कर्क राशीफ़ल ( Kark Rashiphal )


) कर्क

कर्क ही राशी चक्रातील ४ क्रमांकाची राशी आहे.पुनर्वसू चे ४थे चरण, पुष्य व आश्लेशा ही नक्षत्रे यात येतात. जल, चर, मूक, फ़लदायी,  दीर्घ उदीत, स्त्री राशी आहे. या राशीचा अधिपती चंद्र आहे. ह्या राशी मधे गुरु उच्च असतो. मंगळ निचेचा असतो. सूर्याची मित्र राशि आहे तर बुध, शुक्र, शनी करता शत्रू राशी आहे.

1. शारिरिक आकृती- कर्क जातकाचे शरीराचा वरचे अंग मोठे होत जाते. कानाच्या मधील चेहरा रुंद, व तोंड मोठे होते, दात सुंदर व शुभ्र असतात. केस भुरकट व शारिरिक रंग निमगोरा असतो. शरीराच्या वरच्या अंगापेक्षा पाय थोडे कृश असतात. पूर्ण शरीर भारी दिसते व चालताना पडल्यासारखे दिसतात. उंची साधारण असते. या राशीत स्थित ग्रहाप्रमाणे ठेवणीत बदल होईल.

2. विशेषता- कर्क जातकाचे जीवन परिवर्तनीय असते. त्यांचे जीवनामधे अनेक चढ उतार येतात याची चंद्र त्यांना उत्तम कल्पना देतो. विचित्र जगावेगळी दृष्य, गोष्टी व उत्साह त्यांना  आकर्षित करते.ते दुसर्याच्रे प्रकृतीस निभाऊन नेऊ शकतात व दुसर्याचे विचार लवकर समजू शकतात. ते भाऊक, सहानुभूती ठेवणारे व भावना प्रधान व रसिक असतात.

अत्याधिक भाऊकतेमुळे त्यांच्यात चिडचिडेपणा येऊ शकतो. ते लोकांना उत्तम स्थिती, धन किंवा सन्मानाकरता मार्गदर्शन करतात. चंद्रांच्या कलेप्रमाने कधी मानसिक स्थिती उच्च तर कधी खालावलेली असते. साधारणपणे यांना शारिरिक इजा होत राहतात. कर्क जातक मानसिक व नैतिक व्यवहारांमधे फ़ार चतुर असतो. त्यांचा स्वभाव परिवर्तनीय असतो. त्यांना राग लवकर येतो व लवकर शांत ही होऊ शकतो. कर्क राशी ४थे भावाची दर्शक असल्याने पारिवारिक ओढा दाखवते. कर्क जातक घर, परिवार व सुखसुविधांची ईच्छा ठेवतात. त्यांची स्मरण शक्ती तीव्र असते. विशेष रुपाने पारिवारिक गोष्टी चांगल्या लक्षात राहतात.कर्क जातक कुट्नीती कुशल वा स्वतंत्र विचारांचे व अनेक बाबतीत स्वतंत्र असू शकतात. क्रोध अल्पकाळ राहतो व कोणाच्या प्रती ईर्षा रहात नाही. कर्क जातक स्वत:ची संपत्ती, मिळकत बनवतात. कर्क राशीत पाप ग्रह हे दर्शवतात संपत्ती प्राप्त करतान संघर्ष करावा लागेल. हे देखील संभव आहे की नातेवाईक, सट्टा वा प्रेम संबंधांमुळे अथवा एखाद्या मनास आनंद देणार्या कामासाठी वडीलांची संपत्ती खर्च होऊ शकते. असा अनुभव जातकास आयुष्याच्या पूर्वार्धात येतील. जीवनाच्या उत्तरार्धात महान सफ़लता व समृद्धी प्राप्त होईल. सामान्य पणे अधिकांश कर्क जातकांस पैतृक संपत्ती, मिळकत, ई प्राप्त होतील. पण ते त्यांना अडचणी, बाधा व संघर्षानंतर प्राप्त होतात. मोठ्या वयात त्यांची मुले त्यांचे सुखाचे साधन असतात. कर्क राशी कोमल हृदय व सामान्य लोकांसाठीची राशी म्हटली जाते. कर्क राशीची उच्च कंपने त्यांना दूरची घटना पाहण्याची, जाणण्याची क्षमता व आंतरिक शक्ती देतात. त्यामुळे अध्यातिक मध्यस्तता, समुपदेशन असे गुण देतात. अनेक जादुगर, नकलाकार, अभिनेते या राशीत जन्मास येतात. सामान्यत: कर्क जातक भाऊक, शांत व अहंकारहीन असतात पण त्यांचे कडे दुर्लक्ष केले अथवा डिवचले तर मात्र मूडी व चिड्चिडे होतात.

ते लोक भाग्यवान असतील ज्यांचा जोडीदार कर्क राशीचा असेल. कर्क जातक प्रेमी व कल्पक असेल. कर्क जातक आपल्या गत आठवणीतील सुवर्ण क्षणांची आठवण करुन देतात व जोडीदारास प्रसन्न व उत्साही ठेवतात. . जन्मस्थ चंद्राची स्थिती व ईतर ग्रह यांचा अभ्यास करुन सूक्ष्म मुल्यांकन करता येईल. हे असीमित प्रेम देणारे असतात. यामुळे यांचे दोस्त व नातेवाईक यांचे सहवासामधे प्रसन्नता व आनंद अनुभवतात. कर्क जातक मानव सेवा करण्याकरता प्रसिद्ध असतात. कर्क राशि जलराशी असल्याने सरळ मार्गाने प्रभावित होतात परिस्थिती अशा प्रकारे मिसळू शकतात ज्याप्रमाणे पाणी भांड्यात असेल तर त्या भांड्याचा आकार घेऊन राहते पण स्वतंत्र आस्तित्व पण राहते. कर्क जातक दबून जात जात नाहीत. त्यांच्यावर कोणी दबाव आणायचा प्रयत्न केला तर, ते नेहमी हट्टी व दॄढ निश्चय वाले असतात व वाकत नाहीत. कर्क जातकाचे जीवन प्रवाहशील व आरामदायक असते भावना व कल्पनांमुळे कधीकधी रस्ता भटकतात. त्यांच्यामधे आवश्यक दिखावटीपणाची कमतरता असते. कर्क जातक जलद गतीने विचार करु शकतात. व योग्य वेळी योग्य रुपात एखादी गोष्ट वेळ पडली तर सोडू शकतात. कर्क जातकात जबाबदारीची जाणीव असते. एखादी योजना निश्चित केली तर त्यावर ठाम राह्तात व सफ़लता प्राप्त करतात. एका स्त्रोताव्दारे प्राप्ती करण्यापेक्षा अनेक मार्गांनी प्राप्ती करण्याकडे कल असतो. व्यवसायात धोका खाऊ शकतात. ते आयुष्यात अडचणींवर मात करतात पण सहजासहजी ते त्या विसरुन जात नाहीत. कर्क जातक साधारणत: भाग्यशाली असतात. दृष्टी व्यापक असते व स्पष्ट वक्ते असतात. ईतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची ईच्छा ठेवतात. अधिक प्राप्ती करु शकतात. कर्क जातक रुबाबदार व उदार असतात.

जन्मस्थ चंद्राची स्थिती व ईतर ग्रह यांचा अभ्यास करुन सूक्ष्म मुल्यांकन करता येईल.

3. कमजोरी- कर्क जातकास धैर्यशील असायला हवे. (कर्क राशीवर शनीची दृष्टी असेल अथवा कर्क लग्नि शनि स्थित असेल तर ते धैर्यवान, मंगळ असेल तर रागीट असतात.) कर्क जातकाने सहन्शक्ती वाढवणे, भाऊकता नियंत्रित करणे व आळ्स सोडणे गरजेचे आहे. अधिपती चंद्र असल्याने कर्क जातकाचे आरोग्य लहानपणी नरम राहते. पण वाढत्या वयाबरोबर प्रकृती चांगली होत राहते. कर्क रास छाती व पोट प्रदर्शित करते. स्वामी चंद्र मनाचा कारक असल्याने दु:ख अथवा चिंता दर्शवते त्यामुळे त्यांच्या शारिरिक चिंतांचे मूळ मानसिक असू शकते. त्यांना फ़ुप्फ़ुस व पचन, वायु दोष, श्वास नलिका, खोकला,  दमा, संधीवात, जलोदर, हिस्टेरिया, भयगंड, पित्त, पित्ताषय, कॊलर बोन, छातीवर सूज वा फ़ोड ई. संबंधी त्रास होऊ शकतात. ते जर आपला मेंदू नियंत्रित ठेवू शकले तर उत्तम भोजन व स्वास्थ्यरक्षणा व्दारा निरोगी असू शकतात व अधिक कष्ट करण्याची शक्ती प्राप्त करतात. त्यांना तरल पदार्थांबद्दल मोह वाटेल, परंतू त्यांनी तरल व मादक पदार्थ पेय सेवन करु नये. गळा वा घशा ची काळजी घ्यवयास हवी. आपली तहान पाण्यानेच भागते दारुने नव्हे हा कानमंत्र असावा. साधे जीवन व भोजन हा स्वास्थ्य रक्षणाचा सर्वोत्तम उपाय आहे. प्रवास अथवा परदेश वासात ईजा वा दुर्घटनेपासून सावध रहावे.

4. धन व संपत्ती- कर्क धनाच्या बाबतीत फ़ार सावधान असतात. ते स्वत: फ़ार ईमान्दारीने धन कमावतात व अन्य बेईमानी सहन करत नाहीत. ते पैशाचे मूल्य जाणतात व त्याची कदर करतात. मेहनत घेऊन व कल्पकतेने ते धनप्राप्ती करण्यात सफ़ल होतात. व धनसंचय करतात.

5. नोकरी व्यवसाय- कर्क राशिचा प्रभाव असणारे जातक साधारणत: भोजन व्यवसाय, व्यापारासाठी योग्य असतात. रेस्टॊरंट, कॊफ़ी टी हाऊस, जनरल स्टॊअर्स, खाऊची दुकाने, फ़ळ विक्रेते, फ़ूड कंपनीज मधे नोकरी व्यवसाय करु शकतात. नर्स, सुपर्वायजर, ठेकेदार, व्यवस्थापक, पुरातन वस्तू, इतिहास विभाग, जुन्या वस्तू खरेदी-विक्री अशा नोकरीत व्यवसायात असु शकतात.

जलराशी असल्याने हीरे, जवाहरात, मासळी, नावाडी, जहाज कप्तान, हाऊस बोट चालक, अण्वेशन विभाग, नौदल, मर्चंट नेव्ही, आयात-निर्यात, प्रवासी कंपन्या, दुग्ध पदार्थ संबंधी. तसेच त्या त्या ग्रहाच्या प्रभावाने उपदेशक, शिक्षक, वाकपटू, व्याख्याता, वैदिक साहित्य, राज्यमंत्री, प्रसिद्ध कलाकार, नकलाकार, समुपदेशक, सायकॊलॊजिस्ट, जलकंपन अधिकारी, विहीर, तलाव, समुद्राशी संबंधित ई. असू शकते.

6. आरोग्य- अधिपती चंद्र असल्याने कर्क जातकाचे आरोग्य लहानपणी नरम राहते. पण वाढत्या वयाबरोबर प्रकृती चांगली होत राहते. कर्क रास छाती व पोट प्रदर्शित करते. स्वामी चंद्र मनाचा कारक असल्याने दु:ख अथवा चिंता दर्शवते त्यामुळे त्यांच्या शारिरिक चिंतांचे मूळ मानसिक असू शकते. त्यांना फ़ुप्फ़ुस व पचन संबंधी त्रास होऊ शकतात.

7. कौटूंबिक- कर्क राशी ४थे भावाची दर्शक असल्याने पारिवारिक ओढा दाखवते. कर्क जातक घर, परिवार व सुखसुविधांची ईच्छा ठेवतात. त्यांची स्मरण शक्ती तीव्र असते. विशेष रुपाने पारिवारिक गोष्टी चांगल्या लक्षात राहतात. हे नेहमी आपल्या घरात व बगिच्यात रमतात. त्यांना एकटे राहण्यात आनंद मिळतो. ते वेगवेगळ्या गोष्टींचा संग्रह करतात. जरी प्रवास करत असले तरी घरीच आराम करने पसंत करतात. ते आनंददायक आयुष्य होण्यासाठी कष्ट घेतात, मित्रांना घरी बोलवून आपले समाधान होई पर्यंत त्यांची सरबराई करु शकतात. ते घरुन काम करणे पसंत करु शकतात. घरी वेगवेगळे पदार्थ बनवण्याची आवड असते, त्यामुळे कुटुंबिय प्रसन्न राहू शकतात.

8. प्रेम- कर्क जातकाचे जेव्हा कोणावर प्रेम जडते अथवा एखादी व्यक्ती आवडायला लागते तेव्हा ते जिद्दी व खरे प्रेमी असतात, जोपर्यंत तो अप्रिय वा कटू गोष्टी करत नाही. सामान्यपणे हे असीमित प्रेम देणारे असतात. यामुळे यांचे दोस्त व नातेवाईक यांचे सहवासामधे प्रसन्नता व आनंद अनुभवतात. कर्क जातक मानव सेवा करण्याकरता प्रसिद्ध असतात. कर्क जातक भाऊक व विनीत असतात व त्यामुळे चांगले मित्र लाभावेत असे वाटते, पण त्यांचे दीर्घ कालिन मित्र फ़ार कमी असतात. त्यामुळे लहरी व चिड्चिडे राहू शकतात. ते प्रेमात, आणि मैत्रीत फ़ार प्रामाणिक असतात व त्यांनी केलेले सहकार्य विसरत नाहीत. रसिकतापूर्ण आयुष्य त्यांना आवडते, ते प्रेमात आपल्य सुखसुविधा बाजूला ठेवतील पन ईमानदार प्रेमी सिद्ध होतील, ते आपल्या जोडीदारास मानसिक त्रास देऊ इच्छित नाहीत व त्यांचे प्रेम विश्वसनीय, खरे व मनापासून असते.

9. वैवाहिक- कर्क जातक आपल्या वैवाहिक व कौटुंबिक आनंद वाढवण्यात तत्पर असतो व घर व परिवाराचा फ़ार महत्वाचा सदस्य असतो. म्हणून विवाह त्यांना एक सुनिश्चित आयुष्य देतो. कर्क जातक पती प्रेमळ, समायोजनवाले, व सुविधा देणारे असतात. ते पत्नी नेहमी प्रसन्न ठेवतील, तरी अधुन्मधुन चिडचिड करु शकतात. ते अशी पत्नी निवडतील जी कुटुंबाचा आनंद व शांती टिकवण्याचा प्रयत्न करेल. कर्क जातकाचा आपल्या जोडीदाराकडे फ़ार ओढा असतो. व त्यामुळे त्याच्या कामामधे लुड्बुड करतात व प्रसंगी नाराजी ओढवून घेतात. कर्क जातक जोडीदाराबाबत पझेसिव्ह असतात.

कर्क जातक मुलगी प्रेमामधे फ़ार चतुर असते व पतीच्या चिंतनामधे लीन असते. कधीकधी लहरी बनते. ती पतीने दिलेल्या भेट वस्तूबाबत खूश असते. व मुलांसाठी उत्तम माता सिद्ध होते. ती योग्य गृहिणी, प्रेमळ, कर्तव्यपरायण, आनंददायी, विश्वसनीय व सहानुभुतीपुर्ण असते. उत्तम सहचारिणी असून जोडीदाराचे आत्मबल वाढवते.

10. संतती- कर्क जातक आपल्या मुलांना चांगले शिक्षण व संस्कार देण्याचा प्रयत्न करतात. आपल्या मुलांना सर्व सुविधा व आराम देण्याबाबत आग्रही असतात, त्यासाठी स्वत:च्या गरजा बाजूला ठेवण्याची त्यांची तयारी असते. मुलांच्या ईच्छेचा मान ठेवतात. त्यांची मुले देखील, त्याची जाण ठेवणारे, ऐकणारे, कर्तव्यपरायण व विश्वासपात्र असू शकतात. मुलांमधे सहनशक्ती, हिंमत व स्वातंत्र्य असू शकते. स्प्ष्टवक्ते, आपल्या अधिकारसाठी जागरुक, दु:खद घटनेने विचलित होणारे असू शकतात. मेंदू शांत, तेजस्वी, असून आत्म प्रशंसेपासून लांब राहणारे असतील.

11. भाग्य दिवस- सोमवार परिवर्तन व सफ़लता देईल. मंगळ्वार मनोरंजनास चांगला, कार्यमग्न, बुधवारी प्रवास, व पैसा गुंतवणूक व विनियोग साठी चांगला. गुरुवार संपर्क, ओव्हरड्राफ़्ट अकाऊंट, उच्च शिक्षणासाठी, समुद्र सफ़र, विदेशी लोक संपर्कासाठी चांगला. शुक्रवारी आनंद व लाभ मिळतो. शनिवार सावध कारण असमानता, विरोधी विचार, दबाव, भांडण, उशीर, व विपरीत परिणाम देऊ शकतो. रविवार घनिष्ठ संबंध जपण्याकरता लाभदायक.

12. भाग्य रंग- पांढरा, क्रीम कलर, लाल

12- माग्य रत्न- हीरा, मोती, जवाहर नीलम व मण्यांचा त्याग करावा

13- भाग्यशाली अंक- २, ७, ९ भाग्यशाली १, ३, ४, ६ चांगले ५ व ८ अनिष्ट

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

2 thoughts on “कर्क राशीफ़ल ( Kark Rashiphal )

Leave a reply to U. Sunil Cancel reply