ग्रह विचार : मंगळ (Mars)


मंगळ (Mars)

नमस्कार,

आज आपण मंगलाविषयी जाणून घेणार आहोत.

खगोलशास्त्र :

बाह्य ग्रहांमधून मंगळ एक बाहय ग्रह आहे. अन्य बाहय ग्रहांमधून जसे गुरु अथवा शनि ई. पेक्षा हा पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह आहे. पृथ्वी पेक्षा साधारण 9 करोड़ 30 ला मैल दूर आहे, जेव्हा की सूर्य व मंगळ चे साधारण अन्तर 14 करोड़ 10 ला मैल दूर आहे. पृथ्वी व मंगळ दोन्ही सूर्याच्या आसपास विभिन्न गतिने चक्कर लावतात. मंगळ चा वृत्त मार्ग नेहमी पृथ्वीच्या वृत्तीय मार्गाच्या बाहेरचा असेल.

पृथ्वी व सूर्यामध्ये फक्त चंद्र, बुध, शुक्र पण काही अंतरावर दिसतो. पण मंगळ, गुरू व अन्य बाह्य ग्रह सूर्य व पृथ्वीच्या मध्ये कधीही फिरु शकत नाहीत व नेहमी बाहेर राहतात.

मंगळ सूर्याच्या आस-पास आपली यात्रा 687 दिवसामध्ये पूर्ण करितो. म्हणून आपल्या दिवसानुसार मंगळाचे वर्ष 687 दिवसांचे असते. पृथ्वीचा पेक्षा मंगळ लहान आहे व याचा व्यास 4200 मैल आहे. हा चंद्राहून दुप्पट मोठा आहे. हे आढळून येते की मंगळ जापल्या स्थानावर 24 तास 37 मिनीट 23 सेकंद मध्ये पृथ्वीच्या दिशेसमान 1 चक्कर फिरतों मंगळ पृथ्वी प्रमाणे मध्ये अक्ष (Axis ) ज्याभोवती तो फिरतो. त्यावर 24 अंश 50 मिनीटे वाकलेला आहे. पृथ्वीच्या प्रमाणे मंगळावर समशीतोष्ण व शीत कटिबन्ध आहे.

मंगळ लाल रंगाचा आहे म्हणून ह्याचा प्रकाश लाल दिसतो. हा राशि मध्ये स्पष्ट चमकतो. हा अन्य नक्षत्रानंमध्ये व ग्रहा मध्ये सहज ओळखता येतो. सकाळी लवकर व लगेच सूर्यास्तानंतर दोन्ही वेळेस हा स्पष्ट दिसतो, जेव्हा हा सूर्याचा जवळ असतो परन्तु जेव्हा सूर्य व मंगळ ची रेखांश अंतर वाढते तेव्हा मंगळ चमकदार नक्षत्रा मध्ये अधिक चमकतो.

पौराणिक कथा :

मंगळ बौद्धाचा देवता म्हटला गेला आहे. व रोमन लोकांना ईश्वर आहे. हा युद्ध देवता व शिकारीचा पण देव मानला जातो. मंगळ (यास ग्रीस मध्ये Ares, इजिप्त मध्ये Horus, अंबारक कुंज संस्कृत मध्ये, सेव्बरे तामिळ मध्ये म्हटले जाते.) गुरू Zeus व त्याची पत्नी Hera चा पुत्र मानले जाते, हा व्दंव्द, विनाश व युद्धाचा देवता आहे. हा त्याचे युद्धप्रिय स्वभावामुळे सर्व लोकाना अप्रिय होतो. अनेक वेळा दुस-या देवताने त्यांना जखमी करून जिंकून घेतले. एकदा जेलमध्ये टाकले गेले. होते, बुध त्याला सोडविण्यासाठी गेला व मुक्त केले. तो शुक्राशी प्रेम करित होता व शुक्रही त्यापाशी प्रेम करीत होता. अशा कथा आहेत. मंगव्ठास वरील श्रेणी मध्ये मोडले जात असे, बायबल मध्ये मंगळाला दैत्य मध्ये समाविष्ट केले गेले आहे. हा शक्ति व ऊर्जेची देवता आहे. हिंदूंच्या अनुसार मंगळ, पुरुष देवता, युद्ध शक्ति देवता जाहे. हा स्वर्ग सेनेचा सेनापति आहे. मंगळ सामवेदचा जाधिपति आहे.

मंगळ रोमन वर्षाचा प्रथम महिना मार्च व त्यापासून 8 वा महिना आक्टोबर चा अधिपती आाहे. या महिन्यामध्ये काही दिवस मंगष्ठाचे पर्व दिवस निश्चित केले गेले आहेत.

रोममध्ये Augustus च्या वेळेपर्यन्त मंगळाचे फक्त दोन मंदिर होते. दोन्ही युद्धकल्प कार्याशी संबंधित होते. प्रारंभी त्याचे मध्ये एक वेदि होता व दूसरा द्वार होता ज्याचे मधून सेना पुढे वाढत असे.

ज्योतिषशास्त्र : मंगळ स्वभावतः शुष्क, अग्निमय व पुरुष ग्रह आहे. मंगळ मेष व वृश्चिक चा स्वामी आहे. मकर मध्ये उच्चचा असतो कर्क मध्ये नीच व वृषभ व तुळ मध्ये निर्बली असतो. मंगळ ऊर्जा दर्शवितों जो जन्म कुंडली मध्ये त्याची स्थिती व दृष्टि अनुसार असते. मंगळ एखादे व्यक्तिची महत्वाकांक्षा व ईच्छा अधिकांश दर्शवतो. मंगळ इंद्रियांना ही दर्शवतो व मनुष्यामधील पशु प्रवृत्ति चे द्योतक आहे.

सामान्यपणे मंगळ पापग्रह आहे. जर हा पीडित नसेल तर व जर हा शुभ दृष्टि प्राप्त करीत असेल तर, आत्मविश्वास, धैर्य, सन्मान, साहसिक कार्य व महान कार्याची प्रेरणा, शक्ति, हिंमत, युद्धप्रियता, तेज बुद्धि, तर्कशक्ति, पुढे वाढण्याचा उत्साह ई. उत्तम विशेषता देतो. मंगळ जातकास त्वरित मानसिक प्रक्रिया व साधारण शारीरिक शक्ति व्यवस्थाची महान योग्यता, कार्य रूपाने परिणीत करण्याची शक्ति, स्वतंत्र उत्साह, चरित्र शक्ति, दृढ निश्चय व भौतिक जगतामध्ये बिना एखाया विरोधाच्या आकांक्षांची सफलतापूर्वक प्राप्ति व सर्व कामाचे नेतृत्व प्रदान करतो. मंगळ साधन संपन्नता चतुराई, च्या दगाने प्रदान करतो.

जर कोणी मानव समजदार असेल तर तो कधी मंगळ जातकाचा विरोध करणार नाही, कारण मंगळ जातक अवसराच्या अनुकूल एखादे कार्य प्रारंभ करेल व त्यांचे म्हणने ऐकले तर दुस-याना मान देतील. ह सल्ला नेहमी योग्य होय की यांचेशी कश्याही समझोता करावयास हवा. त्याचाशी भांडण्यापेक्षा नम्र व्यवहार करावा. मंगळ जातक जेव्हा ते ज्ञानाचे उच्चस्तरीय असतील तर भौतिक व अध्यात्मिक सुखाचा मेळ घालतात.

मंगळ जर एखाद्या कुंडलीमध्ये पीडित असेल तर तो जातक मूर्ख, चिडचिडा व जिद्दी असू शकतो. कारण विवाद व कलहचा अधिपति आहे, ज्यामुळे जातक भांडखोर असू शकतो. तो दारु पिण्याचा शौकीन ही असू शकतो. जेव्हा विचारधारा भिन्नत्व येईल तेव्हा तो पशु शक्ति प्रयोगामध्ये चटकन विश्वास करेल, बुद्धिमानीपूर्वक तर्कविचार व मुक्तचर्चा करण्याचा पेक्षा तो हिंसात्मक विचार करू शकतो व आक्रमक होण्यास मागेपुढे पाहणार नाही.

निम्न स्तरावरची विलासिता मंगळ द्वारे प्रतिपादित होते, असे लोक त्यांची वासना वाम मार्गाने संतुष्ट करतील, जोडीदाराला होणा-या त्रासाची पर्वा करणार नाही.

ते कोणत्याही वस्तु चे कधी पण बलिदान करू शकतात. कष्ट जातकाला साहसी स्वतंत्र बनवितात, त्यांना दुस-याची सत्ता सहन होत नाही, परन्तु ते आपल्या स्वतःचा अंतरमनानुसार कार्य करितात तहान-सहान कार्य पसंत करीत नाही, परन्तु मोठ-मोठ्या योजना कार्यान्वित करण्यास प्राधान्य देतात. पुष्कळसे मार्ग दर्शक नेता, हीरो, संग्राम करणारे व अन्वेशक मंगळाचे पुत्र आहेत. मंगळ भाऊ व भूमि संपत्तिचा प्रमुख कारक ग्रह आहे.

शारीरिक आकृति :  

मंगळ जातक व्यक्तिने शरीराला रंग पांढरा, लालीयुक्त, जातक उंच व धष्ट-पुष्ट असेल, पेठ-यावर चट्टे, मस असतील व डोळे गोल असतील. त्याची कंबर पातव्ठ व हाडे लाल मज्जाने परिपूर्ण राहतील.

अन्य ग्रहाशी दृष्टि सम्बन्ध :

मंगळ जर सूर्याशी शुभ दृष्ट असेल तर जातकाचे शरीर गरम व तेजी मुळे विकार, जसे देवी, तीव्र ज्वर, इ. सहन करण्याची शक्ति असते. हा दोन्ही ग्रहांची शक्ति असेल तर स्वास्थ्य चांगले असते. संक्रामक रोगापासून बचाव होतो. दोन्ही ग्रह साहस, निर्भयता व उत्साह देतात. ते आत्मनिर्मित व भाग्यशाली होतात. जर त्यानचे मध्ये वाईट दृष्टि असेल तर जातकास ज्वर, अपघात, जळजळ होणे, भाव विस्फोट ई. होतात. अनावश्यक भांडणे, उत्तेजना व अतिघाईमुळे कामामध्ये अडचणी येतात, पारिवारिक जीवन ही दुःखी होईल, ते एकदम उत्तेजित व हिंसक होतात व दु:खी होतात.

मंगळ चंद्राशी शुभ दृष्टि असेल तर तो हे दर्शवतों की जातक अत्यंत उदार, महत्वाकांक्षी, दृढ व उत्साहपूर्ण असतो. मंगळ द्वारे पुष्ट शरीर, विशेषता स्त्रिया करिता (कारण दोन्ही ग्रह स्त्रिया करिता मासिक धर्म काष्ठास प्रतिपादित करतात) मजबूत शरीर गठन व सुंदर आकृति दर्शित करतात. दोन्ही ग्रहाची वाईट दृष्टि असेल तर जातक घाई करणारा व उत्तेजित होऊन कार्य करेल जो मूर्ख ही असू शकतो व परिणामाची काळजी न करणारा असेल. स्वास्थ्य व स्वभाव दोन्हीचे नुक्सान होईल, वारंवार अपघात होईल व अत्यधिक रक्तस्राव पण होऊ शकतो.

शुभ दृष्टिद्वारे जीवनस्तर मध्ये वृद्धि व संतोष कारक आर्थिक स्थिति प्राप्त होईल. प्रतिकूल दृष्टि मध्ये नुकसान, बदनामी, घनिष्ट संबंधाचा मृत्यु भ्रम व मूर्खतापूर्ण भांडणे व संताप प्रदान करतो.

जर मंगळ बुधाशी शुभ दृष्टियुक्त असेल तर तो जातक सर्व कार्यामध्ये उत्सुक्ता ठेवेल व त्याला दिलेले अन्य समस्त कार्य तो यथाशीघ्र पण करेल. ही दृष्टि जातकास चेतना, बल व पराक्रम प्रदान करते. मंगळ व बुधाची शुभ दृष्टि द्वारे पदोन्नति, समृद्धि, प्रतिस्पर्धा व द्वंद्व मध्ये सफलता, जीवनाचे प्रति विस्तृत दृष्टिकोण व साहसपूर्ण उत्साह प्रदर्शित करतो. प्रतिकूल दृष्टि जातकास धोकेबाज, चोर, नीच बनविते. जातकाची स्वत:चे देखील चोरी मुळे नुकसान व हानि होऊ शकते.

मंगळावर गुरुची शुभ दृष्टि हे दर्शवते की जातक निश्चित विचारधारा वाला व विकासाचा उत्साहाच्या जोडीस स्वतंत्रपणे स्वेच्छाचा प्रयोग करणारा असतो, हा योग्य असेल हा प्रतिस्पर्धात्मक परीक्षामध्ये सफल होईल व आर्थिक सफलता, तर्कवेत्ता व मंगळ व गुरुची परस्पर शुम दृष्टि होते वकील, बैंक एजेन्ट व राजनैतिक नेता बनवू शकते.

हा दोन्ही ग्रहाची प्रतिकूल दृष्टि असेल तर तो अत्यन्त खर्च, कोर्टकचेरीत मध्ये नुक्सान, बैंक विनियोग द्वारे, सट्टामध्ये नुकसान होते. अपराध संबंधी अभियोग, व मुकदमे होउन न आवडणारे स्थान या विभागामध्ये स्थानांतर या पदावनती पण होऊ शकते.

मंगळावर शुक्राची शुभ दृष्टि वास्तविक पुष्कळ लाभदायक आहे. कारण शांतिपूर्ण व भाऊक शुक्र मंगळचा क्रोधी स्वभाव कमी करून, कोमल करेल व जातकास नम्र, ईमानदार व समंजस व कूटनीतिज्ञ बनवेल. तो शांतिपूर्ण व अनुकूल जीवन घालविण्याचा प्रयत्न करेल, नेहमी जातकाचा रसिक स्वभाव त्याची स्वेच्छा करिता व स्वतंत्र उत्साहास जिंकून त्याचेवर विजय प्राप्त करेल, तो खेळ व आनंदप्रद कार्याचा शौकीन राहिल, व्यापार करण्याची हिम्मत, उत्साह व क्षमता, विश्वास त्याला धन संग्रह करण्यामध्ये व बागबगीचे सहित भूमि प्राप्त करणे ई. मध्ये सहाय्यता करेल तो आपल्या पूर्ण संतोष व चांगल्या प्रकारचे जीवनाच्या आनंद घेण्यामध्ये स्त्रियाशी उत्तम भाषण करण्यामध्ये व प्रसिद्धी प्राप्त करण्यात खर्च करेल.

मंगळ व शुकामध्ये वाईट दृष्टि असेल तर जातकास खर्चिक, असावधान, अतिव्ययी व कोणत्याही नुकसानाची पर्वा न करणारा बनवितात, तो विलास व इच्छाची पूर्ति करिता सर्वकाही करेल व हीन वर्गाची स्त्री ही अथवा कमी कमाई असणाऱ्या नोकराशी संभोग करू शकतो. काही लोक त्याच वर्गाच्या लोकांकडून कर्ज घेऊन शकतात व सर्व काही खर्च करतील, जर कोणी व्यक्ति आपल्या आत्मशक्तिचा उपयोग करतील व तो अश्या प्रकारे येणाऱ्या संकटाला हरवू शकतो, जो गुरु व शनि अथवा गुरु व यूरेनस बी दृष्टि पडल्यावर मिटविली जाऊ शक्त नाही, कारण की याचे वाईट परिणाम त्याचे स्वतःचे नीच कार्यानि फलस्वरूप होतात म्हणून जातकास आपली जनशक्ति संकल्प व कार्याशी दुःख व अपमान, कलंक, अपकीर्ति, पारिवारिक कष्ट ह. दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मंगळ व शनिची शुभ दृष्टि फारच लाभदायक असते, कारण शनि उत्तेजक, शीघ्रबाज व आक्रमक नसतो परन्तु हा जातकास दृढ साहसी व नियंत्रित बनवितो. तो जातकास चरित्रबल देतो. शांति, धैर्य, उत्साहपूर्ण, स्वास्थ्य, क्रियाशीलता, प्रशासकीय क्षमता जातकास पुष्कष्ठ असेल व इच्छित पद प्राप्त होण्या करिता’ जीवनामध्ये उत्तम विकास प्राप्त करेल. तो कार्यास कधीही संकुचित करणार नाही, मात्र स्टेजवर येण्यावर भयमीत होईल, इतकेच नव्हे तर त्याला अन्य ग्रहाशी संबंधित अनेक अडचणींचा सामना करावयास हवा, तो त्या अग्नी परीक्षे मध्ये सफलता प्राप्त करेल.

वाईट दृष्टि काही बाबतीमध्ये फार भयंकर असते. दोन्ही ग्रह संभवत: पाप ग्रह आहेत व जर ते वाईट स्थानाचे स्वामी असतील तर जातकास त्याचा अंतर्दशे मध्ये सावधानी ठेवावयास हवी, या अश्या काष्ठामध्ये जेव्हा’ गोचर मध्ये परस्पर दृष्ट असतात जातक जल्दबाज, शीघ्र उतेजित होणारा, अनियंत्रित, जति करणारा, हत्या करणारा होतो. आम्ही अनेक हत्या (खून) बघत ऐकत असतो. ह्या अचानक उतेजना वश केल्या जातात, ज्यामुळे हत्यारा स्वतः पोलिस स्टेशनामध्ये जाऊन आत्मसमर्पण करतो. विना कोणत्याही अपवाद फलस्वरूप जापण अश्या कुंडलीमध्ये अशी दृष्टि पाहू शकतो. मंगळ तीक्ष्ण अवजार, चाकू, बन्दूक ह. प्रदर्शित करतात, जेव्हा कि शनि भाऊकतेचा कारक आहे. दोन्ही जातकाची मृत्यु दर्शक आाहे. मंगळ – शनि ची वाईट दृष्टि शनि जातकाचे स्थायी सम्पत्ति नष्ट होऊन तो बरबाद होईल संपत्तिवी चोरी द्वारे हानि व देवी इ. आजारपणा मुळे शरीराची सुन्दरता नष्ट होणे दर्शित होते.

मंगळ व यूरेनस वा मध्ये शुभ दृष्टि हे दर्शविते की जातक साधन संपन्न, मौलिक व स्वतंत्र असेल, तो रहस्यपूर्ण विषयाचे ज्ञान व रुचि ठेवेल. हा शुभ दृष्टिवा आविष्कार फारच शुभ आहे, त्याची गुप्त चतुराई, योग्यता कार्यामध्ये रूपान्तरित होईल जेव्हा’ कधी हे दोन ग्रह गोचर द्वारे शुभ दृष्टि निर्माण करतील.

वाईट दृष्टि तेवढीच भयंकर आहे जितकी शनि व मंगळाची असते, जातक रागवेल व उत्तेजना मध्ये नियंत्रण राहणार नाही. विचारयुक्त पण हट्टी असल्याने तो दुस-याचा सल्ला कडे लक्ष देणार नाही. परन्तु तो स्वतःची कार्यप्रणाली चालू ठेवेल, तो कठोर हृदयी व दुष्ट असू शकतो. मग त्याला आर्थिक लाभ हो वा न हो तो शेवटपर्यन्त संघर्ष करीत राहील. त्याचे म्हणणे योग्य आहे जर तो हा अनुभव करेल की बाजारामध्ये शेअरची किंमत शीघ्र अथवा उशीरा जास्त होणार आहे तर तो महिने पर्यन्त स्थितीला चालू ठेवण्यासाठी मागे पुढे पहाणारा नाही. जेव्हा की बाजार कमजोर होईल व भाव तेज होणार नाही.

जातक स्वत:चे विचारावर दृढ राहील. वैष्ठेच्या अनुसार न चालणे मग किती पण नुकसान होवो हा या दृष्टिचा परिणाम आहे जर कोणताही व्यापार उज्जवल समजून प्रारंभ करेल, ज्याचा अन्त असफल रूपाने प्राप्त करेल अपकीर्ति व बदनामी होईल.

“नेपच्यून च्या जोडीस शुभ दृष्टि असेल तर जातक धार्मिक होतो. तो मोठ मोठ्या यात्रा करक शक्ती, विदेशाशी सम्बन्ध ठेऊन शक्ती व ठोक व्यापारा, एजन्सी ई. द्वारे पुष्कळसा लाभ प्राप्त करू शकतो. संतोषकारक सीमेपर्यन्त सफलता व आनंद दायक उत्साह निश्चय रूपाने प्राप्त होतो.

वाईट दृष्टि त्याला भोग विलासा मध्ये भ्रष्ट करते व अधर्मी होतो. तो दुस-याना विष देण्याचे डोके ठेवेल, अथवा बुडुन अथवा जहर खाऊन आत्महत्या करेल, अन्यथा तो स्वतः नदी, समुद्र, झरे, विहीरी मध्ये बुडून मरण्याची जोखीम घेईल. अश्या प्रकारे मंगळावर अन्य ग्रहाची दृष्टि पडल्याने जातकाचा विशेषता मध्ये बदल होत राहतो.

संक्षिप्त माहिती :

अधिपत्य :

अग्नी, पुरुष, शक्ती, ताकद, पशुत्व, व्यक्तीमत्व, इच्छाशक्ती, अधिकार, लढाई, संहार, नेतृत्व, आत्मविश्वास, प्रमुत्व, व वासना विचार

शरीराचे भाग :

गुप्तेंद्रीयाचा भाग, स्नायु डावा कान, चेहरा व डोके, चव, मूत्राशय, नाक, गर्भाशय, प्रोस्टेट ग्रंथी, गुदद्वार ई.

गुण :

उष्ण, उतावळा, अतिरेकी अधिकारी वृत्ती, नेतृत्व व प्रभुत्व गाजविणे, लढवय्या, शीघ्रकोपी, मेहेनती अधिकार प्राप्ती, भोगी

रोग :

जखमा होणे, भाजणे, गळणे, पुरळ, खाज, आग होणे, रक्तदोष, गुप्तरोग, मुळव्याध, पिस्तुला, सर्व प्रकारचे ताप, देवी, कांजण्या, अल्सर, हर्नीया, मलेरीया, रक्तस्त्राव, रक्तप्रदर, आंत्रपुच्छ, स्नायुचे आजार ट्युमर, विषबाधा, धनुर्वात.

व्यवसाय :

सैनिक, पोलिस, गुप्तहेर, सुरक्षा रक्षक, केमीस्ट, दंतवैद्य, शल्यविशारद, खाटीक, न्हावी, लोखंड, स्टील व्यापारी, स्वयंपाकी, वाफेची इंजीने, लाल रंगाच्या संबंधीत उद्योग, मशिनगन या धारदार हत्याराचे धंदे, भट्टी ई.

निर्मिती :

लोखड, स्टील, कॉफी, चहा, लाखेच्या कांड्या, तंबाखु, ताग, काजू, शेंगदाणे, आले, लसूण, ब्रांडी, व्हिस्की, अर्क, ताडी, भस्म, पावडर धातूचे ऑक्साईड, सुरी, तलवार, बंदूक, तांबे, जमीन, घरबांधणी, काटेरी झाडे ई.

वनस्पती :

काटेरी झाडे, लसुण, तंबाखु, लाल रंगाची फळे झाडे, वनस्पती

स्थळे – लढाईचे मैदान, सैनिक शाळा, पोलिस स्टेशन, खाटीकखाना, औद्योगिक विभाग, भट्ट्या, घरातले स्वयंपाक घर, गीझर, शौचकूप, चोरकप्पा

प्राणि :

वाघ, कोल्हा, शिकारी कुत्रे.

टीप : ज्योतिष अभ्यास करताना मंगळ त्याची रास मेष, वृश्चिक व 1 ले व ८ वे स्थान याबाबत एकत्रित तपशील जाणावा म्हणजे सखोल माहिती प्राप्त होईल.

मंगळाची रास कर्क मेष, वृश्चिक चे फळ जाणून घेण्यासाठी लिंक ओपन करा

१. मेष राशीफ़ळ ( Mesh Rashi Phal )

२. वृश्चिक राशीफ़ळ ( Vrushchik Rashiphal )

ज्योतिष मित्र मिलिंद (7058115947)

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क)

संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

12 thoughts on “ग्रह विचार : मंगळ (Mars)

  1. मंगळ (यास ग्रीस मध्ये Ares, इजिप्त मध्ये Horus, अंबारक कुंज संस्कृत मध्ये, सेव्बरे तामिळ मध्ये म्हटले जाते.) गुरू Zeus व त्याची पत्नी Hera चा पुत्र मानले जाते…

    माझ्या वाचनानुसार बुध ग्रहाला गुरुची (बृहस्पती) पत्नी तारा हिचा पुत्र मानले गेले आहे. अर्थात्, बुध हा गुरुची पत्नी तारा हिला चंद्रापासून (कुकर्माने) झालेला पुत्र आहे, अशीही ती दंतकथा आहे.

    Liked by 1 person

    1. चांगली दृष्टी की वाईट दृष्टी..हे कसे कळेल?

      Liked by 1 person

  2. खुप छान मार्गदर्शक माहीती मिळाली. मनापासून धन्यवाद .

    Liked by 1 person

    1. पारंपरिक ज्योतिष शास्त्रात मंगळ हा पाप ग्रह वा अशुभ ग्रह मानला गेला आहे.

      मंगळाचे अथवा कोणत्याही ग्रहाचे शुभ अशुभत्व ठरवताना तो ग्रह कोणत्या स्थानात, भावात, राशीत स्थित आहे. कोणत्या ग्रहाच्या युतीत वा दृष्टीत आहे. अशा सर्व बाबींचा विचार करून तो शुभ वा अनुकूल किंवा अशुभ वा पीडित आहे हे ठरवावे लागते. त्यांचा त्रिक स्थानाशी संबंध ही तपासावा लागतो. सूक्ष्म फळात नक्षत्र ही निर्णायक ठरू शकतो. या सर्वासाठी जाणकार ज्योतिषी अथवा अखंड अभ्यासाची गरज असते. आपल्या साठी काही माहिती थोडक्यात देतो.

      मंगळाला चवथी, सातवी आणि आठवी दृष्टी असते. १, ४, ७, ८ अथवा १२ व्या स्थानी मंगळ स्व राशिचा अथवा उच्च राशिचा मंगळ असेल तर तो अपवादात्मक ठरतो.

      कर्क, सिंह राशीना मंगळ राजयोगकारक ग्रह ठरतो. त्यामुळे कर्क अथवा सिंह लग्नाच्या कुंडलीत मंगळ राजयोगकारक ग्रह ठरतो.

      मंगळास अनुकूल भाव : तृतीय, षष्ठ, दशम, एकादश.

      मंगळास प्रतिकूल भाव : द्वितीय, अष्टम, द्वादश

      मंगळास बाधक स्थान : सप्तम स्थान

      मंगळास अनुकूल राशी : मेष, वृषभ, कर्क, वृश्चिक, धनु, मकर व मीन

      मंगळास प्रतिकुल राशी : मिथुन, कन्या, तुला व कुंभ

      मंगळाचे मित्र ग्रह : रवि, चंद्र, गुरू, प्लुटो ( रुद्र )

      मंगळाचे शत्रु ग्रह: बुध, हर्षल ( प्रजापती )

      मंगळाचे सम ग्रह : शुक्र व शनि, नेपच्यून ( वरुण )

      मंगळाची उच्च राशी : मकर उच्चांश २८ अंश

      मंगळाची नीच राशी : कर्क, नीचांश २८ अंश

      ज्योतिष मित्र मिलिंद

      Like

      1. Jyotish Mitra Milind मंगळ प्रतिकूल भावात पण अनुकूल राशीत असेल तर तो शुभ धरायचा की अशुभ?

        Liked by 1 person

  3. Mrunal Patwardhan मंगळ प्रतिकूल भावात पण अनुकूल राशीत असेल तरी तो अशुभ मानावा लागेल.

    Like

    1. ok.
      असं detailed विश्लेषण प्रत्येक ग्रहाच देऊ शकाल का?

      Liked by 1 person

      1. Mrunal Patwardhan Inamdar हो नक्कीच, फक्त थोडा वेळ काढावा लागेल, सर्व लिहिण्यास. या आधी रवी, चंद्र यांची माहिती दिलेली आहे, इतर ही ग्रहांची देईन.

        Like

Leave a reply to Astro R. Narvekar Cancel reply