मेष राशीफ़ळ ( Mesh Rashi Phal )


(1) मेष

मेष राशि चक्रातील प्रथम क्रमाकाची राशि आहे, ही अग्नी रास असून उग्र स्वभावाची आहे.  तसेच चतुष्पाद व निष्फ़ळ रास आहे. ही चर रास असून, पुरुष, सकारात्मक व लघु उदित रास आहे. मेंढा हे राशी चिन्ह मानले जाते. ही पूर्व दिशेची राशि म्हणविली जाते. मेष रास डोके व चेहरा दर्शवते.. राशि स्वामी मंगव्ठ आहे,

मेष लग्न रास अथवा चंद्र रास असलेली व्यक्ती उतावळ्या स्वभावाची, गुढ प्रिय व विध्वंसप्रिय, साहसी असते.

1- शारिरीक आकार या राशीमधे जन्मलेले व्यक्ति मध्यम उंचीवाले असतात, त्याचे शरीर दुबळे व मांसयुक्त असते. ते मजबूत ही नसतात व लट्ठही नसतात. रंगरूपाने गुलाबी व लांब मान व चेहरा असतो. त्याचे डोके वरुन रूद व हनुवटीकडे अरुंद असे असते. भुवया केसाळ व डोळे भुरे व तेजस्वी असतात. केस काळे व राठ असू शकतात.

2- मानसिक प्रवृत्ति या राशीमधे जन्मलेले व्यक्ति क्रियाशील व महत्वाकांक्षी, दृढ व प्रेरक असतात, जर लग्न पडित असेल ते उतावळे, आक्रमक व विध्वंसप्रिय, असतात. लाभदायक दृष्टी असल्यास आत्मविश्वासू व हिंमती असतात. उद्देश नेहमी उच्च असतो व साहसी असतात.

3- विशेषता या राशीमधे जन्मलेले व्यक्ति त्यांना सर्व बाबतीत पुढाकार मिळावा अशी आकांक्षा बाळगतात. ते अन्य लोकांच्या सल्ल्यावर अवलंबून रहात नाहीत, आपल्या स्वत:च्या निर्णयानुसार कार्य करतात ते कोणाच्या अधिनस्थ रहाणे पसंत करीत नाही. ते विचार व कार्याने नेता बनू पाहतात. लाभदायक दृष्टी असल्यास ते दुस-यांना मार्गदर्शन करणे, नियंत्रित करणे, य दुस-यावर प्रशासन करण्यामध्ये सुयोग्य असतात. सकारात्मक राशि असल्यामुळे निश्चयात्मकता व चारित्र्य शक्ति वेते अत्माविश्वासाने व शीघ्र गतीने कामे करतात. त्यापमध्ये प्रशासकीय योग्यता अधिक व तडजोड न करण्याची प्रवृत्ती असते. चर राशीचे असल्याने ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या बदलून टाकतात व संधी वाट पहात न बसता ते स्वत: संधी निर्माण करतात. अग्नी राशी असल्याने नुसता विचार करुन थांबत नाहीत तर लगेच त्याप्रमाणे कृती करण्यासाठी उत्सूक असतात. ते कोणत्याही नियतीचा, स्थितीचा सामना करण्यात सक्षम असतात, दुस-या करिता आपल्या व्यक्तिगत इच्छेचा त्याग करीत नाहीत. ते स्वत:च्या दृष्टिकोणावर अधिक भर देतात, ते ईतरांना- तुच्छ मानतात, ते अधिक आशावादी असतात, चौकटीच्या बाहेर जाऊन कार्य करणारे व व्यापाराकडे कल असतो. ते उडी घेण्यापुर्वी विचार करत अथवा डगमगत नाहीत. स्थिरता त्याचा गुण नाही. ते आपल्या हाताचे साहसिक कार्य पूर्ण करण्याचा आधीच दुस-याचे साहसिक कार्य हाती घेतील. ते साधनांपेक्षा परिणामांवर जास्त भर देतात.

जर ते कोणाचा अधिनस्थ असतील व नरम स्थिति असेल तरी देखिल ते कोणत्याही शाखेचे प्रमुख होऊ पाहतात, ते कोणतीही योजना लवकर बनवतात व अन्य लोकांना मार्गदर्शन करत कार्यास प्रवृत्त करतात.

जर एखाद्या ग्रहाने पीहित असेल तर भांडण वा वाद करण्यात तरबेज असतात व त्यांना नीट हाताळले नाही तर आक्रमक होतात व संतापतात. दुराग्रही, आक्रमक, घमंडी, अहंकारी, संतापी, भांडखोर, विध्वसंक बनतात.

4- आरोग्य सामान्य पणे स्वास्थय उत्तम बसते. स्पर्शजन्य रोगापासून ते मुक्त असतात व प्रतिकार शक्ती चांगली असते. कारण राशि स्वामी मगष्ठ असतो. परन्तु त्याना लहान सहान जखमा, खरचटणे वारंवार होते. कधी कधी दुर्घटनेत डॊक्यास मार लागू शक्तो, जे धोकादायक आहे, तरी सावधानता बाळगणे गरजेचे आहे, विशेष रूपाने जेव्हा ते कार चालवित असतील अथवा तीक्ष्ण हत्याराने कार्य करीत असतील. शक्तीप्रयोग व चपळता मुळे मेष राशीचे स्त्री व पुरुष दोघेही खेळाचे फ़ार शौकीन असतात., ते अधिक काळात समाप्त होणा-या खेळापेक्षा लवकर समाप्त होणा-या खेळामध्ये फार निपुण असतात,

मेष डोळ्यांची सुचक रास आहे. ६ वे स्थानी कन्या रास येते, त्यामुळे पचन क्रिया संबंधी त्रास दर्शवतो. ते डोकेदुखी, आगीमध्ये भाजणे, ज्वलनशील बीमारी, डोक्यावर घाव, वातशूळ, निद्रानाश, उच्चज्वर, पोटदुखी, लकवा, फिट्स चक्कर येणे, खाज, खरुज, देवी, हिवताप, मानसिक रोग वाहिणीमध्ये रक्त साचणे ई. रोग त्रास देऊ शकतात.

त्यांनी अधिक आराम, पुरेशी झोप, व भाजीपाला युक्त जेवण आवश्यक आहे. भावना कमी उद्दीपीत व नियंत्रिक करणे शिकले पाहीजे. दु:ख, उत्तेजना व क्रोध सोडायला हवा. उत्तेजक पदार्थ व मांसाहार शक्यतो टाळणे आवश्यक.

5-धन संपत्ती  मेष राशि जातकाना पुष्कष्ळशी संपत्ती प्राप्त होत नाही. परन्तु त्याची इच्छा अधिक कमविणे, व त्यानुसार प्रयत्न करण्याची असते. धन व संपत्ती उत्तेजित होऊन खरेदी व संपत्तीचा विनियोग केल्याने नुकसान होते. उद्याचा विचार न करता, चालू फ़ायद्याचा विचार करणाने नुकसान होते. मेष मध्ये पापग्रह असेल तर असे मानतात की सुरुवात घाईगडबडीत करतात व शेवट वादात होतो. ते आपला जमाखर्च कथीच मांडत नाहीत व नंतर त्यांना मेळ लागत नाही. योग्य मार्ग म्हणजे की काम करण्या आधी विचार करावा. ते दुस-याना बचत चा सल्ला देतील व स्व्त: त्याचे पालन करीत नाही.

6- प्रणय विवाह मेष रास स्पष्ट्वक्तेपणा व प्रेमामाध्ये उत्साही असते. उत्तम स्वभाव व प्रसन्नवदन भिन्न लिंगी व्यक्तीस आकर्षित करते. मेष राशिच्या स्त्रिया चतुर व स्वतंत्र असतील. जर रास पीडित असेल तर दिखावा करण्याविरुद्ध वास्तविक पारिवारिक वातावरणामध्ये रमते व ती नेहमी जापल्या परिवाराची स्तुति करेल, हव्यास व घमंड कमी आढळून येईल. ती नेह्मी आपल्या पति सहवासास उत्सुक असेल. ती नेहमी स्वत:ची प्रशंसा करेल.

जर मेष राशिच्या स्त्रिचा विवाह साधारण मनुष्याशी झाला तर सर्व बाबतीत तो त्याचावर अधिकार गाजवणारी व त्यास काबूत ठेवणारी असेल, कारण की यांचा स्वभाव आक्रमक असल्याने पति करिता धैर्य तसेच चतुर व्यवहार करता येणे हे जरुरी आहे. मेष स्त्रिया फार रोमांचक व उत्साही असतात.

सिंह अथवा धनु राशि मध्ये जन्मलेली व्यक्ती पति-पत्नीला दोघेही तोंड देण्यास सक्षम असतात. तुळ मध्ये जन्मलेले लोक मेषेला रसिकता कौशल्याने हाताळतील व शांती टिकवून ठेवतील.

मेष रास फ़ार वांछित प्रेमी सिद्ध होतील. ते साधारणपणे सुंदर, चतुर व उत्तम पत्नीची निवड करतात. ते उदारता, दानशीलता ला प्राधान्य देतात. मेष पती पैसे हाती नसताना देखील अधिक उधारीमध्ये खरेदी करु शक्तात. म्हणून ज्याचा विवाह मेष राशि वाल्या पतिशी होतो त्यानी पति अपरोक्ष पैसा वाचविण्याचा प्रयत्न करावा.

7- कौटुंबिक वातावरण मेष मध्ये उत्पन्न व्यक्ति आपले पर व कुटुंबावर प्रेम करतो. ते नेहमी आपल्या नातेवाईकांना बरोबर घेऊन राहतात. ते घरास स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न ही करतात. ते सर्वोत्तम आतिथ्य सत्कार करितात व उत्तम संगत करतात. त्यांना तो मित्रांची कमी कथी ही होणार नाही. ते नेहमी त्याना भेटत राहतात व त्यांना खुश ठेवतात जे त्यांना आवडतात.

8-व्यवसाय मेष मध्ये उत्पन्न व्यक्ति अशा प्रकारचे व्ययसाय जे मंगळाच्या अधिकारामधे येतात, एखादा ग्रह कोणाच्या कुंडलीमध्ये 2, 6 व 10 व्या स्थानात वा त्या स्थानांच्या अधिपति असल्याने मेषेशी अथवा मंगळाशी संबंधित असेल तर तो स्थळ सेना, अधिकारी, केप्टन, शिपाई, प्रतिरक्षा विभाग तस्य चिकित्सक, कसाई, न्हावी, पोलिस, पिलीस अधिकारी, औषध विक्रेता, मुख्य प्रशासक, चोर, सोनार, लोहार, शिंपी, चाकू सुरे विकणारा, स्वयंपाकी, ईस्त्री दुकान, स्वयंपाकी, सुतार, खेळाडू, बंदुक बनवणारे, मुष्टियोद्धा, लोखंडाच्या जागेत काम करणारा, फ़ायरमन, गुप्तहेर, मेकैनिक, पहेलवान, विटा व चुना चे काम करणारा, जमिनीचे व्यवहार करणारा, खेळ साहित्य विक्रेता, लाल रंगाचे साहित्य विकणारा, कंपनी, मिल कामगार ई. असू शकतो.

भाग्यकारक दिवस:मंगव्ठवार, शुक्रवार, शनिवार सोमवार रविवार साधारण ठीक बुधवार व गुरुवार खर्चिक व हानिकारक असतील,

१०भाग्यांक ९, ८, ६,

११-भाग्य रत्न- नीलम

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

8 thoughts on “मेष राशीफ़ळ ( Mesh Rashi Phal )

  1. मेष राशीबद्दल जे विश्लेशन केलेआहे.
    ते बरेच जुळणारे आहे.

    त्यामुळे आत्मपरीक्षण करता आले.
    धन्यवाद

    Liked by 1 person

Leave a comment