वृषभ राशीफ़ल ( Vrushabh Rashiphal )


(2) वृषभ

ही राशि चक्रातील दुसरी रास आहे. कृतिका मध्ये दुसरा, तिसरा व चौथा चरण, पूर्ण रोहिणी मात्र व मुग नक्षत्र मध्ये प्रथम व दुसरा चरण  या राशि मध्ये असतो.

वृषभ राशि पृथ्वी तत्व, स्थिर, स्त्री राशि, अर्धफलदाई, चतुष्पाद व लघु उदित राशि जाहे, या राशिचे चिन्ह हिन्दू व पाश्चात्य पद्धति मध्ये बैल मानतात,  असाधारण शिंग असलेला ज्याचा डोक्या वर व शिंग असताना दिसतात. याची दृष्टि सदैव वर असते, व त्या आपला इट्टी व ढ स्वभाव दर्शवितो.

वृषमचा स्वामी शुक आहे. वृषभ मध्ये चन्द्र उच्चीचा असतो कारण की वृषभ मंगळा ची वृश्चिक राशितून सातवा असतो. म्हणून मंगध्ठा करिता नुक्सान दायक आहे. मंगष्ठ चा उग्र स्वभाव भावुक, शांतीप्रिय शुक्राव्दारे सौम्य केला जातो.

1. शारीरिक आकृति – ऊंची सामान्य, शरीर जाड़े, डोक्याचा पुढील माग रुंद, जाडी व स्थूल मान, चमकदार डोळे, काळे केस, सुन्दर चेहरा, सुदृढ़, शरीर कमवलेले, रुंद खांदे व सुविकसित मासपेशी.

2. विशेषता- पृथ्वी तत्वाच्या तीन राशि पैकी वृषभ, प्रथम राशि होय व स्थिर राशि मध्ये ही प्रथम होय. पृथ्वी तत्वाची असल्यामुळे उत्कट उत्साह असतो, ते सहनशील व धैर्यवान असतात. लोक सहनशील व्यक्तिची तुलना पृथ्वीशी करतात, जी निरंतर कार्य करित असते, पण जेव्हा रागामध्ये उत्तेजित होतात व उत्तेजित होउन एखाद्या भूकंपाप्रमाणे मयंकर होतात. ते हिंसक व निडर होतील.. वृषभ जातक धीम्या गतीने व नियमित कार्य करणारे असतात. परिश्रमी, उद्योगप्रिय, धैयवान, सहनशील व प्रशासनमध्ये कुशल असतात. ते परंपरावादी असतात व आपल्या शक्तिचा अपव्यय करीत नाहीत.

स्थिर तत्व राशि असल्याने एकाग्रता, आत्मशक्ती चांगली असते. बुद्धीपेक्षा भावामधे जास्त लीन असतात. ते निश्चित मताचे व कट्टरवादी असतात. वृषभ जातक हट्टी व निश्चयी सिद्ध होतील. ते दुसरें लोकांचे तर्क विचार समजून घेतील पण एकदा मत बनवले अथवा सवय लागली की ते बदलणे फ़ार कठीण आहे. कोणतेही कार्य विचारपूर्वक करतात, पण वेळेची वाट पहात थांबत नाहीत, जर त्यात फ़ायदा दिसत असेल.

वृषभ रास पार्थिव व स्थिर दोन्ही आहे. वृषभ जातक पैशाची नीट काळ्जी घेणारे, ते आपली प्राप्ती सावकाश प्राप्त करतात, पण जेव्हा ते पैसा आवशयक आहे असे डोक्यात घेतील तेव्हा हात धुवुन मागे लागतील. ते दीर्घकालीन योजनांचे सुयोग्य संचालक असतात. कोणी कौतुक करो अथवा टीका ते आपल्या योजनेपासून ढळत नाहीत व चिकाटीने सफ़लता प्राप्त करतील. सांसारिक अधिकार, उत्तम भोजन आस्वाद घेणारे, मिठाईला प्राधान्य देणारे असतात. (२ री रास धन, कुटुंब, पैसा दाखवते.) ते सांसा रिक असतात, जीवनामध्ये उत्तम वस्तूंचा आनंद उपभोगतात. ते डोके अधिक कार्यरत ठेवतील व कमी भावनावश होतील तर त्यांची निकोप प्रकृती राहील. वृषभ जातक स्वाभाविक प्रकृतीचा सरळ स्वभावाचा, निष्पक्ष व ईमानदार असतात त्यामुळे त्यांच्या विचारधारेवर निर्भर राहू शकतात.

राशिचा स्वामी शुक्र जाहे म्हणून व्यक्ति उत्साही व प्रसन्नचित राहतील. चेहरा व वाणी, वक्तृत्व चांगले असेल कारण स्वामी शुक्र आहे. वृषभ जातक आपली विचारधारा स्वत: बनवतात व सामान्यत: चूक करत नाहीत. आपले मनसुबे, विचार गुप्त ठेवतात. काही जातक नेहमी तोंड कडू करतील व कूट्नीती जाणणारे असू शकतात व त्याला समजणे फार कठिण आहे. शुक्र दर्शवितो की तो आपल्या जीवनामध्ये कोणत्याही भागामध्ये वर येईल, कारण तो आपल्या नातेवाईकांच्या शुभकामना व अधिक स्नेह प्राप्त करेल. वृषभ जातक माग्यशाली असेल व दैवी शक्ति द्वारा वागिने, हीरे, जवाहर, फ़र्निचर, सुख सुविधा, आरामाच्या वस्तू प्राप्त होतील. त्याला राज्य, बगीचा, प्राप्त होतील व त्याचा शौक बागायती करण्याचा असेल, ताँ अश्या गोष्टी मध्ये अधिक रुचि दाखवेल व आनंदी जीवन घालवेल. सर्व आनंददायक प्राकॄतिक सौंदर्य त्यांना नेत्रसूख देतील. जर या राशीमध्ये शनी स्थित असेल व शुभ दॄष्ट असेल तर जातक एकांतात अथवा ग्रामीण जीवन व्यतीत करेल.

3. प्रेम-राशी स्वामी शुक्र असल्याने ज्यच्यावर प्रेम करतात ते खरे व मनापासून करतात. मग ते कितीही विपरित परिस्थितीत का असेनात. युवावस्था पार पडेपर्यंत मात्र आत्मनियंत्रण जरुरी असते. विशेष करुन जेव्हा शनी वॄषभेस पाहतो अथवा शनी वॄषभ लग्नी स्थित असतो. या व अशा काही घटकांमुळे तो जातक भौतीक गोष्टींचा आनंद घेताना अनीतीचा मार्ग स्वीकारु शकतो, त्यामुळे मनांस वेसन घालणे आवश्यक ठरते.

शुक्र कोणत्याही व्यक्तीस कला, संगीत, मूर्तीकला, नाटक, सिनेमे ईत्यादीमध्ये आवड निर्माण करतो. परंतू ते भाग्यशाली असतात जे पैशाचे व व्यवहाराचे महत्व जाणतात. सरळ मार्गाने कष्ट करुन धन एकत्र करत नाहीत तेव्हाच ते आराम करतात. जेव्हा ते पैसा प्राप्त करतात तेव्हा त्यांचा खिसा पूर्ण भरलेला असतो पण आधी बचत खात्यात टाकतात वा एफ़ डी करतात. वस्तूत: ते पैसे कमावून साठवण्यामधे विश्वास करत नाहीत वा अडकलेल्या पैशाचा जास्त विचार करत माहीत. त्यांना हे पटत असते ते घाई गडवड करुन पैसा लगेच मिळत नाही मात्र तरीही पैसा कमावण्यासाठी घाई करतात व प्रसंगी नुकसान करुन घेतात.

4. कमजोरी- हट्टी असू नय्रे व कार्य एकदम हळू गतीने करु नये.स्वार्थ व बदल्याची भावना मनात धरु नये, ज्याम्धे व्देष भरलेला असेल.

5. आरोग्य-  वृषभ जातकांस साधारण्पणे उत्तम आरोग्य लाभते. यांच्यामधे इतर मानवीय शक्ती असते तांत्रीक अथवा पश्चिमी व्यवसायांस उत्तम असते. ते ईतरांपेक्षा अधिक कष्ट सोसू शकतात. त्यांना दुखवण्यारेबद्दल कमी भावुकता असते, व ते शारिरिक अक्षमता मनाने स्वीकारु शकत नाहीत. व कोणाला काही न सांगता अधिक काळ दु:खी राहतात. आजारी पडले तर हळ्हळू आरोग्य सुधारते. टॊन्सिल्स, गळा, जिभेचा टाळू, अपचन, हाय ब्लड प्रेशर, कोड, नेत्र रोग ई. वाढत्या वयाबरोबर वाढत जाऊ शकतात.

6. धन व संपत्ती- वृषभ जातक धैर्य व परिश्रम युक्त असतात. हे धन्संचय करताना धन गाडून अथवा लपवून ठेवू शकतात. खर्च करताना आवश्यकतेचा विचार करतात. धनसंचय असला तरी हिशोबीपणे कार्य करतात व जोखीम न घेता पैसा सुरक्षित ठेवतात. व अनावश्यक अपव्यय करत नाहीत. वृषभ पासून २ रे व ५ वे स्थानाचा अधिपती बुध असल्याने संबंधित दशेत सट्टा खेळण्याकडे कल असू शकतो. भाग्याने त्यांना बुधाच्या दशेत सफ़लता मिळते, यात संघर्ष करावा लागला तरी पैसा हाती येतो.सामान्यपणे शनी पापग्रह मानला जातो पण वृषभ जातकास शनी जातकाने पूर्व जन्मामधे कोणकोणते गुण संपन्न केले आहेतव या जन्मात काय भाग्य रुपाने प्राप्त करणार आहे हे दर्शवणार्या ९ व १० व्या स्थानाचा अधिपती असल्याने शुभ फ़ळ देतो.

7. नोकरी वा व्यवसाय- वृषभ जातक भौतिक संपत्तीसाठी काम करतात. ते जमिनीकरता खर्च करु शकतील वा जमिनीचा, फ़ळे, फ़ूल, चहा, कॊफ़ी, ई. संबंधित व्यवसाय करतील. त्यांचे आसपास बाग बगिचे वा वनराई असेल. बुध हे दर्शव्तो की त्यांच्याजवळ दुसर्यांकरता देखील पैसा असेल म्हणून ते दलाल, कमिशन एजंट असु शकतात.

ते कार्यशील राहून पाया मजबूत बनवण्याचा प्रयत्न करतात व आपल्या प्राप्तीची पूर्ण गुंतवणूक न करता शिल्लक ठेवुन सफ़लताचे बचतीशी मूल्यांकन करतात.

वृषभ जातक आरामयुक्त असल्याने जीवनात संपूर्ण आनंद प्राप्त करण्याची ईच्छा ठेवतात. राशि स्वामी शुक्र असल्याने‘ ते विलासी, लक्झुरियस वस्तूंचा व्यापार करु शकतात. सौन्दर्यवर्धक वस्तू, सुगंधित अत्तर, हिरे, जवाहिराचे व्यापारी असू शकतात. राशी चक्रातील २ री राशी असल्याने व दुसरे स्थान वित्त दाखवत असल्याने बैंक मालक, अथवा कंपनी व्यवस्थापन मंडळ, स्टॊक दलाल, खजांची, सट्टेबाज, जुगार चालक, रेस लावणारे असू शकतात. 

शुक्र कला, संगीत, आनंद व सामाजिक सफ़लताचा द्योतक आहे.म्हणून जातक संगीत क्षेत्रात, अभिनेता, फ़िल्म निर्माता, थि‘एटर मालक असू शकतो.

बिल कलेक्टर, रेव्हेन्यू कलेक्टर किंवा त्या विभागात नोकरी, धरण बांधणारा, शिंपी, केमिस्ट, पेंटर, डेकोरेटर, वीमा एजंट, मोटर चालक, टैक्सीचालक, मालक, ट्रन्स्पोर्टर, काच, अभ्रकम प्लास्टिक, रबर, तांदुळ, पशू, दुध डेअरी फ़ार्म, आईस्क्रीम, चांदी, कापूस, पेट्रोल, ऊस व साखर ई. संबंधित व्यवसाय संबंधित ग्रह वृषभ राशी शी संबंधित असताना दर्शविले जातात.

शुक गृह स्त्री ग्रह आहे. वृषभ पण स्त्री राशि जाहे म्हणून कोणी कन्या विद्यालया मध्ये व लेडीज क्लब, कोर्ट, आयकर, विक्रीकर विभाग, इत्यादि मध्ये नोकरी करू शकतो.. कानामध्ये एरिंग, बांगड्या, पड्याष्ठ, औहै, बामडे, ईअरिंग, बांगड्या, सौंदर्य प्रसाधने, पार्लर, वधुवर सुचक ई. व्यापार देखिल शुक द्वारे प्रदर्शित होतात.

अचुकता ज्योतिषावर निर्भर करते की वृषभ राशीशी संबंधित ग्रहाची स्थिती, नक्षत्र, दृष्टी ई संबंध तपासून मग अनुमान काढावे.

उदा. गरम दूध विक्रेता असेल तर वृषभ राशीशी चंद्र व अग्निमय ग्रह मंगळाचा संबंध असेल. आईस्क्रीम विक्रेता असेल तर चंद्र शुक्र व थंड ग्रह शनीचा संबंध असेल ई.

8. कौटुंबिक-. वृषभ पुरुष जातक उत्तम पदावर व स्त्री उत्तम गृहिणी असते. हे आनंदमय व अनुकुल जीवन व्यतीत करतात. यांना घरीच आराम, सुख व शांती मिळते. त्यांना जन्मभूमी पसंत असते व शांती, आनंद, समृद्धी, प्रसिद्धी, मान त्यांना पुष्कळ प्राप्त होतो. लोकांना खाऊ घालणे पार्टी देणे यांना आवडते. अतिथीने त्यांचे कौतुक करावे असे वाटते. हे घर कलात्मक फ़र्निचर, झाडॆ, ई याने सजवतात, स्वच्छ, उत्तम ठेवतात. 

9. वैवाहिक- वृषभ जातक सामन्यपणे जोडीदाराची निवड करताना निश्चय करण्यास जास्त वेळ घेतात.पृथ्वी तत्वाची राशी असल्याने यांना पृथ्वी व जलतत्वाचे जोडीदार योग्य ठरतील. (वॄषभ, कन्या, मकर, कर्क, वृश्चिक, मीन) शांती, आनंद, एकता यानी जीवन व्यतीत होईल. रसिक व प्रेमी असतील. प्रेम करत असतील तर शेवटपर्यंत विश्वसनीय राहतील. भावना व विचार गहन असतात. भांडन आवडत नाही व शंकेचा त्यांना राग येतो. वृषभ जातक पुरुषाची पत्नी प्रेमळ असू शकते. पण या राशीत जन्मलेल्य स्त्री चा पती पुष्कळ प्रेमळ व स्त्री रसिक असते. प्रेम त्यांच्यकरत वास्तविक असते. हे आपली सामाजिक व आर्थिक जबाबदारी पूर्ण करतील. दयाळू व प्रेमळ व्यवहार करणारे असतात. घटस्फ़ोट फ़ार कमी होतात.हे अपरिमित दु:ख सहन करतील पण जोडीदाराला कष्ट होऊ देत नाहीत. हे जोडीदारास उत्तम जागा, प्रेम व उत्तम सांभाळ प्रदान करतात. जोडीदाराची मागणी पूर्ण करण्यात यांना आनंद वाटतो. यांचे जोडीदार उच्च घरातील असतात व शक्यतो अनोळखी जोडीदार मिळतो. कारण ७ वे स्थानाची स्वामी १२ वे स्थानाचा पण अधिपती असतो. हे आपले पारिवारिक जीवन विस्कटलेले पसंत करत नाहीत. कोणत्याही गोष्टी चा पश्चत्तप ही करत नाहीत आणी तारुण्यात केलेल्या मौज मजेचा परिणाम ही होऊ देत नाहीत. वॄषभ जातकाची पत्नी पती व भाऊ दोन्हीचा सन्वय साधते. त्यांना पती प्रेमाबद्दल शंका वाटू शकते, पण स्वत:चे रहस्य सांगत नाहीत.

10. संतती- वृषभ आपल्या मुलांच्या बाबतीत काहीवेळा कठोर असतात. पण त्यांची भावना चांगली असते. संतती आइ वडील व मोठे यांना मान देतात. मुले सुदृढ व बुद्धिमान असतात.

11. भाग्य दिवस- सामान्यपणे शुकुवार भाग्यशाली , बुधवारला मोठ्यात मोठी सफलता मिष्ठते . शनिवार विलंब करतो पण निराश करत नाही व शेवटी सफ़लता देतो.  छोटे प्रवास वा आनंददायक पत्रव्यवहार दर्शवतो. रविवार आवडीच्या गोष्टीत रमतो. मंगळ्वार मनोरंजनात अथवा वेळ वायफ़ळ जातो.

12. भाग्य रंग – गुलाबी, हिरवा, पांढरा,

13. भाग्य रत्न- नीलम, हीरा, पन्ना.

14. भाग्यशाली अंक- ६ ५ ८

-ज्योतिषमित्रमिलिंद (७०५८११५९४७) Whatsapp only

Fire More info : Visit : jyotishmitramilnd.in

2 thoughts on “वृषभ राशीफ़ल ( Vrushabh Rashiphal )

  1. खूप खूप धन्यवाद भाऊजी,खूपच मार्गदर्शक अशी वृषभेची माहिती आहे😊🙏💐💐

    Liked by 1 person

Leave a reply to अनिता जगदाळे, फलटण Cancel reply