
(12) मीन-
मीन ही राशी चक्रातील १२ वी राशी असून गुरु हा स्वामी आहे. या राशीमधे पूर्वा भाद्रपदाचा ४ था चरण, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती ही नक्षत्रे येतात. ही जल, थंड, व्दिस्वभाव, स्त्री, फ़लित, अभौतिक, भाऊक, व्दिपद, लघु उदीत राशी आहे. ही राशी द्याळू, मोक्षदायी, धर्मदायी, स्वर्गदायी व दानाची राशी पण म्ह्टली जाते.
या राशीत शुक्र उच्च व बुध नीच असतो. शनी निर्बळी नसून उलट शुभ असतो. सूर्य, मंगळ, चंद्राची मित्र राशी आहे. माझ्या मता प्रमाणे चंद्र या राशीचा पूर्ण लाभ घेऊ शकतो कारण भाग्येश चंद्र मीन मधे असेल तर नवपंचम योग होईल. मंगळ आपली राशी मेष चे फ़ळ कमजोर देईल कारण मेषेपासून मीन मधे मंगळ आपल्या व्ययस्थानी असेल. सिंह पासून रवी मीनमधे अष्ट्म स्थानी असलेने फ़ळ कमजोर करेल. हिंदू विव्दानांनी सांगितले आहे की गुरु शुक्र शत्रू आहेत. त्याचे तात्पर्य हेच की गुरु जातक व शुक्र जातकाचे गुण विभिन्न असतात. त्यांचे विचार, कार्य, राहणी, मित्र, समाज ई. सारखे नसतात. गुरु व शुक्रास अक्षरश: शत्रू मानावयास नको. गुरु जातक अध्यात्मिक जीवनाकडे वळवेल. तर शुक्र जातक आपल्या पशू प्रवृत्तींना संतुष्ट करतो. या जगातील प्राप्त भौतिक सुखाचा आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.
मीन राशीचे दुसरे स्वामीत्व नेपच्यून ला बहाल केले आहे. नेपच्युन ला समुद्र देवता मानतात, मीन १२ वी राशी असल्याने समुद्र पार विदेशी स्थानामधे जीवनक्रम दाखवते.
1. शारिरिक आकृती- मीन राशीचे लोक उंचीला कमी असतात. त्यांचे वजन बरे असते. हात व पाय लहान असतील. खांदे मांसल व गोलाकार असतील. डोके मोठे व पुढे आलेले असेल. केस नरम व रेशमी असतील.
2. विशेषता- मीन राशी जलराशी व गुरु स्वामी असल्याने दर्शन शास्त्र व प्रजनन दर्शवते. हे जातक दार्शनिक, आरामहीन, स्वप्नाळू, चिंतक, कल्पनाशील, रसिक असेल. जातक इमानदार, स्पष्टवक्ता, मदतगार व मानवीय असेल.
ही व्दिस्वभाव राशी आहे. तो कोणाच्या कष्टाचे कारण होणार नाही, पण कोणी बोलावले तर तत्काळ मदतीस धावून जाईल. मीन जातक शत्रूना शांत करु शकतो. त्याच्याशी नम्रतेने व्यवहार करेल व माफ़ करेल. तो दंभहीन असेल व अत्याधिक उदारता व अती दानशूरपणामुळे अधिक संचय करु शकत नाही. तो कमी महत्वाकांक्षी असू शकतो. अहिंसावादी असतो. कोणासही नुकसान करण्याचा विचार करत नाही. मीन जातक पैशापेक्षा आदर, आत्मसंमान या गोष्टींना जास्त प्राधान्य देतो. तर काही मीन जातक स्वत: इतरांना डोकेदुखी असते. त्यांचा स्वभावात एक प्रकारचा विक्षिप्तपणा असतो व कधी कधी हट्टी स्वभाव डोकावतो. एरवी स्वभावाने मृदू व समाजाकडे ओढा असतो.
स्त्री राशी असल्याने नवनवे विचार व आवडी निवडीकडे ओढा असतो. नम्र व सुशील असतो. शुक्र याराशीमधे उच्च असल्याने त्यास कवी, संगीत क्षेत्र, चित्रकार, मेक अप आर्टिस्ट, ई संबंधित क्षेत्रात असू शकतो. लोकांचे दु:ख कमी करण्यासाठी काम करु शकतो.
व्दिस्वभाव व स्त्री राशि असल्याने त्यांचे विचारात सान्निध्यात येणारे लोकांचा प्रभावाने बदल होत राहतील. मीन जातकाच्या चरित्राशी तुलना करणे अवघड आहे.
राशी चक्रातील १२ वी राशि असल्याने रहस्यमय शास्त्र अथवा अध्यात्मिक जीवनाचा मार्ग असेल. तो घाबरट नसेल पण आत्मविश्वास कमी असेल. तो समुद्र सफ़रीची ईच्छा करेल. विदेशामधे भ्रमण करेल.
व्द्तीयेश मंगळ त्याला दशे अंतर्दशेत वायफ़ळ खर्च करायला लावतो, जास्त कमाई व जास्त खर्च असे समिकरण असते. तो स्पष्टवक्ता व निर्भय असू शकतो. शुक्र ३ रे स्थानाचे अधिपती असल्याने शेजारी चांगले मिळतात व उदारता व सहाय्यता मुळे अनेक मित्र जोडले जातात. बुध हे दर्शवतो की तो अध्ययनशील असून विचार बदलत राहतो. चंद्र त्याला स्वप्नील व कल्पनाशील बनवतो. सूर्य संक्रमक रोग व निराशा दाखवतो. मीन जातक आपल्या सर्व मित्रांवर विश्वास ठेवतो व चांगले व वाईट दोन्ही प्रकारचे लोक असतात याची जाणीव फ़ार उशिरा होते.
3. कमजोरी- अनेक भावनांचा गुंता कमी करावा व कमी काळजी करावी. स्वत:ला कमी लेखू नका, आत्मविश्वासाने पुढे जाण्याची वृत्ती जोपासा. उदार बना पण डोळे उघडे ठेवून. इतरांच्या आश्वासनाला भूलू नका. नेहमी मनन, चिंतन, स्वप्न यात रमू नका.
4. धन व संपत्ती- २ रे, ६ वे, १० वे स्थान हे अर्थ त्रिकोण दाखवते, ज्याचे स्वामी मंगळ, रवी व गुरु आहेत. नीट निरखून पाहिले तर तुम्हास असे लक्षात येईल की कालपुरुषाच्या १ ल्या, ५ व्या व ९ व्या स्थानाचा म्हणजेच धर्म त्रिकोणाचे स्वामी हे तेच आहेत. त्यामुळे यांचा मूळ स्वभावधर्म हा सेवा हाच आहे. त्यांचे मूलत: जीवनाचे ध्येय व आकांक्षा हेच सांगते की त्या लोकांची सहाय्यता करा स्वास्थ्य, धन, द्न्यान याची आवश्यकता असेल त्यांना सहाय्य करणे. यांचे करता उत्तम व्यवसाय हा नोकरी असतो. हे आपले कर्म ईमानदारीने व सेवाभावी वृत्तीने करतात व कमाई करतात व उदारताही दाखवतात वा अव्यवहारी खर्च ही करतात. मीन जातक वृद्धावस्थामधे आपल्या मुलांवर अवलंबून रहायला नको या विचाराचे असतात व त्या व्यवस्थेसाठी ते नेहमी सतर्क राहतात व भविष्यकालीन गुंतवणूक करु ईच्छितात. राशी स्वामी गुरु असल्याने त्यांचे धन उपयोगी व सुरक्षित राहते जरी कोणास गुरु उप दशेत उधार दिले तरीही. पण शनी मित्र जातक वा अंतर्दशेत ते मित्र तोपर्यंत गोड राहतात जोपर्यंत त्यांना मीन जातकाचा लाभ होत असतो व नंतर त्यास त्रस्त, बदनाम व धनहीन करतात.
5. नोकरी व्यवसाय- राशी चक्राची १२ वी राशी असल्याने यांना अशा नोकरी व्यवसायात आनंद मिळतो ज्यामधे दूरर्दृष्टी, विस्तृत कार्य, सहाय्यतेची आवश्यकता असते. त्यामुळे स्वास्थ्य, परिचाल, अन्न व्यवसाय, कल्याणकारी, कार्यकर्ता, शिक्षक, अकाऊन्टंट, बैकर ई. संबंधित नोकरी व्यवसाय करु शकतात.
५ वे स्थानावर ज्याचा स्वामी चंद्राची शुभ दृष्टी असेल तर जलसेना, जहाज, बंदर, पोर्ट, कस्टम, दारु, पेय, तेल, तरल पदार्थ, केमिकल्स, मत्सोद्द्योग, ई संबंधित नोकरी व्यवसाय करु शकतो. शुक्राचे उच्चत्व जातक संगीत, सिनेमा, गुप्त शास्त्र विभाग, संगीतकार, कवी, अभिनेता, वेशभूषा, शृंगार, स्त्रीविषयक ई नोकरी व्यवसाय उत्पन्न करतो.
गुरु लग्नेश व दशमेश असल्याने हे दर्शवतो की ते मंत्री वा चिकित्सकाच्या रुपाने, शिक्षक, मंदीर, चर्च, ट्रस्ट, मठ, दवाखाना, आश्रम, वित्त, स्वास्थ्य ई नोकरी व्यवसायात चांगली सफ़लता प्राप्त करु शकतो.
६ वे स्थानाचा स्वामी सूर्य शुभ दृष्टीने शासकीय विभागामधे कायम नोकरी प्राप्त करु शकतो.
२ रे व ९ वे स्थानाचा स्वामी मंगळ शुभ दृष्टीने दूर संचार, सेना, कस्टम, पोर्ट, ट्रस्ट, तेल, राजनीती, दार्शनिक ई संबंधित नोकरी व्यवसाय करु शकतो.
6. आरोग्य- जल राशी असल्याने तरल पदार्थांची आवड असू शकते. कन्या राशीच्या विपरीत असल्याने गैस ट्र्बल असेल. १२ वे स्थान छोटे पाय दर्शवतात त्यामुळे तळवे व पायाचे दोष त्रास देऊ शकतात.
१२ वी व जल राशी असल्याने एखादी शिर सूजणे व शिर चढणे, वाकडी होणे असा त्रास होऊ शकतो. मीन मधे सूर्य असेल तर पायामधे घाम येणे, थंडपणा आतडीचा त्रास, रक्ताची कमतरता, टायफ़ॊईड ई त्रास होऊ शकतो.
चंद्र दारू वा तरल पदार्थ, पचन संस्था ई. मंगळ पायामधे फ़्रैक्चर, वाकडेपणा, आतड्यामधे उष्णता, हार्निया, बुध नसांमधे खराबी, मुकेपणा, क्षयरोग, गुरु पायामधे सूज, घाम येणे, लिव्हर वाढणे, पोटामधे गोळे, आतड्यांची शिथीलता, शुक्र वातरोग, आतड्यात गाठ, शनी गुठळ्या, पायामधे बाक, क्षय, जलोदर ई आजार दर्शवतात.
7. मित्र व परिवार- मीन जातक सामान्यपणे अनेक मित्रांचे स्वागत करतात, त्यांचे मनोरंजन करण्यासाठी नव्हे तर त्यांनी त्याचे दु:खाचे रडगाने मनापासुन एइकावे, द्या दाखवावी, मानसिक शांती व धीर द्यावा यासाठी. ते आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याची ईच्छा ठेवतात. शिकलेली नसेल तर पत्नीलाही शिक्षित होण्यासाठी प्रोत्साहित करतील. त्यांना आनंदी पारिवारिक जीवन आवडते. व घरात सर्वांवर माया करतात. पंचमेश चंद्र असल्याने प्रत्येक सुदर चेह्ररा पाहून उत्तेजित होऊ शक्तात व कल्पनेत रमतात. पण हे जातकांची प्रवृत्ती चांगली असते. स्वभावाने द्यळु व सहायक सिद्ध होतात. मित्र भरपूर असतात पण काही जण यांचा उपयोग करुन घेतात. मीन जातक आपल्य व्यक्तिगत समस्या विसरुन त्याग करण्यास तयार असतात. जेव्हा त्यांचे मित्र अडचणीत असतात तेव्हा त्यांना दु:ख होते व मित्र आनंदी तर हे आनंदी.
8. प्रेम- मीन जातक आपल्या जोडीदाराची सुंदरता, बुद्धिमत्ता, कार्यकुशलता, ललित कला यांस प्राधान्य देतात. ते संकुचित वृत्तीची व्यक्ती पसंत करत नाही पण हे विसरतात की हाच त्यांचा स्वभाव त्यांना तिरस्कारी बनवतात व त्यांचेकडे शंकीत दृष्टीने पाहिले जाऊ शकते व हळूहळू प्रेम भावना कमी होऊ लागते. जोडीदाराची प्रवृत्ती त्याने समजून घ्यावयास हवी, जोडीदारास प्रेमाचा विश्वास दिला पाहीजे व प्रसंगी प्रसंसा ही केली पाहिजे.
मीन जातक नेहमी प्रेमाचे बाबतीत स्वप्नाळू असतील व स्वप्नील वागण्यासाठी अधीर असतील. त्यांनी असा जोडीदार निवडू नये जो जो स्वतंत्र व अती वास्तववादी असेल. प्रेमातील शंका हे नुकसान करु शकते.
व्दिस्वभाव राशी असल्याने काही प्रसंगी प्रेमात अगदी निरस व्यवहार करतील. व असंतुष्ट ही राहतील. व इतर वेळी प्रेमळ, रसिक, प्रशंसक राहतील. कोणी कोणी प्रेमाचा जर दिखावा करत असेल तर जेवढे द्याळू, प्रेमळ तेवढेच कठोर होऊ शकतात. लहरी वागू शकतात.
9. वैवाहिक- २ रे, ७ वे, ११ वे स्थान विवाह जोडीदार दर्शवते ज्यांचा स्वामी मंगळ, बुध व शनी आहे.
जर मंगळ बलवान कारक ग्रह असेल व जोडीदार दृढ, बहादूर व स्वतंत्र असेल व जर मीन जातक त्याचेशी वाईट व्यवहार करेल तर तो कधी त्यास अनुकूल होऊ शकणार नाही. जर शुक्र व शनीची वाईट दृष्टी असेल तर वैवाहिक आयुष्य अल्प असेल. अशा व ईतर घटकांमुळे घटस्फ़ोट ची शक्यता अथवा एकाच घरात स्वतंत्र राहण्याची शक्यता राहते. ( जाणकार ज्योतिषाचे मार्गदर्शन घेऊन मग च याबाबतीत निर्णय घ्यावा )
जर बुध बलवान कारक ग्रह असेल तर जोडीदार विश्वसनीय व चतुर असेल. व चतुराईने जोडीदारास हाताळेल. जर जोडीदार नाराज असेल तर गप्प बसेल व जर आनंदी असेल तर त्यास अलिंगण देऊन त्यास अनुमोदन देईल.
कन्या व कर्क जातक जोडीदार मीन जातकाबरोबर सुख वैवाहिक आयुष्य उपभोगू शकतात.
जर शनी बलवान कारक ग्रह असेल तर मीन जातकास सावध व सतर्क रहावयास हवे. व स्वत: च्या व्यवहारामधे थोडी सुधारणा करावी लागेल. अन्यथा मीन जातकाच्या चांगल्या वेळी चांगली सोबत करतील व परिस्थिती पालटताच वाईट परिस्थितीत त्यांचे वागणे, बोलणे, ढंग एकदम बदलून जाईल. (शनी ११ वे व १२ वे दोन्ही स्थानांचा अधिपती आहे. जाणकार ज्योतिषाचे मार्गदर्शन घेऊन मग च याबाबतीत निर्णय घ्यावा) ही काळजी व्यावसायिक जोडीदार व मित्र यांचेबाबतीत सुद्धा घ्यावी.
10. संतती- मीन चा स्वामी गुरु हा शुक्राच्या, गुरुच्या व चंद्राच्या राशीत उच्च असतो. संतान दर्शक ५ वे स्थानात चंद्राची कर्क राशी येते. त्यामुळे मीन जातक आपल्या मुलांवर प्रकट प्रेम करतात व त्यांना मुलांचे प्रेम पण प्राप्त होते. मीन जातक आपल्या मुलांचे बाबतीत कठोर होऊ शकत नाहीत आनि तसे मृदू राहीले तरच चांगली फ़ळे प्राप्त करतात. मुलांना परीक्षेत चांगले गुण नाही मिळाले पण खेळात अग्रेसर आहेत तर त्यांना समजून सांगता येते पण जर भीती आणि धमकाऊन सांगाल तर मुले बंडखोर व उर्मट वागतील. मुले सामान्यपणे बुद्धिमान असतात व आयुष्यात सफ़ल होतात, काही जण कलाकार असू शकतात.
11. भाग्य दिवस- गुरुवार, मंगळवार, रविवार शुभ दिवस आहेत. सोमवार व शनिवार व्यग्र ठेवतात व नुकसान करतात. बुधवार व शुक्रवार अशुभ आहेत पण जोडीदारास वा विरोध करण्याकरता लाभप्रद आहेत. व्यवसाय व प्रसिद्धीकरता गुरुवार निवडा. मंगळवार आर्थिक स्थिती, उच्च शिक्षण अथवा प्रवासासाठी शुभ आहे. स्पर्धा, ओव्हरड्राफ़्ट साठी रविवार चांगला आहे. सोमवार, बुधवार, शुक्रवार जोडीदारासाठी वस्तू खरेदीस चांगला. सोमावारी वाद, भांडण अथवा राजीनामा साठी अनुकुल.
12. भाग्य रंग- लाल, पिवळा, गुलाबी, नारिंगी शुभ रंग आहेत. निळा अशुभ असतो. पांढरा, क्रीम, हिरवा जोडीदारासाठी शुभ असतो. मीन जातकाने याचा उपयोग करु नये.
12- भाग्य रत्न- सोन्याच्या अंगठीमधे मुंगा घालणे लाभप्रद ठरेल.
13- भाग्यशाली अंक- १ ४ ३ ९ अशुभ
-ज्योतिषमित्रमिलिंद (७०५८११५९४७) Whatsapp only
For More info : Visit : jyotishmitramilnd.in
मीन राशीबद्दल जे सर्व प्रकारे विश्लेषण केले .ते मनाला खूप भावले.त्यातील वेगवेगळ्या भागांचे वर्णन यथायोग्य आहे.वाचून खूप समाधान वाटले.यावरुन किती सखोल अभ्यास आहे याची कल्पना येते.
अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो आणि स्वत:चे ज्ञान प्रवलीत होऊन दुसऱ्यांना लाभ मिळो.हीच ईश्वरचरणी प्रार्थना
LikeLiked by 1 person
वा वा सर्व राशी हा तर माहितीचा खजिनाच की ,मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏💐💐
LikeLiked by 1 person
खूप छान माहिती दिलीत.
धन्यवाद 🙏
किशोर चिंचोळकर पुणे
LikeLiked by 1 person