मिथुन राशीफ़ल ( Mithun Rashiphal )


) मिथुन

ही राशी चक्रातील ३ री राशी आहे. मृग नक्ष्त्राचे ३ रे व ४ थे चरण, आर्द्रा व पुनर्वसूचा १ ला व २ रा चरण या राशी मधे येतात. ही पुरुष, सकारात्मक, मूक, जुळी, निष्फ़ळ, व्दि, वायु राशी आहे. मिथुन राशीचा अधिपती बुध हा बुद्धिमान स्त्री ग्रह आहे. गुरु या राशीमधे कमजोर असतो कारण ही त्याची राशी धनु पासून सातवा असतो. शनी शुक्र करता ही मित्र राशी आहे व अन्य ग्रहांकरता शत्रू राशी आहे.

1. शारिरिक आकृती- मिथुन राशीचे जातकाचे उंच, सरळ शरीर व हात लांब असतात. पाय सडपातळ असतात व शीरा दिसतात. रंगरुप सामान्य, सुंदर व निमगोरा असतो. लग्नी जो ग्रह स्थित असतो त्याप्रमाणे बदल होतात. डोळे भुरे, तेजस्वी व क्रियाशील नजर असते, नाक लांब असते.

2. विशेषता- वायु राशी असल्याने हे जातक मनामधे भरतात. हे बेफ़िकीर, आनंद्युक्त व काहीसे अनिच्छ असतात. यांचा मेंदू सकारात्मक असून नेहमी परिवर्तनाकडे ओढा असतो. हे जातक लिहिणे, वाचणे व पत्रव्यवहार अधिक पसंत करतात. हे लोकांना समज देण्याची बुद्धी ठेवतात व परिस्थितीचा सामना करण्यास दृढ असतात. हे एखाद्याचे गुण व अवगुण याचे मुल्यांकन करण्याचे प्रयत्न करतात पण त्यानुसार योग्य उपाय करु शकत नाहीत.

व्दिस्वभाव व राशी चक्राची ३ री राशी असल्याने हे जातक प्रवास करणे पसंत करतात. नेहमी छोटे प्रवास घडत राहतात. हे क्रियाशील व तल्लख मेंदूचे असतात. हे कोण्त्याही बाबतीत फ़ायदा व नुकसान याबाबत विचार करत राहतात व त्यामुळे कोणताही निर्णय ठामपणे घेऊ शकत नाहीत.

मिथुन पुरुष जातक घाई करणारे असतात व व्दिराशी असल्याने अनेक उद्योग करु शकतात व नव्या वातावरणात सामावतात, पण  यांनी अतिशयोक्ती करणे सोडावयास हवे. कधीकधी फ़ार भाऊक व उदार होतात. एरवी प्रत्येक कार्य बुद्धिमत्तापूर्ण करतात. त्यांच्या आयुष्यात नेहमी व्दंद्व चालू असते. यांचे दोष सांगायचे झाले तर अवद्न्या अस्थिरता, लहरीपणा, काम अर्धवट सोडणे हे आहेत. यांना आपण ईच्छा केलेल्या गोष्टी त्वरीत प्राप्त व्हाव्यात असे वाटत असते. एखादे रोप लावले तर, पाणी घालतील, थोडीफ़ार सेवा करतील व खणून पाह्तील की, ते रोप वाढलेय का कोमेजलय. अन्य व्यक्तीपेक्षा यांचा आयुष्यात घटना जलद गतीने घडतात.

राशी स्वामी बुध असल्याने व वायुराशी असल्याने पुष्कळ उत्सुकता ठेवणारा असतो व वास्तव शोधण्यासाठी, सर्व गोष्टींची गंभीरपणे डोकेफ़ोड करणारा असतो. असा कोणी असेल तर उत्तम गुप्तहेर, एक चतुर पत्रकार होऊ शकतो. अनेक भाषांमधे निपूण असू शकतो. ते कोणत्याही गोष्टीमधे लक्ष देऊन एकाग्र होणे अवघड असते. बुद्धीच्या जोरावर निभावून नेतात व रास बिघडली असेल तर विस्मरण, लक्षात न राहणे असे घडू शकते.

जर जन्मकाळी लग्नी बुध वक्री असला तर जातक वासतव ते पासून दूर राहतो. जे पाहिले वा अनुभवले त्यावर त्यांचा विश्वास बसत नाही. त्यांचा दृष्टिकोण तार्किक असेल. दुसरेची विचारधारा समजून त्यानुसार आपले वागणे ठरवतात. ते बुद्धीचा चतुराईने वापर करतात व खूप प्रश्न विचारतात व हवी असलेली माहिती काढून घेतात. ते समोरच्या व्यक्तीची आवड नावड, कमजोरी पटकन ओळखू शकतात. व त्याचा बुद्धीने वापर करुन घेतात. त्यांचा स्वभाव प्रशासकाचा असतो. उत्तम विनोदी असू शकतो.

3. कमजोरी- ते सहज कार्य करु शकतात पण कोणी प्रतिस्पर्धी त्यांना आवडत नाही. व्दिस्वभाव राशी असल्याने त्यांना उदार व कंजूस दोन्ही बनवते. ते जर हिंमत करतील तर साहसी कृत्य व क्रियाशील व्यवहार करतील तरी ते साशंक व हताश झालेले असतील. त्यांच्या विशेषतांना समजणे फ़ार कठीण काम आहे. ते भावनेपोटी एखादे काम हाती घेतील पण ते कोणत्याही प्रकारचे दु:ख वा कष्ट सहन करु शकत नाहीत. ज्या वातावरणात राहतात तशी विचारसरणी होते. भिन्न ठिकाणी फ़िरत राहतात व त्याप्रमाणे सानिध्यात येणारे प्रमाणे विचारसरणी बदलतात. ते नियम, संयम, एकनिष्ठ्पणा या गोष्टी पाळत नाहीत. ते असे वागतात जे अकल्पित व अचानक असेल.

4. धन व संपत्ती- यांच्या आयुष्यात अनेक परिवर्तन होऊ शकतात. त्यांचे आयुष्य हे धनवान वा अभागी पण असू शकते आणि यांना भिन्न लिंगी जोडीदार कसा प्रभाव टाकतो यावर अवलंबून असते. ते आपल्या जोवनात संपन्नता व अभाव दोन्हीचा अनुभव करतील. पारिवारिक भांडणे होतील. व हे जातक आपल्या वडीलांच्या मताशी वा कार्यपद्धतीशी सहसा सहमत नसतात.

5. नोकरी व्यवसाय- अकाऊंटंट, कारकून, व्यापारी, यात्री, विक्रेता, एजंट, प्रतिनिधी, संपादक, गुप्तहेर , पत्रकार, व्याख्याता, कायदा सल्लागार, अटेंडंट, पोस्ट खाते, इंजिनीयरींग, सजावटकार, अध्यापक, प्रोफ़ेसर, गणिती, प्रिंटींग प्रेस, गाईड, फ़ोटोग्राफ़र, ट्रान्स्पोर्ट, रेल्वे वायुसेवा, सेक्रेटरी, पी.ए., क्लब व्यवस्थापक, कर्जांचा हिशोबनीस, अनुवादक, वकील, सायकल स्कूटर व्यापारी, स्टेशनरी व्यवसाय, ठेकेदार, दुतावास अधिकारी, विदेश वाणिज्य अधिकारी ई. यांचे साठी एखाद्या नोकरीत वा व्यवसायात टिकून राहणे हेच महत्वाचे ठरते.

6. आरोग्य- मिथुन जातक हे सामान्यपणे अनावश्यक, टाळता न येणार्या गोष्टी व चिंता, हताश मन यामुळे आपले आरोग्य खराब करुन घेतात. ते जर मानसिक आंदोलने टाळू शकले तर आरोग्य उत्तम राहील. त्यांनी अधिक कार्य हाती घेऊन ताण वाढवू नये. झेपेल एवढेच कार्य करावे. मिथुन फ़ुप्फ़ुस व श्वास संबंधी प्रभाव दर्शवतो. यांनी पुरेसा आराम, अधिक व्यायाम, ताजी हवा, अधिक स्वास क्रिया, उत्तम भोजन, शारिरिक व मानसैक संतुलन ठेवावयास हवे. यांना सर्दी, नाक वाहणे, फ़्लू, दमा, टीबी यासारखे त्रास होऊ शकतात. मिथुन रास खांदे व दंड दर्शवतात जे दुखण्याचे त्रास उद्भवू शकतात. मिथुन पासून ६वी राशी वृश्चिक असल्याने मूत्र, मस, इंद्रियविषयक आजार, ताप वा शरीर स्थानामधे विषबाधा संभवते जर पीडीत असेल तर धमन्यांमधे रोग, वा वृश्चिक व्दारे होणारे रोग होऊ शकतात, कारण मिथुन राशीचे रोग स्थान वृश्चिक आहे.

7. कौटूंबिक- मिथुन जातक नेहमी व्यस्त राहतील, कारण त्यांचे व्यापारी सहकारी, ग्राहक, नातेवाईक, मित्र यांचा त्यांचेकडे नेहमी राबता असेल. ते त्यांचे मनोरंजन करतील. जरी ते काही गोष्टी वाढवून सांगणारे असतील तरी आपल्या परिवाराची उत्तम व्यवस्था ठेवतील. त्यांना आपल्या घराची सजावट करणे आवडते व अत्यंत अधुनिक ढंगाने राहतील. जर घरमालक संकुचित विचारांचा असेल तर ते त्याला सहन करत नाहीत व मनासारखे घर मिळत नाही तोपर्यंत घर बदलत राहतील. मिथुन जातक निष्कारण बसणे पसंत करत नाहीत. व नेहमी घरामधे नाविन्य आणण्याचा प्रयत्न करत राहतात. परिवाराल आनंद द्यायचा प्रयत्न करतात. व घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न  करतात.

8. प्रेम- मिथुन जातक कोणाशीही मैत्री करण्यायोग्य असतात व लवकरात लवकर एकमेकांस दोष ही देऊ लागतात. हेच कारण आहे की समाधानकारक मित्रांची निवड करण्यात वा टिकवण्यात असफ़ल ठरतात. मैत्री साठी उत्सुक असतात पण कोणतेही बंधन स्वीकारणे त्यांना मंजूर नसते. आयुष्यात विभिन्नतेस प्राधान्य देतात व जितका आधिक लोकांशी मैत्री, प्रेम करु तेव्ढे प्रसन्न राहू असे काही जणांना वाटत असते. किंवा मन दोन व्यक्तीत विभागले जाते. या लोकांना सरळ रीतीने समजून घेणे कठीण असते. मिथुन जातक स्वत:च त्यांच्या पतनाचा मार्ग तयार करतात. त्यांचे प्रेम संबंधी गुप्त गोष्टी ( जर मंगळ, शुक्र, शनि ६, ८, १२ वे स्थानी असतील ) त्यांना ओढ व नुकसान दोन्ही देतो. काही बिघडलेल्या स्थितीत गर्भ राहू शकतो जो दु:ख व डोकेदुखीचे कारण ठरु शकतो.

9. वैवाहिक- विवाह त्यांचेकरता उत्साहवर्धक क्षण असतो. ते भाग्यशाली आहेत ज्यांचे जोडीदार दृढ असतात. जर जोडीदार सामान्य बुद्धीचा असेल तर यांचे वैवाहिक जीवन प्रसन्न व सफ़ल असते. दोघेही छोट्या मोठ्या प्रवासचा आनंद घेतील. पण जोडीदारास सतर्क मेंदू व त्याचे कौतुक व लाड करण्यात चतुर असायला हवे. मिथुन जातकांना अशी बायको आवडेल जी त्याच्या ईच्छा समजून मान्य करेल. त्याचे जोडीदाराने त्यांस अत्यंत गंभिर रुपाने घ्यावयास हवे व इतर लोकांकडे लक्ष देऊ नये. त्यांना जर अशी आशंका आली व खात्री झाली तर कोणत्याही प्रेमांस एकदम समाप्त करतात व असा विचार करतील की यावर व्यर्थ वेळ, पैसा खर्च करणे नुकसानकारक आहे. त्यांना जर आढळले की आपली पत्नी अधिकार गाजवते तर ते घरापासून लांब राहतील, कारण ते अशा पत्नीचा दबाव व स्वभाव सहन करु शकत नाहीत.मिथुन जातक आपाल्या जोडीदाराला एकटे सोडतील जर त्यांना तो आवडत नसेल व प्रेमभावनेपेक्षा मेंदूव्दारा अधिक नियंत्रित राहतील. ते प्रेमांस बुद्धीच्या दृष्टिकोणातून पाहतात व नेहमी चिडचिडे व तिरकस असतात.

मिथुन जातकाची पत्नी विवाह झाल्यावरही बाहेरच्या गोष्टी सोडत नाही विशेषकरुन जेव्हा ती नोकरी करत असते. तिचा पती तिच्यावर यासाठी नाराज राहील तर तिला ते सहन होणार नाही. तिला याबाबतीत अधिक चतुर असायला हवे. तिला जर प्रसन्नतापूर्वक आयुष्य घालवायचे असेल तर जसजसा काळ जाईल तसे ती अनुभव करेल की दोन्ही पैकी एका गोष्टिवर पाणी सोडावे लागेल. जर नोकरी करायची असेल तर पतीच्या अनिच्छेकडे दुर्लक्ष करेल आणि जर सन्मानपूर्वक वैवाहिक आयुष्य जगायचे ठरवेल तर नोकरी सोडावी लागेल. ती पुष्कळ आधुनिक असेल. स्वत:चे घर नीट्नेटके ठेवेल पण अनेक अधुनिक वस्तू खरेदी करेल.

मिथुन जातकांस तुळ व कुंभ राशी विवाहयोग्य योग्य असतील कारण या तिन्ही वायू राशी एकमेकांवर त्रिकोण अथवा नवपंचम योग दृष्टी ठेवतात. मेष व सिंह सुद्धा चालू शकतील. तुळ व कुंभ राशीवाले आपल्या मिथुन जोडीदारास प्रसन्न ठेवायचा प्रयत्न करतात त्याप्रमाणे सिंह जातकाने आपला अहंकार नियंत्रित ठेवला तर सुखकर राहील. मेष जातक सांस्कृतिक स्तरावर थोडे कमजोर असतात अन्यथा ते प्रसन्न राहतात. मिथुन जातकास ओळखण्याची उत्सुकता व व्यवहार त्यांनी सोडून द्यावयास हवा किंवा जोडीदारास दु:ख पोहोचेल. अन्य लोकांशी संबंध कमी ठेवल्यास व आपले वओवाहिक आयुष्यास आग लागेल असे काही न वागल्यास चांगले जमेल. कारण मेष अग्नी राशि असून मिथून वायु राशी असल्याने भडकावतो किंवा विझवतो.

10. संतती- मिथुन जातकांना त्यांची मुले आवडतात, कारण त्यांचेकडून त्यांना प्रेम मिळते पण ते त्यांचेसाठी पितृत्व अथवा मातृत्व व्यवहार करणारे होऊ शकत नाहीत. त्यांना मुलांचा सांभाळ करणे त्रासदायक वाटू शकते. त्यांनी आपल्या मुलांचा नीट व सावधानीने व संरक्षित सांभाळ करावयास हवा. त्यांचे डोके फ़ार संवेदनशील असते व आई वडिलांनी काळजी घ्यावयास हवी की ते सन्मार्गावर राह्तील. त्यांना आत्मभान जास्त असते त्यांचेवर चुका थोपवण्याचा प्रयत्न केला तर ते ऐकणार नाहीत.

11. भाग्य दिवस-  गुरुवार व बुधवार भाग्यशाली, शुक्रवारी आनंददायक व मौजेखातर खर्च होतील. शनीवारी अडचणी येतील व नुकसानदायक, रविवारी प्रवास व पत्रव्यवहार होतील, सोमवारी धनप्राप्ती होईल,  मंगळवार विचारांत विविधता असेल व वाद होऊ शकतात, शत्रूवर विजय मिळेल

12. भाग्य रंग- हिरवा, पिवळा, निळा (लाल रंग टाळावा)

12- माग्य रत्न- पाचू, पन्ना, पोवळा, नीलम

13- भाग्यशाली अंक- 14, 12

-ज्योतिषमित्रमिलिंद (७०५८११५९४७) Whatsapp only

Fire More info : Visit : jyotishmitramilnd.in

2 thoughts on “मिथुन राशीफ़ल ( Mithun Rashiphal )

Leave a comment