
नमस्कार,
आज आपण नक्षत्र धार्योषधि म्हणजे काय आणि त्याचा उपयोग पाहणार आहोत.
विश्वातील (ब्रह्मांडातील) प्रत्येक ताऱ्यापासून तसेच तारका समुहांपासून शक्तीरूपी वैश्विक किरणे पृथ्वीवर येत असतात त्यांच्या वारंवारतेचे, तसेच तीव्रतेचे परिणाम मानवी शरीरावर होतात. या ऊर्जास्रोतांचा अभ्यास करून आमच्या पूर्वजांनी ज्योतिषशास्त्र विकसित केले. यातूनच माणसाचे जन्माचे वेळेस जन्मस्थळाचे बरोबर डोक्यावर जे तारे, नक्षत्रसमूह व ग्रह असतात तेथून येणाऱ्या ऊर्जास्रोतांचा माणसाचे शरीरावर कसा चांगला अथवा वाईट परिणाम होतो याचा अभ्यास केला गेला. ज्या नक्षत्रावर माणसाचा जन्म होतो त्या नक्षत्रापासून येणाऱ्या ताऱ्यांचा ऊर्जास्रोत जर माणसास हानीकारक असेल तर त्या नक्षत्रास वाईट नक्षत्र म्हणतात व जर परिणाम चांगला असेल तर चांगले नक्षत्र म्हणतात. वाईट नक्षत्र याचा अर्थ असा की, उत्तम आरोग्यास अथवा भाग्यास ज्या ऊर्जाशक्तीची गरज असते ती ऊर्जाशक्ती माणसास न मिळणे अथवा येणाऱ्या स्रोताचा प्रतिकूल परिणाम आरोग्यावर होणे असा आहे. यासाठी ज्या प्रकारच्या ऊर्जेची कमतरता जन्माचे वेळेस आहे ती भरून काढल्यास उत्तम आरोग्य व भाग्य प्राप्त होऊ शकते, असे आमचे पूर्वजांनी शोधून काढले. येणाऱ्या प्रत्येक वैश्विक किरणांची वारंवारता त्यांनी जाणून घेतली व ती मिळवण्यासाठी अन्य उपाय शोधले.
पूर्वीचे काळी ऋषीमुनींनी ह्या कंपन वारंवारतेचा सखोल अभ्यास करून ज्या कंपनांच्या कमतरतेमुळे मानवास अनारोग्य प्राप्त होते अशी कंपने कशी प्राप्त करता येतील याबाबत संशोधन करून ज्योतिष शास्त्राद्वारे आम्हास प्राप्तीचे उपाय सांगितले. उत्तम आरोग्य व भाग्य प्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या कंपन प्राप्तीसाठी उपलब्ध असलेल्या असंख्य वनस्पतींचा विचार त्यांनी केला असला पाहिजे. प्रत्येक झाडांचे रासायनिक घटक (Chemical Composition) हे वेगवेगळे आहेत. हे आज आम्हास ज्ञात आहे. बऱ्याच संशोधनानंतर ज्या वारंवारतेच्या कंपनांची जरूरी होती अशी कंपने देणारी झाडे, वनस्पती त्यांनी शोधल्या व त्या वनस्पतींना त्या त्या नक्षत्राचे आराध्य वृक्ष ही संकल्पना आमचे समोर ठेवली. याचाच अर्थ अमूक एका नक्षत्रावर जन्म झाल्यास कमतरता असणारी ऊर्जास्रोते ही अमूक एक वनस्पती अथवा वृक्षापासून प्राप्त होतात असा होतो. त्याचप्रमाणे रोग होऊ नयेत म्हणून किंवा झाल्यास त्यातून लवकर मुक्तता व्हावी म्हणून विशिष्ट गुणधर्म असलेले झाडाचे मूळ, खोड, साल, फूल, फळ किंवा इतर कोणतेही अंग, मनगटावर, गळ्यात, कंबरेला किंवा शरीरावर कुठेही धारण करावे, असे सांगितले आहे. त्यालाच नक्षत्र धार्योषधि असे म्हणतात.
नक्षत्रकष्टावलि या नावाचे कोष्टक काही पंचांगांत दिले जाते. त्यात वरील आराध्यवृक्षाबरोबर धार्योषधि सांगितल्या आहेत. हा आराध्यवृक्ष नसल्याने जन्मनक्षत्रानुसार येणारी धार्योषधि वनस्पती औषधासाठी वापरणेस हरकत नाही.
येथे नक्षत्रानुसार कोणत्या धार्योषधि वनस्पती उपयोगी आहेत ते पाहू.
अश्विनी, रोहिणी, ज्येष्ठा आणि श्रवण या जन्मनक्षत्रांसाठी अपामार्ग म्हणजे आघाडा आहे.
जास्तीतजास्त वर्षभर हे झुडुप टिकते. पावसाळयात आपोआप उगवते. पांढरा आणि लालसर असे दोन प्रकार आहेत. पाने अंडाकृती, मागील बाजू पांढरट असते. शीतकालात फूल येते. आघाड्यात पोटॅश हा क्षार असतो. पित्तामुळे होणाऱ्या मूतखड्यावर, दातांच्या तक्रारींवर, वेदना, व्रण, दंश यावर पानांचा रस उपयोगी. बियांचा उपयोग मूळव्याध, सूज, मूतखडा, कृमी, भस्मक (सतत भूक) यावर गुणकारी. तर मूळ विषमज्वर, सुलभ प्रसूतीसाठी उपयोगी, दंतरोगावर पाने, मुळे चघळावीत. शरीरातील पाण्याचा मार्ग शुद्ध होतो.
कल्प : आपमार्ग क्षार सिद्ध तेल, अगस्ति हरितकी लेह, अग्निमुख, मयूर दंतमंजन
आर्द्रा, उत्तरा भाद्रपदा, रेवती जन्मनक्षत्रांसाठी अश्वस्थ पिंपळ सांगितला आहे.
हा पिंपळभारतातच आढळतो. हा नित्य परिवर्तनशील व टवटवीत असतो. पिंपळ फळ हृदयाला बळ देणारे आणि शीतल आहे. विषमज्वर, कृमी, कुष्ठ, दाह, वाचा दोष, क्षय ई रोगांवर पिंपळाचे पंचांग उपयुक्त आहे. सालींचा काढा श्वेत प्रदरावर उपयुक्त आहे. पिंपळ कफ पित्त शामक आहे. उदार शुलात फळ, वरण जखमांवर सालींचे चूर्ण, वेदना, सूज, व रक्त स्त्रावावर चिक उपयुक्त आहे. पिंपळाच्या सालीचा चहा साखर व गुल घालून रोज घेतल्यास तो धातुवार्धक, पौष्टिक, शक्तीदायक व स्फूर्तीदायक ठरतो. रोगी व निरोगी दोघांना गुणकारी आहे. दम असणार्यांना उत्तम, पानाचे चूर्ण गुल दुधाबरोबर घेतल्यास मलावरोध दूर होतो. आर्द्रासाठी चंदनासह अश्वस्थ दिला आहे.
कल्प : लाक्षादी चूर्ण, लाक्षादी मलम, लाक्षादी गुग्गुळ, लाक्षाधृत
कृत्तिका, पूर्वाषाढा, उत्तराषाढा या तीन जन्मनक्षत्रांसाठी कार्पास (कापूस) सांगितला आहे.
कापूस आणि कापसाच्या राखेच्या बाह्य उपचाराने व्रण भरून येते. वेदना कमी होतात. सर्पदंशावर पानांचा रस, फुलांचा काढा, मानस रोगात, मुळाचा काढा पाळीच्या व प्रसूतीच्या तक्रारींवर, गरोदरपणी मुळांचा काढा दिल्यास गर्भपाताची शक्यता असते. कर्णस्राव, कर्णनादावर कापूस पानांच्या रसाने सिद्ध केलेले तेल चांगले. सरकीच्या काढ्याने अंगावरील दूध वाढते.
मघा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपदा या तीन जन्मनक्षत्रांसाठी भृंगराज (माका) सांगितला आहे.
पांढरा, पिवळा व निळा असे तीन प्रकार फलांच्या रंगावरून होतात. यात भरपूर राळ व एक्लिप्टिन नावाचे घटक द्रव्य असते. कफ वाताच्या विकारावर उपयोगी. पानाच्या रसाचा बाह्योपचार पद्धतीने सूज, वेदना, व्रण, गातीवर लेप देतात. त्वचेला मूळचा रंग येतो. कपाळदुखीवर कपाळावर चोळतात. पांढरे केस काळे करण्यासाठी रसाने सिद्ध केलेले तेल वापरतात. अस्थिधातू, आम्लपित्त, अग्निमांद्य, अजीर्ण, यकृत प्लीहा, वृद्धी, कावीळ, मूळव्याध, पोटदुखीवर पाच प्रकारच्या खोकल्यावर उपयोगी. माका रस एरंडेलाबरोबर दिल्यास पोटातील कृमी पडतात. मळाची दुर्गंधी नाहीशी होते. रक्तदाब कमी करणारा आहे. आयुर्वेदात त्याला रसायन म्हटले आहे.
कल्प : मट्टा भृंगराज तेल, चूर्ण, आसव, घृत, षबिंदूतेल, सूतशेखर, लघुसूतशेखर
पुनर्वसू आणि मूळ या दोन नक्षत्रांसाठी अर्क(रुई) आहे. पांढर्या रुई ला मंदार म्हणतात. गणपती मारुतीला याची फुले प्रिय आहेत. पान, फुले, मुले औषधात वापरतात. चीक सुद्धा उपयोगी आहे. पण तो अंगावर उततो, त्यामुळे वैद्यांचा सल्ला घ्यावा. रुई च्या मुलांचा उपयोग पोटातील सर्व तक्रारी, कफ, खोकला, हत्तीरोग, सूज, कुष्ठ, विंचूदंश, सर्पदंश, घटसर्प, श्वास, श्वान दंश गंडमाळा, गुडघी रोग, तोंडावर काळे, डाग, मुत्राघात, गाठी यासाठी उपयुक्त आहे. पानाचा उपयोग कर्णशूल, नाळगुंड, मुलांची पोटफुगी, अंग ठणकणे, सुखप्रसुती यावर होतो. रुईचा चीक उतल्यास चिंचेचा पाला वाटून लेप करावा. अर्ज झाडावर साखरे सारखा पांढरा डिंक येतो. तो विषारी असतो. मुळाची साल उष्ण असल्याने कफ वात शामक आहे. हृदय दुर्बलता, सूज यावर वापरतात. सूज वेदनांवर पाने गरम करून बांधावीत. स्वेद (घाम), कुष्ठ त्वचारोगावर उपयोगी, जास्त दिल्यास दाह होतो.
कल्प : अर्कलवन, अर्कतेल, अर्कादी चूर्ण, प्रवाळ पंचामृत, महावात विध्वंस.
आश्लेषा आणि उत्तरा या दोन नक्षत्रांसाठी पटोल (कडू पडवळ) सांगितले आहे.
वर्षभर जगणारी, लांब वाढणारी ही वेल, पाने हृदयकार, खरखरीत, दोन्ही बाजूस निमुळती, फूल पांढरे, फळ लंबगोल, दोन्ही बाजूस निमुळते, फळावर पाच पांढऱ्या रेषा असतात. पिकल्यावर पिवळसर तांबट होते. ही जंगलात आपोआप उगवते. आपल्या खाण्यातले भाजीचे गोड पडवळ पटोल जातीचे नाही. कडू पडवळ त्रिदोषशामक आहे. जखमेवर आणि टकलावर पानांचा रस लावावा. जास्त खाल्ल्यास उलटी व जुलाब होतात. रक्तविकार व सूज यावर उपयोगी ज्वर, कुष्टावर गुणकारी.
कल्प : पटोलादि क्वाथ, पटोलादि चूर्ण.
हस्त व स्वाती नक्षत्रासाठी जाई-जुई चमेली या वेली सांगितल्या आहेत.
वेल खूप मोठे व मजबूत असतात. मूळ, पान, काळ्या, फळ, गुणयुक्त आहेत. मुख रोग, नेत्र रोग, जखमा, विष, कृमी, कुष्ठ या वर उपयुक्त. जाईला ५ पाकळ्यांचे फुल व ७-९ पानाचे पत्रक असते. जूईला ८ पाकळ्यांचे फुल व ३ पानाचे पत्रक असते. चामेलीला रंगीत फुले असतात. तिघांचे गुण सारखेच आहेत.
कल्प : जात्यादी तेल- मलम, पाठादी तेल.
भरणी नक्षत्रासाठी धार्योषधि अगस्ता (हृदगा) आहे. दक्षिण आकाशात अगस्ति ताऱ्याचे दर्शन ऑगस्टमध्ये होऊ लागल्यावर हादग्याला होडीसारखी दिसणारी पांढरी फुले येतात. क्वचित लाल, पिवळ्या, निळ्या फुलांचे झाडसुद्धा आढळते. साल व पाने सूज व जखमेवर उपयोगी. बुद्धिवर्धक व विषनाशक आहेत. फुले व पानांची भाजी जंत व पोटाच्या विकारावर गुणकारी. फुफ्फुसाची सूज, खोकला, पडसे, श्वेत प्रदर व तापावर पानांचा रस उपयोगी. शेंगाचे लोणचे, भाजी करतात. फुले, पाने, शेंगा वैरणीत घातल्यावर दूध, दही, लोणी, औषधी गुणाचे होते. कफपित्तनाशक आहे पण जास्त प्रमाणात घेतल्यास वातवर्धक आहे. मनशीळ शुद्धिसाठी पाने उपयोगी.
कल्प : अगस्तिप्राश
मृग नक्षत्रासाठी यंती (शेवरी) धार्योषधि आहे.
हे झाड ८ ते १० फूट उंच असते. पाने चिंचेच्या पानासारखी पण कडू असतात. शेंगा शेवग्याप्रमाणे असतात. त्यात २०/२५ लहान बिया असतात. मूळ, साल, पाने व फुले त्रिदोषशामक. लेपाने जखम वेदना बरी होते. मूळ हातात धरल्यास विंचवाचे विष उतरण्यास मदत होते. अग्निमांद्य व अतिसारात आणि पाळी सुरू होण्यासाठी बियांचे चूर्ण देतात. नेहमी पडसे येणाऱ्यांना पानांची भाजी देतात. गर्भधारणा न होण्यासाठी कांजीमध्ये फुले वाटून गूळ घालून देतात.
पुष्य नक्षत्रासाठी (तुषार) कापूर धार्योषधि आहे.
औषधासाठी शुद्ध कापूर वापरतात. नेत्ररोग, दंतरोग, डोकेदुखी, यावर उपयोगी. वात व्याधी, मुखरोग, अरुचि, अतिसार, यात देतात. मूत्रल व जंतुनाशक गुण आहेत. अधिक प्रमाणात पोटात गेल्यास विषासारखा परिणाम होतो. मेंथाल म्हणजे पुदिना अर्क आणि ओव्याचे फूल वात यात मिसळल्यास अमृतधारा नावाचे द्रव औषध तयार होते. पोटाच्या अनेक तक्रारींवर सर्दी खोकल्यावर ते गुणकारी आहे.
कल्प : कर्पूररस, कर्पूरासव, अमृतधारा, कर्पूरादिवटी, चंद्रप्रभा, दंतमंजन
पूर्वा नक्षत्रासाठी कंटकारि (रिंगणी, काटेरिंगणी, भुईरिंगणी) ही वनस्पती आहे.
हे लहान काटेरी झाड चकचकीत हिरव्या रंगाचे असते. पानांच्या मागे तीक्ष्ण काटे असतात. फुले निळी क्वचित पांढरी असतात. फळे गोलाकार बोराएवढी असतात. कच्ची फळे हिरवी आणि पांढऱ्या रेषा असणारी, तर पक्क फळे पिवळी होतात. खोकल्यावर याचे चूर्ण मधातून चाटल्यास खोकला बरा होतो. फळांचा धूर दिल्यास दातांतील कृमी पडून जातात. घाम आणण्यास, फकज्वर नाहीसा होण्यास उपयोगी, मूत्ररोग, घशाच्या तक्रारीवर, संधिवात, अंग दुखणे यावर गुणकारी, रिंगणी मूळ अनेक आसवात काढ्यात अरिष्टात वापरतात.
कल्प : निदिग्धादि काढा, व्याघ्री हरीतकी, कंटकारी धृत, नागरादि कषाय, दमा गोळी
चित्रा नक्षत्रासाठी मरुबुक (मदनफळ गेळफळ) आहे.
मध्यम उंचीचे हे झाड जाळी व काट्याने युक्त असते. फुले पांढरट पिवळी तर फळे नासपातीच्या आकाराची, गोल, पिवळट, धुरकट, सुपारीसारखी असतात. फळातील मगज कडूगोड असतो. फळांचा गोडसर वास आजूबाजूस पसरतो. फळाची साल, सूज, जखम, गालफुगी, वेदनांवर लेपासारखी वापरतात. सालींचा काढा वातशामक आहे. पोटातील विषदोष उलटीद्वारे बाहेर काढण्यासाठी आमाशयातील कफपित्त, आम्लपित्त काढण्यासाठी फळाचे चूर्ण वैद्याच्या सल्लयांनी वापरावे..
कल्प: मदनादि लेप, मदन कल्प, लेप गोळी.
विशाखा नक्षत्रासाठी गुंजा ही धार्योषधि आहे.
पुष्कळ फांद्या असलेली ही वेल आहे. पाने चिंचेच्या आकारची, फुले गुच्छांने येणारी, बिया पांढऱ्या किंवा लाल असतात. त्यांना काळा ठिपका (मुख) असतो. पाने व मुळे त्रिदोषात्मक, पण बिया विषारी असतात. घसा बसल्यास मूत्ररोग, दुर्बलता, यावर गुंजेच्या पानांनी सिद्ध केलेले दूध देतात. पानांचा लेप, जखम, सूजेवर लावतात. पानांच्या काढ्यांनी गुळण्या केल्यास मुखरोग दूर होतो.
अनुराधा नक्षत्रासाठी सुपुष्प ही धार्योषधी आहे.
मुचकुंद वृक्षाला सुपुष्प नाव आहे. सुगंधी लालसर पांढऱ्या फुलांचा वृक्ष. ढालीसारखा खूप बारीक लव असलेली पाने. वरून हिरवी खालून पांढरी, फळ लंबगोल, आतल्या बियांना पंख असतात. फुलाचे चूर्ण मूळव्याधीवर तूपसाखरेबरोबर देतात. कफपित्तनाशक, विषनाशक, त्वचारोगात उपयोगी, दाह शांत करणारे.
शततारका नक्षत्रासाठी कमल धार्योषधि आहे.
कमळ कफ पित्तशामक, दाह कमी करणारे, बुद्धिवर्धक, निद्रा आणणारे, गर्भवृद्धी करणारे, उष्णतेपासून हृदयाचे रक्षण करणारे, तीव्र ज्वरात उपयोगी आहे. लहान मुलांना क्षीण करणाऱ्या अनेक विकारात उपयोगी आहे. पांढऱ्या कमळाला पद्म, तांबड्याला कोकनाद आणि निळ्या कमळाला इंदीवर म्हणतात. पद्म म्हणजे पांढरे कमळ इथे अपेक्षित आहे.
(टीप : या धार्योषधी धारण करण्यास प्रत्यवाय नाही. पण जर सेवन, लेपण ई. उपाय करायचे असल्यास जाणकार वैद्याच्या सल्यानुसार उपयोग करावा.)
ज्योतिष मित्र मिलिंद
संपर्क : ७०५८११५९४७
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
khup chan mahiti dili ahe. Me phone karte tumhala, ek kundali pahaychi ahe urgent madhe.
LikeLiked by 1 person
Chhaan mahiti dili aahe sir tumhi…
LikeLiked by 1 person
Very nice information 👍👍
LikeLiked by 1 person
Milind ji,,,,! 👌✌️🌹👍🏻
Mast mast mast….!💐
🙏🏻Om namo adesh 🔱
LikeLiked by 1 person
Mahitipurn Lekh 👍
LikeLiked by 1 person
Khupach Chan mahiti dili aahe
LikeLiked by 1 person
Khup changli mahiti dili ahe..
Pan vanaspati milnar kuthe…
LikeLiked by 1 person
ayurvedic vanaspati chi lagwad karanrya nursary astat. Google var “Medicinal Plant Dealers” ase search kele tar barech Jan milun jatil kinva junya ayurvedic vaidya yancheshi sampark karun dekhil aplya la mahiti milel. Aplya group var pan Sanjayji Pawar ahet te tumhala nakshtra nusar upyogi vanaspati ark tel suchvu athava bikat deu shaktat.
LikeLike
Uttam mahiti 👌
LikeLiked by 1 person