
सूर्य :
खगोल शास्त्र :
सूर्य जो सूर्यमालेचा जनक ज्याला नक्षत्राचे वडिल ही म्हटले जाते. हा पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा आहे व पृथ्वीपासून 9 करोह 30 लाख मैल दूर आहे. सूर्यमाले मध्ये स्थित सर्व ग्रहाहून मोठा आहे, जर सर्व ग्रहांना एकत्र केले तरी त्याचे हून 750 वेळा मोठा आहे, याचा व्यास पृथ्वीचा व्यासापेक्षा 110 वेळा मोठा आहे. याची परिघ 27,19,000 मैल आहे. वैज्ञानिकाचे असे म्हणणे आहे की हा विभिन्न आवरण असलेला गैस राशिचा पिंड आहे जो सकारात्मक चुम्बकीय किरणाचे प्रसारण करतो. ज्याचे मुळे उष्णता व प्रकाश दोन्हीचा विकास होतो. हे किरण अश्या प्रकारे सूर्यमालेतील अन्य ग्रहाना पण प्रभावित करतात, मात्र घनत्व विभिन्न असते ज्याचे वर अनेक तत्व निर्भर करितात.
पौराणिक :
जीवन शक्ति व उर्जा चे केन्द्र असल्यामुळे व प्राणदाता असल्यामुळे सूर्याची पूजा सूर्य देवता म्हणून करितात, याचा पुष्कष्ठ सन्मान केला जातो, हिन्दू द्वारे याची प्रार्थना केली जाते. अनेक व्यक्तिद्वारे सूर्य नमस्कार घातले जातात. अन्य देश पण सूर्याला नमस्कार करितात. याला नियमक ब्रम्हाचा प्रतिनिधि म्हटले जाते व चतुर्मुखी द्वारा चारी दिशांना दृष्टिपात केले जाते, ज्यामध्ये चार ऋतु व चार तत्व ज्याचे नाव – अग्नि, पृथ्वी, वायु व जल उत्पन्न करितात. रविवारला आठवड्यामधील सवात प्रथम वार मानतात. पश्चिमी लोक सूयास अपोलो म्हणतात. ज्यूपिटर व लैटीनाचा पुत्र मानतात. अपोलो डायनाचा माऊ आहे. त्याची ग्रीक निवासी द्वारे पूजा केली जाते. राजहंस व कावळा हे अपोलो चे पक्षी आहेत.
हिन्दू विचारधारा आहे की सूर्य नेहमी सात घोड्यांचा रथामध्ये बसून भ्रमण करतो, हे संभविता एवढ्या साठी की सौर्विक किरणाचे सर्व सात रंग सूर्यामध्ये आहेत. ते म्हणतात की सूर्य प्रतिदिवशी पर्वताच्या आसपास चक्कर लावतो. जेव्हा सूर्य काही निश्चित राशि मध्ये प्रवेश करतो. तेव्हा हिन्दू लोक ज्या दिवसामध्ये शांति करिता काही धार्मिक कार्य करतात व सूर्य देवाची प्रार्थना करितात.
त्याचे मध्ये एक उत्सव अश्या वेळी होती जेव्हा सूर्य स्थिर वसंत संपात पार करतो व राशि मध्ये प्रवेश करतो म्हणजे उत्तरी धृवाचे लोक सहा महिन्याचा दीर्घं रात्रि नन्तर त्याला पाहतात. याला ‘विशु’ या तामिळ नूतन वर्षांचा दिवस मानतात.
दूसरा उत्सव 17 जुलै अथवा आसपास होतो, जेव्हा सूर्य घर उत्तर घुमावाकडे पोहचतो. आकाशीय विष्णुक्त पासून 239-27 कला विकला चा दक्षिणी अयन मार्ग प्रारंभ म्हणतात. याला दक्षिणायन म्हणतात, पुढचा उत्सव ज्या वेळी होती जेव्हा सूर्य साचे दक्षिण मार्गामध्ये शरद संपात बिन्दुवर पोहचतात जो तुला राशिचा प्रारंभ आहे. तीन महिन्यानंतर जेव्हा सूर्य दक्षिणमध्ये एकदम दक्षिण ध्रुवावर पोहचतो व ठीक जेव्हा उत्तरी भागाकडे वाढण्यास प्रारंभ करतो, सर्व हिन्दू, सर्व जातिचे लोक, त्या दिवशी पर्व मानतात, याला मकर संक्राति म्हणतात. अश्या प्रकारे सूर्य हिन्दूचा देवतामध्ये फार महत्वपूर्ण स्थान ठेवतो. महान ज्योतिषी वराहमिहीर फक्त सूर्य देवताची पूजा करीत असे व तो राजा विक्रमाच्या दरबाराच्या नउन रत्नामधील एक अद्वितीय चमकदार रत्न होता.
सूर्य क्रांतीवृत च्या आसपास भ्रमण करण्यास ठीक एक वर्ष लागते. सूर्य फक्त सरळ गति ठेवतो, व कधी वक्री नसतो. सूर्याचा काही अक्षांश नसतो. सूर्य आमच्या करिता एक उत्साहाचे चिन्ह आहे, हिन्दूचा विचार आहे की सूर्य, काल पुरुषाचा आत्मा आहे. चन्द्रमा, त्याचे मन, बुध त्याची वाणी, अथवा मंगव्ठ त्याची शक्ति, गुरु ज्ञान व प्रसन्नता आहे, शुक्र त्याची इच्छा व वासना आहे. शनि त्याचे कष्ट आहेत इ. हे म्हटले जाते की काल पुरुषाचे अनेक अंग, त्याचे प्रदर्शन, ग्रहांच्या अनुसार बली, अथवा निर्बल असतात. फक्त शनिला सोडून दिले जाते जेव्हा कधी शनि कमजोर असतो तो दुःख देईल व ते प्रधान असतील परन्तु जर शनि बलवान असेल तर कष्ट कमी होतील, हे सर्व फळ त्या ग्रहाच्या अंतरदशेमध्ये अनुभव होतील,
सर्व जीवधारी करिता सूर्य, सकारात्मक व मौलिक उद्गम आहे, जेव्हा की चन्द्र नकारात्मक प्रभाव टाकतो. सूर्य रचनात्मक व क्रियाशील आहे जेव्हा की चन्द्र रक्षात्मक व निर्णयात्मक आहे. सूर्य पिता आहे व चन्द्र माता म्हणून सूर्य आत्मा या जीवाचे प्रतीक व चन्द्रमा पदार्थाचे. दोन्ही जीवन व आकृति सारखे काय करितात, हेच कारण आहे की 12 राशिना विभाजित केल्या जातात त्याचा राशिक्रम सकारात्मक व नकारात्मक आहे अथवा पुरुष राशि व स्त्री राशी जाहे.
सूर्य व चन्द्र सर्व प्रभुत्व संपन्न सम्राट आहे जेव्हा की गुरु व शुक्र अथवा मंत्री आहे, बुध प्रवक्ता आहे. मंगव्ठ सेनापति व शनि गुलाम अथवा सेवक, सूर्य राजा आहे व चन्द्र वाणी.
सूर्याची नावे : आदित्य, अर्क, अरुण, मानु, दिनकर जथवा दिनक्त, हैणी, पुण, रवि व तनय.
सूर्याचा प्रभाव :
सूर्य व चन्द्र दोन प्रकाशचे पुंज आहेत. कारण हे दोन्ही प्रकाश फेकतात व प्रत्येक वस्तुला प्रकाशित करतात, सूयाची आकृति गहन लाल रंगाच्या डोळ्या सारखी आहे व हे समजुन घ्या की सूर्य उत्साहवर्द्धक आहे व हा एक असा ग्रह जाहे जो एखाद्यास जीवन प्रदान करतो, सूर्य आम्हाला अवरोध क्षमता व चेतना देतो. हा श्वास प्रश्वास, अर्थात जीवनाच्या श्वासास नियमित करतो. हा आमचा चेतनाचा अधिष्ठाता आहे व व्यक्तित्व दर्शवितो.
जेव्हा की चन्द्रमा बनावट व चरित्र अधिष्ठाता दर्शवितो. सूर्य शक्ति व आत्मबळ देतो व एखादे व्यक्तिस निश्चय करणारा व निर्णय वाला दर्शवितो. सूर्य शुष्क, पुरुष, क्रियाशील व गरम ग्रह आहे. तो अग्नि देवता आहे व त्याचा स्वभाव पण गरम आहे, तो पूर्व दिशेकडे (सहा ऋतुमध्ये) ग्रीष्म ऋतु जो जून व जुलै मध्ये असतो वा अधिपति आहे. सूर्याचा रंग सोनेरी अथवा कनक अम्बरम आहे, हा स्वर्ण व तांबा धातुचा अधिपति आहे.
सूर्य जातकाचा वडिलांना दर्शित करतो. स्त्रीचा कुंडलीमध्ये हा तिचे पतीस, नोकराच्या कुंडलीमध्ये हा मालकास, प्रधान प्रशासक या शासनाला दर्शवतो. सेनेमध्ये हा कैप्टन, व लीडर दर्शवतो.
सूर्य जातक विशेषता :
जेव्हा सूर्य पिडीत नसेल परन्तु बळी व लाभदायक असेल तर तो खरा प्रामाणिक गुण देतो. हा प्रत्येक व्यक्ति व प्रत्येक वस्तु प्रति वास्तविक प्रेम देतो. हा विश्वप्रेमाकडे प्रवृत करतो. ईश्वरा प्रति विश्वसनीय व दृढ भक्त असेल. या मध्ये उत्साह व अंतर ज्ञान असेल, क्रियाशीलता व अधिकार पूर्णता हे लाभदायक फळ आहे, दृढ़ता, स्थिरता व व्यवसाय मध्ये स्थायित्व, सूयांच्या मुळे च येते, हा जातकास स्वतःची कमाई दर्शवातो, कोणतीही व्यक्ति आपले प्राप्ति करिता कठोर परिश्रम, पर्वतावर जाणे, यात्रा करणे, सर्व अडचणी वहन करण्यामध्ये तत्पर असतो. अधिक परिश्रम व कमी मजूरी सूर्य द्वारा दर्शित होते, अनुकूल राशि मध्ये बलवान सूर्य महान आत्मशक्ति देतो. जातकाचे जीवनाचे प्रति आनंददायक दृष्टिकोण राहील व भाग्य सुख प्राप्त होईल, त्याला अधिक स्पष्टवक्त होणे जरुरी नाही, त्याला सावधानी व गोपनीयता ठेवावयास पाहिजे, सूर्यस्तरा पेक्षा अधिक वर येण्याची शक्ति देतो. तो आकर्षणशक्ति व महत्वा कामा स प्रदान करतो. सूर्याचे व्यक्ति अधिक परिश्रमी असतात.
यांनी दुस-यावर अधिकार करण्याच्या वृत्तीचा त्याग करावयास पाहिजे. त्यानी अत्याधिक महत्वाकांक्षी होउ नये व त्यांना असंतोष व अप्रसन्नता अनुभव करावयास पाहिजे, ज्या व्यक्तिंना सूर्य बली असेल व जर त्यांना कोणापासून सहायता प्राप्त हवी असेल तर त्यांनी स्वत: स जपावयास हवे, कोणी सहायक अथवा एजन्टला पाठवावयास नको. कारण त्याचे जोडीस सूर्याची चुंबकीय केन्द्री शक्ति रहाते व ज्या व्यक्तिशी सहायता प्राप्त करावयास हवी तर मागणी स्वीकार करण्यापासून नाही म्हणू शकतो, आत्मनियंत्रण व महत्वाकांक्षा सीमित करण्यामध्ये अभ्यासद्वारे, जनता द्वारे व अधिकार सम्पन्न व्यक्ति द्वारे शुभेच्छा व सन्मान प्राप्त करेल. अश्या प्रकारे उच्च शासकीय अधिकारी जीवनाचा आनंद प्राप्त करू शकतो व लोकांची शुभकामना वर्जित करू शकतो.
लाभदायक सूर्य, महत्वाकांक्षा, दृढता, बुद्धिमानी, अधिकारक्षमता, मान सन्मान, दर्जा, सर्वोच्च श्रेणी, विश्वास, प्रसिद्धी, कीर्ति, उदारता, स्वास्थ्य, आशा, प्रसन्नता, व्यक्तित्व, प्रभाव, आनन्द, दयाळु स्वभाव, सम्राटतुल्य, दिखावट, ईमानदारी, महान उदारता, योग्यता, आशावादिता, शक्ति, प्रामाणिक्ताचा गुण, मोठ्यांचा प्रति मान, प्रसिद्धी, वैभव, राजकीयता, सचैत, सांसारिक मामल्या मध्यै सफलता, सत्यता, चांगला स्वभाव, शुद्ध प्रेम, चेतना, बल, गुण व उत्साह दर्शवतो.
पीड़ित सूर्य जातकास अहंकारी, कर्कश, अत्याचारी, अर्थवादी, अविश्वसनीय, खोटी कीर्तिवाला, अभिमानी, अपमानित, द्वेषयुक्त, व्यर्थ खर्चिक, अत्यन्त महत्वाकांक्षी, शौकीन, घमंडी, स्वत:चे विचार मानणारा, चिड़चिड़ा, क्रोधी व द्वेणी बनतो.
शारीरिक आकृती :
ज्या लोकांचा प्रमुख ग्रह सूर्य आहे तर त्यांचा जन्म रविवारी होती या सिंह लग्नामध्ये होतो या सूर्य लग्ना मध्ये असताना होती. तर जातकाचे ओठ मधाच्या रंगाचे असतात, चेहरा मोठा व गोल असतो, केस व शरीराचा रंग चमकदार असतो.
संक्षिप्त माहिती :
अधिपत्य :
आत्मा, तेज, अग्नी, दृष्टी, हृदय, आत्मबल, प्रतीकारक शक्ती, आत्मिक संवेदना, इच्छाशक्ती, पुर्व दिशा, ऑरेंज रंग, सोने, तांबे, वडील (स्त्रीयांच्या बाबतीत पती) अधिकार, अधिकारी, सरकार, कप्तान, नेतृत्व, पुढारी.
शरीराचे भाग :
हृदय, उजवा डोळा, (स्त्रीयाचा डावाडोळा) तोंड (स्लीन) पसा, मेंदू
रोग :
हृदय, विकार, दृष्टी दोष, नेत्र विकार, रक्तदाब, मेंदूतील रक्तस्त्राव, उष्णतेचे विकार, मेंदूचे रोग, विषमज्वर, उष्मा घात, उष्णतेचे विकार, पोटाचे आजार, पित्त विकार, डोक्याचे आजार, तीव्र ताप, ई.
गुणतत्व :
शुध्द प्रेम, ईश्वराप्रती भक्ती, सात्विकता, नवनिर्मिती, अधिकार वृत्ती, जीवनाकडे आनंदी वृत्तीने पहाणे, इच्छाशक्ती, सतत कार्य मस्त, पहाडी, चातुर्य, मृदू हृदयी, विश्वासु, दिमाख, मान-सन्मान, आरोग्य, नेतृत्वगुण ई.
व्यवसाय :
सरकारी नोकर, प्रशासक, रक्षक, वैयक्तीक धंदा, वडीलोपार्जित धंदा, नारंगी रंगाच्या वस्तु, तांबे, सोने, गहु औषधे, रसायने इ. घंदे, वैद्यकीय सेवा, हॉस्पिटल ई.
निर्मिती :
औषधे, तांदूळ, शेंगदाणे, नारळ, मिरची, बदामी, वेलची, पाईन, परदेशीचलन, नोटा, काटेरी झाडे, संत्री, गुलाब, ई.
स्थळे :
किल्ले, डोंगर, शीव मंदीर, शासकीय इमारती, सार्वजनिक कार्यालये, युनीयन, (सौराष्ट्र जिल्हा)
प्राणी, पक्षी व वनचर :
सिंह, घोडे, गाई-गुरे, हिंस्त्र प्राणि, गाणारे पक्षी, हंस, औषधी वनस्पती.
टीप : ज्योतिष अभ्यास करताना सूर्य त्याची रास सिंह व ५ वे याबाबत एकत्रित तपशील जाणावा म्हणजे सखोल माहिती प्राप्त होईल.
सूर्याची रास सिंह (Leo) चे फळ जाणून घेण्यासाठी लिंक ओपन करा
ज्योतिष मित्र मिलिंद (7058115947)
ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in
One thought on “ग्रह विचार : सूर्य (Sun)”