
तीळा तीळा दार उघड….
गालावरचा तीळ कसा खुलुन दिसतोय बघ…. तुझ्या हेतूबद्दल मला तीळ मात्र शंका नाही रे, पण जीव तीळ तीळ तुटतोय रे माझा…. तीळ गूळ घे आणि गोड बोल…. तीळा तीळा दार उघड….
तर असा हा तीळ सर्वांच्या उत्सुकतेचा कायमच विषय राहिला आहे. बर तीळ हा असा प्रकार आहे की तो शरीरावर कुठेही असू शकतो व आयुष्यभर जन्म खूण म्हणून साथ देत राहतो. याचाच भाऊ आहे तो म्हणजे मस आणि चामखीळ. वेगवेगळ्या आकारात, वेगवेगळ्या रंगात हे सर्व आस्तित्वात असतात. कधी सौंदर्य खुलवतात. तर कधी सौंदर्यात बाधा उत्पन्न करतात. अशा या भावंडांवर तीळ ज्योतिष, सामुद्रिक शास्त्रात विपूल प्रमाणात लेखन, संशोधन झाले आहे. आणि या अशा तीळाभोवती अनेक समज, श्रद्धा वा अंधश्रद्धा एकवटलेल्या आहेत. एवढासा दिसणारा तीळ पूर्वायुष्यातील कर्मांचे परिणाम स्वरुप या जन्मातील काही भोग सूचित करत असतात असे मानले जाते. तीळ ज्योतिष शास्त्रानुसार गर्भधारणेपासून जन्म होईपर्यंत ग्रहस्थितीनुसार तीळ आपली जागा पक्की करत असतात. जर प्रभाव टाकणारे ग्रह, रास ई. स्त्री लिंगी असतील तर शरीराच्या डाव्या बाजूला तीळ उत्पन्न होतात व पुरुष प्रधान असतील तर शरीराच्या उजव्या बाजूला तीळ उत्पन्न होतात. तर हे तीळ जातकाचे व्यक्तिमत्व, स्वभाव, कर्म, भाग्य विशिष्ट परिस्थिती, सवय अशा अनेक गोष्टी प्रगट करत असतात.
चला तर मग पाहू यात कोठे असलेला तीळ आपणांस माहितीचा खजिना खुला करण्यासाठी कोणते दार उघडतो ते…
तीळ तीळ गोळा करुन संग्रहित केलेले अर्थ येथे देत आहे…. तीळा तीळा दार उघड !!!
ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)
| अनु. क्र. | तीळ कोठे आहे | तीळाचा अर्थ |
| ०१ | कपाळाच्या मध्यभागी तीळ | शहाणा आणि शांत स्वभावाचा, स्पष्ट वक्ता, अंतर्दृष्टी प्राप्त, कष्टाळू |
| ०२ | कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ | श्रीमंती लाभेल, भाग्यवान व इतरांचे हीत पाहणारा |
| ०३ | कपाळाच्या डाव्या बाजूला तीळ | खडतर नशीब व स्वत:चे हीत पाहणारा |
| ०४ | कपाळाच्या दोन्ही बाजूला तीळ | आकस्मिक धन लाभ वा एखाद्या सुंदर कुंटुंबास प्राधान्य देणारा जोडीदार लाभेल |
| ०५ | भुवयांच्या मध्यभागी तीळ | नेतृत्व गुण संपंन्न व प्रसिद्धी, आर्थिक समृद्धीचा कारक |
| ०६ | भुवयांच्या डाव्या बाजूला तीळ | घाबरट व आयुष्यात, नोकरी व्यवसायात संघर्ष |
| ०७ | भुवयाच्या उजव्या बाजूला तीळ | सुखी वैवाहिक आयुष्य आणि निरोगी संतती |
| ०८ | उजव्या डोळ्यावर तीळ | प्रामाणिक, मेहनती, विश्वासू, सकारात्मक वृत्ती |
| ०९ | डाव्या डोळ्यावर तीळ | गर्विष्ठ, नकारात्मक वृत्ती |
| १० | नाकाच्या अग्रभागी तीळ | आवेशपूर्ण वागणे आणि बेधडक निर्णय घेण्याचा स्वभाव |
| ११ | नाकाच्या उजव्या बाजूला तीळ | कमी कष्टात जास्त धनप्राप्ती |
| १२ | नाकाच्या डाव्या बाजूला तीळ | कष्टाव्दारे धनप्राप्ती, संघर्ष |
| १३ | नाकाखाली तीळ | कामुकतेचे चुंबक, भिन्न लिंगी सहजपणे आकर्षित करणारे व्यक्तिमत्व. |
| १४ | डाव्या गालावर तीळ | अंतर्मुख, तर्कट स्वभावाची, धनप्राप्ती होऊनही धनसंचय करण्यात अडचण |
| १५ | उजव्या गालावर तीळ | वर्चस्व गाजवणारे व्यक्तिमत्व, तर्कशुद्ध मानसिकता, धनवृद्धी व योग्य विनिमय क्षमता |
| १६ | कानावर तीळ | शौकीन व विलासी राहणीमानाची आवड |
| १७ | कानाच्या शीर्षस्थानी तीळ | बौद्धिक क्षमता जास्त |
| १८ | ओठावर तीळ | वजन वाढ वा आरोग्यास हानिकारक खाण्याची अनियंत्रित सवय |
| १९ | खालच्या ओठावर तीळ | चवीची जाण व चवीने खाणारा |
| २० | जिभेवर तीळ | आरोग्य आणि भाषणाशी संबंधित समस्या, शिक्षणात अडचणी |
| २१ | जिभेच्या टोकावरील तीळ | मुत्सद्दी स्वभावाचा, परिस्थिती हाताळायची कला, व चवीची उत्तम जाण |
| २२ | हनुवटीवर तीळ | प्रवासाची व नवनवीन ठिकाणे भेटीची आवड |
| २३ | हनुवटीच्या उजव्या बाजूला तीळ | मुत्सद्दी स्वभावाचा, विषयाची तर्कशूद्ध मांडणी करण्यात तरबेज |
| २४ | हनुवटीच्या डाव्या बाजूला तीळ | गुळमुळीत स्वभाव पण प्रामाणिक |
| २५ | मानेच्या पुढच्या बाजूला | नशीबवान, शांत आणि कलात्मक आवाज |
| २६ | मानेच्या पाठीमागील बाजूला तीळ | स्वभावात आक्रमकता |
| २७ | डाव्या खांद्यावर तीळ | हट्टी स्वभाव व भांडखोर |
| २८ | उजव्या खांद्यावर तीळ | धैर्यवान, समंजस आणि शहाणा |
| २९ | डाव्या हातावर तीळ | विलासी जीवन जगण्याची इच्छा |
| ३० | कोपरावरील तीळ | अस्थिर, चंचल स्वभाव, कलानिपून, श्रीमंत आणि प्रवास करायची आवड |
| ३१ | मनगटावर तीळ | नाविन्यपूर्ण गोष्टी करणारा, सर्जनशील, चित्रकला किंवा लेखन कौशल्य |
| ३२ | तळ हातावर तीळ | संघर्ष, आव्हाने यांचा सामना |
| ३३ | हाताच्या बोटावर तीळ | अविश्वासू, अतिशयोक्ती पूर्ण |
| ३४ | बरगडीच्या उजव्या बाजूला तीळ | पडून इजा, मनात भीती |
| ३५ | बरगडीच्या डाव्या बाजूला तीळ | साधारण आयुष्य जगेल |
| ३६ | पाठीच्या कण्याजवळ तीळ | यश, नेतृत्व आणि प्रसिद्धी |
| ३७ | खांद्याच्या कुर्ची खाली तीळ | सतत चा संघर्ष |
| ३८ | खांद्याच्या कुर्ची वर तीळ | अडचणींचा सामना करण्याचे धैर्य |
| ३९ | खांद्याच्या उजव्या बाजूला तीळ | उत्तम आरोग्य |
| ४० | खांद्याच्या डाव्या बाजूला तीळ | मुत्सद्दी |
| ४१ | छातीवर तीळ | कामुक वृत्ती |
| ४२ | स्त्री च्या उजव्या स्तनावरील तीळ | व्यसनाकडे कल |
| ४३ | पुरुषाच्या छातीच्या उजव्या बाजूला तीळ | आर्थिक अडचणी |
| ४४ | छातीच्या डाव्या बाजूला तीळ | हुशार पण मित्र व कुटुंबीयांशी संबंध जोपासण्यात कमी |
| ४५ | स्त्री च्या डाव्या स्तनावरील तीळ | शांत स्वभाव, मित्र व कुटुंबीयांशी चांगले संबंध |
| ४६ | स्त्रीच्या नाभीभोवती तीळ | आनंदी वैवाहिक आयुष्य व संतती सौख्य |
| ४७ | पुरुषाच्या नाभीच्या डाव्या बाजूला तीळ | समृद्धी, प्रसिद्ध संतती |
| ४८ | पोटावर तीळ | उत्साही |
| ४९ | पोटावर उजव्या बाजूला तीळ | इर्षा, सोप्या मार्गाने कमाई, |
| ५० | दोन्ही नितंबांवर तीळ | आनंदी, प्रेमळ स्वभाव, निष्ठावान |
| ५१ | उजव्या नितंबांवर तीळ | शहाणा व सर्जनशील |
| ५२ | डाव्या नितंबांवर तीळ | अल्प समाधानी |
| ५३ | जननेंद्रियावर तीळ | खुले मन, उदार, प्रामाणिक, समाधानी, आनंदी वैवाहिक सुख |
| ५४ | उजव्या मांडीवर तीळ | निर्भयी |
| ५५ | डाव्या मांडीवर तीळ | कलात्मक पण आळशी व असामाजिक |
| ५६ | डाव्या गुडघ्यावर तीळ | धोका पत्करायचा स्वभाव, उच्च जीवन शैलीची आवड |
| ५७ | उजव्या गुडघ्यावर तीळ | प्रामाणिक, मित्रता व यशस्वी प्रेम जीवन |
| ५८ | उजव्या पोटरी वर तीळ | यशस्वी आणि समृद्ध राजकारणाची आवड |
| ५९ | डाव्या पोटरी वर तीळ | मेहनती, नोकरी व्यवसाय निमित्त प्रवास मोठा मित्र परिवार |
| ६० | पायावर तीळ | बेधडक कृती |
| ६१ | उजव्या पायावर तीळ | योग्य जोडीदार व कौटुंबिक सुख प्राप्त |
| ६२ | डाव्या पायावर तीळ | आर्थिक वा कौटुंबिक समस्यांचा सामना |
| ६३ | उजव्या घोट्यावर तीळ | दूरदृष्टी, बोलकी |
| ६४ | डाव्या घोट्यावर तीळ | धार्मिक श्रद्धाळू |
| ६५ | तळव्या वर तीळ | आजारपण, गुप्त शत्रू. |
| ६६ | पायाच्या बोटांवर तीळ | वैवाहिक वाद |
टीप : फ़क्त तीळ पाहून प्रगतीला खीळ घालू नका. योग्य प्रगती मार्गासाठी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्या.
ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)
👌👌👍👍
LikeLiked by 1 person
👌🏻chan mahiti
LikeLiked by 1 person
सगळेच लेख अभ्यास पूर्वक आणि छान आहेत, मी सगळे वाचते
thanks for sharing
LikeLiked by 1 person
👍🏻👍🏻 nice
LikeLiked by 1 person
👍👍
LikeLiked by 1 person