
विशोत्तरी दशा पद्धती : एक केस स्टडी (विवाह)
नमस्कार
इतक्यात माझा एक लेख (विशोत्तरी दशा पद्धती : आयुष्यातील चढ उतार जाणून घ्यायचे एक गणिती तंत्र) प्रकाशित झाला. आपण सर्वांनी त्यास चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभार. इंदुमती ताई व इतरांनी एखादी केस स्टडी मांडलीत तर जास्त सोपे होईल अशी अपेक्षा केल्याने हा एक सोपे उदाहरण समोर ठेवत आहे. पण प्रत्येक कुंडली ही वेगळी असल्याने दशेबरोबर बाकीचे ही घटक निर्णायक ठरू शकतात. एखादा जाणकार ज्योतिषी योग्य मूल्यमापन करू शकतो.
आपला विषय विशोत्तरी दशा पद्धती हा डोळ्या समोर ठेवून हा लेख लिहित आहे.
माझे एक स्नेही श्री.विजय (नाव बदलले आहे) जूलै २०१९ च्या दुसऱ्या आठवड्यात माझेकडे आले व गंभीर चेहऱ्याने काही न बोलता बसून राहिले. थोडा वेळ मध्ये जाऊ दिल्यावर येण्याचे प्रयोजन विचारले असता म्हणाले की सध्या मी माझ्या मुली बाबत विचार करत आहे. ती हल्ली घरात जास्त बोलत नाही. घरी यायला उशीर करतेय. सतत फोन वर काही न काही करत असते. त्यामुळे काळजी वाटतेय. त्याला समजावले की आजच्या पिढीची ही सामान्य लक्षणे आहेत. तरी आपण कुंडली तील तिच्या दशा तपासू व त्याप्रमाणे तिची जन्म कुंडली मांडली.
कुमारी …………………..
जन्म तारीख ३१ जुलै २००१ सायंकाळी ५ वा. ३० मि. पुणे येथील जन्म
धनु लग्नाची ही जन्म पत्रिका. लग्न स्थानी चंद्र व केतू ६व्या स्थानात असला तरी शनी पंचम भावात, सप्तमात राहू, शुक्र, गुरु. अष्टमात रवी व बुध आणि व्यय स्थानात मंगळ अशी ग्रह स्थिती.
तेव्हाच्या दशा बघितली तेव्हा १८ जुलै २०१९ ते ०१ नोव्हेंबर २०१९ या काळासाठी तिची शुक्र महादशा गुरु अंतर्दशा व राहू विदशा व शनी सुक्ष्म दशा होती.
नुसते कुंडली कडे नजर टाकली तरी लक्षात येईल की…
वैवाहिक सौख्याचा कारक व ६ वे व ११ वे स्थानाचा अधिपती शुक्र भार्या स्थानी (७ वे स्थान) आहे ज्याची महादशा चालू आहे.
१ ले व ४ थे (सुख) स्थानाचा अधिपती गुरु सुद्धा भार्या स्थानी (७ वे स्थान) आहे ज्याची अंतर्दशा चालू आहे.
राहू ला राशी नसते पण येथे राहू व गुरु राहूच्या नक्षत्रात युतीत आहे जो भार्या स्थानी (७ वे स्थान) आहे ज्याची विदशा चालू आहे.
शुक्र मंगळाच्या नक्षत्रात असून मंगल ५ वे १२ भावाचा अधिपती आहे.
राहू विवाहात वैचित्र्य व ५ वे स्थान प्रेम व मंगळ आकर्षण दाखवतो.
शनी ६व्या स्थानात असला तरी शनी पंचम भावात असून २ रे (कुटुंब) स्थान चा अधिपती आहे.
वरील वर्णना वरून एका दृष्टीक्षेपात जाणकार ज्योतिषाच्या लक्षात येईल की विवाह योग असून प्रेम विवाहाची शक्यता आहे.
त्यामुळे तिच्या वडिलांची चिंता निराधार नव्हती. तसे त्याप्रमाणे त्यांस कल्पना देऊन सावध व शांत राहण्यास सांगितले.
इतरही अनेक गोष्टींची चर्चा केली परंतु तो या लेखाचा विषय नसल्याने तसेच गुप्ततेच्या कारणास्तव येथे देणे अप्रस्तुत ठरेल.
ही मुलगी ७ ऑगस्ट २०१९ रोजी ट्युशन क्लास ला जाते सांगून सकाळी घरातून निघाली व लग्न केले. आधी कल्पना असून सुद्धा तिच्या घरी व्हायचा तो गदारोळ व विरोध हा झालाच. तरी समाधानाची गोष्ट म्हणजे मुलगा चांगला असल्याने नंतर त्यास स्वीकारले गेले व दोघे आनंदात सहजीवन व्यतीत करत आहेत.
तर विशोत्तरी दशा पद्धती : आयुष्यातील चढ उतार जाणून घ्यायचे एक गणिती तंत्र घटनेविषयी भविष्य कथन करताना सहाय्यभूत ठरले.
ज्योतिष मित्र मिलिंद (7058115947)
ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in
Dhanyawad…sir
LikeLiked by 1 person
Super study….👍
LikeLiked by 1 person