जन्मवेळी असलेले नक्षत्रा परत्वे फ़लित


भविष्यात काय फळ मिळेल हे जाणून घेण्याची उत्सुकता असणारे प्रत्येक पिढीत आहेत. काही जण या विषयावर फार गंभीर असतात तर काही जणांना विरंगुळा म्हणून फळ जाणून घ्यायची इच्छा असते.

यातील राशी भविष्य हा प्रकार फारच लोकप्रिय आहे. पण राशी च्या ही आधी आपल्या हिंदू विद्वानांनी नक्षत्र चक विकसित केले होते. राशी चक्रात ३६० अंशांचे १२ भाग विभागून ३० अंशाच्या राशी तयार होतात, त्याच प्रमाणे ३६० अंशांचे २७ भाग विभागून १३ अंश २० कलेची नक्षत्रे तयार होतात. यावरून लक्षात येईल की नक्षत्र फळे ही राशी फळांपेक्षा जास्त सूक्ष्म होत.

या दोन्ही चक्रांचा योग्य विचार व सांगड घालून जाणकार ज्योतिषी एक उत्तम भविष्यवेत्ता होतो. उत्तम अनुभव देणारी विशोत्तरी दशा पद्धत ही जन्म नक्षत्र नुसार निर्मित आहे, पण त्यांची फळे अभ्यासताना राशीं देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. असो.

आज आपण पाहणार आहोत की, जन्मवेळीं असलेल्या नक्षत्रा प्रमाणे एखाद्या व्यक्तीस काय फळ मिळू शकते.

ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)

१ अश्विनी नक्षत्र :
धनी, हसतमुख, सुंदर, बुद्दिमान, चाग्ले कपडे, दागिणे ची आवड, उत्तम शरीर, जनप्रिय, प्रत्येक कामात तर्बेज, परोपकारी, यशस्वी, वाहन एवं नोकर युक्त, भाग्योदय २० वर्ष नंतर , यशस्वी, ऐश्वर्य संपन्न, नम्र, स्पष्ट वक्ता, अस्थिर, चरित्रवान, उद्देशपूर्ति साठी काहीही करणारा, अशुभ ग्रह दशा मधे सूर्य, मंगल व् गुरु अंतरदशामधे शत्रु कष्ट, चोरी चे भय
२ भरणी नक्षत्र :
सत्यवादी, उत्तम स्वाथ्य,सन्मार्गी,, सुखी, स्त्रियांचे आकर्षण, अस्थिर मनोवृत्ति, परदेश प्रवासची इच्छा, दीर्घायु, शत्रुंजय, भाग्योदय २५ वर्ष नंतर, काही वेळा दुखापती होतात, मितभाषी, क्रूर व् कृतघ्न, नीच कर्म रत, अशुभ ग्रह दशा मधे व चन्द्र, राहू, शनि अंतरदशा मधे शत्रु, कष्ट, चोरी चे भय
३ कृतिका नक्षत्र :
कामी, कंजूस, मित्र नतेवाईकांशी मतभेद, हाती घेतलेले काम तडीस नेणारा, खाण्यापिण्याचा शौक़ीन, स्त्रियांशी मैत्री, स्वत:च्या पद्धतीने काम करणारा, बुद्दिमान, लोभी, प्रसिद्ध, तेजस्वी, आशावादी, चांगले व्यक्तिमत्व, दिसायला भव्य, भाग्योदय २९ वर्ष नंतर, अशुभ ग्रह दशा मधे व मंगल, गुरु, बुध अन्तर्दशा मधे शत्रु, कष्ट चोरी चे भय
४ रोहिणी नक्षत्र :
सुंदर आकर्षक, लोभस व्यक्तिमत्व, सत्य व मधुर भाषी, लोकप्रिय, कार्यक्षम, कलाकार, बुद्धिप्रधान, दृढ निश्चयी, रात्रीचा जन्म असल्यास खॊटे बोलणारा, कठोर मन, वासना जास्त, तीव्र स्मरण शक्ति, मोठे डोळे, रूद कपाळ, आळशी, भाग्योदय ३० वर्ष नंतर, अशुभ ग्रह दशा मधे राहू, शनि, केतु अंतर दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय
५ मृगशिरा नक्षत्र :
कामी, जलद चाल कोपी, चालाक, वादपटू, भित्रा विव्दान, संतान व मित्र युक्त, चंचल वृत्ति, अभिमानी, भाग्योदय २८ वर्ष नंतर, अशुभ ग्रह दशा मधे, गुरु, बुध, शुक्र अंतरदशा मधे शत्रू, कष्ट, चोरी चे भय
६ आद्रा नक्षत्र :
नम्र स्वभाव, बुद्दिमान, परिस्थितीशी सामना करणारा कमाई व खर्च सारखाच चांगल्या कामात रुची ठेवणारा विचलित मन, हलके विचार अल्पशिक्षित धार्मिक कामामधे प्रदर्शन करणारा फिटर वर्कर, फोरमेन, इंजिनीयर ई. भाग्योदय २५ वर्ष नंतर, अशुभ ग्रह दशा मधे शनि केतु सूर्य अंतर दशामधे शत्रु, कष्ट चोरी चे भय
७ पुनर्वसु नक्षत्र :
बुद्दिमान, विद्वान् शीतल स्वभाव खुप मित्र व संतती सुख युक्त, पांढरे रंगाची आवड, प्रवासाची आवड काव्य प्रेमी मातृ-पितृ भक्त, आनंदमय जीवन, कामात प्रसिद्धी, , स्वकर्मी पण परोपकारी, जास्त तहान लागते, अहंकारी दुष्ट, दुर्बुद्दी, मुर्ख भाग्योदय २४ वर्ष नंतर, अशुभ ग्रह दशा मधे बुध शुक्र चन्द्र अंतर दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय
८ पुष्य नक्षत्र :
बुद्दिमान, सुशील हुशार, धार्मिक, मदत करणारा,, अल्पसंतुष्ट, आकलनशक्ती, चतुर कार्यदक्ष, सुन्दर सत्यवादी, कुटुंब प्रेमी, विशाल ह्रदयी प्रवक्ता, कार्य कुशल, अतिथि प्रेमी करुण मन, कवि लेखक पत्रकार वकील अध्यन – अध्यापन क्षेत्राची आवड, प्रशासकिय कार्यात दक्ष वस्त्राभूषण नोकर वाहन युक्त भाग्योदय ३५ वर्ष नंतर, समाजिक प्रतिष्ठा प्राप्त, अशुभ ग्रह दशा मधे केतु, सूर्य व् मंगल अंतर मधे शत्रु कष्ट चोरी चे भय
९ आश्लेषा नक्षत्र :
सत्कर्मी, मोठे कुटुंब, साधू संतांची सेवा करणारा, स्वधुंदीत मग्न, फ़ायदा असेल तर नीती अनीती चा विचार न करणारा,, आप्तेष्टांशी मतभेद, मद्य प्रेमी, धूर्त लम्पट, चिडखोर, दुराचारी, निर्लज्ज, शत्रुंजय, औषध व्यापार मधे लाभ, परस्त्रीआसक्त भाग्योदय ३० वर्ष नंतर, अशुभ ग्रह दशा मधे शुक्र चन्द्र राहु अंतर दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय

१० मघा नक्षत्र :
धनवान, पत्नीप्रेमी, खुशहाल, आइ वडीलांची सेवा करणारा, चतुर, व्यवहार कुशल, व्यापारात लाभ, योजनाकार, कामसु अस्थिर चित्तवृत्ति, अत्यंत साहसी, अस्वास्थ्य, घमंडी, परिश्रमी, अहंकारी, स्त्रिआसक्त, व्यर्थ वाद विवाद करणारा, मुळापर्यंत जाण्याची क्षमता,भाग्योदय २५ वर्ष नंतर, अशुभ ग्रह दशा मधे सूर्य मंगल व् गुरु अंतर दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय
११ पूर्वा फाल्गुनी :
शत्रुंजय, हुशार, कामात निपुण, मृदु भाषी, मोठ्या लोकांत ऊठ्बस, स्त्रियांना आकर्षित करणारा, सरकारी कामाशी संबंधित, राजकीय वर्तुळात वावरणारा, दानी, वस्त्राभूषण वाहन, प्रवासाची आवड, धनवान संतान युक्त, नृत्य– संगीत प्रेमी, मिस्कील व खुषमस्करी, अधिक मित्र, कमावलेले शरीर, नेतृत्वाची आवड, भाग्योदय २८ – ३२ वर्ष दरम्यान, अशुभ ग्रह दशा मधे, चन्द्र राहु शनि अंतर दशा मधे शत्रु कष्ट व चोरी चे भय
१२ उत्तरा फाल्गुनी :
धन संचय करणारा, विलासी मर्दानी खेळाची आवड, कुशाग्र बुद्धि, मृदुभाषी, सत्यवचनी, मदत करणारा, अधिक संतती, मेहनती, पत्नी वाद घालणारा, भाग्योदय ३० – ३२ वर्ष दरम्यान, अशुभ ग्रह दशा मधे मंगल गुरु बुध अंतर दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय
१३ हस्त नक्षत्र :
जातीमधे नेता, मुखिया, विरोधकांना टक्क्र द्यायची क्षमता, चरित्र हीन, क्रोधी, मद्यप्रेमी, पत्नी ची तब्येत नाजूक व् संतती चुकीच्या संगतीने वाया जाण्याचा धोका, अशांत मन, भाग्यशाली, सम्मानित, किर्किरा स्वभाव, भाग्योदय ३०- ३२ वर्ष मधे, अशुभ ग्रह दशा मधे राहु शनि केतु अन्तर्दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय
१४ चित्रा नक्षत्र :
बुद्धिमान, साहसी, धनवान, दानी, सुशील, शरीर सुन्दर, स्त्री व् संतान सुख उत्तम, धार्मिक, आयुर्वेद वर विश्वास, सिव्हिल इंजिनीयरींग मधे रुची, सौंदर्य प्रसाधन प्रेमी, चित्रकला अभिनय, बहुमूल्य वस्तुं चा व्यापार, प्रभावी व्यक्तिमत्व, गायन गणित, लेखनकला ई गुणसंपन्न. भाग्योदय ३३ से ३८ वर्ष मधे. अशुभ ग्रह दशा मधे गुरु, बुध, शुक्र, अंतरदशा मधे शत्रु कष्ट व् चोरी चे भय
१५ स्वाति नक्षत्र :
समजंस, शीतल स्वभाव, मित्रवत, हुशार व कुशल व्यवसायी, बौद्धिक कार्यों द्वारा मनासारखा लाभ, यशस्वी, अर्धवट शिक्षण, आर्थिक द्रष्टया संपन्न व् ऐश्वर्यशाली, समाजात मान, इंजीनियर व् टेक्नीकल क्षेत्र, परोपकारी व् साधू संतांचि सेवा करणारा. भाग्योदय ३० से ३६ वर्ष मधे. अशुभ ग्रह दशा मधे शनि, केतु, सूर्य अंतरदशा मधे शत्रु कष्ट व् चोरी चे भय
१६ विशाखा नक्षत्र :
सुंदर, धनवान, कावेबाज, वाद घालणारा, लोभी, बोलण्यात हुशार, सामान्य बुद्धि, क्रोधी, अहंकारी, कामासक्त, मद्यप्रेमी, जुगारी, स्त्री आसक्त, पाप पुण्य न मानाणारा, मतलबी, अचानक धन प्राप्ती, शत्रुंजय, कष्ट्दायक जीवन, भाग्योदय २१-२८-३४ वर्ष मधे, अशुभ ग्रह दशा मधे बुध, शुक्र, चन्द्र, अंतर दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय
१७ अनुराधा नक्षत्र :
शक्तिशाली, स्थूल शरीर, धनवान, मान,सम्मान प्राप्त, कामात तरबेज, प्रवास करणारा, अस्थिर मनोवृत्ति, साहसी, पराक्रमी, यशस्वी, स्वावलंबी, सुन्दर व्यक्तिमत्व, खादाड, धार्मिक, अध्ययनशील, एकांत प्रिय, दानी सहिष्णु. सरकारी नोकरी, स्वार्थ साधणारा, मृदुभाषी, स्त्रियांना आकर्षित करणारा, भाग्योदय ३९ वर्ष नंतर. अशुभ ग्रह दशा मधे केतु सूर्य मंगल अंतर दशा मधे शत्रु कष्ट व् चोरी चे भय
१८ ज्येष्ठा नक्षत्र :
चतुर, कामात हुशार, खूप मित्र, संतोषी, शीतल स्वभाव, कलेची आवड, क्रोधी, धार्मिक स्त्री चा आदर करणारा, ,सुन्दर व्यतिमत्व, चांगली संतान, गृहस्थ जीवन सुख बरे, कवि, लेखक, पत्रकार, साहित्यकार, प्रशाशक, निरीक्षक, वकील चार्टर्ड एकाउंटेंट. २७,३१,४९ वर्ष आरोग्य जपा, अशुभ ग्रह दशा मधे शुक्र, चन्द्र, राहु, अन्तर्दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय
१९ मूळ नक्षत्र :
विशाल ह्रदय, गंभीर, धनी, समाजात मान, कमजोर स्वास्थ्य, वाकपटु, चतुर, धूर्त, स्वार्थी, वाचाल, लोकप्रिय, संतापी, सतत अडीअडचणी, भाग्योदय २७ या ३१ वें वर्ष मधे, अशुभ ग्रह दशा मधे सूर्य मंगल गुरु अंतर दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय
२० पूर्वाषाढा नक्षत्र :
बुद्धिमान, उपकारी, सगळ्यांचा मित्र, सर्व कामात हुशार, संतान सुख, उदार, स्वाभिमानी, शत्रूंजय, अधिक धन प्राप्ती बरी असुनसुद्धा अडत नाही, भाग्यशाली, कार्य कुशल, यशस्वी, पत्नी सुख चांगले, भाग्योदय २८ वें वर्ष मधे, अशुभ ग्रह दशा मधे चन्द्र, राहू, शनि अन्तर्दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय
२१ उत्तराषाढा नक्षत्र :
परोपकारी, मान सम्मान प्राप्त, हुशार, चतुर, बहादुर, संगीत प्रेमी, विनम्र, शांत स्वभाव, धार्मिक, सुखी, सर्व प्रिय, विद्वान, बुद्धिमान, मेहनती धनी, सट्टेबाजी चा शौक, कुसंगति चा धोका, कामुक, विनासायास धन प्राप्ति, भाग्योदय ३१ वें वर्ष मधे, अशुभ ग्रह दशा मधे मंगल, गुरु, बुध अंतरदशा मधे शत्रु, कष्ट, चोरी चे भय
२२ श्रवण नक्षत्र :
धनी, बडबड्या, बुद्धिमान, साहसी, प्रसिद्द, नेक, पत्नी सुन्दर, गणित, ज्योतिष आवड,, मनातले विचार ओळखणारा, १९ – २४ वे वर्ष खराब असू शकते, विवेकी, विद्वान, उच्च विचार, धार्मिक, उत्तम व्यक्तिमत्व, उच्च पदाधिकारी, काव्य, संगीत, सिनेमा मधे रूचि, अशुभ ग्रह दशा मधे राहु, शनि, केतु अन्तर्दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय
२३ धनिष्ठा नक्षत्र :
बंधू प्रेमी, धनवान, नेक, साहसी, सत्कर्मी, स्त्रियाम्ना आवडणारा, सरकारी संबंधित काम, दागिन्यांचा शौकिन, समाजात इज्जत व् मान, १५, १९, २३, वर्ष अशुभ, धर्मं कर्म मधे लिप्त, संपन्न, उदार, वासना ग्रस्त, कामुक, पत्नी ला दबकून राहणारा, लोभी, स्त्रियांवर खर्च, अशुभ ग्रह दशा मधे गुरु, बुध, शुक्र अंतर दशा मधे शत्रु, कष्ट, चोरी चे भय
२४ शततारका नक्षत्र :
धनवान, सत्यवादी, दानी, प्रसिद्द, सत्कर्मी, बुद्धिमान, हुशार, शत्रुंजय, इज्जतदार, सरकारी पद, सत्कार, परस्त्री आसक्त, २८ वे वर्ष विशेष महत्वपूर्ण, जुगार, व्यसनी, सट्टेबाज, साहसी, निडर, ज्योतिष प्रेमी, साधारण धन, अन्य व्यक्तीच्या धनाची लालसा, अशुभ ग्रह दशा मधे शनि केतु सूर्य अन्तर्दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय
२५ पूर्वाभाद्रपदा नक्षत्र :
धनवान, सुंदर, खुप बोलका, कुशल, झोप प्रिय, अनेक साथीदार, संतान सुख उतम, पटकन चिडणारा, कार्यदक्ष, चतुर, धूर्त, डरपोक, सहन शक्ति कमी, कामुकता, स्त्रियांकडुन धोका खाणारा, पत्नी चंचंल, गृहस्थ जीवन सामान्य, भाग्योदय १९ से २१ वर्ष मधे. अशुभ ग्रह दशा मधे बुध, शुक्र, चन्द्र अंतर दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय
२६ उत्तराभाद्रपदा नक्षत्र :
सुन्दर, पराक्रमी, साहसी, बुद्धिमान, रंग गोरा, वाचाल, दानी, शत्रुंजय, धार्मिक, धनवान, उदार, परोपकारी, सुखी, धन-धान्य व् संतती युक्त. अध्ययनशील, जबाबदार, लेखक, पत्रकार, संगीतज्ञ, सफल संसार, म्रदु भाषी पत्नी, भाग्योदय २७ से ३१ वर्ष दरम्यान. अशुभ ग्रह दशा मधे केतु, सूर्य, मंगल अन्तर्दशा मधे शत्रु कष्ट चोरी चे भय
२७ रेवती नक्षत्र :
आई वडीलांची जाण ठेवणारा, बुद्धिमान, साधू स्वभाव, तेज वाणी, व् मित्रांबरोबर खुश राहणारा, शरीर पुष्ट, निरोगी काया, साहसी, सर्वप्रिय, धनवान, सुपुत्रवान, कामातुर, सुन्दर, चतुर, कुशाग्रबुद्धि, सल्ला देण्यात हुशार, चांगला व्यापारी, कवि लेखक, पत्रकार, निबंधकार, कादंबरीकार स् दृढ निश्चयी, प्रतिभाशाली, सर्वगुण संम्पन्न, सुन्दर पत्नी वाला, चरित्रवान, गृहकर्तव्य तत्पर, मधुर भाषी. १७ वें, २१ वें, २४ वें वर्ष अशुभ. अशुभ ग्रह दशा मधे शुक्र- चन्द्र राहु अन्तर्दशा मधे शत्रु कष्ट चोरी भय

-ज्योतिषमित्रमिलिंद

Leave a comment