कुंभ राशीफ़ळ ( Kumbh Rashiphal )


कुंभ राशीफ़ळ ( Kumbh Rashiphal )

कुंभ ही राशी चक्राची ११ वी राशी आहे. कुंभ राशीमधे धनिष्ठा नक्षत्राचा उत्तरार्ध, शततारका, पूर्वा भाद्रपदाचा १, २, ३ चरण ही नक्षत्रे येतात. या राशीचा स्वामी शनी आहे.

कुंभ रास ही वायू, आर्द्र, स्थिर, सकारात्मक, मानवीय, स्वर, पुरुष व लघु उदीत राशी आहे.

कुंभ राशीमधे कोणताही ग्रह उच्च वा नीच नसतो. बुध व शुक्राची ही मित्र राशी आहे. सूर्य, चंद्र, मंगळ, गुरु यांची शत्रू राशी आहे.

1. शारिरिक आकृती- कुंभ मधे जन्मलेले लोक उंच व भरलेल्या शरीराचे असू शकतात. मजबूत बांधा व चेहरा अंडाकार असतो. सुंदर बांधा, सुंदर चेहरा असेल. दात खराब असू शकतात. केस भुरकट असू शकतात. जांघेमधे मस अथवा घावाचे चिन्ह असू वा होऊ शकते.

2. विशेषता- वायु राशी असल्याने कुंभ जातक बुद्धिमान असतील. कोणी त्यांची खुशामत करुन अथवा उल्लू बनवून त्यांचे काम साधू शकत नाही. ते इतरांचा स्वभाव वा प्रकृती ओळखू शकतात. वायू राशिचा स्वामी शनी हे दर्शवतो की ते प्रत्येक गोष्टीचे गुण अवगुणांचा बारकाईने निवांत विचार करतात. नवेनवे विचार हळू हळु ग्रहन करुन आत्मसात करतात. त्यांची स्मरण शक्ती उत्तम असते.

राशी चक्रातील ११ वी राशी असल्याने विस्तृत विचारधारा असणारे असतात. मानवीय दृष्टिकोण, स्पष्टवादी, नि:स्वार्थी असतात. ते सामजिक देखील असऊ शकतात. मित्रांचा एकोपा जपण्याचा प्रयत्न करतात. भावी काळात बाधक, हानीकारक, अडथळा आणणार्या गोष्टींना शिताफ़ीने दूर करतात. निंदकांपासून २ हात लांब राहणे पसंत करतात.

युरेनस ला कुंभ राशीचा दुसरा स्वामी समजत असल्याने जातक चतुर, स्पष्ट्वक्ता, बुद्धिमान, पाय जमिनीवर असणारा असू शकतो. समाजाचा विकास व स्तर उंचावण्यासाठी प्रय्त्न करणारा, नवे विचार, नवे रस्ते, अडचणींवर उपाय, विकसित साधने ई बाबतीत अग्रेसर असतात. त्यांचे स्वता:चे असे विचार असतात, स्वत:चे पक्के नियम असतात, ते लोकांचे अनुकरण करत नाहीत, त्यांचा ढंग, कपडे, राहणीमान स्व्त: ला आवडेल असे राहते. ते नेहमी काही सिद्धांतावर जोर देतात. ठरवलेले काम करण्यावर ठाम असतात. संशोधन कार्य करण्यास योग्य असतात व दीर्घ काळ काम करुन सफ़लता प्राप्त करतात. ते आपल्या आवडी निवडीवर ठाम असतात. ते चांगल्या मित्रांकरता काहीही करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. पण एखादी गोष्ट त्यांना पटत नसेल तर कोणीही त्यांचे मन वळवू शकणार नाही. ते हट्टी असतात पण मूर्ख नसतात.

काम कामत्रिकोणातील पारमार्थीक साधनांची व आत्मानंद मिळवणारी ही राशी आहे. काम म्हणजे कामना वा इच्छा. ते भौतिक विषय शिकण्याची इच्छा ठेवतात व अंतर्द्न्यान व प्रेरणांचा विकास करतात. ते एकांत, गहन ध्यान, उत्तम एकाग्रता पसंत करतात. उपवास तप ई करु शकतात. जर त्यांच्या मनात जगापासून वेगळे रहायचा विचार आला तर सर्व त्यागुण सन्यासी बनू शकतात. ते इतरांना सल्ले उपदेश देत न बसता स्वत: कृती करतात. ते समाजशास्त्राला शास्त्रीय दृष्टिकोणातून पाहतात.

गुरु कुटुंब व धन स्थानाचा व लाभ स्थानाचा २ व ११ चा स्वामी असल्याने जातकास उत्तम परिवार व समाधानकारक आर्थिक स्थिती प्रदान करतो.

३ रे व १० वे स्थानाचा स्वामी मंगळ अध्ययन कढे ओढा, संशोधन करण्यामधे दृढ व साहसी असल्याने व शेवटी सफ़लता प्राप्त होत असल्याने नाव, सन्मान, प्रसिद्धी प्राप्त करतो.

४ थे व ९ वे स्थानाचा स्वामी शुक्र असल्याने आई वडीलांचा भक्त असतो. चांगले शिक्षण प्राप्त करतो. ते संशोधन, समुद्र यात्रा ई करतात.

संसारामधे सुख्प्राप्ती साठी गुरु २ ११ चा स्वामी व शुक्र ४ ९ चा स्वामी व धनू या गुरुच्या राशी मधे पुर्वाषाढा या नक्षत्रामधे एखादा ग्रह आसेल तर त्या ग्रहाच्या दशा अंतर्दशेत तो भाग्यशाली ठरेल.

बुध ८वे स्थानाचा व च्ंद्र ६ वे स्थानाचा स्वामी असल्याने हे दर्शवतो की कुंभ जातक नेहमी विचारांचा भुकेला असतो व नेहमी मनन, ध्यान, योजनांमधे गुंतलेला असतो. व पीडीत असेल तर उदास, खिन्न, निराश व एकलकोंडा राहू शकतो.

3. कमजोरी- लग्न वा लग्नेश शनी जर पापग्रहांनी पीडीत असेल तर जातक आळशी व सुस्त असेल, त्याला एकलकोंडा राहण्याची सवय मोडायला हवी. निराशा, दु:ख व खिन्नता झटकून अग्रस्थानी व सतर्क रहावयास हवे. जी गोष्ट वा व्यक्ती पसंत नाही त्याविषयी चा कठोर रवैय्या सोडायला हवा.

4. धन व संपत्ती- सामान्यपणे कुंभ जातक महान अविष्कार, व अनुसंधानव्दारे धन कमवतात. ते केलेल्या कामाच्या त्वरीत धन्प्राप्तीमधे विशवास ठेवत नाहीत. ते पुष्कळ काळापर्यंत प्रतिक्षा करु शकतात. धैर्यपूर्वक काम करतात. व काही विकास कामांनंतर वा नवीन उपलब्धीनंतर आपली योग्यता वा गुणांआधारे धन अर्जित करतात. ते कधी मान मतराब शोधण्यास जात नाही उलट मान त्यांना शोधत येतो. त्यांचे विचाराने धन व संपत्ती सांसारिक गरजांसाठी असते. ते मितव्ययी असतात, ना फ़ार उदार ना फ़ार खर्चिक. त्यांचे मधे गुण व महत्वाकांक्षा असते व धन कमवण्यात भाग्यशाली व भाग्यहीन दोन्ही असतात. ते त्यांच्या विचारांच्या ठामपणावर अवलंबून असते.

5. नोकरी व्यवसाय- सामान्यपणे कुंभ जातक महान अविष्कार, व अनुसंधानव्दारे धन कमवतात. ते केलेल्या कामाच्या त्वरीत धन्प्राप्तीमधे विशवास ठेवत नाहीत. ते पुष्कळ काळापर्यंत प्रतिक्षा करु शकतात. धैर्यपूर्वक काम करतात. व काही विकास कामांनंतर वा नवीन उपलब्धीनंतर आपली योग्यता वा गुणांआधारे धन अर्जित करतात. ते कधी मान मतराब शोधण्यास जात नाही उलट मान त्यांना शोधत येतो. त्यांचे विचाराने धन व संपत्ती सांसारिक गरजांसाठी असते. ते मितव्ययी असतात, ना फ़ार उदार ना फ़ार खर्चिक. त्यांचे मधे गुण व महत्वाकांक्षा असते व धन कमवण्यात भाग्यशाली व भाग्यहीन दोन्ही असतात. ते त्यांच्या विचारांच्या ठामपणावर अवलंबून असते.

गुरु २ रे स्थानाचा स्वामी असल्याने शास्त्रीय, प्रशासकीय, वा कंपनीमधे उच्च पदावर असू शकतो. एक व्याख्याता, सायकॊलॊजिस्ट, समुपदेशक, ज्योतिषी, कायदा, वित्त, शिक्षण, धार्मिक संस्था, खनिज पदार्थ, जहाज, निर्यात या संबंधी नोकरी व्यवसाय करु शकतो.

चंद्र ६ वे स्थानाचा स्वामी असल्याने जातक चिकित्सक, सामाजिक सेवक, जहाज, समुद्र यात्रा, पंप सेट, तरल पदार्थ ई संबंधित नोकरी व्यवसाय करु शकतो.

मंगळ १० वे स्थानाचा स्वामी असल्याने जातक धातू, विमा, केमिकल्स, यांत्रिक, बांधकाम, कच्चे खनिज पदार्थ, वीट भट्टी, बॊयलर, सिमेंट, सर्व्हेयर, शल्य चिकित्सक, पोस्ट मार्टम, हत्यारा, कसाई, न्हावी, शीसे, तांबे, स्टील, गुप्तचर संस्था, ई संबंधित नोकरी व्यवसाय करु शकतो.

शुक्र १० वे स्थानावर शुभ दृष्टीने पहात असेल तर जातक एक कवी, चित्रकार, संगीत क्षेत्र, हैंड बैग ई संबंधित नोकरी व्यवसाय असू शकतो.

6. आरोग्य- कुंभ राशी सुर्य़ाच्या विपरीत राशी असल्याने कुंभ जातक संक्रमक रोगाने ग्रासित असतात. जर साधारणपणे अति परिश्रमाने थकवा जाणवेल तर वैद्यकिय सल्ला घ्यावा. हृदय प्रभावित होऊ शकते. दात दुखणे, टॊन्स्लिल्स, देखील कष्टाचे कारण होऊ शकते.  शनी थंड ग्रह व कुंभ वायू राशी असल्याने त्यांचा रक्त प्रवाह कमी असतो. त्यांना हिवाळ्यात जड जाते. खरचटले व घाव लागला तर ताबडतोब मलम पट्टी करावी. डासांचा प्रादुर्भाव जास्त असेल अशा ठिकाणी थांबणे टाळावे. काही त्रास झाल्यास योग्य आराम करावा. वाढलेल्या वा फ़ुगलेल्या शिरा चा वेळीच उपाय करावा. गाठी, रक्तदाब, पायावर सूज, पीडीत शुक्र चामड्याचे रोग, नेत्रपीडा, पीडीत चंद्रामुळे जलोदर, धनिष्ठा नक्षत्रामधे स्थित ग्रह उच्चताप, मलेरिया, फ़िलेशिया, उच्च रक्तदाब, फ़्रैक्चर दर्शवतो.

शततारका मधे स्थित ग्रह जातकास अधिक वैठकीच्या अभ्यासामुळे कमजोर पचनक्रिया बनवतो. रक्तदाब, निद्रानाश, देतो. पूर्वा भाद्रपदामधे स्थित ग्रह जलोदर, स्कीन चे रोग, फ़ोड ई दर्शवतो.

स्थिर राशी असल्याने ९ वे स्थान बाधक स्थान असते. शुक्र ९ वे स्थानाचा स्वामी असल्याने तसेच केंद्राधिपती पन असल्याने आयुष्यावर प्रभाव टाकतो. तसेच २ रे व ७ वे स्थानांचे स्वामी गुरु व सुर्य आहे, ६ वे स्थानाचा अधिपती चंद्र आहे व बुध अष्टमेष आहे. हे सर्व ग्रह त्यांच्या दशा अम्तर्दशांमधे आरोग्यास नुकसानकारक सिद्ध होतात.

चंद्र षष्ठेश असल्याने सामान्य रोग दाखवतो जे उपचारांनी बरे होतील. पण गुरु, सूर्य, बुध दर्शित आजार जास्त त्रासदायक असतील. बुध व शुक्राची दशामधे उत्पन्न रोग दुभाग्यवश असतात. उत्तरा फ़ाल्गुनी, विशाखा, पुर्वाषाढा नक्षत्रामधे स्थित ग्रह जातकाच्या प्रकृतीस प्रभावित करतील.

7. मित्र व परिवार- कुंभ राशी चक्रातील ११ वी राशी जिचा स्वामी गुरु असल्याने चांगली मनोवृत्ती, अत्याधिक उत्साह व प्रसन्न असतात. त्यांना अनेक मित्र हवे असतात व गुरु त्यांना खरे, विश्वसनीय व उत्तम मित्र देतो. त्याचे मधून काही जणाचे बाबतीत कुंभ जातक थोडे अलिप्त राहतात. त्यांचे मित्रांना असे वाटू शकते की हे संपर्क करत नाहीत व उदासिन राहतात. पण कुंभ जातक इतरांचे दोष काढत नाहीत व गोष्ट सहज घेतात. त्यांचे बरोबर कोणी चांगला व्यवहार केला नाही तरी हे सहयोगी असतात. ते आपले मित्रांचे वागने व व्यवहार याचा अभ्यास करतात. ते मित्रांप्रती इमानदार असतात पण याची जाणीव असते की काही जण दगाबाज व स्वार्थी व अनादर करणारे असू शकतात. तरी ते शांत व अहंकार रहित असतात.

कुंभ जातक फ़ार सामाजिक असतात. ते आपले घर फ़ार स्वच्छ व सुंदर ठेवतात व मित्रांना घरी आमंत्रित करतात. घर छान सजवलेले, चित्र विचित्र जुन्या वस्तू, वा अधुनिक ढंगाचा संग्रह असेल. कुंभ जात घरकामासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देतात व त्याचे पाहुण्यांसमोर प्रदर्शन करण्यात त्यांना आनंद होतो. ते जुन्या परंपरागत कष्टदायक पद्धती सोडून देतात व आधुनिक साधनांचा वापर करुन वेळेची बचत करतात. ते एकांत व समाज दोघांना समान प्राधान्य देतात हे विशेष आहे. हे अगदी अलिप्त व अगदी मिसळ्णारे नसतात.

8. प्रेम- कुंभ जातक बुद्धिमान असल्याने नेहमी शिक्षित व बुद्धिमान जोडीदार निवडण्यास प्राधान्य देतात.  ते दृढ व कायमचे संबंध राखतात. ते अहंकारहीन असल्याने जोडीदाराव्दारे नुकसान होत नाही. ते सर्वांबरोबर स्वच्छ मनाने राहतात व नंतरही त्यांना आयुष्यात स्थान देतात. ते आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करत नाहीत. हर प्रेमी भाऊक असेल तर तो असमाधानी राहू शकतो कारण कुंभ जातक फ़ार शांतीने सर्व गोष्टी घेतात.

9. वैवाहिक-  रे, ७ वे, ११ वे स्थान जीवन साथी दाखवते. कुंभ जातकास यांचे स्वामी गुरु व सूर्य आहेत. म्हणून जोडीदार कायदा पाळ्णारा, ईमानदार, विश्वसनीय असतो. ते गौरवशाली व योग्य कर्तव्यपरायण असतात. परंतू ज्यांचा विवाह कुंभ जातकाशि होतो त्यांना हे जाणवेल की हे लोक पुष्कळ मानवतावादी, द्याळू, सहानुभूतीपूर्ण, निभाऊन नेणारे असतात. ते अनुकुलता व प्रसन्न्तेची चर्चा करतील.

कुंभ जातक स्त्रिया परंपरावादी नसतात. जर तिला जानवेल की जोडीदार तिच्या मताने वागत नाही तर त्यास बदलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल वा भासवेल. पती बरोबर अधिक इच्छा प्रदर्शित करुन सहयोग करेल. त्याव्हे उत्तरदायित्व, कर्तव्य व कामामधे सहभागी होईल.

मिथुन व तुळ जातक कुंभजातका करता सुयोग्य असतात.जोडीदारास हे जाणणे जरुरी आहे की कुंभ जातक अलिप्त राहणारा असतो व कमी वेळ सहवासात रमतो. त्यंची पत्नी नोकरी करणारी वा इतरत्र गुंतवून घेणारी असेल तर जास्त गोडवा टिकून राहील. पण त्याच्या भरपुर वेळ व सहवास मिळण्याची इच्छा ठेवणारी असेल तर दु:खी होईल.

10. संतती- कुंभ जातक स्वत:ला वयाने मोठे आहोत हे मुलांसमोर दाखवत नाहीत, त्यांना वास्तवात अले पाहीजे व आपल्या मुलांशी एक शिक्षकाप्रमाणे कठोर व्यवहार केला पाहीजे हे परंपरागत मान्य नसते.. उलट ते मुलांशी असे वागतात जसे ती मुले मोठी झाली आहेत. त्यामुळे मुले त्यंच्यावर प्रेम व आदर देखील करतात. मुलांना नवीन पद्धतीने व बुद्धिमानीने प्रशिक्षित केल्याने ती साहसी व आत्मविश्वासू होतात. कुंभ जातकांजवळ गोष्टींचे भांडार असते. व मुलांना मुलांप्रमाणे नक्कल करुन शिकवू शकतात. व त्यांना क्रियाशील बनवतात.

२ रे ५ वे ११ वे स्थान संतानकारक आहे ज्याचे स्वामी गुरु व बुध आहेत. हे स्पष्ट आहे की ते बुद्धिमान, माहित्गार असतील व प्त्रकार, सूचना अधिकारी, गणिती, प्रचारक ई होतील.

11. भाग्य दिवस- गुरुवार, शुक्रवार, मंगळ्वार, सोमवार भाग्यशाली दिवस आहेत. बुधवार रविवार अशुभ आहेत. शनिवारी मिश्र फ़ळ मिळेल, अधिकर नुकसान करतो. मंगळ्वार, गुरुवार करार करा, मंगळवार, सोमवार स्पर्धेत यश शुक्रवार समुद्र यात्रा, शाळा, कॊलेज प्रवेश साठी चांगला, शनिवारी व्यवहार करु नका. बुधवार, रविवारी करार करु नका.

12. भाग्य रंग- पिवळा, लाल, पांढरा, क्रीम शुभ रंग आहेत, संत्री, हिरवा, निळा अशुभ रंग आहेत.

12- भाग्य रत्न- पोवळा, माणिक, हिरा शुभ, व पाचू, नीलम अशुभ

13- भाग्यशाली अंक- ३, ९, २, ७ शुभ अंक आहेत व १,४,५,८ अशुभ आहेत.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

2 thoughts on “कुंभ राशीफ़ळ ( Kumbh Rashiphal )

  1. मिलिंदभाई ,खूप भारी उत्तम माहिती ,,प्रचंड अभ्यास ,,अनेक वर्षं घेतलेला ध्यास ,, सातत्त्यता,, भविष्य विषयक माहिती संग्रह ,,,खूप कौतुक या माहिती ज्ञान वर्धक संग्रह कारिता 🙏🕉️

    Liked by 1 person

Leave a reply to विजय भापकर पुणे Cancel reply