
(५) सिंह-
सिंह ही राशी चक्रातील ५ वे क्रमांकाची राशी आहे. मघा, पूर्वा फ़ल्गुनी, उत्तरा फ़ल्गुनी चे १ ले चरण ही नक्षत्रे या राशीत येतात. ही अग्नी, गरम, रुक्ष, पुरुष, सकारात्मक, जंगली, उजाड, स्थिर, दीर्घ राशी म्हणवली जाते.
सिंह राशी चा स्वामी सूर्य आहे. कोणताही ग्रह सिंह राशीमधे उच्च वा नीच नसतो. युरेनस या राशीमधे कमजोर असतो व नेपच्यून बलवान.
1. शारिरिक आकृती- सिंह राशी मधे जन्मलेल्या व्यक्तीची हाडे पुष्ट व मजबूत असतात. खांदे व कपाळ पुढच्या बाजूस रुंद असते. उंच, मजबूत व मांसल अंगयष्टीचा असतो. तो लठ्ठ व कुरुप नसतो, लंबोदर असतो. याची बनावट बाह्यता पूर्ण प्रभावशाली, रुबाबदार, प्रभूत्वसंपन्न व गौरवशाली असते. रंगरुप व वर्णन लग्न स्थित ग्रह, दृष्टी यानुसार बदल होऊ शकतो.
2. विशेषता- सिंह राशीमधे जन्म घेणारे जातक योग्यतापूर्ण व उदार असतात. हे जातक माणसांची सहाय्यता करु शकतात. सिंह जातक सूर्याप्रमाणे इतरांना प्रकाश दाखवणारा, आयुष्यातील अंधकार नाहीसा करणारा, वाईट विचार नष्ट करणारा असू शकतो. (जर पापग्रहाने बिघडला नसेल तर )सूर्य शासनाचे प्रतिनिधित्व करतो. ज्या व्यक्तीचे सूर्यावर गुरुची शुभ दृष्टी असेल ते सरकार व्दारा सहाय्यता प्राप्त, संरक्षणप्राप्त व सुरक्षित कवचात राहतात.
शनीची सूर्यावर वाईट दृष्टी असल्यास अशा व्यक्तीना सरकार व्दारे दंड, शिक्षा होऊ शकतो. म्हणून स्वास्थ्य, आनंदी आयुष्य अथवा अडचणी साठी सुर्यावर पडणारी दृष्टी व लग्नराशीची स्थिती यामुळे विशेषता प्रभावित होऊ शकते. सिंह जातक समारचरणास पात्र असतो व मित्र व नातेवाईकांना विश्वासाने सल्ले देत राहतील.
त्यांची प्रमुख विशेषता मौन राहण्यात आहे. ते तक्रारी व अफ़वा अगदी शांतपने ऐकूण घेतील व बुद्धिपूर्वक निर्णय घेतील. ते इतरांच्या चुका विसरु वा माफ़ करु शकतात. ते विश्वास ठेव्णारे असतात त्यामुळे त्यांना दु:ख वा धोका प्राप्त होऊ शकतो. ते स्वत:च्या आदर्श कल्पनेत रमतात व त्यापुढे त्यांना इतर गौण वाटते. सिंह जातक इतरांच्या विनंतीमुळे प्रसन्न होतात व लोक त्यांचे ईप्सित साध्य करुन घेऊ शकतात. बुध जातक सिंहाचे प्रिय असतात. कारण ते चतुरपणे सिंह जातकाची स्तुती करु शकतात. सिंह जातकामधे प्रशासन क्षमता असते. एखाद्या गोष्टीचे योग्य विश्लेशन करु शकतात.
सिंह अग्नी व स्थिर राशी असल्याने प्रभुत्व, महत्वाकांक्षा, अधिकार, चमक, चतुरपणा, शासन करणे, शक्ती व उत्साह, अत्म विश्वास, प्रसिद्धी व कीर्ती, शिश्टता, सन्मान बुद्धी, प्रसन्नता, नेतृत्व गुण, वैभवता, दिखावट, गर्व, आदर, स्पष्ट्वक्ते पणा हे गुण आढळतात.
सिंह राशी चक्राची ५वी रास असल्याने, संगीत, खेळ, नाट्क, ई आवड असते.
सिंह जातक स्थिर राशी असल्याने तो हट्टी व ठाम निर्णयाचा, दृढ असतो. ते बाधा व अडचणी येतात तेव्हा शांत राहण्यासाठी मौन धारण करतात. ते आपली आकांक्षा पूर्ण होईपर्यंत पूर्ण आत्मशक्ती पणाला लावतात. सिंह जातक स्पष्ट्वादी, मोकळे मन व न्यायप्रेमी असतात. त्यांचा क्रोध फ़ार टिकाऊ नसतो. नीच कृत्याचा राग येतो ते उत्तम सेवा करु शकतात व मनापासून करतात. ते नेहमी प्रमुख नेता व श्रेष्ठ बनण्याची ईच्छा ठेवतात. सिंह जातक उदार असतात, पण त्यांना आग्रहपूर्वक कोणी मागणी केलि तर ते त्यांना आवडत नाही,
जर शनीची सूर्यावर अथवा सिंह लग्नावर शुभ दृष्टी असेल तर, उत्तेजित वा अधिक परिश्रम होऊ देत नाहीत व हृदयावर कोणतेही विपरित परिणाम होऊ देत नाहीत. यांना कही दु:ख वा हताशपणा असेल तर ते त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. ते कोणती ही चुक न होण्याची खबरदारी घेतील.
जर मंगळ लग्न अथवा सिंह राशी पीडीत करत असेल तर, तो अतिषयोक्ती करणारा, अहंकारी व आत्मप्रशंसक असेल. जर तो कोणाशी विवाह करेल तर शंकेखोर, कामी, हिंमतवान असेल.
साधरणपणे सिंह जातक कोण्त्याही समस्येवर दोन्ही बाजूंचा विचार करत नाहीत. त्यांनी इतरांच दृष्टीकोण समजून घेतला पाहिजे. जेव्हा त्यांना बाजूला ठेव्अले जाते तेव्हा ते वाह्यमुखी होतात व सिंहाप्रमाणे गुरगुरतात व कष्टी होतात. सिंह जातक दैनंदिन, भूत, भविष्याचा विचार न करता पुढे वाटचाल करत राहतात. ते मनातले उद्देश व ईच्छांवर ताबा ठेवतात. इतरांना आपले अधिकाराखाली ठेवण्याचा प्रयत्न करतात व आपल्या स्वत:च्या जोख्मी वर मोठमोठे निर्णय घेत राहता. त्यांना स्वतंत्रता आवड्ते.
3. कमजोरी- मी सिंह जातक घाई करतात, इतरांचे मत विचारात घेत नाहीत, गर्व, जादा आत्मविश्वास या गोष्टी टाळायला हव्यात.
4. धन व संपत्ती- सिंह जातक उच्च आर्थिक स्थिती प्राप्त करण्यासाठी झटत असतात. ते बहुतांश स्थितीत प्राप्त ही करतात. ते जास्तीत जास्त फ़ायदा कसा होईल यासाठी प्रयत्नशील असतात. स्वभावत: खर्च करण्याकडे कल असू शकतो. किंवा खर्चास अनेक वाटा फ़ुटतात, त्यामुळे कधी कधी कठीण परिस्थिती ही निर्माण होऊ शकते. पण ते कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करण्यास समर्थ असतात. सिंह जातकांना भाग्याची साथ लाभते. तरुणपणी अनेक कमाई चे साधन उपलब्ध असतात. एखादी जोखीम पत्करली तरी भाग्याने जुगार यशस्वी होतो.
5. नोकरी व्यवसाय- साधरणपणे सिंह जातक शासनाचे प्रधान, रजिस्ट्रार, शासक, अध्यक्ष, स्बागताध्यक्ष, डायरेक्टर, प्रसासक, अशा जागांवर अधिक काळ पर्यंत पदावर राहू शकतात.
सिंह राशी चक्राची ५ वी रास असल्याने, संगीत, खेळ, नाट्क, ई क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात.
स्थिर राशी असल्याने व सूर्य स्वामी असल्याने व्यापारात उत्तम यश देऊ शक्तो. तसेच सरकारी नोकरी, व्यवस्थापन अशा नोकरी चा लाभ होऊ शकतो. ५ वी राशी अस
मंगळाची शुभ दृष्टी असेल तर, शिपाई, सर्जन, केमिस्ट, डेंटिस्ट, न्हावी, कसाई, लोखंड-तांब्याचा व्यापारी, अवजारे, प्रतिरक्षा, आरोग्य विभाग, इंजिनीयर, ई दर्शवतो.
बुध शुभ दॄष्टीत राजदूत, लेबर दलाल, ऒडीटर ई दर्शवतो.
गुरु शुभ दॄष्टीत प्रवासी कंपन्या, शेती विभाग, सोने, काच, कपडे, रेशीम, सधन सुविधा, खाद्य वस्तू ई मधे संधी देतो.
शनी शुभ दॄष्टीत खाण, कोळसा, लाकूड, रस्ता, जंगल, मजदूरी, सेवा विभाग ई दर्शवतो.
6. आरोग्य- साधरणपणे सिंह जातक सुदृढ असतात. कधी आजारी पडले तरी ते लवकर बरे होतात. जेव्हा त्यांना आजारी पडण्याची शक्यता वाटते,तेव्हा ते सावध होतात. सिंह राशी हृदय दर्शवते. या व्यतिरिक्त पाठीचा कणा, मज्जा नाडी व तंतू दाखवते. त्यामुळे या संबंधी आजार होऊ शकतात. सिंहस्थ गुरु असेल तर शल्य चिकित्सेपासून रक्षा करतो. मंगळाने पीडीत असेल तर रक्त नलिकेत रक्त साचणे, अथवा शल्य चिकित्सा दर्शवते. हृदयाशी संबंधी असल्याने या राशीच्या लोकांनी मद्य सेवन, मदक पेय, उत्तेजक पेय यांना टाळावे व सकस आहारावर भर द्यावा.
7. कौटूंबिक- सिंह जातक नेहमी उत्तम मित्रांची निवड करतात. ते आपला मान व प्रतिष्ठा कायम ठेवण्यास खर्च करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. त्यांचा काही काळ अडचणीचा व आर्थिक चणचणीचा असेल तरीही आपण सुखात आहोत हेच भासवतील. ते पोषाख, घराचे पडदे, फ़र्निचर ई स्व्च्छ व उत्तम ठेवतील व ते पाहून त्यांचा सुखाचा भास तयार करतील. जोडीदार जर सिंह जातक असेल तर त्याला हा विचार करणे भाग आहे की, ड्रेस, दागिणे, कपडे ई घेऊन प्रसन्न कसे ठेवता येईल. हे जर जमले त्याचे घर स्वर्ग होईल.
8. प्रेम- सिंह जातक रसिक असतो व तो फ़ार प्रेम करतो व प्रेमाच्या अधिन असतो. तो चतुरपणे आपल्या जोडीदारास आनंदी ठेवतो व एक आदर्श प्रेमी असतो, तो उग्र व कामुक असतो. पण तो बाहेर समाजात प्रेमाचे प्रदर्शन करणे योग्य समजत नाही व त्यास आपल्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध समजतो. सिंह जातकामधे आपल्या प्रेमीसाठी एक सौंदर्य व आकर्षण असते, सिंह जातकाची पत्नी थोडी नाखुश राहू शकतो कारण सिंह स्त्रिया च्या समुहामधे वावरत असतो. त्यामुळे सिंह जातकाने थोडे समजदारी ने काम घ्यावे. जेव्हा तो पार्टी देतो व उत्तेजक वेळी आनंदित होतो तेव्हा स्त्रीस देखील यामधे सामील व्हावयास हवे.
जोपर्यंत सिंह जातकाचे लग्नी, ५वे, ७वे, ११वे स्थानी शनी, मंगळ, शुक्र नसेल तर सिंह जातक स्त्रीचा पती होणे गैरवाजवी नाही.
9. वैवाहिक- सिंह जातकास नीट समजून घेतले तर तिंस सिंह जातकाचे प्रेम व प्रशंसा प्राप्त होईल.व ती संसारात सुखी होईल. सिंह जातक कधीहि आपल्या जोडीदाराची अथवा कुटुंबियांची मानहानी सहन करणार नाही. आपल्या जोडीदाराचा व कुंटुंबाचा नेहमी गर्व राहील. सिंह स्त्री आपली सामजिक प्रतिमा जपण्यासाठी नेहमी सतर्क व हुशार राहील. सिंह राशी अग्नि राशी असल्याने मेष, सिंह, धनू व वायू राशीच्या मिथुन, तुळ, कुंभ या राशीत जन्मास आलेले जातक जोडीदार म्हणून योग्य असतील. मेष व धनू जातक आनंद व अनुरुपता देतील. मिथुन, तुळ, कुंभ राशीत जन्मलेले सिंह जातकावर फ़ार प्रेम करतील. तुळ जातक त्यास नेहमी लाभ देण्याचा प्रयत्न करेल, कष्टी होण्यापासून दूर ठेवेल व कोण्त्याही परिस्थित शांती टिकवून ठेवेल. मिथुन जातक युक्तीबाज असतात व असे कोणतेही काम करणार नाहीत ज्याने जोडीदार नाराज होईल. मिथुन एक साथ देणारा व विश्वसनीय प्रेमी ठरेल.
सिंह स्त्री महत्वाकांक्षी व आदर्श असते. ती आपल्या घराची उत्तम व्यवस्था ठेवेल या जोडीला ती सामाजिक संबंध सुद्धा उत्तम जोपासेल. ती सर्वांवर अनुकुल प्रभाव ठेवू शकते. सिंह स्त्री मेष वराशी लग्न करेल तर तिला भाग्यशाली असते. कारण तो अधिकारप्रिय असेल तर ही आपल्या सीमा ओळखू शकते. व ती न ओलांड्ण्याचा तिचा मानस असेल. ती असा पती निवड्ते जो अधिकारयुक्त असेल व तिला आपल्या पतीचे कौतुक करता येईल. प्रेम दया, वस्तविकतेचे भान व समृद्धी असे जीवन व्यतीत करेल.
काही स्त्रियांचे विचार पक्के असतील व तो असे अनुभव करेल की तिचा शब्द हाच कायदा आहे व दोघे तिच कामे करतील जी तिला योग्य वाटतात.
10. संतती- सिंह जातक व्यक्ती आपल्या मुलांवर फ़ार प्रेम करतात. त्यांना त्यांचा फ़ार अभिमान वाटतो. साधारणत: त्यांची मुले फ़ार कष्टाळू व संवेदनशील असतात. त्यांना बंधन जास्त रुचत नाही व लहानपणी बंडखोरी सुद्ध करु शकतात.
सिंह जातकांने नेहमी आपल्या मुलांवर विश्वास ठेवावा व समजावून सांगावे अन्यथा विश्वास गमावतील.
सिंह राशीमधे जन्मलेले बालक इतरांवर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करेल. ते टीम चे कप्तान, शाळेत हेडबॊय असतील. योग्य नेता होतील. कारण त्यांचे कडे चेतना, महत्वाकांक्षा व आग्रहीपणा असतो. हे इतराना प्रेरणा देणारे उत्तम व्यवस्थापक असतात. ते अभिमानी असतात पण अहंकारी नसतात. ते आपल्या कल्पनेम्धे वहावत जात नाहीत. ते चांगल्या स्वभावाचे अधिकारी व शासन करण्याची हिंमत असणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध पावतील.
11. भाग्य दिवस- स्वास्थ्य, उच्च अधिकार, साहसी काम, सूर्य अधिष्ठित वस्तू खरेदीस रविवार लाभदायक. सोमवार अनिष्ट. धनहानी, मानहानी, गुप्त शत्रू कारवाया, संताप. मंगळ्वार जिद्दीने काम करण्यासाठी, विजय मिळवण्यासाठी, संपत्तीकारक, वाहन खरेदीत सफ़लता देणारा. बुधवार भाग्यदायक, धनलाभ, बैंकिंग ची कामे, करार, दस्तएइवज कामे, प्रेमपूर्ती, मैत्री साठी चांगला दिवस. गुरुवारी पैसे उधार वा कर्ज घेण्यासाठी चांगला. लवकर त्याची परतफ़ेड करता येईल. मौल्यवान वस्तू खरेदी, भेटीगाठीसाठी, जमीन अथवा कार मुलांच्या नावावर खरेदी करण्यासाठी चांगला. शुक्रवार लहान सहान प्रवास, बदली अथवा पदोन्नतीसाठी चांगला दिवस. शनिवार नुकसानदायक, धोका खाऊ शकता.
12. भाग्य रंग- संत्र्याचा रंग, लाल, हिरवा चांगला निळा व पांढरा अशुभ
13- भाग्य रत्न- माणिक व पाचू
14- भाग्यशाली अंक- १ ४ ५ ९ ६ चांगले, २ ७ ८ खराब, ३ मिश्र फ़ळ देतो.
-ज्योतिषमित्रमिलिंद (७०५८११५९४७) Whatsapp only
Fire More info : Visit : jyotishmitramilnd.in
Very informative. Thank you.
LikeLiked by 1 person
Masta. Thanks.
LikeLiked by 1 person