
विंशोत्तरी दशा पद्धति :
आयुष्यातील चढ़ उतार जाणून घ्यायचे एक गणिती तंत्र
आज आपण थोड़े ज्योतिष शास्त्रातील दशा पध्दति चे विश्लेषण करणार आहोत. आपण बऱ्याच वेळा ऐकत असतो, काय दशा झाली आहे त्याची. दशा म्हणजे स्थिती. आपली आयुष्यात काळा नुसार चांगली अथवा वाईट स्थिती बदलत राहते. वाईट काळ कधी संपेल व चांगला काळ कधी असेल हे आधीच जाणून घ्यायची माणसाला नेहमीच उत्सुकता वाटत आली आहे. दशा पद्धति म्हणजे आयुष्यातील चढ़ उतार नक्की केव्हा असतील है जाणून घ्यायचे एक गणित तंत्र.
पूर्वीच्या काळी हिंदू ज्योतिष शास्त्र कारांनी विंशोत्तरी, अष्टोत्तरी, योगिनी, पाराशरी अशा ४३ विविध प्रकारच्या दशा शोधल्या होत्या. नंतर काळाच्या ओघात या पद्धति लोप पावल्या. सध्या विंशोत्तरी, अष्टोत्तरी आशा मोजकया दशा प्रचलित आहेत.
जसे ३६० अंशाचे १२ विभाग केले असता राशी चक्र तयार होते, तसेच ३६० अंशाचे २७ नक्षत्रांमधे विभाजन करून नक्षत्र चक्र तयार होते. एका ग्रहाच्या मालकीची ३ नक्षत्रे असतात. या नक्षत्र चक्र आणि राशी चक्राची फ़ार सुंदर गुफ़ण करण्यात आली आहे. थोड्क्यात १ नक्षत्र म्हणजे १३ अंश २० कला चा एक विभाग. सहाजिकच राशीफ़लात सुक्ष्मता आणण्यासाठी नक्षत्र विभागाचा उपयोग होतो. या नक्षत्रांचा क्रम ठरलेला असतो. मेष राशीतील अश्विनी हे पहिले नक्षत्र जे केतूचे आहे तिथुन सुरु होऊन केतू, शुक्र, रवी, चंद्र, मंगळ, राहू, गुरु, शनी, बुध व परत केतू पासून बुध पर्यंत असा ३ वेळा ९ ग्रह मिळून २७ नक्षत्रांचे एक चक्र पूर्ण होते. थोडक्यात ९ ग्रहांची एक माला १२० अंशात पूर्ण होते. १२० अंश गुणिले ३ माला बरोबर ३६० अंश.
अशी रचना करण्याचे काय कारण असावे हे मला विशोत्तरी दशेचा अभ्यास करताना लक्षात आले. विशोत्तरी दशा ही एक सुक्ष्मता व अचुकता देणारी नक्षत्राधारित कालमापन पध्दति आहे. १२० वर्ष हे माणसाचे जास्तीत जास्त आयुष्य मानुन ते या नक्षत्र मालेशी संबंधित आहे. जन्मकाळी चंद्र ज्या नक्षत्रात असेल तिथुन त्या नक्षत्राच्या मालकीच्या ग्रहाची महादशा सुरु होते. प्रत्येक महादशेची वर्षे ही ठरलेली आहेत. केतू ७ बर्षे, शुक्र २० वर्षे, रवी ६ वर्षे, चंद्र १० वर्षे, मंगळ ७ वर्षे, राहू १८, गुरु १६, शनी १९, बुध १७ असे मिळून १२० वर्षे १२० अंश पूर्ण होतात. याप्रमाणे जन्मदशा अंशात्मक विभाजन करुन अंतर्दशा, विदशा, सुक्ष्म दशा, प्राण दशा ई. शोधतात. व त्यामुळे कुंडलीत दिसत असलेले एखादे फ़ळ अथवा योग उदा. विवाह योग, संतती योग कधी प्राप्त होईल याचे अगदी वर्ष, महीना, दिवस असा सुक्ष्म अनुमान घेता येते. यासाठीच अंशात्मक जन्मकुंडली व्दारे वर्तवलेले फ़ळ गोचर फ़ळांपेक्षा बहुतांशी जास्त सुक्ष्म व अचुक येते असा अनुभव आहे.
धन्य ते आपले पूर्वज ज्यांनी अवघ्या मानव जगताचे आकलन एका जन्मकुंडली व्दारे रेखाटले.
– ज्योतिषमित्रमिलिंद
वा छानच माहिती मिळाली 🙏
स्मिता चौकीदार
LikeLiked by 1 person
Chhan mahiti dili 👍👌
Deepali Karanjkar
LikeLiked by 1 person
खूप छान माहिती ज्योतिष मित्र मिलिंद 👌🏻🙏🏻
सुनील उमराणी कराड
LikeLiked by 1 person
Thank you for the nice information…👍
LikeLiked by 1 person
अगदी बरोबर ज्योतिष मित्र मिलिंद…
LikeLiked by 1 person
अगदी उपयुक्त माहिती ,गुरुजी
धन्यवाद 🙏
गुरुजी आपल्याला भेटायची संधी मिळेल का ?
मी शिरवळ मध्ये राहायला आहे.
दिपक लाळे
LikeLiked by 1 person
उदाहरण देउन सांगीतले तर जास्त समजेल.
छान माहीती.धन्यवाद….🙏👍
LikeLiked by 1 person
छान उपयुक्त माहिती दिलीत आपण…
गुरू माऊली धन्यवाद 🙏
LikeLiked by 1 person
कुंभ राशीत पूर्वा भाद्रपद चे दोन चरण येतात.ते दाखवले नाहीत असे वाटते
LikeLiked by 1 person
Anilkumar Deshpande he schematic drawing ahe fakt…ready image…👍😊
LikeLike
Anilkumar Deshpande दोन नसुन तीन चरण कुंभेत असतात.
LikeLiked by 1 person
काही ज्योतिषी महादशा पाहत नाही तर चालू गोचर पाहून भविष्य सांगतात.
LikeLiked by 1 person
Ajit Wankhede भविष्य कथन करण्याच्या अनेक पद्धती आहेत, दशा, गोचर, ताजिक, के.पी. ई. प्रत्येकाचा तो अनुभवाचा भाग आहे..
LikeLike
Ajit Wankhede के.पी त तर गोचरीत ही महादशा अंर्तदशा पाहिल्या जातात.
LikeLiked by 1 person
वाह,खूप छान ज्योतिष विद्येचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त
LikeLiked by 1 person
Thank you for the information
LikeLiked by 1 person
सॉल्लिड इन्फॉर्मेशन आहे ही सर
LikeLiked by 1 person
Mast ch article ahe sir
LikeLiked by 1 person
Sundar रित्या mahiti mandali ahe.
LikeLiked by 1 person
माहिती खुपच छान लिहिली आहे
LikeLiked by 1 person
माहिती आवडली कृपया ह्या वर आणखी पुढची सखोल माहिती द्यावी 🙏
LikeLiked by 1 person