Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह)


Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह)
प्रत्येक क्षणावर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा वा ग्रहांचा प्रभाव असतो. व त्याप्रमाणे घटना घडताना त्याचे परिणाम अनुभवास येतात. असे कार्येश ग्रह जर शोधून काढता आले तर एखादे घटनेचा अंदाज वर्तवण्यात अधिक अचुकता येऊ शकते. कै. कृष्णमूर्तींनी आपल्या अथक संशोधनाने Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह) ही संकल्पना शोधून काढली. जन्मकालिन कुंडलीतील एखाद्या घटनेचे कार्येश ग्रह, घटना घडताना चे कार्येश ग्रह व त्यासंबंधी तळमळीने प्रश्न सोडवतानाचे कार्येश ग्रह हे सारखेच वा संबंधित असतात हे यामागिल तत्व आहे.
व याव्दारे जन्मकुंडली नसेल तरीही काही विवक्षित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हे मोठे दालन उघडले गेले आहे. काही नामांकित ज्योतिर्विदांनी या पद्धतीस कृ.प. मधील चमत्कार, जादूची कांडी वा यक्षिणीची कांडी अशी संबोधने बहाल केली आहेत.

खाली दिलेल्या नियमांप्रमाणे असलेले ग्रह प्रश्नवेळी क्रियाशील असतात.
१. L : प्रश्नवेळी चालू असलेल्या लग्नाचा स्वामी १००% फ़ळ देतो
२. S : प्रश्नवेळी असलेल्या चंद्र नक्षत्राचा स्वामी ७५% फ़ळ देतो
३. R : प्रश्नवेळी असलेल्या चंद्र राशीचा स्वामी ५०% फ़ळ देतो
४. D : प्रश्नवेळ दिवसाचा स्वामी (सुर्योदया पासून पुढील सुर्योदया पर्यंत) २५% फ़ळ देतो

या Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह) वापर अचुकतेसाठी अनेक प्रकारे केला जातो. काही ज्योतिषी प्रश्न कुंडली म्हणजेच प्रश्न सोडवतानाची अंशात्मक कुंडली व Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह) चा वा जन्मकुंडली व Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह) चा संयुक्त वापर करतात. काही प्रश्नात समजा एखादी गोष्टीचा आकारमान, रंग ई. ओळखायचे असल्यास वा घटना लवकर वा उशीरा घडणार असल्यास ग्रहाच्या नैसर्गिक कारकत्वाचा वापर करतात. मुलाला वा मुलीला किती % मार्क मिळू शकतात अशा प्रश्नांमधे ना उत्तरांचे पर्याय ठरवून त्यानुसार अंदाज वर्तवतात. चोराचे वर्णन, हरवलेली वस्तू, हरवलेली व्यक्ती, पुनर्मिलन, विवाह योग, संतती, दत्तक योग, घटस्फ़ोट, परदेश गमन, शस्त्रकिया कधी करावी पासून लॊटरी लागेल का पासून लाईट कधी येणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देता येऊ शकतात.
अशा पद्धतीने जन्म कुंडली देऊ शकणार नाही इतक्या सुक्ष्मतेने उत्तरे देता येऊ शकतात. पण माझ्या अनुभवाने उत्तरे तेव्हाच जास्त अचुक येतात जेव्हा जातकाची प्रश्न विचारण्याची आंतरिक व प्रामाणिक तळमळ, प्रश्न सोडवण्याची अचुक वेळ व ज्योतिषाचा अनुभव हे सारे जमून येते. तर मित्रांनो आपलेही काही असे प्रश्न असतील व जाणून घेण्याची तळमळ असेल तर नक्कीच या पद्धतीचा लाभ घेऊ शकता.

-ज्योतिष मित्र मिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

16 thoughts on “Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह)

  1. मिलिंद सर, आम्ही घेतला ना हा अनुभव . तुमच्या prediction ने आम्हाला खूप धीर मिळाला.🙏

    Liked by 1 person

  2. उत्तम पोस्ट सर . कृपया एखादी प्रश्न कुंडली ( केस स्टडी ) सादर केल्यास विषय जास्त चांगला समजेल .

    धन्यवाद !

    👏👏👍

    Liked by 1 person

    1. Manisha Bhavsar rulling planets madhe jar rahu Ani ketu astil tar nakkich mahtvache thartat. Karan rahu Ani ketu fal denyat itar grahanpeksha jast balwaan astat. Fak tyana swatachi ras naslyane konaya rashit nakshatra t ahe ityadi parikshan karave. Rulling planet madhe vakri grahanchya nakshatra t asnare grah vagalaavet.

      Like

Leave a reply to jyotish mitra milind Cancel reply