान : लाभदायक मित्र, मदत करणारा, भाऊ लाभदायक, व्यवसाय सफलता, इच्छापूर्ति, आनंद, लाभ व शक्ति, प्रतिष्ठितत लोकाशी स्थायी मित्रता असेल.

व्दादश स्थान : खरेदी व विक्री मध्ये भाग्यशाली, विनियोगा मध्ये भाग्यशाली, गुप्त शत्रुची क्रिया, शेवटी लाभ मिळेल, अज्ञात सूत्राद्वारे लाभ, सम्पत्ति मध्ये वृद्धि. जर पीडित असेल तर तो अनेक प्रकारे नुकसान, बारावे स्थान सुख व शयन करिता व आरामा करिता आहे.

भाग्य सहम राशीगत फलादेश :

मेष : जातक धैर्यशील. प्रेरणादायक आणि संयमी असेल. त्याचेमध्ये ऊर्जाशक्ती भरपूर असते. त्यामुळे जातकाने उर्जेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जातक अत्माविवेकी आणि स्वावलंबी असतो. आव्हाने आणि अडथळ्यांना धैर्याने तोंड देणारा असतो.

वृषभ : जातक अनावश्यक गोष्टीचा उलगडा करण्यात वेळ घालवणारा, शांती-प्रेम अशा गोष्टींच्या उपयुक्ततेवर विश्वास ठेवणारा, भरीव काम करणारा व पूर्तीचा आनंद घेणारा, बाह्य गोष्टींची पर्वा न करता धैर्य व शांती टिकवून ठेवणारा असतो.

मिथुन : जातक जिज्ञासू वृत्तीने आयुष्याचा अनुभव घेणारा, जगण्याचा आनंद लुटणारा, सतत हालचाल करणारा, अष्टपैलु, लवचिकता आणि स्वत;ची शैली जोपासणारा, विनोदबुद्धी असलेला, प्रत्येक क्षण जगणारा, स्वत:च्या निर्णयांवर नियंत्रण नसलेला असतो.

कर्क : जातक नम्र आणि पोषण कर्ता असतो. इतरांचे पालनपोषण करण्यात आणि स्वतःचे पोषण करण्यात आनंद मानतो, तो स्वत:ची निरागसता आणि इतरांचे निरागसपण जपतो. मुलाला किंवा व्यवसायाला जन्म देण्यात, वाढवण्यात विशेष आनंद प्राप्त करणारा उर्जेचा योग्य वापर करणारा असतो.

सिंह : जातक उत्साही, उदार व आशावादी असतो. स्वत:ची बलस्थाने व प्रभुत्वावर लक्ष केंद्रित करणारा व  इतरांसाठी प्रेरणादायी असल्याने संपर्कात येणारे आनंदी होतात. तो स्वत:च्या उदाहरणाद्वारे एखाद्याने स्वतःचा मार्ग कसा शोधला पाहिजे याचे मार्गदर्शन करतो. कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वतःच्या आनंदासाठी इतरांना मदत करणारा असतो. सर्जनशील, एकाग्र व मुबलक ऊर्जावान असल्याने मोठी संधी उपलब्ध होते.

कन्या : जातक तार्किक विश्लेषक, सहिष्णु, विवेकबुद्धीवान असतो. सुयोग्य वातावरणात आनंदी असतो. कार्यकुशलतेने काम करून आनंदी होतो. भूतकाळातील आठवणींचे ओझे वहात नाही.

तूळ : जातक मुत्सद्दी, विनयशील आणि कृपावान असेल. त्याला विजयी परिस्थिती निर्माण करण्याची समज असते. नाते जपण्याताला आनंद मानतो, दुहेरी जगात संतुलन राखत, सर्वांना समान आणि एक समजतो.

वृश्चिक : जातक कार्यक्षम, महत्त्वाकांक्षी, संघटक असेल. अनुभवाने पदर काढून गाभ्यापर्यंत पोहोचण्यातच माणसाचा आनंद असतो. जो व्यर्थ जीवनाला परम लाभ मानतो. तीव्र समज, तीक्ष्ण अंतर्दृष्टी आणि अज्ञाताची निर्भयता ही मूळची देणगी आहे.

धनु : जातकास मोकळेपणा, सरळपणा, प्रामाणिकपणा, नैसर्गिक नियमांची समज विकसित होते. व्यक्ती जोखीम घेण्यास घाबरत नाही आणि धैर्य आपले नशीब आजमावतो. बहुधा घरापासून दूर असलेल्या ठिकाणी भाग्योदय होतो.

मकर : जबाबदारी, संयम, चिकाटी, व्यावहारिकता विकसित होईल. व्यक्ती आपली प्रगती पाहून आनंदित होते आणि त्याला एक रचना देऊन पुढे जात रहातो. तो स्वत: स्वत:च्या नशिबाचा शिल्पकार आहे. आणि ते घडवेपर्यंत चैन नसते.

कुंभ : निष्पक्षता, मौलिकता, मानवतावाद विकसित होईल. जातक परंपरावादी पण नाही आणि फार आधुनिक हि नाही आणि फरक शुद्धता त्यांस समजते. जा जातक एका गोष्टीला दुसर्‍यापेक्षा श्रेष्ठ किंवा नीच मानत नाही, नियमाने बांधील नाही. इतरांच्या वेगळेपणापेक्षा स्वतःच्या वेगळेपणावर आनंदी आहे.

मीन : कल्पनाशक्ती, करुणा आणि विश्वास वाढेल. जीवनाचा प्रवाह संथगतीने वाहताना पाहून त्यास आनंद वाटतो. तो स्वभावतःच आत्म्याशी जोडलेला असतो. त्यास माहित आहे की सर्व मर्यादित काळ आहे. जो गरजा मर्यादित करण्यास सक्षम आहे आणि त्याला एकतेचे महत्त्व समजले आहे.

● भाग्य सहम ज्या स्थानामध्ये आहे त्याचेशी संबंधित क्षेत्रातून लाभ होतो. जर भाग्य सहम् अग्नि तत्वाच्या राशीत असेल तर क्रियाकलाप, नेतृत्व, अग्निपासून लाभ होतो. जर भाग्य सहम पृथ्वी तत्वाच्या राशीत असेल तर धन आणि सुख हे आर्थिक क्षेत्र आणि पृथ्वीशी संबंधित गोष्टींमधून मिळते. वायू तत्वाच्या राशीत असेल तर बौद्धिक क्षेत्र आणि वायूशी संबंधित गोष्टींमधून धन, सुख प्राप्त होते. जर भाग्य सहम जल तत्वाच्या राशीत असेल तर व्यक्तीला भावनिक क्षेत्र आणि पाण्यापासून पैसा मिळतो आणि आनंद मिळतो.

ज्योतिष मित्र मिलिंद, पुणे

संपर्क : ७०५८११५९४७

(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

6 thoughts on “ज्योतिष शास्त्रातील भाग्यसहम (FORTUNA)

    1. Lekhamadhye savistar dile ahe, tari tyasathi shortcut asa ki Chandra Ani suryachya madhe jitke rashi antar ahe titkyach antaravar lagnsthanapasun bhagya sahan asto. Fakt to krushn pakshacha ahe ki shukl pakshacha te check Kara…

      Like

Leave a reply to Manoj Nayak Cancel reply