Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह) : एक केस स्टडी (सोन्याचे इअरिंग्ज परत मिळाले)


Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह) : एक केस स्टडी (सोन्याचे इअरिंग्ज परत मिळाले)

Rulling Planets ( तात्कालिक कार्येश ग्रह ) हा माझा लेख प्रकाशित झाल्यावर अतुल बर्वे व इतर काही जणांनी एखादी प्रश्न कुंडली सादर केल्यास विषय चांगला समजेल असे कळवले हेच हा लेख लिहिण्याचे प्रयोजन.

२६ सप्टेंबर २०२१ रोजी अचानक ध्यानी मनी नसताना अचानक…… या व्यक्तीने मला संपर्क केला व मदत मागितली. घडले असे होते ती व्यक्ती सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान पुण्याहून अलिबाग ला कार ने निघाली व साधारण ३ वाजता पोहोचली तेव्हा लक्षात आले कि तिच्या कानातले सोन्याचे ईअरिंग्ज हरवले आहेत आणि सापडत नाहीत. आणि कोणाला न सांगता एकतर बाहेर गावी जाण्याचा उद्योग आणि त्यात हे नवे संकट समोर. त्यामुळे आमची आठवण आली.

त्यामुळे लागलीच ठोकळा प्रश्न कुंडली मांडली.

हरवलेली वस्तू परत कधी मिळेल ?

प्रश्न कुंडली वेळ : दि.२६ सप्टेंबर, २०२१ दु. ३ वा.३५ मि. स्थळ पुणे.

प्रश्न कालीन Rulling Planets ( तात्कालिक कार्येश ग्रह ) खालील प्रमाणे

लग्न मकर स्वामी : शनी

चंद्र नक्षत्र स्वामी : चंद्र

चंद्र राशी स्वामी : शुक्र

दिन स्वामी : रवि

विश्लेषण : प्रश्न समयी मकर लग्न असून लग्न स्वामी शनी व गुरु लग्न स्थानी. धन स्थान चे मागील स्थान धनाचा व्यय दाखवते. त्यामुळे शनी ईअरिंग्ज चे हरवणे दाखवतो. गुरु शनी बरोबर लग्नस्थानी व ३ रे व १२ वे स्थानाचा स्वामी जो प्रवासातील सोन्याचा व्यय दाखवतो.

चंद्र नक्षत्र स्वामी चंद्र ५ वे स्थानात फसव्या राहू बरोबर असून ७ वे स्थानाचा मालक आहे जो प्रतिस्पर्ध्याचा लाभ दर्शवतो.

राशी स्वामी शुक्र आहे जो दशम स्थानात म्हणजे लाभ स्थानाच्या व्ययात आहे म्हणून लाभ हानी दाखवतो.

दिन स्वामी रवि आहे जो ९ वे स्थानात असून अष्टमेश आहे जो प्रवासातील नुकसान दर्शवतो.

आता हेच Rulling Planets ( तात्कालिक कार्येश ग्रह ) पुनर्प्राप्तीच्या २ व ११ वे स्थानाशी संबंधित असतील तेव्हा वस्तू परत मिळेल. तर अशी स्थिती शोधून मि २७ तारखेला दुपारी १२ ते ३ वा.दरम्यान शोध घेतला असता सापडेल असे सांगितले. सोबत लग्न स्वामी शनी विचारात घेता कार ड्रायव्हर मध्यम वयीन आथवा वृद्ध असेल व शनी चामडे चा कारक असल्याने तुमच्या पर्समध्ये वा लेदर सीट पाशी शोध घ्या सांगितले. त्याप्रमाणे २७ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता कानातले सोन्याचे इअरिंग्ज सीट कव्हरच्या फटीत सापडले.

आता वस्तू परत मिळाली ती कुंडली वेळ तपासा : दि.२७ सप्टेंबर, २०२१ दु. १२ वा.३५ मि. स्थळ पुणे.

वस्तू प्राप्तीचे Rulling Planets ( तात्कालिक कार्येश ग्रह ) खालील प्रमाणे

लग्न धनु स्वामी : गुरु (शनी बरोबर मकर राशीत)

चंद्र नक्षत्र स्वामी : चंद्र

चंद्र राशी स्वामी : शुक्र

दिन स्वामी : चंद्र

विश्लेषण : धनु लग्न असून लग्न स्वामी गुरु व शनी धनस्थानी (२ रे स्थानात) मकर राशीत जी सोन्याच्या वस्तूचा लाभ दाखवते.

चंद्र नक्षत्र स्वामी चंद्र ६ वे स्थानात फसव्या राहू बरोबर असून जो ८ वे स्थानाचा मालक आहे जो प्रतिस्पर्ध्याचा व्यय दर्शवतो.

राशी स्वामी शुक्र आहे जो लाभ स्थानात असून म्हणजे ६ व ११ वे स्थानाचा अधिपती आहे म्हणून जातकाचा लाभ लाभ व प्रतिस्पर्ध्याची हानी दाखवतो.

दिन स्वामी चंद्र चे फळ वर आलेच आहे.

या वरून लक्षात येईल कि केवळ Rulling Planets ( तात्कालिक कार्येश ग्रह ) चा वापर करून व ठोकळा कुंडलीचा योग्य तार्किक व कल्पक वापर करून व थोडी कारकत्वाची मदत घेऊन किती सहजपणे प्रश्न सोडवता आला. (एक गोष्ट अनुभवाने सांगावी वाटते ती म्हणजे जेव्हा प्रश्न् कर्त्याची कळकळ वा भाव प्रामाणिक असेल तेव्हा योग्य वेळ साधली जाते. उठला सुटल्या तुम्ही प्रश्न कुंडली मांडत बसलात तर हे दैवी मार्गदर्शन फळ देणार नाही. यात लग्न स्वामी २ तासांचाच स्वामी असल्याने तो महत्वाचा ठरतो.

अर्थात हे एक उदाहरण Rulling Planets ( तात्कालिक कार्येश ग्रह ) चा उपयोग समजण्यासाठी सोपे करून सांगितले आहे. या पद्धतीत ही अनेक घटक व नियम आहेत ज्याचा व कुंडली अभ्यासाचा  योग्य वापर तुम्हास नक्कीच सहाय्यकारी ठरेल.

ज्योतिष मित्र मिलिंद ( ७०५८११५९४७ )

For any query or Astrological guidance (fees applicable)

Do contact on 7058115947 (whatsapp)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

6 thoughts on “Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह) : एक केस स्टडी (सोन्याचे इअरिंग्ज परत मिळाले)

  1. पारंपरिक पद्धतीने सुध्दा हरवलेल्या वस्तू माणसं सापडवून देता येतात . मी अनेकांना असं सापडवून दिले आहे. प्रश्न कुंडली बघता यावी लागते

    Liked by 1 person

    1. Urmila Pandit मी सहमत आहे. माननीय व.दा. भट यांचे या विषयवरील संपूर्ण प्रश्न शास्त्र हे पुस्तक व त्यातील
      प्रश्न कुंडली – तंत्र आणि मंत्र
      षटपंचाशिका
      प्रश्नतंत्र
      दैवज्ञवल्लभ
      प्रश्नवैष्णव
      हे topic मनापासून व सखोल अभ्यासण्या सारखे आहेत.

      अजून एक जुने प्रश्न भैरव हे एक पुस्तक आठवतेय.

      माझ्या मते सर्व पद्धतीचे मूळ पारंपरिक ज्योतिष शास्त्र हेच आहे.

      Like

Leave a comment